नासाच्या अंतराळ मोहीम 69चे अंतराळवीर Dmitri Petelin अंतराळस्थानका बाहेरील Solar Systemच्या मागील भागात Space Walk करताना -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -22जुन
नासाच्या अंतराळ मोहीम 69 चे रशियन अंतराळवीर व कमांडर Sergey Prokopyev आणी Flight engineer Dmitri Petelin ह्यांनी अंतराळ स्थानकाच्या कामासाठी 22 जुनला Space Walk केला
गुरुवारी सकाळी 10 वाजून 24 मिनिटाला हे दोन्ही अंतराळवीर Space Walk साठी स्थानकाबाहेर पडले आणी दुपारी 4 वाजून 48 मिनिटाला Space Walk पुर्ण करून स्थानकात परतले सहा तास 24 मिनिटांच्या ह्या Space Walk मध्ये ह्या अंतराळविरांनी अनेक महत्वाची कामे पुर्ण केली त्यांनी स्थानकाच्या बाहेरील Zvezda आणी Poisk Module ह्या भागात काम केले त्यांनी ह्या भागातील स्थानकात सुरू असलेल्या सायंटिफीक प्रयोगाची Packages बदलण्यासाठी काढली शिवाय स्थानकाबाहेरील भागात Communications Equipment install केले
ह्या दोन्ही अंतराळवीरांनी बुधवारीच ह्या Space Walk ची तयारी सुरु केली होती त्यांनी Space Walkसाठी लागणारे हार्डवेअर चेक करून तयार ठेवले त्यांनी त्यांचे स्पेससुट चार्ज केले त्यामध्ये लाईट्स,कॅमेरे आणी बॅटऱ्या install केल्या त्यांना ह्या कामात अंतराळवीर Stephen Bowen ह्यांनी मदत केली
ह्या Space Walk दरम्यान अंतराळवीर Sergey ह्यांनी लाल रंगाच्या रेशा असलेला Orlan स्पेससुट परीधान केला होता आणी अंतराळवीर Dmitri ह्यांनी निळ्या रंगाच्या रेशा असलेला स्पेससुट परीधान केला होता
अंतराळवीर Sergey ह्यांच्या अंतराळ कारकिर्दीतला हा सातवा Space Walk होता अंतराळवीर Dmitri ह्यांचा हा पाचवा Space Walk होता ह्या वर्षातला स्थानकाच्या कामासाठी केलेला नववा Space Walk होता आणी आजवरचा स्थानकाच्या कामासाठी केलेला हा 266वा Space Walk होता
ह्या आधी मागच्या आठवड्यात 15 जुनला आणी त्या आधी 9 जुनला स्थानकाच्या बाहेरील भागातील solar system मधील Solar Array च्या नुतनीकरणा साठी अंतराळवीर Woody Houburg आणी Steve Bowen ह्यांनी Space Walk केला होता अंतराळ स्थानकातील प्रकाशऊर्जा व सौरऊर्जा वाढविण्यासाठी हा Space Walk करण्यात आला होता
नासाच्या अंतराळ मोहीम 68चे अंतराळवीर Woody Hoburg ह्यांनी स्थानकाच्या बाहेरील Truss ह्या भागातील Space Walk दरम्यान 9 जूनला काढलेला "Space Selfie"-फोटो-नासा संस्था
9 जूनला केलेल्या Space Walk दरम्यान अंतराळवीर Woody Houburg ह्यांनी त्यांचा Space Selfie काढला होता
No comments:
Post a Comment