Friday 30 December 2022

शाब्दिक ऊचलेगीरी वाढली

 सध्या सर्वत्र चोऱ्यांच प्रमाण वाढतच चाललय रोजच्या चोऱ्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत सर्वत्र भ्रष्टाचार वाढलाय मग ते कुठलही क्षेत्र असो कारण कायद्याचा,पोलीसांचा वचकच राहिला नाही !

हल्ली शाब्दिक ऊचलेगीरी पण वाढलीय एखाद्याचा लेख,बातमी वा ब्लॉगवरील ईतर साहित्य प्रकाशीत होताच त्यातले शब्द ऊचलेगीरी करून सर्रासपणे वापरले जातात तो शब्दवापर जीथे वापरलाय तिथे   योग्य ठरतो की नाही हेहि त्यांना समजत नाही कारण शब्दाचा अर्थच व तो कुठे,कोणासाठी योग्य ठरतो हे कळण्याची बुद्धी कमी असते म्हणून मग काही ऊचलेगीरी करणाऱ्यांच हस होत आणी विषेश म्हणजे हे साहित्य खालीपासून वरपर्यंत ऊचलेगीरी करून वापरल जात अशी लाँबीच सध्या सक्रीय झाली आहे 

काँपीराईट अँक्ट नुसार अशा साहित्य ऊचलेगीरी करणाऱ्यास दंड केल्या जातो पण काँपीराईट असुनही हे सर्रासपणे कसे घडते ? त्याचे पैसे संबंधीत लेखकाला का मिळत नाहीत ,कोठे जातात? कोण घेत? हे त्यांना कळायला हव आणी अशांना वेळीच समज देणे आवश्यक आहे 

कोणाचेही साहित्य सोशल मिडिया कींवा ईतरत्र वापरताना त्यांचे नाव छापणे परवानगी घेणे आवश्यक आहे पण असे ह़ोत नाही अर्थात ऊचलेगीरी करणाऱ्यांंचच हस होत म्हणून स्वतःचे शब्द वापरा ऊगाच ऊचलेगीरी करु नका म्हणजे हस होणार नाही आणी अर्थाचा अनर्थही होणार नाही

Thursday 29 December 2022

मंगळावरील आकाशात Ingenuity Mars helicopter चे 38 वे ऊड्डाण

  Image taken by Ingenuity Helicopter on Mars

           मंगळावरील आकाशात उड्डाण करताना Ingenuity Mars Helicopter -फोटो -नासा संस्था

 नासा संस्था -

Ingenuity Mars हेलिकॉप्टर Perseverance मंगळयानासोबत मंगळावर गेले होते तेव्हापासून तेथील आकाशात ऊड्डाण करत आहे ऊड्डाणादरम्यान Ingenuity हेलिकॉप्टर आसपासच्या भागाचे निरीक्षण नोंदवून तेथील फोटो व माहिती गोळा करुन Perseverance यानाला संशोधनात मदत करत आहे Perseverance टीममधील शास्त्रज्ञांना  Ingenuity हेलिकॉप्टर एक वर्षे कार्यरत राहील अशी अपेक्षा होती कारण मंगळावरील वातावरण अत्यंत क्षीण आहे अशा वातावरणात ऊड्डाण करणे कठीण जाते पण तेथील प्रतिकुल वातावरणात अजूनही Ingenuity हेलिकॉप्टर सतत ऊड्डाण करत आहे आणी आधीपेक्षा जास्त ऊंचीवर पोहोचुन शास्त्रज्ञांना आश्चर्यचकीत करत आहे 

24 डिसेंबरला Ingenuity मंगळयानाने मंगळावरील आकाशात 38 वी यशस्वी भरारी मारली आहे ह्या ऊड्डाणा दरम्यान हेलिकॉप्टरने 68 सेकंदात 53 फुट ऊंचीवरून मंगळभुमीवरील  344 feet अंतर पार केले ह्या वेळेस हेलिकॉप्टरचा वेग ताशी 8mph ईतका होता मंगळावरील Jezero Crator ह्या भागातील आकाशात हेलिकॉप्टरने हे 38 वे यशस्वी ऊड्डाण केले आहे

Wednesday 28 December 2022

 नासाच्या Perseverance मंगळयानाने मंगळभूमीवर पहिली सॅम्पलची ट्यूब ठेवली

  NASA’s Perseverance rover deposited the first of several samples onto the Martian surface

