Friday 26 March 2021

नासाचे अंतराळवीर Mark Vande Hei स्थानकात जाण्यासाठी सज्ज जाण्याआधी साधला संवाद

नासाच्या Huston येथील संस्थेतून अंतराळवीर Mark Vande Hei ह्यांच्याशी लाईव्ह संवाद साधताना Megan Sumner -फोटो -नासा संस्था

नासा संस्था - 15 मार्च

नासाच्या अंतराळ मोहीम 64/65 चे अंतराळवीर Mark Vande Hei ह्यांनी मागच्या आठवड्यात पत्रकारांशी लाईव्ह संवाद साधला शिवाय सोशल मीडियावरून आलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली सध्या ते रशियातील Star City येथे आहेत नासा संस्थेतर्फे ह्या लाईव्ह संवादाचे प्रसारण नासा T.V. वरून करण्यात आले सुरवातीला नासाच्या Huston येथील कार्यालयातुन Megan Sumner ह्यांनी Mark Vande ह्यांच्याशी संपर्क साधुन संवादाला सुरवात केली 

Megan-  नऊ एप्रिलला तुम्ही स्थानकात जाणार आहात,काय फिलींग आहेत?

Mark- He thanks Megan! मी खुपच exited आहे! खरतर आक्टोबर मध्ये माझ ट्रेनिंग पूर्ण झाले होते पण तेव्हा मी जाऊ शकलो नाही पण आता मात्र माझी अचानक शेवटच्या क्षणी निवड झालीय त्या मुळे मी खूप आनंदात आहे आणि  जाण्यासाठी एकदम रेडी आहे

 Megan - That is great to hear! आता मिडिया वरुन प्रश्न घेऊ यात !

Joey roulette( the verge)- अगदी ऐनवेळी अचानक तुमची निवड झाली हे तुम्हाला केव्हा आणी कस कळल?

Mark- हा गमतीदार किस्सा आहे ! माझ्या शाळेतल्या मित्राचा  मध्यरात्री  फोन आला खरतर मी खूप झोपेत होतो तेव्हा फोन माझ्या पत्नीने ऊचलला त्यान तीला माझी ह्या मिशनसाठी निवड झाल्याची बातमी twitter वर वाचल्याच सांगितल मी आनंदित झालो पण जोवर मला नासाचा निवड झाल्याचा Official ईमेल आला नाही तोवर मला खात्री नव्हती कारण आम्हा चौघा अंतराळवीरांच स्थानकात जाण्यासाठी सिलेक्शन झाले होते आणी ट्रेनिंगही आणी सोयुझ यानातुन फक्त तिघांना जाता येत पण ऐनवेळी एका रशियन अंतराळवीराऐवजी माझी निवड झाल्याचा ईमेल आला आणी मी खरोखरच खूप आनंदी झालो माझ्या आजवरच्या मेहनतीच प्रयत्नांच चीज झाल होत आणी आता मी जाण्याच्या तयारीत आहे अत्यंत ऊत्सुक आहे

Mercia Dunn(associated press)- तुम्ही किती दिवस स्थानकात रहाणार आहात आम्हाला अस कळालय की,स्थानकात रशियन फिल्मच शुटींग होणार आहे त्यामुळे तीथे दोन टुरीस्ट अंतराळवीर येणार आहेत त्यामुळे तुमच परतीच सीट त्यांना द्यावे लागेल व तुमचा स्थानकातील मुक्काम वाढेल

Mark - हो! खरय! कदाचित अस घडेल सोयुझ यानात आधी सांगितल्या प्रमाणे तिघांनाच बसता येत त्यामुळे रशियन फिल्म निर्माते जर तिथे आले तर मला सहा महिन्यांनी पृथ्वीवर परतता येणार नाही मला जास्ती दिवस स्थानकात रहावे लागेल आणी मला जर तिथे जास्ती दिवस रहायची संधी मिळाली तर नक्कीच आवडेल कारण आधीच्या मिशनमध्ये मी तीथे फक्त सहा महिने राहिलो होतो आता ह्या दुसऱ्या मिशनमध्ये मी हि संधी स्विकारेन कारण स्थानकातील झीरो ग्रव्हिटीत जास्त दिवस राहिल्याने मानवी आरोग्य तिथल्या वातावरणाला कसा प्रतिसाद देते मानवी शरीरात तेथे तग धरून राहताना काय बदल होतात ह्या वर सध्या शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत  त्यासाठीच्या प्रयोगात ह्या आधी अंतराळवीर Scott Kelly आणी Peggy Whitson ह्यांनी वर्षभर स्थानकात राहुन आणी Jessica Meir हिनेही जवळपास वर्ष भर राहून सहभाग नोंदवला होता आता मला ती संधी मिळेल

Caustin- आता स्थानकात तुम्ही अकरा अंतराळवीर एकत्रित रहाणार आहात तेव्हा कसे adjust करणार? 

