Tuesday 22 June 2021

अंतराळवीर Thomas Pesquet ह्यांनी स्थानकात केला Music Day साजरा

अंतराळवीर Thomas Pesquet आणि अंतराळवीर Soichi Noguchi स्थानकातील वाद्यांवर संगीत वाजवून Music Day साजरा करतानाचे आनंदी क्षण -फोटो -नासा संस्था 

नासा संस्था- 22 जुन

नासाच्या अंतराळ मोहीम 65 चे अंतराळवीर Thomas Pesquet ह्यांनी काल 21जुनला अंतराळस्थानकात Music day साजरा केला त्या आनंदी क्षणाचे फोटो त्यांनी सोशल मीडियावरून शेअर केले आहेत त्या वेळेस बोलताना ते म्हणाले 

आज जागतिक French Music Day आहे France मधील नागरिक आज ऊत्साहात हा दिवस साजरा करत असतील कोणी सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होऊन लाईव्ह संगीत ऐकण्याचा आनंद घेत असतील तर कोणी मित्रमैत्रिणी सोबत आवडीच संगीत,गाण ऐकुन हा दिवस ऊत्साहात,आनंदात साजरा करत असतील 

पण ईथे स्थानकात तिथल्या सारखा हा दिवस साजरा करता येत नाही स्थानकातील झीरो ग्रव्हिटित तरंगत्या अवस्थेत संगीत वाद्य हातात घेऊन संगीत वाजवण सोप नाही कारण ईथे कमी गुरुत्वाकर्षण असल्ऱ्याने साऱ्याच वस्तू आमच्या प्रमाणे तरंगतात तरीही आम्ही हा दिवस ईथे साजरा करतोय वीस वर्षांपुर्वीच्या Alpha अंतराळ मोहिमेतील नासाचे अंतराळवीर Carl Walz ह्यांनी स्थानकात Music Band आणला होता तो अजूनही ईथे आहे त्या मधील संगीत वाद्यांवर संगीत वाजवून आम्ही हा दिवस साजरा करतोय 

अंतराळवीर Soichi  Noguchi ईथल्या Keyboard वर संगीत वाजवत आहेत आणी मी माझ्या Sax संगीत वाद्यावर संगीत वाजवतोय मी माझ्या मागच्या अंतराळ मोहिमेत हे वाद्य स्थानकात आणल होत आणी ईथेच ठेवल होत चार वर्षांनी ते वाद्य जसच्या तस पाहून मला खूप आनंद झाला होता खरतर ते साधच वाद्य असल तरी माझ्यासाठी स्पेशल आहे आधी सांगितले त्याप्रमाणे इथे स्थीर राहुन वाद्य वाजवण अवघड असल तरी आम्ही ऊत्तम वाद्य संगीत ऐकवण्याचा प्रयत्न केला आणी आम्ही त्यात यशस्वी झालो ह्याचा आम्हाला अभिमान वाटतोय

जगभरातील संगीत प्रेमी 21 जुनला जागतिक संगीत दिन साजरा करतात जवळपास 120 देशात संगीत क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रती आदर आणी प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केल्या जातो France मध्ये 21 जुन 1982 मध्ये हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली त्या वेळेसचे कला आणी सांस्कृतीक मंत्री Jack Lange ह्यांनी व French Music Composer  Maurice Fleured ह्यांनी हा दिवस साजरा करण्याचे ठरवले सर्व लोकांनी एकत्रित जमुन संगीताचा आस्वाद घेत आनंदात हा दिवस साजरा करावा आणी आपल्याला संगीताचा आनंद देणाऱ्या संगीत क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रती आदर व्यक्त करावा हा हेतू त्या मागे होता तेव्हापासुन France मध्ये दर वर्षी 21 जूनला हा दिवस साजरा केल्या जातो यंदा कोरोनाच्या निर्बंधामुळे नेहमी प्रमाणे हा दिवस साजरा करता आला नाही तरीही मर्यादित स्वरूपात हा दिवस  तेथील नागरिकांनी साजरा केला  

