Friday 18 May 2012

जया अमिताभची यवतमाळ भेट

सिने जगताने यंदा शतक पूर्ण केलय जया अमिताभ हे सिने जगतातले मोठे प्रस्थ त्यांनी यवतमाळ इथे लोकमतच्या सखीमंचला भेट दिली तेव्हाचा हा प्रसंग.
                            सनई च्या निनादात टाळ्यांच्या गजरात आणी हर्षोउल्लासाच्या वातावरणात जया अमिताभ यांच आगमन झाल आणी सगळ्यांची अवस्था क्षण भर स्वप्नवत झाली आपले आवडते कलाकार नव्हे सम्राट साम्राज्ञी आपण आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्षात पाहतोय यावर त्यांचा विस्वासच बसत नव्हता , आपण स्वप्नात तर नाही न?
ऐय्या काय कयूट दिसतोय !
जया पण काय सुंदर दिसतेय ग अजून !
अमिताभ बघ किती लोभस दिसतोय !
या वयात पण छान मेंटेन केलय नाही दोघांनी
या सारख्या  उत्स्फूर्त  प्रतिक्रिया सखीमंचच्या सदस्या मधून व्यक्त होऊ लागल्या जया अमिताभच्या आगमनान वातावरण भारून गेल होत जया अमिताभ मात्र अशा वातावरणाला समारंभाला सरावलेलेच असल्याने अगदी शांतपणे मंद हसत सर्वांना अभिवादन करत होते अमिताभन बायकांकडे द्रुष्टीक्षेप टाकून हस्यवदनाने हात उंचावला पण अजूनही आपल्या आवडत्या अभिनेत्यांना प्रत्याक्षात पाहिल्याच्या सुखद धक्कयातून न सावरलेल्या भगीनिंना क्षणभर काय होतंय तेच कळल नाही पण मग चक्क अमिताभ आपल्याकडे पाहुन हसतोय हात हलवून अभिवादन करतोय म्हटल्यावर त्यांना पण हसू आल पण आता अमिताभला वाटल असाव की आपल हे अस हासण हात दाखवण बायकाना आवडल नसाव म्हणुन अमिताभन जी मान खाली घातली ती शेवट पर्यंत आणी काय आश्चर्य बायकामधे कुजबुज सुरु झाली
,"बघा, बघा बायकांकडे मान वर करून पण पहात नाहीय!काय सज्जन आहे नाही !
                              एकूण अमिताभवर बायका जाम खुश होत्या त्याची प्रत्येक अदा पसंतीची पावती घेत होती मधेच निवेदिकेन सांगीतलं की अमिताभ पुढे जे बसलेत ते युवा मंचचे सदस्य तर जया पुढच्या बायका सखीमंचच्या सदस्या तेव्हा मिस्कील हसत अमिताभन खुणेनंच सागितलं अरे नाही ,नाही ! माझ्या पुढे तर सख्या आहेत अमिताभ हास्यमुखाने प्रत्येक गोष्ट लक्षपुर्वक ऎकत होता मग ते निवेदन ,भाषण असो की स्वागत गीत जया मात्र थोडी गंभीर वाटली निवेदिकेन तीच नाव पुकारल मात्र जयान असे काही हावभाव केले की,"अरे देवा आता ही मला काय करायला सांगतेय!" पण तिने ज्योत पेटवण्याची घोषणा केली आणि जयान हुश: केल तेव्हा उपस्थितांना हसू आल जयाच्या चेहरया वरचे गंभीर भाव थोडासा त्रासीकपणाचाच आभास निर्माण करत हाते तेव्हा वाटल ,अरे जया पोक्त झालीय तिच्यातली अवखळ गुड्डी ,परीचय मधली खोडकर जया किव्हा कीत्येक सिनेमातून दिसलेलं तीच कणखर करारी व्यक्तीमत्व आता लोप पावलाय की काय ? पण जया भाषण करायला ऊठली अन तिच्यातले हे सर्व गुण दिसले जयान प्रथमं हल्ला चढवला तो पुरुषी स्वभावावर त्यांच्या