Thursday 31 August 2023

नासाच्या Space X Crew- 7 मोहिमेतील अंतराळवीर स्थानकात पोहोचले

  The Crew-7 astronauts walk out of the Neil Armstrong Operations and Checkout Building at NASA's Kennedy Space Center in Florida on Aug 26, 2023.

           नासाच्या Space X Crew -7 अंतराळ मोहिमेतील अंतराळवीर स्थानकात जाण्याच्या तयारीत -फोटो नासा संस्था

नासा संस्था - 28 ऑगस्ट 

नासाच्या Space X Crew -7 अंतराळ मोहिमेतील नासाची अंतराळवीर Jasmin Moghbeli युरोपियन अंतराळवीर Andreas Mogensen जपानचे अंतराळवीर Satoshi Furukawa आणी रशियन अंतराळवीर Konstantin Borisov 27 ऑगस्टला स्थानकात सुखरूप पोहोचले हवामान ऊड्डाणासाठी अनुकूल नसल्याने ह्या अंतराळवीरांचे ऊड्डाण एक दिवस लांबले नासाच्या Florida Space Center येथील 39 A ऊड्डाण स्थळावरून  26 ऑगस्टला  Space X Crew Dragon Endurance ह्या चारही अंतराळविरांसह अंतराळात झेपावले आणी रविवारी 27 ऑगस्टला 10.58 a.m.ला स्थानकात पोहोचले  

  NASA astronaut and Crew-7 Commander, Jasmin Moghbeli, poses for a photo in the first moments the Crew-7 quartet is onboard the International Space Station after hatch opening on August 27, 2023.

    Endurance Dragon Crew -7 मोहिमेतील अंतराळवीर स्थानकात पोहोचल्यानंतर -फोटो नासा संस्था

जाण्याआधी ह्या अंतराळविरांची ऊड्डाणपुर्व अंतीम चाचणी घेण्यात आली त्यांंचे स्पेससुट फिटिंग चेकअप,लिकेज चेकअप ,हेल्थ चेकअप व ईतर आवश्यक चेकअप नंतर हे अंतराळवीर ऊड्डाण स्थळी जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांना निरोप देण्यासाठी नासाचे Administrator Bill Nelson आणी ह्या मोहिमेतील प्रमुख हजर होते ह्या अंतराळविरांना निरोप देण्यासाठी त्यांचे कुटुंबीय देखील  ऊड्डाणस्थळी आले होते पण गेल्या दोन महिन्यापासून हे अंतराळवीर Quarantine मध्ये होते त्यामुळे त्यांना कुटुंबीयांशी लांबुनच संवाद साधावा लागला त्यांच्याशी काही वेळ संवाद साधुन अंतराळवीरांनी सर्वांना Bye करत सर्वांचा निरोप घेतला तेव्हा त्यांच्या कुटुबीयांनी त्यांना सूरक्षीत अंतराळ प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या अंतराळप्रवासास निघण्यापूर्वी अंतराळविरांनी Endurance Dragon मध्ये प्रवेश केल्यावर पुन्हा एकदा सर्व ठिक आहे ना ह्याची खात्री केली आणी ठरलेल्या वेळी Space X Dragon सह अंतराळवीर अंतराळस्थानकात जाण्यासाठी अंतराळात झेपावले रविवारी 9.16a.m.ला  Dragon स्थानकाजवळ पोहोचले आणी 10.58 a.m. ला स्थानक आणी Dragon ह्यांच्यातील hatching,docking प्रक्रिया पार पडली त्या नंतर अंतराळविरांनी स्थानकात प्रवेश केला स्थानकात सध्या रहात असलेल्या अंतराळवीरांनी ह्या चारही अंतराळविरांचे स्थानकात स्वागत केले त्या नंतर काही वेळातच ह्या अंतराळविरांचा Welcome Ceremony पार पडला

