Thursday 29 December 2016

सरत वर्ष गाजल नोटबंदीन

                                            जुन्या हजाराच्या नोटा आता इतिहास जमा होणार 

दिवाळीचा सण संपला तरीही आसमंतात फटाक्यांचे आवाज घुमत होते फेस्टिव्ह मूडमधून पुरते बाहेर न पडलेल्या लोकांना मोदींनी फोडलेल्या ऑटोंबाँम्बन खडबडुन जाग केल आठ नोव्हेंबरला मोदींनी दहा तारखेपासून पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद झाल्याच जाहीर केल आणि नागरिकांची झोप उडाली आठ नोव्हेंबर पाचशे आणि हजारांच्या नोटांसाठी शेवटची ठरली आता चलनबंदीमुळे त्या कोठेही दिसणार नव्हत्या, चालणार नव्हत्या आजवर ज्या नोटांनी नागरिकांचा प्रेस्टिज पॉईंट वाढवला त्याच नोटा लोकांसाठी डोकेदुखी ठरणार होत्या आणि " नको ती पाचशे हजाराची नोट" ! अस प्रत्येकाला वाटू लागल
टेन्शनची ती रात्र संपून सकाळ होताच जो,तो आपल्याजवळच्या पाचशे हजाराच्या नोटा घेऊन खरेदीसाठी बाहेर पडला एरव्ही दूध,भाजीवाला व इत्तर ठिकाणी चिल्लर घेऊन जाणारे नागरिकही पाचशे हजाराच्या नोटा घेऊन गेल्याने जिथे तिथे ह्या नोटा दिसू लागल्या पण चलन बंदीने कोणीही त्या नोटा स्वीकारत नव्हते ज्यांना हा निर्णय माहीत नव्हता त्यांनी ह्या नोटा स्वीकारल्या पण बहुतेक ठिकाणी हि बातमी पोहोचली होती
शिवाय एरवी भाजी मार्केटमध्ये शंभर,पन्नासची चिल्लर मिळत नाही तिथे ह्या न चालणारया नोटांची चिल्लर कोण देणार?

                                       जुन्या पाचशेच्या नोटांनाही आता चालनबंदी 

लोकांनी आपले पैसे गुंतवण्यासाठी सोनाराच्या दुकानात गर्दी केली पण तिथेही ह्या नोटा स्वीकारल्या जात नव्हत्या आणि घेतल्या तर त्यात कमिशन घेऊन मग कोण खरेदी करणार? पण तरीही सोन्याचे भाव त्या दिवशी सर्वसामान्यांसाठी तीस ऐवजी चवतीस हजार जिल्याच्या ठिकाणी तर मुंबई दिल्लीला चक्क साठ हजारावर गेले आणि नंतर सत्तर हजार रुपये तोळ्यांनी सोने विक्री झाली पण मोदींनी सोने घेण्यावर व विक्रीवर बंधने आणताच सोनारांची दुकाने ओस पडली ती आजतागायत कारण सध्या सोन्याचे भाव उतरले असले अन लोकांजवळ पैसे असले तरी ते काढता किंवा खर्चता येत नाहीत ह्याचा सर्वाधिक फटका भर लग्नसराईत प्रामाणिकपणे कर भरणारया नागरिकांना बसला
मोदींच्या देशहिताच्या व काळा पैसे पकडण्यासाठीच्या ह्या निर्णयाचे स्वागत करत दहा तारखेपासून  लोकांनी इतर कामे सोडून नोटबदलांसाठी व पैसे बँकेत भरण्यासाठी बँकेसमोर, ATM  समोर लांबच लांब रांगा लावल्या त्या अजूनही आहेतच
बँकिंगच हे कामही सोप नव्हतच!  कारण पैसे भरण्यासाठी किंवा बदलण्यासाठी आपल्याच बँकेत कित्येक वर्षांची ओळख असताना देखील प्रूफ I D द्यावा लागत होता व्होटिंग कार्ड ,पॅन कार्ड,आधार कार्डचे झेरॉक्स काढण्यासाठी वेगळी कसरत नागरिक करत होते त्यातही अडीच किंवा साडेचारहजारच्या जागी थोडीही कमी जास्त रक्कम असली कि तो फॉर्म रिजेक्ट होत होता त्या मुळे लोक वैतागले होतेच पण मोदींनी आधी ठराविक तारखेनंतर जास्त रक्कम काढता येईल अस सांगूनही नंतर त्यावरही मर्यादा घातली आणि नोट बदलांची प्रक्रियाच बंद करून टाकत फक्त बँकेतच पैसे जमा करता येतील असा नवा निर्णय जाहीर केला आजपर्यंत त्यांनी कित्येक निर्णय बदलले त्या मुळेही लोक त्रासलेत शिवाय बरेच दिवस झाले तरीही पाचशेच्या नव्या नोटा बँकेत पोहोचल्याच नव्हत्या कारण त्या कमी प्रमाणात छापल्या गेल्याने त्यांचा तुटवडा असल्याच  यवतमाळ येथील S B I बँकेच्या मॅनेजरनी सांगितल होत आणि नव्या नोटांच्या वेगळ्या डिझाईन बदलामुळे ATM मशिनही बंद होती