Mark- स्थानक मोठे आहे तीथे भरपूर जागा आहे अमेरिकन व रशियन segment वेगळे आहेत थोडी फार adjustment करावी लागेल अर्थात थोडे दिवसच कारण Kate Rubin's आणी दोन रशियन अंतराळवीर लवकरच पृथ्वीवर परततील तिथे प्रत्येक जण आपआपल्या कामात व्यस्त असतो कोणी व्यायाम करतो कोणी संशोधन तर कुणी ईतर कामे त्या मुळे अडचण होणार नाही पण मोकळ्या वेळी आम्ही जेव्हा एकत्र जमु तेव्हा खूप मजा येईल एरव्ही स्थानकात तीनच जण रहायचे एव्हढे जण एकत्र पहायला मिळण,रहायला मिळण आमच्यासाठी सुवर्ण संधी आहे आमच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी ते चांगलेही आहे 

Space News(Jeff Faust)- ह्या वेळेसच्या निवडीबद्दल तुम्हाला twitter वरून कळाल अस तुम्ही सांगितलत ह्या आधीच्या आणी आताच्या अंतराळ मोहिमेत काय फरक आहे?

Mark- आधी मी नवीन होतो अंतराळ प्रवासाबद्दल माहिती नव्हती पण जाण्यासाठी इतकाच ऊत्सुक होतो तेव्हा मी अननुभवी होतो पहिल्या अंतराळ प्रवासाचे क्षण थरारक होते आता मला अंतराळ प्रवासाचा अनुभव आहे स्थानकात सहा महिने रहाण्याचा तेथील वातावरणाचा अनुभव आहे ह्या वेळेस वेळेवर माझी निवड झाल्याने ऊड्डानपुर्व ट्रेनिंगसाठी वेळेवर पोहोचलो पण आधी मी पुर्ण वेळ ट्रेनिंग घेतल,अत्यंत कठीण आणी अथक परीश्रम केले आता सोप वाटल तरी तेव्हा ते खूप कठीण होत पण आताही मी तितकेच परीश्रम घेतलेत आणी मी दुसऱ्यांंदा स्थानकात जाऊन संशोधन करण्यासाठी ऊत्सुक आहे कोरोना मुळे launching एप्रिलमध्ये असल्याने पुरेसा वेळ मिळाला

Bill Hardwood (CBS News)- अंतराळवीर सातत्याने स्थानकात रहाण्यासाठी जातात अजूनही सोयुझ यानातुन रशियन भुमीवरून तुम्ही जाणार आहात त्याबद्दल सांगा

Mark- गेल्या विस वर्षापासून नासाचे  अंतराळवीर स्थानकात सातत्याने जात आहेत सद्या तरी रशियन भुमीवरून सोयुझ यानातुन अंतराळवीर स्थानकात जातात आता Space X Dragon मधुन अमेरिकन भुमीवरून अंतराळवीर स्थानकात पोहोचले आहेत ईतर देशाप्रमाणे रशियाही नासाचे पार्टनर आहेत  अमेरिकेतून अमेरिकन स्पेसक्राफ्टमधुन जायची संधी मिळाली तर आम्हाला निश्चितच आवडेल भविष्यात असे घडेल

Robert Perelman(Collect Space)- तुमची निवड ऐनवेळी झाल्यामुळे तुमचे कपडे,सामानाची तयारी करण्यासाठी वेळ मिळाला का ? स्थानकात नेण्यासाठी तुमच्या आवडीचे पदार्थ वै. ?