 नासाच्या Perseverance यानाने 21 डिसेंबर 2022ला मंगळावरील 653व्या मंगळदिवशी मंगळभूमीवर ठेवलेली  नमुन्याची ट्युब -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -22डिसेंबर

नासाच्या  Perseverance मंगळयानाने मंगळ भूमीवर पहिली खडकाचे नमुने भरलेली ट्यूब ठेवली  मंगळावरील आणि भूगर्भातील जमीन खोदून त्यातील खडक,माती आणि वाळू ह्यांचे नमुने यानातील Titanium ट्युब मध्ये भरण्याचे काम सध्या Perseverance यान करत आहे पहिल्या टप्प्यात येत्या दोन महिन्यात दहा ट्यूबमध्ये हे नमुने  भरले जाणार आहेत त्यातीलच एक खडकाच्या नमुन्याने भरलेली ट्युब मंगळावरील भूमीवर व्यवस्थित ठेवण्यात Perseverance यानाला यश आले आहे मंगळावरील,"Three Fork " ह्या भागात हे काम सुरु आहे 

नासा संस्थेच्या परग्रहावरील भूमीवरील नमुने गोळा करून ट्युब मध्ये भरून पृथ्वीवर परत आणण्याआधी तेथील भूमीवर जमा करून ठेवण्याच्या कामाचा हा ऐतिहासिक प्रारंभ आहे भविष्यकालीन मंगळ मोहिमेत ह्या जागेचा ऊपयोग डेपोसारखा होईल शास्त्रज्ञांच्या अपेक्षेनुसार ह्या मोहिमेत Perseverance यानाने आजवर 17नमुने गोळा केले असून त्यात मंगळावरील वातावरणातील नमुन्यांचा समावेश आहे ट्यूबमध्ये Perseverance यानाने जमा केलेल्या नमुन्यातील थोडे नमुने ट्युबमध्ये भरले जातील आणी थोडे यानातच ठेवले जाणार आहेत 

Perseverance यानाने मंगळभूमीवर ठेवलेल्या ह्या पहिल्या ट्यूब मधील हा नमुना Igneous खडकाचा असून तो लहान खडूच्या आकाराचा आहे ह्या टीममधल्या शास्त्रज्ञांनी ह्या खडकाला "Malay"असे नाव दिले आहे हा पहिला नमुना 31जानेवारी 2022 मध्ये Pereverance यानाने मंगळावरील Jezoro Crater ह्या भागातील South Seitah येथुन गोळा केलेला आहे 

विशेष म्हणजे हे नमुन्याने भरलेली ट्यूब जमिनीवर ठेवण्याचे काम Perseverance यान बनविणाऱ्या ह्या टीममधील  इंजिनीअर्स मार्फत केले गेले नाही तर यानाने स्वयंचलित यंत्रणेमार्फत हे काम पूर्ण केले जेव्हा हे काम यशस्वीरीत्या पार पडले तेव्हा ह्या मोहिमेतील टीम सतर्क झाली त्यांनी यानावर बसविलेल्या WHTSON कॅमेऱ्यावर लक्ष केंद्रित केले हा कॅमेरा यानाच्या सात फूट लांब रोबोटिक आर्मवर शेवटच्या टोकावर बसविण्यात आला आहे Perseverance यानाने गोळा केलेल्या नमुन्यांची ट्युब यानाच्या चाकात न अडकता व्यवस्थित जमिनीवर ठेवली गेली कि नाही हे पाहण्यासाठी हा कॅमेरा यानावर बसविण्यात आला आहे आणि टिमच्या अपेक्षेनुसार यानाच्या ह्या स्वयंचलित यंत्रणेमार्फत नमुन्याची ट्युब जमिनीवर उभी न राहता व्यवस्थित ठेवली गेली ह्या ट्यूब व्यवस्थित जमिनीवर ठेवल्या गेल्यामुळे आता नमुन्यांची ट्यूब रोबोटिक आर्मच्या सहाय्याने ऊचलुन रोबोटिक Lander मध्ये ठेवताना न अडकता व्यवस्थित ठेवल्या जाईल

