Sunday 31 December 2023

आर्टिमस मोहिमेतील Space X - Moon Landerआणी Elevator ची चाचणी यशस्वी


नासा संस्था -27 डिसेंबर

नासाचे आर्टिमस मोहिमेतील अंतराळवीर  Christina Koch ,Victor Glover,Ried Wiseman आणी Jeremy Hansen पुढच्या वर्षी चंद्रावर जाणार आहेत ह्या अंतराळवीरांची मोहीम दहा दिवसांची असुन त्यातील आठ दिवस अंतराळवीर चंद्रभुमीवर ऊतरून तेथील वातावरणातील आणी भुमीवरील संशोधीत माहिती गोळा करणार आहेत 

ह्या अंतराळवीरांना चंद्राच्या कक्षेतून खाली चंद्रभुमीवर ऊतरण्यासाठी आणी चंद्रभुमीवर फिरून माहिती मिळवण्यासाठी Moon Rover आणी Elevator ची आवश्यकता होती त्यासाठी नासा संस्थेने व्यावसायिक कंपनींना Rover तयार करण्याची संधी दिली होती आणी नासा संस्थेने Space -X ने तयार केलेल्या Moon Rover ची निवड केली होती आता ह्या Rover आणी Elevator च्या कार्यक्षमतेची,कार्यप्रणालीची आणी परीपूर्णतेची  चाचणी घेण्यात आली असून ती यशस्वी झाली आहे 

नासाच्या आर्टिमस III आणी IV मोहिमेतील अंतराळविरांच्या चांद्रमोहिमेसाठी तयार करण्यात आलेल्या Moon Rover आणी Elevator ची ऊड्डाणपुर्व अंतीम चाचणी घेण्यात आली ह्या चाचणीत अंतराळवीर Nicole Mann आणी Doug Wheels ह्यांनी भाग घेतला ह्या मोहीमेत चार अंतराळवीर  दहा दिवसांसाठी चंद्रावर जाणार आहेत त्यांचे Orion अंतराळयान चंद्राच्या कक्षेत शिरल्यावर चारपैकी दोन अंतराळवीर खाली चंद्रभुमीवर ऊतरतील व दोन अंतराळवीर चंद्राच्या कक्षेत फिरून संशोधीत माहिती गोळा करतील 

चंद्राच्या कक्षेतुन खाली ऊतरण्यासाठी हे अंतराळवीर Space X ने तयार केलेल्या Elevator चा ऊपयोग करतील आणी Moon Rover मधून फीरुन चंद्रभुमीवरील संशोधीत माहिती गोळा करतील त्या दरम्यान त्यांना तेथे आठ दिवस मुक्काम करावा लागणार आहे त्या साठी ह्या Rover मध्ये वरच्या बाजूला त्यांना रहाण्यायोग्य जागेची सोय करण्यात आली आहे तसेच अंतराळवीरांना फिरून चंद्रावरील वातावरणातील,भुमीवरील व भुगर्भातील नमुने  गोळा करावे लागतील हे नमुने गोळा करण्यासाठी लागणारी अत्याधुनिक यांत्रिक सामुग्री व  संशोधनासाठी लागणारे ईतर साहित्य ठेवण्यासाठीही त्यात  भरपूर जागा आहे 

ह्या Moon Lander च्या चाचणी दरम्यान दोन्ही अंतराळवीरांनी Axiom Space कंपनीने तयार केलेला स्पेससुट घातला होता अमेरीकेची आर्टिमस मोहीम पन्नास वर्षांनी सुरू झाली आहे त्यामुळे अपोलो मोहिमेतील अंतराळवीरांचे स्पेससुट आता जुने झाले आहेत त्यामुळे नासा संस्थेने अंतराळवीरांसाठी नवीन नाविन्यपूर्ण आणी चंद्रावरील वातावरणात सुरक्षित असा स्पेससुट तयार करण्याचीही संधी दिली होती त्यात Axiom कंपनीने तयार केलेल्या स्पेससुटची निवड झाली म्हणून ह्या चाचणी दरम्यान स्पेससुटचीही योग्यता तपासण्यात आली हा स्पेससुट तेथील वातावरणात वादळवाऱ्यात टिकेल का? त्यातून लिकेज होत नाही ना ?तो अंतराळवीरांच्या योग्य साईजचा आहे ना? आणी तो घालून तिथे सहजतेने फिरता येईल का? विषेश म्हणजे अंतराळवीरांना आवश्यक बाबींची पुर्तता करणारा टिकाऊ व सुरक्षित आहे ना हे तपासण्यात आले 

