Wednesday 31 August 2016

नासाच्या अंतराळवीरांचा 1 सप्टेंबरला पुन्हा स्पेस वॉक

                    अंतराळवीर स्पेसवॉक करताना -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -30ऑगस्ट

दोन आठवडयाच्या आत नासाचे अंतराळवीर जेफ विल्यम्स व केट रूबिन्स स्थानकाबाहेर पुन्हा स्पेस वॉक करणार आहेत  1 सप्टेंबरला अंतराळस्थानकाच्या तांत्रिक कामासाठी ते हा स्पेस वॉक करणार आहेत
जेफ विल्यम्स अंतराळस्थानका बाहेरील पोर्ट साईडचे तांत्रिक काम करणार आहेत तर केट रूबिन्स स्थानकाबाहेरील कुलिंग सिस्टीमचे रेडियेटर काढण्याचे काम करणार आहे स्थानकातील कुलिंग सिस्टीम मधून अमोनिया गॅस लीक होत असल्यामुळे पर्यायी व्यवस्थेसाठी हा रेडीयेटर बसवण्यात आला होता
आता तो काढण्याचे काम ती करेल व स्थानकाबाहेरील सोलर सिस्टीमचा रॉड टाईट करण्याचे काम ती
करेल स्थानकाबाहेर लाईटस व उच्च दर्जाचा कॅमेरा बसविण्याचे कामही केट करणार आहे हा कॅमेरा बसविल्या मुळे अंतराळवीरांना स्थानकातून बाहेरच्या घडामोडीवर लक्ष ठेवता येईल
शीवाय अंतराळस्थानकात येणारया व जाणारया अंतराळवीरांच्या अंतरिक्ष यानावर व मालवाहू यानावरही नजर ठेवता येईल

                                           अंतराळवीर जेफ विल्यम्स -  फोटो -नासा संस्था

आतापर्यंतचा अंतराळवीरांचा अंतराळस्थानकाबाहेरील हा 195 वा स्पेस वॉक असेल
जेफ विल्यम्स यांचा हा पाचवा स्पेस वॉक आहे शिवाय जेफ विल्यम्स ह्यांनी 24ऑगस्टला अंतराळ स्थानकात 520 दिवस राहण्याचा विक्रम केला असून त्यांनी ह्या आधीचा स्कॉट केली ह्यांचा जास्ती दिवस अंतराळ स्थानकात राहण्याचा विक्रम मोडला आहे  
केट रुबिन्स हिचा हा दुसरा स्पेस वॉक असेल त्यांच्या ह्या स्पेस वॉकच्या कामात जपानचे अंतराळवीर Takuya Onishi हे अंतराळ स्थानकातुन त्यांना मदत करतील
1 सप्टेंबरला गुरुवारी (अमेरिकन तारीख व वेळ ) सकाळी आठ वाजता हा स्पेस वॉक सुरु होईल आणि जवळपास सहा साडेसहा तासानंतर तो संपेल नासा टी वी वरून ह्याचे थेट प्रक्षेपण केल्या जाईल
    