                                                नव्या दोन हजाराच्या नोटेच स्वागत 

                                                                                                                                        फोटो -R B I
सुरवातीला दोन हजाराची नोट मिळताच काही उत्साही तरुणाईने त्या सोबत सेल्फी काढत तो सोशल मीडियावर शेअर करून आपला आनंद द्विगुणित केला पण जसजसे दिवस पुढे सरकत गेले तेव्हा ह्या नोटांचीही डोकेदुखी सुरु झाली कारण दोन हजारची चिल्लर मिळेना त्या मुळे त्याही कोणी स्वीकारत नाहीत अस हैदराबादमधील एका मोठ्या व्यापाऱयाने  सांगितलं कारण त्यांच्याकडे आधीच दोन हजाराच्या खूप नोटा आहेत पण त्या बदलण्यासाठी तिथल्या व्यापाऱयांना पन्नास रुपये कमी मिळतात त्या मुळे लोक दोन हजाराची नोट घेतच नाहीत
नोटबंदीमुळे सर्वच व्यावसायिक त्रस्त झालेत कारण अगदी छोटया व्यावसायिकांपासून मोठया कारखानदारांचा व्यवसाय ठप्प झालाय काहींचा मंदावलाय तर काहींनी बंदच केलाय भाजीमार्केटमधील भाजी कधी नव्हे ते स्वस्त झाल्याने गृहिणी खुश आहेत पण भाजीवाल्यांचं मात्र नुकसान होतंय
ह्या नोटबंदीन सुरवातीच्या दिवसात मोदी सरकारनं लोकांना जुन्या काळात नेल नांदेड जिल्यातील एका  खेडयात पैसे हातात नसल्याने वस्तूंच्या बदल्यात किराणा माल खरीदला गेल्याची बातमी पाहायला मिळाली
अनेक ठिकाणी असा व्यवहार केला गेला
ह्या नोटबंदीचा फटका गृहिणींनाही झाला त्यांनी काटकसरीने जमवलेले पैसेहि बँकेत भरावे लागले त्यातून ज्यांची घरी आर्थिक पिळवणूक होते त्यांनी वेळप्रसंगी उपयोगी पडेल म्हणून लपवलेल्या पैशाची ठिकाणही मीडियाने बातमी देण्याच्या नादात सर्वांपुढे आणल्याने त्यांच्या संकटात भर पडलीय
ह्या नोटबंदीचा परिणाम इतर सेवेप्रमाणे एयर लाईन्स वरही झाला तिथल्या कर्मचारयांची प्रतिक्रिया घेतल्यावर त्यांनी मोदींचा निर्णय चांगला असला तरीही नियोजन मात्र योग्य नाही असं सांगितलं आम्ही अहोरात्र ड्युटीवर असतो तेव्हा बँकेत लाईन कशी लावणार ? अशी संतप्त प्रतिक्रियाही व्यक्त केल्या गेली तर एका महिला पोलीस अधिकाऱयाची नोटबंदीच्या काळातच दिल्लीहून हैद्राबादला बदली झाली त्यामुळे तिला कृत्रिम आर्थिक टंचाईला सामोरे जावं लागल तिचे पतीही नोकरी करतात त्या मुळे त्यांचाही पगार अडकलेला अशा वेळी घरातील रक्कम पुरेशी नव्हती तेव्हा त्यांना त्यांच्या मुलीची पिगी बँक कामी आली ती फोडून त्यांना वापरावी लागली  नोटबंदी आधी पुरेशा प्रमाणात नव्या नोटा छापून लोकांना उपलब्ध करायला हव्या होत्या असच सारे म्हणतात  एअर इंडियानेही आपल्या कर्मचाऱयांना स्वतःहून मदत केलीय कारण त्यांचे पगार अडकलेत अशीच परिस्थिती सर्वच नोकरदारांची झालीय
सुरवातीला मोदींना साथ देणारे नागरिक म्हणताहेत कि मोदींनी टेन्शन के दिन लाये ! कारण ज्यांच्या साठी आणि ज्या साठी मोदींनी हा निर्णय घेतला तो कितपत यशस्वी ठरलाय मुदत संपण्याआधीच नव्या नोटांचे गैरव्यवहार दररोज न्यूज चॅनल वरून पाहायला मिळत आहेत भ्रष्टाचारी आधीच सुटलेत प्रामाणिक नागरिकांना मात्र नाहक त्रास सोसावा लागला काहींचा नाहक जीव गेला
आता फक्त उद्याचा दिवस उरलाय आता दहा पेक्षा जास्त जुन्या नोटा बाळगणाऱयांना शिक्षा होईल अशी नवी घोषणा मोदींनी केलीय आता उद्या त्यात बदल झाल्यास नवल नाही ! जुन्या नोटासंग्रह करणाऱयांसाठी निदान दहा तरी जुन्या नोटा जवळ ठेवता येतील हे काही कमी नाही कारण आता त्या इतिहास जमा झाल्यात
नव्या नोटा आकर्षक रंगाच्या असल्या तरीही त्याला जुन्या पाचशे हजाराच्या नोटांची सर नाही! अशी प्रतिक्रिया व्यक्त होतेय

