Saturday 29 February 2020

Jessica Meir ने साधला विद्यार्थ्यांशी स्थानकातून संवाद


            अंतराळ स्थानकातून विद्यार्थोंशी संवाद साधताना Jessica Meir- फोटो-नासा संस्था

नासा संस्था - 20 Feb.
नुकताच स्थानकातून Michigan येथील East Middle School मधील विद्यार्थ्यांशी Jessica Meir हिने संवाद साधला नोव्हेंबर महिन्यात अंतराळवीरांसाठी कार्गोशिप मधून ओव्हन पाठविण्यात आला होता त्या ओव्हनचा स्थानकात कसा उपयोग होतोय,तिथे बनवलेल्या Cookies आणि Chocolate Chips मध्ये ईथल्या पेक्षा वेगळा फरक जाणवला का? ह्या विषयी जाणून घेण्याची विद्यार्थ्यांना उत्सुकता आहे त्यांना इतर प्रश्नही विचारायचे आहेत असे तिथल्या Teacher Christopher Dan ह्यांनी सांगितले आणि संवाद साधण्यासाठी वेळ दिल्याबद्दल Jessica चे आभार मानून प्रश्नांना सुरवात केली
- अंतराळवीर स्थानकात कुकीज कसे बेक करतात ?
Jessica -  हे पहा ! माझ्या डोक्यावरील स्थानकाच्या  भागातील रॅक मध्ये ओव्हन फिट केलेला आहे हा नवीन
Zero G Oven  स्थानकाच्या US Lab मध्ये बसविण्यात आलाय आम्हाला कार्गोशिप मधून आलेल्या खाण्याच्या प्रिझर्व्ह फूड पॅकेट सोबत कुकीज Dough असलेल आणि चारी बाजूला अल्युमिनियमच्या पट्ट्या बसविलेले पॅकेट पाठवण्यात आलय ते पॅकेट ओव्हन मध्ये फिट करून आम्ही बेक करू शकतो
Rachel Castle -स्थानकात  बेक झाल्यानंतर कुकीज कसे दिसतात ?
Jessica - खरतर  मी स्वत: कुकीज बेक केले नाहीत पण अंतराळवीर Luca Parmintano ह्यांनी बेक केल्या होत्या आधी सांगिल्याप्रमाणे त्यांनी पॅकेट ओव्हन मध्ये बसवून कुकीज बेक केल्या त्या तयार झाल्यावर तिथे जशा दिसतात तशाच दिसल्या थोढ्याशा फुगीर आणि डार्क कलरच्या आपण घरी बनवतो किंवा बाजारातून आणतो अगदी तशाच!
Arianna - ओव्हनमध्ये पहिल्यांदा बेक करण्यासाठी कुकीज योग्य होते का ? तुमचा अनुभव काय होता  ?
Jessica - 👌हो नक्कीच ! स्थानकाच्या मध्यवर्ती भागात US Lab मध्ये ओव्हन फिट केला आहे आम्ही सतत इथून येजा करत असतो त्यामुळे कुकीज तयार झाल्यावर त्याचा वास आम्हाला आला पृथ्वीवर बाहेरून आत आल कि बेकिंग चा वास येतो तसच घरी बनवलेल्या ताज्या कुकीज खायला सगळ्यांनाच आवडतात इथे तर जास्तच कुकीजचा खमंग वास आला कि पटकन दुधाचा ग्लास घेऊन सोबत कुकीजचा आस्वाद घ्यावा असं आम्हाला झाल
 Lenise - स्थानकात कुकीज बनवताना घरच्यासारखा अनुभव आला का ?
Jessica - मला बेक करायला खूप आवडत मी पृथ्वीवर असताना नेहमी कुकीज muffins बनवते आणि माझ्या ऑफिस मधल्या मित्रांना देते त्या मुळे इथे कुकीज बेक होताना जो वास आला तेव्हा निश्चितच मला घरी असल्यासारख वाटल मला लहानपण आठवल माझी आई उत्कृष्ठ Chef आणी baker आहे ती जेव्हा बेक करायची तेव्हा असा वास यायचा
Steve - स्थानकातील वास्तव्यात सगळ्यात जास्त कशाची आठवण येते काय मिस करता ?
Jessica -मला हा प्रश्न खूपवेळा विचारला गेलाय आणि मी सांगितलय कि मी काहीच मिस करत नाही कारण इथे येऊन राहण वेगवेगळे प्रयोग करण हे माझ स्वप्न होत आणि सुदैवाने ते पूर्ण झालय हे सार अकल्पित आहे इथून पृथ्वीच जिवंत रूप न्याहाळण आकाशातील ग्रहतारे जवळून पाहण सतत तरंगत  राहून अत्याधुनिक संशोधन करतानाचा अनुभव रोमांचक आहे जे केवळ स्वप्नात किंवा कल्पनेत मी पाहू शकले असते ते मी प्रत्यक्षात पाहतेय अनुभवतेय हे सार अचंबित करणार अदभूत वास्तव आहे हे मला तिथे नसत मिळाल मला hiking तसच skiing खूप आवडत तिथे आता बर्फ पडत असेल मला परिवारासोबत मित्रमैत्रिणींसोबत राहायला आवडत पण आता जरी हे शक्य नसल तरी तिथे आल्यावर मला हे सार पुन्हा मिळेलच पण इथले जे नवीन अविस्मरणीय अनुभव मला पुन्हा मिळतीलच अस नाही इथला मी Christina सोबत केलेला स्पेसवॉकचा अनुभव जसा नाविन्यपूर्ण होता ऐतिहासिक होता तसाच इथला झिरोग्रॅविटीतल्या संशोधनाचाही म्हणूनच मी काहीच मिस करत नाही
Taylor - स्थानकातील बेकिंग सारख्या सुविधांमुळे स्पेस ट्रॅव्हल किती सुसह्य होईल ?
Jessica - हो नक्कीच ! मी स्थानकात सात महिन्यांपासून वास्तव्य करतेय अंतराळवीर Andrew Morgan नऊ महिन्यांपासून इथे राहात आहेत Christina तर वर्षभर इथे राहून गेली आणि स्थानकात दीर्घकाळ राहताना मानसिक स्वास्थ निरोगी ठेवणे अत्यंत आवश्यक असते आणि बेकिंगमुळे आम्हाला घरच्यासारख फीलिंग आल शिवाय आगामी दूरवरच्या चांद्र किंवा मंगळ मोहिमेत अंतराळवीरांना पृथ्वीवरून येणाऱ्या अन्नावर अवलंबून न राहता स्वत: स्थानकात ते बनवता आल तर निश्चितच फायदा होईल म्हणूनच इथे Veggie project राबवल्या जातोय तिथल्यासारखी वातावरण निर्मिती करून भाज्या फळे,फुले आणि धान्य पिकविल्या जातेय आणि त्यात यशही मिळालय मी आले तेव्हा दोन प्रकारचे Lettuce लावले Mizuna Lettuce खूप चविष्ठ असतात मला Lettuce आणि salad खायला खूप आवडत इथे आम्ही दोन वेगवेगळ्या wavelength च्या lights मध्ये त्या वाढवून त्यांच्यावर संशोधन केले शिवाय आम्हाला त्यांचा जेवणात आस्वादही घेता आला इथे पृथ्वीसारखी आजूबाजूला निसर्ग नाही वातावरणही नाही त्या मुळे स्थानकातील कृत्रिम बागेत भाज्या वाढवताना त्यांची निगा राखताना त्यांची वाढ होताना पाहताना आणि त्यांचा स्पर्श अनुभवताना मानसिक शांती मिळते आणि आगामी दीर्घकाळच्या अंतराळ मोहिमांमध्ये हे आवश्यक आहे
Elena -तुम्ही स्पेसस्टेशन मध्ये कसे आलात आणि किती काळ तेथे राहात आहात ?
