Thursday 27 April 2017

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump ह्यांनी अंतराळवीरांगना Peggy Whitson ह्यांचे केले अभिनंदन

          अमेरिकेचे अध्यक्ष Donald Trump ,त्यांची कन्या Ivanka आणि अंतराळ वीरांगना Kate Rubins
              Peggy आणि Jack ह्यांच्याशी फोनवरून संपर्क साधताना -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -  25 एप्रिल
Peggy  whitson आता तिसऱयांदा अंतराळ स्थानकात दीर्घ मुक्काम करणार आहेत त्यांनी सतरा नोव्हेंबरला अंतराळ स्थानकात राहण्यासाठी प्रयाण केले होते आतापर्यंत पेगीनीं 377 दिवस स्थानकात मुक्काम केला आहे महिलांमध्ये सर्वात जास्तवेळा स्पेसवॉक करण्याचा विक्रमही त्यांनी नुकताच स्थापित केला आहे शिवाय त्या दुसऱयांदा अंतराळ स्थानकात राहून कमांड करणाऱ्या पहिल्या महिला अंतराळवीरांगना ठरल्या आहेत 24 एप्रिलला Jeff  Williams यांचा 2008 मधला 534 दिवस अंतराळ स्थानकात राहण्याचा विक्रम  Peggy ह्यांनी मोडला आहे

                          अंतराळ वीरांगना Peggy Whitson 2001 च्या अंतराळ मोहिमेच्या तयारी दरम्यान
                                                                                                                फोटो -नासा संस्था
Peggy ह्यांच्या ह्या अतुलनीय अभिमानास्पद कामाच कौतुक करण्यासाठी अमेरिकेचे  राष्ट्राध्यक्ष Donald Trump  ह्यांनी अंतराळवीरांगना Peggy Whitson ह्यांच्याशी  24  एप्रिलला फोनवरून लाईव्ह संपर्क साधला आणि त्यांच्या ह्या धाडसी यशाच कौतुक करून त्यांच्या पाठीवर अभिनंदनाची थाप दिली व त्यांच्याशी फोनवरून संवाद साधत तिथे सुरु असलेल्या संशोधनाची माहितीही घेतली
राष्ट्राध्यक्ष  Donald Trump ह्यांच्या सोबत त्यांची जेष्ठ कन्या Ivanka Trump आणि नासाची अंतराळवीरांगना Kate Rubins  देखील ह्या लाईव्ह संवादात सहभागी झाल्या होत्या
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ह्यांनी प्रथम पेगीचे ह्या यशाबद्दल अभिनंदन केले ट्रम्प म्हणाले कि,Peggy Whitson आजच्या तरुणींसाठी रोल मॉडेल आहेतच तसेच त्या सर्वच युवा वर्ग आणि नागरिकांसाठीही प्रेरणादायी आहेत विशेषतः जे नागरिक व विद्यार्धी स्टेम Education व Program मध्ये सहभागी आहेत ते पुढे म्हणाले कि, मी ह्या आधीच अमेरिका महान राष्ट्र होण्यासाठी व देशाचा विकास होण्यासाठीच्या कामात महिलांचा सहभाग होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले होते Peggy ह्यांच्या ह्या रेकॉर्ड ब्रेक यशाने ह्या मताला बळ मिळाले आहे
त्याचा मला आनंद होतोय!
संवादाच्या वेळी नुकत्याच स्थानकात पोहोचलेल्या अंतराळवीरांसोबत नासाने पेगीचे अभिनंदन करणारे बॅनर पाठवले होते ते स्थानकात मागे लावले होते स्थानकातून Peggy Whitson आणि वीस तारखेला स्थानकात पोहोचलेले नासाचे अंतराळवीरJack Fischer ह्यांनी Donald Trump ह्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली
Donald Trump ह्यांनी Peggy Whitson  व Jack Fischer ह्यांच्याशी साधलेला हा संवाद
Donald Trump -  Congratulations  Peggy ! हा विक्रम प्रस्थापित केल्यावर कसे वाटतेय ?
Peggy -  Thanks !  हे यश माझ्यासाठी खूपच गौरवास्पद आहे !  आणि हे यश माझ्या एकटीचे नसून नासाच्या पूर्ण टीमचे आहे आणि मला त्यांचे कौतुक वाटते मी खूप आनंदी आणि उत्साहित आहे माझ्यासाठी हा काळ खूप छान आहे !  इथे केलेल्या संशोधनाचा उपयोग आगामी अंतराळ मोहिमांसाठी विशेषतः मंगळ मोहिमेसाठी होणार असल्याने मी एक्सायटेड आहे !
Donald  - Space मध्ये राहून तुम्ही काय शिकत आहात? मला माहितीय कि तुम्ही स्थानकात राहून वेगवेगळे प्रयोग करताय पण त्याचे नेमके परिणाम व त्याचे फलित कसे मिळेल? हे मला जाणून घ्यायचेय !
Peggy -सध्या आम्ही सोलर पॅनल द्वारे पाण्यातील Oxygen आणि Hydrogen वेगळे करून Oxygen Breathing साठी तर hydrogen व Co2एकत्रित करून पुन्हा पाणी तयार करण्याचा आणि इतरही प्रयोगाने पाणी परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत कारण स्थानकात पाणी पृथ्वीवरून येत आणि ते अत्यल्प असत स्थानकातील सध्याचे प्रयोग आगामी दूरवरच्या अंतराळमोहिमांसाठी सेतू सारखे आहेत आगामी दूरवरच्या सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात अंतराळ स्थानकात राहून संशोधन करताना मानवाला येणारया अडचणींवर मात करून तिथे तग धरून जास्त दिवस निवास करण्यासाठी इथले प्रयोग उपयुक्त ठरतील तसेच ह्या मोहिमांसाठी लागणारे आधुनिक संशोधित तंत्रज्ञान, त्यासाठीचे कसब व कसोटीचा उपयोगही अशा आगामी दूरवरच्या अंतराळमोहीम आणि ग्रहावर निवास करण्यासाठी मानवाला होईल