Mark- माझी निवड वेळेवर झाल्याने मला वेळ मिळाला नाही माझ्या मापाचा Space suiteही तयार नव्हता पण मी रशियन सहकाऱ्याचा स्पेससुट वापरला त्यांचे स्पेससुटही चांगले आहेत मला माझ्या साईजचे सुट नासा संस्थेतर्फे पाठवण्यात येणार आहेत आणी पदार्थच म्हणाल तर रशियन पदार्थही चांगले असतात स्थानकात  सध्या अमेरिकन अंतराळवीर रहात आहेत त्यामुळे तिथे अमेरिकन पदार्थ आहेतच 

सोशल मिडिया वरुन- अंतराळप्रवासात काही अडचण येईल,समस्या ऊदभवेल अशी भीती किंवा चिंता वाटते का?

Mark - आम्हाला ट्रेनिंग दरम्यान अंतराळप्रवासात काही समस्या आली तर परीस्थिती कशी हाताळायची कस नियंत्रण मिळवायच ह्याच प्रशिक्षण दिलेल असत त्यासाठी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत खूप कठीण ट्रेनिंग देऊन तयार केल जात त्यामुळे आम्ही सतत सतर्क असतो यानातुन काही toxic पदार्थ लिक होऊ नये म्हणून  यानातील सगळ्याच पार्टची,लिकेज नाही ना ह्याची कसुन तपासणी केली जाते माझ्या पहिल्या अंतराळ प्रवासाच्या वेळेस मला अशी चिंता होती पण सुदैवाने काही समस्या ऊद्भवली नाही आता मी निश्चिंत आहे मला आता पहिल्या अंतराळ  प्रवासाचा अनुभव असल्याने काही समस्या आल्यास मी ती कुशलतेने सोडवून त्यावर नियंत्रण मिळऊ शकेन

 प्रश्न -स्थानकात मानव किती काळ वास्तव्य करू शकतो? आणी स्थानकात गेल्यावर तुम्ही काय मिस करता?

Mark -सद्या तरी निश्चित काळ सांगता येणार नाही पण ह्या आधी सांगितल्याप्रमाणे अंतराळवीर एकवर्ष तिथे राहु शकतात मानवी शरीर तिथल्या वातावरणात कीतीकाळ तग धरून राहु शकते आणी सक्षम बनून तिथल्या वातावरणाला सामोरे जाऊ शकते ह्यावर संशोधन सुरू आहे कदाचित भविष्यात मानव जास्त काळ स्थानकात राहु शकेल

स्थानकात आम्ही पृथ्वीवरील वातावरण मिस करतो तिथे झीरो ग्रव्हिटीत तरंगत्या अवस्थेत राहाव लागत सरळ ऊभ राहता येत नाही चालता येत नाही हालचाली नियंत्रित होतात मानव किंवा वस्तू 360 degree कोनातून गोलाकार फिरतात त्यामुळे सतर्क रहाव लागत नाही तर कुठेही धडकुन ईजा होण्याची भीती असते कधी आपण समोर जाऊ पहातो तेव्हा फोर्सने ऊलट्या दिशेने ढकलल्या जातो सुरवातीला त्रास होतो पण नंतर सवय होते दोन्ही हात कामात असतील तर भिंतीवर पाय ठेऊन ऊभ रहाता येत कुठल्याही दिशेने वर,खाली अगदी सुपरमॅन सारख हळूहळू सगळ्याची सवय होते मग मात्र मजा वाटते पण सुरवातीला खूपच कठीण जात 

Robert Perlman-(Collect Space) -साठ वर्षांपुर्वी पहिले स्फुटनिक अंतराळयान अंतराळात झेपावले आता गेल्या विस वर्षांपासून अंतराळवीर सातत्याने स्थानकात रहात आहेत काय फरक जाणवतो 

Mark- साठ वर्षांपूर्वी अमेरिका व रशियात स्पर्धा होती आता आम्ही मिळुन अंतराळ मोहीम यशस्वी करतो नासा संस्थेत अनेक देश सहभागी आहेत आणी सद्याची मंगळ मोहीम,आगामी आर्टिमस मोहीम,Space X Crew Dragon ह्या मोहिमाच यश अभिमानास्पद आहे प्रेरणादायी आहे

Marcia Dunn-(associated press) तुम्ही कोविड लस घेतल्याच ऐकल! काय आणी कशी काळजी घेतली?

