Tuesday 11 July 2023

नासाच्या शास्त्रज्ञ निर्मित कृत्रिम मंगळ भूमीत एक वर्षाच्या निवासासाठी चार धाडसी नागरिकांचा शुभारंभ

 CHAPEA Ingress

 नासाच्या J.PL संस्थेतील शास्त्रज्ञ निर्मित कृत्रिम मंगळ भूमीत प्रवेश करताना चार धाडसी उमेदवार -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -10 जुलै

सध्या नासाचे Curiosity मंगळयान व Perseverance मंगळयान मंगळावर यशस्वी संशोधन करत आहेत  Perseverance यानासोबत मंगळावर पोहोचलेल्या Ingenuity mars Helicopterने देखील नुकतीच तिथल्या आकाशात 50 वी यशस्वी भरारी मारून मंगळावरील महत्वपूर्ण संशोधित माहिती गोळा करून पृथ्वीवर पाठविली आहे  शिवाय भविष्यकालीन मंगळ मोहिमेत मानव निवासासाठी पृथ्वीसारख्या पोषक वातावरणाचाही शोध घेतल्या जात आहे इथे पृथ्वीवरील नासा संस्थेतही भविष्यकालीन मंगळ मोहिमेची जोरदार तयारी सुरु आहे आगामी मानवसहित मंगळ मोहिमेसाठी उपयुक्त वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत 

  Kelly Haston, CHAPEA mission 1 commander, offers final remarks alongside her crewmates (from left to right: Anca Selariu, Ross Brockwell, Nathan Jones) before entering the habitat.

 नासाच्या Mars Dune Alpha ह्या शास्त्रज्ञ निर्मित कृत्रिम मंगळभूमीत प्रवेश करण्याआधी मनोगत व्यक्त करताना कमांडर Kelly Haston ,Anca Selaria ,Ross Brockwell आणि Nathan Jones -फोटो -नासा संस्था

नासाच्या Crew Health & Performance Exploration Analog (CHAPEA) मोहिमे अंतर्गत नासाच्या J.PL lab मध्ये शास्त्रज्ञांनी कृत्रिम मंगळ भूमी निर्माण केली आहे नासाचे मंगळ मोहिमेतील अंतराळवीर प्रत्यक्ष मंगळावर जाण्याआधी आणि तिथे भविष्यकालीन मानवी वसाहत निर्माण करण्याआधी मंगळासारखे वातावरण आणि भूमी असलेल्या ह्या शास्त्रज्ञ निर्मित मंगळभूमीत राहिल्यावर मानवी शरीरावर,आरोग्यावर काय परिणाम होतो हे संशोधित करण्यासाठी हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे ह्या  प्रयोगशील उपक्रमात सहभागी होऊन ह्या कृत्रिम मंगळ भूमीत एक वर्ष राहण्यासाठी धाडसी नागरिकांना नासा संस्थेने संधी उपलब्ध केली होती ह्या अभिनव उपक्रमा अंतर्गत निवड झालेल्या चार शिकाऊ अंतराळवीरांचा समावेश असलेले तीन ग्रुप तयार करण्यात आले होते आणि त्यातीलच निवडक चार धाडसी उमेदवारांच्या पहिल्या ग्रुपला आता नासाच्या Johnson Space Center संस्थेतील मंगळासारख्या कृत्रिम  वातावरण निर्मिती केलेल्या छोट्या खोलीत एक वर्ष निवास करण्यासाठी पाठवण्यात आले आहे भविष्यकालीन मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांच्या सुरक्षित मंगळ निवासासाठी हा प्रयोग करण्यात येणार असून त्याची सुरवात आता झाली आहे 

NASA’s simulated Mars habitat includes a 1,200-square-foot sandbox with red sand to simulate the Martian landscape. The area will be used to conduct simulated spacewalks or “Marswalks” during the analog missions. 