Jessica - आम्ही कझाकस्थानातील बैकोनूर Cosmodrome येथून सोयूझ यान आणि रॉकेट मधून सहा तासांच्या अंतराळ प्रवासानंतर अंतराळस्थानकात पोहोचलो  माझी अंतराळवीर होण्यासाठी निवड झाल्यावर मी अंतराळ वीरांसाठी आवश्यक ट्रेनिंग घेण्यासाठी Star city मधील Gogarian Cosmonauts training Center मध्ये बरीच वर्ष अत्यंत कठीणआणि कठोर ट्रेनिंग घेतल तिथला माझ्या रशियन सहकाऱ्यासोबत मी घेतलेला सोयूझ यानातील Copilot चा अनुभव  माझ्यासाठी अविस्मरणीय आहे मी मागच्या सात महिन्यांपासून इथे राहतेय मला परतण्याची घाई नाही कारण इथे मी अत्याधुनिक नाविन्यपूर्ण आणी मानवी आरोग्यासाठी उपयुक्त संशोधन करतेय इथला स्पेसवॉकचा अनुभव थरारक होता म्हणून इथून पृथ्वीवर परतताना मला वाईट वाटेल आणि इथल आयुष्य मी मिस करेन
Solan - स्थानकातून पृथ्वीवरील तुमच्या परिवारासोबत तुम्ही संवाद कसा साधता ?
 पृथ्वीवरील नासा संस्थेतील टीम आमचा आमच्या परिवारांसोबत संपर्क करून देते आणि आमच्या मानसिक आरोग्यासाठी ते आवश्यक असत कुकीज,lettuce खाणे जस आवश्यक आहे तसच परिवारासोबत बोलणही  मित्रमैत्रिणींसोबत संवाद साधल्यावर आमच मन ताजतवान होत उत्साह वाढतो आम्ही Skype किंवा Face time वरून Video Call करू शकतो दर आठवड्याला Video Conference द्वारे आम्ही आमच्या घरच्यांशी बोलतो सण ,वाढदिवस किंवा विशिष्ट प्रसंगी आम्हाला video chat साठी जास्त वेळ मिळतो
Taylor -लहानपणापासूनच तुम्ही अंतराळवीर होणार अस ठरवल होत का ? आणि अंतराळवीर नसता झाला तर काय केल असत ?
Jessica - हो ! लहानपणापासूनच मी अंतराळवीर होणार असं मनाशी पक्क ठरवल होत का कोण जाणे पण मला Exploration बद्दल आकर्षण होत निसर्ग निर्माण कसा झाला असावा ह्याच कुतूहल होत मला Biology खूप आवडत त्या मुळे आपल्या आसपासचा  निसर्ग आणि प्राण्याबद्दल एकूणच सृष्ठीतील जैववैविध्या बद्दल जाणून घ्यायच औसुक्य होत मी सायंटिस्ट आहे मी Physiologist पण आहे मी इथे येण्याआधी विपरीत परिस्थितीतील प्राण्यांच्या physiology वर संशोधन करत होते विशेतः खोल पाण्यातील Seal,Emperor Penguins बद्दल तसेच Antartic आणि उंच पर्वतावतील प्राण्यांविषयी सखोल अभ्यास करत होते समुद्राच्या तळाशी किंवा उंच पर्वता वरील वातावरणात oxygenचे प्रमाण अत्यंत कमी असत अशा वेळेस बर्फाच्छादीत पर्वतावरील Penguins किंवा Seal माशाला श्वास घ्यायला त्रास होत नाही का ? हे मला जाणून घ्यायच होत मी केलेल्या सखोल अभ्यासानंतर माझ्या लक्षात आल की,Elephant Penguins विपरीत परिस्थितीत तीस मिनिटे साठवलेल्या श्वासावर जगू शकतो तर Seal मासा दोन तासापर्यंत साठवलेला श्वास वापरू शकतो हे प्राणी इतका वेळ Oxygen कसा साठवून ठेवू   शकतात त्यावर मी संशोधन करत होते
Emily -सामान्य लोक अंतराळात कधी जाऊ शकतील ?
Jessica - आम्ही अंतराळवीर असलो तरीही स्वत:ला आम्ही सामान्यच समजतो आम्हिही तुमच्यासारखेच लहान होतो जगाच्या वेगवेगळ्या देशातून इथे आलो ते एका ध्येयातून इच्छा आणी जिद्द असली तर द्येय साध्य होतच त्यासाठी ध्येयाचा पाठपुरावा करत संघर्ष करण आवश्यक असत सध्या पृथ्वीवरील काही कंपनीज एकत्रितपणे सामान्य माणसांना अंतराळ सफर करता यावी म्हणून प्रयत्न करत आहेत आणि त्यांना यशही मिळालय नुकतीच  कमर्शियल यानाची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती पूर्वी अंतराळ प्रवास खर्चिक होता आता जसजस जास्त कंपन्या हि अंतराळ सेवा पुरवतील तसतसा हा अंतराळ प्रवास स्वस्त होईल आणि भविष्यात सामान्य लोक अंतराळ प्रवास करू शकतील
Danny -तुम्ही स्थानकात वापरत असलेल तंत्रज्ञान पृथ्वीवर काम करत तसच स्थानकातही काम करत का ?
Jessica - हो! दोन्हिकडेही सारखच ऊपयुक्त असत पृथ्वीवर आपण वापरत असलेले Video,Camera Microphone ,Satellite,Transformer,Receiver  ह्या गोष्ठी पृथ्वीसारखच ईथेही काम करतात पण ईथल्या मायक्रो ग्रव्हिटीचा परीणाम काही गोष्टी वर होतो पृथ्वीवर Oven मधून गरम हवा वर येते व हवेची सायकल तयार होते पण ईथे स्थानकात ग्रव्हिटी नसल्याने गरम हवा वर येत नाही त्यामुळे तिथल्या सारखा Oven ईथे चालत नाही ईथे Electrical heating चा ऊपयोग केल्या जातो heating मुळे 350 पर्यंत temperature निर्माण होत मग तिथल्या प्रमाणे इथेही बेकींग करता येते
Congressman Dan  -स्थानकातील वास्तव्यामुळे पृथ्वीबद्दलचा  द्रुष्टीकोन बदलला का? आणी अंतराळ संशोधन महत्वाचे का आहे?
Jessica-मोठा पण खुप छान प्रश्न आहे हा! मानवाला नेहमीच नावीन्याची आणी सृष्ठितील गुढ अनाकलनीय गोष्टी बद्दल औसुक्य आहे त्यामुळेच शास्त्रज्ञ हे गूढ उकलण्यासाठी नवनवे शोध लावतात ईथल्या संशोधनाचा वैज्ञानिक प्रगतीसाठी ऊपयोग होतो शिवाय जे संशोधन पृथ्वीवर करता येत नाहीत ते ईथल्या मायक्रो ग्रव्हिटीत करता येतात आणी अनपेक्षितपणे आपल्याला माहिती नसललेले ऊपयुक्त आणि अचंबित करणारे शोध लागतात ते मानवी विकासासाठी,आरोग्यासाठी ऊपयुक्त ठरतात
पृथ्वीबद्दलचा द्रुष्टीकोन अंतराळात आल्यावर निश्चितच बदलतो ईथुन पृथ्वीकडे पहाताना पृथ्वीच अलौकिक सौंदर्य पाहिल्याच स्वर्गीय सुख मिळत तीच महत्त्व जाणवत सद्यातरी ह्या ब्रम्हांडात सजीव सृष्ठि अस्तित्वात असलेली प्रुथ्वी हा एकमेव अद्वितीय निसर्ग सौंदर्याने नटलेला ग्रह आहे ह्याची जाणीव होते आणी आपण नशीब वान आहोत कारण आपण पृथ्वीनीवासी आहोत ह्याची प्रकर्षाने जाणीव होते शिवाय मानवी आयुष्यासाठी पर्यावरण संरक्षणाची किती गरज आहे हे पटत शिवाय ह्या अमर्याद विशाल विश्वाचा आपण कीती लहानसा भाग आहोत हेही जाणवत 

