श्रीहरीकोटा येथील उड्डाण स्थळावरून चांद्रयान- 3 अंतराळात झेपावताना -फोटो इसरो संस्था
ISRO संस्था - 15 जुलै
भारताच्या चांद्रमोहिमे अंतर्गत चांद्रयान -3 ह्या अंतराळयानाचे 14 जुलैला इसरो संस्थेच्या श्रीहरीकोटा येथून यशस्वी उड्डाण करण्यात आले श्रीहरिकोटा येथील उड्डाण स्थळावरून दुपारी 2.35 मिनिटाला LMV-3-M4रॉकेटच्या साहाय्याने चांद्रयान -3 अंतराळयान चंद्रावर जाण्यासाठी अंतराळात झेपावले उड्डाणानंतर काही वेळातच यान रॉकेट पासून वेगळे झाले आणि चंद्राच्या दिशेने मार्गस्थ झाले तेव्हा युनियन मिनिस्टर जीतेंद्रसिंह,इसरो संस्थेतील प्रमुख शास्त्रज्ञ S.Somnath आणि ह्या मोहिमेतील इतर सहभागी शास्त्रज्ञ ,इंजिनीअर्स,तंत्रज्ञ आणि सर्व कर्मचाऱ्यांनी उभे राहून टाळ्या वाजवत ह्या मोहिमेच्या यशस्वी शुभारंभाचा आनंद व्यक्त केला इसरो संस्थेतील ह्या मोहिमेतील महिला शास्त्रज्ञांनी देखील एकमेकांचे अभिनंदन करत त्यांचा आनंद व्यक्त केला आणि त्यांचे फोटो सोशल मीडियावरून शेअर केले इसरो संस्थेचे माजी डायरेक्टर Dr .P.V. Venkitakrishnan ह्यांनी विमान प्रवासादरम्यान चांद्रयान 3च्या उड्डाणाचा विमानातून घेतलेला व्हीडिओ सोशल मीडिया वरून शेअर केला आहे
हा उड्डाण सोहळा पाहण्यासाठी संस्थेबाहेर हजारो लोक उपस्थित होते इसरो संस्थेतर्फे ह्या सोहळ्याचे लाईव्ह प्रसारण करण्यात आले होते संस्थेतील निवेदक ह्या मोहिमेची माहिती टि.वी.स्क्रीन वरून नागरिकांना देत होते चांद्रयानाच्या चंद्राच्या दिशेने नियोजित उड्डाण प्रक्रिया पार पडल्यानंतर युनियन मिनिस्टर जितेंद्र सिंह आणि इसरो संस्थेचे चेअरमन S.Somnath ह्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले आणि हि मोहीम राबविण्यासाठी परवानगी देऊन आर्थिक साह्य दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले त्यांनी ह्या मोहिमेतील सहभागी सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले ह्या वेळी सोमनाथन म्हणाले,"कि लहानपणापासूनच मला रॉकेट बद्दल आकर्षण होते मला रॉकेट एखाद्या लहान मुलासारखे वाटते लहान मुलांना जसे आपण सर्व शिकवतो तशीच प्रक्रिया रॉकेट निर्मिती पासून launching पर्यंतची असते त्या चमकत्या रॉकेटने अंतराळात यशस्वी झेप घेतलेली पाहतानाचा क्षण माझ्यासाठी आनंददायी होता!"