अंतराळ प्रवासा दरम्यान हे अंतराळवीर नासा संस्थेच्या सतत संपर्कात होते Space X Crew Dragon अत्यंत वेगाने अंतराळात मार्गक्रमण करत नियोजित प्रक्रिया पार पाडत होते अखेर अंतीम प्रक्रिया पार पाडत Dragon rocket पासून वेगळे झाले आणी प्रचंड वेगाने पृथ्वीच्या कक्षेतून झीरो ग्रव्हिटित प्रवेशले तेव्हा नासा संस्थेने लाईव्ह संपर्क साधुन Dragon चा अंतराळातील सुरक्षित प्रवेश आणी  स्मूथ ड्रायव्हिंग केल्याबद्दल अंतराळविरांचे अभिनंदन केले आता Dragon मधून तुम्ही चार वेगवेगळ्या देशातील अंतराळवीर एकत्र अंतराळ प्रवास करत असल्याचे पाहून आम्हाला आनंद होत आहे आता खऱ्या अर्थाने Dragon International झाले आहे तुम्हाला तुमच्या पुढील प्रवासासाठी आणी स्थानकातील प्रवेशासाठी शुभेच्छा !असे म्हणत त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा Dragon मध्ये बसण्यासाठी मोकळी जागा आहे आम्ही देखील आनंदी आहोत आम्हाला नासा आणी आमच्या देशातील सहभागी संस्थेचे आभार मानावयाचे आहेत त्यांच्या मुळे आम्ही हा अदभूत प्रवास करतोय हा अभुतपुर्व,अविस्मरणीय क्षण अनुभवतोय आम्हाला ट्रेनिंग देणाऱ्या ह्या मोहीमेतील सहभागी सर्वांचेच आभारी आहोत त्यांच्या मुळेच आम्ही सुरक्षित अंतराळप्रवास करत आहोत असे म्हणत त्यांनी अंतराळातून पृथ्वीच अलौकिक सौंदर्य दाखवले 

ह्या प्रवासात अंतराळवीर Andreas ह्यांच्या मुलाने दिलेले झीरो ग्रव्हिटी ईंडीकेटर 3 toed Sloth देखील कसे तरंगते ते दाखवले हा Sloth दोन ऐवजी तीन toed  का आहे ह्या बद्दल  विचारले असता Andreas," ह्यांनी सांगितले मागच्या क्रिसमसला सुट्टीत मी माझ्या फॅमिली सोबत Casta Rica येथील समुद्रकिनारी फिरायला गेलो होतो तीथे आम्हाला  Sloth दिसला मी पायलट आहे माझ्या फॅमिलीत मला Slowest person म्हणतात त्यामुळे मला तीन toed Sloth ची गरज आहे असे त्यांना वाटते त्यांच्यासाठी ते लकी आहे मला त्यांची आठवण म्हणून त्यांनी हे ईंडीकेटर सोबत दिलय जपानी अंतराळवीर Satoshi Furuawa ह्यांनी देखील अंतराळात  पुन्हा प्रवेश केल्यावर मी देखील आंनदीत झालो आहे असे सांगितले रशियन अंतराळवीर  Borisov म्हणाले मी खूप Excited आहे Thanks ! ह्या.मोहिमेत सहभागी सर्वांचेच आभार त्यांच्यामुळे हे शक्य झाले !  

अंतराळवीर स्थानकात पोहोचल्यानंतर काही वेळातच ह्या अंतराळविरांचा Welcome Ceremony पार पडला Welcome Ceremony साठी स्थानकातील अकरा अंतराळवीर एकत्र जमले नासा संस्थेने लाईव्ह संपर्क साधुन ह्या अंतराळविरांचे सुरक्षित अंतराळ प्रवास व स्थानकातील प्रवेशाबद्दल अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आणी स्थानकात प्रवेश केल्यानंतरचे त्यांचे मनोगत जाणून घेतले 

सुरवातीला अंतराळवीर  Frank आणी अंतराळवीर Sergey ह्यांनी  ह्या अंतराळवीरांचे स्थानकात स्वागत केले '',स्थानकात सुखरूप पोहोचल्या बद्दल अंतराळमोहीम 69 तर्फे तुमचे अभिनंदन ! अंतराळवीर Satoshi आणी Andreas तुमचे स्वागत तुम्ही दुसऱ्यांंदा स्थानकात पोहोचला आहात पण अंतराळवीर Jasmine आणी  Konstantin ,तुमच्या स्थानकातील प्रथम प्रवेशाबद्दल स्पेशल अभिनंदन आणी स्वागत ! आता तुम्ही खरोखरच अंतराळवीर झाला आहात हा तुमच्या आयुष्यातील महत्त्वपुर्ण क्षण आहे तुमच्या Happy flight आणी भविष्यकालीन स्थानकातील वास्तव्यासाठी आणी संशोधनासाठी शुभेच्छा ! आता आपण एकत्र संशोधन करणार आहोत !"