          अंतराळ वीरांगना  Peggy अंतराळ स्थानकातील फिरत्या प्रयोग शाळेत संशोधन करताना
                                                                                                                           -फोटो -नासा संस्था

Donald -मला आगामी मंगळ मोहिमेबद्दल सांगा,ती केव्हा प्रत्यक्षात येईल काही Schedule ठरले आहेत का ?
Peggy - अंदाजे  2030 मध्ये हि मोहीम यशस्वी होईल त्यासाठी सध्या पृथ्वीवर नासा संस्थेत वेगवेगळे Hardware तयार करण्यात येत आहेत S LS Rocket Launch पण आहे हे सर्व सध्या टेस्ट फ्लाईट साठी तयार होत आहेत अशा मोहिमा दीर्घ कालीन आणि खर्चिक असतात त्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य सुद्धा लागत

       अंतराळ वीरांगना Peggy Whitson  मार्च 2017  मध्ये  रेकॉर्ड ब्रेक स्पेसवॉक दरम्यान -फोटो- नासा संस्था

Donald -माझी इच्छा आहे कि माझ्या पाच वर्षांच्या कार्यकाळात हि मोहीम पूर्ण व्हावी किंवा कदाचित पुढच्या पाच वर्षात !
Peggy -आम्ही आमचे सर्वस्व पणाला लावून हि मोहीम लवकर पूर्ण करण्याचा व यशस्वी करण्याचा आटोकाट प्रयत्न करू
Trump - मला माहितीय तुम्ही ते कराल मला तुमच्याबद्दल आदर व अभिमान वाटतोय! आता आपल्या सोबत Kate Rubins पण आहेत अंतराळ स्थानकात राहून DNA sequence वर संशोधन करणारया त्या नासाच्या पहिल्या महिला अंतराळवीर आहेत आम्हाला त्या बद्दल आणखी माहिती सांगाल का?
Kate Rubins -नक्कीच! हे संशोधन अत्यंत महत्वाचे आहे तंत्रज्ञान व विज्ञान मिळून अत्यंत प्रगत संशोधन करता येउ शकत ह्याच हे उत्तम उदाहरण आहे हे फक्त प्रात्यक्षिक नाही  तर ह्या संशोधनाच्या आधारे स्थानकात Microbs शोधता येतील शिवाय ह्याचा उपयोग Health Science मध्येही होईल
Ivanka Trump- Congratulations Peggy ! तुम्हाला माहिती असेलच माझ्या डॅडनी Inspire Women Act वर साइन केलय ह्या द्वारे स्टेम एज्युकेशन व करिअर मध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यावर भर दिलाय
इथे Kates पण आहेत मला तुमच्या दोघींची ह्या क्षेत्रात येण्यामागची प्रेरणा कोणती होती हे जाणून घ्यायला आवडेल !
Kate - मी पंधरा वर्षांची असताना एका DNA Conference मध्ये भाग घेतला होता तेव्हा मला त्यात आवड निर्माण झाली आणि Science Scientist, Biology ,DNA ह्या विषयी औसुक्य आणि आवड निर्माण झाली
Peggy -Apollo Program हे माझे प्रेरणास्थान होते माझी शाळा,college,माझे guide ह्या सगळ्यांनीच माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत केली खूप सहकार्यही केले
Trump - मी नुकतेच NASA चे मानव सहित मार्स मिशन बिल साइन केलेय तुमच्या पैकी कोण मंगळावर जाण्यास उत्सुक आहे Kate तर तयार आहेतच
Peggy -Jack -आम्ही दोघेही तयार आहोत आणखी खूप शास्त्रज्ञ ,अंतराळवीर ह्या मिशनवर काम करत आहेत त्याला अजून बरीच वर्षे लागतील
Ivanka Trump- मला एका गोष्टीची खूप उत्सुकता आहे आणि मला खात्री आहे कि अनेक जणांना हे जाणून घ्यायला आवडेल कि, अंतराळ स्थानकात अंतराळवीरांचा दिवस कसा असतो ?
Peggy -मी रोज उठल्यानंतर Messages check करते पृथ्वीवर आमची खूप मोठी सपोर्ट टीम आहे जी आमची Schedule ठरवते त्या प्रमाणे आम्ही दिवसभर काम करतो इथल्या दोनशेच्या वर सुरु असलेल्या प्रयोगात सहभागी होतो कधी रोबोटिक वर काम करतो तर कधी दुसरे कुठले काम असते रोज इथे आव्हानात्मक वेगवेगळे काम करायला मिळते हीच खरी गंमत असते जॅक आताच आलाय तो अधिक माहिती देईल
Jack -पृथ्वीपेक्षा इथला दिवस वेगळा असतो आम्ही वेगवेगळे प्रयोग करतोच तसेच अंतराळस्थानकातल्या वास्तव्यातील गमतीजमती पण एन्जॉय करतो मी जिथे व्यायाम करतो तिथे एक खिडकी आहे तिथुन दिसणारी वेगवेगळी दृश्ये पाहताना मजा येते इथले काम अत्यंत कठीण आहे आणि राहणे त्याहून कठीण पण माझे डॅड म्हणायचे तूम्ही जेव्हा आवडीचे काम करता तेव्हा तुम्हाला कष्ठ जाणवत नाहीत
Donald -आताचा काळ अमेरिकेसाठी खूप आशादायक आहे अंतराळ विज्ञान ,मिलिटरी आणि अंतराळ क्षेत्रात बरेच व्यावसायिक उतरत आहेत तुम्हाला काय वाटते त्यांनी ह्या क्षेत्रात याव कि अन्य व्यवसाय करावा?
Peggy -Jack - खरंच हे क्षेत्र अत्यंत आव्हानात्मक आहे!  मला वाटते विद्यार्थ्यांनी आधी वेगवेगळ्या तंत्रज्ञानात प्रगत होऊनच अंतराळ मोहिमेत सहभागी व्हाव
Jack -हो खरय ! आता Space X सारखे बरेच खाजगी व्यवसायिक ह्या क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत ते चांगेच आहे ह्या मुळे पायाभूत सुविधा निर्माण होतील व दुरवरच्या अंतराळ मोहिमेसाठी मदत होईल नासा तर उत्तम काम करत आहेच
Donald - जॅक तुम्ही नुकतेच स्थानकात पोहोचला आहात तुमचा प्रवास कसा होतो सोपा त्रासदायक कि अवघड ?
Jack -प्रवास अत्यंत अदभुत आहे! अवर्णनीय आहे! मी रशियन यानातून रशियन अंतराळवीरांसोबत पृथ्वीवरून कझाकस्थानातून निघून सहा तासांनी इथे पोहोचलो इथल्या संशोधनात व्यग्र अंतराळवीरांना पाहिलं कार्गो डॉकिंगसाठी रोबोटिक ऑपरेट करताना पाहिलं आणि आता स्थानकातील भिंतीला लटकून अमेरिकेच्या प्रेसीडेंटशी बोलतोय सारच अमेझिंग आहे माझ्यासाठी आणि अभिनंदनीयही आहे !