Perseverance यानाने गोळा केलेल्या नमुन्यांच्या ह्या ट्यूब यानाला बसविलेल्या रोबोटिक आर्मच्या साहाय्याने Robotic Lander मध्ये ठेवण्यात येतील त्या नंतर पृथ्वीवर हे नमुने आणण्यासाठी पाठविण्यात आलेल्या दोन रॉकेट मधील Containment ट्युब मध्ये रोबोटिक आर्मच्या साहाय्याने नमुन्यांच्या ट्युब्स भरण्यात येतील नासाने बनविलेले हे रॉकेट प्रथमच परग्रहावर म्हणजे मंगळावर प्रज्वलित होऊन उड्डाण करेल त्या नंतर पृथ्वीवरून मंगळावर हे नमुने आणण्यासाठी पाठविण्यात आलेल्या अंतराळयानात हे Container ठेवण्यात येतील जर काही कारणामुळे अडचण आली आणि मंगळयान हे नमुने पाठवू शकले नाही तर दोन Sample Recovery Helicopters मार्फत हे काम पूर्ण केल्या जाईल  

मंगळावरील यानाने जमा केलेले खडकांचे आणि इतर नमुने ट्युब मध्ये भरून ती ट्युब जमिनीवर ठेवलेली पाहणे हे आमच्या टीमचे प्रमुख उद्दिष्ट साध्य झाले आहे हे काम सहा जानेवारीला संपेल उरलेले काम पूर्ण झाले की ह्या मोहिमेतील हा पहिला टप्पा संपेल असे नासाच्या J.PL Lab मधील Perseverance यानाच्या टीमचे Deputy Project Manager, Rick Welch म्हणतात 

मंगळावरील पुरातन सजीव सृष्टीच्या अस्तित्वाला दुजोरा देणारे मंगळावरील वातावरणातील व भूगर्भातील  पुरावे गोळा करण्यासाठी Perseverance यान मंगळावर गेलॆ आहे

Friday 23 December 2022

नासाच्या Insight मंगळयानाचे काम थांबणार

  An image of the final selfie taken by NASA's InSight Mars lander on April 24, 2022,. The lander is covered with a lot of dust than it was in its first selfie, taken in December 2018.

Insight मंगळ यानाने मंगळावरील 1,211व्या दिवशी 24 एप्रिल 2022 ला मंगळावरील धुली वादळाच्या दिवसात पाठवलेला Selfie ह्या फोटोत मंगळ यानावर साचलेली धूळ दिसत आहे -फोटो -नासा संस्था

नासा संस्था-21 डिसेंबर

नासाचे Insight मंगळयान चार वर्षांच्या यशस्वी कारकिर्दी नंतर आता रिटायर्ड होणार आहे चार वर्षांपूर्वी मंगळावर पोहोचलेल्या मंगळयानाने मंगळभुमीवरील व भुगर्भातील अत्यंत महत्वपूर्ण संशोधीत माहिती गोळा करून पृथ्वीवर पाठवीली आहे 

नासा संस्थेच्या South California येथील J.PL lab मधील Insight मंगळयानाच्या मिशन कंट्रोलरनी दोनवेळा प्रयत्न करूनही यानाशी संपर्क होऊ शकला नाही तेव्हा यानावर बसविण्यात आलेल्या सौरपॅनल मधून पुरेशी ऊर्जानिर्मिती होत नसल्याने यानातील सौरऊर्जेवर चालणाऱ्या बॅटऱ्या क्षीण झाल्याचे त्यांच्या लक्षात आले ह्या आधीच नासा संस्थेने यानाशी दोनवेळा प्रयत्न करुनही संपर्क होऊ शकला नाही तर हे मिशन थांबवण्याचा निर्णय घेतला होता 15 डिसेंबरला यानाशी शेवटचा संपर्क झाला होता पण आता मात्र संपर्क होत नसल्याने अखेर हे मिशन थांबविण्याचा  निर्णय घेण्यात आला हे मिशन थांबले तरीही ह्या टिममधील कंट्रोलर यानाच्या सतत संपर्कात रहाण्याचा प्रयत्न करतील व सिग्नल येण्याची वाट पहातील