अंतराळवीर Jasmin -."Thanks ! Sergey आणी  Frank तुम्ही केलेल्या स्वागताबद्दल आपण काही दिवस एकत्र ट्रेनिंग घेतल आहे आताचा क्षण खरोखरच महत्त्वाचा आहे आता आपण एकत्र रहाणार आहोत,संशोधन करणार आहोत आम्ही येथील झीरो ग्रव्हिटितील वास्तव्याचा अनुभव घेणार आहोत त्या साठी नासा संस्था,ईसा,Space X JAXA CSA आणी Roscosmos संस्थेतील सर्वांचे आभार त्यांच्यामुळे मी ईथे येऊ शकले हा क्षण अनभवु शकले येणाऱ्या काळात आम्ही निश्चितच चांगली कामगिरी पार पाडु तुमच्यापैकी तीनजण वेगळे आहेत पण मला आशा आहे तुम्ही आम्हाला संशोधनातील परीपूर्ण,ऊपयुक्त गोष्टी शिकवाल ह्या टिममध्ये सहभागी झाल्याचा मला अभिमान वाटतो आहे !"

अंतराळवीर Andreas -"मला सुध्दा Jasmine सारखच फिल होतय ह्या मोहीम 69 मध्ये सहभागी होताना अभिमान वाटतोय हि मोहीम आम्ही नक्की यशस्वी करु आधीच्या ESAच्या अंतराळवीरांनी केलेले अनेक युरोपियन आणी Danish Expt. मी पुढे चालू ठेवेन मला त्यासाठी ESA संस्थेचे आभार मानावयाचे आहेत त्यांच्या Hard Work बद्दल आणी मला ईथे येण्यासाठी Train  केल्याबद्दल हि मोहीम अभुतपुर्व आहे ईथे स्थानकात पोहोचल्यानंतरचा क्षण अभुतपुर्व आहे,थरारक आहे ईथल्या ब्रिलीयंट इंटर नॅशनल  टिम सोबत रहायला,संशोधन करायला मिळणार ह्याचा आनंद होतोय मी Excited आहे !"

अंतराळवीर  Borisov -"खरच खूप Excited क्षण आहे हा शब्दात व्यक्त करता येत नाही ईथल्या झीरो ग्रॅविटीत ईतक्या सहजतेने तरंगताना ह्या सर्वांना पहाण किती कठोर परिश्रम करावे लागतात त्यासाठी !आणी आता मिही ईथल्या झीरो ग्रव्हिटित तरंगत्या अवस्थेत रहाणार मलाही त्या साठी खूप प्रयत्न करावे लागणार आहेत खूप कठीण आहे हे ईथल्या ईंटरनॅशनल टिमसोबत एकत्र संशोधन करताना एकी कीती महत्त्वाची आहे ह्याचा प्रत्यय येतोय ह्या ईंटरनॅशनल अंतराळस्थानकात आम्ही बहुतेकजण ईंटरनॅशनल रहिवासी आहोत ईथे पाच देशातील अंतराळवीर वास्तव्य करत आहेत आगामी काळात आम्ही एकत्र काम करणार आहोत नासा,Space X आणी सहभागी सर्व संस्थेचे आभार खरेच ईथले अंतराळवीर वैशिष्ट्यपूर्ण आहेत आता काही महिने आम्ही एकत्र संशोधन करणार आहोत आणी ईथल्या झीरो ग्रव्हिटितील रहाण्याची मजा अनुभवणार आहोत!"

हे चारही अंतराळवीर आता स्थानकात सहा महिने राहून तेथे सुरु असलेल्या संशोधनात सहभागी होणार आहेत लवकरच  Space X -6 अंतराळ मोहिमेतील चार अंतराळवीर पृथ्वीवर परततील तो पर्यंत स्थानकातील अकरा अंतराळवीर एकत्रित राहून तेथील संशोधनात सहभागी होतील

 

Friday 25 August 2023

भारताची चांद्रयान -3 मोहिम यशस्वी विक्रम चांद्रयान चंद्रावर प्रज्ञान रोवरसह स्थिरावले

 Image

 भारताच्या चांद्रमोहीम -3 मधील विक्रम चांद्रयान चांद्रभूमीवर सुरक्षितपणे उतरून स्थिरावल्यानंतर -फोटो -इसरो संस्था