Mark- मी रशियात येण्याआधी कोविडची पहिली लस घेतली आता ह्या आठवड्यात दुसरी घेईन माझ्या रशियन सहकाऱ्यांनी घेतली की नाही हे मला माहिती नाही कारण आम्ही quarantine होतो आम्ही सर्वांनी मास्क वापरून कोरोना  lock down च्या कडक निर्बंधाचे पालन केले सुरक्षित अंतर ठेवल पण आता सोयुझ यानात मात्र कमी जागेत सुरक्षित अंतर ठेवता येणार नसले तरी आमच्या अंगावर स्पेससुट असल्याने भीती नाही 

Joey roulette-( the Verge)-  तुम्ही Space X Crew Dragon ऊड्डानाच प्रशिक्षण घेतल का?

Mark- मी सोयुझ यान ऊड्डानाच प्रशिक्षण घेतलय flight engineer असल्याने पण Space X Crew Dragonच नाही पण Crew  Dragon आतुन पाहिल खरच खूप Fantastic आहे ऊड्डानाच ट्रेनिंग घेतल नसल तरी आम्हाला त्यातील यंत्रणेची माहिती देण्यात आलीय विषेशतः Dragon मधील स्वयंचलित Docking System बद्दलची 

Stepanie- पृथ्वीवरुन अंतराळात गेल्यावर आणी तीथुन पृथ्वीवर परतल्यावर पुर्ववत व्हायला कीती वेळ लागतो? तुमचा अनुभव कसा होता ?

Mark-- आधी सांगितले त्याप्रमाणे स्थानकातील वातावरणात adjust व्हायला दोन आठवडे लागले कारण तीथे सारच तरंगत आपण सवयीने एखादी वस्तू खाली ठेवायला जातो पण थोड्या वेळाने ती वस्तू तिथे नसते ईतरत्र तरंगत जाते मग खूप शोधाव लागत मग तो ग्लास असो की,ईतर काही तसच इथल्या भींतीवर टिस्कोटेपसारख्या वस्तू चिटकवल्या तरी त्या निघून जातात पाणी,अन्न तरंगत त्यामुळे ते पकडून खाण्याची कसरत करावी लागते पण नंतर सवय होते पृथ्वीवर परतल्यावर हालचाली करताना त्रास होतो,हाडे ठिसूळ होतात डोळ्याच्या दृष्टी वर परिणाम होतो,चालण विसरत nausea होतो पण डाक्टरांच्या सल्ल्याने,औषधाने आणी घरच्यांच्या सहकार्याने दोन महिन्यात सगळ पुर्ववत होत पण ढिसुळ झालेली हाडे पुर्ववत व्हायला मला सहा महिने लागले होते

प्रश्न -तुमच्या स्थानकातील संशोधनाच स्वरूप कस असत तूम्ही कशावर प्रयोग करणार आहात

Mark- आम्ही तिथे सुरू असलेल्या सायंटिफिक प्रयोगात सहभागी होतो नासाच्या शास्त्रज्ञांनी ठरवल्यानुसार आम्ही तेथे experiment करतो झीरो ग्रव्हिटीतील मानवी शरीरात होणारे बदल नोंदवतो, samples गोळा करतो आणी त्याची माहिती पृथ्वीवरील नासा संस्थेत पाठवतो वेगवेगळ्या रोगांवर अत्याधुनिक ऊपचार शोधण्यासाठी तीथे संशोधन सुरू आहे मी तीथे अल्झायमर ह्या रोगावर संशोधन करणार आहे विसरभोळेपणासाठी मेंदुतील कोणत्या पेशी कारणीभूत आहेत झीरो ग्रव्हिटीतील वातावरणात त्या कशा बिहेव्ह करतात त्यांच्यात काय बदल होतो ह्यावर  मी संशोधन करणार आहे शीवाय ईतर संशोधनातही सहभागी होणार आहे


Wednesday 17 March 2021

अंतराळ वीर Mark Vande Hei दोन रशियन अंतराळवीरांसोबत नऊ एप्रिलला स्थानकात रहायला जाणार

 NASA Astronaut Mark Vande Hei trains for a spacewalk at NASA’s Johnson Space Center in Houston in March 2017.