                                                      नवी पाचशेची नोट चलनात                फोटो -RBI

पण अजूनही नव्या नोटांचा तुटवडा जाणवणार आहेच कारण नव्या नोटांसाठी  लागणारया पेपरच देण्यात येणार टेंडर वेळेवर दिल्या न गेल्यान पेपर मिळण्यास वेळ लागेल आणि सध्या आहे तो पेपर पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही म्हणूनच नव्या नोटांसाठीच्या कागदाची प्रत वेगळी आहे आणि त्याचा परिणाम नोट छपाईवरही पाहायला मिळाला सुरवातीला नोटेचा रंग उडाल्याचीही बातमी आली तेव्हा सरकारकडून रंग जाण हेच नोटेच्या खरेपणाच लक्षण असल्याच सांगितल गेल मग जुन्या नोटा पाण्यात भिजल्या तरीही त्याचा रंग जात नव्हता तेव्हा त्या खोटया होत्या का ? हा प्रश्न उपस्थित केल्या जातोय
वर्ष सरतांना मोदींच्या ह्या चलन बंदींन मात्र चांगलाच धुमाकूळ घातलाय नोटा बंदीनंतर पकडल्या जाण्याच्या भीतीन श्रीमंतीची शान असणारया ह्या नोटा काहींनी कचऱयात फेकल्या ,काहींनी पाण्यात तर काहींनी त्या चक्क जाळल्या देखील वर्षभराच्या ठळक घडामोडींचा विसर पाडत नोटबंदीची चर्चा  मात्र चांगलीच रंगतेय