अंतराळवीरांनी नासाच्या J.PL स्पेस सेंटरमध्ये हा सस्पेसुट घालून Orion यानातुन Elevator वरुन खाली ऊतरुन Moon Lander मधून फिरून ह्या चाचणीत भाग घेतला त्यांना ह्या Moon Lander आणी Elevator ह्यांची कार्यप्रणाली आणी डिझाईन ह्याचा अनुभव कसा होता ह्या बाबतीत चर्चा करण्याची संधी दिली  तेव्हा त्यांनी ऊत्तम प्रतिक्रिया दिली 

Moon Lander आणी Elevator मध्ये वरच्या बाजूला मुबलक जागा फिरण्यासाठी बास्केट सारखे गोलाकार चाकावर चालणारे फिरणारे अत्याधुनिक ऊपकरण, Elevator मधून आत बाहेर चढण्या,ऊतरण्याची सोय आणी अंतराळवीरांना संशोधन करण्यासाठी,संशोधीत साहित्य ठेवण्यासाठी भरपूर जागा देखील आहे आणी कार्यप्रणाली ऊत्तम आहे,सुरक्षित आहे अशी प्रतिक्रिया अंतराळवीरांनी दिली 

नासा संस्था प्रमुख म्हणतात,आर्टिमस मोहीमेतील अंतराळवीरांच्या चंद्रावरील मानवी Landing साठी System तयार करण्यासाठीची प्रक्रिया कठीण होती पण नासा संस्थेतील आर्किटेक्टने बनवलेले डिझाईन आणी ईंजीनिअर्स,तंत्रज्ञांनी मिळुन केलेली Orion अंतराळयान आणी Space Launch System ची निर्मिती यशस्वी झाली आहे

नासाच्या आर्टिमस मोहिमेतील अंतराळवीरांची आपदकालीन टेस्ट संपन्न


आर्टिमस मोहिमेतील अंतराळवीर आपदकालीन ट्रेनिंग दरम्यान -फोटो - नासा संस्था 

नासा संस्था -21 डिसेंबर 

नासाच्या आर्टिमस मोहीमेची सध्या जय्यत तयारी सुरु आहे ह्या मोहिमेतील अंतराळवीर नासाच्या Johnson Space Center मध्ये अंतिम ट्रेनिंग घेत आहेत नुकतीच ह्या अंतराळवीरांची आपदकालीन टेस्ट पार पडली

नासाच्या आर्टिमस मोहीमेतील अंतराळवीर Christina Koch,Victor Glover ,Jeremy Hansen आणी Ried Wiseman ह्यांना नासाच्या JPL सेंटर मध्ये अंतराळयानातुन आपदकालीन स्थितीत बाहेर निघण्याचे ट्रेनिंग देण्यात आले आर्टिमस मोहिमे अंतर्गत चंद्रावर पोहोचुन हि मोहीम यशस्वी करून Orion यान पृथ्वीवर  समुद्रात खाली ऊतरताना काही आपदकालीन समस्या निर्माण झाल्यास किंवा काही कारणाने  त्यांना यानातुन बाहेर काढण्यासाठी रिकव्हरी टिम वेळेवर पोहोचली नाही तर यानातुन स्वतः बाहेर पडण्यासाठी  खास प्रशिक्षण देण्यात आले 

अशा वेळेस परिस्थितीवर नियंत्रण मिळवत अंतराळवीरांना यानाच्या किनाऱ्याजवळील भागातील आणी वरच्या बाजूला असलेल्या दारातून बाहेर पडण्याचे प्रशिक्षण देण्यात आले ह्या प्रशिक्षणसाठी अंतराळवीर Christina Koch ,अंतराळवीर Jeremy Hansen ह्यांनी विषेश परीश्रम घेतले नासाचे स्पेससूट टेक्निशियन ओव्हेन्स ह्यांनी अंतराळवीरांना सहकार्य केले 

