Monday 29 February 2016

नासाने टीपलेय अवकाशातील निळ्या बबलचे आकर्षक दृश्य

                 अवकाश निर्मित  निळा बबल   फोटो -नासा आणि इसा संस्था

नासा संस्था -26 Feb.
नासा संस्थेकडून 26 Feb. ला मिळालेल्या माहिती नुसार  
अवकाश निर्मित निळ्या रंगाच्या आकर्षक बुडबुड्याचे हे मनमोहक दृश्य नासा व इसा ह्या अवकाश संशोधन संस्थेच्या संशोधकांनी हबल दुर्बिणीच्या सहय्यानी अचूक टीपलेय  
हा निळसर बुडबुड्याच्या आकाराचा गोलाकार तेजोमेघ अवकाशातील धूळ ,हेलियम ,हायड्रोजन व इतर वायूंच्या संयुगांनी W.R.31 a ह्या तारयाभोवती तयार झाला असून त्याचे नाव W.R.31 a नेब्युला असे आहे हा ग्रह पृथ्वी पासून 30,000 प्रकाश वर्षे दूर असून 20,000  वर्षांपूर्वी तो तयार झाला असावा मात्र सध्या तो प्रसरण पावत आहे त्या मुळे  100,000  वर्षे एव्हडेच त्याचे आयुष्य असल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे        

Wednesday 24 February 2016

चाय पे चर्चा

  
               
