Sunday 27 December 2020

नासाच्या अंतराळवीरांनी स्थानकात नाताळ सण केला उत्साहात साजरा

      नासाचे अंतराळवीर Shannon ,Kate ,Soichi ,Hopkins आणि Victor स्थानकातून साधलेल्या लाईव्ह संवादा दरम्यान -फोटो नासा संस्था

नासा संस्था - 25 डिसेंबर 

सध्या अंतराळस्थानकात राहात असलेल्या मोहीम 64 च्या अंतराळवीरांनी नाताळ सण उत्साहात साजरा केला आणि पृथ्वीवरील नासा संस्थेशी लाईव्ह संवाद साधून सर्वांना नाताळच्या शुभेच्छाही दिल्या 

नाताळ साजरा करण्यासाठी सर्वच अंतराळवीरांनी त्यांची ह्या आठवड्यातील कामे लवकर आटोपून वेळ काढला आणि नाताळ साजरा केला अंतराळवीरांनी नाताळच्या पार्टीसाठी स्थानकातील डेक हॉलचा उपयोग केला तो सजवण्यासाठी सर्वच अंतराळवीरांची चढाओढ लागली होती सर्वानीच स्थानकातील मिळेल ते सामान आणून हॉल सजवला

 नासा च्या Johnson Space Center मधील प्रमुख लाईव्ह संवादादरम्यान अंतराळवीरांना डेकोरेशन दाखवताना -फोटो -नासा संस्था 

असेच चॅलेंज त्यांनी पृथ्वीवरील Houston येथील Johnson Space Center येथील मिशन कंट्रोल टीमला दिले आणि तिथल्या बिल्डिंग मध्ये असलेलेच सामान वापरून हॉल सजवायला सांगितले नासाच्या Flight Director Zebulon  ह्यांनी हे चॅलेंज स्वीकारले संस्थेतील सर्वांनी तेथील उपलब्ध सामान वापरून हॉल सजवला आणि अंतराळवीरांना दाखवला देखील त्या वेळी त्यांनी White dazzling Red आणि white coat परिधान केला आणि Flight Console वर चमकत्या माळा गुंडाळून केलेले डेकोरेशन दाखवले अंतराळवीरांसाठी सहा तारखेला स्थानकात पोहोचलेल्या कार्गोशिप मधून नाताळसाणासाठी Festive food पाठवल्याच नासाच्या Deputy Program Manager ह्यांनी ह्या वेळी सांगितल 

 नासाचे अंतराळवीर Mike Hopkins ,Victor Glover ,Kate Rubins ,Shannon Walker आणि Soichi Noguchi ह्या अंतराळवीरांनी खास व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर केला आणि सर्वांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या त्या वेळी संवाद साधताना अंतराळवीरांनी केलेली बातचीत

Mike Hopkins -आम्ही Space X Crew Dragon ला दिलेले Resilience हे नाव त्या सर्वांना समर्पित करतो ज्यांच्या मुळे आमच मिशन यशस्वी झाल आणि आम्ही इथे सुखरूप पोहोचलो आज स्थानकात उत्साहात नाताळ सण साजरा करतोय ते त्यांच्या मुळेच सर्वांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा !

Victor Glover -खरोखरच ह्या सारखे दुसरे समर्थक नाव असू शकत नाही ह्या वर्षीच्या कोरोना महामारीच्या कठीण काळात हे चॅलेंज स्वीकारून यशस्वी करण्यासारख दुसर असामान्य कर्तृत्व असूच शकत नाही आम्ही उत्साहात हा सण साजरा करतोय कारण आमच मिशन यशस्वी झालय आज माझी फॅमिली माझ्याच विचारात असेल माझ्यासाठी प्रार्थना करत असेल म्हणून मी त्यांचे फोटो प्रिंट असलेले पायमोजे घातलेत असे म्हणून त्यांनी सर्वांना पायमोजे दाखवले आणि सर्वांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या त्यांनी मिलिटरी आणि हेल्थ सर्व्हिस मेम्बर्सचे विशेष आभार मानले कारण त्यांच्या मते त्यांच्यामुळेच लोक सुरक्षित आणि फिट राहू शकतात 

अंतराळवीर Victor Glover लाईव्ह संवादादरम्यान फॅमिली फोटो प्रिंट पायमोजे घातलेले दाखवताना -फोटो -नासा संस्था

Shannon Walker -माझ्यासाठी ख्रिसमस म्हणजे फॅमिली,फ्रेंड्स ,फूड आणि सेलीब्रेशन इथे स्थानकात मला त्यांची उणीव प्रकर्षाने जाणवतेय तिथे पृथ्वीवर असताना त्यांची किंमत कळत नाही आज आम्ही आमच्या साठी आलेल्या खास पदार्थांचा जेवणात आस्वाद घेणार आहोत सर्वांना नाताळच्या शुभेच्छा !