ईसरो  संस्था -24 ऑगस्ट 

भारताच्या चांद्रमोहिम -3 अंतर्गत चंद्रावर गेलेले विक्रम चांद्रयान बुधवारी चंद्रावर सूखरूप पोहोचले आणी संद्याकाळी 6 वाजुन 4 मिनिटांनी चंद्रभुमीवर सुरक्षीतपणे खाली ऊतरले विक्रम चांद्रयानाने हि मोहीम यशस्वी करत चंद्राच्या दक्षीण भागात चांद्रयान ऊतरवणारा पहिला देश म्हणून भारताची विक्रमी नोंद केली आहे विक्रम चांद्रयान चंद्रावर पोहोचताच ईसरोचे अध्यक्ष S Somanath ,चांद्रमोहिम 3 मधील प्रमुख शास्त्रज्ञ आणी सारे कर्मचारी आनंदित झाले विक्रम चांद्रयान चंद्रावर पोहोचताच यानाने पृथ्वीवरील ईस्रो संस्थेशी लाईव्ह संपर्क साधत " I reached my destination and you also !" असे ट्वीट केले चांद्रयान चांद्रभूमीवर स्थिरावताच काही तासानंतर विक्रम चांद्रयानातुन प्रज्ञान रोवर देखील बाहेर पडले आणी कार्यान्वित झाले विक्रम चांद्रयानाने चंद्राच्या कक्षेत फिरतानाच चंद्रभुमीवरील फोटो व व्हिडीओ काढून पृथ्वीवर पाठवणे सुरू केले होते विक्रम चांद्रयान चंद्रभुमीवर ऊतरताना ऊतरल्यावर आणी प्रज्ञान रोवर यानातुन बाहेर पडतानाचा व्हिडीओ देखील विक्रम चांद्रयानाने लगेचच पृथ्वीवर पाठवला आहे 

 Image

विक्रम चांद्रयान 14 जुलैला ईस्रोच्या श्रीहरीकोटा येथील ऊड्डाण स्थळावरून चंद्रावर जाण्यासाठी अंतराळात झेपावले आणी 41 दिवसांनी चंद्रावर पोहोचले ह्या आधीच्या चांद्रमोहिम 2 मधील विक्रम चांद्रयान चंद्रावर ऊतरताना नष्ठ झाले होते आणी दोन दिवस आधीच रशियाचे लुना चांद्रयान देखील चांद्रभूमीवर ऊतरताना नष्ठ झाले त्यामुळे ह्या वेळेस विक्रम चांद्रयान चंद्रावर सुरक्षीतपणे खाली ऊतरेल की नाही ह्या बद्दल ईस्रोचे अध्यक्ष आणी  ह्या मोहिमेचे प्रमुख शास्त्रज्ञ S.Somanath आणी त्यांची टिम सांशक होती पण अखेर हि मोहीम यशस्वी करत विक्रम चांद्रयान सुरक्षीतपणे चंद्रभुमीवर खाली ऊतरले

 


ईस्रो संस्थेतील शास्त्रज्ञांनी विक्रम चांद्रयान चंद्राच्या कक्षेत शिरताच चांद्रयान चंद्रभुमीवर ऊतरवण्याची तयारी सुरू केली होती सारी यंत्रणा सज्ज होती चांद्रयान चंद्रभुमीवर ऊतरण्याआधी चंद्राच्या कक्षेत फिरत होते आणी चंद्रावर ऊतरण्यासाठी योग्य जागेचे निरीक्षण करत होते योग्य जागा सापडताच विक्रम चांद्रयानातील स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित झाली चांद्रयानाने चंद्रभुमीवर ऊतरण्यासाठी वेगावर नियंत्रण ठेवत चंद्रभुमीच्या दिशेने झेप घेतली तेव्हा टिममधील शास्रज्ञ सर्तक झाले त्यांचे लक्ष यानावर केंद्रित झाले जसजसे विक्रम यान खाली खाली येत होते तसतशी शास्त्रज्ञांची ऊत्कंठा वाढत होती यानाने नियोजीत प्रक्रिया पार पाडताच सर्वजण टाळ्या वाजवत आनंद व्यक्त करत होते अखेरची प्रक्रिया पार पाडत यानाने स्थीती बदलली आणी वेग कमी करत उभ्या स्थितीत चंद्रभुमीवर सुरक्षीतपणे खाली ऊतरत जमीनीला स्पर्श केला तेव्हा ईस्रो संस्थेत सर्वांनी जल्लोष केला S.Somanath त्यांंचे सहकारी कर्मचारी निश्चिंत झाले त्यांच्या चेहऱ्यावर कर्तव्यपुर्तीचा आनंद दिसत होता ईस्रोतील चांद्रमोहिम 3 मधील शास्त्रज्ञ,ईंजीनिअर्स,तत्रंज्ञ,कर्मचारी साऱ्यांंनीच ऊभे राहून टाळ्या वाजवत हा क्षण अनुभवला