                           नुकतीच सरकारने लांब पल्याच्या रेल्वे प्रवाशांना पंचवीस प्रकारचा चहा  मीळणार असल्याची घोषणा केलीय चहा शौकिनांसाठी हि घोषणा सुखद आहे एरव्ही पाणीदार चहासाठी रेल्वे स्टेशन प्रसिध्द होत कधीही कोठेही पाणचट ,पाणीदार चहा असला कि ," काय रेल्वे स्टेशन सारखा चहा आहे !" अस विनोदाने म्हटल जायच पण आता हे चित्र बदलणार आहे लांबच्या रेल्वे प्रवासा दरम्यान ,"अद्रक तुलसी चाय ,आम पापड चाय ,कुल्हड चाय,हनी जिंजर चाय " आदी पंचवीस प्रकारच्या चहाचा आस्वाद चहा शौकिनांना घेता येणार आहे अर्थात चहा मागवण्यासाठी मोबाइल वर IRCTC च App डाऊन लोड कराव लागणार आहे आणि त्यावरूनच आपल्या आवडीच्या चहाची फर्माईश करता येणार आहे
                 चहा आता भारतीयांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला असला तरी तो शोधण्याच श्रेय मात्र चीनला जात त्यांनीच चहाला जागतिक स्तरावर पोहोचवल आणि वर्षानुवर्षे चहा आपली आब राखून आहे चहा सर्वच ऋतूत लोक आवडीन पितात थंडी पावसात चहा शरीराला उब देतो तर उन्हाळ्यात उन्हान त्रासलेल्या शरीरात तरतरी आणी उत्साह निर्माण करतो.डोकेदुखी ,सर्दीत, तापात चहा गुणकारी आहे ते त्यातील औषधी घटकांमुळे हे शास्त्रज्ञानी संशोधनांती सिध्द केलय चहावर जगात सर्वत्र संशोधन केल्या जातय भारतात आसाम मधील"टोकलाई"इथेही चहावर संशोधन केल्या जातय नवीन संशोधना नंतर संशोधकांनी चहामध्ये anti oxidant आहेत व ते शरीरातील अपायकारक घटक नष्ट करतात शिवाय चहा मुळे रक्तदाब नियंत्रित राहतो , कॅन्सर ,हृदयविकारावर चहा उपयुक्त आहे ,त्यातील उपयुक्त रासायनिक घटकामुळे cholesterolची पातळी वाढत नाही अस सिध्द केलय चहातील कॅफिन ,पॉलीफेनाल शरीरास उपयुक्त आहे त्यामुळे चहा शौकिनांना आता माफक प्रमाणात बिनधास्त चहा प्यायला हरकत नाही
                 चहा कडकडत्या थंडीत ,भिरभिरत्या पावसात ,रखरखत्या उन्हात, कधी कॉलेज कॅन्टीन मध्ये तर कधी प्रवासात, टपरीवरच्या कळकटल्या केटलीतुन काचेच्या ग्लासात किंवा क़पात पिल्या जातो तर कधी ए सी रूम मध्ये बसून ऑफिस टाइम मध्ये ,गप्पासोबत,काम करताना दिल्या घेतला जातो कधी प्रवासात," गरम चाय लेलो ! " म्हणणाऱ्या पोरयाकडून तर कधी विमानातून युज आणि थ्रो च्या कागदी कपातून डिप टीप टी bag घालून पिल्या जातो
                 हा चहा चीनी लोकांनी आधी शोधला म्हणूनच हा चहा तिथे लोकप्रिय तर आहेच पण हा चहा तिथे कसाही केव्हाही पिल्या जात नाही तर तो खास नजाकतीन शिष्ठाचार पाळून वेगवेगळ्या वेळेस ठरलेला चहा घेतला जातो आपल्यासारखाच तिथे चहा देऊन पाहुणचार केला जातो आपल्या कडे पूर्वी काश्मिरी कहवा देखील काश्मीर मध्ये खास चांदीच्या नक्षीदार केटली तून दिल्या घेतला जायचा अर्थात श्रीमंत ,कारखानदारांकडे! कहवा खास मसाले ,केशर,सुखा मेवा घालून बिन दुधाचा केला जातो हा चहा काश्मिरी लोकांचे तिथल्या बर्फ वर्षावात थंडीपासून रक्षण करतो पूर्वी कारखानदार मोठी खरेदी करणाऱ्या गिराइकांना हा चहा पिऊन पहा असा आग्रह करत चहा गरीब ,श्रीमंतांच उत्तम आदरातिथ्याच साधन आहे पूर्वेला बंगालमध्ये चहा मातीच्या छोटया मडक्यातून किंवा कुल्हड मध्ये पिल्या जातो तर दक्षिण ,तामिळनाडु आंध्रात चहा स्टीलच्या ग्लास व पसरट वाटीतून पिल्या जातो तिरुपतीला चहा पाणी तापवायच्या तांब्याच्या बंबामध्ये केल्या जातो दर्शन रांगेत जाण्याआधी किंवा सुप्रभातमच्या दर्शन रांगेत जाण्याआधी लोक हा मसाला चहा आवर्जून पितात कारण तो खरच टेस्टी असतो खाली गोविंदराज टेंपल जवळही असा चहा मिळतो तिबेट मध्ये नमकीन चहा पिला जातो चहात साखरेऐवजी मीठ व लोणी घालतात.काहीजण खोबरही घालतात ह्याला नून चाय अस म्हणतात काश्मीरमध्येही असा नून चहा आवडीन पिल्या जातो तिबेटमध्ये चहाची ताजी पाने खलबत्यात कांडून ,ती पाने उकळून असा नून चहा केल्या जातो
