नासाच्या Insight Mars Rover ने पाठविलेला शेवटचा सेल्फी -फोटो -नासा संस्था (J.PL Lab)
नासा संस्था -23मे
नासाचे Insight Mars Rover मंगळ ग्रहावरील भूपृष्ठाखालील भागातील अंतर्गत माहिती गोळा करण्यासाठी आणि मंगळावरील पुरातन सजीवसृष्ठीच्या अस्तित्वाला दुजोरा देणारे पुरावे शोधण्यासाठी 20 नोव्हेंबर 2018 साली मंगळावर पोहोचले होते Insight मंगळ यान मंगळावरील Elysium Planitia ह्या भागात उतरले होते आजवर Insight यानाने मंगळावरील महत्वपूर्ण संशोधित माहिती पृथ्वीवर पाठविली आहे
Insight Mars Rover ने मागच्या महिन्यात 24 एप्रिलला शेवटचा सेल्फी पाठवला आहे हा सेल्फी यानाच्या मंगळ ग्रहावरील 1,211व्या मंगळ दिवशी (Sol) काढलेला आहे ह्या सेल्फीत मंगळयानावर खूप धूळ जमलेली दिसत असून हा फोटो अस्पष्ट आहे ह्या आधी Insight यानाने 2018च्या डिसेंबर मध्ये म्हणजे मंगळावर पोहोचल्यानंतर काही दिवसातच सेल्फी काढून पाठवला होता त्यानंतर 2019 च्या एप्रिलमध्ये Insight यानाने पुन्हा सेल्फी काढून पृथ्वीवर पाठविला होता ह्या दोन्ही सेल्फीतील Insight यानाचे फोटो स्पष्ट व चांगले आले आहेत पण आताच्या सेल्फीतील Insight यानाचा फोटो पुसट,अस्पष्ट आणि धुळीने माखलेला आहे
नासाच्या J.PL Labमधील Insight Mars Rover च्या टीम प्रमुखानी प्रसारित केलेल्या माहिती नुसार यानातील रोबोटिक आर्मद्वारे हा सेल्फी काढताना यानाला अनेकवेळा प्रयत्न करावे लागले मंगळावर झालेल्या धुळीच्या वादळामुळे Insight यान आणि यानातील सौर पॅनलवर धूळ जमा झाली आहे त्या मुळे सौरऊर्जा निर्मितीवर परिणाम झाला आहे Insight मंगळ यानाच्या सोलर पॉवर युनिट मधून ताशी 5,000 Watt सौर ऊर्जेची निर्मिती होते पण धुळीमुळे आणि वातावरणातील बदलामुळे ह्या सौर पॅनल ची सौरऊर्जा निर्मितीची क्षमता कमी झाली असून सध्या ती दसपटीने कमी म्हणजे फक्त 500 Watt इतकी आहे त्या मुळे यानातील अत्याधुनिक स्वयंचलित यंत्रणेवर परिणाम झाला आहे आणि येणाऱ्या काही महिन्यात मंगळावरील धुळीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे वातावरणात बदल होईल आणि मंगळ ग्रहावर सूर्यप्रकाश देखील कमी पडेल अशा अवस्थेत Insight यानाची कार्यक्षमता देखील कमी होईल त्या मुळे सौर पॅनल वरील धूळ दूर करणे आवश्यक आहे पण सध्या तरी हे काम अत्यंत कठीण आहे Insight मंगळयानाच्या टीम मधील शास्त्रज्ञांनी म्हणूनच मंगळयानाच्या रोबोटिक आर्मचे काम काही काळ स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे रोबोटिक आर्मच्या ह्या स्थितीला "Retirement Pose " असे म्हणतात लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येईल
नासाच्या Marshall Space Flight Center ह्या संस्थेतून Insight मंगळयानाच्या स्वयंचलित यंत्रणेवर नियंत्रण ठेवल्या जाते नासा संस्थेतील Germany,France,UK मधील Space Center मधील टीम मधील शास्त्रज्ञ देखील त्या साठी सहकार्य करतात Insight मंगळयानाचा मंगळावरील कार्यकाळ फक्त दोन वर्षांचा होता पण त्याची कार्यक्षमता पाहून तो काळ 2022 डिसेंबर पर्यंत वाढविण्यात आला होता Insight यानाने ह्या काळात अत्यंत महत्वपूर्ण माहिती गोळा केली भूगर्भातील सॅम्पल्स गोळा केले आणि हि संशोधित माहिती आणि फोटो पृथ्वीवर पाठवले आहेत
ह्या महिन्यात 4 मेला Insight यानाच्या मंगळावरील 1,222व्या मंगळ दिवशी मंगळावर झालेल्या भूकंपाची माहिती व नोंद यानाने पृथ्वीवर पाठविली होती हा भूकंप 5 रिक्टर स्केल एव्हढा होता ह्या भूकंपाच्या Seismogram चा व्हिडिओ देखील यानाने पृथ्वीवर पाठविला होता
No comments:
Post a Comment