Blue Origin कंपनीच्या Moon Lander चे नियोजित मॉडेल -फोटो -नासा संस्था
नासा संस्था- 26 जून
नासा संस्थेने आर्टिमस V मोहिमेसाठी Moon Lander बनविण्यासाठी Blue Origin कंपनीची निवड केली आहे नासा संस्थेतर्फे Artemis मोहिमेतील सहभागी अंतराळविरांची निवड झाल्यानंतर आता भविष्यकालीन मोहीमेची तयारीही सुरू आहे मागच्या महिन्यात नासा संस्थेने Artemis V मोहिमेसाठी Moon Lander बनविण्यासाठी Blue Origin कंपनीची निवड केली आहे ह्या आधी Space X कंपनीची निवड करण्यात आली होती ह्या दोन्ही कंपन्या आता Artemis मोहिमेसाठी Moon Lander ची निर्मिती करणार आहेत
Artemis V मोहिमे अंतर्गत अंतराळवीर चंद्रावर जाणार आहेत आणी चंद्रभुमीवरील South Pole ह्या भागात आठवडाभर राहून तेथे सायंटिफीक प्रयोग व संशोधन करणार आहेत ह्या अंतराळविरांच्या चंद्राच्या कक्षेतील अंतराळ प्रवासासाठी आणी चंद्रभुमीवर ऊतरण्यासाठी Moon Lander ची आवश्यकता आहे त्या साठी नासा संस्थेने अंतराळ विश्वातील व्यावसायिक कंपन्यांना Lander निर्मितीची संधी दिली होती त्याच मोहिमे अंतर्गत आधी Space X आणी आता Blue Origin ह्या कंपन्यांंची निवड करण्यात आली आहे
ह्या Moon Lander चे डिझाईन नासा कंपनीच्या अपेक्षा पुर्ण करणारे असावे हि प्रमुख अट आहे Moon Lander ची निर्मिती करताना त्याची रचना अंतराळयानाचा आकार,रूंदी आणी सुरक्षितेचा विचार केला जाईल गरज पडल्यास व अंतराळविरांची संख्या वाढल्यास त्यांना बसण्यासाठी Lander मध्ये जास्त जागा असावी मिशनचा दिर्घ कालावधी आणी भविष्यकालीन मोहिमेत चंद्रावर पृथ्वीवरुन सामान नेण्या,आणण्याची सोय असणे आवश्यक आहे शीवाय अंतराळ प्रवासादरम्यान अंतराळविरांच्या आवश्यक सोयीची पूर्तता आणि आरामदायी प्रवास घडवणारे असावे ह्या Lander मध्ये चंद्रावरील सुरक्षित मानवी Landing System ची आवश्यकता पुर्ण करण्याची क्षमता असावी भविष्य कालीन अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांना तेथील स्पेस स्टेशन मध्ये प्रवेश करण्यासाठी Docking ची सोय असणे अपेक्षित आहे 2029 मध्ये Artemis V मोहिमेतील अंतराळवीर चंद्रावर जाणार आहेत Moon Lander साठी नासा संस्थेतर्फे 3.4 बिलियन डॉलर खर्च मंजूर करण्यात आला आहे हे Moon Lander मजबूत,सुरक्षित आणी भविष्यकालीन मोहिमेतील अंतराळविरांना नियमित सेवा देण्यायोग्य असायला हवे असा करार नासा संस्थेतर्फे करण्यात आला आहे
नासाचे Administrator Bill Nelson म्हणतात,ह्या दुसऱ्या कंपनीची निवड करताना आम्ही ऊत्साहित झालो आहोत सध्या अंतराळ विश्वातील मानवी अंतराळ मोहिमेतील अंतराळविरांसाठी सुवर्णयुग आहे नासा आणी आमचे व्यावसायिक भागीदारांनी मिळुन हे शक्य केले आहे भविष्यकालीन मंगळ मोहीम आणी दुरवरच्या अंतराळमोहिमेतील अंतराळविरांना मंगळावर ऊतरण्यासाठीची हि पहिली पाऊलवाट आहे म्हणून आम्ही ह्या मोहिमेत Investment करत आहोत
Artemis V मोहिमेतील अंतराळवीर S.LS Rocket च्या सहाय्याने Orion अंतराळयानातुन चंद्राच्या कक्षेत प्रवेश करतील अंतराळवीर चंद्रावर पोहोचले आणी चंद्रभुमीवर ऊतरले कि,अंतराळयानातील चार अंतराळवीरांपैकी दोन अंतराळवीर Blue Origin कंपनीने निर्मित केलेल्या Moon Lander मध्ये प्रवेश करतील आणी एक आठवड्यासाठी चंद्रावरील दक्षिणेकडील भागात जातील आणी तेथील भविष्यकालीन मानवी मोहिमेतील अंतराळवीरांना रहाण्यासाठी जागा आणी पोषक वातावरण शोधतील शिवाय चंद्रावरील मानवाला अज्ञात असलेली माहिती गोळा करतील आणी सायंटिफिक संशोधन करतील
नासाच्या मार्शल स्पेस फ्लाईट सेंटरच्या Alabama येथील Manager Lisa Watson म्हणतात,"Artemis मोहिमेसाठी Moon Landerची निर्मिती करण्यासाठी नासा संस्थेने दोन कंपन्यांची निवड केली आहे त्या मुळे दोन नाविन्यपूर्ण,अद्ययावत अंतराळविरांच्या सुरक्षिततेचा आणी सोयीचा विचार करुन त्यांना आरामदायी अंतराळप्रवास घडविणारे Lander तयार होतील दोन कंपनीत व्यावसायिक स्पर्धा असल्याने दर्जा सुधारेल आणी नाविन्यपूर्ण डिझाईन पहायला मिळेल आणी मुख्य म्हणजे किंमत कमी होईल आणी टॅक्समध्ये बचत होईल
Blue Origin कंपनी आधी Landerचे डिझाईन बनवेल त्या नंतर नासा संस्थेतील तज्ञांची टिम Landerची सुरक्षितता,क्षमता आणी आवश्यक बाबींची पुर्तता चेक करतील त्या नंतर आधी मानव विरहित Lander टेस्टींग साठी चंद्रावर पाठवले जाईल त्यासाठी मानव विरहित टेस्टसाठी Lander डिझाईन करावे लागेल
No comments:
Post a Comment