यवतमाळातील भाजी मार्केट मध्ये गेल्या कित्येक वर्षापासून भाजी मोजण्यासाठी दगडाचा वापर होतोय .पूर्वी वजनकाटे अस्तित्वात नव्हते.अश्मयुगात दगडाचा शोध लागला व त्याचीच भांडी,वजन वगेरेचा वापर चलनासाठी होऊ लागला.पण आताच्या कॉम्प्युटरच्या युगात भाजीवाले देखील हायटेक झालेत .मोबाइल क्रांती मुळे तर त्यांच्या हातात मोबाइल आलेत .मग तो गवंडी ,कामगार ,पेंटर कोणीही असो
भाजी वाले तरी त्याला अपवाद कसे असतील ? अशावेळी मोजमाप करण्यासाठी वजनाचा वापर होणे आवश्यक असताना व कायद्याने बंधनकारक असताना देखील जवळपास बहुताउंश भाजी विक्रेते भाजी मोजण्यासाठी दगड ,लोखंडाचा वापर करतात .कित्येकदा तर भाजी मोजण्यासाठी भाजीचाच वापर होतो त्यात मोठे वांगे ,बटाटे किंवा तत्सम वस्तूचा समावेश असतो.
अशा वेळेस भाजी मोजण्यासाठी वजनाचा आग्रह धरल्यास छोटे वजन चोरीला गेल्याचे सांगितले जाते .त्यात १०० ग्राम,२०० ग्राम कधी कधी तर २५०ग्रामचे वजन देखील चोरीला गेलेले असते विशेष म्हणजे सर्वच भाजीवाल्यांची हि मापे चोरीला कशी जातात व ती पुन्हा का घेतल्या जात नाहीत ? हे एक कोडच आहे . दगडांनी मोजून भाजी घेण्यास नकार दिल्यास "आम्ही फसवत नाही तर आमचे माप बरोबर आहे कोठेही मोजून बघा " असे उत्तर मिळते कारण सगळ्यांचीच मापे चोरीला जातात मग ग्राहक तरी काय करणार नाविलाजास्तव भाजी घेणेच त्यांच्या हाती असते विशेष म्हणजे इतर वेळेस सक्रीय असणारे वजनमाप नियंत्रण अधिकारी मात्र ह्या बाबतीत कानाडोळा करतात ग्राहकांची फसवणूक थांबवायची असल्यास ग्राहकांनी तर जागरूकता दख्वायला हवीच शिवाय वजनमाप अधिकारयांना ह्या कडे लक्ष देण्यास भाग पाडल्यास ह्या प्रकाराला आळा बसेल .

No comments:
Post a Comment