Friday 26 August 2016

Orion स्पेसक्राफ्टची वॉटर ड्रॉप टेस्ट यशस्वी

                                 Orion स्पेस क्राफ्टची वॉटर ड्रॉप टेस्ट फोटो -नासा संस्था

नासा संस्था -26 ऑगस्ट
25 ऑगस्टला नासाच्या व्हर्जिनिया येथील Langley Research Center ,Hampton मध्ये 
Orion स्पेसक्राफ्टची वीस फूट खोल हायड्रो इम्पॅक्ट बेसिन मध्ये वॉटर ड्रॉप टेस्ट करण्यात आली 
आगामी मंगळ मोहिमेसाठी  Orion अंतरिक्ष यान बनवण्यात आले आहे
ह्या  Orion वॉटर ड्रॉप टेस्टच्या वेळी नासाचे Eric Gillard  व Mark Boldnin उपस्थित होते
Orion  हे संशोधित नवीन अंतरिक्ष यान आहे हे यान आधीच्या यानापेक्षा वेगळे असून ह्या यानात अंतराळवीरांसाठी आधीपेक्षा जास्त सुविधा देण्यात आल्या आहेत अंतराळवीरांचा दूरवरचा अंतरिक्ष प्रवास सुखकर व्हावा व संकट आल्यास त्यांना त्यातून निर्विघ्नपणे बाहेर पडता यावे ह्या साठी विशेष सोय ह्या यानात करण्यात आली आहे
ह्या वॉटर ड्रॉप टेस्ट मुळे इंजिनीअर्संना ह्या यानातून पृथ्वीवर परतणारया अंतराळवीरांची सुरक्षितता व ह्या यानाची  क्षमता पडताळून पाहता आली विशेषतः अंतराळवीरांना घेऊन येणारे अंतरिक्ष यान जेव्हा परतते तेव्हा अंतराळातून पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करते आणि पॅसिफिक महासागराकडे झेपावत पॅसिफिक महासागरात शिरते
पॅसिफिक महासागरात शिरल्या नंतर Orion अंतरिक्ष यान यानातील अंतराळवीरांची सुरक्षितता राखण्यास सक्षम आहे का? याची चाचणी घेण्यात आली    

Sunday 21 August 2016

अंतराळवीर जेफ विल्यम्स आणि केट रुबिन्स ह्यांचा स्पेसवॉक यशस्वी

             केट रूबिन्स स्पेसवॉक दरम्यान स्थानकाबाहेर अडॉप्टर जोडणीचे काम करताना -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -20 ऑगस्ट
नासाच्या अंतराळ मोहीम 48 चे कमांडर जेफ विल्यम्स आणि  फ्लाईट इंजीनिअर केट रुबिन्स ह्यांनी 19ऑगस्टला  तांत्रिक कामासाठी केलेला स्पेसवॉक यशस्वी झाला
ह्या स्पेसवॉक साठी केटने तिच्या प्रशिक्षणादरम्यान सराव केला होता त्या मुळेच तिने अंतराळ स्थानकाला अडॉप्टर जोडण्याचे काम कुशलतेने व निडरतेने केले जेफ विल्यम्स ह्यांचा हा चवथा स्पेसवॉक असल्याने ते अनुभवी होते पण केटचा मात्र हा पहिलाच स्पेसवॉक होता  ह्या स्पेसवॉक आधी ह्या दोन अंतराळवीरांनी त्यांच्या स्पेससूटची बॅटरी चार्ज केली होती जेफ विल्यम्स ह्यांच्या स्पेससूटवर लाल रंगांच्या रेषा तर केट रूबिन्स हिच्या स्पेससूट वर पांढरया रंगांच्या रेषा होत्या अंतराळवीरांनी केलेला हा 194वा स्पेस वॉक होता
अंतराळ स्थानकात आगामी काळात येणारया बोईंग आणि स्पेस X कमर्शियल क्रू स्पेसक्राफ्टच्या तयारीसाठी हा स्पेसवॉक करण्यात आला 5 तास 58 मिनिटांच्या स्पेसवॉक मध्ये ह्या दोन अंतराळवीरांनी पहिले दोन इंटर नॅशनल डॉकिंग अडॉप्टर अंतराळस्थानकाला यशस्वीपणे जोडण्याचे अत्यंत कठीण व जिकिरीचे काम यशस्वीपणे पार पाडले
अडॉप्टर जोडल्यामुळे हे दोन स्पेसक्राफ्ट अंतराळस्थानकात येण्यासाठी व पार्किंगसाठी मार्ग तयार करण्यात आला आहे नासाच्या कमर्शियल क्रू प्रोग्राम अंतर्गत हे अडॉप्टर बनवण्यात आले आहेत