                        चहाचा शोध चीनमधल्या तत्ववेत्त्याला जंगलात पाणी तापवत असताना त्यात वारयान उडून आलेली चहाची पाने मिसळल्यान अपघातान लागला चहाच्या रासायनिक घटकामुळे त्याला रंग सुवास अन स्वाद आला आणि ते पाणी पिल्यान त्याला तरतरी आली त्या मुळे तो रोजच आवडीन पाण्यात पाने टाकुन उकळून पिऊ लागला अन लोकांना पाजू लागला कालांतराने असा चहा प्रसिद्ध झाला सुरवातीला चीन मधून चहा सर्व देशात निर्यात केल्या जायचा पण नंतर भारतात आसाम मध्ये चहाची झाड सापडली
पूर्वी चहा औषध म्हणून पिल्या जायचा आता मात्र चहाचे भरपूर प्रकार प्यायला मिळतात हैदराबादेत अपोलो हॉस्फीटल जवळ ग्रीन टी ,हर्बल टी,हनी जिंजर लेमन टी अशा विविध प्रकारचा चहा मिळतो आताचा हेल्थ कॉन्शस ग्रीन टी पूर्वी आजीच्या बटव्यातील औषधी वनस्पती घातलेला औषधी काढा म्हणून नाक मुरडत पिल्या जायचा पण आता मात्र हा काढा आधुनिक नाव लेऊन नव्या प्रकारात उपलब्ध झालाय आणि विशेष म्हणजे तो आवडीन पिल्याही जातोय मुंबईत कट चहा फ़ेमस आहे तर पूर्वी चहा कॉफी मिक्स चहाला मारामारी म्हणत चहा आवडी प्रमाणे दुधातला ,अर्ध्या दुधातला ,कोरा वरून दुध टाकुन किंवा मलाई मारकेही पिला जातो
                    चहाची झाड उंच वाढत असली तरीही त्यांची पाने खुडता यावीत म्हणून हि झाड कमी उंचीची ठेवल्या जातात भारतात आसाम ,त्रिपुरा ,केरळ दार्जीलिंग मध्ये चहाच्या बागा आहेत चहाची पाने तोडून त्यावर रासायनिक प्रक्रिया करून वाळवून त्याची पूड केल्या जाते मग चहा जाड व बारीक भुकटीच्या रुपात आकर्षक packing मधून विक्रीसाठी बाजारात येतो पण पूर्वी मात्र दुकानातून किलौ प्रमाणे चहा सुटा मिळत असे त्यातही दार्जीलिंग टी, आसाम टी. ,टाटा टी.अशा मोजक्याच कंपनीचा चहा मिळायचा मधल्या काळात सुपर डस्ट ,रेड लेबल ,डबल डायमंड ,सपट परिवार ह्यांनी बाजार काबीज केला नंतर," वाह ताज !"म्हणत ताजमहाल कंपनीन झाकीर हुसेन ,सैफ आली खान वै मान्यवरांना आपल्या जाहिरातीत आणून उंचे लोग उंची पसंत म्हणून ताजची शान राखली तर सपट परीवारन स्वस्त आणि मस्त म्हणत सर्वसामान्यांच्या घरात स्थान मिळवल आता असंख्य प्रकारच्या नावाच्या चहाच्या कंपन्या बाजारात आल्यात त्या मुळे स्पर्धाही वाढलीय त्या मुळे गृहिणींना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या आकाराच्या बरण्या ,मग ,जार आता चहासोबत मोफत दिल्या जातात आता चहाची नाव पण वैविध्य पूर्ण असतात उदाहरणार्थ वाघ बकरी चहा त्याचा चहाशी काय संबंध हे मात्र विचारू नका!  तसच पूर्वी आवाज करत चहा पिणारयाला लोक हसत पण एका कंपनीन हाच आवाज " फुSSरSSकSSन पियो!" म्हणत जाहिरातीसाठी वापरलाय.
                अर्थात चहाची चव रंग आणि स्वाद जगभरातील तज्ञ चाखतात आणि मगच त्याची किंमत ठरवली जाते मोदी सरकार सत्तेत येण्या आधी आणि नंतरही चाय पे चर्चा बरीच गाजली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच स्वत:च चहाच दुकान असल्यामुळे ह्या चर्चेला चांगलाच रंग चढला आणि आता तर रेल्वे प्रवाशांना कडक फेसाळ आणि वर उल्लेख केल्या प्रमाणे पंचवीस प्रकारच्या चहाचा आस्वाद घेता येणार आहे

