नासाचे Boeing Starliner अंतराळयान स्थानकाजवळ पोहोचल्यानंतर -फोटो -नासा संस्था
नासा संस्था - नासा आणी Boeing ह्यांच्या सहकार्याने बनवलेले नवे व्यावसायिक Boeing Starliner अंतराळयान विस मेला स्थानकात पोहोचले मानव विरहित Flight Test -2 अंतराळ मोहिमे अंतर्गत 19 मेला रात्री 6.54 मी. वाजता Boeing Starliner CST-100 अंतराळयान नासाच्या फ्लोरिडा येथील Cape Canaveral Space Force Station येथील ऊड्डान स्थळावरुन Atlas V रॉकेट च्या साहाय्याने अंतराळ स्थानकात जाण्यासाठी आकाशात झेपावले आणी 31 मिनिटांनी रॉकेट पासून वेगळे होऊन अंतराळ प्रवासाच्या पहिल्या टप्प्यात पोहोचले त्या नंतर अंतराळयान स्थानकाच्या दिशेने अंतराळ प्रवासास निघाले Starliner अंतराळयान 20 मेला 8.28 p.m.ला स्थानकाच्या समोरील भागातील Harmony Module जवळ पोहोचले आणि 11.45a.m.ला अंतराळस्थानकातील अंतराळवीरांनी Boeing Starliner आणि स्थानक ह्यांच्यातील Hatching प्रक्रिया पार पाडली
अमेरिकेची अमेरिकन भूमीवरून अमेरिकन निर्मित अंतराळ यानातून अंतराळवीरांना स्थानकात नेण्याआणण्याची मोहीम पुन्हा सुरु झाल्यानंतर नासा आणि Space X crew Dragon ह्यांच्या सहकार्याने सुरु झालेले Space X Crew Dragon अंतराळयान चारवेळा अंतराळवीरांसह अंतराळस्थानकात जाऊन आले ह्या व्यावसायिक अंतराळयान मोहिमेच्या यशानंतर नासा आणि Boeing ह्यांच्या सहकार्याने Boeing CST-100 Starliner अंतराळयानाची निर्मिती करण्यात आली ह्या यानाची उड्डाण पूर्व पहिली चाचणी यशस्वी झाल्यानंतर आता मानवविरहित दुसरी उड्डानचाचणी घेण्यात आली आहे ह्या अंतराळयानाचा उपयोग भविष्यकालीन अंतराळ मोहोमातील अंतराळवीरांना अंतराळ स्थानकात नेण्याआणण्यासाठी होणार आहे त्यामुळेच अंतराळवीरांनी अंतराळप्रवास करण्याआधी ह्या यानात काही त्रुटी राहिल्या आहेत का ?हे तपासून पाहणे आवश्यक होते त्यासाठी हे मानवविरहित यान अंतराळस्थानकात पाठवण्यात आले आहे ह्या यानाचा उपयोग व्यावसायिक अंतराळ मोहिमांसाठी आणि त्यातील अंतराळवीरांसाठीही होणार आहे
Boeing Starliner अंतराळ यान मानवविरहित असले तरीही त्यातून अंतराळवीरांसाठी लागणारे आणि अंतराळ स्थानक आणि तेथे सुरु असलेल्या संशोधनासाठीचे आवश्यकअसलेले 500 टन सामान स्थानकात पाठवण्यात आले आहे आणि 25 मेला Boeing Starliner अंतराळयान पृथ्वीवर परत येण्यासाठी निघेल तेव्हा त्यामधून जवळपास 600 पौंड सामान परत पाठवण्यात येईल त्यामध्ये स्थानकातील नको असलेल्या सामानासोबत स्थानकातील अंतराळवीरांना श्वासोच्छवासासाठी लागणारे Oxygen पुरवणाऱ्या Oxygen Recharge System (NORS) Tanks चा समावेश आहे हे Tanks पृथ्वीवर दुरुस्त करून पुन्हा स्थानकात पाठवण्यात येणार आहेत
नासाचे Administrator Bill Nelson ह्यांनी हि मोहीम यशस्वी झाल्यानंतर समाधान व्यक्त केले ते म्हणाले हे ह्या टीममधील सर्वांचे यश आहे त्यांची मेहनत धैर्य आणि कामातील निष्ठा ह्या मुळे हे यश मिळाले आहे त्यांनी त्यांच्या नाविन्यपूर्ण कामाने अमेरिकेचे नाव अंतराळ विश्वात प्रगतीपथावर नेले आहे ह्या Boeing Starliner यानाच्या सेवेमुळे भविष्यकालीन अंतराळमोहिमेतील अंतराळवीरांना अंतराळप्रवास करणे सोपे होईल हि दुसरी मानवविरहित यशस्वी अंतराळयान उड्डाण टेस्टअंतराळविश्वात मैलाचा दगड ठरेल आणि अंतराळवीरांच्या स्वतंत्रपणे स्थानकात जाण्यासाठीच्या अंतराळप्रवासाचा शुभारंभ ठरेल
नासाच्या Associate Administrator Kathryn Leuder ह्यांनी देखील आनंद व्यक्त केला ह्या असामान्य यशस्वी उड्डाणाबद्दल आम्ही Boeing Starliner टीमचे आभारी आहोत ह्या मोहिमेत सर्वांनी एकत्रित काम करून हि मोहीम यशस्वी केली आहे आगामी काळात Boeing Starliner अंतराळ यानातून अंतराळ प्रवास करणे अंतराळवीरांना सोयीचे होईल ह्या मानाविरहित Boeing Starliner अंतराळयानाच्या उड्डाण सोहळ्याचे नासा T.V. वरून लाईव्ह प्रसारण करण्यात आले होते आणि सामान्य हौशी नागरिकांना सोशल मीडियावरून व्हर्च्युअली सहभागी होण्याची संधीही देण्यात आली होती
No comments:
Post a Comment