Friday 14 May 2021

Perseverance यानाने केला मंगळभूमीवर उत्खननास प्रारंभ

 NASA's Perseverance Mars rover used its dual-camera Mastcam-Z imager to capture this image of Santa Cruz, a hill within Jezero Crater, on April 29, 2021.

Perseverance यानाने मंगळभूमीवरील Jezero Creater ह्या भागातील खडकाळ भागाचे मंगळावरील 68 व्या दिवशी घेतलेले फोटो -नासा संस्था 

नासा संस्था -12 मे

मागच्या महिन्यात नासाच्या Perseverance मंगळयानासोबत मंगळावर पोहोचलेल्या Ingenuity helicopter ने मंगळ भुमीवरील आकाशात ऊड्डाण चाचणी यशस्वी केल्या ह्या हेलिकॉप्टरच्या ऊड्डाणावर Perseverance यानाने कार्यरत होऊन नियंत्रण ठेवले आणी सर्व टेस्ट यशस्वी केल्या ह्या ऊड्डानाची सखोल माहिती आणी फोटो पृथ्वी वरील नासा स्ंस्थेत पाठवण्यात हे मंगळयान व्यस्त होते तरीही Perseverance यानाने स्वयंचलित यंत्रणेने कार्यरत होऊन इतर नियोजित कामेही पार पाडली आहेत सध्या Perseverance यानाने रोबोटिक आर्मच्या सहाय्याने मंगळ भुमीवरील Jezero Crater ह्या भागातील जमीन खोदण्याचे काम सुरू केले आहे आणि तेथील खडकांचे फोटो पृथ्वीवर पाठवले आहेत

  NASA's Perseverance rover viewed these rocks with its Mastcam-Z imager on April 27, 2021.

मंगळ भूमीवरील Jezero Crater ह्या भागातील खडकाळ भागाचे Perseverance यानाने घेतलेले फोटो -नासा संस्था 

हे यान मंगळावर ह्याच भागात ऊतरले आहे हा भाग खोलगट असून तेथे पुरातन काळी तळे असावे व कालांतराने त्यातील पाणी आटले असावे असे पुरावे शास्त्रज्ञांना मिळाले आहेत त्या मुळेच शास्त्रज्ञांनी संशोधनासाठी हा भाग निवडला आहे आता त्या भागातील जमीन उत्खनना नंतर मिळालेल्या खडकांच्या नमुन्यावर संशोधनाअंती तेथील पुरातनकाळच्या सजीवसृष्टीच्या अस्तित्वाचे पुरावे मिळतील असे शास्त्रज्ञांना वाटते ह्या तळ्याच्या सभोवतालच्या सेडीमेंटरी खडकावरून व भूगर्भातील Igneous खडकांच्या निर्मितीच्या काळावरून हे तळे कधी तयार झाले कधी त्यात गाळ साचणे सुरु झाले आणि कधी त्यातील पाणी आटले ह्याची माहिती मिळू शकेल

यानाच्या रोबोटिक आर्मच्या शेवटच्या भागात बसविलेल्या WATSON कॅमेऱ्याच्या साहाय्याने ह्या मंगळयानाने ह्या खडकांचे जवळून फोटो काढले आहेत आणि रोबोटिक आर्मच्या समोरच्या भागातील दोन Zoomable कॅमेऱ्याच्या Mastcam-Z Imager च्या साहाय्याने ह्या खडकातील सूक्ष्म बारकावे कॅमेरा झूम करून टिपले आहेत शिवाय ह्या रोबोटिक आर्मला बसविलेल्या लेसर यंत्रणेने युक्त असलेल्या Super Cam च्या साहाय्याने घेतलेल्या फोटोवरून त्या खडकातील केमिकल्स,मिनरल्स वै.डिटेल माहिती मिळू शकेल ह्या भागातील आणखी खोलवर केलेल्या उत्खनना नंतर ह्या दगडांबद्दलची आणखी सखोल माहिती मिळू शकेल 

सध्या शास्त्रज्ञांना हे खडक सेडीमेंटरी म्हणजे वाळू,माती,चिखल व पाण्याबरोबर वहात आलेल्या गाळापासून बनलेला दगड आहे कि ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या लाव्हा रसापासून तयार झालेले Igneous दगड आहेत ह्याची खात्री करून घ्यायची आहे त्यावरून ह्या दगड निर्मितीचे कारण आणि काळ कळेल इथे पृथ्वीवर geologist दगड फोडून त्याची अंतर्गत रचना आणि निर्मितीचा काळ शोधू शकतात पण तिथे मंगळावर Perseverance मंगळ यानाच्या रोबोटिक आर्मला हातोडा बसविलेला नसल्यामुळे हे काम थोडे कठीण आहे पण रोबोटिक आर्मला बसविलेल्या अत्याधुनिक यंत्राच्या साहाय्याने तेथील खडक ड्रिल करून त्यांचा चुरा व मातीचे नमुने व फोटो घेऊन त्यावर सखोल संशोधन करून दगडांचा प्रकार आणि त्यांच्या अंतर्गत भागातील केमिकल्स,मिनरल्सची माहिती मिळू शकेल शिवाय Perseverance यानाच्या सभोवतालच्या भागातील खडकांवर मंगळावरील  वादळामुळे उडालेल्या धुळीच्या प्रचंड लोटांचे थर साचलेले आहेत आणि काही खडकांची झीजही झाली आहे पण लवकरच हे काम पूर्ण होईल शास्त्रज्ञांना मंगळ भूमीवर हवा तसा भाग सापडताच नासाची मंगळ टीम त्या भागावर लक्ष केंद्रित करून रोबोटिक आर्मच्या साहाय्याने तेथील जमीन सपाट करून आणि भूगर्भातील भाग खोदून त्यातील खडक ,माती आणि दगडांचा चुरा गोळा केल्या जाईल आणि कुपीत भरल्या गेलेले हे नमुने पृथ्वीवर आणले जातील रोबोटिक आर्मच्या PIXL आणि SHERLOC ह्या यंत्रणेच्या साहाय्याने खडकातील केमिकल्स ,मिनरल्स ,आणि मंगळावरील पुरातन सजीवसृष्ठीचे अवशेषाचे अस्तित्व ह्याची सखोल माहिती मिळेल नासाच्या मंगळ मोहिमेचे टीम प्रमुख शास्त्रज्ञ Ken Farley ह्यांनी माहिती प्रसारित केली 

सेडीमेंटरी खडकाच्या संशोधनानंतर मंगळ ग्रहावर पाणी होत का ? त्यात सजीव सृष्ठीचे अस्तित्वाच्या खुणा किंवा पुरावे सापडतात का ? पाणी असल्यामुळेच हे गाळांचे थर जमले असतील तर ते कधी जमायला सुरु झाले आणि कधी बंद झाले आणि ह्या खडकातील थर किती वर्षे जुने आहेत हे कळेल तर Igneous दगडांच्या संशोधनानंतर त्यांच्या निर्मितीचा काळ तळे कधी तयार झाले तेथील भागाची उत्पत्तीचा निश्चित काळ कळेल शिवाय ह्या तळ्यात कधी पाणी  होते कधी त्यातील पाणी येणे बंद होऊन तळे आटले ह्याची सखोल माहितीही मिळेल त्यावरून मंगळावर पुरातन काळी सजीव सृष्टी अस्तित्वात असेल तर तो काळ आणि ती नष्ठ होण्याचे कारण आणि काळ समजेल

No comments:

Post a Comment