Saturday 20 February 2016

दिल दोस्ती दुनियादारी प्रेक्षकांचा निरोप घेतेय

                    दिल दोस्ती दुनियादारी हि मालिका आज प्रेक्षकांचा निरोप घेतेय गेल्या वर्षभर दिल दोस्तीतल्या माजघरातील हे दोस्त प्रेक्षकांच्याही माजघरातील झाले होते विशेष म्हणजे महाविद्यालयातील समकालीन युवकांच्या पसंतीची असलेली हि मालिका वयाच बंधन पार करत जेष्ठांच्याही आवडीची बनली हे खरेतर माजघरातील कलाकारांच यशच आणि अर्थातच लेखिका दिगदर्शकाचही !  दिल दोस्तीच आर्या आंबेकर व जुईली जोगळेकरने म्हटलेल शीर्षक गीतही अल्पावधीतच लोकप्रिय झाल
                  सुरवातीला उनाड वाटलेली माजघरातील हि दोस्त मंडळी जसजसे एपिसोड प्रक्षेपित होत गेले तसतशी त्यांच्यातली प्रगल्भता अन त्यांच्या स्वभावातले विविध पैलू उलगडत गेले त्यांच्यातल एकमेकांना सावरून घेण ,धीर देण अन नैराश्य घालवत पुन्हा आत्मविश्वासाने आपल्या मित्रांना उभ करण्याचा एक अनोखा पैलू प्रेक्षकांना पहायला मिळाला
                     सध्याच्या कट ,कारस्थान ,खून मारामारया ,तुरुंगवास आणि त्याच त्याच रटाळ कथानक असलेल्या मालिकांमध्ये हि मालिका आपल्या साधेपणामुळे अन दोस्तातल्या सच्चेपणामुळे इतर मालिकांपेक्षा वेगळी ठरली आणि म्हणूनच प्रेक्षकांच्या विशेष पसंतीची ठरली काही अपवाद वगळता ह्या मालिकेतील मनमोकळा संवाद अन कधी कोपरखळी मारत तर कधी शाब्दिक कोटी करत केलेले नर्म विनोद प्रेक्षकांना वर्षभर मनमुराद हसवत होते ह्या दोस्तांमधली चिडवाचिडवी ,खेचाखेची पेक्षकांना रिझवत होती दिवसभराच्या कामान कंटाळलेल्या अन मरगळलेल्या मनात उत्साह जागवित होती (प्रत्यक्षात मात्र हे कलाकार शुटींगच्या वेळी रात्री जागुन अभिनय करत होते ) रात्री उशीरान प्रक्षेपित होणारया ह्या मालिकेन सगळ्यांना मनमोकळ हसवल हलक फुलक मनोरंजन केल हे दोस्त कधी एकमेकांशी भांडत ,कधी एकमेकांची बाजू घेत त्यांना अडचणीतून बाहेर काढून मदतीचा हात देत, एकमेकांचे हात गुंफत अखेरपर्यंत एकजुटीन राहिले दोस्तांच्या यशासाठी प्रसंगी माघार घेत राहिले एकमेकांच्या यशाने आनंदित झाले तर अपयशान दु:खी! कोठेही कुटील कारस्थान नव्हत कि एकमेकांचे पाय ओढण नव्हत ! तर होत एकत्रित येऊन आत्मविश्वासाने आलेल्या प्रसंगाला धैर्याने सामोरे जाण्याच बळ देणार मैत्रबंध !
                         नवीनच संसाराच सुखस्वप्न घेऊन आपल्या जोडीदारासोबत रहायला आलेल्या विवाहित रेशामाला नवरयाची "लिव इन रिलेशनशिप" मधली प्रेयसी पाहून झालेल्या मानसीक आघातातून सावरत नव्या आयुष्यात नव्यान जगण्याची नवसंजीवनी देणारे हे दोस्त कैवल्यला त्याच्या गाण्याच्या करिअर मध्ये आलेल अपयश असो कि मिनलच्या नाटयप्रवेशाच्या वेळी डळमळीत झालेला तिचा आत्मविश्वास असो त्यांना उभारी देण्यात त्यांना यशस्वी करण्यात आणि सुजयच्या बहिणीच मानसिक दौर्बल्य दूर करण्यातही हे दोस्त यशस्वी ठरले हे दोस्त एकमेकांच्या मानसिक एकांताच्या वेळी एकमेकांचे आधार झाले