Tuesday 26 December 2023

अंतराळवीरांच स्थानकातील ख्रिसमस सेलिब्रेशन


स्थानकातील kibo Lab मध्ये ख्रिसमस सेलिब्रेशन साठी केलेली सजावट - फोटो-नासा संस्था

नासा संस्था -26 डिसेंबर

नासाच्या अंतराळमोहिम 70चे अंतराळवीर Jasmin Moghbeli,Loral O Hara,जपानचे अंतराळवीर Satoshi Furukawa आणी युरोपियन अंतराळवीर Andreas Mogensen ह्यांनी 25 डिसेंबरला स्थानकात Christmas साजरा केला 
 

 
अंतराळातील झीरो ग्रव्हिटीत फिरणाऱ्या अंतराळ स्थानकातील Kibo Lab मध्ये स्थानकातील ऊपलब्ध सामान गोळा करून त्यांनी lab मधील कोपरा सजवला लाईट्स,मोजे,देशाचे झेंडे भिंतीवर लावले ख्रिसमस ट्रि सजवुन समोर जेवणाचे टेबल सजवले 
ह्या अंतराळवीरांनी ख्रिसमस सेलिब्रेशन साठी शांताक्लाज सारखा वेश व टोपी परीधान केली 
ह्या ख्रिसमस सेलिब्रेशनचा व्हिडीओ ह्या अंतराळवीरांनी शेअर केला आहे 
 

 
ह्या वेळी नासाच्या अंतराळवीर Jasmin Moghbeli ह्यांनी मनोगत व्यक्त केले ह्या क्षणी मी माझ्या कुटुंबीयांना आणी मित्रांना मिस करतेय पण माझ्या स्पेशल Space Family सोबत मी ख्रिसमस साजरा करत आहे आम्ही सर्वांनी एकत्र येऊन ख्रिसमससाठी हि सजावट केलीय आम्ही Cookies decorate केले आहेत केक आहे आणी ईतर पदार्थ पण आहेत आम्ही टेबलावर ते सजवून ठेवलेत आणी आता आम्ही जेवणाचा आस्वाद घेणार आहोत सर्वांना,
Happy Christmas !
 

 
 
 

Monday 25 December 2023

अंतराळवीरांनी दिल्या लाईव्ह संवादा दरम्यान पृथ्वीवासीयांना ख्रिसमसच्या शुभेच्छा

नासाच्या अंतराळ मोहीम 70 चे अंतराळवीर Andreas Mogensen ,Jasmin Moghbeli , Satoshi Furukawa आणि Loral O' Hara नासा संस्थेशी लाईव्ह संवादा दरम्यान ख्रिसमस निमित्य शुभेच्छा देताना -फोटो नासा संस्था
 