Monday 17 February 2020

रेकॉर्ड ब्रेकर Christina Kochने पृथ्वीवर परतल्यानंतर पत्रकारांशी साधला संवाद


Image
            Christina Koch आवडत्या बीचवरचा मनसोक्त आनंद लुटताना -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -१३ Feb.
स्थानकात दीर्घकाळ वास्तव्य करणारी पहिली महिला व  Only महिला स्पेसवॉकर होण्याचा ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित करून Christina Koch स्थानकातील 328 दिवसांच्या मुक्कामानंतर सहा फेब्रुवारीला पृथ्वीवर परतली
नासा संस्थेत आणि तिच्या शहरात पोहोचल्यावर तिचे उत्साहात स्वागत झाले त्यातून वेळ मिळताच Christina ने  नासाच्या Houston येथील Johnson News Room मध्ये आघाडीच्या न्युजपेपरच्या पत्रकारांशी बातचीत केली   काही पत्रकारांनी फोनवरूनही तिला प्रश्न विचारले हा संवाद चांगलाच रंगला
Christina Koch म्हणाली पृथ्वीवर परतल्यानंतरचा क्षण अत्यंत आनंददायी आणि शब्दातीत होता ! पृथ्वी सोडताना आणि आल्यानंतरचा अनुभव तितकाच अविस्मरणीय आहे तिथे स्थानकातून पृथ्वीच जिवंत रूप पाहण्याचा अनुभव स्वर्गीय आणि आल्हाददायी होता एरव्ही स्वप्नात किंवा कल्पनेत आपण पृथ्वी पाहू शकतो मी शाळेत पृथ्वीची प्रतिकृती ballच्या स्वरूपात पाहिली होती पण स्थानकातून मला दररोज अनेकदा पृथ्वीच मूर्तिमंत जीवंंत स्वरूप पाहायला मिळाल त्या साठी नासा संस्थेची मी ऋणी आहे तसच पृथ्वीवर परतल्यानंतरचा क्षणही विलक्षणच! इथे परतल्याक्षणी मी खूप दिवसांनी पुन्हा खूप लोकांना पाहिल त्यांना झालेला आनंद अनुभवला त्यांनी केलेल स्वागत अभिनंदन सारच आनंददायी होत! भारावलेल वातावरण होत ते ! मला आपली पृथ्वी किती अनमोल आहे ह्याची नव्याने जाणीव झाली इथे सहजतेने मी हालचाल करू शकले ताठ उभी राहू शकले चालू शकले हे सारच खूप सुंदर आहे साऱ्या विश्वात आपली पृथ्वी आणि पृथ्वीवर राहणारे आपण खूप भाग्यवान आहोत! स्थानकातील 328दिवस आणि आल्यानंरच्या सहा दिवसांचा अनुभव तर खूपच रोमांचकारी आहे उत्साही,आनंददायी वातावरण आहे इथे! तुम्ही आल्याबद्दल तुमचे आभार!
घरी परतल्यानंतर घरच्यांना भेटण्याचा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्याचा अनुभव शब्दातीत!तसच मी  परतल्याचा आनंद माझ्या doggy ला जास्त झाला कि मला हेही सांगण कठीण आहे इतके आम्ही दोघे खुश झालो एकमेकांना भेटून ! मी त्याच रेकॉर्डिंगही केलय माझ्या कुत्रीच नाव L.B.D आहे Humane सोसायटी मधून मी तिला आणलय ती खूप लहान आहे अस एका प्रश्नाच्या उत्तरात Christina म्हणाली
प्रश्न  -तू पृथ्वीवर परतल्यावर बीचवर गेली होतीस का?तु पोहायला गेली होतीस का? कि तुला परवानगी नव्हती ?
तिथली अविस्मरणीय आठवण सांग
Christina -मी स्थानकात असताना माझ्या आवडत्या बीचला खूप मिस केल होत तो अनुभवण्यासाठी मी उत्सुक होते म्हणून आधी मी बीचवर गेले आणि खूप enjoy केल! समुद्राची गाज  घोंघावणाऱ्या लाटांचा आवाज ऐकत लाटांचे तुषार अंगावर झेलत अनवाणी पायाने वाळूचा स्पर्श अनुभवत चालण्याचा आनंद काही औरच! मी पुन्हा नव्याने तो अनुभवलाय आवाज स्पर्श गंध सारच सुखावणार होत! माझ्या Athletic trainerला माझी समुद्राची आवड माहिती असल्यान ती मला सतत प्रेरित करत होती की,हे लवकर केलस तर तुला बीचवर लवकर जाता येईल म्हणून मी रविवारीच बीचवर जाऊ शकले
स्थानकातील वास्तव्यादरम्यान मला खूप नवे अनुभव आले सुरवातीला कठीण खूप संघर्षरतच पण अत्याधुनिक संशोधन करण्याची संधी मिळाली सतत पक्षांप्रमाणे तरंगत राहण कठीण पण मजेशीर अनुभव देणार कधीही कुठेही कसेही तरंगत राहून उभे राहण्याची कसरत करत जीवन जगण आणि संशोधन करण खरच अकल्पित! म्हणूनच तिथली एक आठवण सांगण कठीण पण पहिल्यांदा स्थानकात पाऊल ठेवण्याचा क्षण अविस्मरणीय! आता वर्षभर इथे रात्रंदिवस अशा अवस्थेत राहायचय ह्याची जाणीव झाली किती वर्षे ट्रेनिंग घेतलेल इथे राहण्याच स्वप्न प्रत्यक्षात साकार झालेल होत 
प्रश्न -स्थानकातील वास्तव्यादरम्यान तिथला तुझा कोपरा किंवा खोली तुला आपलीशी वाटायला लागली होती का इथल्या आपल्या घर किंवा ऑफिस सारखी वाटली का? अंतराळप्रवासात नेहमीप्रमाणे जास्त सामान तुला नेता आल नसेल तरीही परतताना पॅकिंग करताना नेलेल्या सामानातून,तिथे जमवलेल्या वस्तूंपैकी पृथ्वीवर आणण्या योग्य महत्वाच्या वाटल्या का ?
Christina -सुरुवातीच्या तीन महिन्यांच्या वास्तव्यातच मी त्या वातावरणात इतकी रुळले कि इथल वातावरण वेगळे आहे ह्याचा विसर  पडला ग्लास मधून पाणी न पिण,पॉकेट मधल प्रिझर्वड अन्न खाण आणि तरंगण इतक सवयीच झाल की आपण तरंगत्या अवस्थेत आहोत ह्याचा विसर पडला नवीन अंतराळवीर स्थानकात आल्यावरच त्यांचा तरंगण्याचा पहिला उत्साह पाहून अरे आपण आता सराईतपणे तरंगतोय ह्याची जाण आली
खरच !खूप सामान नेता आणता येत नाही माझ सामान एका Shoe Box मध्ये मावेल एव्हढच होत माझ सामान माझ्या आवडत्या जागेवर खूप ठिकाणी होत त्यात माझे आवडते खाद्यपदार्थही होते एक महिना आधीच मी पॅकिंगची तयारी करीत होते नको असलेले सामान तिथेच ठेवले आणि आवश्यक सामान आणले जे मला माझ्या आप्तस्वकीयांनी प्रेमाने दिले होते
