Thursday 3 May 2012

शेतकऱ्यानो आत्महत्या थांबवा

                               
                     पेपर उघडताच रोज एक तरी शेतकरयाची आत्महत्या झालेली बातमी असतेच कर्जाच्या चिंतेने शेतकरी आत्महत्या करताहेत हे वृत्त वाचून सारे हळहळतात राजकारणी,समाजकारणी भेट देतात शेतकऱ्याच सांत्वन करतात शेतकरयांच घर उघड्यावर पडत राजकारणी मदतीच आश्वासन देतात समाजकारणी पण मदत  देऊ करतात क्वचित मदत मिळतेही पण गेलेला जीव परत येतो का ?
शेतकरी मरतो,आत्महत्त्या करतो त्याची चर्चा होते पण थोड्याच दिवसात सारे ही घटना विसरतात आणि पुन्हा दुसरा शेतकरी आत्महत्या करतो आणि हे आत्महत्या चक्र असच सुरु राहत
विदर्भ तर आत्महत्याग्रस्त शेतकरयांचा जिल्हा म्हणूनच गाजतोय रोज शेतकरी आत्महत्त्या करतोय आता दसऱ्यालाही शेतकरी आत्महत्त्या झाली हि खरोखरच दुर्दैवी घटना आहे दसरा,दिवाळी,पोळा,नागपंचमी कुठलाही सण असो त्यावर शेतकरी आत्महत्त्येच सावट असतच. 
                 आत्महत्या हे पळपुटेपणाच लक्षण आहे.मरण सोप आहे,जगण कठीण!
पूर्वीचे लोक म्हणत की,आपण आत्महत्या केली तर पुन्हा जन्म घेऊन हेच जीवन जगाव लागेल कारण ते स्वातंत्रपूर्व काळातले होते त्यानी खूप त्रास सहन केलेला होता.आपण  स्वातंत्र्यात जगतोय खरेतर मरणापासून परावृत्त करण्याची त्यांनी अवलंबिलेली ती एक युक्ती होती कारण काही वेळानंतर माणूस जेव्हा शांत होतो तेव्हा त्याचा आत्महत्त्येचा विचार दूर पळतो आणि आत्महत्त्येन आपल नुकसानच होत हे त्याला पटत.
कर्ज फेडण्यासाठी कष्ट करणे आवश्यक आहे तुम्ही कर्ज काढता तेव्हाच ह्याची जाणीव ठेवायला हवी की,बँक  लोन देते तेव्हा ते वसूल करणारच.तुम्ही कर्ज काढताना बायको मुलांना ह्याची कल्पना द्यायला हवी तूम्ही कर्ज  काढता आणि फेडण होत नाही म्हणून आत्महत्येचा मार्ग स्वीकारता आणि तुमच्या कुटुंबियाना  दु:खात लोटून  जाता ह्यात दोष कोणाचा ? म्हणून कर्ज काढू नका म्हणजे अवैध सावकारांना धडा मिळेल तुमच आयुष्य वाचेल कुटुंब वाचेल 
आज घराघरातून मजुरांची आवश्यकता आहे उन्हाळ्यात झाडावरून आंबे तोडण्यासाठी मजूर मिळत नाहीत, ते काम शेतकरी करू शकतात तसेच शेतकरयांना अनुभव असलेल्या गवत काढणे,खत तयार करणे झाडे कापणे या सारखी व इतर कामे ते सहजतेने करू शकतात शिवाय रोजगारीवर मजूर म्हणूनही कामे मिळू  शकतात घराघरात इमानदार,कष्ठाळु राखणदारही हवे असतात.
पश्चीम महाराष्ट्रात जेव्हा दुष्काळ पडला होता तेव्हा तिथल्या एका सधन शेतकऱ्याने विदर्भात येऊन उसाच्या  रसाची गाडी लावली होती तसेच यवतमाळ येथील बोध गव्हाण इथल्या शेतकरयांनी एकत्र  येऊन दुधदुभत्याचा  धंदा सुरु केलाय.तेव्हा मरण्याआधी तिथे अवश्य भेट द्या.