                          दिल दोस्तीतले हे सारे दोस्त आपआपल्या भूमिकेत सरस ठरले प्रसंगी कठोर पण मदत करणारा तत्वनिष्ठ आणि कंटाळवाण बौद्धिक घेणारा ,बहिणीच्या आजारपणामुळे खचलेला तरीही त्या परिस्थितीला धैर्याने सामोरे जाणारा सुजय सुव्रत जोशीन उत्तम साकारला मराठी न समजल्यान गोंधळणारी निरागस अन कचरयातून कला साकारताना कधी नवीन कपड्यांना कात्री लावत तर कधी कामाच्या वस्तू वापरून धमाल उडवून देणारी ख्रिस्चन  Ana पूजा ठोंबेन छान वठवली तर थोडीशी बॉईश ,dashing , मिनल स्वानंदिन छान साकारली  सखी गोखालेनही साधी पण तितकीच कणखर सारया दोस्तांना वळण लावत अस्ताव्यस्त घर सावरत आपल दु:ख विसरून सगळ्यांना प्रेमान करून खाऊ घालणारी भाऊक रेशमा छान साकारली ह्या दोघींतही आपल्या आईवडिलांचे अभिनयाचे गुण उपजतच उतरलेत  गंगाधर टिपरे नंतर बरयाच वर्षांनी लोकांना हि मालिका आपलीशी वाटली  अभियंता पुष्कराज चीरपूटकरन भडक डोक्याचा खादाड पण मनान हळवा आशु छान वठवला तर किंजलन आपल्या गुजराती बोलण्यातून   विनोद  घडवत मालिका कंटाळवाणी होऊ दिली नाही अमेय वाघचा कैवल्य तर उत्तमच! त्यान आधी सिनेमातून अभिनय केल्याने त्याच्या अभिनय सहज सुंदर आहे
                              गेल्या वर्षभर हे दोस्त आपल्या अभिनयातून संवादातून प्रेक्षकांना हसवत  होते त्याचं  मनोरंजन करत होते विशेषत: रेशमा तिचा नवरा राकेश सोबत न राहता तिच्या ह्या मित्रांसोबत रहाते हे सत्य तिच्या आईवडील व इतरांपासून लपवण्यासाठीची कसरत करताना ,त्यातून अभावितपणे होणारे गैरसमज अन घडणारे विनोद ह्या मुळे गेले वर्षभर हि मालिका उत्तरोत्तर रंगत गेली आणि मनोरंजक ठरली सुरवातीला उद्धट वाटणारी हि दोस्त मंडळी शेजारच्या  निकम आजीच्या बाबतीत मात्र हळवी होतात तिचा आदर राखतात   कैवल्यचे आईबाबा असो कि रेशमाचे आईवडील ह्या जेष्ठांचाहि ते आदर करतात हे एपिसोड मधून लोकांना पाहायला मिळाल अन बहुदा ह्याच मुळे हि मालिका जेष्टांनाही पहायला आवडली ह्या मालिकेतील प्रगल्भा ,निशा ,राकेश ,नागावकर ह्याचाही अभिनय चांगला होता ह्या साऱ्यांनीच मालिकेत विनोदी रंग भरले
                              आता मात्र दिल दोस्ती  हि मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतेय दिल दोस्तींच्या चाहत्यांसाठी हा निरोप हुरहूर  लावणारा असेल पण लवकरच ह्या मालिकेचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे अशी बातमी आहे पण तूर्तास तरी मालिका संपतेय आणि लोकांना हवीहवीशी वाटत असतानाच संपतेय हेच ह्या मालिकेच यश आहे  पण दिल दोस्तीतले हे दोस्त आपल्याला इतर टी.वि. मालिकेतून कार्यक्रमातून दिसतील अशी आशा करू यात  



