InSight मंगळयानाच्या रोबोटिक आर्मचा कॅमेरा मंगळावरील सूर्योदयाचा क्षण टिपताना -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -1 मे सध्या मंगळावर कार्यरत असलेल्या नासाच्या InSight मंगळ यानाने मंगळावरील सूर्योदय आणि सूर्यास्ताचे नयनरम्य फोटो टिपले असून ते त्वरित पृथ्वीवर पाठवले आहेत
InSight मंगळयान अत्याधुनिक यंत्रणेने सज्ज असून ह्या यानातील अध्ययावत यंत्र सामुग्री मंगळावरील सूक्ष्म घडामोडींचे निरीक्षण करून त्याची माहिती पृथ्वीवर त्वरित पाठवण्याचे कार्य यशस्वी पणे पार पाडत आहे
नुकतेच 24 आणि 25 एप्रिलला InSight मंगळ यानाने Landerच्या रोबोटिक आर्मवर बसविलेल्या अत्याधुनिक कॅमेऱ्याच्या साहाय्याने तेथील आकाशातील सूर्योदय आणि सूर्यास्ताचे फोटो अचूक टिपले आहेत
मंगळावरील दीनगणनेनुसार InSight मंगळयानाच्या 145 व्या मंगळदिनी मंगळ वेळेनुसार पहाटे 5.30 वाजता सूर्योदयाचा नयनरम्य क्षण कॅमेराबद्ध केला आणि संध्याकाळी मंगळवेळेनुसार 6.30 वाजता सूर्यास्ताचा सुंदर क्षणही अचूक टिपला हे फोटो अप्रतिम आहेतच शिवाय InSight मंगळयानाने त्यावेळेसच्या मंगळावरील आकाशातील सूर्याभोवतीच्या ढगांच्या रंगीबिरंगी छटा त्यांची हालचाल आणि रंगांची मनोहारी उधळणही अचूक टिपलीय
InSight मंगळयानाच्या रोबोटिक आर्मच्या कॅमेऱ्याने टिपलेला मंगळावरील सूर्यास्त -फोटो-नासा संस्था
InSight मंगळयानाने ह्या नैसर्गिक क्षणांचे टिपलेले हे फोटो प्राथमिक स्वरूपातील आहेत त्या फोटोमध्ये आकाशातील नैसर्गिक घडामोडींच डिटेल अवलोकन करता येत असले तरीही शास्त्रज्ञांनी त्या फोटोवर कलर प्रक्रिया केली आहे त्यामुळे हे फोटो मानवी डोळ्यांना जास्तच आकर्षक दिसत आहेत
पृथ्वीप्रमाणेच मंगळावरील सूर्योदय आणि सूर्यास्त सुंदर दिसतोय पण सूर्याचा आकार मात्र पृथ्वीवरून दिसतो तेव्हढा मोठा दिसत नाही कारण मंगळ ग्रह पृथ्वीच्या तुलनेत सूर्यापासून लांब अंतरावर आहे त्या मुळे तिथून सूर्य 2/3 एव्हढा दिसतो
InSight मंगळ यानाने दुसऱ्यांदा ह्या दैनिक घडामोडी कॅमेऱ्यात कैद केल्या आहेत ह्या आधी दोन आणि दहा मार्चला InSight च्या कॅमेऱ्याने practice shot घेण्यात आले ते फोटो पाहून त्यावर चर्चा करून त्यानंतर शास्त्रज्ञांनी पुन्हा मंगळावरील सूर्योदय आणि सूर्यास्त कॅमेराबद्ध करण्याचे ठरविले आणि हे फोटो घेण्यात आले
InSight मंगळयानाने टिपलेले मंगळावरील आकाशातील ढगांची हि नयनरम्य रंगांची उधळण -फोटो -नासा संस्था
ह्या आधीच्या Viking-1 missionमध्ये 21Aug.1976 ला आणि Viking-2 missionमध्ये 14 जून 1978 मध्ये मंगळावरील सूर्योदय आणि सूर्यास्ताचे फोटो कॅमेराबद्ध करण्यात आले होते त्या नंतरच्या Spirit,Opportunity, Curiosity Rover ह्या मंगळयानांनी देखील मंगळावरील सूर्योदय आणि सूर्यास्ताचा क्षण टिपला आणि त्याचे
Recording ही करण्यात आले होते.
No comments:
Post a Comment