प्रश्न - स्थानकातील दीर्घकाळच्या वास्तव्यानंतर आता तुझी मानसिक स्थिती कशी आहे?आणि एका मुलाखतीत तू केलेल्या चिप्स आणि साल्सा बद्दल सांगितल होतस त्या बद्दल जाणून घ्यायला आम्हाला आवडेल
Christina -मी खूप आनंदी आहे मला खूप छान वाटतय विशेष म्हणजे सुदैवाने मायक्रो ग्रॅविटीतून पृथ्वीवरच्या गुरुत्वाकर्षणीय वातावरणात परतल्यावर बहुतेकांना होणारा Motion Sickness चा त्रास मला जाणवला नाही फक्त चालताना तोल सावरायला वेळ लागतोय पृथ्वीवर परतल्यावर वर्षभर पाहिले नव्हते इतके लोक मी दोन मिनिटात पाहिले परत येण्याचा सुखदायी अनुभव होता तो त्यांच्याशी संपर्क साधताना,बोलताना मन जागृत झाल स्पर्श गंध ह्याची जाणीव नव्याने अनुभवताना जाणवल आपल्या माणसात परतण्याचा अनुभव अवर्णनीय आहे
चिप्स आणि साल्सा काही ठराविक ब्रँडचेच हवे अस नाही माझ्या सुदैवाने माझ्या माझ्या नातेवाईकांनी हे सार आधीच आणून ठेवल माझ किचन भरून गेल होत माझ्या शेजाऱ्यांनी मला खास घरी साल्सा बनवून आणून दिला आधी ह्या गोष्टींच छोट असलेल महत्व आता मात्र खूप वाढलय
प्रश्न - तूझ कर्तृत्व ऐतिहासिक आहे! तुझ्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळेल त्यांनाही तुझ्या पाऊलवाटेने जावस तुझ्या सारख व्हावस वाटेल त्यांना काय सल्ला देशील ? स्थानकातील दीर्घ वास्तव्यासाठी काय तयारी केलीस शारीरिक मानसिक ह्या साठी तू कसे मार्गदर्शन करशील ?
Christina -खूपच छान प्रश्न आहे हा ! भविष्यातील होतकरू अंतराळवीरांना मी काय सल्ला देऊ शकेन ह्याचा विचार मी पण केलाय खरतर नासा मध्ये दीर्घकाळच्या अंतराळ वास्तव्याला हे मिशन म्हणजे Sprint नसून Marathonआहे असा समज आहे माझ्या बाबतीत तर Ultra Marathonआहे हे मिशन दीर्घकाळच असल्याने आधी मानसिक तयारी करण आवश्यक असत माझ्या बाबतीत सांगायच तर मला माझी  Antarctica मोहीम आणि स्पेसस्टेशनच्या अनुभवावरून लक्षात आल कि इथे प्रत्येक क्षण महत्वपूर्ण असतो वेळ अत्यंत कमी असल्याने त्वरित निर्णय क्षमता हवी कामाप्रती निष्ठा आणि एकाग्रता आवश्यक असते हि दुर्मिळ संधी खूप कमी जणांना मिळते म्हणून आपल्याला काय मिळाल नाही ह्या पेक्षा काय करायला मिळालय ह्याचा विचार आधी करायला हव कधी कधी जीवन संथपणे चाललय अस वाटत निराशेचे क्षणही येतात तेव्हा त्यावर मात करून  आपण इथवर पोहोचलो ते सहज शक्य नाही हि दुर्मिळ संधी आपल्याला मिळाली कारण आपण त्या साठी खूप संघर्ष केलाय आपण नशीबवान आहोत आपल्याला अद्वितीय महत्वपूर्ण काम पूर्ण करायचय त्या साठी अनेक शास्त्रज्ञाचे अविरत परिश्रम आणि आशा आपल्यावर अवलंबून आहेत असा विचार करून दुप्पट शक्तीने ते कार्य पूर्णत्वास न्यायला हव पृथ्वीवर परतल्यावर इथे न मिळालेल्या गोष्टी आपल्याला परत मिळतीलच पण इथला काळ अनमोल  आहे असा विचार मी करायची मला Scott Kelly आणि Peggy Whitson ह्यांनी मोलाच मार्गदर्शन केल
माझी ऐतिहासिक कामगिरी प्रेरणादायी ठरतेय हि गोष्ठ माझ्यासाठी गौरवास्पद आहे माझा हा रेकॉर्ड मोडून कोणीतरी नवा रेकॉर्ड प्रस्थापित केलेला पाहायला मला नक्कीच आवडेल भावी अंतराळवीरांना मी हेच सांगेन कि तुमच इच्छित ध्येय साध्य करण्यासाठी चिकाटी,संघर्ष आणि अथक प्रयत्न करण आवश्यक आहे मला माझ ध्येय साध्य करण्यासाठी अनेकांनी प्रोत्साहित केल तस मीही त्यांना करेन
प्रश्न -तुझ्या अंतराळ स्थानकातील वास्तव्यात एखाधा भीतीदायक अनुभव आला का? त्या क्षणी तुला NC State ची आठवण आली होती का? तु तुझ पहिल Rock Climbing Carmichael Gym मध्ये केल होतस कि दुसरीकडे कुठे?
Christina -हो ! NC state चा माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा टप्पा आहे आणी माझ्या यशातील मोठा वाटाही
आपल्या साऱ्यांच्या Collage मधल्या दिवसाचे आयुष्यातील अनुभव अनमोल असतात त्यातुनच आपली जडण घडण होते तिथेच मी Rock Climbing शिकले Rock Climbing चा अनुभव मला अंतराळातील Space Walk मध्ये ऊपयोगी पडला  इथे Teamwork आवश्यक असत माझ्या Climbing बद्दल सांगायचे तर Stone Mountain ला आमची field trip होती तीथे पहिल्यांदा केल खूप आठवणी आहेत तिथल्या
प्रश्न -तुझ्या West Michigan ह्या शहराबद्दल,तिथल्या तुझ्या जडणघडणीबद्दल सांग तु सद्या तिथल्या विद्यार्थ्यांची  प्रेरणादायी आदर्शआहेस
Christina -तिथल्या जीवनात मला मेहनत कष्ट करण्याची शिकवण मिळाली मी लहानपणी आजी आजोबा सोबत शेतात जायचे त्यांनीच माझ्यात जीवनमूल्ये रुजवली आणी मला यशाच्या वाटेवर नेल प्रत्येक दिवस आपल्या साठी नवीन संधी घेऊन येतो आपण त्याचा ऊपयोग करायला हवा हे मी लहानपणी त्यांच्याकडूनच शिकले
प्रश्न -अंतराळवीर Scott Kelly ह्यांना त्यांच्या स्थानकातील दिर्घकालीन वास्तव्यानंतर स्नायूदुखी सांधेदुखी त्वचा आणी तळपायाची जळजळ अशा समस्यांचा त्रास झाला होता तुलाही त्रास झाला का? तुझा अनुभव काय आहे?
