नासाचे अंतराळवीर Shannon Walker ,Victor Glover ,Mike Hopkins आणि जपानचे अंतराळवीर Soichi Noguchi Space X Crew Dragon मधून पृथ्वीवर येण्याच्या तयारीत -फोटो नासा संस्था
नासा संस्था -2 मे
नासाच्या Crew -1 Space X Dragon Resilience चे अंतराळवीर Mike Hopkins,Shannon Walker,Victor Glover आणि जपानचे अंतराळवीर Soichi Noguchi त्यांचा स्थानकातील सहा महिन्यांचा मुक्काम आटोपून आज पृथ्वीवर सुरक्षित परतले आहेत
Resilience Crew Dragon ह्या अंतराळवीरांना घेऊन काल 8.55p.m.ला स्थानकातून पृथ्वीवर येण्यासाठी अंतराळप्रवासास निघाले त्या आधी Resilience Crew Dragon स्वयंचलित यंत्रणेने स्थानकापासून वेगळे झाले आणि आज दोन मेला 2.56a.m.ला प्रुथ्वीवर परतले फ्लोरिडा मधल्या Gulf of Mexico मधल्या समुद्रात हे Crew Dragon Resilience सुरक्षितपणे उतरले
Resilience Space X Crew Dragon Gulf Of Mexico येथील समुद्रात parachute च्या साहाय्याने उतरताना आणि अंतराळवीरांना नेण्यासाठी बोटी जाताना फोटो -नासा संस्था
Resilience पृथ्वीच्या कक्षेत शिरताच नासाची विमाने Resilience भोवती घिरट्या घालू लागली Resilience जेव्हा Parachuteच्या साहाय्याने समुद्रात सुरक्षित पणे उतरले तेव्हा नासाची रिकव्हरी टिम आणि रेस्क्यू टीम तिथे पोहोचली Dragon बोटी जवळ येताच बोट व Dragon ह्यांच्यातील hatching आणि Docking प्रक्रिया पार पडली Dragonला सुरक्षित पणे बोटीवर चढवण्यात आले त्यानंतर नासाच्या रेस्क्यु टिमने अंतराळविरांना अंतराळयानातुन बाहेर काढले प्रथम अंतराळवीर Mike यानातुन बाहेर आले नंतर Victor,Shannon आणी Soichi याानाातुुन बाहेर आले टिममधील डॉक्टर्सनी सर्व अंतराळविरांची प्राथमिक तपासणी केली त्या नंतर आवश्यक प्रक्रिया पुर्ण होताच हे अंतराळवीर नासाच्या विमानाने Houston येथे रवाना झाले
हे अंतराळवीर पृथ्वीवर सुरक्षित पोहोचल्यानंतर नासाचे नवनियुक्त Administrator Bill Nelson ह्यांनी ह्या अंतराळविरांचे Welcome home!Victor,Mike,Shannon & Soichi! असे म्हणत स्वागत केले ते म्हणाले तुम्ही अत्यंत सुरक्षित पणे Resilience Dragon स्थानकात नेले आणी परत आणुन अमेरिकेतील समुद्रात Splashdown केले त्या बद्दल सर्वांचे अभिनंदन! नासा संस्था,Space X आणी तुम्ही अत्यंत कठीण काळात संघर्ष करून अमेरीकेला पुन्हा एकदा स्वयंपूर्ण केले आणी अमेरीकेची बंद पडलेली अंतराळ मोहीम पुन्हा सुरू करण्याच असामान्य कर्तृत्व सिध्द केलय आता दुसऱ्यांदा हि मोहीम यशस्वी करून तुम्ही अमेरिकेच्या भविष्यकालीन कमर्शियल अंतराळ मोहीमेच्या यशस्वीतेची नांदी दिली
हे चारही अंतराळवीर Resilience Crew Dragon मधून 15 नोव्हेंबर 2020 मध्ये स्थानकात रहाण्यासाठी गेले होते आणी 27 तासांच्या अंतराळ प्रवासानंतर स्थानकात पोहोचले होते कोरोना काळातील कोरोना योध्दे,नासा आणी Space X संस्थेतील ह्या मोहिमेतील शास्त्रज्ञ,तंत्रज्ञआणी ईंजीनीअरर्स ह्यांनी कोरोना महामारीच्या कठीण काळात अत्यंत संघर्षाने ह्या Space X Crew Dragon ची मोहीम यशस्वी केली ह्याची भविष्य कालीन पीढिला जाणीव व्हावी आणी जिद्द आणी चिकाटी असली की कठीण काळातही ध्येय साध्य करता येत हे कळावे म्हणून अंतराळविरांनी Space X Dragon ला Resilience हे नाव दिले होते
ह्या चारही अंतराळविरांनी प्रथमच चार अंतराळवीर Crew Dragon मधून स्थानकात जाऊन जास्त दिवस (168 दिवस )वास्तव्य करण्याचा आणी कमी वेळेत रात्री समुद्रात यशस्वी Splash down करण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे ह्या आधी अंतराळवीर Bob Behenken आणी Douglas हे दोन अंतराळवीर पहिल्या SpaceX Crew Dragon मोहीमेत 84 दिवस अंतराळस्थानकात राहिले होते ह्या आधी 1968 मध्ये Apollo 9 चे रात्री समुद्रात Splashdown करण्यात आले होते त्या यानातुन अंतराळवीर Frank Borman ,Jim Lovellआणी Bill Anders ह्यांनी अंतराळ प्रवास केला होता तो रेकॉर्ड ह्या अंतराळ विरांनी मोडला
ह्या अंतराळवीरांनी त्यांच्या स्थानकातील वास्तव्यादरम्यान अंतBorman राळस्थानकाच्या दुरुस्तीसाठी पाचवेळा Space Walk केला आणि तेथे सुरू असलेल्या सायंटिफिक प्रयोगात सहभाग नोंदवला त्यांनी तिथल्या झीरो ग्रॅव्हिटीत मानवी आरोग्यावर ऊपयुक्त असे संशोधनात्मक प्रयोग केले स्थानकातील झीरो ग्रॅव्हिटीत protein Crystal formation वर आणी मानवी रोगावरील अत्याधुनिक औषध शोधण्यासाठी संशोधन केले शीवाय स्थानकातील Veggie chamber मध्ये Veggie project अंतर्गत यशस्वी भाजी लागवड केली आणी Advance Plant Habitat हा प्रयोगही यशस्वी केला त्यांनी संशोधीत केलेल्या भाजीचे नमुने आणी ईतर सायंटिफिक आणी biological नमुने आणी माहिती पुर्ण डाटा सोबत आणला आहे
No comments:
Post a Comment