Saturday 22 April 2017

26 एप्रिलला शनी ग्रहावर होणार कॅसिनी यानाच्या ग्रँड फिनालेची सुरवात

    शनी ग्रह व त्याच्या कड्याभोवती भ्रमण करणारे Cassini  यान   फोटो -नासा संस्था


 नासा संस्था -21 एप्रिल
शनिग्रह व त्याच्याभोवतीच्या कड्यांचे गूढ उकलण्यासाठी शास्त्रज्ञ वर्षानुवर्षे प्रयत्न करत आहेत अमेरिकेच्या नासा संस्थेने वीस वर्षांपूर्वी पृथ्वीवरून शनिग्रहावर पाठवलेल्या आणि आजपर्यंत सतत कार्यरत असलेल्या कॅसिनी ह्या अंतरिक्ष यानाचा आता 26 एप्रिलला ग्रँड फिनाले होणार आहे
शनी ग्रह,त्याच्या भोवतीचे कडे तेथील वातावरण आणि तिथल्या जीवसृष्टीच्या अस्तित्वाची शक्यता ह्या विषयी सखोल माहिती मिळवण्यासाठी वीस वर्षांपूर्वी नासाने कॅसिनी अंतराळ यान पृथ्वीवरून शनीग्रहावर पाठवले होते सात वर्षांच्या प्रवासानंतर ते शनिग्रहाच्या कक्षेत पोहोचले आणि गेल्या तेरा वर्षांपासून हे यान शनीभोवती अविरत भ्रमण करत असून तिथली इतंभूत माहिती पृथ्वीवर पाठवत आहे
शनीच्या  Enceladus ह्या चंद्रावरील बर्फ़ाळ प्रदेशात जागतिक महासागर असून त्याचा दुसरा चंद्र Titan वर  देखील द्रव्य रूपातील मिथेनचा महासागर वहात असल्याचे संकेत कॅसिनी यानाने दिले असून ह्या संदर्भातील महत्वपूर्ण माहिती कॅसिनी यानाने पृथ्वीवर पाठवली आहे
अनेक चक्रीवादळांना तोंड देत आणि अनेक ग्रह पार करीत शनीपर्यंत पोहोचलेल्या आणि अविरतपणे शनीभोवती भ्रमण करत सतत शनीची माहिती पृथ्वीवर त्वरित पोहोचवणाऱया कॅसिनी यानाचे इंधन आता मात्र संपत आलय त्यामुळेच आता हे मिशन संपवण्याचा निर्णय नासाच्या खगोल शास्त्रज्ञांनी घेतला आहे येत्या 26 एप्रिलला ह्या कॅसिनी यानाचा ग्रँड फिनाले होणार आहे

