Soyuz अंतराळयान पृथ्वीवर पोहोचल्यावर कझाकस्थानातील Zhezkazgan येथे पॅराशूटच्या साहाय्याने खाली उतरताना -फोटो -नासा संस्था
नासा संस्था-24 सप्टेंबर
नासाची अंतराळवीर Tracy Dyson रशियन अंतराळवीर Oleg Kononenko आणी Nikolai Chub स्थानकातील वास्तव्य संपवून पृथ्वीवर परतले आहेत ह्या अंतराळवीरांसह 23 सप्टेंबरला 4.56 a.m.वाजता सोयूझ MS-25 अंतराळयान पृथ्वीवर येण्यासाठी स्थानकातून निघाले आणी 7.59a.m. वाजता पृथ्वीवर पोहोचले पृथ्वीच्या कक्षेत पोहोचल्यावर सोयूझ अंतराळयान कझाकस्थानातील Zhezkazgan येथे पॅराशूटच्या साहाय्याने खाली ऊतरले
निघण्याआधी स्थानकात ह्या अंतराळवीरांचा फेअरवेल सेरेमनी आणी कमांडर चेंज कार्यक्रम पार पडला ह्या अंतराळवीरांना निरोप देण्यासाठी स्थानकातील सर्व अंतराळवीर एकत्र जमले होते त्या वेळी नासा संस्थेशी साधलेल्या लाईव्ह संवादात ह्या अंतराळवीरांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले स्थानकाचे कमांडर Oleg Kononenko ह्यांनी स्थानकाच्या कमांडर पदाची सुत्रे अंतराळवीर सुनिता विल्यम्स ह्याच्या हाती सोपवली ते म्हणाले,"माझ्या ह्या स्थानकातील दुसऱ्या घरातील मुक्काम संपवून मी माझ्या पृथ्वीवरील घरी परतत आहे माझ्या ह्या अंतराळातील घरातील अंतराळवीरांचे कुटुंब मोठे आहे स्थानकातील त्यांच्या सोबतचा वास्तव्याचा काळ आनंदात गेला त्यांच्या सोबतच्या मैत्रीपूर्ण वातावरणात संशोधन करताना मजा आली त्यांची मैत्री खास होती सुंदर होती " त्या नंतर त्यांनी सगळ्यांंचे आभार मानले आणी रशियन भाषेतही संवाद साधला
अंतराळवीर सुनिता विल्यम्स ह्यांनी देखील कमांडरपदाची जबाबदारी स्विकारल्यावर संवाद साधला त्या म्हणाल्या,"आम्ही ईथे पुर्व नियोजीत वेळेपेक्षा जास्त दिवस वास्तव्य करणार आहोत आणी स्थानकात राहणारे अंतराळवीरही जास्त होते तरीही ह्या मोहीम 71च्या अंतराळवीरांनी आम्हाला सामावून घेतल हे अंतराळवीर आमच्या अपेक्षेपेक्षाही जास्त समंजस आहेत आणी Oleg आम्ही तुला मिस करु ईथल्या जेवणाच्या टेबलवरच्या शंभर गोष्टी आम्हाला आठवतील Nikolai चा Precision आणि Professionalism आठवेल आणि Tracy सोबत घालवलेला वेळ मजेशीर क्षण आणि तिच Organization,Ability सारच मिस करेन मला कमांडरपद दिल्याबद्दल नासा संस्थेचे आणि तुम्हा सर्वांचे आभार तुमच्या अंतराळ प्रवासासाठी शुभेच्छा ! त्यानंतर अंतराळवीरांनी सर्वांचा निरोप घेतला आणि सोयूझ यानातून पृथ्वीवर परतण्यासाठी निघाले
Soyuz अंतराळयानातून पृथ्वीवर परतताना स्थानकातील अंतराळवीरांच्या निरोपाचा क्षण -फोटो नासा संस्था
अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेत शिरून पॅराशूटच्या साहाय्याने खाली ऊतरताच नासा आणी रशियन स्पेस एजन्सीची रिकव्हरी टिम तेथे पोहोचली त्यांनी ह्या तिनही अंतराळवीरांना यानातुन बाहेर काढले आणी खुर्चीवर बसविले त्या नंतर त्यांचे प्राथमिक चेकअप केले आणी त्यांना पाणी प्यायला दिले ह्या वेळी नासा आणि रशियन स्पेस एजंन्सी मधील मान्यवर त्यांच्या स्वागताला उपिस्थत होते त्यांनी ह्या अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुरक्षित पोहोचल्याबद्दल अभिनंदन केले आणि त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले शिवाय ह्या अंतराळवीरांना त्यांच्या नावाची डॉल भेट देण्यात आली
अंतराळवीर Tracy Dyson पृथ्वीवर पोहोचल्यानंतर कझाकस्थानातील Zhezkazganयेथे स्वागताच्या क्षणी Doll सोबत -फोटो नासा संस्था
ह्या अंतराळवीरांना Recovery camp मध्ये नेण्यात आले आणि अंतिम चेकअप नंतर अंतराळवीर Tracy Dyson ह्यांना नासाच्या विमानाने Johnson Space Center येथे पोहोचविण्यात आले आणि दोन्ही अंतराळवीरांना त्यांच्या गावी पोहोचविण्यात आले
Tracy Dyson ह्यांनी स्थानकातील 184 दिवसांच्या वास्तव्या दरम्यान मोहीम 70/71 चे Flight Engineerपद सांभाळले त्यांनी त्यांच्या तीनवेळच्या अंतराळ वास्तव्यादरम्यान स्थानकाच्या दुरुस्तीसाठी 20 तास 20 मिनिटे स्पेसवॉक केला आणि स्थानकात सुरु असलेल्या Cardiac Tissue वरील संशोधनात सहभाग नोंदवला मानवी शरीरातील अवयव आणि Tissue च्या replacement साठी आवश्यक असलेल्या अत्याधुनिक Stem cell निर्मिती संशोधन केले शिवाय अत्याधुनिक मेडिकल उपचारासाठीच्या औषध निर्मितीसाठी Proteins Crystallization वरील संशोधनात सहभाग नोंदवला
अंतराळवीर Oleg आणि Nikolai ह्यांनी स्थानकात 374 दिवस वास्तव्य केले अंतराळवीर Oleg ह्यांच्या पाचवेळच्या अंतराळ कारकिर्दीत त्यांनी स्थानकात 1,111दिवस वास्तव्य करून जास्ती दिवस स्थानकात राहण्याचा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे अंतराळवीर Nikolai ह्यांची मात्र हि पहिलीच अंतराळवारी होती