Soichi Noguchi - आम्हा अंतराळवीरांसाठी जपानमधील शाळेतील मुलींनी खास तयार केलेले Canned mackerel आम्ही आज खाणार आहोत हे छोट आहे पण त्या साठी त्यांनी वर्षभर मेहनत घेतलीय त्या मुळे आमच्यासाठी ते मौल्यवान आहे नव्या वर्षाच कॅलेंडर बदलण्याआधी आपण नाताळ उत्साहात साजरा करू या आणि नविन वर्ष चांगल आणि निरोगी आयुष्य घेऊन येवो अशी प्रार्थना करू या ! सर्वांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा !

                  नासाचे अंतराळवीर स्थानकातून नाताळच्या शुभेच्छा देताना -फोटो -नासा संस्था

Kate Rubins - आज नाताळ सण साजरा करण्यासाठी हॉल सजवण्यासाठी अंतराळवीरांची स्पर्धा सुरु होती सर्वचजण हॉल आकर्षक सजवण्यासाठी धडपडत होते स्थानकात सगळीकडे सामान शोधत होते फिस्ट साठी तयारी करत होते त्यांनी स्थानकातील सगळीकडून मिळेल ते सामान आणून हॉल सजवलाय सारे खूप उत्साही आहेत आम्ही आनंदात आज नाताळ साजरा करतोय सर्वांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा !

ह्या सर्व अंतराळवीरांनी त्यांच्या चाहत्यांना सोशल मीडियावरून स्थानकातील नाताळ सेलिब्रेशनचा व्हिडिओ पाठवून शुभेच्छा दिल्या

Wednesday 16 December 2020

Space X Crew Dragon -3 साठी अंतराळवीरांची निवड भारतीय वंशाच्या राजा चारिंचीही निवड

composite photo showing NASA astronauts Raja Chari and Tom Marshburn, and ESA (European Space Agency) astronaut Matthias Maurer Space X Crew Dragon-3चे नासा अंतराळवीर Raja Chari Tom Marshburn आणि E.SAचे अंतराळवीर Mathias Maurer -फोटो -नासा संस्था 

नासा  संस्था - 14 डिसेंबर 

अमेरिकेचे अमेरिकन निर्मित Space X Crew Dragon आता तिसऱ्यांदा अंतराळात झेपावणार असून त्यातून अंतराळ प्रवास करणाऱ्या अंतराळवीरांची निवड निश्चित करण्यात आली आहेत अमेरिकेची नासा संस्था आणि युरोपियन E.SA संस्था ह्या दोघांनी मिळून Space X Crew Dragon -3 साठी तीन अंतराळवीरांची निवड केली आहे  नुकतेच Space X Crew Dragon Resilience मधून चार अंतराळवीर स्थानकात  सुखरूप पोहोचले आहेत ह्या आधीच्या Space X Crew Dragon च्या यशस्वी उड्डाणानंतर आता तिसऱ्यांदा Space X Crew Dragon अंतराळात झेपावणार आहे

सध्या निवड झालेल्या तीन अंतराळवीरांमध्ये भारतीय वंशाच्या राजा चारी ह्या अंतराळवीराचा समावेश आहे नुकतीच त्यांची 2024 च्या चांद्र मोहीम Artemis टीम मध्येही निवड झाली आहे 2021 मध्ये हे अंतराळवीर Space X Crew Dragon -3 मधून अंतराळ प्रवास करणार आहेत नासाचे अंतराळवीर राजा चारी,Tom Marshburn आणि E.SA चे अंतराळवीर Mathias Maurer हे तिघे अंतराळस्थानकात राहण्यासाठी जाणार आहेत ह्या मोहिमेत राजा चारी Crew Dragon च्या कमांडर पदाची तर Tom Marshburn Crew Dragonच्या Pilot पदाची जबाबदारी सांभाळतील Mathias Maurer हे मिशन specialist असतील चवथ्या अंतराळवीराची निवड अजून निश्चित झाली नसून नासा संस्था आणि त्यांचे इंटरनॅशनल पार्टनर लवकरच चवथ्या अंतराळवीराचे नाव निश्चित करतील 