उड्डाण सोहळा पाहण्यासाठी जमलेले नागरिक -फोटो -इसरो संस्था
चांद्रयान -3 आता 41 दिवसांनी चंद्रावर पोहोचेल सध्या अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेत फिरत असून बावीस दिवस यान पृथ्वीच्या कक्षेत फिरेल आणि पृथ्वीच्या बाहेरील वातावरणाच्या आवरणातून हळू,हळू पुढे मार्गक्रमण करेल ह्या दरम्यान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणा बाहेर पडण्यासाठी वेग व भ्रमण कक्षेवर नियंत्रण ठेवेल हे यान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत ओढल्या जाऊ नये म्हणून प्रयत्न करेल पृथ्वीच्या वातावरणातील शेवटच्या कठीण आवरणाचा थर भेदून कक्षेबाहेर पडण्यासाठी यानाचा वेग प्रचंड वाढवेल आणि यान त्या नंतर चंद्राच्या कक्षेत शिरण्यासाठी प्रवास करेल सहा दिवसांच्या अंतराळ प्रवासानंतर चंद्राच्या 100k.m.च्या कक्षेजवळ पोहोचल्यावर यान वेगावर नियंत्रण ठेवेल आणि वेग कमी,कमी करत चंद्राच्या पृष्ठभागाच्या दिशेने खाली येत कमी वेगाने हळुवार पणे चंद्रभूमीवर उतरण्याचा प्रयत्न करेल ह्या आधीच्या मोहिमेतील विक्रम लॅण्डर अत्यंत वेगाने चंद्रावर उतरले होते पण वेग नियंत्रणात न आल्याने तेथील भूमीवर आढळले आणि स्फोट होऊन नष्ट झाले होते ह्या वेळी असे होऊ नये म्हणून शास्त्रज्ञांनी हि खबरदारी घेतली आहे पूर्वीच्या विक्रम लॅण्डर मधील त्रुटी काढून यानात आवश्यक बदल करण्यात आले आहेत
चांद्रयान चंद्रभूमीवरील दक्षिण दृवावर सुखरूप उतरल्यानंतर ह्या यानातून प्रज्ञान रोव्हर बाहेर पडेल आणि भारताच्या चंद्रावरील चांद्रमोहीमेची सुरुवात होईल ह्या चांद्रयानात अत्याधुनिक रोबोटिक उपकरणे,कॅमेरे,X Ray Spectrometer आणी Lunar Seismic Activity मापक उपकरण बसविलेली असल्यामुळे हे यान तेथील भूमीवर फिरून तेथील भविष्यकालीन अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांच्या निवासासाठी उपयुक्त पोषक वातावरण असलेली जागा शोधेल शिवाय चंद्रावरील पुरातन सजीव सृष्टीला दुजोरा देणारे पुरावे गोळा करेल यानातील संशोधित उपकरणाच्या साहाय्याने संशोधनास सुरवात करेल चंद्रावरील भुपृष्ठावरील आणि भूगर्भातील माती,खडक ,मिनरल्स आणि पाण्याच्या अस्तित्वाचा शोध घेईल आणि त्याचे फोटो आणि संशोधित माहिती पृथ्वीवर पाठवेल ह्या आधीच्या मोहिमेतील शास्त्रज्ञांना त्या भागात डोंगरदऱ्या आणि पाण्याच्या अस्तित्वाच्या खुणा आढळल्या आहेत ह्या आधीच्या मोहिमेत विक्रम लॅण्डर जरी नष्ट झाले असले तरीही यानासोबत चंद्रावर गेलेले ऑर्बिटर अजूनही तेथे कार्यरत आहे ह्या ऑर्बिटरवरून मिळालेल्या माहितीवरून चंद्राचा दक्षिण भाग पृथ्वीच्या दक्षिण दृवासारखाच अत्यंत थंड आहे आणि तेथे बर्फ़ाचे अस्तित्व आहे त्या मुळे तिथे पाण्याचे अस्तित्व असू शकते म्हणून ह्या मोहिमेत चांद्रयान चंद्राच्या दक्षिण भागात पाठविण्यात आले आहे ह्या आधीच्या नासाच्या मोहिमेत देखील हीच संशोधित माहिती मिळाली आहे त्या मुळेच अमेरिकेच्या Artemis मोहिमेतील अंतराळवीर पुढच्या वर्षी चंद्राच्या ह्याच भागात उतरणार आहेत
परंतु चंद्राचा हा भाग पंधरा दिवस अंधारात असतो आणि पंधरा दिवसच प्रकाशात त्या मुळे आपले चांद्रयान जेव्हा तेथे पोहोचेल तेव्हा तेथे प्रकाश असेल अशी शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे ह्या मोहिमेतील संशोधित माहितीचा उपयोग भविष्यकालीन मोहिमेतील अंतराळवीरांना तसेच भविष्यकालीन चंद्रावरील मानवी वास्तव्यासाठी ऊपयुक्त आणी पाणी असणारे ठिकाण शोधण्यासाठी होईल हि मोहीम यशस्वी झाल्यास भारत चंद्रावर पोहचणारा चवथा देश ठरेल ह्या आधी अमेरिका,रशिया आणि चीनची चांद्रमोहीम यशस्वी ठरली आहे
No comments:
Post a Comment