            फोटो -नासा संस्था

अमेरिकेच्या फ्लोरिडा येथील स्पेस कोस्ट वरून अंतराळस्थानकाकडे होणारया अंतराळवीरांच्या उड्डाणांचा उपयोग मानवी अंतराळमोहिमेसाठी व वैज्ञानिक प्रयोगासाठी होतोय
शिवाय ब्रह्मांडातील दूरवरच्या ग्रहांच्या आगामी अंतराळमोहिमेसाठी विशेषतः मंगळ मोहिमेसाठीही ह्या अंतराळमोहिमांचा उपयोग होईल असे शास्त्रज्ञांना वाटतेय
स्पेसवॉक करणे सोपे नसते कारण अंतराळात कुठलीही वस्तू गुरुत्वाकर्षणाच्या अभावामुळे तरंगते अगदी अंतराळवीर सुद्धा ! आणि त्यांच्या ह्या यांत्रिक जोडणीसाठीचे सामान सुद्धा! म्हणूनच आपला तोल सांभाळून हे सामान पकडत काम करण कठीणच असत त्यात खाली आणि आजूबाजूला अथांग पोकळी ! ह्या स्पेसवॉकच दृश्य सामान्यजनांसाठी थरारक ! काळजाचा ठोका चुकवणार असल तरी ह्या अंतराळवीरांना मात्र त्याची तमा नसते त्यांच्यासाठी हा स्पेसवॉक आव्हानात्मक  आनंददायी असतो ,त्यांच्या बुद्धीचा कस लावणार असतो
विशेष म्हणजे फ्लाईट इंजिनीअर केट सारख्या एका अंतराळवीरांगनेन केलेला हा पहिला यशस्वी स्पेसवॉक म्हणजे तमाम महिलावर्गाला अभिमानास्पदच !



Tuesday 16 August 2016

अंतराळवीर Jeff Williams व Kate Rubins 19 ऑगस्टला स्पेस वॉक करणार

                        नासाचे अंतराळवीर तांत्रिक जोडणीची तयारी करताना -फोटो -नासा संस्था   

नासा संस्था -16 ऑगस्ट 
19ऑगस्टला नासाच्या अंतराळ मोहीम 48चे कमांडर Jeff Williams व Flight Engineer Kate Rubins हे दोघे अंतराळ स्थानकाबाहेर आवश्यक तांत्रिक कामासाठी स्पेस वॉक  करणार आहेत
15 ऑगस्टला दुपारी दोन वाजता अमेरिकेतील होस्टन इथल्या जॉन्सन स्पेस सेंटर मधून अंतराळ स्थानकातील अंतराळवीर व कमर्शियल crew एक्सपर्ट ह्यांच्यात ह्या स्पेस वॉक संदर्भात आवश्यक असलेल्या अडॉप्टरच्या तांत्रिक जोडणीसंबंधित चर्चा करण्यात आली ह्या चर्चेचे लाईव्ह प्रक्षेपण पत्रकारांना दाखवण्यात आले नासाच्या अंतराळ मोहीम 48 चे अंतराळवीर स्थानकात पोहोचल्या नंतरच्या ह्या पहिल्या  इंटर नॅशनल डॉकिंग अडॉप्टर (I D As ) च्या स्थानकाशी करण्यात येणारया जोडणी बद्दल ह्या कार्यक्रमात अंतराळ वीरांशी थेट स्थानकात संवाद साधत आवश्यक सूचना देण्यात आल्या
अंतराळ स्थानकातील अंतराळवीर Jeff Williams व फ्लाईट इंजिनीअर Kate Rubins ह्यांनी ह्या संवादादरम्यान  विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली आणि त्यांची ह्या स्पेस वॉक साठीची तयारी पूर्ण झाली असल्याचे सांगितले
           केट रूबिन्स आणि जेफ विल्यम्स  अंतराळस्थानकात स्पेसवॉकची तयारी करताना

