Monday 24 May 2021

नासाच्या Curiosity मंगळ यानाला आढळले मंगळभूमीवरील मातीत मिठाचे अस्तित्व

  

This look back at a dune that NASA's Curiosity Mars rover drove across was taken by the rover's Mast Camera (Mastcam) on Feb. 9, 2014 – the 538th Martian day, or sol, of Curiosity's mission.

           Curiosity मंगळ यानाने ड्राईव्ह करून घेतलेला मंगळावरील Gale  Crater ह्या भागातील  फोटो -फोटो -नासा संस्था 

नासा संस्था -(J.PL lab)- 20 मे 

नासाच्या Perseverance मंगळयानाने मंगळभूमीवर उत्खननास सुरवात केली असतानाच ह्या आधी मंगळावर कार्यरत असलेल्या Curiosity मंगळयानाने देखील मंगळभूमीवरील महत्वपूर्ण माहिती पृथ्वीवर पाठविली आहे नासाचे Curiosity मंगळयान 26 नोव्हेंबरला 2011 ला पृथ्वीवरून मंगळावर जाण्यासाठी निघाले आणि 6 ऑगस्ट 2020ला मंगळावर पोहोचले होते हे यान मंगळावरील Gale Crater ह्या डोंगराळ भागात उतरले तेव्हापासून तिथे कार्यरत आहे नुकतीच ह्या यानाने नासा संस्थेत तेथील माहिती व फोटो पृथ्वीवर पाठवली आहे

ह्या यानाने केलेल्या Gale Crater ह्या भागातील जमिनीखालील उत्खननात तेथील मातीत काही organic compounds, माातीच्या भांड्याचे तुकडे व कार्बन compound सापडले असून त्यामध्ये मिठही आढळले आहे हे अवशेष मंगळ ग्रहांवरील पुरातन सजीवसृष्ठीला पृष्ठी देणारे आहेत शास्त्रज्ञाच्या मते मंगळावर करोडो वर्षांपूर्वी सजीव सृष्ठी अस्तित्वात होती पण कालांतराने अति उष्णता,पाऊस,वादळे,भूगर्भातील घडामोडी ह्या मुळे तेथील वातावरणात बदल होऊन तेथील पाणी व जीवसृष्ठी नष्ठ झाली असेल पण त्यांचे अवशेष जमिनीत गाडल्या गेले असतील आणि कालांतराने मातीत मिसळल्या गेले असतील 

Geological घडामोडी दरम्यान काही Micro Organisms जमिनीखाली गाडल्या गेले असतील आणि त्यांचे अवशेष मातीत fossilsच्या स्वरूपात तसेच राहिले असतील तेथे सापडलेले मिठाचे अंश तेथे पुरातन काळी अस्तित्वात असलेल्या सजीवांच्या दैनंदिन वापरातील राहिलेले जमिनीत मुरलेले असेल किंवा तेथील Chemicals च्या प्रक्रियेदरम्यान हे मीठ तयार झाले असेल पण तेथील मातीत सापडलेले मीठ मंगळग्रहांवरील पुरातन सजीवसृष्ठीच्या अस्तित्वाला पृष्ठी देणारे आहेत कारण पृथ्वीवरील काही Micro Organismsअशा Organic मिठाचा वापर करतात उदा: Oxalates आणि Accetates 

जर मंगळभूमीवर असे Organic मीठ भरपूर प्रमाणात अस्तित्वात असेल आणि जमिनीखालील मातीत प्रिझर्व्ह झालेले असेल तर असा भूभाग तेथे असेलच तो भाग जर सापडला तर नासाचे शास्त्रज्ञ त्या भागावरील संशोधनावर लक्ष केंद्रित करून भर देतील आणि तेथील जमिनीखाली खोलवर उत्खनन करतील अशी माहिती नासाच्या Goddard Space Flight Center चे मुख्य शास्त्रज्ञ James M.T. Lewis ह्यांनी प्रसारित केली आहे  ते म्हणतात ,Curiosity मंगळ यानातील SAM ( Sample Analysis at Mars ) ह्या Portable Chemistry Lab मध्ये बसविलेल्या अत्याधुनिक यंत्रणेने मंगळावरील उत्खननात गोळा केलेल्या माती व दगडाचा चुरा ह्यांच्या रासायनिक प्रक्रियेनंतर असे मातीत मुरलेले मीठ सापडले आहे आणि मंगळ ग्रहांवरील पुरातन संस्कृतीचे अस्तित्व शोधण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे ह्या  SAM यंत्रणेद्वारे मातीवर रासायनिक प्रक्रिया करण्यासाठी हि माती अत्यंत उच्च तापमानात गरम करावी लागते तेव्हा मातीच्या कणांचे विघटन होऊन त्यातील मीठ व वायू बाहेर पडतात पण हे काम  Curiosity च्या लॅबमध्येच करावे लागते मंगळावरील वातावरणात हि प्रक्रिया करण अवघड आहे कारण ह्या रासायनिक प्रक्रियेदरम्यान बाहेर पडणारे वायू तेथील वातावरणात मिसळतात त्यामुळे हे वायू ह्या मातीच्या रासायनिक प्रक्रियेदरम्यान निर्माण झाले कि तिथल्या वातावरणातील आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही त्या मुळे सध्या तरी निश्चित पणे मंगळावर सापडलेल्या मिठाबाबत निश्चित पुरावा नसला तरीही अधिक सखोल संशोधनानंतर हे निश्चितपणे स्पष्ट होईल Curiosity यानातील दुसऱ्या अत्याधुनिक Che Min उपकरणाने  Gale Crater ह्या भागातील X-ray द्वारे काढलेल्या फोटोतून शास्त्रज्ञांना आणखी सखोल माहिती मिळेल 

Perseverance मंगळयानात अशी यंत्रणा बसविलेली नसल्यामुळे तेथे हि रासायनिक प्रक्रिया करता येणार नाही पण Perseverance यानाने गोळा केलेल्या माती आणि दगडांचे नमुने जेव्हा पृथ्वीवर आणल्या जातील तेव्हा येथील लॅबमध्ये शास्त्रज्ञानी त्यांच्यावर रासायनिक प्रक्रिया करून केलेल्या संशोधनाअंती मंगळभूमीवरील मिठाच्या आणि पुरातन सजीव सृष्ठीच्या अस्तित्वाचा ठोस पुरावा मिळेल 

No comments:

Post a Comment