नासा संस्था -15 Jan.
नासाच्या अंतराळ मोहीम 50 चे कमांडर Shane Kimbrough आणि फ्लाईट इंजिनीअर Thomas Pesquet ह्या दोन अंतराळ वीरांनी ह्या आठवडयात अंतराळ स्थानकातील तांत्रिक कामासाठी दुसऱयांदा स्पेस वॉक केला
सहा जानेवारीला Shane Kimbrough व Peggy Whitson ह्यांनी त्यांच्या मोहिमेतील पहिला स्पेसवॉक केला होता
अंतराळवीरांनी केलेला ह्या आठवडयातील हा दुसरा स्पेस वॉकही यशस्वी झाला आहे जवळपास सहा तासांच्या ह्या स्पेसवॉक मध्ये ह्या दोघांनी अंतराळ स्थानकात मागील आठवडयातील उर्वरित adapter plates बसवल्या आणि तीन जुन्या निकेल हायड्रोजन बॅटरिज बदलून त्या जागी नवीन तीन लिथियम आयन बॅटरीज बसवल्या त्या आधी त्यांनी ह्या बॅटरीजच्या इलेक्ट्रिकल कनेक्शन जोडणीसाठी आवश्यक हुक प्लेट मध्ये अडकवले
ह्या नवीन लिथियम आयन बॅटरीज आधीच्या बॅटरीज पेक्षा कमी जागा व्यापणारया व अधिक पॉवरफुल आहेत ह्या बॅटरीजचा उपयोग अंतराळ स्थानकाला जोडलेल्या सौर प्रणालीतील ऊर्जा गोळा करून ती साठवण्यासाठी होतो
ह्या दोन अंतराळवीरांनी ह्या शिवाय अंतराळस्थानकासाठी आवश्यक व पुढील स्पेसवॉकसाठी उपयोगी असलेली इतर कामेही ह्या स्पेसवॉक मध्ये केली आहेत
Shane Kimbrough ह्यांचा ह्या आठवडयातील हा दुसरा व त्यांच्या करिअर मधला चवथा यशस्वी स्पेसवॉक होता तर Thomas Pesquet ह्यांचा मात्र हा पहिलाच स्पेसवॉक होता
अंतराळवीरांनी आतापर्यंत अंतराळस्थानकाच्या तांत्रिक कामासाठी केलेल्या स्पेसवॉक मधील हा 197 वा स्पेसवॉक होता
No comments:
Post a Comment