                 शेवटच्या टप्यातील कॅसिनी यान  21 एप्रिलला शनीच्या Titan  चंद्राच्या अत्यंत जवळून जाताना
                                                                                                                                  फोटो -नासा संस्था
कॅसिनी यान शनीला धडकणार 
शास्त्रज्ञांनी हे यान नष्ट करण्यापूर्वी कॅसिनीला शनिग्रहाच्या कक्षेत धडकवून यानाचा शेवट करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे सव्वीस एप्रिलला बुधवारी ह्या ग्रँड फिनालेची सुरवात होईल तेव्हा कॅसिनी यान शनी ग्रह व त्याच्या कड्यामधील 1500 मैल रुंद पट्यात शिरेल
नासाच्या वॉशिंग्टन येथील सायंन्स मिशनचे असोसिएट Administrator Thomas Zurbuchen म्हणतात
कि, " आजवर एकही यान शनीच्या कक्षेत शिरले नाही पण आम्ही मात्र हे धाडस बावीसवेळा करणार आहोत ह्या धाडसामुळे ब्रम्हांडातील मोठे ग्रह व ग्रहमालांच्या उगमाचे रहस्य उलगडेल " ह्या कॅसिनी यानाचा शेवट जरी झाला तरी तो नवीन मोहिमेसारखाच असेल
इतक्या वर्षांमध्ये कॅसिनीने मिळवलेल्या माहितीच्या आधारे कॅसिनीच्या इंजिनीअर्सनी Flight Plan तयार केला आहे  15 सप्टेंबरला कॅसिनी यान शनिग्रहावर आढळेल ( उतरेल ) दरम्यान ह्या पाच महिन्यांच्या प्रवासात कॅसिनी मार्फत शनीविषयी जास्तीतजास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल शनी ग्रहाची अंतर्गत रचना ,त्याच्या कड्यांचा उगम ,तेथील वातावरणातील सॅम्पल्स मुख्य कड्यातील पार्टिकल्स ,तसेच शनिग्रहावरील ढगांचा जवळून वेध घेतला जाईल
सद्या नासाचे इंजिनीअर्स कॅसिनीच्या अंतिम ग्रँड फिनालेची तयारी करण्यात गुंतले आहेत त्या साठी कॅसिनी यानातील रोबोटिक प्रोब ला आवश्यक ते निरीक्षण करण्यासाठी कमांड देण्यात येईल
22 एप्रिलला कॅसिनी यान  Titan ह्या शनीच्या चंद्राच्या अतिशय जवळून प्रवास करेल तेव्हा Titan च्या गुरुत्वाकर्षणाच्या परिणामामुळे कॅसिनीची भ्रमण कक्षा थोडीशी झुकेल त्यामुळे हे यान कड्यांच्या बाहेरून न फिरता ग्रह व कड्यांच्या आतल्या कक्षेत पोहोचेल
शास्त्रज्ञाच्या माहितीनुसार ह्या प्रक्रियेत अडचणी येणार नाहीत असा प्राथमिक अंदाज आहे पण तरीही आवश्यक ती सावधगिरी बाळगली जाईल यानासमोरील अँटेना द्वारे मार्गाची सुरक्षितता तपासल्या जाईल काही अनपेक्षित धोके टाळण्यासाठी हे धाडस मोहिमेच्या शेवटी करण्यात येणार आहे 15 सप्टेंबरला यान  जेव्हा शनी वर धडकेत तेव्हा जोवर हे यान पूर्णपणे नष्ठ होत नाही तोवर त्यातील वेगवेगळ्या उपकरणाद्वारे हे यान शेवटपर्यंत पृथ्वीवर माहिती पाठवत राहील

          कॅसिनी यान ग्रँड फिनालेच्या क्षणी शनी आणि त्याचे कडे ह्यांच्या मध्ये बावीस वेळा भ्रमण करेल 
                                                                                                                              फोटो -नासा संस्था 
शास्त्रज्ञांच्या दृष्टीने कॅसिनी यानाचा ग्रँड फिनाले अत्यंत उत्कंठावर्धक असेल ह्या मोहिमेच्या साहसासाठी हि योग्य निवड आहे असे नासाच्या शास्त्रज्ञांना वाटतेय 


Friday 14 April 2017

Peggy Whitsonचा अंतराळस्थानकातील मुक्काम तीन महिन्यांनी वाढला

       अंतराळ वीरांगना Peggy Whitson  स्थानकात जास्तही दिवस राहण्याच्या आनंदात फोटो -नासा संस्था