Wednesday 17 February 2016

एकाच वेळी अंतराळ स्थानकात व पृथ्वीवर फुलली झीनियाची फुले स्कॉट केलींची valentine day ला अनोखी भेट

नासाच्या केनेडी स्पेस सेंटर मध्ये Chunk Spern  हे चेंबर मधून झीनियाचा ट्रे काढताना
नासा संस्था -16 Feb.2016
नासाच्या फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर Vencore येथील प्रोजेक्ट इंजिनीअर Chunk Spern ह्यांनी 1 Feb ला अंतराळ स्थानका प्रमाणेच व्हेजी प्रकल्पा अंतर्गत उगवलेली झीनियाची फुले तोडली फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर मधेही व्हेजी प्रकल्प राबवण्यात आला ह्या प्रकल्पा मध्ये स्पेस सेंटर मधील एका चेंबर मध्ये अंतराळ स्थानका प्रमाणेच वातावरण निर्मिती करून भाजी व फुलांची रोपे लावली गेली आणि त्याची व्यवस्थित निगा राखली गेली आणि आता ह्या प्रकल्पाचे प्रमुख इंजिनीअर Chunk Sperm व त्यांच्या टीमच्या प्रयत्नांना यश आले असून कृत्रिम वातावरणात झीनियाची ताजी व टवटवीत फुले उमलली आहेत.
Scott Kelly ह्यांची Valentine day ला अनोखी भेट
तिकडे अंतराळ स्थानकातही अंतराळवीर Scott Kelly ह्यांनी ह्याच व्हेजी प्रकल्पा अंतर्गत उगवलेली झीनियाची फुले 14 feb ला ValentineDay च्या दिवशी तोडून पृथ्वीवासीयांना अनोखी भेट दिलीय.
एकाच वेळी अंतराळ वीरांनी पृथ्वीवरील मानवांना अंतराळात व पृथ्वीवर, आपल्या बुद्धी कौशल्याने व अथक परिश्रमाने विपरीत हवामानात व कठीण वातावरणात झीनियाची फुले फुलवून दाखवली अंतराळात पृथ्वीसारखे व पृथ्वीवर अंतराळ स्थानकासारखे वातावरण निर्माण करून नवनिर्मिती करणे सोपे नाही त्यांच्या अथक परिश्रमाला व कर्तुत्वाला दाद द्यायलाच हवी !

Monday 15 February 2016

अवकाश निर्मित नीलपंखी हेन तारका समूह

                                                    Photo- NASA &ESA

नासा संस्था 12 feb.2016

नासा व इसा ह्या संस्थेच्या वैज्ञानीकांनी विश्वातील अदभूत चमत्काराचे हे नेत्रदीपक हेन तारका समूहाचे दृश्य हबल दुर्बिणीच्या सहाय्याने अचूक टिपलेय
जवळपास तीन हजार तारकांनी बनलेला Hen-2-437  हा तारका समूह Vulpecula  च्या उत्तरेला अतिशय क्षीण वातावरणात स्थित आहे ह्या तारकासमूहातील वायूंमुळे व बर्फीय वातावरणामुळे त्याला निळसर रंग प्राप्त झाला असून त्याच्या दोन्ही बाजू एकसारख्या व पक्षांच्या पंखाप्रमाणे भासताहेत
1946 मध्ये प्रथम Minkowski ह्यांनी Hen-2-437 ह्या तारका समूहाचा शोध लावला नंतर त्यांनी ं M2-9 ह्या twin jet nebula  चाही शोध लावला