                                                                                                                              फोटो -नासा संस्था 
Kate Rubins हिचा हा पहिलाच स्पेस वॉक आहे त्या मुळे तूला ह्या स्पेस वॉक बद्दल काय वाटतेय !
तू  त्या साठी तयार आहेस का ? असे विचारताच केट म्हणाली ," कि तिने आधीच तिच्या ट्रेनिंग दरम्यान ह्या स्पेस वॉक साठी आवश्यक तयारी केली असल्यामुळे ती ह्या स्पेस वॉक साठी तयार आहेच शिवाय हा पहिलावहिला स्पेस वॉक चा अनुभव तिच्यासाठी थरारक  रोमांचकारी आणि आनंददायी असेल "
Jeff  Williams ह्यांचा मात्र हा चवथा स्पेस वॉक असल्यामुळे ते अनुभवी आहेत स्पेस वॉक करणे अत्यंत कठीण आणि धोकादायक असले तरीही तो उपयुक्त आणि आवश्यक कामासाठीच करावा लागतो त्यांच्यासाठीही स्पेस वॉकचा अनुभव आनंददायी व थरारक असतो त्या साठी खूप तयारी मात्र करावी लागते असं त्यांनी सांगितल
19 ऑगस्टला करण्यात येणारया ह्या स्पेस वॉक मध्ये करण्यात येणारया अडॉप्टरच्या तांत्रिक जोडणीमुळे स्थानकात आगामी काळात येणारया Boeing Space व  X Commercial Crew Spacecraft च्या पार्किंग साठी जागा व मार्ग तयार करण्यात येईल हे अडॉप्टर वीस जुलैलाच अंतराळ स्थानकात पाठवले होते आता 19ऑगस्टला ते अंतराळस्थानकाला जोडण्यात येईल जपानचे अंतराळवीर Onishi  ह्या दोन अंतराळवीरांना स्पेस वॉक दरम्यान मदत करणार असून त्यांच्या अँक्टिव्हिटीज वर लक्ष ठेवतील
सकाळीआठ वाजून पाच  मिनिटाला हा स्पेस वॉक सुरु होईल सहा साडेसहा तासांच्या ह्या अंतरिक्षातील स्पेस वॉकचे लाईव्ह प्रक्षेपण नासा टी वी वरून केले जाणार आहे
ह्या अंतराळवीर जेफ विल्यम्स यांनी स्पेस वॉकची तयारी पूर्ण झाल्याचे twitter वरून कळवले आहे

Friday 12 August 2016

मंगळ ग्रहावरील भविष्यातील मानवी निवासाच्या नियोजनासाठी सहा कंपन्यांची निवड

           अंतराळातील भविष्यातील मानवी निवासाचे काल्पनिक मॉडेल                          फोटो -नासा संस्था

नसा संस्था -12 ऑगस्ट

नासाचे शास्त्रज्ञ आगामी मानव सहित मंगळ मोहिमेची जोरदार तयारी करत आहेत आतापर्यंतच्या त्यांच्या यशस्वी मंगळमोहीमेमुळे त्यांचा उत्साह द्विगुणित झाला असून आता नासाचे शास्त्रज्ञ मंगळावर मानव पाठवण्या सोबतच मानवाच्या तिथल्या निवासासाठीही प्रयत्नशील आहेत
भविष्यात जर नासाच्या संशोधकांच्या मानवासहित मंगळ मोहिमेला यश मिळाले आणि मानवाला तिथे राहण्यायोग्य वातावरण सापडले तर मानव निश्चितच तिथे निवास करेल आणि त्या साठी त्याला तिथे घराची आवश्यकता भासेल
म्हणूनच नासाचे शास्त्रज्ञ आतापासूनच भविष्यातील मंगळ ग्रहावरील वसाहतीचे नियोजन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत
आणि त्याच उपक्रमाअंतर्गत नासाने आता अमेरिकेतील सहा कंपन्यांची ह्या मंगळावरील वसाहतीच्या नियोजनासाठीचे मॉडेल बनवण्यासाठी निवड केली आहे

Bigelow Aerospace-Las Vegas
Boeing Of Pasadena-Texas
Lockheed Martin- Denver
Orbital ATK-Dulles,Virginia
Sierra Nevada Corporations Space Systems of Louisville-Coloorado
NanoRacks of Webster-Texas