नासा संस्था -
आधीच जास्ती दिवस अंतराळ स्थानकात राहण्याचा विक्रम करणारी नासाची अंतराळ मोहीम 50 ची सध्याची कमांडर Peggy Whitson हीचा अंतराळस्थानकातील मुक्काम आणखी तीन महिन्यांनी वाढला आहे
अमेरिकेच्या नासा आणि रशियाच्या Roscosmos एजन्सीजने नुकतेच Peggy च्या स्थानकातील वाढीव तीन महिन्याच्या वास्तव्यास मंजुरी देऊन त्यावर शिक्कामोर्तब केले
आधी ठरल्याप्रमाणे Peggy रशियाचे अंतराळवीर Oleg Novitsky आणि युरोपियन अंतराळवीर Thomas Pesquet ह्या दोन अंतराळवीरांसोबत जूनमध्ये पृथ्वीवर परतणारहोती पण आता तीन महिन्यानंतर ती नवीन दोन अंतराळवीरांसोबत पृथ्वीवर पोहोचेल
पेगीच्या न येण्याने परतीच्या सोयूझ अंतरिक्ष यानातील एक सीट रिकामी राहणार असली तरी अंतराळ स्थानकात मात्र सहा अंतराळवीर एकत्र राहून तिथे सुरु असलेले महत्वाचे संशोधन पूर्ण करतील
पेगी म्हणते," मला आता खूप आनंद होतोय कारण मला स्थानकात राहून संशोधन करायला खूप आवडते स्थानकातील हा काळ कधीच संपू नये तर हे क्षण स्तब्ध व्हावेत सरूच नयेत असे मला वाटतेय!  " स्थानकातील नव्या संशोधनाच्या कामात सहभाग नोंदवणे माझे कित्येक दिवसाचे स्वप्न आहे जास्ती दिवस इथे राहायला मिळाल्यामुळे ते आता पूर्ण होईल
नासाच्या इंटरनॅशनल स्पेस सेंटरचे प्रोग्राम मॅनेजर म्हणतात," पेगीचा उत्साह,तिचा अनुभव आणि तिची बुद्धिमत्ता विलक्षण आणि अतुलनीय आहे! तिच्या स्थानकातील वाढीव वास्तव्यामुळे आमच्या रिसर्च आणि टेक्नॉलॉजी डेव्हलपमेन्टला फायदा होईलच शिवाय तिच्या संशोधनाचा फायदा आमच्या कमर्शियल आणि इंटरनॅशनल पार्टनर्सनांही होईल "
Peggy  तिसऱयांदा अंतराळ स्थानकात दीर्घ मुक्काम करणार आहे तिने सतरा नोव्हेंबरला अंतराळ स्थानकात राहण्यासाठी प्रयाण केले होते आतापर्यंत तिने 377 दिवस स्थानकात मुक्काम केला आहे
महिलांमध्ये सर्वात जास्तवेळा स्पेसवॉक करण्याचा विक्रमही तिने नुकताच केला आहे शिवाय आता ती दुसऱयांदा अंतराळ स्थानकात राहून कमांड करणारी पहिली महिला अंतराळवीरांगना ठरली आहे
आणि 24 एप्रिलला Jeff  Williams यांचा 2008 मधला 534 दिवस अंतराळ स्थानकात राहण्याचा विक्रम  Peggy तोडेल 

Wednesday 12 April 2017

अंतराळवीर Shane Kimbrough ,Andry Borisenko आणि Sergey Ryzhikov सुखरूप पृथ्वीवर परतले

                 सोयूझ MS-02 तीनही अंतराळवीरांना घेऊन जमिनीवर उतरताना  फोटो -नासा संस्था

नासा संस्था -10 एप्रिल
नासाच्या अंतराळ मोहीम 50 चे कमांडर Shane Kimbrough ,Andry Borisenko आणि Sergey Ryzhikov  सोयूझ MS-02 ह्या अंतरिक्ष यानाने अंतराळ स्थानकातून पृथ्वीवर परतले आहेत
हे तीनही अंतराळवीर सोमवारी 7.30a.m. वाजता कझाकस्थानातील Dzhezkazhgan येथे सुखरूप पोहोचले
अंतराळ स्थानकातून निघण्याआधी हे सहाही अंतराळवीर निरोपाच्या क्षणी भावनावश झाले एकमेकांचा निरोप घेताना त्यांचे डोळे पाणावले होते ह्या अंतराळवीरांना घेऊन सोयूझ अंतराळयान जेव्हा पृथ्वीवर उतरत होते तेव्हा क्षणभर सार वातावरण स्तब्ध झाल पण अंतराळवीर सुखरूप पोहोचताच सारे आनंदित झाले ह्या
अंतराळवीरांना उचलून आणुन त्यांना खुर्चीवर बसवण्यात आले ,त्यांना पाणी देण्यात आले,त्यांची नाडी चेक करण्यात आली

                          अंतराळवीर Shane Kimbrough पृथ्वीवर पोहोचल्यानंतर  फोटो-नासा संस्था

ह्या अंतराळवीरांनी अंतराळ स्थानकात 173 दिवस वास्तव्य करून तिथे सुरु असलेल्या संशोधनात सहभाग नोंदवला त्यांनी अंतराळातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा मानवी शरीरातील Stem cell वर होणारया परिणामांवर सखोल संशोधन केले हे संशोधन स्थानकात राहताना अंतराळवीरांना होणारया अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी व त्यांना जखम झाल्यास ती बरी करण्यासाठी उपयुक्त ठरेल शिवाय पृथ्वीवरील मानवी आरोग्यासाठीही उपयुक्त Stem cell निर्माण करून आजारांवर नियंत्रण मिळवता येईल
अंतराळवीरांनी Tissue Regeneration- Bone Defect ह्या विषयांवरही संशोधन केले माणूस व कुरतडणारया  प्राण्यांमध्ये हाड व Tissue ह्यांची पुनर्नर्मिती होत नाही त्या मुळे तुटलेले हात ,पाय किंवा सांधे पुन्हा निर्माण होत नाहीत त्याचे नेमके शास्त्रीय कारण काय ह्या वरही संशोधन केले अधिक संशोधनाअंती त्यावरील  उपचारपद्धतीत सुधारणा करता येतील अंतराळवीर अंतराळस्थानकातील फिरत्या प्रयोगशाळेत व नासाच्या अमेरिकेतील संशोधन केंद्रात संशोधक सतत ह्या महत्वपूर्ण विषयांवर संशोधन करत आहेत
अंतराळवीर Shane Kimbrough ह्यांनी ह्या वास्तव्यात जानेवारी व मार्च मध्ये मिळून चार वेळा अंतराळस्थानकाच्या तांत्रिक कामासाठी स्पेसवॉक केला तसेच ह्या अंतराळवीरांनी अंतराळ स्थानकासाठी ,स्थानकातील प्रयोगासाठी लागणारे कित्येक टन सामान ,इंधन आणि अंतराळवीरांसाठी लागणारे अन्न आणि पाणी घेऊन आलेल्या चार कार्गो स्पेस क्राफ्टचेही स्थानकात स्वागत केले आणि त्या साठी आवश्यक डॉकिंग सुविधा निर्माण केली
Shane kimbrough ह्यांनी त्यांच्या दोनवेळच्या अंतराळ मोहिमेत 189 दिवस स्थानकात मुक्काम केला
तर रशियन अंतराळवीर Borisenko  ह्यांनीही त्यांच्या दोन अंतराळ मोहिमेत 337 दिवस स्थानकात मुक्काम केला असून दुसरे रशियन अंतराळवीर Ryzhikov ह्यांची मात्र हि पहिलीच अंतराळवारी होती आणि त्यांनी आता स्थानकात 173 दिवस मुक्काम केला आहे