असा बनला Hen-2-437 

एखाधा मोठा  तारा जेव्हा नष्ठ होण्याच्या स्थितीत येतो तेव्हा तो तप्त  गोळा गरम वायुमुळे लाल होतो व त्याच्या वरच्या भागात वायू भरून तो फुगतो पण जसजसे हे वायू थंड होऊ लागतात तेव्हा वरील आवरण आकुंचित होते आणि त्यातील वायू बाहेर पडू लागतात बाहेर पडलेले हे वायूंचे कण तिथल्या अति थंड वातावरणामुळे बर्फाच्या सूक्ष्म कणामध्ये रुपांतरीत होतात व त्यांना निळसर रंग प्राप्त होतो
ह्या छायाचित्रातील   Hen-2-437  ह्या तारकासमूहाच्या दोन्ही बाजूने सारख्या आकारात पसरून जमलेल्या वायूंच्या बर्फीय कणांमुळे हा तारका समूह एखाद्या सुंदर निळसर पंख पसरलेल्या पक्षाप्रमाणे भासतोय
त्या मुळेच सर्वसामान्या प्रमाणेच नासा व इसाच्या अंतराळवीरांना देखील अवकाशातील ह्या अदभूत चमत्काराचा फोटो काढण्याचा मोह पडला आणि त्यांनी हबल दुर्बिणीच्या सहाय्याने  हे दृश्य अचूक टिपून सारयांना पाहण्यासाठी उपलब्ध केलय

Friday 12 February 2016

आता नासाची अंतराळ वीरांगना Peggy Whitson करणार space walk

         फोटो -नासा संस्था -Bill Brassard (NBL)

नासा संस्था -11feb.2016
 नासाची अंतराळ वीरांगना Peggy Whitson  अंतराळात space walk करणार आहे ह्या वर्षाच्या शेवटी अंतराळ स्थानकात जाणारया 50-51  ह्या अंतराळ मोहिमेत त्यांचा सहभाग आहे
ह्या आधीही त्यांनी अंतराळ स्थानकात सहा महिने  राहून संशोधन केले आहे
सध्या त्या Houston येथील Neutral Buoyancy Laboratory ( NBL) ,Jonson Space Center येथे पाण्याखाली स्पेस walk  करण्याचे प्रशिक्षण घेत आहेत
 Dr. Peggy Whitson  विषयी 
Dr. Peggy Whitson ह्या ऑक्टोंबर 2007 च्या shuttle-111 ह्या अंतराळ स्थानक मोहिमेत जाणारया पथकात सहभागी झाल्या होत्या तेव्हा त्यांची नासाच्या पहिल्या महिला सायन्स ऑफिसर म्हणून नेमणूकही झाली होती त्यांनी अंतराळ स्थानकात सहा महिने राहून संशोधन केले आहे त्यांच्या सहा महिने वास्तव्याच्या काळात त्यांनी Human Life Science,Microgravity  आणि Commercial payload ह्या विषयाशी संबंधित एकवीस विषयावर संशोधन केले
सहा महिने अंतराळ स्थानकात राहून  मोहीम 16 च्या अंतराळवीरांच्या पथकाचे नेतृत्व करणारया  त्या  नासाच्या पहिल्या महिला अंतराळ वीरांगना आहेत 


1995 साली अंतराळवीर Barnard A Harris आणि Michel Foale ह्यांचा पहिला स्पेस walk 


   Barnard A Harris आणि Michel Foale हे  स्पेस walk साठी  डिस्कवरी यानाच्या बाहेर पडतानाचा       क्षण  -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -9 feb 2016
1995 साली अंतराळवीर Barnard A Harris आणि Michel Foale ह्यांनी Discovery अंतराळ यानाच्या बाहेर पहिल्यांदा स्पेस walk केला होता अंतराळ वीर Barnard Harris हे STS -63 ह्या अंतराळ मोहिमेचे Jr payload  Commander होते 
अंतराळातील अतिशय थंड  तापमान असलेल्या वातावरणात अंतराळ वीरांचे संरक्षण करण्यासाठी स्पेस सूट मध्ये काही सुधारणा करण्यात आल्या होत्या व त्याची चाचणी घेण्यासाठी हा स्पेस walk करण्यात आला होता 
2500 पौंड वजनाचे  SPARTAN  हे  Space craft  हाताळण्याची तयारीही तेव्हा करण्यात येणार होती 
पण अंतराळ वीरांना तेव्हा स्पेस सूट मध्ये खूपच थंडी वाजत असल्यामुळे ते काम पूर्ण झाले नव्हते 
त्यांचा अंतराळातील हा स्पेस walk  चार तास अडतीस मिनिटांचा होता 
Barnard Harris हे स्पेस walk करणारे पहिले अफ्रिकन अमेरिकन अंतराळवीर आहेत 