नासा संस्थेतील शास्त्रज्ञांनी लाल वाळूचा उपयोग करून तयार केलेली मंगळासारखे वातावरण निर्मित पृथ्वीवरील कृत्रिम  मंगळभूमी -फोटो -नासा संस्था   

25 जूनला ह्या मोहिमेतील पहिल्या ग्रुप मधील कमांडर Kelly Haston  -(Research Scientist), Flight  Engineer- Ross  Brockwell-, Medical Officer -Nanthan Jones आणी Microbiologist -Anca Selariu   हे चार धाडसी निवडक उमेदवार एक वर्षाच्या वास्तव्यासाठी ह्या पृथ्वीवरील कृत्रिम मंगळ सृष्टीत गेले आहेत नासा संस्थेतील ह्या मोहिमेतील प्रमुख Grace Douglas, Director-Vanessa Weik ,Judy Hayes (Human health & Performance Director ) ह्यांच्या उपस्थितीत ह्या चार उमेदवारांना ह्या Mars Habitat मध्ये एक वर्षासाठी बंदिस्त करण्यात आले ह्या अभिनव  उपक्रमाच्या शुभारंभा आधी ह्या चार धाडसी उमेदवारांचे नासा संस्थेतर्फे स्वागत करण्यात आले आणि ह्या अभिनव प्रयोगात सहभागी होऊन त्या साठी घेतलेल्या ट्रेनिंग दरम्यानच्या अथक परिश्रमाबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले त्यांना ह्या शास्त्रज्ञ निर्मित पृथ्वीवरील कृत्रिम मंगळ भूमीतील प्रवेशासाठी आणि एक वर्षांच्या वास्तव्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आत प्रवेश करण्याआधी ह्या उमेदवारांनी देखील त्यांचे मनोगत व्यक्त केले सर्वांनीच नासा संस्थेने त्यांना हि सुवर्णसंधी दिल्याबद्दल आभार मानले ह्या मोहिमेतील सहभागी सर्वांनीच त्यांना ह्या मोहिमेसाठी ट्रेनिंग दिल्याबद्दल त्यांचेही आभार मानले शिवाय त्यांचे कुटुंबीय,मित्र प्रेरणा देणाऱ्या साऱ्यांचे  विशेष आभार मानले कुटुंबियांचे आभार मानताना, निरोप घेताना काही क्षण ते भावविवश झाले पण नंतर त्यांनी सर्वांचा निरोप घेतला नासाचा हा अभिनव उपक्रम भविष्यकालीन मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांच्या सुरक्षित मंगळ निवासासाठी आहे आणि आम्ही ह्या ऐतिहासिक मोहिमेत सहभागी होऊन संशोधन करणार आहोत ह्याचा आम्हाला अभिमान वाटत आहे आम्ही आनंदित आहोत आम्ही हि मोहीम निश्चितच यशस्वी करू असे त्यांनी सांगितले शास्त्रज्ञ निर्मित मंगळ भूमीत प्रवेश करण्याआधी ह्या मोहिमेतील प्रमुखांनी Mars Dune Alpha चे चिन्ह असलेल्या झेंड्यावर त्यांच्या सह्या घेतल्या त्या नंतर ह्या उमेदवारांनी आत प्रवेश केल्यानंतर बाहेरून दार बंद करून त्यांना बंदिस्त करण्यात आले आता मंगळ मोहिमेतील अंतराळवीरां सारखेच ते एक वर्ष पृथ्वीबाहेर राहतील 

The CHAPEA mission 1 crew poses with a flag featuring their mission patch surrounded by their signatures.