हि मोहीम यशस्वी होताच ईस्रोचे अध्यक्ष S.Somanath ह्यांनी चांद्रमोहिम यशस्वी झाल्याची अधिकृत घोषणा केली आणी मनोगत व्यक्त केले ते म्हणाले," हे यश टिममधील सर्वांचे आहे गेल्या चार वर्षापासून सर्वजण ह्या मोहीमेसाठी रात्रंदिवस काम करत होते दैनंदिन व्यवहार करताना,खाताना,पितानाच नाही तर श्वास घेताना देखील ते हि मोहीम यशस्वी करण्याच्याच विचारात होते त्यांच्या सहकार्यामुळे अथक परीश्रमामुळे हे यश प्राप्त झाले आहे त्यामुळे त्यांचे अभिनंदन ! आधीच्या चांद्रयान 2 मोहिमेतील त्रुटी दुर करून ह्या मोहिमेत काही आवश्यक बदल करण्यात आले होते पण तरीही विक्रम चांद्रयान चंद्रभुमीवर ऊतरेपर्यंत आम्ही चिंतीत होतो पण अखेर हि मोहीम यशस्वी झाली आमच्यासाठी हा ऐतिहासिक क्षण अनमोल आहे पंतप्रधान मोदींनी परवानगी देऊन सहकार्य केल्यामुळे हे यश प्राप्त होऊ शकले त्यामुळे त्यांचे आभार 

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं अफ्रिकेतील जोहन्सबर्ग येथून लाईव्ह टेलीकास्टद्वारे विक्रम चांद्रयान चंद्रभुमीवर ऊतरतानाच्या सोहळ्यात  सहभागी झाले होते चांद्रयान चंद्रभुमीवर ऊतरताच त्यांनी भारताचा तिरंगा फडकावत आनंद साजरा केला त्यांनी हि मोहीम यशस्वी केल्याबद्दल ईस्रो संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ, मोहिमेतील सहभागी शास्त्रज्ञ आणी सर्व कर्मचाऱ्यांंचे अभिनंदन केले ते म्हणाले,"आधीच्या मोहिमेतील अपयशाने खचून न जाता शास्त्रज्ञांनी हि मोहीम यशस्वी करुन देशाचे नाव ऊंचावले आहे विक्रम यानाने देशाच्या ईतिहासात विक्रमी नोंद केली आहे भारताने चंद्राच्या दक्षिण भागात यान ऊतरवुन चांद्रमोहिमेतील यशाच्या वाटेवर प्रथम पहिले पाऊल टाकले आहे हे यश शास्त्रज्ञांच्या आणी टिमच्या अपार मेहनतीने प्राप्त झाले आहे त्या साठी ईस्रो संस्थेतील ह्या टिममधील सर्वांचे अभिनंदन!" माझ्यासाठी हा  ऐतिहासिक क्षण अविस्मरणीय आहे!अनमोल आहे! ईस्रो तील ह्या मोहिमेतील सर्वांना पुढील वाटचालीसाठी शूभेच्छा ! देशातील 140 कोटी जनता ह्या ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार आहे सर्व जनतेचेही आभार अंतराळविश्वातील भारताचे भविष्यकालीन यश निश्चित आहे लवकरच भारत चंद्रावर गगनयान मोहिमेत मानव पाठवणार आहे मंगळ,शुक्र मोहिमेची तयारी सुरु आहे आजवर अमेरिका ,रशिया आणि चीनने चंद्रावर यान पाठवून चांद्रमोहीम यशस्वी केली होती आता भारतही यशस्वी चौथा देश झाला आहे 

विक्रम चांद्रयान व प्रज्ञान रोवर आता चंद्रभुममीवरील व भुगर्भातील खनिजे,माती,खडकांचे नमुने घेतील चंद्रावरील पुरातन सजीव स्रुष्ठिच्या अस्तित्वाला दुजोरा देणारे पुरावे व पाण्याच्या अस्तित्वाचा शोध घेतील तसेच भविष्यकालीन मानवसहित चांद्रमोहिमेतील अंतराळविरांसाठी रहाण्यायोग्य पोषक वातावरणाचा शोध घेतील तेथील वातावरणाचे निरीक्षण नोंदवून तेथील फोटो व व्हिडिओ प्रुथ्वीवर पाठवतील