Christina -सुदैवान मला जास्त त्रास झाला नाही पण स्नायूदुखी जाणवतेच कारण स्थानकात तरंगत्या अवस्थेत स्नायूंची हालचाल,त्यांचा वापर होत नाही त्यामुळे परतल्यावर मुळ अवस्थेत यायला थोडा वेळ लागतो मला ताठ ऊभ राहायला लहान बाळासारखा वेळ लागला कारण सवय गेली होती दहा वर्षात आता बरच बदलल आहे स्थानकातील वास्तव्यात शरीरातील हाडे आणी स्नायूवर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून खूप काळजी घेतली जाते,व्यायाम केल्या जातो शिवाय ईथे परतल्यावर एक पुर्ण प्रशिक्षित डॉक्टरांची टिम आमचा त्रास कमी करण्या साठी कार्यरत असते ते आम्हाला इथल्या वातावरणात जुळवून घेण्यासाठी आवश्यक त्या सुचना देतात आता पुर्वी पेक्षा कमी वेळात आम्ही नार्मल होतो
प्रश्न -Jim Brownstone आगामी चांद्रमोहिमे बाबत बोलताना म्हणाले की,चंद्रभुमीवर जाणाऱ्या तीन जणात एका महिला अंतराळ वीराचा समावेश असेल आणी आमच्या संस्थेत हि पहिली महिला ऑलरेडी आहे आणी तु रेकॉर्ड ब्रेक यश प्राप्त केलस तुझ्या निवडीच्या शक्यतेबद्दलच तुझ मत काय आहे?
Christina -आगामी चांद्रमोहिमेत माझा सहभाग झाला तर माझ्या साठी ती गौरवास्पद बाब असेल कारण फक्त चंद्रावर जाऊन न येता तिथे राहुन संशोधन करण्याची संधी मिळणार आहे आणी त्या काळात मी संस्थेत कार्यरत होते हे माझ भाग्य आहे मी आनंदाने ह्या मिशन मधे सहभागी होईन पण जर संस्थेतील माझ्या ओळखीच्या दुसऱ्या महिलेची निवड झाल्यास मला तितकाच आनंद होईल
प्रश्न -स्थानकातील दिर्घकालीन वास्तव्यात तुला कोणकोणत्या आव्हानाला सामोरे जाव लागल त्या काळात तु तुझ मानसिक स्वास्थ्य कस राखलस?
Christina -अशावेळेस मी माझ लक्ष माझ्या कामावर केंद्रित केल मला मिळालेल्या अमूल्य संधीच सोन केल हि दूर्मिळ संधी मला नशिबाने,संघर्षाने मिळाली म्हणून तो क्षण वाया जाऊ न देता चिकाटीने काम पूर्ण केल त्यामुळे मला यश मिळाल 
 प्रश्न-स्थानकात करण्यात येणाऱ्या कुठल्या प्रयोगाबद्दल जाणून पृथ्वीवरच्या लोकांना आश्चर्य वाटेल तुला संधी मिळाली तर तू  कुठला प्रयोगाच प्रोग्रामिंग करशील?
Christina - खुप छान प्रश्न आहेत हे! स्थानकात सध्या खूप प्रयोग सुरू आहेत ते मानवी आयुष्यात ऊपयुक्त बदल घडवू शकतील लोकांना ह्या गोष्टीच आश्चर्य वाटेल कि,असाद्य रोगांवर ऊपयुक्त ईलाज करण्यासाठीच औषध तयार करण्यासाठी तिथे सतत प्रयोग सुरू आहेत पृथ्वीवरील वातावरणात तसे संशोधन करता येत नाही खासकरून प्रोटिन Crystalsची तिथल्या मायक्रोग्रव्हीटीत वाढ होते त्यानंतर त्यांच्यावर संशोधन करता येते जे ईथल्या वातावरणात शक्य होत नाही मी Physicistआणी Electrical Engineerअसल्याने मला programmingची   आवड आहे मला अशा संशोधनात खूप इंटरेस्ट आहे सगळ्याच प्रयोगात सहभागी व्हायला मला आवडत असे सायंटिफिक प्रयोग फक्त मायक्रो ग्रव्हीटीतच संशोधीत करता येतात शिवाय Industrial Manufacturing field Development साठीही तिथे संशोधन सुरू आहे
प्रश्न -मी meteorologist आहे तु शेअर केलेले फोटो निसर्गाचे रौद्र रुप दाखवणारे होते विषेशतः Dorian वादळाचे फोटो किंवा Australia मधील आगीचे फोटो तुला स्वतः ला स्पेसमधुन बघितलेल आणी आवडलेल वातावरण कोणत होत?
Christina -स्थानकातुन दिसणाऱ्या पृथ्वीभोवतालच्या ढगांचे विविध रंगी आकार पहायला मला खूप आवडायच एरव्ही आपण विमानातून ढग पहातो पण अंतराळातून दिसणाऱ्या ढगांच रुप अभुतपुर्व होत आणी त्यांंच्या आकारा वरूनच वाऱ्याचा अंदाज येतो त्यामुळे वातावरणातील बदलांचे निरीक्षण नोंदवून करण्यात येणाऱ्या अभ्यासाचे महत्व जाणवल
Grand Rapids-मी तुझ्या शहरातून बोलतेय,तु पाच वर्षाची असतानाच अंतराळवीर होण्याच स्वप्न बाळगल होतस तेव्हाच्या Christina बद्दल जाणून घ्यायला आम्हाला आवडेल
Christina -पाच वर्षाची Christina आजच्या ईतकी confident नव्हती मी अंतराळ वीर होईन की नाही हे निश्चित नव्हत पण ते माझ स्वप्न होत लहानपणी मी एका campला गेले होते त्या class मध्ये How to be an Astronaut ह्या बद्दल माहिती देत होते आणी फळ्या वर आवश्यक गोष्टीची लिस्ट लिहित होते सगळेजण आपल्या वहित त्या लिस्टमधल्या गोष्टींची नोंद करत होते पण मी मात्र ठरवल की लिस्ट प्रमाणे नाही करायच तर आपल्या Passion प्रमाणे आपल ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करायचा मी नासा संस्थेतील सुरळीत चालू असलेला engineeringचा job सोडला आणी Antarctica mission मध्ये सामील झाले मी आधी सांगितले त्या प्रमाणे मला तेव्हाचा Rock Climbing चा अनुभव अंतराळात Space walk च्या वेळी ऊपयुक्त ठरला खरतर ह्या Activity ची अंतराळवीर  होण्यासाठी गरज नसते पण मला मात्र ती ऊपयोगी पडली म्हणून मी म्हणेन की वेगवेगळ्या गोष्टी शिकल्या आणी अनुभवल्या पाहिजेत
प्रश्न -Christina तुला माहीत होत का तुम्ही ऐतिहासिक विक्रमाची नोंद केलीत की तुम्हाला ह्याची जाणीव करून द्यावी लागली?
Christina -नाही आम्ही नोंद ठेवत नसल्याने माहिती नव्हत आम्ही आमच काम केल मला प्रसिद्धी करायला आवडत नाही पण त्यामुळेच इतरांना प्रेरणा मिळते Space Walk च ट्रेनिंग घेतना शेवटच्या दिवसात कोणी तरी म्हणाल होत की,आतापर्यंत एकही फक्त महिला अंतराळ वीराचा Space Walk झाला नाही तेव्हा मला वाटत होत की भविष्यात अस होईल पण मीच तो करेन अस मात्र वाटल नव्हत सुदैवाने मला संधी मिळाली आणी माझ्या साठी ती गौरवास्पद संधी ठरली 