Saturday 24 December 2016

Christmas Celebration in Space Station

                  Peggy Whiston ची अंतराळ स्थानकातील  ख्रिसमस मूडमधली आनंदित मुद्रा
                                                                                                                                  फोटो -नासा संस्था
नासा संस्था- 23 डिसेंबर

आज जगभरात ख्रिसमसची धुम आहे  झिंगल बेल  SS झिंगल बेल SS झिंगल ऑल द वे  SS  चे सूर आनंदमयी वातावरणात सर्वत्र निनादताहेत सजावटीच्या,गीफ्टच्या  वस्तूंनी बाजारपेठ फुललीय
ख्रिसमस ट्री सजवण ,एकत्रित येऊन ,एकमेकांना भेटवस्तू देण त्या साठी सांताक्लाज बनून छोट्यांच्या आवडीच्या वस्तू पायमोज्यात घालून त्यांना सरप्राईज देण ह्यात ख्रिस्ती बांधव गुंतलेत आपल्या दिवाळी सणासारखाच हा सणही सर्वत्र उत्साहात साजरा होतो आप्तांना परिचितांना केक ,चॉकलेटची भेट दिल्या जाते
ह्या पृथ्वीपासून दूर अंतराळात फिरत्या अंतराळस्थानकात तरंगत्या अवस्थेत राहुन संशोधन करत असलेले  नासाचे अंतराळवीरही महिन्याच्या शेवटच्या आठवडयातील हा वीकएण्डला येणारा सण स्थानकात उत्साहात एकत्रित साजरा करणार आहेत
नासा संस्थेने लाईव्ह टेलिकास्ट द्वारे ह्या अंतराळ मोहीम 50 चे कमांडर Shane Kimbrough , Peggy Whitson  आणि  France चे अंतराळवीर  Thomas Pesquet ह्यांच्याशी संवाद साधून ते स्थानकात नाताळ कसा साजरा करणार आहेत आणि नेहमी ते हा सण कसा साजरा करतात ह्या विषयी जाणून घेतले Peggy  ने दोनदा संपर्क साधत नाताळविषयीच्या तिच्या आठवणी शेअर केल्या