नासा संस्था -11 एप्रिल 



          Johnson Space सेंटर च्या  डायरेक्टर Ellen Ochoa  Shane Kimbrough होस्टन येथे पोहोचल्यावर स्वागत करताना 

अंतराळवीर Shane Kimbrough मंगळवारी नासाच्या aircraft ने Houston येथे पोहोचले असुन तिथे त्यांचे नासाच्या जॉन्सन स्पेस सेंटरच्या डायरेक्टर Ellen Ochoa ह्यांनी स्वागत केले
रशियाचे अंतराळवीर Sergey Ryzhikov आणि Andry borisenko हे दोघेही आता मास्कोला पोहोचले आहेत 
  

Sunday 9 April 2017

नासाचे तीन अंतराळवीर 10 एप्रिलला पृथ्वीवर परतणार



                    अंतराळवीर Shane Kimbrough  पृथ्वीवर परतण्याच्या तयारीत -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -5 एप्रिल
अमेरिकेच्या नासाचे अंतराळ मोहीम 50 चे कमांडर Shane Kimbrough, रशियाचे flight Engineer Sergey Ryzhiko आणि Andry Borisonko हे तीन अंतराळवीर दहा एप्रिलला पृथीवर परतणार आहेत
हे तीनही अंतराळवीर दहा एप्रिलला दुपारी चार वाजता सोयूझ MS -02 ह्या अंतरिक्ष यानातून पृथ्वीवर परतणार आहेत दुपारी चारला त्यांचे यान स्थानकातून निघेल व सात वाजून वीस मिनिटाला कझाकस्थान येथे पोहोचेल (5.20 p.m. स्थानिक वेळ )

                 मोहीम 50 चे अंतराळवीर Snane Kimbrough Sergey Ryzhiko आणि Andry Borisonko

9 एप्रिलला नासाचे सध्याचे कमांडर Shane Kimbrough अंतराळ स्थानकाची सूत्रे flight Engineer Peggy Whitson हिच्या हाती देतील ह्या अंतराळवीरांच्या परतीचे थेट प्रक्षेपण नासा TV वरून करण्यात येईल
10 एप्रिल ला
12.15 a.m- फेअर वेल , 3.30  a.m.Undocking, 6 a.m. De orbit burn & landing coverage
9 a.m. -  Video file hatch closure,un docking & Landing activities
11 एप्रिल
12 p.m ला .- पृथ्वीवर अंतराळवीर व्यवस्थित पोहोचल्यानंतरचे लाइव टेलिकास्ट आणि Shane Kimbrough ह्यांच्याशी मुलाखतीचे थेट प्रक्षेपण करण्यात येईल
हे अंतराळवीर ऑकटोबर मध्ये अंतराळ स्थानकात गेले होते त्यांनी तिथे 173 दिवस वास्तव्य केले अंतराळ स्थानकात सध्या सुरु असलेल्या Biology .Biotechnology ,Earth Science आणि Physical Science ह्या विषयीच्या शंभरावर प्रयोगात सहभाग नोंदवून संशोधन केले व अंतराळ स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी Shane Kimbrough ह्यांनी स्पेसवॉक सुद्धा केला
आता अंतराळ स्थानकाची सूत्रे Peggy Whitson हिच्या हाती असतील तिच्या सोबत रशियन अंतराळवीर
Oleg Novitskiy  व Thomas Pesquet (E SA ) हे दोन अंतराळवीर असतील हे तिघेही आता तिथे सुरु असलेल्या प्रयोगांवर संशोधन करतील वीस एप्रिलला नवीन तीन अंतराळवीर अंतराळ स्थानकात राहण्यासाठी जातील तोवर हे तिघे अंतराळ स्थानक सांभाळतील