Saturday 8 February 2020

ऐतिहासिक विक्रम नोंदवून Christina Koch अंतराळवीर Alexander Skovrtsov आणि Luca Parmintanoसह पृथ्वीवर पोहचली


NASA astronaut Christina Koch gives a thumbs-up as she emerges from the Soyuz spacecraft that carried her home
         पृथ्वीवर पोहोचल्यावर अभिवादन करताना Christina Kochची आनंदी मुद्रा -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -6Feb.
नासाच्या मोहीम 61चे तीन अंतराळवीर Alexander Skovrtsov,Luca Parmintano आणि Christina Koch गुरुवारी सहा तारखेला पृथ्वीवर सुखरूप पोहचले त्यांचे Soyuz MS-13हे अंतराळयान सकाळी 12.50 मिनिटाला अंतराळस्थानकाकडून पृथ्वीकडे झेपावले आणि 4.12 a.m.वाजता पृथ्वीवर पोहोचले
कझाकस्थानातील Dzhezkazgan ह्या कॉस्मोड्रोम वर अंतराळयान पोहोचताच तिघेही पॅराशूटच्या साहाय्याने खाली उतरले तेव्हा नासा संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना स्पेस कॅप्सूल मधून बाहेर काढून उचलून आणले त्या नंतर नासाच्या तज्ञ डॉक्टरांनी त्यांची प्राथमिक तपासणी केली आणि त्यांना पाणी प्यायला दिले

 NASA astronaut Christina Koch
        पृथ्वीवर परतल्यावरचा आनंद नासा संस्थेतील सहकाऱ्यांसोबत साजरा करताना -फोटो -नासा संस्था

पृथ्वीवर सुखरूप पोहोचल्याचा आनंद ह्या तिघांच्याही चेहऱ्यावर ओसंडून वाहात होता त्या वेळेस Christina म्हणाली की अंतराळातील झिरो ग्रॅव्हीटीतून पुन्हा पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणात पोहोचल्याचा क्षण आश्चर्यकारक असतो कारण इथे सहजतेने आपण हालचाल करू शकतो आपले हातपाय वरखाली करू शकतो जमिनीवर पाऊल ठेऊन ताठ उभे राहू शकतो पण आम्हाला लगेचच अशी हालचाल करण सोप नसत कारण सतत इतक्या दिवस तरंगत्या अवस्थेत राहिल्यामुळे जमिनीवर चालण आम्ही विसरून जातो आम्हाला हे सार कठीण जात पाहू या आता कस आणि किती लवकर सार जमत ते !
Christina Koch  हिची हि अंतराळवारी ऐतिहासिक ठरली तिने ह्या अंतराळवारीत सलग 328 दिवस अंतराळ स्थानकात वास्तव्य केल शिवाय तिने Jessica Meir सोबत पहिला only महिला स्पेसवॉक यशस्वी करत ऐतिहासिक विक्रमही केला तीनवेळा फक्त ह्या दोघीनी मिळून अंतराळस्थानकाच्या तांत्रिक कामासाठी स्पेसवॉक केला ह्या अनुभवाविषयी बोलताना, Christina म्हणाली आम्ही स्पेसवॉक साठी स्थानकातून बाहेर पडलो तेव्हाचा क्षण अविस्मरणीय होता आम्ही एअर लॉक मधून बाहेर आलो बाहेर अमर्याद अंतराळ आणि प्रचंड काळोख होता आम्ही  एकमेकिंकडे पाहील तो क्षण आमच्यासाठी किती महत्वाचा आहे हे जाणवल शेवटी आम्हाला आमच ध्येय साध्य करण्याची संधी मिळाल्याचा आनंद आमच्या डोळ्यात होता तत्क्षणी आम्हाला आमच्या कर्तव्याची जाणीवही झाली! नंतर आम्ही ते काम अचानक उद्भवलेल्या अडचणीवर मात करत यशस्वीपणे पार पाडल
Christinaने अंतराळातील वास्तव्यादरम्यान सहा स्पेसवॉक केले अंतराळ स्थानकात सलग 328 दिवस राहणारी पहिली महिला अंतराळवीर होण्याचा विक्रमही Christina ने प्रस्थापित केला तिने Peggy Whitson ह्यांचा ह्या आधीचा स्थानकात जास्त दिवस राहण्याचा विक्रम मोडीत काढला आहे
नासा संस्थेतर्फे आगामी चंद्र आणि मंगळ मोहिमांसोबतच दूरवरच्या अंतराळ मोहिमामध्ये अंतराळवीरांच्या निवासासाठी मानवी आरोग्यावर जास्त दिवस राहिल्यावर होणाऱ्या परिणामांवर संशोधन करण्यात येत आहे
ह्या संशोधनात ह्या आधी अंतराळवीर Scott Kelly आणि Peggy Whitson ह्यांनी अंतराळस्थानकात जास्त दिवस राहून सहभाग नोंदवला होता त्याच संशोधनात Christinaहि सहभागी झाली अंतराळस्थानकात जास्त दिवस राहून आवश्यक ती माहिती आणि सॅम्पल्स घेऊन त्यावर तिने अंतराळात संशोधन केले आता पुढील सखोल संशोधनासाठी शास्त्रज्ञांना हि संशोधित माहितीउपयुक्त ठरेल
ह्या संशोधनांतर्गत अंतराळस्थानकातील झिरो ग्रॅव्हीटीत तरंगत्या अवस्थेत राहताना आणि तिथल्या सततच्या  isolation,radiationला सामोरे जाताना मानवी शरीरावर काय परिणाम होतो तिथल्या पृथ्वीपेक्षा वेगळी दिनचर्येत विशेषतःआहार झोप आणि दिवस रात्रीचा काळ आणि वेळेतील फरक ह्या सर्व विपरीत परिस्थितीला सामोरे जाताना मानवी वजनरहित शरीर कसा प्रितिसाद देते त्या परिस्थितीतही तग धरून राहण्याची क्षमता कशी निर्माण होते ह्याचे निरीक्षण नोंदवून त्यावर संशोधन करण्यात येत आहे
आता जास्त दिवस अंतराळस्थानकात राहिल्यावर मानवी शरीरात काय बदल होतात विशेषतः तिथे सतत तरंगत राहिल्यामुळे पायाचा वापर न झाल्याने हाडे कमकुवत होतात पाठीचा कणा ताठ अवस्थेत न राहिल्याने तो मोडण्याचा धोका निर्माण होतो शरीरातील स्नायू कमकुवत होतात हे विपरीत परिणाम होऊ नयेत आणि अंतराळातही अंतराळवीरांना सुरक्षित निरोगी आयुष्य जगता यावे त्यांना त्यांनी स्थानकात पिकवलेले ताजे अन्न खाता यावे म्हणून सतत संशोधन करण्यात येतेय आणि त्यात यशही मिळत आहे आता Scott Kelly,Peggy Whitson आणि Christina Koch ह्यांच्या स्थानकातील दीर्घकालीन वास्तव्यामुळे मानव अंतराळातीळ झिरो ग्रॅव्हीटीतील विपरीत परिस्थितीतही तग धरून राहू शकतो त्याची प्रतिकारक्षमता वाढत जाते आणि पृथ्वीवर परतल्यानंतर काही काळाने ते पुन्हा नॉर्मल आयुष्य जगू शकतात अशा निष्कर्ष शास्त्रज्ञानी काढला आहे Christina आणि Peggy ह्यांनी अंतराळ स्थानकातील झिरो ग्रॅव्हीटीत महिलांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो ह्याचे निरीक्षण नोंदवून संशोधन केले ह्या शिवाय Christina ने कॅन्सरला कारणीभूत ठरणाऱ्या प्रोटीन क्रिस्टल्स च्या अनियंत्रित वाढीवर संशोधन केले आहे अंतराळातील  वातावरणाचा त्यावर कसा आणि काय परिणाम होतो ह्याचे निरीक्षण नोंदवले शिवाय त्यावर नियंत्रण आणण्यासाठी उपाय शोधून कॅन्सर बरा व्हावा म्हणून सखोल संशोधन केले Christinaने नासाच्या 59-60-61ह्या तीन मोहिमेतील अंतराळ वीरासोबत वास्तव्य केले