  नासाची अंतराळ वीरांगना Peggy Whitson ,कमांडर Shane Kimbrough आणि फ्रेंच अंतराळवीर Thomas            Pesquet  लाईव्ह टेलीकास्टने संवाद साधत ख्रिसमस फूड दाखवताना  -   फोटो-नासा संस्था                                                                                                                              
पेगी हा सण दरवर्षी सर्वांसोबत साजरा करते  पण ह्यावर्षी कुटुंबियांच्या अनुपस्थितीत त्यांच्या आनंददायी आठवणी सोबत ती नाताळ इतर अंतराळ ह्यावीरांसोबत साजरा करणार आहे त्या साठी ख्रिसमस ट्री सजवण्यासाठी लागणार सामान आणि इतरांना देण्यासाठीच गिफ्ट ( अर्थातच सरप्राईज )तिने ह्या अंतराळ यात्रेला येण्यापूर्वीच बॅगेत ठेवल होत
आता अंतराळ स्थानकातच ती ख्रिसमस ट्री सजवणार आहे  ख्रिसमस  टेबल सजवण्यासाठी त्यांना खास ख्रिसमस फूड मिळाल आहे त्यांच्या कडे कुकीज ,कोको ,फ्रॉस्टिंग वै साहित्य आहे. पेगीची इच्छा होती की ,ख्रिसमसला सगळ्या अंतराळवीराची आपण कुकीज सजवण्याची स्पर्धा घेऊ पण इतरांना मात्र त्यात इंटरेस्ट नाही.
लाईव्ह टेलिकास्ट द्वारे संवाद साधताना तिला विचारले गेले कि,तू एकटीच महिला आहेस त्या मुळे तुला असुरक्षित वाटत का ?
नव्या वर्षात तू काही संकल्प करणार आहेस का?
आणि तुम्ही शॅंपेन पार्टी करणार का?
तू घरच्यांना मिस करतेस का ?
पेगीने सांगितले कि नाही !  तिला असुरक्षित वाटत नाही! सारेच जण चांगले आहेत कामाव्यतिरिक्तचा वेळ ते एकत्रित गप्पागोष्टीत आनंदात घालवतात ते रोज एकत्र जेवण करतात
ती पृथ्वीवरच्या सारख नव्या वर्षात वजन कमी करण किंवा वाढवण असे संकल्प करणार नाही
ते शॅंपेन पार्टी करणार नाहीत!
घरच्यांना नक्कीच मिस करतेय पण अंतराळस्थानकात राहून संशोधन करण हे तीच ध्येय आहे आणि ह्या वर्षीचा नाताळ पृथ्वी बाहेर राहून स्थानकात साजरा करण आणि  तीथून पृथ्वी न्याहळण्याचा क्षण अलौकिक आहे! रोमांचक आहे!
 ह्या मोहीमेचे कमांडर Shane Kimbrough  ह्यांनाही ख्रिसमस साजरा करायला खूप आवडत त्या दिवशी त्यांचे सर्व नातेवाईक एकत्र येतात कधी त्यांच्याकडे तर कधी नातेवाईकांकडे जमून ख्रिसमस ट्री लाइटिंगने सजवून म्युझिकच्या साथीने ते हे सेलिब्रेशन एन्जॉय करतात एकमेकांना गिफ्ट देतात त्यानांही घरच्यांची आठवण येतेय पण अंतराळस्थानकातील नाताळ सेलिब्रेशन अनोख आहे !
फ्रान्सचे अंतराळवीर Thomas Pesquet ह्यांचं बालपण पंचवीसजणांच्या कुटुंबात गेल ख्रिसमसला सारेजण एकत्र येत धमाल मस्ती करत ! आनंदात ख्रिसमस सण साजरा करत त्यावेळची सजावट व आनंददायी आठवणी आहेत ह्या वर्षी  मात्र ते साऱ्यांना मिस करताहेत  पण ख्रिसमसला ते त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतील त्यांची आजी त्यांच्यासाठी खास रेसिपी करायची तीच रेसिपी वापरून त्यांच्या फ्रेंच शेफने चिकन सूप ,जिंजर ब्रेड आणि त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून पाठवलेत आणि ते साऱ्यांना पुरेल इतक आहे ते जिथे वाढले तिथला स्पेशल पदार्थ ते स्टार्टर म्हणून खातील
त्यांनाही स्थानकातील ख्रिसमस सेलिब्रेशन थ्रिलिंग  वाटतय
आता ह्या अंतराळवीरांचं ख्रिसमस सेलिब्रेशन अंतराळातील 


          अंतराळ  स्थानकातील सहाही अंतराळवीर फेस्टिव्ह मूडमध्ये   फोटो -नासा संस्था 

छोटयाशा जागेत ख्रिसमस ट्री सजवून ख्रिसमस टेबलवर खास युरोपियन ट्रॅडिशनल U.S. meal आणि फ्रेंच फूड , टर्की ,पोटॅटो,ग्रीन पीज ,आयरर्लंड मधला फेमस कोका, कॉर्न ब्रेड,Pineapple dessert , फ्रुट सॅलेड आणि चॉकलेट केक मांडुन एकत्रित येऊन एकमेकांना आपले पदार्थ आणि सरप्राईज गिफ्ट देऊन आपल्या आनंददायी आठवणी शेअर करीत आपल्या कुटुंबियांपासून दूर पण ह्या नव्या अंतराळातील कुटुंबात आनंदात साजरा करतील सध्या त्यांच्याकडे नुकतच आलेल नाताळसाठीच फूड तर आहेच शिवाय जापनीज अंतराळवीरांचेहि काही पदार्थ आहेत 
ह्या तिनही अंतराळ वीरांनी पृथ्वीवासीयांसाठी Happy Christmas ! म्हणत शुभेच्छा दिल्यात