अंतराळवीर Mark Vande Hei Johnson Space Center मध्ये 2017 च्या  Space Walk ट्रेनिंग दरम्यान -फोटो -नासा संस्था 

नासा संस्था- 16 मार्च

नासाचे अंतराळ वीर Mark Vande Hei रशियन अंतराळवीर Oleg Novitskiy आणी Pyotr Durbrov अंतराळ स्थानकात राहण्यासाठी जाणार आहेत शुक्रवारी नऊ एप्रिलला कझाकस्थानातील Baikonur येथुन MS-18 ह्या अंतराळ यानातुन हे तिन्ही अंतराळवीर अंतराळात उड्डाण करतील जाण्याआधी 23 मार्चला ते पत्रकारांशी लाईव्ह  संवाद साधुन ह्या मोहिमेविषयी माहिती देणार आहेत ह्या लाईव्ह संवादाचे नासा टि.वी.वरून सकाळी  8 ते 9.30 a.m. ला लाईव्ह प्रसारण  करण्यात येणार आहे नुकतेच रशियातील Star City येथील त्यांचे ऊड्डाण पुर्व ट्रेनिंग पार पडले त्यानंतर पंधरा मार्चला त्यांनी अमेरिकेतील आघाडीच्या दैनिकातील निवडक पत्रकार आणी सोशल मिडीया वरुन आलेल्या प्रश्नांना लाईव्ह संवादाद्वारे ऊत्तरे दिली

अंतराळवीर Mark Vande दुसऱ्यांदा अंतराळ स्थानकात राहायला जाणार आहेत ह्या आधी ते 13 सप्टेंबर 2017च्या  अंतराळ मोहीम 53/54 अंतर्गत स्थानकात रहायला गेले होते आणी 168 दिवस स्थानकात वास्तव्य करुन 26 Feb 2018 ला पृथ्वीवर परतले ह्या मोहिमे दरम्यान त्यांनी स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी चारवेळा  26 तास 42 मिनिटांंचा Space Walk केला होता शिवाय स्थानकातील फिरत्या प्रयोगशाळेत सुरु असलेल्या Manufacturing of fiber optic filament in micro-gravity ,improving the accuracy of implantable glucose biosensorआणी measuring the Suns energy input of Earth ह्या विषयांवरील संशोधनात सहभाग नोंदवला होता

आता अंतराळ मोहिम 64-65 च्या flight engineerपदी ते कार्यरत राहणार आहेत शिवाय स्थानकातील वास्तव्यात तेथील झिरो ग्रॅव्हीटीतील फिरत्या प्रयोगशाळे मध्ये सुरू असलेल्या संशोधनात सहभागी होणार आहेत Alzheimer's disease,Cotton Root Systemआणी Technology demonstration of Portable ultrasound device ह्या विषयीचे संशोधन ते करणार आहेत सद्या अंतराळ स्थानकातील झीरो ग्रव्हिटीतील लॅब मध्ये भविष्यकालीन मानवसहित चांद्र व मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांसाठी ऊपयुक्त सायंटिफिक प्रयोग करण्यात येत आहेत अंतराळवीरांच्या परग्रह व अंतराळ निवासात ह्या संशोधनाचा ऊपयोग होणार आहे 

अंतराळवीर Mark Vande हे मुळचे Virginia येथील रहिवाशी असुन नंतर ते New Jersey आणी Minnesota येथे स्थायिक झाले ते आर्मी मधील  रिटायर्ड ऑफिसर आहेत त्यांनी Minnesota येथील Saint John's University येथुन B.Sc Physics आणी Standford University PaloAlto California येथून M.Sc Applied Physics ची पदवी प्राप्त केली 1999 मध्ये ROTC Program अंतर्गत त्यांची Army मध्ये combat engineer पदी निवड झाली नासात निवड होण्याआधी ते New York मधील US Military Academy मध्ये  Physics चे Assistant Professor म्हणून कार्यरत होते त्याच दरम्यान त्यांची नासात अंतराळवीर म्हणून निवड झाली अंतराळ स्थानकातील वास्तव्यात ते सोशल मिडिया वर सक्रीय रहाणार असुन तेथील सर्व महिती ते त्यांच्या चाहत्यांशी शेअर करणार आहेत

Tuesday 9 March 2021

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Joe Biden ह्यांनी केले Perseverance टीमचे अभिनंदन स्वाती मोहन ह्यांच्याशी साधला संवाद

 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Joe Biden Perseverance टीमशी संवाद साधताना फोटो -नासा संस्था 

नासा संस्था -  5 मार्च 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Joe Biden ह्यांनी चार मार्चला perseverance टीमशी लाईव्ह संवाद साधून त्यांनी हि मोहीम यशस्वी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि ह्या मोहिमेचे प्रमुख नासाच्या JP.L labचे Director Mike Watkins आणि मूळच्या भारतीय वंशाच्या नागरिक स्वाती मोहन ह्यांच्याशी संवाद साधून त्यांचे अभिनंदन केले लॉक डाऊन मुळे लॅबमधील सर्वांनीच मास्क वापरले  व सुरक्षित अंतराचे निर्बंध पाळले होते 

Image

 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Joe Biden ह्यांच्याशी संवाद साधताना नासाच्या JP.L चे Director Mike Watkins 

-फोटो -नासा संस्था 

 Joe Biden -Hey Mike !How are You ?