नासा संस्था-23 डिसेंबर

25 डिसेंबरला जगभरात सर्वत्र ख्रिसमस साजरा केला जातो सर्वजण आपल्या कुटुंबियांसोबत,मित्रांसोबत एकत्र येऊन हा सण उत्साहात साजरा करतात पृथ्वीपासून दूर अंतराळातील फिरत्या अंतराळ स्थानकात वास्तव्य करणारे अंतराळवीर मात्र आपल्या कुटुंबियांसोबत हा सण साजरा करू शकत नाहीत पण स्थानकातील झिरो ग्रॅव्हीटीत हे अंतराळवीर स्थानकातील सहकारी अंतराळवीरांसोबत एकत्र येऊन हा सण साजरा करतात सध्या  अंतराळ स्थानकात रहात असलेले नासाच्या अंतराळ मोहीम 70 चे अंतराळवीर Jasmin Moghbeli आणि Loral O Hara युरोपियन अंतराळवीर Andreas Mogensen जपानचे अंतराळवीर Satoshi Furukava ह्यांनी नासा संस्थेशी लाईव्ह संवाद साधताना पृथ्वीवासीयांना  ख्रिसमस निमित्य शुभेच्छा दिल्या आहेत त्या वेळी संवाद साधताना
अंतराळवीर Jasmin Moghbeli म्हणाल्या ,
" माझ्यासाठी ख्रिसमस  सण विषेश आहे माझ्या आयुष्यातील सुंदर क्षण मला तुमच्याशी शेअर करावयाचे आहेत त्याच दिवशी मी व माझे पती एकमेकांना प्रथम भेटलो आम्ही  दोघेही दरवर्षी हा सण साजरा करतो आम्ही वेगवेगळ्या संस्कृतीत वाढलो पण आम्ही दोघेही आमचे सण वेगवेगळ्या पध्दतीने साजरे करून दोन्ही संस्कृतीचे जतन करतो आम्ही दरवर्षी आमच्या दोन छोट्या मुलींसोबत हे सण साजरे करतो आणि त्यांच्यामध्ये दोन्ही संस्कृती रूजवतो आमच्या भेटिच्या क्षणाची आठवण देणारा हा क्षण माझ्यासाठी म्हणूनच स्पेशल आहे आमच नात जस स्पेशल आहे तसच,  सर्व जातीधर्माचे वेगवेगळ्या संस्कृतीचे लोक एकत्र येत ख्रिसमस साजरा करतात हा सण सर्वांना आनंद देणारा आहे ह्या वर्षी मी माझ्या कुटुंबीयांसोबत हा सण साजरा करत नसले तरीही ईथे स्थानकात आम्ही सर्वजण तो साजरा करणार आहोत!"
"Happy Christmas !"
Loral O Hara-
माझ्यासाठी ख्रिसमसची सुट्टी आणी हा सण म्हणजे सर्व कुटुंबीय एकत्र येण्याचा क्षण ह्या वर्षी प्रथमच मी कुटुंबीयांशीवाय हा सण साजरा करणार आहे पण मी Super Excited आहे कारण मी ईथे स्थानकातील झीरो ग्रव्हिटीत माझ्या सहकारी अंतराळवीरांसोबत हा सण साजरा करणार आहे आणी हि आमची Space Family आहे स्थानकातील वास्तव्यात वेगवेगळ्या देशातील,संस्कृतीतील अंतराळवीर एकत्र येऊन हा सण साजरा करतात तेव्हा पृथ्वीवरील विविधतेची,संस्कृतीची ओळख होते जागतिक एकतेची जाणीव होते जगाकडे पहाण्याचा नवा दृष्टीकोन आणी नवी प्रेरणा मिळते असाच दृष्टिकोन आणि मानवतेची जाणीव पृथ्वीवासीयांना व्हावी असे मला वाटते 
Satoshi Furukawa
"जपानमध्ये  देखील नववर्षाच्या शुभारंभाला  सर्वजण एकत्र जमतात धार्मिक स्थळांना भेटी देतात येणारे वर्ष आनंदी आणी सुखाचे जावे म्हणून सर्वजण प्रार्थना करतात ईथुन स्थानकातुन मी पृथ्वीवासीयांना ख्रिसमसच्या आणि नवीन  वर्ष शेवटपर्यंत सुखाचे आणी आनंदी जावे अशी  शुभेच्छा देतो !
Andreas Mogensen
"मी देखील ख्रिसमस हा सण माझ्या कुटुंबियांसोबत दरवर्षी  साजरा करतो पण ह्या वर्षी मी माझ्या कुटुंबीयांसोबत नसलो तरीही ईथे मला माझ्या स्थानकातील Space Family सोबत हा सण साजरा करायला मिळणार आहे त्यासाठी नासा संस्थेचे आणी संस्थेतील सर्वांचे आभार  आम्ही जेव्हा स्थानकातुन खाली पृथ्वीकडे पहातो तेव्हा ती शांत समृद्ध  दिसते मला आशा आहे की,जगातील सर्व देशातील लोकांच्या सहकार्याने एकत्रीतपणे अशीच शांतता पृथ्वीवर प्रस्थापित होईल जगभरातील लोकांनी जर असे करायचे ठरवले तर एकमेकातील वितुष्टता जाऊन सर्वत्र शांतता निर्माण होईल मानवाने ठरवले तर काहीच अशक्य नाही ! आमच्या सर्वांकडून नासा संस्था आणि पृथ्वीवासीयांना ख्रिसमस निमित्य शुभेच्छा !"
                Wish you happy Merry Christmas & Happy New Year ! 