  

Thursday 22 December 2016

नासाच्या अंतराळ विरांनी अभ्यासला स्थानकातील वातावरणाचा स्नायूंवर होणारा परिणाम

           नासाच्या मोहीम 50 चे कमांडर Shane Kimbrough स्थानकात दोन स्पेस सूट मधल्या जागेत आराम                                 करताना   फोटो -नासा संस्था

नासा संस्था -21 डिसेंबर
नासाच्या अंतराळ मोहीम 50 चे अंतराळवीर सध्या अंतराळ स्थानकात राहुन तिथल्या वातावरणाचा मानवी आरोग्यावर काय परिणाम होतो ह्याविषयावर सखोल संशोधन करत आहेत त्या साठी आवश्यक असे अनेक प्रयोग ते सतत करत असतात
नुकतेच ह्या अंतराळ वीरांनी अंतराळ स्थानकात राहून तिथल्या वातावरणात काम करताना आपल्या शरीरावर व स्नायूंवर काय परिणाम होतो ह्यावर संशोधन केले आहे
रशियाचे अंतराळवीर  Sargey Ryzhikov  आणि फ्रान्सचे अंतराळवीर  Thomas Pesquet ह्या दोघांनी मिळून Ultrasound Scanner व Electrodes च्या मदतीने सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा गुडघ्यावर होणारा परिणाम व त्याची भविष्यात होणारी हानी ह्याचा अभ्यास केला
नासाच्या ह्या अंतराळ मोहीम 50 चे कमांडर Shane Kimbrough  व Peggy Whitson ह्यांनी स्थानकातील Electrostatic Levitation Furnace यंत्रणेचे काम पाहिले.अंतराळ स्थानकातील वातावरणाचा स्थानकात Gas व Liquid  ह्याच्यावर काय परिणाम होतो ह्याचही संशोधन केल तसेच  Medical Emergency Drill  मध्ये सहभागी होत  CPR Procedure व Medical Hardwareचाही आढावा घेतला
अंतराळवीरांनी केलेल्या ह्या आधुनिक संशोधनाचा उपयोग पृथ्वीवरील मानवी आरोग्यासाठी उपयोगी पडेलच शिवाय आगामी अंतराळ मोहिमेत दूरवरच्या ग्रहांवरील अंतराळ निवासासाठीही उपयुक्त ठरेल अशी आशा ह्या अंतराळ वीरांना वाटते