 Expedition 61 crewmembers in their Sokol launch and entry suits
नासाचे  अंतराळवीर Christina Koch Luca Parmintano आणी Alexander Skvortsov फोटो -नासा संस्था

 Luca Parmintano हे दुसऱ्यांदा स्थानकात राहण्यासाठी गेले आणि त्यांनी आजवरच्या अंतराळ मोहिमांत 367दिवस वास्तव्य केले आणि स्थानकाच्या कामासाठी चारवेळा स्पेसवॉक केला
Alexander Skvortsov ह्यांची हि तिसरी अंतराळवारी होती त्यांनी आजवरच्या अंतराळ मोहिमांत 346 दिवस स्थानकात वास्तव्य केले
 ह्या तीनही अंतराळवीरांना पुढील मेडिकल चेकअप साठी कझाकस्थानातील recovery staging city येथे नेण्यात आले पूर्ण चेकअप नंतर हे तीनही अंतराळवीर नासाच्या विमानाने त्यांच्या गावी पोहचतील





Saturday 1 February 2020

सरस्वती मंदिर सव्वाशे वर्षात पदार्पण करतेय

                   सरस्वती मंदिर सव्वाशे वर्षात पदार्पण करतेय आणि त्या निमित्याने माजी विद्यार्थीनी संमेलनाचे आयोजन करण्यात आलय हि बातमी कळाली तेव्हा आमची शाळा इतक्या वर्षांची शैक्षणिक परंपरा जपत आजच्या स्पर्धात्मक युगातही यशस्वीपणे मार्गक्रमण करतेय हे पाहून आनंद झाला आणी आपल्याही नकळत आपल्या मनाच्या कोपऱ्यात बंदिस्त झालेल्या शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या
सिद्धेश्वर तळ्याच्या गणपतीघाटाजवळची आमची सरस्वती मंदिरची तीन मजली शाळा एका बाजूने किल्ल्याची भक्कम तटबंदी बाजूला चर्च समोर सेंट्रल टॉकीज आणि नवीपेठेतील मुख्य बाजारपेठ जवळच बस स्टॉप पण शाळेच्या रूटवर खूप कमी बस धावत स्वातंत्र्यापूर्वीच्या काळातील पारतंत्र्याच्या झळा सोसलेले आमचे पालक आणि शिक्षक स्वातंत्र्याची पंचवीस तीस वर्षे उलटल्यानंतरही कडक शिस्तीचे आणि कठोर मनोवृत्तीचे! टीव्हीच्याही आगमनाआधीचा तो काळ स्त्री शिक्षणासाठी प्रचंड संघर्षाचा!आणि शिक्षणच नाही तर आवडता वेष परिधान करण्यासाठी सुद्धा! नऊवारी आवडीने नेसणाऱ्या आजच्या पिढीला आश्चर्य वाटेल पण आज साठी पंच्याहत्तरीतल्या महिला सहजतेन सलवार कमीज किंवा इतर ड्रेस घालू शकतात पण तेव्हा शाळेत सलवार कमीज घालणही सहज शक्य नव्हत आज मुली सहजतेन सर्वच क्षेत्रातील शिक्षण घेऊ शकतात उच्च शिक्षणासाठी नोकरीसाठी परदेशीही सहजतेने जाऊ शकतात पण तेव्हा ग्रॅज्युएट होण देखील कित्येकांना अशक्य होत
 सोलापूरच्या वृत्तवेध ह्या लोकल चॅनल वरून सरस्वती मंदिर शाळेचा प्रसारित झालेला वृत्तांत
            व्हिडिओ -सौ .नीता येरमाळकर कडून प्राप्त
शाळेतल वातावरण कडक शिस्तीच पण शैक्षणिक बांधिलकी जपत उत्कृष्ट शिक्षण देणार तेव्हा वाळवेकर सर मुख्याधापक होते खूपच कडक आणि करारी! शाळेला पोहोचायला पाच मिनिटे जरी उशीर झाला तरी बंद फाटक उघडण्याची परवानगी देत नसत त्यामुळे सहसा कोणी उशीर करत नसत शाळा बसच्या रूटवर नसल्यामुळे कित्येक विद्यार्थिनींना पायीच अनेक चौक पार करत शाळेत पोहोचायची घाई असे कारण तेव्हा मुलींकडे किंबहूना  कित्येक पालकांकडेही बाईक किंवा सायकल नसे आता मागे वळून पाहताना आपण किती दूरवर पायी चालायचो हे पाहून आश्चर्य वाटत पण त्या मुळेच आम्हाला वेगळ्या मॉर्निग वॉकची गरज नसे
शिक्षणाप्रती असलेल्या शिक्षकांच्या प्रामाणिक बांधिलकीमुळे आमचे शिक्षक आत्मीयतेने आपुलकीने विद्यार्थ्यांना शिकवत त्या वेळेस म्हणूनच ट्युशन्सची गरजही नव्हती आणि प्रस्थही! शिक्षणाच बाजारीकरणही झाल नव्हत तेव्हा!आजकाल अनेकदा शैक्षणिक क्षेत्रातल्या भ्रष्ठाचाराच्या,शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळिमा लावणाऱ्या शिक्षकांच्या बातम्या वाचण्यात आल्या की आमच्या शाळेतल सुरक्षित आश्वस्थ वातावरण आठवत  आजकालचे सहजतेन सामूहिक कॉपी करणारे विद्यार्थी आणि त्यात शिक्षकांचाही सहभाग असल्याच्या बातम्या वाचून,पाहून आम्हाला आमच्यातली निकोप स्पर्धा आणि प्रामाणिक पणे अभ्यास करून आम्ही दिलेली कडक वातावरणातली परीक्षा आठवते मार्क वाढवणे,पेपर सेट करणे असला प्रकार तेव्हा नव्हताच कॉपी करण दूरच तसा प्रयत्नही कोणी केला तर त्याला शाळेतून बाहेर काढल जाई तेव्हा मेरिट येण फर्स्ट क्लास मिळवण खूप कठीण होत कित्येकदा पेपर बरोबर लिहूनही मार्क कमी पडले तरी पुन्हा रिटोटल करायची भीती असे कारण अजून मार्क कमी तर होणार नाहीत ना अशी भीती असायची आता मात्र एखाद्या हुशार विध्यार्थ्याला रिटोटल च काय पेपरची झेरॉक्स प्रत मिळतेय ही खरच चागंली बाब आहे आता कॉम्पुटर,मोबाईलच्या एका क्लीकवर जगभरातील हवी ती माहिती एका क्षणात मिळते पण तेव्हा आम्ही शिक्षकांनी शिकवलेल्या शिक्षणावरच अवलंबून होतो ऑफ पिरियडला लायब्ररीतील पुस्तके वाचून दाखवत तेव्हा उत्तमोत्तम लेखकांची ओळख होई त्या वेळेस सावरकरांच्या "ने मजशी ने " सारख्या देशभक्ती जागी करणाऱ्या कवितांमुळे किंवा "एक तुतारी द्या मज आणून फुंकीन मी ती स्व:प्राणांनी" सारख्या केशवसुतांच्या कवितांनी जागृती निर्माण होई आताच्या भ्रष्टाचार बोकाळलेल्या वातावरणात तर अशा कवितांची आवर्जून पुन्हा गरज निर्माण झालीय