नासाच्या Washington येथील Assistant Administrator Thomas Zurbuchen म्हणतात,"आम्ही Insight यानाचे पृथ्वीवरून मंगळावर जातानाचे Launching आणी मंगळग्रहावर पोहोचल्या नंतर तेथील भूमीवरच्या Landingचे थरारक क्षण अनुभवले आहेत त्यामुळे हे मिशन थांबविण्याचा निर्णय घेताना आम्हाला वाईट वाटत आहे ह्या यानाने चार वर्षात अत्यंत महत्वपुर्ण माहिती गोळा केली आहे मंगळावरील भुकंप विषयक माहिती पुढील संशोधनासाठी तर ऊपयोगी पडेलच पण पृथ्वीसाठीही हि माहिती ऊपयुक्त ठरेल

Insight मंगळयान 2018 मध्ये मंगळ ग्रहावरील व भुपृष्ठाखालील माहिती गोळा करण्यासाठी मंगळावर पोहोचले होते  मंगळावरील जमीन खोदून भुगर्भातील(Core  भागातील) खडकांचे प्रकार,लेयर्स,खोली,भुकंप प्रवण क्षेत्र ,ऊष्णता वाहक क्षेत्र शोधून तेथील संशोधित माहिती गोळा करणे आणि तेथील तापमान आणी तीव्रता मोजणे हे Insight यानाचे मुख्य ऊद्दिष्ठ होते 

French Space Agency (CNES)आणी E.TH  Zurich ( Marsquake service) ह्यांच्या सहयोगाने बनविलेल्या यानातील अत्यंत संवेदनशील Seismometer च्या सहाय्याने Insight यानाने चार वर्षात भूगर्भातील नियमित निरीक्षण नोंदवून मंगळावर झालेल्या 1,319 भुकंपाची नोंद केली ह्या भूकंपाचे फोटो आणी लाईव्ह व्हिडीओही पृथ्वीवर पाठवले त्यामुळे पृथ्वीवासीयांना मंगळावरील भुकंपाची तीव्रता व आवाज ऐकता आला 

ह्या संशोधीत माहितीचा ऊपयोग मंगळग्रहावरील भुगर्भातील Core भागातील लेअर निर्मितीचा काळ समजण्यासाठी होईल नासाच्या अपोलो मोहिमेनंतर प्रथमच पृथ्वीबाहेरील परग्रहावर भुकंपमापन यंत्र नेण्यात आले होते ह्या आधी अपोलो मोहिमेत  पहिल्यांदा अंतराळवीरांनी चंद्र ग्रहावर भुकंपमापन यंत्र नेले होते

Insight मंगळयानात Mole नावाचे एक Self-Hammering Spike  बसविण्यात आले होते आणी त्याला सेंसरयुक्त एक तार जोडण्यात आली होती मंगळयानाने रोबोटिक आर्मला जोडलेल्या Hammer च्या सहाय्याने मंगळावरील भुभाग खोदुन तारेला जोडलेल्या सेंसरच्या मदतीने भुगर्भातील ऊष्णता आणी खोली मोजली आणि हि संशोधित माहिती पृथ्वीवर पाठविली ह्या टिममधील शास्त्रज्ञांना ह्या Hammering Spike च्या साहाय्याने तेथील 16 फुट (5मीटर) खोल जमीन खोदणे अपेक्षित होते पण मंगळावरील भुभाग ईतर ग्रहावरील जमीनी प्रमाणे,भुसभुशीत रेताळ नसल्याने तेथील खडकाळ भुभागात  Hammer रूतवुन भुगर्भातील खडक खोदणे Insight यानाला शक्य झाले नाही त्यामुळे Hammer अपेक्षित भागापर्यंत पोहोचू शकले नाही आणि कार्यरत होऊ शकले नाही यानातील Hammer Spike फक्त भुगर्भातील 16 ईंच खोल भागापर्यंत खोदु शकले पण तोवर यान त्या भागातील खडक,लेयर्स आणी तेथील तापमानाची नोंद करण्यात यशस्वी ठरले होते त्यामुळे हे कार्य थांबविण्यात आले मात्र Insight मंगळ यानाला बसविलेल्या रोबोटिक आर्म आणि स्कुपच्या साहाय्याने मंगळ ग्रहांवरील वादळी दिवसात सौर पॅनलवर साचलेली धूळ काढण्यात यान यशस्वी ठरलेपण आता मात्र सौर पॅनल वर पुन्हा धूळसाचल्याने यानातील सौरऊर्जेवर चालणाऱ्या बॅटऱ्या क्षीण झाल्या आहेत