काही वेळेस बटाईने घेतलेले शेत शेतकरी आपलेच समजतात तर काही वेळेस एखादा शेत पाहणारा मुनीम मालकाकडून घेतलेले पैसे इतरत्र वापरतात तर काही लबाड शेतकरी त्याच पैशाने अवैध सावकारी करतात त्यामुळे शेत सतत तोट्यात येते आणि मरणाची वेळ येते तर काही शेतकरी शेतासाठीचे पैसे घेऊन शेत नुकसानीत घालवतात  सतत काही ना  काही कारण सांगून मालका कडून पैसे उकळतात कधी बैल तर कधी घरचे कोणीतरी आजारी आहे सांगून पैसे हडपतात पैसे परत  देण्याची वेळ आली की मग मात्र त्यांचे धाबे दणाणते आणि दुसरीकडून पैसे फेडण्यासाठी मिळाले नाही कि जीव देतात
एकदा गेलेला जीव मग परत कसा येणार?  मग ते सरकार असेल किव्हा एखाधा नेता ते तुम्हाला जिवंत करू शकतात का ? नुकसान तर शेतकऱ्यांच्या कुटुंबाचेच होते ना ?
मुळात कर्ज काढावयाचे कशाला ?
आणि मरावयाचेच कशाला?
दुसरयाचे पैसे किती दिवस पुरणार ?
सरकारची दया हवी कशाला ?
सरकार किती दिवस मदत करेल
आणि सरकारी मदत मिळतेच कोठे ?
कधीही स्वत: कमावलेले पैसे,स्वावलंबी आयुष्य केव्हाही चांगले स्वत: आधी कष्टाने कमवा म्हणजे कर्ज घ्यावे लागणारच नाही मग कर्ज फेडायची चिंताही नाही आणि  नैराश्येने मरावेही  लागणार नाही आत्महत्त्या  केल्यास तो तुमचा भ्याडपणाच ठरेल  .
मला "एक धागा सुखाचा " ह्या टी.वि सिरियलची आठवण येतेय.त्यातल्या  नायकाची मुलगी आत्महत्या करते तेव्हा दुखातून सावरून ते इतरांची आत्महत्या थांबावी म्हणून अफलातून आयडीया करतात आणि जो आत्महत्या करेल त्याला बक्षीस जाहीर करतात  पेपरमधली जाहिरात वाचून त्यांच्याकडे खुपजण येतात त्यातून ते काहींना निवडतात आणि त्यांच्या आत्महत्येच कारण समजून घेऊन त्यांना त्यापासून परावृत्त  करतात व त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात व त्यात शेवटी ते यशस्वीही होतात त्यांचा जीव वाचतो आता सरकारने पण आत्महत्या न करणारयास बक्षीस जाहीर करावे म्हणजे काही प्रमाणात आत्महत्त्या वाचण्यास मदत होईल त्यांना रोजगार उपलब्धही करून दिल्यास शेतकरी आत्महत्त्या करण्याच्या विचार बाजूला सारेल त्यांना कष्टाची स्वावलंबनाची जाणीवही देणे गरजेचे आहे शेतकऱ्यानी पण आत्महत्या करण्या  ऐवजी काम  करून कर्ज फेडावे व आपले कुटुंब व आपला जीव वाचवावा काही जण गरज आहे असे सांगून किव्हा धंद्यासाठी सावकाराकडून पैसे घेतात व ते धंद्यासाठी न वापरता शेतकऱ्याना व्याजाने देऊन अवैध सावकारी करतात  व मालामाल होतात अशा अवैध सावकारा पासून शेतकऱ्यांनी सावध राहावे म्हणजे मरण्याची वेळ येणार नाही काहीजण आधीचे पैसे फेडण्या ऐवजी वारंवार पैसे  कर्ज रुपात घेत रहातात त्या मुळे त्याचं कर्ज फिटण्या ऐवजी वाढतच जात आणि तो कर्जात  गुरफटत जातो  म्हणूनच कष्ट करून पैसे कमावण केव्हाही फायद्याच आणि आत्महत्त्ये पासून वाचवणार!
         .

No comments:

Post a Comment