Wednesday 20 December 2023

अंतराळवीर Frank Rubio ह्यांनी व्हेजी चेंबरमधील तोडलेला पण नंतर हरवलेला टोमॅटो सापडला

 

 The seven-member Expedition 70 crew poses for a portrait inside the International Space Station's Kibo laboratory module. In the front row (from left) are, Commander Andreas Mogensen from ESA (European Space Agency) and NASA Flight Engineers Jasmin Moghbeli and Loral O'Hara. In the back are, Roscosmos Flight Engineers Nikolai Chub, Konstantin Borisov, and Oleg Kononenko; and JAXA (Japan Aerospace Exploration Agency) Flight Engineer Satoshi Furukawa.

 नासाच्या मोहीम 70 चे अंतराळवीर कमांडर अंतराळवीर Andreas Mogensen,Jasmin Moghbeli, Loral O'Hara,Nikolai Chub,Konstantin Borisov,Oleg Kononenko,Satoshi Furukawa एकत्रित संवाद साधताना -फोटो नासा संस्था

 नासा संस्था -14 डिसेंबर 

सहा डिसेंबरला अंतराळस्थानकाने 25व्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे त्या निमित्ताने नासा संस्थेतील मान्यवरांनी सध्या स्थानकात रहात असलेल्या मोहीम 70 च्या अंतराळवीरांसोबत लाईव्ह संवाद साधुन त्यांना स्थानकाच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या त्या वेळी त्यांना काही  प्रश्नही विचारण्यात आले तेव्हा त्यांनी अंतराळवीर Frank Rubio ह्यांच्या हातुन हरवलेला टोमॅटो सापडल्याचे सांगितले

अंतराळवीर Frank Rubio ह्यांनी तोडलेले पण नंतर सापडलेले व्हेजी चेंबर मधील टोमॅटो -फोटो -नासा संस्था 

नासाचे अंतराळवीर वेगवेगळ्या मोहिमेअंतर्गत अंतराळस्थानकात रहायला जातात त्यांच्या तेथील वास्तव्यात त्यांना पृथ्वीसारखे ताजे पोषक अन्न आणी भाजी खायला मिळत नाही त्यांना पृथ्वीवरून प्रिझर्व केलेले फ्रोझन अन्न व भाज्या खाव्या लागतात त्यांना ईथल्या सारखे ताजे अन्न व भाज्या खायला मिळाव्यात म्हणून स्थानकात व्हेजी प्रोजेक्ट राबविण्यात येत आहे ह्या व्हेजी प्रोजेक्ट अंतर्गत आतापर्यंत वेगवेगळ्या भाज्या छोटे गहु,चेरी टोमॅटो,मिरचीची रोपे लाऊन ऊगवलेल्या भाज्यांंचा आस्वाद देखील अंतराळवीरांनी घेतला आहे  व्हेजी चेंबरमध्ये पृथ्वीसारखी रोपांना पोषक अशी वातावरण निर्मिती करण्यात आली आहे त्यासाठी रंगीत लाईटचा वापर करून ऊजेड,अंधार निर्मिती आणी तापमान नियंत्रण केल्या जाते 

अंतराळवीर त्यांच्या संशोधनाच्या कामातून वेळ काढून ह्या व्हेजी चेंबरमधील रोपांची निगा राखतात नासाचे रेकॉर्ड ब्रेकर अंतराळवीर Frank Rubio ह्यांनी स्थानकात 371 दिवस वास्तव्य केले होते अंतराळात जास्त दिवस राहिल्यावर मानवी शरीरावर काय विपरीत परिणाम होतो त्यांच्या शारीरिक मानसिक क्षमतेवर शरीरातील सर्व सिस्टीममध्ये काय बदल जाणवतात,पेशींमध्ये काय बदल होतात ह्या विषयीच्या मानवी संशोधनात ते सहभागी झाले होते त्यांच्या स्थानकातील वास्तव्यात त्यांनी ह्या गोष्टीचे निरीक्षण नोंदवून नमुने गोळा केले शीवाय सायंटिफिक प्रयोग व ईतर कामासोबत त्यांनी व्हेजी प्रोजेक्टमध्ये काम केले मार्चमध्ये ते पृथ्वीवर परतले