Saturday 8 April 2017

                          Shane Kimbrough  आणि PeggyWhitson स्पेस वॉक दरम्यान  फोटो -नासा संस्था

नासा संस्था - 30 march
नासाच्या अंतराळ मोहीम 50 चे कमांडर Shane Kimbrough आणि फ्लाईट इंजिनीअर Peggy Whitson  ह्यांनी नुकताच अंतराळ स्थानकाबाहेर स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी सात तासाचा स्पेस वॉक यशस्वी केला
ह्या स्पेस वॉक दरम्यान दोन्ही अंतराळ वीरांनी रोबोटिक आर्मच्या साहाय्याने अंतराळ स्थानकाच्या बाहेरील भागात इलेक्ट्रिक कनेक्शनसाठी केबल जोडणी केली ह्या मुळे आगामी काळात पृथ्वीवरून स्थानकात येणारया मालवाहू अंतराळ यानाच्या डॉकिंगची सोय होईल
अंतराळ वीर स्थानकातील बाहेरील उघडया भागाला चार थर्मल प्रोटेक्शन शिल्ड बसवणार होते पण दुर्दैवाने त्यातील एक थर्मल प्रोटेक्शन शिल्ड बसवताना अंतराळवीरांच्या हातून निसटले अंतराळवीरांनी ते शिल्ड पकडण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण ते शिल्ड अंतराळात उडून गेले उर्वरित तीन शिल्ड बसवण्यात मात्र अंतराळवीर यशस्वी झाले
अंतराळवीर Shane Kimbrough व Peggy Whitson अंतराळस्थानकाबाहेरील भागात स्पेसवॉक करत होते तिथल्या एका नवीन डॉकिंग पोर्टचे कनेक्शन निघाले होते हे दोन्ही अंतराळवीर त्या पार्टला झाकण्याचे काम करत होते त्याच दरम्यान त्यांच्या हातून हे शिल्ड निसटले आणि अंतराळात उडाले विशेष म्हणजे हि घटना घडण्याआधी साडे तीन तास पर्यंत त्यांचा स्पेसवॉक व्यवस्थित सुरु होता हे थर्मल शिल्ड दोरयाने बांधलेले नव्हते त्या मुळे ते निसटले आता ते परत मिळणे कठीण आहे
उडून गेलेले शिल्ड अंतराळ स्थानकासाठी आवश्यक होते हे शिल्ड अंतराळ स्थानकाला अंतराळातील बदलत्या तापमानामुळे होणारया दुष्परिणामापासून वाचवते तसेच अंतराळात तरंगणाऱया दगड ,इतर वस्तू आणि उल्कापिंडापासून स्थानकाचा बचाव करते
अमेरिकेतील नासाच्या जॉन्सन स्पेस सेंटर मधील शास्त्रज्ञानीं हा भाग झाकण्यासाठी त्यांना काही उपयुक्त सूचना दिल्या त्या नुसार ह्या दोन्ही अंतराळवीरांनी PMA -3 ह्या अडॉप्टरला नवीन शिल्ड बसविले आणि त्याला Cummerbund असे निकनेम दिले हे शिल्ड कमरबेल्ट सारखे असून tuxedo ह्या ड्रेस मध्ये कमरेच्या फिटींगसाठी  वापरतात
 अंतराळवीरांनी केलेला हा स्पेसवॉक सात तास चार मिनिटे पर्यंत सुरु होता Peggy Whitson हिचा हा आठवा स्पेसवॉक होता
आणि तिने आता सर्वात जास्त स्पेस वॉक करणाऱया महिला स्पेसवॉकरचा रेकार्ड ब्रेक केला आहे ह्या आधी सुनीता विल्यम्स हि सर्वात जास्त वेळा स्पेसवॉक करणारी पहिली महिला स्पेसवॉकर होती तिचा रेकार्ड आता पेगीने मोडला आहे  

Friday 7 April 2017

यवतमाळात पाणी विलंबाने पाण्यात आढळली अळी

तारीख -7 एप्रिल
यवतमाळात ह्या वर्षी भरपुर पाऊस पडला त्या मुळे धरणे पुर्ण भरली आता वर्षभर पाणी टंचाई जाणवणार नाही म्हणुन येथील जनता निश्चिन्त झाली पण थोडयाच दिवसात लोकांना पुन्हा पाणीप्रश्न सतावू लागला आठ दिवसांनी येणारे पाणी चार दिवसांनी सोडण्यात आले आणि गेले वर्षभर त्यात बदल झाला नाही हे पाणी नेहमीच कमी दाबाने येते ते अंगणात येते पण घरात येत नाही त्या मुळे गृहिणींना नाहक त्रास होतो ह्या बाबतीत कितीही तक्रार केली तरी काहीही फायदा होत नाही

                                               पाणी गढूळ पाण्यात आढळली अळी 


                          पाण्याच्या भांडयात निघालेली जिवंत अळी (छोटया चौकोनात )

आधीच आठवडयातून दोनदा येणारे पाणी गढूळ असते पाण्याला ब्लिचिंग पावडरचा वास असतो पाणी गाळूनही आणि पाण्यावरून तुरटी फ़िरवुनही त्यात माती राहतेच अशा चार दिवसानंतर खाली राहिलेल्या पाण्यात माती साचते ह्याच साचलेल्या मातीत जिवंत अळी निघाली आहे त्या मुळे यवतमाळ येथे पाणी शुद्धीकरण यंत्रणा अस्तित्वात आहे कि नाही ? असा प्रश्न नागरिक विचारात आहेत कारण पाण्याने तळ गाठल्याने पाण्यात माती असली तरीही पाणी शुद्धीकरणानंतर पाणी स्वच्छ व्हायला हवे
पिण्याच्या पाण्याच्या टाकीतील पाणी उकळण्यासाठी भांडयात काढले असता हि अळी दिसली साचलेल्या मातीत सूक्ष्म जंतू असतात अशाच जंतूंची चार दिवसात अळी तयार झाली असावी असे पाणी जर न पाहता वापरले गेले तर अळी पोटात जाऊन त्याचे किती धोकादायक परिणाम लोकांना भोगावे लागतील ह्याचा विचारही केला जात नाही हि अत्यंत गंभीर बाब असून नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे त्या मुळे ह्या बाबतीत संबंधितांनी त्वरित लक्ष घालून पाणी शुद्धीकरणावर भर द्यावा अशी लोकांची मागणी आहे
असे पाणी पिणे निरोगी माणसांसाठीच अयोग्य असताना ज्यांना विविध आजार आहेत त्यांना किती धोकादायक ठरू शकते ह्याचा विचार करून संबंधित अधिकारयांनी कठोर कारवाई करावी
पाणीपुरवठा विलंबाने 
पाणीपुरवठा विभागाकडून होणारया अनियमित ,दुषित आणि कमी दाबाने करण्यात येणाऱया पाणीपुरवठया मुळे नागरिकांचे भर उन्हाळ्यात हाल होत आहेत त्यातून यवतमाळचे तापमान 40 अंशाच्याही वर गेल्याने नागरिक आधीच त्रस्त झाले आहेत
आरोग्यास हानिकारक