 Mars Dune Alpha-भूमीत प्रवेश करण्याआधी चौघांनी सह्या केलेल्या झेंड्यासह -फोटो -नासा संस्था

ह्या मोहिमेतील ऊमेदवार Johnson Space Center मधील 1,700 sq.foot जागेत तयार केलेल्या Mars Dune Alpha ह्या 3D printing चा वापर केलेल्या खोलीत वर्षभर राहतील ह्या चौघांसाठी सेपरेट रूम असून त्यात त्यांच्या संशोधनाचे साहित्य,मेडिकलचे साहित्य,रोबोटिक उपकरण,व्यायामासाठी,झोपण्यासाठी आणि इतर आवश्यक गोष्ठीसाठीची सोय करण्यात आली आहे ह्या एक वर्षाच्या निवासा दरम्यान ऊमेदवारांना मानसिक आणी शारिरीक दृष्ठ्या काय समस्या ऊद्भवतात त्यांच्या आरोग्यात काय बदल होतात मानवी शरीर मंगळासारख्या वातावरणाला कसे सामोरे जाते ह्याचे निरीक्षण नोंदवण्यात येणार आहे आणी त्या समस्या निवारण्यासाठी ऊपाय शोधले जाणार आहेत त्या साठी नवीन Technology शोधण्यात येईल ह्या मोहिमेचा ऊपयोग भविष्यातील मंगळ मोहिमेतील अंतराळविरांना होईल अंतराळवीर प्रत्यक्षात जेव्हा मंगळावर निवास करतील तेव्हा त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून खबरदारीचे ऊपाय शोधले जातील त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा हा प्रयत्न आहे त्यासाठीच हा मोहीम पुर्व अभिनव ऊपक्रम राबविण्यात येत आहे असे Johnson Space Center चे प्रमुख शास्त्रज्ञ म्हणतात शीवाय ह्या संशोधीत माहितीमुळे भविष्य कालीन मानवसहित मंगळ मोहिमेतील अंतराळविरांसोबत सकस अन्न आणी आवश्यक गोष्टी व सामान मंगळावर पाठवण्यास मदत होईल भविष्यात मंगळावर मानवी वसाहत निर्माण करण्याचा शास्त्रज्ञांचा विचार आहे त्या दृष्टीने हे प्रयत्न सुरू आहेत

हे धाडसी उमेदवार अंतराळवीर नसल्यामुळे ह्या निवासा दरम्यान त्यांना मंगळग्रहावरील वातावरणात रहाण्यासाठी आवश्यक ट्रेनिंग देण्यात आले होते त्यांना अंतराळवीरांसारखे झिरो ग्रॅव्हीटीत राहण्याचे आणी तेथील निवासा दरम्यान कराव्या लागणाऱ्या Space Walk,Robotic operations,Habitat Maintenance,personal hygiene ह्या गोष्टींचेही  ट्रेनिंग देण्यात आले त्या मुळे ह्या शास्त्रज्ञ निर्मित मंगळभूमीच्या बाहेरील भागात हे उमेदवार संशोधना बरोबरच अंतराळवीरांसारखा Space Walkही करणार आहेत त्या साठी त्यांना स्पेस सूटही देण्यात आला आहे शिवाय ह्या मंगळभूमीत ते धान्य,भाजी,फळे वै रोपांची लागवडही करणार आहेत त्या साठी ह्या भूमीत खास मंगळावरील लाल माती,वाळू,मिनरल्सचा वापर करण्यात आला आहे 

मंगळ ग्रह पृथ्वीपासुन दुर असल्यामुळे अंतराळविरांना तेथून पृथ्वीवर संपर्क साधताना अडचण आली किंवा काही समस्या उद्भवल्यास त्यांना त्वरीत मदत पाठवता येणार नाही त्यामुळे अशा आपद्कालीन समस्येवर  मात करण्याचे ट्रेनिंगही त्यांना देण्यात आले आहे शीवाय तेथील वातावरणातील बदलामुळे येणारा मानसिक ताण किंवा ऊपकरणात अचानक काही कठीण समस्या निर्माण झाली तर आपद्कालीन संकटांशी सामना करण्यासाठी प्रशिक्षीत करण्यात आले असून हे सर्व उमेदवार नासा संस्थेच्या संपर्कात असतील नासाच्या Artemis मोहिमेअंतर्गत मानव चंद्रावर जाणार आहे त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे आगामी काळातील भविष्यकालीन मंगळ मोहीम आणि दूरवरच्या अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांसाठी आणि मानवी निवासासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल

No comments:

Post a Comment