गोड बोलण्याला भुलु नका म्हणुन तीन सावध केल आणी मग तलवार न वापरता चतुराईन नवरयास मुठित ठेव्ण्याची कला शिका म्हणाली इथेच जयान स्रियांना जिंकून घेतल पण तीन हळुच कानपिचक्या देत स्रियांनी घरादाराकडे दुर्लक्ष करून दिवसभर सखीमंच मधेच ठाण मांडून बसू नये तर रिकाम्या वेळेत मात्र संधीचा उपयोग करावा अस सांगितलं जयान थोडीफार जी प्रेक्षका मधुन नजर फिरवली होती त्यातून तिला दिसलेल्या  सदस्यांच्या डोळ्यातल्या प्रेमाचा तीन आवर्जून उल्लेख केला मला परिवारात आल्यासारखच वाटतंय हे सांगताना जया इतकी भावूक झाली की तिच्यातली ममता जागी झाली आणी अगदी साधेपणान मला आता माझ्या मुलाची आठ्वण येतेय अन कधी घरी त्याचाकडे जाऊ  असे झालेय अस सांगतानाच पुढच्या वेळेस मी त्याला सोबत आणेन वाटल्यास अमिताभजिला सोडून येईन नी खूप वेळ थांबेन अस म्हणाली आपल्या उंची वर ही तीन कोटी केलीच पण तिच्या अभिनयाची उंची पाहता ती अमिताभ बरोबरच किंबहुना कितीतरी उंचच आहे हे तिला सांगायला हवय
                        अखेर जाता जाता तिच्यातली खोडकर गुड्डी दिसलीच अमिताभ कडे पहात तीन म्हटलं ,पहा,पहा कसे शांत बसून ऐकताहेत ते !. म्हणून तर ते मला आवडतात आणी ती दिलखुलासपणे हसली शेवटी निवेदिकेन अमिताभला एका प्रश्नात छेड ल्यावर मात्र त्यातन झालेला रेखाचा गर्भित उल्लेख आणी अमिताभन त्याला दिलेली जाहीर संमती ऐकून मात्र जयाचा चेहरा पडला तीच भावनिक विश्व कोलमडल ती व्यथित झाली पण आपल्या चेहरयावरचे हावभाव दिसू न देण्याचा तिचा प्रयत्न निष्प्रभ ठरला तेव्हा वाटल हे विचारण्याची गरज होती का?
                         अमिताभ हस्यावदनान समारंभाचा आनंद लुटत होता हा सिनेमातला  Angry young man  भाषण करताना मात्र हळवा झाला आपल्या आजारपणातल्या जनतेच्या सहभागाचा त्यान आवर्जून उल्लेख करून कृतज्ञता व्यक्त केली आपल्या यशामागे कठोर परीश्रम आहेत तेव्हा विनाश्रम यशाची अपेक्षा न करता धीराने समस्येला सामोरे जा हताश न होता जिद्दीने यश मिळवा असा सल्ला त्याने तरुणांना दिला युवकांनो आपल्या आई वडीलांना एकटे सोडू नका आपले संस्कार जपा अस त्याने हळवे पणान संगीतल तेव्हा क्षणभर सारे आवाक झाले सिनेमात खूप मारामारी करणारा हा हिरो प्रत्यक्षात इतका भावूक आहे हे पाहून त्यांना नवल वाटले आपल्या हृदयाची तार तुमच्याशी जुळलीय ती छेडा की मी येईन ह्या वाक्याच टाळ्यांनी स्वागत झाल जया बद्दल प्रेम व्यक्त करताना तिच्या शिवाय आपल कस अडत हे सांगताना त्यान देखील तिची खोडी काढलीच आता जया च्या भाषणावर मी काही बोलत नाही नाहीतर माझ काही खर नाही म्हणताच प्रचंड हशा पिकला त्याच्यावर कोसळलेल्या कठीण प्रसंगात जयानच तर खंबीर साथ दिलीय नाही तर एकमेकांना सोडण ह्या फिल्मी सिता-यांना काय अवघड होत .







No comments:

Post a Comment