राजा चारी ह्यांची हि पहिलीच अंतराळवारी असून 2017 साली त्यांची नासा संस्थेत अंतराळवीर म्हणून निवड झाली Milwaukee येथे जन्मलेले राजा चारी नंतर Lowa येथे स्थायिक झाले नासा संस्थेत येण्याआधी ते U.S.Force मध्ये कार्यरत होते नंतर त्यांची नासा संस्थेत Test Pilot पदासाठी निवड झाली त्यांना त्यांच्या करिअर मधला आकाशात 2,500 तास विमान उड्डाणाचा अनुभव आहे 

Marshburn हे North Carolina येथील रहिवासी आहेत आणि ते डॉक्टर आहेत 2004 मध्ये त्यांची नासा संस्थेत निवड झाली सुरवातीला ते नासाच्या Houston येथील Johnson Space Center मध्ये  Flight Surgeon पदावर कार्यरत होते नंतर त्यांची निवड  स्थानकातील अंतराळवीरांसाठीच्या  Medical Operation प्रमुखपदी झाली त्यांची हि तिसरी अंतराळवारी आहे ह्या आधी त्यांनी 2009 आणि 2013 साली अंतराळस्थानकात वास्तव्य केले आहे आता दुसऱ्यांदा स्थानकात ते जास्त  दिवस मुक्काम करणार आहेत 

Mathias Maurer हे  Sankt Wendel ह्या German State Of Saarland मधील रहिवासी आहेत Maurer हे देखील राजा चारी ह्यांच्या प्रमाणे प्रथमच अंतराळ प्रवास करणार आहेत अंतराळवीर म्हणून नासा संस्थेत निवड होण्याआधी त्यांनी इंजिनिअरींगच्या विविध शाखेत प्रावीण्य मिळवले असुन त्यांनी युनिव्हर्सिटी आणि E.SA संस्थेतील विविध शाखेत संशोधकपदी काम केलय 2016 मध्ये Under Sea Mission अंतर्गत त्यांनी समुद्राखाली 16 तास व्यतीत केले हि मोहीम   NASA संस्थेच्या Extreme Environment mission operations Space Analog अंतर्गत होती 

हे तिन्ही अंतराळवीर अंतराळस्थानकात सहा महिने राहून तेथील संशोधनात सहभागी होतील 2021च्या Spring मध्ये Space X Crew Dragon -3चे launching करण्यात येणार आहे सध्या अंतराळस्थानकात सात अंतराळवीर एकत्रित राहून तेथील संशोधनात सहभागी झाले आहे 

Tuesday 15 December 2020

नासाच्या चांद्र मोहिमेतील Artemis टीम मधील अंतराळवीरांची नावे जाहीर

नासा संस्था -15 डिसेंबर 

मागच्या आठवड्यात बुधवारी 9 तारखेला नासाच्या Florida येथील Kennedy Space Center मध्ये आठवी Space Council Meeting पार पडली ह्या मिटींगच्या वेळेस Vice President Mike Pence ह्यांनी 2024 मधल्या Artemis चांद्र मोहिमेतील सहभागी अंतराळवीरांची नावे जाहीर केली ह्या वेळेस बोलताना ते म्हणाले ,मी Artemis मोहिमेतील सहभागी अंतराळवीरांची नावे जाहीर करत आहे हे सर्व अंतराळवीर आपल्या देशाचे हिरो आपल्याला चंद्रावरच घेऊन जाणार नाहीत तर भविष्यातील Artemis पिढीचे प्रतिनिधित्व करणार आहेत ह्या Artemis मोहिमेत महिलेला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे ऐकून मला खूप आनंद झाला अमेरिकेतील अंतराळविश्वाचे भवितव्य उज्वल आहे ह्या टीममधील सहभागी अंतराळवीर वेगवेगळ्या भागातून आणि वेगवेगळ्या पेशातील अनुभव संपन्न तज्ञ आहेत 2024 मध्ये Artemis चंद्रावर पोहोचेल तेव्हा नासाची पहिली महिला चांद्रभूमीवर आपल्या पाऊलाचा ठसा उमटवेल आणि नव्या ऐतिहासिक युगाची सुरवात होईल 