Monday 1 February 2016

नासाचे संशोधक अवकाशात Biosensor द्वारे करणार संशोधन

नासा संस्था -30Jan.2016
नासाचे संशोधक अवकाशात Biosensor  द्वारे संशोधन करण्याची तयारी करत आहेत 2013च्या जुलै महिन्यात em-1 ह्या Biosentinel मिशनची अवकाशातील संशोधनासाठी निवड झाली पण ह्या प्रयोगाची प्रत्यक्ष सुरवात मात्र  2018च्या जुलै मध्ये होणार आहे
ह्या संशोधना अंतर्गत पृथ्वी भोवतालच्या 160 ते 2000 km अंतराच्या कक्षेतील अवकाश किरणांचा सजीवांवर होणारया दीर्घकालीन परिणामाचा अभ्यास केला जाइल ह्या अंतरातील कक्षेत सूर्य पृथ्वी पेक्षा थोडा जवळ असेल ह्या प्रयोगा अंतर्गत एक जैव संवेदक (organism ) मॉडेल म्हणुन वापरून व तो त्या वातावरणात पाठवुन त्या organism वर अवकाशातील अवकाश किरणांचा दीर्घकालीन Biological Radiation effect किती , काय व कसे होतात ह्या वर संशोधन केले जाइल
                                                      फोटो -नासा संस्था
                                          फोटो -नासा संस्था     -DNA- DSB radiation particles 
Biosentinel biosensor ह्या प्रयोगामध्ये यीष्टच्या पेशी एका कोरड्या microfluidic card मध्ये साठवल्या जाणार आहेत व ते अवकाशात  पाठवून योग्य स्थळी पोहोचल्यावर प्रत्यक्ष प्रयोगाला सुरवात होईल  ह्या प्रयोगा अंतर्गत ह्या वेळी एक card विशेष द्रवाने ओली केल्या जाइल त्या मुळे ती तीनचार आठवडे active राहील अशी शास्त्रज्ञांची अपेक्षा आहे ह्याच प्रमाणे ह्या मोहिमेच्या वेगवेगळ्या टप्प्यात card activate केल्या जातील व त्याची माहिती पृथ्वीवरील संशोधन केंद्रात साठवल्या जाइल जैवसेंसरचा वापर करून भविष्यात अशा वातावरणाचा मानवी जीवनावर कसा परिणाम होतो ह्याचेही संशोधन शास्त्रज्ञ करतील
अशाच प्रकारे तीन Biosentinel biosensorतयार करण्यात येतील एक आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन साठी जिथे सूक्ष्म गुरुत्वाकर्षण असेल व radiation तुलनेने कमी असेल दुसरे sensor पृथ्वीच्या गुरुत्वाकार्षणाच्या कक्षेत पण कमी radiation असलेल्या ठिकाणी आणि तिसरे Brookhaven National loboratory मध्ये radiation टेस्टिंग साठी
ह्या प्रकारे तीनही ठिकाणच्या यीस्ट सेलच्या वाढीची नोंद ठेऊन त्यावर space radiation मुळे होणारे परिणाम कळू शकतील विशेष म्हणजे गेल्या चाळीस वर्षात पहिल्यांदाच Biosentinel द्वारे सजिवावर स्पेस radiatition चा परिणाम काय होतो ह्याची संशोधनात्मक मोहीम राबवल्या जातेय शिवाय ह्या मोहिमेचा उपयोग भविष्यात मानवावरही स्पेस radiationचा काय परिणाम होतो हे शोधण्यासाठी केल्या जाइल
ह्या प्रयोगात यीस्ट सेलची निवड केल्या गेली कारण त्यांच्या व मानवी पेशीत बरेचसे साम्य आहे
तसेच DSB ( double strand breaks ) मुळे होणारे नुकसान भरून काढण्यास यीस्ट सेल समर्थ असतात आणि जास्तकाळ पर्यंत त्यांची साठवणूक करता येते