Thursday 17 June 2021

अंतराळवीर Shane Kimbrough आणी Thomas Pesquet ह्यांनी केला Space Walk यशस्वी

Spacewalkers Shane Kimbrough and Thomas Pesquet working at the Port-6 truss during EVA 74. Credit: NASA TVअंतराळवीर Shane Kimbrough आणि Thomas Pesquet स्थानकाच्या Port -6 Truss ह्या भागातील स्पेसवॉक दरम्यान -फोटो -नासा संस्था 

नासा संस्था- 17 जुन

नासाच्या अंतराळ मोहीम 65चे अंतराळवीर Shane Kimbrough आणी युरोपियन अंतराळवीर Thomas Pesquet ह्यांनी स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी बुधवारी Space Walk केला

ह्या दोनही अंतराळवीरांनी ह्या Space Walk ची तयारी आदल्या दिवसापासूनच सुरू केली होती त्यांनी त्यांचे स्पेससुट चार्ज करून त्यातून हवा लिक होत तर नाही ना? ह्याची खात्री केली होती  Thomas Pesquet ह्यांनी लाल रंगाच्या रेषा असलेला स्पेससुट परीधान केला होता तर Shane ह्यांचा स्पेससुट रेषाविरहित होता अंतराळवीर बुधवारी सकाळी 8.11 मिनिटाला स्पेसवॉकसाठी स्थानकाबाहेर पडले व सात तास पंधरा मिनिटांनी स्पेसवॉक पुर्ण करून दुपारी 3.26 ला स्थानकात परतले

 NASA astronauts Shane Kimbrough (left) and ESA astronaut Thomas Pesquet (right) are today’s spacewalkers.

अंतराळवीर Shane Kimbrough आणि Thomas Pesquet स्पेससूट घालून स्पेसवॉकसाठी स्थानकाबाहेर पडण्याच्या तयारीत -फोटो -नासा संस्था   

ह्या सव्वा सात तासांच्या स्पेसवॉक दरम्यान अंतराळवीरांनी स्थानकाच्या बाहेरील डाव्या बाजुच्या Port  ह्या भागात काम केले अंतराळवीरांनी ह्या भागात नवे Solar Array Panels बसविले आहेत अंतराळस्थानकाच्या बाहेरील भागात 2000 साली आठ Solar Array Panels बसविले होते आता त्यातील सहा Solar Array Panels जुने झाल्याने बदलविण्यात येणार आहेत सहा पैकी दोन Solar Array युनिट्स हे दोन अंतराळवीर दोन स्पेसवॉक दरम्यान बदलवणार आहेत त्या पैकी एक स्पेसवॉक काल करण्यात आला आता विस तारखेला दुसऱ्या स्पेसवॉक मध्ये दुसरा Solar Array unit बसविणार आहेत ह्या Solar Array चा ऊपयोग स्थानकातील Power system साठी होतो  नुकत्याच स्थानकात आलेल्या Space X Cargo Spacecraft मधुन Solar Array चे दोन युनिट पाठविण्यात आले होते  अंतराळवीरांंनी  त्यातील एक Solar Array युनिट Space-X Dragon मधून काढून स्थानकाच्या Port ह्या भागात बसविले शिवाय हे युनिट बसविण्यासाठी लागणारी ईलेक्ट्रिकल केबल व  बोल्टही फिट केले  अंतराळवीरांनी ह्या कामासाठी रोबोटिक आर्मचा वापर केला स्थानकातून ह्या स्पेसवॉक साठी त्यांना अंतराळवीर Mark Vande Hei आणी Megan McArthur ह्यांनी सहकार्य केले तर नासाच्या पृथ्वीवरील JPL संस्थेतून मार्गदर्शन करण्यात आले 

अंतराळवीर Shane Kimbrough ह्यांचा हा सातवा स्पेसवॉक होता त्यांनी आजवरच्या स्पेसवॉक साठी अंतराळात 46 तास15 मिनिटे व्यतित केले आहेत तर Thomas Pesquet ह्यांचा हा तिसरा स्पेसवॉक होता त्यांनी आजवरच्या तीन स्पेसवॉक दरम्यान अंतराळात 19 तास 47 मीनिटे व्यतीत केले आहेत 

ह्या दोन अंतराळवीरांनी मिळुन केलेला हा तिसरा स्पेसवॉक होता आणी आजवर स्थानकाच्या दुरूस्तीसाठी अंतराळवीरांनी  केलेला 239 वा स्पेसवॉक होता त्यासाठी अंतराळवीरांनी आजवर 62 दिवस 18 तास आणी 28 मीनिटे अंतराळात व्यतीत केले आहेत