हरवलेल्या टोमॅटो बाबत सांगताना ते म्हणाले,"हो माझ्या हातून टोमॅटो हरवला होता मी व्हेजी चेंबरमधील टोमॅटोची कापणी करत होतो तेव्हा एक,दोन टोमॅटो जरा जास्त पिकलेले वाटले म्हणून मी ते दोन टोमॅटो प्लास्टिक पिशवीत घातले आणी velcroआणण्यासाठी गेलो टोमॅटोची पीशवी व्यवस्थीत राहील असे मला वाटले पण मी परत आलो तर पिशवी आणी टोमॅटो गायब झाले होते मी खूप वेळ सर्वत्र ते शोधले पण सापडले नाही सगळ्यांंना वाटल की मी ते टोमॅटो खाल्ले मी त्यांना ते हरवल्याचे सांगितले तरीही कोणीही त्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते मी टोमॅटो खाल्ले नव्हतेच मग ते सिध्द करण्यासाठी मी जवळपास विस तास वाया घालवले पण टोमॅटो सापडले नाहीत पण मला खात्री होती की कधी ना कधी ती टोमॅटोची पिशवी सापडेल मी पृथ्वीवर परतताना सहकारी अंतराळवीरांना ते शोधण्यास सांगितले होते अखेर मोहीम 70 च्या अंतराळवीरांना ते टोमॅटो सापडल्याचे त्यांनी सांगितले आणी मी ते खाल्ले नव्हते ह्याची त्यांना खात्री पटली !"

मोहीम 70 ची अंतराळवीर Jasmin Moghbeli हिने नासा संस्थेतील मान्यवरांशी लाईव्ह संवाद साधताना टोमॅटो सापडल्याचे सांगितले,"आम्हाला व्हेजी चेंबरमध्ये प्लॅस्टिक पीशवीत ते सापडले आमचा सहकारी Good Friend Frank आता पृथ्वीवर परतले आहेत त्यांनी ते टोमॅटो खूप शोधले होते आणी खरेच हरवले होते त्यानीं ते खाल्ले नव्हते हे आता सिद्ध झाले आहे !"

Frank Rubio ह्यांनी VEG-03 प्रोजेक्ट अंतर्गत ह्या चेरी टोमॅटोची लागवड केली होती ह्या X-ROOT  प्रोजेक्ट मध्ये Hydroponic,Aeroponic टेक्निकचा वापर करून माती किंवा ईतर आवश्यक गोष्टी न वापरता हि रोपे ऊगवण्यात आली रोपामधील पोषकद्रव्ये वाढविण्यासाठी आणि अंतराळवीरांना आवश्यक व्हिटॅमिन्स मिळावेत म्हणून हा प्रोजेक्ट राबविण्यात आला ह्याचा ऊपयोग दुरवरच्या अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांसाठीही होणार आहे 

ह्या सापडलेल्या टोमॅटोत आठ महिन्यानंतरही  विशेष फरक पडला नाही ते थोडेसे फिकट रंगाचे चपटे आणी वाळले आहेत त्यावर बुरशीही आली नाही आता हे टोमॅटो पृथ्वीवर परत आणले जाणार नाहीत तिथेच व्हेजी चेंबरमध्ये पुन्हा लागवडीसाठी वापरले जातील आणी अंतराळातील झीरो ग्र्ँव्हिटीतील वातावरणात टोमॅटोमधील जिन्स नवीन टोमॅटोमध्ये कसे ऊतरतात ह्याचे निरीक्षण नोंदवून संशोधन केल्या जाईल


Tuesday 19 December 2023

अंतराळस्थानकाचे 25 व्या वर्षात यशस्वी पदार्पण

 

