Sunday 19 July 2020

अंतराळवीर Kate Rubin रशियन अंतराळवीर Sergey Ryzhikov आणी Sergey Kud-Sverchkov14 ऑक्टोबरला स्थानकात वास्तव्यास जाणार

 महिला अंतराळवीर Kate Rubinsरशियन अंतराळवीर Sergey Ryzhikovआणी Sergey-Kud- Sverchkov लाईव्ह संवाद साधताना -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -
नासाची महिला अंतराळवीर Kate Rubin, रशियन अंतराळवीर Sergey Ryzhikov आणि Sergey Kud Sverchkov 14 ऑक्टोबरला अंतराळस्थानकात राहण्यासाठी जाणार आहेत नुकतेच त्यांचे प्राथमिक ट्रेनिंग पूर्ण झाले असून जाण्यापूर्वी अंतिम ट्रेनिंग आधी त्यांनी त्यांच्या ह्या अंतराळ मिशन बाबत पत्रकारांशी lock down मुळे सोशल मिडिया वरून लाईव्ह संवाद साधला
त्याचा हा वृत्तांत
Howard Eunice Napa Valley - Kate तु दुसऱ्यांदा अंतराळ स्थानकात राहायला जाणार आहेस ह्या आधीच्या अंतराळ मिशनच्या अनुभवावरून काय शिकलीस ?
Kate - मी पुन्हा एकदा अंतराळ स्थानकात जाण्यासाठी खूप  Exited आहे तिथे जाऊन तिथल्या लॅब मध्ये मी मागच्या वेळेसच्या माझ्या Tool Kit वर पुन्हा प्रयोग करण्यासाठी उत्सुक आहे तिथे अंतराळवीर Chris Cassidy सोबत संशोधन करायला मला आवडेल तो सिनिअर आहे मागच्या वेळेसचा अनुभव मला नवा होता स्थानकातील झिरो ग्रॅविटीत सर्वच वस्तू तरंगतात तिथे स्थिर उभे राहता येत नाही त्या मुळे तरंगत्या अवस्थेत तिथे राहून आपल्या दैनंदिन गोष्टी करताना खूप तारांबळ होते स्थानकात एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाताना सामान घेऊन येताना तरंगत्या अवस्थेत पाणीही तरंगत असल्यान पाणी पिण,खाण आणि इतर गोष्टी करताना त्रास झाला स्थानकात वीस ठिकाणी फिरून वस्तू आणून काम करताना,संशोधन करताना सुरवातीला त्रास झाला पण नंतर दोनचार आठवड्यात मात्र हालचालीत सहजता आली आता पुन्हा एकदा हे सार अनुभवायला मी उत्सुक आहे अर्थात मागचा अनुभव कामी येईलच
Pacific Rim Midia-  Kate मागच्या वेळेसच्या 2016 च्या मिशन मध्ये तु DNA Sequence वर संशोधन केलेस त्या बद्दल सांग पृथ्वीवर त्याचा काय उपयोग होतो
Kate - मी सायंटिस्ट आहे मला मायक्रोऑरगॅनिझम्स वर संशोधन करण्यात इंटरेस्ट आहे पृथ्वीवर आपल्या अवतीभवती हवेत आपल्याला न दिसणारे अनेक सूक्ष्म जंतू फिरत असतात त्यातले सगळेच harmful नसतात पण इथे त्यांच्यावर प्रयोग करता येत नाही स्थानकातील झिरो ग्रॅविटीत त्यांच्यावर संशोधन करता येत कारण तिथे ते आपल्याला दिसतात त्यांना पकडून त्यांच्या वर संशोधन करता येत मानवी शरीरावर तिथल्या झिरो ग्रॅविटीत हे सूक्ष्म जंतू काय परिणाम करतात ह्याच निरीक्षण नोंदवून त्यावर मी संशोधन करणार आहे 
CBS -Harwood -  सध्याच्या कोरोना संसर्गाच्या सावटात ऑक्टोबर मध्ये स्थानकात तुमच लाँचिंग होणार आहे ह्या महामारीच्या काळात कोरोनाचा संसर्ग होऊ न देता काम करण कठीण आहे तुम्ही काय काळजी घेतलीत कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी तू सर्वांना काय सल्ला देशील ?