Friday 18 August 2023

नासाच्या Space X Crew-6 मोहिमेतील अंतराळवीर सप्टेंबर मध्ये पृथ्वीवर परतणार

Clockwise from bottom, are NASA astronaut Stephen Bowen; UAE (United Arab Emirates) astronaut Sultan Alneyadi; NASA astronaut Woody Hoburg; and Roscosmos cosmonaut Andrey Fedyaev.
 
नासाच्या Space X Crew -6 चे अंतराळवीर Stephen Bowen ,Sultan Alneyadi ,Woody Hoburg आणी रशियन अंतराळवीर Andrey Fedyaev स्थानकातील वास्तव्या दरम्यान -फोटो नासा संस्था
 
नासा संस्था -17 आँगस्ट 
नासा आणी Space X Crew 6 अंतराळ मोहिमेतील अंतराळवीर त्यांचे स्थानकातील सहा महिन्यांचे वास्तव्य संपवून सप्टेंबरमध्ये पृथ्वीवर परतणार आहेत नासा आणी Space X ह्यांच्या अंतराळ मोहीम Crew -6 अंतर्गत नासाचे अंतराळवीर Stephen Bowen,Woody Hoburg सौदी अरबचे अंतराळवीर Sultan Alneyadi आणी रशियन अंतराळवीर Andrey Fedyaev हे चार अंतराळवीर तीन मार्च 2023 मध्ये सहा महिन्यांच्या वास्तव्यासाठी स्थानकात गेले होते 
स्थानकातील सहा महिन्यांच्या वास्तव्या दरम्यान हे अंतराळवीर तेथे सुरू असलेल्या सायंटिफिक संशोधनात सहभागी झाले विशेषतः त्यांनी स्थानकात सुरु असलेल्या Technology demonstrations, Student Robotic Challenges,Plant genetics ह्या विषयीच्या सायंटिफिक प्रयोगातील संशोधनात सहभाग नोंदवला  शीवाय अंतराळ स्थानकातील झीरो ग्रव्हिटितील वास्तव्या दरम्यान मानवी आरोग्यावर काय विपरीत परिणाम होतात ह्याचे निरीक्षण नोंदवून त्यावर सखोल संशोधन केले मानवाच्या विकासासाठी ऊपयुक्त आणी पृथ्वी संरक्षणासाठी आवश्यक  संशोधनातही ते सहभागी झाले  
हे अंतराळवीर एक सप्टेंबरला पृथ्वीवर परतणार आहेत Space X Crew Dragon Endeavor ह्या अंतराळवीरांसह Florida येथील समूद्रात ऊतरणार आहे पृथ्वीवर परतण्याआधी हे अंतराळवीर स्थानकातून पत्रकारांसोबत लाईव्ह संवाद साधणार आहेत आणि त्यांच्या सहा महिन्यातील वास्तव्याविषयी आणि त्या दरम्यान त्यांनी केलेल्या संशोधना विषयी माहिती देणार आहेत

Friday 11 August 2023

नासाच्या Space X-Crew -8 मोहिमेतील अंतराळविरांची निवड

  NASA’s SpaceX Crew-8 Crew Portrait

                         नासाच्या अंतराळ मोहीम Space X Crew -8 चे अंतराळवीर -फोटो नासा संस्था

 नासा संस्था - 4 ऑगस्ट 

नासाच्या Space X -Crew-8 अंतराळ मोहिमे अंतर्गत चार अंतराळवीर सहा महिन्यांच्या वास्तव्यासाठी स्थानकात  जाणार आहेत ह्या मोहिमे अंतर्गत नासाचे अंतराळवीर Matthew Dominick, Michael Barratt,Jeanette Epps आणी रशियन अंतराळवीर Alexander Grebenkin हे चार अंतराळवीर सहा महिन्यांच्या वास्तव्यासाठी स्थानकात जाणार आहेत 

ह्या मोहिमेत अंतराळवीर Matthew Dominick हे कमांडर पद,अंतराळवीर Michael  Barratt हे पायलट पद सांभाळणार आहेत अंतराळवीर Jeanette Epps आणी अंतराळवीर Alexander Grebenkin हे दोघे मिशन स्पेशॅलिस्ट पद सांभाळणार आहेत 

