हल्ली सगळकडे चोरयाच,चोरया सुरु आहेत इतक्या कि हे चोरांचेच युग सुरु आहे कि काय? असे वाटावे. घरी, दारी, रस्त्यात बसमध्ये रेल्वेत ,कोठेही,कधीही केव्हाही सर्रास चोरया होत आहेत नागरिकांना असुरक्षित वातावरणात जगावे लागत आहे बँकेतून पैसे काढताना, बँकेत पैसे भरताना सहजतेने चोर चोरी करतात .चोर ,दरोडेखोर ,लुटारू ,भुरटे चोर इतके सक्रीय झालेत कि महिलांना मंगळसूत्र घालून फिरणे कठीण झाले आहे दररोज हजारो महिलांचे मंगळसूत्र दागिने चोरीला जात आहेत विशेषत: त्याच त्याच भागातून चोरी होत असताना चोर सापडत कसे नाहीत?त्या मंगळसूत्राचे पुढे काय होते ? कोणालाच कळत नाही.
आता तर रस्त्यावरील प्लास्टिक गोळा करणारे व इतर वस्तू उचलणारया बायका व लहान मुले आपण घरी असताना देखील घरात घुसून दुपारच्या वेळेस घरातील आवारात चोरया करतात अशाच एका बाईला पकडल्यावर मी एकदा येऊन मंगळसूत्रच चोरून नेते म्हणून धमकावण्याचा प्रकार एका घरात घडला चोर एवढे निर्भय कसे झालेत ? म्हणूनच आता चोरांना पकडून तुरुंगात डांबून त्यांना खडी फोडायला पाठवावे म्हणजेच नागरिक निर्भयपणे फिरू शकतील. एकीकडे सोन्याचा भाव गगनाला भिडलेला असताना दुसरीकडे मात्र मंगळसूत्र जे कष्टाने केलेले असते ते एका क्षणात चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे त्यास आळा बसावा अशी नागरिकांची मागणी आहे .
No comments:
Post a Comment