Saturday 12 June 2021

अंतराळवीर Shane Kimbrough ह्यांचा 54 वा वाढदिवस अंतराळवीरांनी केला स्थानकात साजरा

अंतराळवीर Shane Kimbrough ह्यांचा वाढदिवस साजरा करताना स्थानकातील मोहीम 65 चे अंतराळवीर -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -7 जून 

नासाच्या अंतराळ मोहीम 65 अंतर्गत नासाचे अंतराळवीर Shane Kimbrough तिसऱ्यांदा स्थानकात राहायला गेले आहेत ह्या आधी दोनवेळा त्यांनी स्थानकात वास्तव्य केले आहे मागच्या आठवड्यात  शुक्रवारी चार जूनला अंतराळवीरांनी स्थानकात त्यांचा 54 वा वाढदिवस साजरा केला 

मागच्या आठवड्यात Space X -22 कार्गोशिप पृथ्वीवरून स्थानकात पोहोचले त्यातून स्थानकात सुरु असलेल्या सायंटिफिक प्रयोगासाठीचे साहित्य,अंतराळवीरांसाठीचे अन्न व इतर आवश्यक सामान आणि स्थानकासाठी लागणारे तांत्रिक सामान स्थानकात पाठविण्यात आले त्यामुळे दुसऱ्याच दिवशी स्थानकात पोहोचणाऱ्या ह्या कार्गोशिपच्या आगमनाच्या docking ,hatching आणि इतर कामात अंतराळवीर अत्यंत व्यस्त होते तरीही आम्ही ह्या कामातून थोडा मोकळा वेळ काढून Shane ह्यांचा वाढदिवस साजरा केला अर्थात हा आठवडा धावपळीचा असल्याने आम्हाला वाढदिवस साधेपणाने घाईगडबडीत साजरा करावा लागलल्याच अंतराळवीर Thomas Pesquet ह्यांनी ट्विटर वरून दिलेल्या माहितीतून सांगितले आहे 

अंतराळस्थानकातील झिरो ग्रॅविटीत सतत तरंगत्या अवस्थेत राहून वाढदिवस साजरा करण अत्यंत कठीण असल तरीही अंतराळवीर त्यांच्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून एकत्रित जमून पार्टीचे आयोजन करून एकमेकांचे वाढदिवस साजरे करतात त्या साठी स्थानकातील एखादा मोकळा कोपरा निवडून स्थानकात उपलब्ध असलेल्या सामानांनी डेकोरेशन करतात पृथ्वीवरून त्यांच्यासाठी आलेल्या गोड पदार्थांचा फिस्टमध्ये समावेश करून आणि स्थानकातील Music Instrument च्या साहाय्याने संगीताचा आस्वाद घेत अंतराळवीर वाढदिवसाची पार्टी enjoy करतात त्यामुळे ज्यांचा वाढदिवस असतो त्यांना छान तर वाटतेच पण पृथ्वीपासून दूर असलेल्या अंतराळवीरांच्या व्यस्त दिनचर्येतील काही क्षण आनंदात जातात अस मत अंतराळवीर व्यक्त करतात पृथ्वीवरचे वाढदिवस आम्ही नेहमीच साजरे करतो पण अंतराळस्थानकातील झिरो ग्रॅविटीत तरंगत्या अवस्थेत अंतराळातून पृथ्वीकडे पाहात वाढदिवस साजरा करण्याचा आनंद काही औरच! अशी प्रतिक्रिया अंतराळवीर नेहमीच व्यक्त करतात अंतराळस्थानकातील मानवी वास्तव्याला आता वीस वर्षे पूर्ण झाली असून आजवर स्थानकात 80 अंतराळवीरांनी त्यांचे वाढदिवस साजरे केले आहेत

Tuesday 1 June 2021

नासाच्या Space X Crew -3 मोहिमेसाठी Kayla Barron ची मिशन स्पेशालिस्ट पदी निवड जाहीर

  

 NASA astronaut candidate Kayla Barron poses for a portrait after donning her spacesuit, Friday, July 12, 2019 at NASA's Johnson Space Center in Houston, Texas.

