अंतराळवीर Nick Hague ह्यांनी ह्या महिन्यात Virginia,Norfolk येथील लोकल Schools आणि youth organizations मधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्याचा हा वृतांत
सुरवातीला Mallory Dudley ह्यांनी Nick Hague ह्यांच्याशी पृथ्वीवरून लाईव्ह संपर्क करत त्यांचे स्वागत केले आणि संवादाला सुरवात झाली
अंतराळवीर स्थानकातून संवाद साधताना विध्यार्थ्यांशी संवाद साधताना -फोटो -नासा संस्था
Brandon- तुम्ही अंतराळात झेपावतानाचा अनुभव कसा होता? अंतराळ यान कीती वेगाने स्थानकाकडे ऊड्डान करत
Nick Hague - पृथ्वीवरुन अंतराळात झेपावतानाचा अनुभव विलक्षण असतो आम्ही आमच्या सीटकडे प्रचंड वेगामुळे ओढल्या जात होतो तेव्हा आमचे वजन चौपटीने वाढल्यासारखे जाणवत होते आमचे Rocket आवाजाच्या पंचवीस पट जास्त वेगाने (4G force) म्हणजे ताशी 17,500 मैंल इतक्या वेगाने अंतराळात ऊड्डान करत होत अंतराळात प्रवेशण्यासाठी ईतक्या प्रचंड वेगाची आवश्यकता असते
Paige- तुम्हाला स्थानकात झोपल्यावर ईथल्या सारखच स्वप्न पडतात का? तिथे झीरो ग्रव्हिटीमध्ये तंरगत्या अवस्थेतील पडलेली स्वप्ने वेगळी असतात का?
Nick Hague -आपल्या आजुबाजुला घडणाऱ्या गोष्टीचा आपण सतत विचार करत असतो आणी स्वप्नात आपल्याला तशाच गोष्टी दिसतात तसच ईथेही मी सतत तरंगत्या अवस्थेत वावरतो काम करतो दुसऱ्या दिवसाच्या,संशोधनाच्या कामाचा विचार करतो त्यामुळे स्वप्ने पण तशीच दिसतात आम्ही झोपतो तेव्हा crew quarters मध्ये अंधार असतो तेव्हा पूर्ण अंधार दिसतो पण मधुन,मधून radiation चा प्रकाश चमकतो तेव्हा माझी optic nerve activate होते आणी मला त्या प्रकाशाची जाणीव होते
Adair- स्थानकातील झीरो ग्रव्हिटीमध्ये पाणी सुध्दा तरंगत मग ते तुम्ही कसे पिता?
Nick Hague -हो! ईथे झीरो ग्रव्हिटीमध्ये पाण्याला control करण कठीण जात पृथ्वीवर पाणी वरुन खाली पडत ग्लास मध्ये टाकल तर त्यातच रहात पण ईथे आमच्या सारख पाणीही तंरगत सगळीकडे थेंबाच्या रुपात पसरलेल्या स्वरूपात तंरगत्या अवस्थेत फिरत रहात त्यामुळे ते पकडून पिण म्हणजे कसरतच असते पण आम्हाला स्पेशल bag दिलेली असते त्याला Straw जोडलेला असतो त्यातून थेंब,थेंब काढून आम्ही पाणी पितो ते खूप मजेशीर असत कित्येकदा जेवताना आम्ही ती मजा अनुभवतो त्यांनी विद्यार्थ्यांना पाणी पिण्याच प्रात्यक्षित करून दाखवल
Jackson- चंद्रावर मानवी वसाहतीचे plan आहेत का?स्पेस स्टेशन त्यासाठी Base Camp असेल का?
Nick Hague - अतिशय छान प्रश्न! ह्या साठी छान कारण आता त्या दृष्ठीने आमचे प्रयत्न सुरु आहेत मला माहिती नाही कि,तुम्हाला Artemis Program बद्दल माहिती आहे कि नाही Artemis ह्या चांद्रयानातुन लवकरच एक महिला व पुरुष अंतराळवीर चंद्रावर जाणार आहेत तिथे ऊतरणार सुद्धा आहेत आणि हि सुरवात असेल मग सतत प्रयोग सुरु होतील सद्या मी स्थानकातील US lab मध्ये संशोधन करतोय ईथे सगळ्या प्रकारची ऊपकरणे आहेत आणी इथे सतत शेकडो प्रयोग सुरू असतात सध्या आम्ही एक Hardware चे testing करत आहोत जे चंद्रभोवती फिरण्यासाठी ऊपयोगी पडणार आहे आगामी पाच वर्षात चंद्रावर उतरण्यासाठीचे आमचे सगळे प्रयत्न सुरु आहेत
Raquel- तुम्ही किती दिवस स्थानकात रहाणार आहात? सुरुवातीला तिथे रहाण कठीण होत का?