 International Space Station with Earth in the background

    अंतराळातील झिरो ग्रॅव्हीटीतील फिरते अंतराळस्थानक -फोटो नासा संस्था

  नासा संस्था- 8 डिसेंबर

नासा संस्थेतील पाच देशांनी मिळुन निर्माण झालेल्या अंतराळातील झीरो ग्रॅव्हिटीतील फिरत्या अंतराळस्थानकाने आता पंचविसाव्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे सहा डिसेंबरला नासा संस्थेतर्फे स्थानकाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला नासाचे Associate Administrator Robert Cabana आणी Space Station Program Manager Joel Montalbano ह्यांनी सध्या अंतराळस्थानकात रहात असलेल्या अंतराळ मोहीम 70 च्या अंतराळवीरांसोबत लाईव्ह संवाद साधुन त्यांना स्थानकाच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या 

अंतराळस्थानकाच्या निर्मितीचा शुभारंभ 25 नोव्हेंबर 1998 ला झाला पण 6 डिसेंबरला अंतराळात फिरणाऱ्या Zarya Module ला पहिल्यांंदा Unity Module जोडण्यात आले म्हणून सहा डिसेंबरला स्थानकाचा वर्धापन दिन साजरा केल्या जातो अमेरिका आणी रशिया ह्या दोन देशांनी मिळुन हे दोन Module एकत्र जोडले होते आता त्या भागात अंतराळस्थानकात वास्तव्य करणारे अंतराळवीर एकत्र जेवण करतात 

अंतराळस्थानकाच्या निर्मितीचा शुभारंभ करून हे दोन भाग एकमेकांना जोडण्याची मोहीम आखण्यात आली तेव्हा ह्या मोहिमेचे कमांडर Robert Cabana होते त्यांच्याच देखरेखीखाली हे भाग जोडण्यात आले आणी त्यांनीच पहिल्यांंदा स्थानकात प्रवेश केला स्थानकात प्रवेश करणारे ते पहिले अमेरिकन अंतराळवीर आहेत स्थानकाच्या वर्धापनदिनी अंतराळवीरांसोबत लाईव्ह संवाद साधताना त्यांनी हि माहिती दिली ते म्हणतात,"खरोखरच त्या वेळेस हे साहसी,थरारक काम मी केलय ह्यावर आता माझा विश्वास बसत नाही तुम्ही जिथे सध्या राहात आहात संशोधन करत आहात त्याचे श्रेय आम्हाला आहे तुम्ही तिथे वास्तव्य करून पृथ्वी संरक्षणासाठी आणी पृथ्वीवासीयांसाठी ऊपयुक्त संशोधन करत आहात ह्याचा ऊपयोग भावी पीढीसाठी आणी दुरवरच्या अंतराळ मोहीमेतील अंतराळवीरांसाठी होणार आहे 

अंतराळातील ह्या फिरत्या वास्तुचा आकार गोलाकार आणी अमेरिकेतील फुटबॉल फिल्ड एव्हढा आहे ह्या अंतराळातील झीरो ग्रॅव्हिटितील फिरत्या स्थानकात सहा क्वार्टर आणी दोन बाथरूम आहेत शीवाय व्यायामासाठी जीम आणी ईतर सायंटिफिक प्रयोग,संशोधन करण्यासाठी भरपूर जागा आहे अंतराळवीरांसाठी ताजी भाजी आणी अन्न पिकवण्यासाठी ह्या स्थानकात पृथ्वीसारखे कृत्रीम वातावरण असलेले व्हेजी चेंबर देखील आहे नवनवीन व्हेजी प्रोजेक्ट द्वारे अंतराळवीरांनी त्यात भाजी ऊगवण्यात यश मिळवले आहे आणी ताज्या भाज्यांचा आस्वाद देखील घेतला आहे 