नासाच्या J.PL Lab चे Principal Investigator Bruse Banerdt म्हणतात," गेल्या चार वर्षात Insight आमचा मंगळावरील मित्र झाला होता जो आम्हाला तेथील संशोधित माहिती नियमित पाठवत होता त्या मुळे त्याला "Good bye!" म्हणताना जड जात आहे पण ह्या यानाने चार वर्षात त्याचे मूळ उद्दिष्ट साध्य केले आहे त्याने संशोधित केलेली माहिती युनिक आणि महत्वपूर्ण आहे 

नासाच्या J.PL Lab मधील Director Laurie Leshin ह्यांनी देखील असेच मत व्यक्त केले ते म्हणतात ," Insight मंगळ यान नावाप्रमाणेच यशस्वीपणे चार वर्षे कार्यरत राहिले त्याने मंगळावरील अत्यंत दुर्मिळ माहिती गोळा केली त्या साठी जगभरातील ह्या टीममधील सर्वांचे आभार ज्यांनी हे मिशन यशस्वी व्हावे म्हणून प्रयत्न केले खरोखरच हे मिशन थांबवताना Insight यानाला "Good Bye"! म्हणताना वाईट वाटतेय पण त्याचे कार्य सगळ्यांच्या सतत लक्षात राहील प्रेरणादायी ठरेल !"

Friday 16 December 2022

नासाची Artemis -1मोहीम यशस्वी Orion अंतराळयान चंद्रावरून पृथ्वीवर परतले

 NASA's Orion spacecraft shown splashing down in the Pacific Ocean, west of Baja California, at 9:40 a.m. PST Sunday, Dec. 11.

 नासाचे Orion अंतराळयान चंद्रावरून पृथ्वीवर परतल्यावर California येथील पॅसिफिक महासागरात खाली उतरताना -फोटो नासा संस्था

 नासा संस्था-11डिसेंबर

नासाच्या Artemis-1मोहिमेअंतर्गत चंद्रावर गेलेले Orion अंतराळयान पृथ्वीवर परतले रविवारी 11तारखेला California येथील पश्चिमेकडील भागातील पॅसिफिक महासागरात ते सुखरूप खाली ऊतरले Orion अंतराळयान 16 नोव्हेंबरला Florida येथील केनेडी स्पेस सेंटरमधील 39B ह्या ऊड्डाण स्थळावरुन चंद्रावर जाण्यासाठी अंतराळात झेपावले होते आता 25.5 दिवसानंतर मोहीम यशस्वी करून पृथ्वीवर परतले नासा संस्थेने पन्नास वर्षांनी पुन्हा सुरु केलेल्या ह्या Artemis 1 च्या यशाने ईतिहासाची पुनरावृत्ती केली ह्या आधी 11डिसेंबर 1972 मध्ये अपोलो 17 मोहिमेअंतर्गत अंतराळवीर Eugene Cernen आणी अंतराळवीर Harrison Schmitt हे अंतराळवीर चंद्रावर पोहोचले होते आणी चंद्रभुमीवर पाऊल ठेवणारे बारावे अंतराळवीर ठरले होते तेथे त्यांनी तीन दिवस व्यतीत केले होते नंतर हि मोहीम थांबविण्यात आली होती 

NASA's Orion spacecraft splashed down in the Pacific Orion at 12:40 p.m. EST Dec. 11, 2022.

          नासाचे  Orion अंतराळयान पॅसिफिक महासागरात उतरल्यानंतर फोटो -नासा संस्था

Artemis -1 च्या यशाने नासा संस्थेतील ह्या टिम मधील सर्वजण आनंदित झाले आहेत नासाचे Administrator Bill Nelson हे देखील आनंदित झाले आहेत ते म्हणाले,"Artemis मोहिमेला मिळालेले हे यश अंतराळविश्वातील दुरवरच्या अंतराळ मोहिमेला प्रेरित करणारे आहे ह्या टिममधील हजारो कर्मचारी,ईंजीनिअर्स,तंत्रज्ञ,शास्त्रज्ञ ह्यांनी अनेक वर्षे ह्या मोहिमेत स्वतःला झोकून देऊन अथक परीश्रम केले त्यांच्या प्रयत्नांना व असामान्य कर्तृत्वाला मिळालेले हे यश आहे नासा संस्थेतील सहकारी देश आणी एकत्रित मानवी प्रयत्नांना मिळालेले हे यश आहे आगामी दुरवरच्या अंतराळमोहिमेचा हा शुभारंभ आहे ब्रह्मांडातील दूरवरच्या मानवाला अज्ञात असलेल्या गोष्टीपर्यंत पोहोचण्यासाठी असे एकत्रित प्रयत्न ऊपयुक्त ठरतील