 Kayla Barron अंतराळवीर होण्यासाठी निवड झाल्यानंतर Space Suit घालून काढलेल्या फोटोत -फोटो -नासा संस्था 

 नासा संस्था -

मागच्या महिन्यात Space X Crew -3साठीच्या अंतराळवीरांची निवड जाहीर झाली असून 23 ऑक्टोबरला Space X Crew Dragon अंतराळवीरांना घेऊन स्थानकात जाणार आहे नासाची अंतराळवीर Kayla Barron हिची ह्या मोहिमेत मीशन स्पेशालिस्ट म्हणून निवड करण्यात आली आहे तिच्या सोबत भारतीय वंशाचे अंतराळवीर राजा चारी,अंतराळवीर Tom Marshburn आणी युरोपीयन अंतराळवीर Matthias Maurer हे तीन अंतराळवीर देखील स्थानकात रहायला जाणार आहेत नासाच्या  कमर्शियल क्रु प्रोग्राम अंतर्गत हे Crew Dragon तिसऱ्यांदा स्थानकात अंतराळवीरांना घेऊन जाणार आहे आधीच्या Demo-2 test flight नंतर चवथ्यांदा Crew Dragon स्थानकात जाईल 

Kayla Barron मुळची Pocatello ldaho ईथली रहिवासी असुन नंतर ती Washington मधील Richland  येथे स्थायिक झाली 2010 मध्ये U.S.Naval Academy in Annapolis Maryland येथे तिने system engineering मध्ये BE केले आणी  2011 मध्ये  England मधील Cambridge युनिव्हर्सिटी मध्ये तिने nuclear engineeringमध्ये ME केले असून ती Cambridge Scholar आहे ती Submarine Warfare officer पदी कार्यरत होती 2017 मध्ये जेव्हा तीची नासा संस्थेत अंतराळवीर होण्यासाठी निवड झाली तेव्हा ती U S Naval academy मध्ये सहाय्यक Superintendent पदावर कार्यरत होती 2020 मध्ये तीची अंतराळवीर होण्यासाठी नासा संस्थेत निवड झाली होती  त्यानंतर तीने अंतराळवीर होण्यासाठीचे  दोन वर्षांचे ट्रेनिंग पुर्ण केल्यानंतर आता तिची  ह्या तीन अंतराळविरांसह स्थानकात राहायला जाण्यासाठी निवड झाली आहे आता ती त्यांच्या सोबत ऊड्डान पूर्व ट्रेनिंगमध्ये सहभागी झाली आहे Kayla ची हि पहिलीच अंतराळवारी आहे 

composite photo showing NASA astronauts Raja Chari and Tom Marshburn, and ESA (European Space Agency) astronaut Matthias Maurer Space X Crew Dragon-3चे नासा अंतराळवीर Raja Chari Tom Marshburn आणि E.SAचे अंतराळवीर Mathias Maurer -फोटो -नासा संस्था 

नासाचे अंतराळवीर राजा चारी ,Marshburn आणी Maurer ह्या तिघांची ह्या मोहिमेसाठी 2020 मध्येच निवड निश्चित करण्यात आली होती अंतराळवीर राजा चारी आणी युरोपियन अंतराळवीर Matthias Maurer हे दोघे देखील ह्या मोहीमेचे मिशन स्पेशालिस्ट असतील तर Tom Marshburn ह्या मोहिमेचे pilot म्हणून सहभागी होतील अंतराळवीर राजा चारी आणी अंतराळवीर Maurer हे पहिल्यांदाच अंतराळ स्थानकात रहायला जाणारअसून त्यांची देखील हि पहिलीच अंतराळवारी आहे 

 Marshburn मात्र तिसऱ्यांदा स्थानकात रहायला जाणार आहेत ह्या आधी ते STS-127 मिशन अंतर्गत 2009 मध्ये तर अंतराळ मोहीम 34/35 अंतर्गत 2013 मध्ये स्थानकात रहायला गेले होते 

हे चारही अंतराळवीर स्थानकात सहा महिने वास्तव्य करणार असुन तेथे सुरू असलेल्या सायंटिफिक संशोधनात सहभागी होणार आहेत

ह्या संबंधित अधीक माहिती साठी वाचा ह्याच blog वर

http://heetguj.blogspot.com/2020/12/space-x-crew-dragon-3.html