अंतराळस्थानकाची निर्मिती जरी 1998 साली झाली असली तरी कित्येक वर्षांपासून अंतराळातील फिरत्या स्थानकाची अभीनव कल्पना मांडली गेली होती सोळाव्या शतकातच पहिल्यांदा Astronomer Johannes ह्यांंना अशी कल्पना सुचली अंतराळात फिरणाऱ्या अशा स्थानकात अंतराळात फिरता आणी रहाता  देखील येईल एक दिवस ते शक्य होईल आणी मानव अंतराळात प्रवास करेल असे त्यांनी म्हटले होते त्या नंतर 1860 मध्ये  Edward Everett Hale ह्यांंनी Brick Moon ह्या त्यांच्या लेखात अंतराळातील स्थानकाची कल्पना मांडली त्यांनी म्हटले होते पृथ्वीच्या वर अंतराळात फिरणारे मानव निर्मित घर असेल आणी त्यात मानवी वास्तव्य असेल हे अंतराळातील घर पृथ्वीवासीयांसाठी नवी दिशा देणारे ठरेल रशियन Theoretician Konstantin Tsiolkovsky ह्यांनी देखील अशाच अंतराळातील घराची कल्पना मांडली त्यात सौर ऊर्जेचा वापर करून प्रकाश निर्माण करता येईल आणी पृथ्वी सारखे वातावरण निर्माण करून आतमध्ये भाजी आणी धान्य पिकवता येईल असा विचार त्यांनी मांडला पुढे 1928 मध्ये पहिल्यांंदा Herman Noordung ह्यांनी अंतराळातील चाकाच्या आकाराच्या कृत्रीम ग्रॅव्हिटि असलेल्या अंतराळातील घराच्या बांधणीचे डिझाईन केले त्या नंतर 1952 मध्ये Willy Ley ह्यांनी देखील अशा अंतराळातील घराची कल्पना मांडली त्या आधी 1950 मध्ये US government मध्ये अशा अंतराळातील फिरत्या घराच्या निर्मितीबाबत चर्चा झाली अखेर 1960 मध्ये नासाच्या Huston येथील J.PL संस्थेत गरजेतून ह्या अंतराळस्थानकाच्या निर्मितीचा विचार करण्यात आला आणी नासाने Space Station निर्मितीचे पेटंट मिळवत Skylab च्या निर्मितीचा शुभारंभ केला 

त्या नंतर 1998 च्या डिसेंबरमध्ये अंतराळ स्थानकाचा शुभारंभ झाला आणी त्याचा हळूहळू विस्तार होत गेला सध्या नासा संस्थेत कॅनडा,युरोप,जपान,रशिया आणी अमेरिकेचा सहभाग आहे आजवर 21 देशातील 273 अंतराळवीर स्थानकात वास्तव्य करून आले आहेत तीथे सतत शेकडो विषयांवर सायंटिफिक संशोधन सुरू असते वेगवेगळ्या देशातील अंतराळवीर वेगवेगळ्या मोहीमे अंतर्गत स्थानकात जा,ये करतात, संशोधन करतात तीथुन लाईव्ह संवाद साधतात अंतराळस्थानकाच्या कामासाठी स्पेसवॉक करतात त्यात महिला अंतराळवीरही मागे नाहीत स्थानकातील वास्तव्या दरम्यान येणारे सण साजरे करतात,पार्टी करतात

अंतराळवीर जेव्हा स्थानकात पोहोचतात तेव्हा अंतराळस्थानक पाहून अंचबीत होतात अंतराळातील झीरो ग्रॅव्हिटीतील निर्मित झालेल्या अंतराळवीरांना प्रेरित करणाऱ्या मानवाच्या ह्या असामान्य कर्तृत्वाचे,कुशलतेचे ते कौतुक करतात जेव्हा त्यांना त्यांचा अविस्मरणीय क्षण कोणता हे विचारले जाते तेव्हा अंतराळातून दिसणारे पृथ्वीचे अलौकिक सौंदर्य आणी स्थानकातील प्रवेशाचा क्षण असे ऊद्गार त्यांच्या तोंडून बाहेर पडतात ते नासा संस्था आणी स्थानक निर्माण करणाऱ्या अभियंता,ईंजीनिअर,शास्त्रज्ञ,तंत्रज्ञांचे आभार मानतात खरोखरच पृथ्वीवरून प्रुथ्वीचे अलौकिक सौंदर्य पहाता येत नाही त्यासाठी अंतराळात जावे लागते म्हणूनच तिला अलौकिक म्हटले जात