 नासाचे अंतराळवीर 2024 मध्ये Artemis चांद्र मोहिमे अंतर्गत चंद्रावर जाणार आहेत आणि विशेष म्हणजे ह्या Artemis मोहिमेत अंतराळवीरांसोबत जाणाऱ्या महिला अंतराळवीराला चंद्रावर प्रथम पाऊलस्पर्श करण्याची संधी  देण्यात येणार आहे तीन अंतराळवीरांमध्ये एका महिला अंतराळवीराचा सहभाग असेल आणि चंद्रावर पोहोचताच ती प्रथम चांद्रभूमीवर उतरेल नंतर उर्वरित अंतराळवीर चंद्रावर उतरतील

ह्या मोहिमेबद्दल मत व्यक्त करताना नासाचे Administrator Jim Bridenstine म्हणाले आम्ही ह्या मोहिमेला परवानगी दिल्याबद्दल आणि First Woman next Man ह्या अभूतपूर्व संकल्पनेला आणि महिलेचे कर्तृत्व सिद्ध करण्याच्या संधीला मान्यता दिल्याबद्दल Mike Pence ह्यांचे आभारी आहोत शिवाय ह्या मोहिमेतील सहभागी NASA Science,Aeronautic Research Technology Development आणि Human Exploration Goals ह्या सर्व सहभागी टीमचे आभारी आहोत आम्ही सर्वचजण ह्या Artemis मोहिमेची उत्सुकतेने वाट पाहात आहोत कारण ह्यात पहिली महिला चंद्रावर उतरणार आहे 

 ह्या वेळेस Chief Astronaut Pat Forrester ह्यांनी देखील आपले मत व्यक्त केले आम्ही सर्व अंतराळवीर आम्हाला ह्या मोहिमेत सहभागी केल्याबद्दल तुमचे आभारी आहोत हि मोहीम यशस्वी करण्यासाठी चंद्रावर जाण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत Excited आहोत आम्ही त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात आहोत ह्या मोहिमेतील प्रथम महिला चांद्रभूमी स्पर्श संकल्पना नाविन्यपूर्ण आहे तिथे गेल्यावरच नाही तर तिथून पृथ्वीवर परतल्यानंतर तिथून आणलेल्या सॅम्पल्स वर संशोधन करण्याचे कामही महत्वपूर्ण आहे आता आमच्यावर हि मोहीम यशस्वी करण्याची मोठी जबाबदारी आहे आणि आम्ही ती निश्चितच यशस्वी करणार आहोत 

ह्या मोहिमेतील सहभागी अंतराळवीरांमध्ये भारतीय वंशाच्या राजा चारी आणि सध्या अंतराळस्थानकात राहात असलेल्या Kate Rubins ,Victor Glover आणि नुकतेच स्थानकातून परतलेल्या पहिल्या ओन्ली महिला स्पेस वॉकर जेसिका मीर आणि क्रिस्टिना कोच ह्यांचा समावेश आहे 

Joseph Acaba,Kayla Barron,Raja Chari ,Warren Hoburd Cristina Koch,Kjell Lindgren ,Nicole A.Mann,Anne McClain ,Jessica Meir Jasmin Moghbel,Kate Rubins ,Scott Tingle Jessica Watkins Stephanie Wilson ह्यांचा समावेश आहे

Tuesday 8 December 2020

अंतराळस्थानकात उगवलेल्या मुळ्याची Kate Rubins ने केली कापणी अंतराळवीरांनी घेतला आस्वाद

  Expedition 64 Flight Engineer Kate Rubins is pictured with radish bulbs

 नासाची अंतराळवीर Kate Rubins स्थानकातील व्हेजी चेंबर मध्ये उगवलेले मुळे दाखवताना -फोटो नासा संस्था 

नासा संस्था - 4 डिसेंबर 

 नासाच्या अंतराळ मोहीम 64 ची Flight Engineer Kate Rubins हिने नुकतीच अंतराळ स्थानकातील व्हेजी चेंबरमध्ये उगवलेल्या मुळ्याच्या रोपांना आलेल्या पानांची कापणी केली चार आठवड्यांपूर्वी अंतराळवीरांनी स्थानकातील लॅबमध्ये ह्या रोपांची लागवड केली होती मुळा व त्याची पाने आरोग्यदायी आहेत त्यात भरपूर व्हिटॅमिन्स असतात आणि मुळ्याचे उत्पादन कमी दिवसात होत असल्याने मुळ्याची निवड स्थानकातील Habitat-2 प्रोजेक्ट साठी करण्यात आली 