Nick Hague - सुरुवातीला ईथे रहाण अत्यंत कठीण जात कारण आपण आणि आपल्या बरोबर साऱ्याच वस्तू तरंगत असतात पण हळूहळू सवय होते आमच शरीर ईथल्या वातावरणात adjust होत माझ Schedule सात महिन्यांच आहे आणी आता पाच महिने झालेत दोन महिने ऊरलेत
Precious- तुम्ही स्थानकातुन तुमच्या कुटुंबियांशी कसा आणी किती वेळा संवाद साधु शकता?
Nick Hague - आम्ही आमच्या कुटुंबियांशी नियमित संवाद साधतो कारण ते आमच्या मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे तसेच आम्ही मोठ्या मिशनवर असताना घरच्यांना आमची सतत काळजी असते शिवाय आम्हालाही कुटुंबिंयाबद्दल जाणून घ्यायचे असते माझी मुले आता Texas मधील शाळा सुरु झाल्यावर शाळेत जातील हे मला इथे त्यांच्याशी फोनवर बोलल्यावरच कळल आम्ही आठवड्यातून एकदा फोनवरून Video Conference करतो ईथे Internet सुविधा आहे
Daniel- Astronaut होण्यासाठी सर्वात अवघड गोष्ट कोणती असते? तुमचा अनुभव कसा होता?
Nick Hague -Astronaut होण्यासाठी अत्यंत कठीण परिस्थितीशी सामना करावा लागतो कठोर ट्रेनिंग चिकाटीने, धैर्याने पुर्ण कराव लागत आपल ईच्छित ध्येय साध्य करण्यासाठी संकटापुढे हार न मानता जिद्दिने परीश्रम करून त्याला सामोरे जाण्याची क्षमता असावी लागते मी माझ अंतराळवीर होण्याच स्वप्न पुर्ण करण्यासाठी हे सार केल मी तिनदा प्रयत्न केला तेव्हा दहा वर्षांनी माझ स्वप्न साकार झाल पण तरीही हा प्रवास सोपा नव्हता खूप आव्हाने झेलावी लागली अंतराळ स्थानकात जाण्यासाठी ऊड्डान केल्यानंतर मागच्या वेळेस अचानक Rocket मध्ये बिघाड झाला अत्यंत कठीण प्रसंग ओढवला होता पण आम्ही त्यावर मात करून सुखरूप प्रुथ्वीकडे परतलो आणी जिद्दीने आता पुन्हा अंतराळ स्थानकात पोहोचलो
Joet-Space Station मध्ये तुमच्या सोबत प्राणीही रहातात का?तिथे कुत्रा कींवा ईतर पाळीव प्राणी आहेत का?
Nick Hague - ईथे पाळीव प्राणी नाहीत पण आमच्या सोबत ऊंदीर,Spider व काही micro organisms आहेत त्यांच्यावरही आमच्या शरीरावर होतो तसा झीरो ग्रव्हिटीचा परीणाम होतो का ह्यावर आम्ही सतत निरीक्षण नोंदवुन संशोधन करत असतो
Cora- तुम्ही स्थानकात बागकाम कसे करता? रोपांची लागवड कशी करता?
Nick Hague - आमच्या मानसिक स्वास्थ्यासाठी,विरंगुळ्यासाठी आणी आम्हाला ताजी भाजी मिळावी म्हणून स्थानकात व्हेजी प्रोजेक्ट यशस्वीपणे राबविण्यात येतोय त्यासाठी खास व्हेजी चेंबर बनविण्यात आला असून त्यात पृथ्वीप्रमाणे वातावरण निर्माण करून त्यात रंगीत लाईटची सोय करून ऊजेड,अंधार व योग्य तापमानाची सोय केली जाते शिवाय पाणी न तरंगता झाडाच्या मुळाकडे पोहोचेल ह्याचीही सोय केली आहे सध्या lettuce आणी ईतर भाज्याची लागवड केली आहे आम्ही त्यांची नियमितपणे देखभाल करतो कारण आगामी दुरवरच्या अंतराळ मोहीमामध्ये अंतराळवीरांना त्याचा ऊपयोग होईल सध्या आम्ही पृथ्वीवरुन आलेले Frozen Food खातो
Briona- तुम्ही स्थानकात तुमच्या कोणकोणत्या वैयक्तीक गोष्टी नेऊ शकता पुस्तके,I pad नेऊ शकता का?
Nick Hague -काही वैयक्तिक गोष्टी आम्ही ईथे आणु शकतो मी बऱ्याच आवश्यक वस्तू आणल्यात त्या माझ्या कुटुंबियांशी संबंधीत आहेत ईथे पुस्तके,I pad आणु शकतो मी ईथे तिथल्या सारखेच रिकाम्या वेळात वाचन करतो त्यामुळे ज्ञानात भर पडते आणि आपण अपडेट रहातो तुम्हीही समर व्हेकेशन मध्ये वाचता ना? वाचन खूप आवश्यक आहे
Savannah- Space Station मधून तुम्ही कोणती अद्भुत गोष्ट पाहिलीत ?