Mike Watkins - We are very Well ! स्पेशली अठरा तारखेनंतर !

Joe Biden - तुम्ही खूप उत्कृष्ट आणी असामान्य काम केलय 

Mike -तुम्ही आम्हाला ह्या मंगळमोहिमेत सहभागी होण्याची संधी दिली आणि आज आता तुम्ही आमच्याशी बोलण्यासाठी वेळ काढला हे अत्यंत कौतूकास्पद आहे इथे आज लॅबमध्ये माझे जवळपास शंभर सहकारी मित्र आणि नासाच्या कंट्रोल रूममधील सहकारी ह्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत आम्ही सारेच तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आमच्याशी बोलण्यासाठी दिला त्याबद्दल तुमचे आभारी आहोत 

Joe Biden - खरेतर तुमच्याशी बोलण्याची संधी मिळतेय हेच माझ्यासाठी महत्वाच आहे तुम्ही खूप उत्कृष्ठ काम केलत! तुम्ही बोलण्यासाठी कितीही वेळ घ्या !

Mike - इथे मिशन प्रमुख स्वाती मोहन आहेत त्या तुमच्याशी संवाद साधतील 

Image

Perseverance मंगळयान टीम प्रमुख स्वाती मोहन ह्यांचे अभिनंदन करताना राष्ट्राध्यक्ष Joe Biden

 फोटो-नासा संस्था 

Biden - Hey Doc ! How are You !

स्वाती मोहन - I am doing very well Mr. President ! मी प्रथमच ह्या Perseverance मंगळ मोहिमेत सहभागी झाले हे माझ पहिल मिशन आहे इथे नासाच्या  JP.L लॅब मध्ये कित्येक वर्षांपासून काम करतेय ह्या मोहिमेतील टीममध्ये असामान्य बुद्धिमत्ता असलेले माझे सहकारी मला कुटुंबीयांप्रमाणे वाटतात ह्या साऱ्यांच्या साथीने हे मिशन यशस्वी झाल

Biden - तुम्ही खूप उत्कृष्ठ आणि असामान्य काम केलय तुमच्या ह्या यशाने लाखो तरुण आणि लहान मुले प्रेरित झाले आहेत त्यांच्या मनात तुम्ही आत्मविश्वासाचे बीज रुजवले अमेरिकन नागरिकांच स्वप्न  तुम्ही पूर्णत्वास आणलय तुम्ही त्यांच्यापुढे यशाचा आदर्श ठेवलाय हि यशाची पाऊलवाट त्यांना मार्गदर्शक ठरेल 

"You guys did it !" You guys gave a sense of America's back ,You did it ! तुम्ही हि मोहीम यशस्वी करून अमेरिकेला पुन्हा अवकाश विश्वात उंचावर नेलय हे उतुंग यश प्राप्त करण्यासाठी  तुम्ही अथक परिश्रम केले ह्या महामारीच्या कठीण काळातही लाकडाऊनचे कठोर निर्बंध पाळत हि मोहीम पूर्णत्वास नेली त्यासाठी मनोनिग्रह आवश्यक आहे इच्छित ध्येय साध्य करण्यासाठी मनाचा ठाम निश्चय आवश्यक असतो त्या शिवाय हे शक्य होत   नाही आपण अशा देशात राहतो जिथे लोकांच्या बुद्धिमत्तेला वाव मिळतो ह्या संधींमुळेच अमेरिकेने पुन्हा एकदा अंतराळविश्वात भरारी मारलीय तुम्ही अमेरिकेच मंगळग्रहावर Perseverance मंगळयान उतरवण्याच,चालवण्याच स्वप्न प्रत्यक्षात साकारलत हे असामान्य कर्तृत्व आहे तुमच काम खूप उत्कृष्ठ आणि कौतुकास्पद आहे ह्या कोरोना महामारीच्या काळात हे काम अशक्य होत,कठीण होत ह्याही काळात अमेरिकेचा सायन्स विषयक दृष्ठीकोन आशादायक होता तुम्ही तो सार्थ  ठरवला आणि अमेरिकेतील भावी पिढीसाठी हे प्रेरणादायी ठरेल माझ्या ऑफिस मध्ये काही लोक आले होते, त्यांनी ओव्हल ऑफिस मधल्या शेल्फमधले  दगड पाहिले मी त्यांना  गमतीने सांगितल  ते चंद्रावरचे दगड आहेत आता लवकरच तिथे मंगळावरून आणलेले दगड तुम्हाला पाहायला मिळतील आणि खरच हे स्वप्न लवकरच खर होईल मंगळ ग्रहांवरून Perseverance मंगळयानातून तिथल्या दगडांचे नमुने पृथ्वीवर आणल्या जातील हे सार तुमच्या मुळे शक्य झाल त्या मुळे पुन्हा तुमच अभिनंदन 