सध्या अंतराळस्थानकातील लॅब मध्ये पृथ्वी प्रमाणे कृत्रिम वातावरण निर्मिती करून बनविण्यात आलेल्या व्हेजी चेंबर मध्ये Habitat -02 ह्या प्रकल्पा अंतर्गत व्हेजी प्रोजेक्ट राबवण्यात येत आहे स्थानकातील झिरो ग्रॅविटीत भाजी,फळे,फुले आणि धान्य ह्यांची लागवड करून पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणात होणारी वाढ आणि स्थानकातील गुरुत्वाकर्षण विरहित वातावरणात होणारी वाढ ह्यावर निरीक्षण नोंदवून त्यावर संशोधन करण्यात येत आहे त्या साठी स्थानकातील कृत्रिम बागेतील ह्या व्हेजी चेंबरमध्ये पृथ्वीसारखेच तापमान व वातावरण तयार करण्यात आले आहे शिवाय दिवस आणि रात्रीचा आभास निर्माण करून अंधार व उजेड निर्माण करण्यात आला आहे त्या साठी रंगीत लाईटचा वापर करण्यात आला आहे अंतराळस्थानकातील अंतराळवीर त्यांच्या संशोधनातून वेळ काढून ह्या रोपांची देखभाल करतात ह्या प्रोजेक्टचा उपयोग आगामी दूरवरच्या अंतराळ मोहीमांतील अंतराळवीरांना तेथील वास्तव्यादरम्यान स्वत:चे अन्न पिकवण्यासाठी होईल

गेल्या वीस वर्षांपासून अंतराळवीर अंतराळ स्थानकात राहून मानवी आरोग्यासाठी आवश्यक असे संशोधनात्मक प्रयोग करत आहेत त्यांना पृथ्वीवरून आलेले प्रिझर्व व फ्रोजन अन्न खावे लागते त्यासाठी त्यांना पृथ्वीवर अवलंबून राहावे लागते त्यामुळे स्थानकातील झिरो ग्रॅविटीत त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम नये त्यांना ताजे अन्न व भाजीपाला मिळावा म्हणून स्थानकातील अंतराळ वीरांनी हा  व्हेजी प्रोजेक्ट सुरु केला आणि त्यात त्यांना यशही मिळाले आहे सर्वात आधी नासाच्या रेकॉर्डब्रेकर अंतराळवीर  Peggy Whitson ह्यांनी अंतराळ स्थानकात कोबीची यशस्वी लागवड केली नंतर Scott Kelly,Andrew Margen,Jessica Meir हयांनी व इतर अनेक अंतराळवीरांनी हा व्हेजी प्रोजेक्ट यशस्वी करून स्थानकात उगवलेल्या भाजीचा आस्वाद घेतला मोहीम 61चे अंतराळवीर Andrew Margen आणि Jessica Meir ह्यांनी स्थानकात उगवलेल्या Mizzuna Mustard Green ह्या भाजीची देखभाल करून त्यांचा आस्वाद घेतला होता (वाचा ह्या संदर्भातील बातमी ह्याच ब्लॉगवर)

 Expedition 64 Flight Engineer Kate Rubins photographs radish leaves

 स्थानकातील Harmony Module मधल्या Work area मधील भिंतीवर चिटकवलेली पाने दाखवताना Kate Rubins फोटो -नासा संस्था

सद्या स्थानकात राहात असलेल्या अंतराळवीरांनी विशेषतः Kate Rubins आणि जपानचे अंतराळवीर Souchi Noguchi ह्यांनी ह्या मुळ्याच्या रोपाची काळजी घेतली नुकतीच ह्या दोघांनी ह्या रोपाला आलेल्या पानांची कापणी केली त्यातील काही पाने त्यांनी पृथ्वीवर नमुना म्हणून परत आणण्यासाठी ठेवली तर काही पानांचा त्यांच्या जेवणासोबत आस्वाद घेतला हि पाने त्यांनी स्थानकाच्या Harmony Module मधील त्यांच्या Work area मध्ये लटकावून त्याचे फोटो काढले आणि पृथ्वीवरील नासा संस्थेत पाठविले ह्या दोन अंतराळवीरांनी ह्या रोपांचे फोटो त्यांच्या चाहत्यांना देखील सोशल मीडियावरून शेअर केलेत