अंतराळवीर Dominick ह्यांची हि पहिलीच अंतराळवारी आहे 2017 मध्ये त्यांची नासा संस्थेत निवड झाली Colorado येथील रहिवासी असलेले Dominick ह्यांनी U.S. Navy Astronaut आणि U.S. Naval Test Pilot म्हणून काम केलय 

अंतराळवीर Michael Barratt ह्यांची हि तिसरी अंतराळवारी असून ते तिसऱ्यांदा स्थानकात राहायला जाणार आहेत ह्या आधी अंतराळ मोहीम 19-20 अंतर्गत 2009 साली ते स्थानकात रहायला गेले होते  ह्या मोहिमेत त्यांनी Flight Engineer पद सांभाळले होते त्यांच्या स्थानकातील वास्तव्या दरम्यान त्यांनी स्थानकाच्या कामासाठी दोन वेळा Space Walk केला आणि 2011 मध्ये STS-133अंतर्गत ते पुन्हा स्थानकात गेले होते त्यांच्या अंतराळ विश्वातील करिअर मध्ये त्यांनी आजवर स्थानकात 212 दिवस वास्तव्य केले आहे Michael Barratt वॉशिंग्टन येथील रहिवासी असून 2000 साली यांची नासा संस्थेत निवड झाली होती नासा संस्थेत Flight Surgeon & Project Physician पदी कार्यरत आहेत

Jeanette Epps ह्यांची हि पहिलीच अंतराळवारी आहे त्या New York च्या रहिवासी आहेत 2009 साली त्यांची नासा संस्थेत अंतराळवीर होण्यासाठी निवड झाली त्या आधी त्या Ford Motor co.आणि Intelligence Agency मध्ये कार्यरत होत्या Boeing Starliner -1 मोहिमेसाठीही त्यांची निवड झाली आहे रशियन अंतराळवीर Alexander Grebenkin हे देखील प्रथमच स्थानकात राहायला जाणार आहेत  

2024 मध्ये हे चार अंतराळवीर स्थानकात जाणार आहेत आणी अंतराळ मोहीम 70-71च्या अंतराळविरांसोबत  अंतराळ स्थानकात सुरू असलेल्या संशोधनात सहभागी होणार आहेत

Wednesday 9 August 2023

मंगळावरील आकाशात Ingenuity मंगळयानाचे 54वे यशस्वी ऊड्डाण

 This view of NASA’s Ingenuity Mars Helicopter was generated using data collected by the Mastcam-Z instrument

 मंगळावरील आकाशात 872 व्या मंगळ दिवशी 54 वे उड्डाण यशस्वी करून मंगळभूमीवर उतरलेले Ingenuity मार्स हेलिकॉप्टर -फोटो - नासा संस्था (J P L)

नासा संस्था-JPL- 8 ऑगस्ट 

नासाच्या Perseverance मंगळयानासोबत मंगळावर पोहोचलेल्या Ingenuity मार्स हेलिकॉप्टरने मंगळावरील आकाशात 54वी यशस्वी भरारी मारली आहे Perseverance मंगळयान आणी Ingenuity हेलिकॉप्टर 19 एप्रील 2021 मध्ये मंगळावर पोहोचले तेव्हापासुन तेथे यशस्वीपणे कार्यरत आहे शास्त्रज्ञांनी मंगळावरील आकाशात पाच ऊड्डाणाच्या अपेक्षेने ह्या  हेलिकॉप्टरचे डिझाईन केले होते पण शास्त्रज्ञांच्या अपेक्षेपेक्षा दसपटीहुनही जास्त यशस्वी ऊड्डाणे करून ह्या हेलिकॉप्टरने शास्त्रज्ञांना आश्चर्यचकीत केले आहे एप्रिलमध्ये दोन वर्षे पुर्ण होण्याआधीच Ingenuity हेलिकॉप्टरने तेथील आकाशात ऊड्डाणाचे अर्धशतक पुर्ण केले होते आता Ingenuity हेलिकॉप्टरने मंगळावरील आकाशात चोपन्नावे ऊड्डाण यशस्वी केले आहे 