ह्या मोहिमेदरम्यान Orion अंतराळ यानाने चंद्रावरील कक्षेत 80 मैल अंतरावर प्रवेश केला.आणी 270,000मैलाचा अंतराळ प्रवास केला ह्या अंतराळ यानातुन अंतराळवीरांना पाठवण्या ऐवजी  मानवी डमींना पाठविण्यात आले होते  चंद्रप्रवासादरम्यान मानवी अवयवांवर काय परिणाम होतो हे  पहाण्यासाठी त्यांना सेन्सर्स बसविण्यात आले होते

नासाचे Associate Administrator Jim Free म्हणतात,आता Orion अंतराळयान चंद्रावर जाऊन सुरक्षीत पृथ्वीवर परतल्यामुळे Artemis -2 मोहिमेतील अंतराळवीरांचा चंद्रावर जाण्याचा मार्ग सुरक्षित झाला आहे ह्या यशानंतर आता मानवी चंद्रमोहिमेचा शुभारंभ तर होईलच शिवाय तेथील सायंटिफिक शोध मोहिमेची देखील सुरूवात होईल आणी आगामी काळातील मंगळ मोहिमेसाठीही ह्याचा ऊपयोग होईल 

पृथ्वीच्या कक्षेत शिरण्याआधी Orion अंतराळयान Service Module पासुन वेगळे झाले ह्या प्रक्रीयेच्या वेळी पृथ्वीवरील E.SA संस्थेतील पॉवर हाऊस मधील ईंजीनिअर्सच्या टिमने सहकार्य केले Orion यान पृथ्वीच्या कक्षेत पुन्हा प्रवेश करण्याआधी यानाचे तापमान 5,000 degree Fahrenheit एव्हढे प्रचंड होते पण 20 मिनिटे आधी यानाने हळूहळू तापमान कमी केले यानाचा वेगही 25,000 mph ईतका होता पण यानाने वेगावर नियंत्रण मिळवत पॅराशूटच्या सहाय्याने समुद्रात ऊतरण्यासाठी वेग 20mph ईतका कमी केला 

ह्या मोहिमेतील Orion यान आजवर चंद्रावर गेलेल्या यानापेक्षा जास्तकाळ चंद्रावर राहिले तेही कुठल्याही स्पेस स्टेशनमध्ये न थांबता कार्यरत राहून यानाने हि मोहीम यशस्वी केली त्या साठी ह्या आधीच्या अपोलो 13 मोहिमेतील अंतराळ यानापेक्षा वेगळे Orion यानाचे विषेश डिझाईन तयार करण्यात आले होते 

आर्टिमस 1मोहिमेचे मॅनेजर Mike Sarafin म्हणतात,"आता Orion अंतराळयान चंद्रावर जाऊन पृथ्वीवर सुरक्षित परतले आहे आमच्या अपेक्षेप्रमाणे यानाने समुद्रात सुरक्षित बुडी देखील मारली आणी यानाने चंद्रावरील कठीण वातावरणात टिकाव धरला शिवाय यानाने परत पृथ्वीच्या कक्षेत शिरण्याआधी वेगावर नियंत्रणही मिळवले

Orion यान समुद्रात ऊतरण्याआधी तेथे नासा संस्थेची landing recovery team हजर होती त्यामध्ये US department of defense Navy amphibious specialists ,Space Force Weather specialist आणी Airforce Specialist तसेच Huston येथील नासा संस्थेतील ईंजीनिअर्स आणी टेक्नीशीयन्सचा समावेश होता 