Kate - ह्या कोरोनाच्या सावटात ट्रेनिंग कठीण होत पण नासा संस्थेने घालून दिलेल्या lock down च्या निर्बंधाची कडक अंमलबजावणी करून आम्ही आमच ट्रेनिंग पूर्ण केल आम्ही मास्क वापरले सोशल distancing पाळल वेळोवेळी आमचे हात आणि hardware sanitize केले  खरेतर सर्वानीच हा संसर्ग रोखण्यासाठी lock down चे सर्व नियम पाळण आवश्यक आहे मास्कचा वापर Sanitizeचा वापर सोशल distancing पाळण आणि तसच अनावश्यक कामासाठी घराबाहेर न पडण कारण ते तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांसाठी घातक आहे
प्रश्न - लाँचिंग आधीचा काळ कसा घालवत आहेस ?
Kate -सध्या lock down सुरु आहे आधी सांगितल्याप्रमाणे आम्ही नासा संस्थेत lock downचे  सर्व नियम पाळून आमच इथल ट्रेनिंग पूर्ण केलय आता रशियातील उर्वरित ट्रेनिंग पूर्ण करणार आहोत जाण्याआधी काही काळ आम्हाला quarantine मध्ये राहाव लागेल पृथ्वीवरून स्थानकात कोरोनाचे जंतू जाऊ नयेत आणी आमची तब्येत निरोगी राहावी म्हणून हि विशेष काळजी घेतली जातेय
Eva -(सोशल मीडिया ) -तुम्ही स्थानकात केलेल्या संशोधित प्रयोगापैकी कुठल्या प्रयोगाचा उपयोग उद्योगासाठी व्हावा अस तुला वाटत
Kate - इथे स्थानकात आम्ही शेकडो प्रयोग करतो मानवी आरोग्यासाठी उपयुक्त रोगप्रतिबंधक औषध शोधण्साठी,उद्योग जगतासाठी अद्ययावत तंत्रज्ञान शोधण्यासाठी आणि पृथ्वीवरील पर्यावरणाच संतुलन योग्य राखण्यासाठी मी सायंटिस्ट आहे Micro biologist,Virologist आहे त्या मुळे tissueची अनियंत्रित वाढ रोखण्यासाठी विषेशतः Cancer वर प्रभावी औषध शोधण्यासाठी आम्ही केलेल्या संशोधीत माहितीचा ऊपयोग औषधी कंपनीत औषध तयार करण्यासाठी झालेला मला आवडेल
Russel Pound -सध्या सार जग कोरोना महामारीच्या विळख्यात सापडलय ह्या कठीण परीस्थिती बद्दल तु काय सांगशील
Kate -सध्या सार जग कोरोनाच्या संकटान त्रस्त आहे आणी सर्वच देशातील सायंटिस्ट,डॉक्टर्स कोरोना व्हायरस वर मात करण्यासाठी,औषध शोधण्यासाठी अहोरात्र मेहनत करत आहेत आजवर ईतक्या साऱ्या देशातील शस्त्रज्ञ  एकत्रितपणे एखाद्या रोगावर औषध शोधण्यासाठी संशोधन करताना आपण प्रथमच पहातोय कोरोनाचा संसर्गजन्य रोगाचा ईतक्या मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव देखील आपण प्रथमच पाहतोय तो रोखण्यासाठी, नष्ट करण्यासाठी  सगळ्या देशाचे पंतप्रधान,प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत आपण सारेही कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी lock,down पाळतोय आपल्या निरोगी आयुष्यासाठी हे अत्यावश्यक आहे पण अजूनही पुर्णपणे यश मिळाले नाही पण लवकरच त्यावर औषध शोधण्यात शास्त्रज्ञ यशस्वी ठरतील अशी मला आशा आहे
Robert -अंतराळ स्थानकाला यंदा विस वर्षे पुर्ण झाली तुझ्या पहिल्या अंतराळ मिशनचा अनुभव कसा होता आणी आताच्या मिशन मधला फरक काय सांगशील?