 ह्या सहा अमेरिकन कंपन्या मिळुन येत्या दोन वर्षात भविष्यातील मंगळ ग्रहावरील मानवी निवासासाठी अपेक्षित मॉडेल बनवतील त्या साठी नासा संस्थेतर्फे 65 मिलियन डॉलर खर्च होईल असा संशोधकांचा अंदाज आहे
 2016 व  2017  ह्या वर्षात सुरु असलेल्या ह्या प्रोजेक्ट मध्ये जर अपेक्षेपेक्षा जास्त खर्च आला तर नासा संस्था  2018  साली ह्या जास्तीच्या खर्चाचा भार उचलेल तर ह्या सहा कंपन्यांतर्फे तीस टक्के खर्च करण्यात येईल
नासाच्या हॅबिटेशन सिस्टीम अंतर्गत मंगळ ग्रहावर मानवी निवासासाठी पोषक वातावरण असलेली सुरक्षित जागा शास्त्रज्ञ शोधत आहेत
नासाच्या अमेरिकन  अंतरिक्ष एजन्सीचे प्रमुख निर्देशक  Jason Crusan  म्हणतात कि,शास्त्रज्ञ 
आता मानवाच्या आगामी अंतरिक्ष मोहिमेसाठी आणि मानवाच्या इतर ग्रहावरील निवासासाठीही प्रयत्नशील आहेत  
सध्या शास्त्रज्ञ मंगळ ग्रहावरील मानवी वस्ती निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत
आता जर मंगळावर मानव पोहोचला किंवा भविष्यात तेथे मानवी वस्ती निर्माण केली तर त्यांना पृथ्वीवरून आवश्यक सामान पाठवण्याची गरज भासू नये आणि त्यांना पृथ्वीवर विसंबुन न राहताही महिनोंमहिने किंवा वर्षेसुद्धा तिथे राहता येईल व संशोधन करता येईल ह्या साठी संशोधक प्रयत्न करत आहेत




Thursday 11 August 2016

प्रदूषण विरहित हवाई यात्रेसाठी नासाने केली ग्रीन टेक्नॉलॉजीची निवड

    नासा संस्थेने निवडलेले ग्रीन सिद्धांत                                                                             फोटो -नासा संस्था

       नासा संस्था - 10 ऑगस्ट
नासा संस्थेने कमी इंधनात व प्रदूषण विरहित हवाई यात्रेसाठी नवीन ग्रीन टेक्नॉलॉजीची निवड केली आहे
नासाचे संशोधक स्वच्छ व प्रदूषण विरहित हवाई यात्रेसाठी सतत प्रयत्नशील आहेत त्याचाच एक भाग म्हणून नुकतीच त्यांनी पाच ग्रीन टेक्नॉलॉजी सिद्धांताची निवड केली आहे
संशोधकांच्या मते ह्या ग्रीन सिद्धांताचा वापर केल्यास  विमान उड्डाणामुळे होणारे वायू प्रदूषण पंचाहत्तर टक्क्यांपर्यंत कमी होईल शिवाय विमानाच्या इंधनाचीही बचत होईल
नासाच्या ट्रान्सफॉर्मेटिव्ह एरोनॉटिक्स कन्सेप्टस प्रोग्रॅम अंतर्गत दोन वर्षे संशोधन करून संशोधकांनी ह्या सिद्धांताची निवड केली आहे
ह्या कॉन्सेप्टस अंतर्गत ,
1 -   विमान उड्डाणासाठी विजेचा वापर करणे 
2  -  अल्टरनेटिव्ह इंधनाचा वापर करणे 
3 -    3 D प्रिंटिंग टेक्निकचा वापर इलेक्ट्रिक मोटारीची क्षमता वाढवण्यासाठी करणे 
4 -    लिथियम एअर बॅटरीचा उपयोग ऊर्जा साठवण्यासाठी करणे 
5 -   नवीन मेकॅनिझमचा वापर करून विमान उड्डाणाच्या वेळी विमानाच्या पंखांचा आकार बदलणे
आणि एरोजेल ह्या वजनाला हलक्या फुलक्या असलेल्या पदार्थाचा उपयोग एअरक्राफ्टच्या अँटेना मध्ये करणे 
ह्या पाच गोष्टींचा ह्या सिद्धांतात समावेश आहे
ह्या प्रोग्रॅमचे प्रोजेक्ट मॅनेजर Doug Rohn ह्यांच्या मते ह्या नवीन सिद्धांताच्या वापरामुळे जेट विमानामुळे होणारे ध्वनी प्रदूषण देखील कमी होण्यास मदत होईल
नासाचे संशोधक आता विमान उड्डाणाच्या वेळी विमानातून बाहेर पडणाऱया कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन कमी करण्यासाठीही प्रयत्नशील आहेत     

