Friday 21 August 2015

श्रद्धा की अंधश्रद्धा

 सद्या अत्याधुनिक पोषाख घालुन सिनेसंगीताच्या तालावर नाचणारी पण स्वत:ला देवीचा अवतार भासवून दागिने भारी साड्यानि सजून भक्तांपुढे देवीच सोंग घेऊन त्यांना  फसवणारी त्यांच्या भोळेपणाचा फायदा उठवून त्याचा गैरफायदा घेणारी
"  भोंदू राधे मा व तिची भोंदुगिरी" ,तिचे वेडेचार ,तिची व तिच्या तथाकथित भोंदू भक्तांची चलाखी तिच्याच भक्तांकडून उघडकीस आलीय तिच्याविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप दाखल झालाय Dolly बिंद्रा आणि इतर अनेकांनीही आता तिच्या विरोधात तक्रारी दाखल केल्यात मिडियानेही तिची अधिक माहिती काढत तीच खर रूप लोकांपुढे आणलय त्या मुळेच तिची भोंदुगिरी उघडकीस आलीय ती भक्तांना लॉकेट ,अंगठी प्रसाद म्हणून देते अशी माहितीही समोर आलीय इतक सोन तिच्याकडे येत कोठून? असे प्रश्न सामान्यांना पडताहेत तसच सद्या नाशिक मध्ये सुरु असलेल्या कुंभमेळाव्यातील साधूंच्या अंतर्गत वादामुळे स्वत:ला साध्वी म्हणून घेणारया महंताच प्रकरण गाजतय 
 " साध्वी महन्ता "च भोंदूपण तिच्याच भक्त असलेल्या महिलेन उघडकीस आणलय भिकारीणींना पैसे देऊन त्यांना अनुयायी करणारी हि भोंदू महिला संसारिक त्रासाला कंटाळून साध्वी बनली आणि लोकांना फसवू  लागलीय अशी माहिती मिडियाच्या स्टिंग ऑपरेशन मुळे लोकांना कळाली  असे कितीतरी साधू अजूनही भोंदुगिरी करत भक्तांना फसवत असतील त्यांनाही पकडण आवश्यक आहे 
श्रद्धेची अंधश्राधा कधी बनते हे भोळ्या भक्तांना कळत देखील नाही आणि ह्याचाच गैरफायदा हे चलाख भोंदू साधू घेतात ह्याला कारण अज्ञान आणि अडचणीन त्रस्त झालेले लोक ह्या भोन्दुकडे जातात आणि फसतात 
      (ह्याच विषयावर लिहलेला व abp माझाच्या ब्लॉग माझावर प्रकाशित झालेला  हा लेख मी पुन्हा प्रकाशित करतेय )   