Thank you! Thank You! Thank You !

Monday 8 March 2021

Perseverance Mars Rover ने मारला मंगळभूमीवर फेरफटका

 This image was captured while NASA’s Perseverance rover drove on Mars for the first time on March 4, 2021.

 Perseverance यान मंगळभूमीवर गाडी वळवून जिथून फिरले तो भाग आणि यानाच्या चाकांच्या खुणा -फोटो -नासा संस्था 

नासा संस्था -5 मार्च 

नासाचे Perseverance मंगळयानाने अठरा फेब्रुवारीला मंगळावर  पोहोचताच तिथल्या लँडिंग स्थळाचे व आजूबाजूचे फोटो त्वरित पृथ्वीवर पाठवले होते आता चार मार्चला ह्या यानाने प्रत्यक्ष कामाला सुरवात करण्याआधी मंगळभूमीवर फेरफटका मारून यानाची यशस्वी mobility चाचणी केली आहे 

यानाने मंगळभूमीवर जवळपास 33 मिनिटे गाडी चालविली आणि चार मीटर अंतर पार केले त्या नंतर गाडी150 degree कोनातून वळवुन पुन्हा परतीचे अडीच मीटर अंतर पार केले त्या नंतर हे यान तात्पुरते नव्या जागेवर स्थिरावले आहे यानातील अत्याधुनिक यंत्रणा आणि कॅमेऱ्यामुळे Perseverance यानाचे Driving, Parking आणि लोकेशन कॅमेराबद्ध झाले Perseverance यानाने मंगळभूमीवर अंदाजे साडेसहा मीटर ( 21.3 feet) अंतरापर्यंत गाडी चालवून तेथील भूमीचे व आजूबाजूच्या भागाचे निरीक्षण नोंदवले आणि त्याचे फोटो व व्हिडिओ पृथ्वीवर पाठवले आहेत 

perseverance यानाची हि mobility test यशस्वी झाल्याने ह्या यानाचे mobility test bed Engineer Anais Zarifian आनंदित झाले आहेत,हि प्रत्यक्ष कामाला सुरवात कारण्याआधी Perseverance यानातील System,Subsystem आणि Instruments व्यवस्थित कार्य करत आहेत का ? हे पाहण्यासाठीची चाचणी होती एकदा का यान कामाला लागले की,कमीतकमी सहाशे छप्पन्न फूट (200 मीटर ) अंतर पार करेल आणि तेथील भूमीवरील व भूपृष्ठाखालील भागातील नमुने गोळा करेल शिवाय तेथील वातावरणाचेही निरीक्षण नोंदवेल परग्रहावर Perseverance यानाने गाडीला किक मारून अत्यंत कुशलतेने ह्या सहा चाकांच्या गाडीला मंगळ भूमीवर फिरवून आणले आहे त्यामुळे आम्ही आता निश्चिन्त झालो आहोत आमचा आत्मविश्वास वाढला आहे  पुढील दोन वर्षांच्या काळात हे यान यशस्वी कामगिरी पार पाडेल व इतर ठिकाणीही व्यवस्थित फिरेल ह्याची आम्हाला आता खात्री वाटते

Perseverance यानाने जेथून ह्या मिशनला सुरवात केली त्या मंगळभूमीवरील स्थळाला आता Octavia E Butler ह्या दिवंगत विज्ञान लेखिकेचे नाव देण्यात आले आहे Octavia ह्या  मुळच्या आफ्रिकन अमेरिकन नागरिक पण नंतर California  येथील Pasadena येथील रहिवासी होत्या त्या Hugo Award व Nebula Award पुरस्कार प्राप्त वैज्ञानिक कथा लेखिका होत्या

