Jack Fischer अंतराळ स्थानकातून संवाद साधताना फोटो -नासा संस्था
नासा संस्था -10 जुलै
सध्या नासाच्या अंतराळ मोहीम 52 चे अंतराळवीर अंतराळ स्थानकात राहून संशोधन करत आहेत
ते तिथे कसे राहतात? काय खातात? त्यांची दिनचर्या कशी असते ?त्यांच्या कामाच स्वरूप काय ?असे प्रश्न साऱ्यांनाच सतत पडत असतात आणि वेळोवेळी नासा संस्थेमार्फत विध्यार्थी,नागरिक ,संस्थेतील पदाधिकारी ह्या अंतराळवीरांशी लाईव्ह टेलीकास्ट द्वारे संवाद साधत ह्या प्रश्नांचे निरसन करत असतात
नुकतेच नासा संस्थेने पत्रकारांना ह्या अंतराळ वीरांसोबत लाईव्ह टेलिकास्टद्वारे संवाद साधण्याची संधी दिली तेव्हा अंतरराळवीर Jack Fischer ह्यांनी पत्रकारांना अंतराळवीरांच्या स्पेस लाईफ बद्दल माहिती देत साधलेला हा मोकळा संवाद
4 जुलैला तुम्ही पाठवलेले फोटो पाहिले त्यात तुमची आनंदी मुद्रा दिसतेय! तुम्ही फोटो शूट ,विडिओ ह्या व्यतिरिक्त सेलिब्रेशन करण्यासाठी आणखी काय केल ? की कामच केलत ?
हो ! आम्हाला खूप काम होत ,आहे ! नुकताच अंतराळ स्थानकात Space X कार्गोशिप आल त्यात सायंटीफिक प्रयोगासाठी लागणार साहित्य होत ते सेटअप केलं शिवाय इथे सुरु असलेल्या संशोधनात्मक प्रयोगाचे सॅम्पल्स पृथ्वीवर पाठवण्यासाठी तयार केले आणखीही खूप कामे आहेत
Peggy Whitson ह्यांचा अंतराळ स्थानकातील कार्यकाळ वाढवण्यात आलाय त्यांच्या बरोबर काम करण्याचा अनुभव कसा आहे ?
Peggy सायंटिस्ट आहे,अनुभवी आहे,ती खूप उत्साही पण आहे तिच्यात चार माणसांचं काम एकटीन करण्याची क्षमता आहे म्हणूनच तीच काम आम्हाला प्रेरित करत आमच्या सगळ्यात ती जास्त अनुभवी असल्यामुळे ती आमच्या साऱ्यांच्याच संशोधनात सहभाग नोंदवते तीच कुशल नेतृत्व आम्हाला उपयोगी पडत आम्हाला आमच काम खूप आवडत त्या मुळेच आम्ही निष्ठेने संशोधन करू शकतो
लाँचिंगचा पहिला अनुभव कसा होता ? तुला अपेक्षित तसाच अनुभव होता कि वेगळा ?
तो अदभुत अनुभव होता ! सुरवातीला लाँचिंग नंतर झटका बसला अन आठ मिनिटानंतर वजनविरहित अवस्था व्हायला सुरवात झाली बाहेरच दृश्य कल्पनातीत होत! समोर अंतराळस्थानक दिसत होत त्यात आपण वास्तव्य करणार आहोत हि बाबच क्षणभर अविश्वसनीय वाटली स्वप्नवत वाटली !
स्पेस स्टेशन मधला दिवस कसा सुरु होतो ?
सकाळी लवकर सहाला उठून आम्ही फ्रेश होतो नंतर व्यायाम करतो कारण मायक्रो ग्रॅव्हिटीमुळे शरीरावर विपरीत परिणाम होतो तिथे नेहमीच्या शारीरिक हालचाली नसतात त्या मुळे हाडांवर परिणाम होतो इथे व्यायामाची साधने आहेत नंतर कामाला सुरवात होते
तुझा अर्धा कार्यकाळ आता संपत आलाय तरीही स्थानकात राहताना भीती नाही का वाटत ?
सुरवातीला भीती तर वाटतेच पण हळू हळू सवय होते स्वत:बरोबर स्थानकातील सिस्टीम वर विश्वास ठेवावा लागतो इथल्या सर्वच सिस्टीम आपल्या नियंत्रणात नसतात जगभरातल्या कुशल शास्त्रज्ञाच्या टीमवर आम्ही विसंबून असतो कधीही काहीही होऊ शकत ह्याची भीती तर असतेच पण म्हणून घाबरून त्याचाच विचार करत बसल तर कामावर लक्ष कस केंद्रित करणार ?