Monday 3 April 2017

मंगळावरील वायूमंडलातील अधीकांश वायू अंतराळात झाले लुप्त मावेनचा निष्कर्ष


  मंगळावर पूर्वी वहात असलेले पाणी (काल्पनिक चित्र ) आणि आताचे रखरखीत वाळवंट फोटो -नासा संस्था

नासा संस्था -30 march
मंगळावरील वायूमंडलात अब्जावधी वर्षांपूर्वी सजीव सृष्टीसाठी आवश्यक असलेले वायू  अस्तित्वात होते पण त्यातील अधीकांश म्हणजे जवळपास 65 टक्के वायू अंतराळात झाले लुप्त झाले आणि मंगळ ग्रहावर ओसाड वाळवंट निर्माण झाले असा निष्कर्ष अमेरिकेच्या नासा संस्थेने काढला आहे
अमेरिकेच्या नासा संस्थेने नोव्हेंबर 2013 मध्ये मावेन हे मंगळ यान मंगळग्रहावरील वातावरणाची सखोल माहिती मिळवण्यासाठी पाठवले आहे आणि वेळोवेळी हे मानवविरहित यान तेथील फोटो व इतर माहिती गोळा करून पाठवत असते
University Of  Colorado येथील मुख्य संशोधक Bruce Jakosky ह्यांनी दिलेल्या माहितीनुसार  नुकत्याच मावेन कडून मिळालेल्या माहितीचा डेटा व फोटो वापरून संशोधकांनी हा निष्कर्ष काढला आहे
मंगळावर अब्जावधी वर्षांपूर्वी सजीव सृष्टी अस्तित्वात होती ह्याचे पुरावे आता सतत मिळत आहेत मे 2016 मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीत मंगळ ग्रहावरील Naukluft ह्या पाठारी प्रदेशात पूर्वी पाणी वाहात असल्याचा सबळ पुरावा मिळाला होता त्यात वाहते पाणी आटल्याचा आणि नदीकाठच्या दगडात काही मिनरल्स ,चिखलाचा अंश आणि सेडीमेंटरी व वाळूचे खडकही सापडल्याची नोंद आहे शिवाय त्या आधीच्या बातमीत पाण्याचे गोठलेले बर्फाच्या स्वरूपातले अंशही सापडल्याचा पुरावा मिळाला आहे (वाचा ह्याच ब्लॉगवर ह्या संदर्भातल्या बातम्या ) त्या मुळेच संशोधकांचा उत्साह दुणावला आणि त्यांनी सखोल संशोधन सुरु ठेवले आहे
मावेनने दिलेल्या ताज्या माहिती नुसार अब्जावधी वर्षांपूर्वी मंगळावर अत्यंत उष्ण वारे वाहात होते सौर वादळे सूर्याची अति प्रखर नीलकिरणे ,विद्युत भारित प्रकाशकिरणे ह्या मुळे नद्या आटल्या पाणी नष्ट झाले, मंगळावरील वायूमंडलातील सजीवांसाठी आवश्यक असलेले वातावरणही बदलले त्यातील सृष्टीसाठी उपयुक्त असलेले 65 टक्के वायू नष्ट झाले आणि अंतराळात लुप्त झाले सजीव सृष्ठीला आवश्यक असलेले वातावरणच नष्ठ झाल्याने सजीव सृष्टीचे अस्तित्वही संपले
अति उष्णतेने पाणी आटले ,नद्या नाले कोरडया पडल्या तर अती थंडीने आणि कमी प्रकाशामुळे पाणी गोठले आणि खडकात सूक्ष कणांच्या रूपात शिल्लक राहिले तसेच सजीव सृष्टीही म्हणजेच सूक्ष्म जिवाणू खडकात जीवाश्मांच्या रूपात अस्तित्वात असावेत असे संशोधकांना वाटतेय
जिथे पाणी प्रवाही स्वरूपात होते त्याच्या किनाऱयावरील खडकांवर सौर वादळामुळे व वातावरणातील सूर्याच्या प्रखर व विद्युत भारित अतिनील किरणांचा रासायनिक परिणाम होऊन खडकांची व जमिनीची धूप
झाली असावी आणि खडकातील वायूही नष्ट झाले असावेत मंगळावरील वायूमंडलातील अधिकांश कार्बन डाय ऑक्साईड वायू छोटया छोटया विस्फोटानंतर नष्ट झाले असावे शिवाय वातावरणाचा थर अत्यंत क्षीण ,पातळ ,अत्यंत थंड व गुरुत्वाकर्षणाच्या अभाव असल्याने कालांतराने तिथले स्थिर व प्रवाही वाहते पाणी नष्ट झाले असावे परिणामी आता तिथे रुक्ष वाळवंट निर्माण झाले आहे असा निष्कर्ष आता संशोधकांनी काढला आहे