 Perseverance मंगळ यानाने जिथून mobility test मिशनला सुरवात केली ते मंगळभूमीवरील ठिकाण -फोटो -नासा संस्था 

NASA has named the landing site of the agency’s Perseverance rover after the science fiction author Octavia E. Butler

Tuesday 2 March 2021

Perseverance Mars रोव्हरने पाठवले मंगळावरच्या Landing site चे नवे फोटो

This is the first 360-degree panorama taken by Mastcam-Z, a zoomable pair of cameras aboard NASA’s Perseverance Mars rover.

Perseverance मंगळयानाने पाठवलेला मंगळावरील Jezero crater हा भाग व परिसर -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -25 Feb.

नासाचे Perseverance मंगळयान अठरा तारखेला मंगळावर सुरक्षित उतरले नासा संस्थेमुळे आणि perseverance मधील अत्याधुनिक यंत्रणेमुळे ह्या यानाच्या मंगळग्रहावरील वातावरण भेदून तिथल्या भूमीवर उतरतानाचे ऐतिहासिक थरारक क्षण पृथ्वीवासीयांना पाहायला मिळाले मंगळभूमीवर पोहोचताच Perseverance मंगळयानातील स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित झाली आणि मंगळयानाने मंगळावरील भूमीचे फोटो देखील पाठवले ह्या मंगळयानासोबत पाठविण्यात आलेले Ingenuity Mars Helicopter देखील यान मंगळभूमीवर पोहोचताच  यानातून बाहेर पडून तिथे स्थिरावले 

Perseverance यानाने मंगळावरील तिसऱ्या दिवशी वीस व एकवीस  तारखेला मंगळभूमीवरील आणखी फोटो काढून पाठवले आहेत ह्या फोटोत हे यान जिथे उतरले आहे तो Jezero Crater हा भाग,आजूबाजूचा परिसर आणि Perseverance यानाच्या सेल्फीचा समावेश आहे

 Perseverance मंगळ यानाच्या समोरील रोबोटिक Mast (head ) ह्या भागातील Mast Cam -Z instrument च्या साहाय्याने कॅमेरा 360अंश कोनातून फिरवून Navigationकॅमेऱ्याच्या साहाय्याने हे फोटो घेतल्या गेले आहेत Mast वर बसविलेले हे दोन कॅमेरे अत्याधुनिक यंत्रणेने युक्त आहेत ह्या कॅमेऱ्यात 3D,कलरफुल आणि लाईव्ह व्हिडीओ काढण्याची सुविधा आहे आणि दूरवरच्या आणि जवळच्या घडामोडी देखील ह्या कॅमेऱ्यामुळे चित्रित होतील ह्या कॅमेऱ्यात High resolution Image काढण्याची क्षमता असल्यामुळे मंगळावरील अत्यंत सूक्ष्म कणांचे फोटो देखील टिपल्या गेले आहेत शिवाय यानात बसविलेल्या रोबोटिक Astrobiologist यंत्रणेमुळे मंगळभूमीवरील आणि भूगर्भातील खडक,माती,मिनरल्स व इतर सूक्ष्म कणांचे फोटो अत्यंत ठळक दिसत आहेत

आधीच्या मंगळ यानांनी देखील ह्या आधी तिथले फोटो काढून पृथ्वीवर पाठवले होते पण ते आता सारखे स्पष्ट व तेथील सूक्ष्म बारकावे टिपणारे नव्हते ह्या रोबोटिक Astrobiologist मुळे आणखी फोटो व नमुने मिळतील सध्या पाठवलेल्या फोटोत मंगळावरील माती,खडक,आजूबाजूचा परिसर तेथील वातावरण आणि आटलेल्या नदी प्रवाहातील गाळातील माती नदी किनारे वै.चा भाग स्पष्ठ दिसत आहे असे मत ह्या मंगळ मोहिमेतील शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे Perseverance यानातील अत्याधुनिक यंत्रणेमुळे यानाच्या मंगळभूमीवरील प्रवेशाचा आवाजही टेप झाला आणि यानाने तो पृथ्वीवासीयांना ऐकण्यासाठी पाठवला