नासाच्या Europa Clipper अंतराळयान मोहिमेतील Message In Bottle ह्या अभियानाचे स्वरूप -फोटो नासा संस्था
नासा संस्था- 2 जून
नासा संस्थेतर्फे हौशी नागरिकांना अंतराळ मोहिमेत सहभागी करुन घेण्यासाठी नेहमीच नवनवीन अभिनव ऊपक्रम राबवीले जातात त्याच मोहिमे अंतर्गत नासा संस्थेने गुरु ग्रहावर हौशी नागरिकांना त्यांची नावे पाठविण्याची संधी जाहीर केली आहे
नासा संस्थेचे Europa Clipper हे अंतराळयान 2024 मध्ये गुरु ग्रहावर जाणार आहे गुरु ग्रहाच्या Europa ह्या चंद्रावर शास्त्रज्ञांना बर्फाचा सागर आढळला तेव्हा पासुनच शास्त्रज्ञांना तेथे सजीवांचे अस्तित्व आहे का?किंवा पुरातन काळी होते का ?हे जाणून घेण्याची ऊत्सुकता होती आता त्या बाबतीत अधिक संशोधन करण्यासाठी Europa Clipper अंतराळयान गुरु ग्रहावर जाणार आहे आणी Europa ह्या गुरू ग्रहाच्या चंद्रावर आधळलेल्या समुद्राच्या तळाशी सजीव सृष्ठीचे अस्तित्व आहे का ह्याचा शोध घेतला जाणार आहे
ह्या यानासोबत U.S.मधील पुरस्कार प्राप्त नामांकित कवियत्री Laureate Ada Limons ह्यांची कविताही पाठवण्यात येणार आहे Europa Clipper Mission वर त्यांनी हि कविता लिहिली आहे ह्या कवितेसोबतच सहभागी नागरीकांची नावे देखील गुरु ग्रहावर पाठविण्यात येणार आहेत एका मायक्रोचीपवर स्टेन्सीलच्या स्वरूपात कोरलेली कविता व हि नावे यानाला जोडली जातील आणी यानासोबत गुरू ग्रहावर पोहोचतील ह्या अभियानात सहभागी होण्यासाठी नागरिकांना आधी Laureate Ada Limion ह्या कवियित्रीची In Praise Of Mystery-A Poem for Europa हि कविता ऐकावी किंवा वाचावी लागेल कवियत्री Laureate ह्यांनी जानेवारीत नासाच्या J PL Lab ला भेट दिली होती तेव्हा Europa Clipper पाहून त्या प्रेरित झाल्या आणि त्यांनी हि कविता सुचली
नागरिकांना ह्या मोहिमेत सहभागी झाल्यानंतर त्यांचा फोटो आणी सहभागी झाल्यानंतरचे त्यांचे नाव सोशल मिडियावरुन शेअर करून त्यांचा आनंद व्यक्त करण्याची संधीही जाहीर करण्यात आली आहे डिसेंबर पर्यंत नागरिक ह्या अभियानात सहभागी होऊ शकतील नासा संस्थेतील Associate administrator Nicola Fox म्हणतात. "Message in Bottle म्हणजे सायन्स.कला आणी आधुनिक तंत्रज्ञान ह्यांचे ऊत्कृष्ट ऊदाहरण आहे नासा संस्थेने जगभरातील नागरिकांना ह्या अभियानात सहभागी होण्याची आणी त्यांच्या भावना शेअर करण्याची सुवर्णसंधी दिली आहे त्यांच्या नावांना गुरूग्रहावर जाण्यासाठी आणि रोमांचक अंतराळप्रवास करण्याची संधी मिळणार आहे मला तर आपल नाव अंतराळयाना सोबत अंतराळप्रवास करून सौरमालेतील परग्रहावर पोहोचणार आहे आणि तिथल्या Europa ह्या चंद्रावरील गोठलेल्या सागराचा शोध घेताना पहाणार आहे हा विचारच रोमांचक वाटतो !"
Message In Bottle हे अभियान नासाच्या इतर मोहिमे सारखेच आहे आता पर्यंत अशा मोहिमे अंतर्गत सहभागी दहा मिलियन लोकांनी त्यांची नावे Artemis -1 आणि वेगवेगळ्या मंगळ यानासोबत परग्रहांवर पाठविली आहेत आणि त्यांच्या नावांनी यानासोबत अंतराळप्रवास देखील केला आहे आपल्या सौरमालेत आणि त्या बाहेरील जगातील अज्ञात अशा आपल्या सारख्या सजीव सृष्टीचा शोध घेण्यासाठी,त्यांना प्रेरित करण्यासाठी आणि त्यांच्याशी संपर्क करण्यासाठी नासा संसंस्थेतर्फे असे अभियान राबवले जातात नासाच्या Voyager Golden Record मोहिमेत एका कॅप्सूल मध्ये पृथ्वीवरील मानवाचे विविध आवाज टेप करून आणि मानवाची आकृती असलेले चित्र पाठविण्यात आले होते ते पाहून पृथ्वीवरील सजीवांबद्दल माहिती होईल आणि जर कुठे आपल्या सारखे सजीवांचे अस्तित्व असेल तर ते आपल्याशी संपर्क साधु शकतील
सौर मालेतील सोलर सिस्टमचा शोध घेण्यासाठी ज्यांनी हाताने मोठे अंतराळयान बनविले त्या नासा संस्थेतील तंत्रज्ञ,शास्त्रज्ञ ,इंजिनीअर्स आणि टीममधील सर्वांना प्रेरणा देण्यासाठी,जगभरातील लोकांना मानवतेचा संदेश देण्यासाठी आणि त्यांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी हि मोहीम राबविण्यात येते असे नासाच्या California -(J PL) संस्थेतील Director Laurie Leshin म्हणतात ह्या प्रत्येक नावाच्या अंतराळ प्रवासा सोबत Inspiration अंतराळ प्रवास करेल आणि गुरूचा चंद्र Europa वर पोहोचेल
सध्या नासाच्या California येथील J.PL Lab संस्थेत Europa Clipper यानाची फायनल तयारी होत आहे हे अंतराळयान फ्लोरिडा येथून 2024 मध्ये गुरु ग्रहांच्या दिशेने अंतराळ प्रवासास निघेल आणि 2030 मध्ये गुरु ग्रहावर पोहोचेल गुरु ग्रहावर हे अंतराळयान पन्नास वेळा ग्रहाभोवती परिक्रमा करेल आणि त्या दरम्यान तेथील 8000,000k.m.अंतर पार करेल ह्या यानातील अत्याधुनिक सायंटिफिक उपकरणाच्या साहाय्याने गुरु ग्रहाचा पृष्ठभाग आणि वातावरणाची माहिती गोळा केली जाईल तसेच Europa वरील गोठलेला सागर ,बर्फाची खोली आणि सागराच्या तळाच्या खोलवरच्या पुरातन सजीव सृष्ठीच्या अस्तित्वाचा शोध घेईल Europa Clipper अंतराळ यान भविष्यकालीन मानवी अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांसाठी गुरु ग्रहावरील पृथ्वीसारख्या पोषक वातावरणाचा देखील शोध घेईल आणि गोळा केलेली संशोधित माहिती पृथ्वीवर पाठवेल
No comments:
Post a Comment