Tuesday 9 August 2016

यवतमाळ येथे भरपूर पाऊस पण अजूनही पाणीकपात सुरूच

यवतमाळ येथे जून मध्ये सुरु झालेला पाऊस आता ऑगस्ट महिन्यातही सतत बरसतच आहे कधी जोरदार तर कधी रिमझिम पडणाऱ्या पावसामुळे यवतमाळ येथील नदी, नाले दुथडी भरून वाहात आहेत यवतमाळला पाणी पुरवठा करणारी धरणेही आता पाण्याने भरली आहेत एकंदरीत पाऊस समाधानकारक व पुरेसा पडलाय असे असूनही उन्हाळ्यात सुरु झालेली पाणीकपात अजूनही सुरूच आहे
यवतमाळकर गेल्या वर्षभर कमी पावसामुळे पाणीटंचाईच्या समस्येला साथ देत आहेत यवतमाळात आधी एक दिवसाआड होणारा पाणीपुरवठा पाणी कपातीमुळे आठवड्यातून दोनदा करण्यात आला नंतर भयंकर उन्हामुळे निर्माण झालेल्या भीषण दुष्काळामुळे पाणी आठवड्यातून एकदाच सोडण्यात आले कधी उशिराने तर कधी अनियमित व कमी दाबाने अत्यंत गढूळ पाणी नळाला येत होते तरीही नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाला संयमाने साथ दिली कारण मागच्या वर्षी कमी पाऊस पडल्याने दुष्काळामुळे नदीनाले आटले होते धरणातील पाणीसाठाही अत्यल्प होता
विशेष म्हणजे  उन्हाळ्यातच लोकांनी स्वयंस्फुर्तीने धरणातील साचलेला गाळ काढला होता आणि तोही लोकवर्गणी गोळा करून
आता नदीनाले तुडुंब पाण्याने भरले आहेत धरणेही पाण्याने भरली आहेत तरीही पाणीपुरवठा मात्र अजूनही आठवड्यातून दोनदाच केला जातोय पाऊस पडल्यामुळे आठवड्यातून एकदा केला जाणारा पाणीपुरवठा दोनदा केल्या जातोय पण अजूनही तो पूर्ववत झाला नाही
राज्यात सर्वत्र जिथे,जिथे समाधानकारक पाऊस झालाय व धरणे भरलीत तिथे पाणीकपात रद्द झालीय आणि पाणीपुरवठा नियमित केला गेलाय मग यवतमाळ येथे अपेक्षित पाऊस पडला असताना व धरणे ओव्हरफ्लो झाली असतानाही पाणी पुरवठा नियमित का होत नाहीय ?
विशेष म्हणजे सरकारकडून पाणीटंचाईच्या काळात आणि नंतरही पाणीप्रश्न सोडवण्यासाठी कोट्यावधीचा निधी मंजूर झाला आणि प्राप्तही झाला तरीही पाणीकपात सुरूच आहे
निवडणुकी आधी यवतमाळला चोवीस तास पाणी पुरवठा करू असे आश्वासन देणारे नेते पाणीपुरवठा नियमितही करू शकले नाहीत त्या मुळे संतप्त झालेले नागरिक आता पावसाळ्यातील हि पाणी कपात रद्द करून दररोज पाणी पुरवठा करावा अशी मागणी करत आहेत