तुझा स्पेसवॉकचा अनुभव कसा होता buoyancy lab मध्ये कठीण प्रॅक्टिस केली होतीस ? प्रत्यक्ष अनुभव कसा होता ?
मला buoyancy lab मध्ये प्रॅक्टिस करताना खूप मजा आली होती प्रत्यक्षात स्पेसवॉकच्या वेळेसचा अनुभवही मजेशीरच होता आम्ही नेहमीच स्थानकातून खिडकी बाहेर पहात असतो पण प्रत्यक्ष अंतराळात जाण म्हणजे ,अदभूत अद्वितीय अवर्णनीय अनुभव होता तो ! वाव ! काय अलौकिक दृश्य असत !अंतराळात फक्त आपण एकटेच, आजूबाजूला कोणीच नाही,सोबतीला आकाशातील असंख्य तारे,दूरवर ब्रह्मांडात खोल आकाशगंगा वातावरणात निरव शांतता अगदी स्वप्नात पाहतो तस प्रात्यक्षातल दृश्य, एक वेगळाच अविस्मरणीय अलौकिक अनुभव असतो तो आगळ वेगळं विश्वदर्शन होत खाली नजर टाकताच पृथ्वीच पूर्ण रूप पहायला मिळत ते अदभुत सौन्दर्य पहातानाचा अनुभव आनंददायी असतो ,पुन्हा: पुन्हा तिथे जावस वाटत !
स्पेस स्टेशन मधली सगळयात उत्तम गोष्ठ कोणती ? आणि वाईट कोणती ? दोन्हीही अनुभव शेअर कर
वाईट म्हणाल तर माझी बायको माझ्यासोबत नाही,तिची उणीव भासतेच तिच्या असण्यान आयुष्यात खूप फरक पडतो !
आणि चांगली गोष्ठ म्हणाल तर मला उडायला अत्यंत आवडत.आणि अत्याधिक आवडीची गोष्ठ म्हणजे इथे रोज नवनवीन गोष्ठी करायला मिळतात नवीन वैज्ञानिक प्रयोग करायला मिळतात हे वैज्ञानिक संशोधन मानवी आरोग्याशी निगडित आणि उपयुक्त असल्यामुळे चांगल वाटत आता सुद्धा Peggy दुसऱया रूममध्ये कॅन्सर lang Tissue culture वर संशोधन करतेय त्याचा फायदा cancer वर प्रभावी उपचारासाठी होईल हे काम निश्चितच अभिमानास्पद आहे समाधानकारक आहे
सध्या स्पेसस्टेशन मध्ये तुम्ही तिघेच आहात त्या मुळे बरीच मोकळी जागा आहे पण लवकरच स्थानकात आणखी तिन अंतराळवीर येतील तेव्हा जागा कमी होईल ह्याच दुःख होईल कि आपल्या मदतीला आणखी तीन जण आल्याचा आनंद ?
सगळ्याच बाबीला चांगली वाईट बाजू असतेच तसाच जागेचा प्रॉब्लेम होईल पण तरीही आम्ही ह्या नवीन अंतराळवीरांच्या येण्याची उत्सुकतेने वाट पाहतोय आता स्थानकाचा पूर्ण क्षमतेने वापर होईल आणि आम्ही सर्वजण मिळून करणार असलेल्या संशोधनात्मक प्रयोगाबद्दल देखील मला उत्सुकता आहे
स्पेस स्टेशन मध्ये तुम्ही फक्त कामच करत असता मग ,कामाचा थकवा घालवण्यासाठी तुम्ही मिळालेल्या मोकळ्या वेळेचा कसा उपयोग करता ?
अंतराळ स्थानकात सिनेमा पाहताना अंतराळवीर -फोटो -जॅक आणि पेगी -नासा संस्था
आम्ही कधी कधी शुक्रवारी रात्री picture पाहतो त्या साठी स्थानकातील projector चा वापर करतो आम्ही तात्पुरती सिलींगवर screen लावतो Peggy ने lounge chairs तयार केल्या आहेत ज्यावर बसून आम्ही सिलींगवर लावलेल्या स्क्रीनवर सिनेमा पाहतो आम्ही आमच्या कुटुंबियांशी संपर्क साधत त्यांच्याशी बातचीत करतो कधी फोटो काढतो एकूणच मोकळा वेळ मिळाला तरीही आम्ही बिझीच असतो

No comments:
Post a Comment