Wednesday 14 December 2016

नोटबंदी आणि जयललिताच्या निधनाने सात डिसेंबरला तिरुपती मंदिरात कमी गर्दी


                         नोटबंदी आणि जयललितांच्या निधनाने तिरुपतीच्या मंदिरातील शुकशुकाट

तिरुपती -7 डिसेंबर
पर्यटक आणि भाविकांच्या गर्दीन गजबजलेल्या तिरुपती तिरुमला देवस्थान मंदिरात सात डिसेंबरला शुकशुकाट जाणवत होता  एरव्ही भक्तांच्या रांगाचरांगा असणाऱया रांगेंची ठिकाण देखील रिकामी होती त्या बाबतीत अधिक माहिती घेतली असता हा नोटा बंदीचा परिणाम असल्याची माहिती मिळाली आधीच नोटबंदीने पर्यटकांची गर्दी कमी त्यातून सहा तारखेला जयललिताच्या निधनामुळे तामिळनाडूतील बससेवा व रेल्वेसेवाही बंद होती त्या मुळे सात डिसेंबरला मंदिरात अत्यंत कमी गर्दी होती आधीच तिरुपतीचे तिकीट काढून ठेवलेल्या भक्तांना तिरुपतीत वेळेवर पोहचता आले नाही मात्र आठ डिसेंबरला तिरुपतीच्या मंदिरात भक्तांचा गजबजाट होता पण नेहमीपेक्षा कमीच!  नोटबंदीमुळे तिथे येणारया भाविकांची संख्या जशी रोडावली आहे तसेच तिथल्या दुकानदारांच्या धंद्यांवर देखील नोटबंदीचा परिणाम झाला आहे सर्वच दुकानदार मंदीचा सामना करत असून नोटबंदीने त्रस्त असल्याच तिथल्या काही व्यावसायिकांनी सांगितल           
 नोटबंदी आणि जयललिताच्या निधनाने सात डिसेंबरला तिरुपती मंदिरात कमी गर्दी असली तरीही तिथली सुरक्षा व्यवस्था मात्र चोख होती तिथे प्रवेश करणारी वाहने ,भाविक आणि पर्यटकांची कडक तपासणी होत होती त्या नंतरच लोकांना तिरुपतीत प्रवेश मिळत होता
एरव्ही तिरुपतीच्या दर्शनाला येणारया भाविकांचा ओघ प्रचंड असतो दर्शन रांगा गर्दीने भरून जातात भाविकांचे जथ्थे सतत तिरुपतीत दाखल होतात ह्या गर्दीतही लोक शिस्तीत दर्शन घेत असतात सर्वात श्रीमंत देव अशी तिरुपतीची ख्याती आहे अर्ध्या रात्री सकाळच्या सुप्रभातम साठी रांग लागते ते दिवसभरच्या सर्व सेवा पूर्ण करून शेवटच्या एकांत सेवा संपेपर्यंत रांग सुरूच असते शिवाय इतर दर्शन रांगातून गोविंदा SSS गोविंदा चा जयघोष सुरूच असतो
तिरुपती तिरुमला देवस्थान समितीच व्यवस्थापन खरोखरच वाखाणण्याजोग आहे मग ती स्वच्छता असो की दानपेटीतुन आलेली प्रचंड रक्कम तिरुपतीचा लाडू प्रसाद प्रसिद्ध आहे दररोज तिथे लाखोंच्या संख्येत लाडू बनवले जातात दर्शन रांगेत बुंदीचे लाडू ,दहीभात ,चिंचेचा भात आलटून पालटून वाटल्या जातो लाडू विक्री केंद्रात पैसे भरून कुपन काढून लाडू विकत मिळतो दर्शन रांगा आणि जागोजागी तैनात सुरक्षा व्यवस्था सारच एकदम चोख आहे तिथले नियमही एकदम कडक मंदिरातील गाभाऱयातील विशेष सेवांच्या वेळी सील्कचे धोतर किंवा लुंगी व शाल घालावी लागते तरीही तेथे दररोज लाखो लोक दर्शनासाठी येतात श्रद्धेपोटी केसदान करतात अगदी बायका,मुलही मुंडन करून देवाला केस अर्पण करतात त्यासाठीही विशेष सोय केली आहे तिरुपतीत अशी असंख्य मुंडन करून डोक्याला चंदन लावलेली कुटुंब पाहायला मिळतात

                        तिरुपतीच्या वाटेवर सप्तरंगांची उधळण करत अस्ताला जाणारा सूर्य

तिरुपतीहून तिरुमला देवस्थानात जातानाची सप्तगिरीतील घाटाची वाट निसर्गदत्त नैसर्गिक वनसंपदेने समृद्ध आहे दुर्मिळ औषधी वनस्पतीची विपुलता तिथे पाहायला मिळते
तिरुपती तिरुपती देवस्थान समितीने खालून वर तिरुमलाच्या बालाजीचे दर्शन घेण्यासाठी पायी जाणारया भाविकांसाठी हा परिसर निसर्गरम्य आणि सुशोभित केलाय ह्या वाटेवर देवळे व थकलेल्यांना विसाव्यासाठी रमणीय ठिकाणेही आहेत सप्तगिरीचा हा परिसर घनदाट वृक्षांनी वेढलेला आहे त्या मुळे तिथे वन्यप्राण्यांचा वावर आहे देवस्थान प्रशासनाने ह्या वाटेवर तिरुपती तिरुमला प्राणीसंग्रहालय विकसित केल आहे अशाच विसाव्याच्या ठिकाणी वसलेल हे डियर पार्क येणाऱ्या जाणारया भाविकांना आकर्षित करत
             