आता लवकरच Orion यानाला ट्रक मधून नासा संस्थेच्या Kennedy Space Center मध्ये नेण्यात येईल त्यानंतर आर्टिमस टिममधील तंत्रज्ञ यानाचे Hatch ऊघडतील आणी त्यातील अनेक पेलोड ओपन करतील या बरोबरच यानातील मानवी डमी Commander Moonikin Compos,Space Biology experiments,Snoopy आणी official flight kit देखील ऊघडतील चंद्रावरील अंतराळ  प्रवासादरम्यान मानवी डमींवर काय परिणाम झाला व ईतर साहित्यावर तेथील वातावरणात काय बदल झाला ह्याचे निरीक्षण नोंदवतील त्यानंतर शास्त्रज्ञ त्यावर सखोल संशोधन करतील यानातील Capsule आणी heat shield ह्यांना अनेक टेस्ट आणी Analysis प्रक्रियेमधुन जावे लागेल आणी ह्यासाठी अनेक महिने लागतील  

Artemis मोहिमेतील हे पहिले ऊड्डाण यशस्वी करण्यात नासा संस्थेतील हजारो कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने बनविलेल्या SLS Rocket आणी अंतराळयान बनविणाऱ्या जगातील कुशल तंत्रज्ञांंच्या कर्तृत्ववान टिममुळे हे शक्य झाले आता नासा संस्था 2024 मधील Artemis II च्या मानवसहित मोहीमेची तयारी करत आहे

Friday 2 December 2022

अंतराळ स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी अंतराळवीर Josh Cassada आणी Frank Rubio Space Walk करणार

 NASA astronaut and Expedition 68 Flight Engineer Frank Rubio is pictured during a spacewalk tethered to the International Space Station's starboard truss structure.

 अंतराळ मोहीम 68 चे अंतराळवीर Frank Rubio अंतराळ स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी Space Walk दरम्यान -फोटो नासा संस्था

नासा संस्था -2 डिसेंबर

नासाच्या अंतराळ मोहीम 68चे अंतराळवीर Josh Cassada आणी Frank Rubio अंतराळ स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी 3डिसेंबरला Space Walk करणार आहेत हे दोन्हीही अंतराळवीर सकाळी 7.25 a.m.ला Space Walk साठी स्थानकाबाहेर पडतील आणी सात तासांंनी Space Walk संपल्यावर स्थानकात परततील  

ह्या Space Walk दरम्यान अंतराळवीर Josh Cassada लाल रंगाच्या रेशा असलेला स्पेससुट परीधान करतील आणी अंतराळवीर Frank Rubio ह्यांनी परिधान केलेला स्पेससुट रेशाविरहित असेल 

सात तासांच्या ह्या Space Walk दरम्यान हे अंतराळवीर स्थानकाच्या बाहेरील 3A power Channel ह्या Starboard truss ह्या भागात Solar Arrays (iROSA) install करणार आहेत  ह्या भागातील Solar channel वरून योग्य प्रमाणात पॉवर निर्मिती होत आहे कि नाही आणी बॅटरी अपेक्षित क्षमतेनुसार चार्ज होत आहे कि नाही हे चेक करण्यासाठी आणि सोलर चॅनेलची पॉवर चार्जिंग क्षमता वाढविण्यासाठी हा स्पेसवॉक करण्यात येणार आहे

ह्या आधी 1B सोलर channel मधील केबल routing मध्ये बदल करण्यात आला होता आणि स्थानकाला होणाऱ्या इलेक्ट्रिसिटी आणि पॉवर मध्ये काय बदल होतो हे चेक करण्यात आले होते ह्या पुर्वीच्या Space Walk मध्ये स्थानकाबाहेरील आठ power channel मधील एक channel बदलण्यात आले होते  सहसा अंतराळस्थानकात 1B सोलर channel वरुन निर्माण होणाऱ्या  ईलेक्ट्रिसीटी आणी ऊर्जेचा वापर केल्या जातो पण सद्या 1A सोलर channel वरुन हे काम केल्या जात आहे अंतराळस्थानकाला आवश्यक असलेला प्रकाश आणी सायंटिफिक प्रयोगासाठी आवश्यक असलेली Electric power ची क्षमता वाढविण्यासाठी हा Space Walk करण्यात येणार आहे

हे दोन्ही अंतराळवीर पुन्हा 19 डिसेंबरला Space Walk करणार आहेत ह्या Space Walk चे लाईव्ह प्रक्षेपण नासा टीव्ही वरुन करण्यात येणार आहे