Kate -मी जेव्हा पहिल्यांदा स्थानकात गेले तेव्हा स्थानकाची अत्याधुनिक रचना,अद्ययावत तंत्रज्ञान पाहून मी थक्क झाले आणी स्थानक बनविणारे ईंजीनीअर,तंत्रज्ञ आणी ईतर कर्मचाऱ्यांच्या असामान्य कर्तृत्वाची जाणीव झाली तिथल्या तरंगत्या अवस्थेतील वास्तव्या बद्दल मी सांगितले आहेच पण ह्या अंतराळातील फीरत्या झीरो ग्रव्हीटीतली स्थानकातील lab अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज आहे तिथे दोनशेच्या वर सायंटिफिक संशोधनात्मक प्रयोग अनेक देशाचे शास्त्रज्ञ व अंतराळवीर एकत्रितपणे करत आहेत हे खरच कौतुकास्पद आहे पहिल्या अंतराळ वारीच्या वेळेस जाण्याआधी मी स्थानकाबद्दल ऐकले होते मी सायंटिस्ट होते अंतराळवीर झाले नव्हते तेव्हा स्थानकाबद्दल आकर्षण होत जायची ईच्छा होती पण मी अंतराळवीर होऊन खरच तीथे जाईन अस वाटल नव्हत आता स्थानकात आणखी बदल झाले आहेत ह्या वेळेस मला Space X Endeavour जवळून पहायला मिळेल
-DNA Sequence बद्दल माहिती सांग हा प्रयोग ईथे करता येत नाही का?
Kate -DNA Sequence म्हणजे मानवी शरीरातील पेशीतील जीन्सची रचना त्यातील RNA थोडक्यात पेशीच Architecture आपल्या शरीरातील पेशीतील Genes पृथ्वीवर आणी अंतराळात कसे कार्य करतात झीरो ग्रव्हीटीत त्यांच्या संरचनेत काय बदल होतात आणि त्यामुळे मानवी शरीरात काय बदल होतात हे आम्ही अभ्यासतो आणी त्यावर संशोधन करतो ईथे झीरो ग्रव्हीटीत ते शक्य होत कारण ईथल्या विपरीत परिस्थितीत Genesची रचना बदलते ते थोडेसे तुटतात,वेगळे होतात पण पृथ्वीवर परतल्यावर मात्र तीथल्या गुरुत्वाकर्षणीय वातावरणात पुन्हा जुळतात पूर्ववत होतात हे संशोधन फक्त स्थानकातील झीरो ग्रव्हीटीतच करता येत शीवाय आम्ही Twins मधल्या Genesमध्ये पृथ्वीवर व अंतराळात होणाऱ्या बदलांचे निरिक्षण नोंदवून त्यावर संशोधन करतोय अंतराळवीर Scott Kellyआणी त्यांचा भाऊ ह्या संशोधनात सहभागी झाले होते शिवाय मानवी Heart मधील पेशीतही स्थानकातील वातावरणात बदल होतात त्या मुळे मी Cardiovascular System वरही संशोधन करणार आहे
-आता तु Cold Atom वर संशोधन करणार आहेस त्या बद्दल सांग त्याचा पृथ्वीवर काय ऊपयोग होईल?
Kate -माझ्या संशोधनाचा विषय Use of Laser cold atoms for future quantum sensors हा आहे ह्याचा ऊपयोग Space exploration साठी Atomic clock साठी होईल शिवाय ऊद्योगजगतातही हे संशोधन ऊपयुक्त ठरेल
रशियन अंतराळवीर Sergey Ryzhikov हे देखील दुसऱ्यांदा स्थानकात जात असून त्यांनी देखील त्यांचा पहिला अनुभव शेअर केला ते म्हणाले लहानपणी पक्ष्यासारखे मुक्त आकाशात विहरण्याचे सर्वांचेच स्वप्न असते मला देखील असच वाटायच स्थानकात प्रवेश केल्यावर वजनरहित अवस्थेत तरंगताना माझ स्वप्न पूर्ण झाल पण त्या अवस्थेत सहा महिने राहण अत्यंत कठीण असत पण तिथून पृथ्वीच अलौकिक सौन्दर्य पाहण्याचा आनंद अविस्मरणीय असतो मी देखील पुन्हा स्थानकात जाऊन संशोधन करण्यासाठी उत्सुक आहे सध्या कोरोना मुळे lock down पाळत तयारी केली आता काही दिवस launching आधी आम्ही Quarantine मध्ये राहणार आहोत
 Sergey -Kud म्हणाले हि माझी पहिलीच अंतराळवारी असून माझे सर्व लक्ष मी माझ्या ट्रेनिंग वर केंद्रित केले असून हे ट्रेनिंग आमच्या launching च्या शेवटच्या क्षणापर्यंत सुरु राहील
ह्या दोन रशियन अंतराळवीरांनी रशियन भाषेतून संवाद साधला त्याचे इंग्लिशमध्ये रूपांतर करण्यात आले तेव्हा Kate ला तू ह्या दोघांशी कसा संवाद साधणार असे सोशल मीडियावरून विचारले असता आम्ही गरजेपुरते एकमेकांची भाषा शिकलो असं तिने सांगितले

No comments:

Post a Comment