 3 ऑगस्टला मंगळावरील 872 व्या मंगळ दिवशी Ingenuity हेलिकॉप्टरने तेथील आकाशात चोपन्नावे ऊड्डाण केले  मंगळभूमीवरील आकाशात Ingenuity हेलिकॉप्टरने सोळा फुट ऊंचीवरुन उड्डाण केले तेव्हा त्याचा वेग 2.5 मीटर प्रतीसेकंद होता ह्या उड्डाणादरम्यान Ingenuity हेलिकॉप्टरने मंगळावरील 7.6 मैल अंतर पार केले हेलिकॉप्टर मधील अत्याधुनिक सॉफ्टवेअर व Navigation Camera च्या सहाय्याने त्या भागातील फोटो,व्हिडीओ आणी महत्त्वपुर्ण माहितीही गोळा केली ह्या आधी Ingenuity हेलिकॉप्टरच्या 53 व्या उड्डाणात हेलिकॉप्टर नियोजित वेळेपेक्षा कमी वेळात मंगळ भूमीवर खाली उतरले होते उड्डाण करताना पर्वतीय भागात हेलिकॉप्टर स्वयंचलित यंत्रणेने उंचावर पोहोचले आणि हळू,हळू उंची कमी करत सुरक्षितपणे खाली उतरले होते हेलिकॉप्टर नियोजित वेळेपेक्षा लवकर खाली का उतरले हे शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी Ingenuity हेलिकॉप्टरचे 54वे उड्डाण घडवले आणि हे उड्डाण नियोजित वेळेत पूर्ण झाले

Ingenuity हेलिकॉप्टर फेब्रुवारी 2021 मध्ये Perseverance मंगळयानासोबत मंगळावर पोहोचले होते दोन वर्षांपासून Perseverance यान मंगळावरील पुरातन सजीव सृष्ठीच्या अस्तित्वाला दुजोरा देणारे पुरावे शोधण्याचे काम करत आहे मंगळावरील पुरातन काळी अस्तित्वात असलेले पण कालांतराने नष्ठ झालेले पाण्याचे स्रोत,मंगळ भुमीवरील आणी भुगर्भाखालील खडक,मिनरलस्,सजीवांचे अवशेष शोधण्याचे काम Perseverance यान करत आहे ह्या यानाला मंगळावरील सजीवांच्या अस्तित्वाला दुजोरा देणारी आणि पाण्याचे श्रोत असणारी ठिकाणे शोधून देण्याचे काम हे हेलिकॉप्टर करत आहे शीवाय भविष्यकालीन मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांसाठी आणी मानवी निवासासाठी पोषक वातावरण असलेला भाग शोधण्याचे कामही हे हेलिकॉप्टर करत आहे

 नासाच्या Perseverance टिममधील शास्त्रज्ञांनी Ingenuity हेलिकॉप्टरचे डिझाईन ह्या कामासाठी केले तेव्हा त्यांना Ingenuity हेलिकॉप्टर कडून मंगळावरील आकाशात पाचवेळा उड्डाणाची अपेक्षा होती पण Ingenuity हेलिकॉप्टरने शास्त्रज्ञांच्या अपेक्षेपेक्षा दहापटीपेक्षाही जास्तवेळा उड्डाण करून त्यांना आश्चर्यचकीत केले आहे नासाच्या वॉशिंग्टन येथील संस्थेचे Planetary Science चे डायरेक्टर Lory Glaze म्हणतात,"1903 मध्ये राईट बंधूंनी पहिल्या प्रयत्नानंतर विमान ऊड्डाण सुरु ठेवले आणी यश मिळवले तसेच Ingenuity च्या पहिल्या ऊड्डाणा नंतर न थांबता आम्ही सतत ऊड्डाण सुरू ठेवले दरवेळी हे हेलिकॉप्टर नव्याने आकाशात ऊड्डाण करते आणी मंगळावरील नवीन भाग शोधून तेथील संशोधीत माहिती गोळा करण्यात यशस्वी होते तेव्हा तेथील फोटो पाहून आम्ही आश्चर्यचकीत होतो त्यामुळे आमच्या दृष्टिकोनात बदल होतो नवनवीन भुभाग शोधण्याची आमची जिज्ञासा वाढते Ingenuity च्या मंगळावरील पहिल्या उड्डाणाने आम्ही आनंदी झालो होतो पण आता Ingenuity ने उड्डाणाच्या अर्धशतकानंतरही कार्यरत राहून हि मोहीम यशस्वी केली आहे 

Ingenuity हेलिकॉप्टरने संशोधीत केलेल्या ह्या माहितीचा ऊपयोग भविष्यकालीन मंगळ मोहिमेसाठी होणार आहे