आमच्या जोग,बाग,रिसबूड मॅडम खेळाच्या नाडकर्णी मॅडम खूप छान शिकवत त्या विद्यार्थिनीत लोकप्रिय होत्या
आमच्या दोघीतिघींचे पेपरमधले चांगले निबंध वर्गात मॅडम वाचून दाखवत आणि नीटनेटके पेपरही दाखवत त्या मुळे आपसूकच प्रोत्साहन मिळायच आमचे सायन्सचे पाठक सरही छान शिकवायचे माझ्याकडून आणि माझी मैत्रीण नेने कडून (आमच अक्षर चांगल असल्याने) सर नोट्स लीहून घेत आणि फळ्यावर चिटकवत पण अचानकच ते हे जग सोडून गेले तेव्हा त्यांच्या जाण्याच दुःख: कित्येक दिवस विद्यार्थिनींच्या मनात होत
आमच्या वेळेस विद्यार्थ्यांना कडक शिक्षा करण्याच कधी कधी छडीने मारण्याच पूर्ण स्वातंत्र्य शिक्षकांना होत पालक कधी तक्रार करत नसत आणि विद्यार्थीही,कारण घरी तक्रार केली कि डबल मार मिळण्याची भीती असे सुदैवाने आमच्यावर कधी तशी वेळ आली नाही
शाळेत शारदा,हादगा स्नेहसंमेलन उत्साहात पार पडायच शाळेच्या स्नेहसंमेलनात विद्यार्थिनींना आपली कला सादर करायची संधी मिळे अर्थात निवड शिक्षकच करत आमच्या ग्रुपचा दरवर्षी त्यात सहभाग असायचा त्या निमित्ताने निघालेल्या स्मरणिकेत लेखनाची संधी मिळे स्मरणिकेतूनच मला पहिल्यांदा लेखनाची संधी मिळाली पण मी तो लेख माझ्या लहान बहिणीच्या नावाने लिहिला होता तो छापून आला आणि सर्वांना आवडलाही होता पण तो लेख मी लिहलाय ते ना तीने सांगितले ना मी! आता खूप लेख छापून आलेत पण तेव्हाचा पहिल्या लेखाचा तो आनंद अविस्मर्णीयच!
आमच्या वर्गात दोन जोडगोळ्या होत्या लिमये भगीनी सेम टु सेम ओळखण खूप कठीण!पण एकीच्या कानात रींग होती त्यावरुन आम्ही ओळखायचो तर दुसऱ्या भट्टड भगीनी माझ्या ग्रुपमधल्या माझ्या खास मैत्रिणी तेव्हाचे शाळेपासूनचे मैत्रबंध अजूनही घट्ट आहेत!
आमच्या शाळेसमोरच सेंट्रल टॉकीज होत शहरातल्या पंधरावीस टॉकीजच्या तुलनेत साधारणच पण आतासारख शाळेला किंवा पिरियडला बंक मारून कोणी सिनेमाला जात नसत शाळेतर्फे जर एखादा चांगला सिनेमा आला तरच तो पाहायला नेत तेव्हाच ते टॉकीज आतून पाहायला मिळायच आमच फाटक मधल्या सुट्टीतही उघडत नसत त्याच कारण आमच्या शाळेतून सरला येवलेकर सिनेमात काम करण्यासाठी पळून गेली अस सांगत अर्थात ते कितपत खर होत ते सरला येवलेकरलाच माहीत
आमच्या सुदैवाने आम्हाला शशिकला ह्या अभिनेत्रीला पाहायला मिळाल होत शशिकला तेव्हा प्रख्यात सिने अभिनेत्री होती ती खूप सुंदर होती पण ती खाष्ट नणंदेच्या भूमिका जास्त करायची तीच घर आमच्या वर्गमैत्रिणीच्या घरासमोरच होत ती तेव्हा खूप बिझी होती कधी कधी ती सोलापूरला यायची एकदा ती आल्याच आम्हाला कळाल तेव्हा तिच्या आणि घरच्यांच्या परवानगीने आम्ही मैत्रिणीनी तिच्या भेटीची वेळ ठरवली पण आम्हाला जायला उशीर झाला आणि शशिकलाच्या व्यायामाची वेळ झाली त्या मुळे तिने आम्हाला दुसऱ्या दिवशी भेटायला बोलावल मात्र आम्ही तिला व्यायाम करताना मैत्रिणीच्या गच्चीवरून पाहिल गुलाबी रंगाच्या सलवार कमीज मध्ये शशिकला खूपच लहान आणि सुंदर दिसत होती तिच्याशी संवाद साधायच मात्र राहूनच गेल तिला अचानकच  मुंबईला जाव लागल पण तो क्षण अविस्मरणीय होता! तेव्हा आजच्या सारखा टीव्ही मोबाईल नव्हता
आणि सिनेतारे फक्त सिनेमातच पाहायला मिळायचे त्यांची एक झलक पाहायला मिळावी म्हणून लोक धडपडत असत आता चोवीस तास सिनेतारे सोशल मीडियावरून चाहत्यांशी संवाद साधतात त्यांच्या मुलाखती पाहायला मिळतात पण तेव्हा आतासारखी फोटोक्रांती,मोबाईल क्रान्ती झाली नव्हती आमच्या शालेय जीवनाच्या शेवटी फक्त मुंबईत टीव्ही आला होता पण आम्हाला आमच्या शाळेत टीव्हीवर लाईव्ह प्रक्षेपण कस दाखवतात ह्याच प्रात्यक्षित तिथून आलेल्या टीमने दाखवल होत
शाळेतल्या शेवटच्या वर्षी शिक्षक दिनाच्या दिवशी शिक्षकाच्या भूमिकेत शिरल्यावर शाळेचा कारभार सांभाळताना उडालेली आमची तारांबळ निरोप समारंभाचा भावुक क्षण आता पुन्हा एकदा नव्याने बाहेरच्या जगात एकट्याने पाऊल टाकायला सज्ज झालेले आम्ही  शाळेतल्या शैक्षणिक अनुभवांची शिदोरी घेऊन इथे भेटलेल्या आणि मैत्रीच्या सुरवातीच्या कोवळ्या धाग्यांनी एकत्र बांधलेल्या मत्रिणीसोबत तर कधी त्यांच्या  आठवणी सोबत! आज इतक्या वर्षांनंतरही आम्हा मत्रिणींचे बंध अजूनही घट्ट आहेत आताच्या Whats app मुळे सहजतेने रोज संपर्कात आहोत ते ह्या शाळेमुळेच आता माजी र्विद्यार्थीनी संमेलनामुळे अशा अनेक मैत्रिणी कित्येक वर्षांनी एकत्र येतील आणि संवाद साधत शाळेतल्या आठवणींना उजाळा देतीलआणि नवी ऊर्जा घेऊन बाहेरच्या जगाला सामोरे जातील !
                             "शाळेच्या 125 व्या वर्धापन दिनानिमित्य हार्दिक शुभेच्छा !"