 मानवी जीवनात असे अनेक प्रसंग येतात कि माणूस नियती पुढे हतबल होतो. दुखा:ने खचून जातो.अचानक पणे आलेल्या संकटांनी घाबरून जातो अशा वेळेस माणूस ईश्वराचा धावा करतो आणि अघटीतपणे त्याला मार्ग सापडतो संकटाशी सामना करण्याची शक्ती येते आणि त्याच्या वरील संकटे दूर होतात ह्या विलक्षण योगायोगाच त्याला आश्चर्य वाटत आणि तो मनोभावे ईश्वराला शरण जातो ईश्वरावरची त्याची श्रद्धा अगाढ बनते आणि तो देवाची भक्ती करू लागतो त्याला पुजू लागतो.पण जो पर्यंत हि भक्ती एका मर्यादे पर्यंत असते तो पर्यंत ठीक असत पण एकदा का हि मर्यादा ओलांडली कि , श्रद्धेची अंधश्रद्धा कधी होते ते कळत देखील नाही. "अती  तेथे माती" हि गोष्ट मग अंधश्रद्धेच्या बाबतीत घडते नेहमी कर्म,कर्तव्य ,क्रियाशीलता ,प्रयत्न ह्याला महत्व दिल्यास देव भेटतो अगदी महाभारतातील कृष्णाचे उदाहरण त्या साठी योग्य ठरेल केवळ देवाची पूजा केल्याने आणि निवांत बसल्याने यश व पैसा कसा मिळेल?
                जो सतत कार्यरत राहतो कुठलेही अवडंबर न माजवता देवाची पूजा करतो त्याला देव सदैव प्रसन्न होतो काही वेळेस स्रिया किव्हा माणसे आपल्या संसाराकडे दुर्लक्ष करून फक्त देव,देव करतात ह्या देव, देव करण्यात कित्येकदा शाळेत जाणारी मुले उपाशी शाळेत जातात कारण आई पूजेत ,जपात किव्हा पारायणात गुंतल्याने स्वयंपाकाला उशीर होतो. अशी किती तरी उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर दिसतात .
                      हीच गोष्ट साधूच्या मागे जाण्याची असते आजकाल देवाच्या नावावर लुटण्याचा धंदा जोरात सुरु आहे काही भोंदू साधू गरीब भोळ्या ,भाबड्या लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतात त्यांना खोटेनाटे चमत्कार दाखवून फसवतात त्याच्या कडून पैसे दागदागिने लुबाडतात ,खेडोपाडी गावोगावी शहरात असे भोंदू साधू असतात असे फसवणारे साधू जेव्हा फसवणूक उघडकीला येते तो पर्यंत  परागंदा झालेले असतात जेव्हा लोक आपली समस्या घेऊन त्यांच्या कडे जातात तेव्हा त्यांच्याच तोंडून ऐकलेली माहिती जाणून घेऊन हे भोंदू त्यांचा माग काढतात आणि त्यांची आणखी माहिती गोळा करून जेव्हा त्यांना सांगतात तेव्हा चकित होऊन भक्त त्यांनी टाकलेल्या जाळ्यात अडकतात. मग ते सांगतील ते उपाय करू लागतात त्यांची सारासार बुद्धी गहाण पडते साधू ,भोंदू मागतील ती वस्तू ,पैसे,दागदागिने ,धान्य ते त्या साधूला दक्षिणा म्हणून आणून देतात आणि पूर्णपणे लुबाडले गेल्यावर भोळा भक्त भानावर येतो पण साधू त्यांना दाद देत नाही.
               कधी कधी तर ते त्यांचा फोन देखील चोरून ऐकतात भोळ्या भक्तांनी त्यांना फोन नंबर दिलेला असतोच कधी फोनला क्लिप बसवून तर कधी फोन नंबर मधेच दुसऱ्या फोनला जोडून तर कधी भ्रष्ट कर्मच्यारयाला हाताशी धरून अशा गोष्टी घडल्याची उदाहरणे मागे उघडकीस आली होती असे साधू आपल्या भोळ्या भक्तांना हातातून अंगारे,कुंकू काढून दाखवतात त्या साठी ते आपल्या शर्टाच्या किंवा  ब्लाऊजच्या बाहीत कशी खुबीने अंगारा किव्हा कुंकवाची पुडी लपवतात ते अंधश्रद्धा निर्मुलन समिती नेहमी दाखवत असते साधू हातचलाखीने हवेतून अंगठी कशी काढून दाखवतात ,नारळ आधीच फोडून त्यात खुबीने चिंदी,लिंबू हळद,कुंकू कसे घालतात अन मग चमत्कार म्हणून कसे काढून दाखवतात हे प्रकार कित्येकदा दाखवले जातात तरीही भोळे भक्त फसतातच काहींच्या अंगात देवी येते आणि त्या असे चमत्कार करून दाखवतात माझ्या लहानपणी शाळेत असताना आणि नंतरही अशा बायका मी आमच्या आसपास खूप पहिल्यात कारण सोलापूर पासून तुळजापूर जवळ असल्याने असे प्रकार नेहमी घडत दर मंगळवारी ,शुक्रवारी अशा बायकांच्या अंगात येई आणि त्या कुंकू काढण्याचे चमत्कार करीत कोणाला केळ खायला सांगत तर कोणाला उपवास करायला सांगत कोणाच्या अंगात भूत आहे असे  सांगून त्यांना झोडपत आणि दक्षिणा रूपाने भरपूर पैसे उकळीत आम्ही आमच्या परीने त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असू एकदा आमच्या घरी आलेल्या चमत्कारी गजानन महाराजाचे अवतार समजणाऱ्या भोंदू साधूला आम्ही पकडले होते.व त्याची हातचलाखी उघड केली होती
             काहीजण घरात भूत आहे ,गुप्तधन आहे असे सांगून घरात जळते कपडे टाकणे ,लिंबू टाकणे ,कपडे फाडणे घरातील वस्तू चोरी करवणे एव्हडेच नाही तर घरात साप सोडण्याचे प्रकारही करतात ह्यासाठी घरातील कोणी अंधश्रद्ध व्यक्ती ,नोकर त्यात सामील करून घेतात तर कधी घर सोडावे ह्यासाठी काही बिल्डरही हि कामे करवतात गुप्त धनासाठी बळी देण्याची घटना मागे घाटंजीत घडली आणि त्या नंतर अशा कितीतरी घटना उघडकीस आल्या तर भोंदू साधूच्या नादी लागून एका इंजिनिअरच्या पत्नीचा बळी गेल्याची घटना अशीच उघड झाली होती

.ह्या वर्षी साधू रामपाल ,आसाराम बापू त्याचा मुलगा नारायण साई या सारख्या अनेक भोंदू साधूंचा भोंदूपणा उघडकीस आलाय तर सद्या वर लिहल्या प्रमाणे अत्याधुनिक पोषाख घालुन सिनेसंगीताच्या तालावर नाचणारी पण स्वत:ला देवीचा अवतार भासवून पुराणातल्या देवी प्रमाणे दागिने भारी साड्यानि सजून हातात त्रिशूळ घेऊन भक्तांपुढे देवीच सोंग वटवून त्यांना फसवुन ,त्यांच्या भोळेपणाचा फायदा उठवून त्याचा गैरफायदा घेणारी  भोंदू राधे मा व तिची भोंदुगिरी अशीच उघडकीस आलीय ती भक्तांना लॉकेट ,अंगठी प्रसाद म्हणून देते अशी माहितीही समोर आलीय साध्वी महन्ताच भोंदूपण तिच्याच भक्त असलेल्या महिलेन उघडकीस आणलय भिकारीणींना पैसे देऊन त्यांना अनुयायी करणारी हि भोंदू महिला संसारिक त्रासाला कंटाळून साध्वी बनली आणि लोकांना फसवू लागलीय अशांना पकडण अत्यंत आवश्यक झालय 
                  माझ्या लहानपणी साधूच्या नादी लागून एका बाईच्या मुलाचा जीव गेल्याची घटना घडली होती खरे साधू संत असे फसवे नसतात तेव्हा उगाच वाईट परीस्तीतीला ,आलेल्या संकटाला घाबरून बुवाबाजीच्या नादी लागण्या पेक्षा किव्हा नुसतीच पूजा करत बसण्य पेक्षा ईश्वरावर श्रद्धा ठेवून आलेल्या संकटाना धीराने सामोरे जाण्यातच यश आहे तेव्हा श्रद्धा व अंधश्रद्धा ह्यातला फरक जाणून घेणेहि आवश्यक झाले आहे.

No comments:

Post a Comment