Nick Hague -खरतर इथल सतत तरंगत राहण त्याच अवस्थेत सारी काम करण झोपण,जेवण,संशोधन सारच अद्भुत आहे त्या बद्दल मी वेळोवेळी सांगितल पण आहेच पण सर्वात अद्भुत गोष्ट म्हणजे रिकाम्या वेळी स्थानकाच्या Cupola मधून पृथ्वीकडे पाहण खरच खूप अद्भुत विस्मयकारी आणि सुंदर गोष्ट आहे ती ! आपली पृथ्वी हळू,हळू सरकताना पाहण्याचा आनंद विलक्षण आहे एका क्षणात इथून कॅनडा दिसत तस मेक्सिकोही दिसत तेही एकाच वेळेस ! इथून पृथ्वीवर वाहणाऱ्या नद्या,पर्वत पाहताना क्षणभर भान हरपत आपणही ह्या पृथ्वीचा एक भाग आहोत हि जाणीव विलक्षणच !
Truman - Galieli library New Jersey -तुमची तिथली दिनचर्या पृथ्वीवर असते तशीच आहे कि वेगळी ?
Nick Hague -आम्ही सहाही जण सकाळी सहाला उठतो आणि फ्रेश होऊन साडेसातला कामाला सुरवात करतो संध्याकाळी साडे सातला आमच काम संपत नंतर आमची मिटिंग होते आणि दिवस संपतो विकेंडला मात्र आम्हाला मोकळा वेळ मिळतो आम्हाला सपोर्ट करण्यासाठी पृथ्वीवरून जगभरातून लाखो शास्त्रज्ञांची टीम काम करत असते आणि सगळ्यांचा ताळमेळ जुळावा म्हणून आम्ही Greenwich Standard Time fallow करतो
Mckenzie- पृथ्वी व्यतिरिक्त तुमचा आवडता दुसरा ग्रह कोणता आहे ?
Nick Hague - हा प्रश्न खरच अवघड आहे कारण स्थानकातून पाहताना पृथ्वी एव्हढा सुंदर दुसरा कुठलाच ग्रह नाही असं वाटत आता आपण चंद्राकडे वाटचाल करतोय चांद्रमोहीम पूर्ण करून मग मंगळाकडे वाटचाल करायचीय त्या मुळे माझा आवडता दुसरा ग्रह मंगळ आहे
Henry- Florida -तुम्ही स्थानकात आजारी पडता का ? तिथे पृथ्वीपेक्षा वेगळे जंतू आहेत का ?
Nick Hague - हो ! आम्ही इथेही आजारी पडू शकतो पण आम्ही सारेच जण आजारी पडू नये म्हणून स्वत:ची खूप काळजी घेतो लाँचिंग आधी आम्हाला Quarantine मध्ये ठेवले जाते म्हणजे आम्ही कमीतकमी लोकांच्या संपर्कात राहू आणि पृथ्वीवरील कमीतकमी जंतू आमच्यासोबत अंतराळस्थानकात प्रवेश करतील पृथ्वीवरील टीम आमच्या सर्वांची खूप काळजी घेत असते
Scarlet -तुम्ही तुमच मिशन संपवून पृथ्वीवर परतल्यानंतर नार्मल व्हायला किती वेळ लागतो ?
Nick Hague -पृथ्वीवर परतल्यानंतर पंचेचाळीस दिवसांचा Rehabilitation चा प्रोग्राम असतो इथे स्थानकात तरंगत्या अवस्थेत हालचाल कमी असते त्या मुळे शरीर,स्नायू व हाडे कमजोर होतात तसे होऊ नये म्हणून आम्ही इथे रोज दोनतास ट्रेडमिलवर व्यायाम करतो पण झिरो ग्रॅव्हिटी मध्ये शरीरात बदल होतातच म्हणून पृथ्वीवरील वातावरणाशी जुळवून घ्यायला वेळ लागतो अंतर्गत शारीरिक बदल चार महिन्यात नॉर्मल होतात बाकी महिना दीड महिना नार्मल व्हायला लागतो
Giovanna -स्थानकात अवघड व धोकादायक अशा कोणत्या गोष्ठी तुम्हाला कराव्या लागतात ?
Nick Hague -इथे माझ्या आजूबाजूला असंख्य उपकरणे आहेत त्यातच आम्ही वावरतो त्या मुळे धोका हा असतोच पण सगळ्यात अवघड आणि धोकादायक गोष्ट म्हणजे स्थानकाबाहेर अंतराळातील Space Walk करण हे तितकच आव्हानात्मक आणि रिस्की आहे त्या साठी आधीपासून स्पेससूटची तयारी करावी लागते खरतर ह्या स्पेससूट मध्ये आम्ही एखाद्या सटलाईट सारखे असतो आम्हाला लागणाऱ्या सगळ्या आवश्यक गोष्टी स्पेससूट मध्ये असतात माझा Wingman माझ्या बरोबर काम करत असतो पृथ्वीवरची एक टीमही मला सपोर्ट करत असते त्या वेळी अंतराळातील अनंत पोकळीत वर ताऱ्यांची साथ अन खाली पृथ्वी अशा वातावरणात काम करण्याचा अनुभव रोमांचकारी आणि अद्भुत असत
शेवटी Nick Hague ह्यांचे आभार मानून मुलाखत संपली

No comments:
Post a Comment