                                     तिरुपतीच्या वाटेवरचा आर्कषक सुंदर हरिणांचा हा एकत्रित कळप

                                  फळे खाण्यासाठी जमलेला हा डौलदार हरणांचा कळप
 एरव्ही  प्रवासात जंगलवाटेवर माणसांना पाहुन वायुवेगाने पळणारी हरण आपण पहातो पण इथली हरीण मात्र चांगलीच माणसाळलीत तिथून प्रवास करणारी वाहन ह्या हरीण दर्शनासाठी थांबतात तिथे विकत मिळणारी  कडू काकडी (वाळूक) ,पपई आणि इतर फळे विकत घेऊन ती हरिणांना खायला देतात हरणही ती खाण्यासाठी गर्दी करतात तिरुपतीला येणारे भाविक पर्यटन प्लस भक्ती ह्याचा सुरेल मेळ साधतात 

Friday 2 December 2016

कार्गो स्पेस क्राफ्ट Progress 65 उड्डाणानंतर काही वेळातच पेटले


          Progress 65  कार्गो स्पेस क्राफ्ट गुरुवारी सकाळी कझाकस्थानातील बैकोनूर येथून उड्डाण करताना
                                                                                                                                     फोटो -नासा संस्था
नासा संस्था - 1 डिसेंबर
गुरुवारी सकाळी रशियाच्या  Progress 65  ह्या कार्गो स्पेस क्राफ्टने अंतराळात उड्डाण केल्या नंतर काही वेळातच पेट घेतला रशियाच्या रॉसकॉसमॉस ह्या रशियन स्पेस एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार
प्रोग्रेस 65 ह्या रशियन बनावटीच्या मालवाहू अंतरिक्ष यानाने गुरुवारी सकाळी कझाकस्थानातील बैकोनूर येथून  9.51a.m .ला अंतराळ स्थानकाकडे व्यवस्थित झेप घेतली पण उड्डाणानंतर काही वेळातच त्याचा संस्थेशी असलेला संपर्क तुटला आणि त्याने पेट घेतला सोयूझ ह्या रॉकेट द्वारे Progress 65 कार्गो स्पेस क्राफ्ट अंतराळात सोडण्यात आले होते पण काही वेळानंतर रशियातील तुवा ह्या पर्वतीय क्षेत्रात 190 km उंचीवर पोहोचल्यानंतर अचानक हे यान पेटले
सद्या अंतराळस्थानकात राहात असलेल्या सहा अंतराळवीरांसाठी लागणारे आवश्यक सामान घेऊन हे मालवाहू यान अंतराळ स्थानकाकडे जात होते आता हे कार्गो स्पेस क्राफ्ट जळाल्यामुळे त्यातील 2.4 टन वजनाचे इंधन ,खाद्य पदार्थ व इतर आवश्यक रिसर्च हार्डवेअरचे साहित्यही जळून खाक झाले आहे
नासा संस्थेने ह्या अंतराळवीरांशी live telecast द्वारे संवाद साधत त्यांना ह्या अपघाताची माहिती दिली व त्यांच्या सुरक्षिततेविषयी विचारपूस केली असता सहाही अंतराळवीरांनी आम्ही सुरक्षित असल्याचे सांगीतले शिवाय त्यांना लागणारे आवश्यक सामान सद्यातरी पुरेसे असल्याची माहितीही दिली
लवकरच 9 डिसेंबरला जपानच्या JAXA एजन्सीचे HTV-6 हे कार्गोशिप स्पेस क्राफ्ट अंतराळ वीरांना लागणारे सामान घेऊन स्थानकात जाणार आहे