Wednesday 1 May 2019

मंगळाला बसले भूकंपाचे धक्के InSight मंगळयानाने भूकंपाचा आवाज केला रेकॉर्ड

       नासाच्या मंगळावर कार्यरत InSight यानातील Seismometer वरील थर्मल शिल्ड -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -23 एप्रिल
भविष्यवेत्यांनी मंगळाला पत्रिकेतील अपशकुनी ग्रह म्हणून कितीही वाईट ठरवले असले तरी शास्त्रज्ञ मात्र मंगळ मोहीम जास्त जोमाने राबवत आहेत आणि सुदैवाने त्यांच्या प्रयत्नांना यश तर मिळत आहेच शिवाय मंगळाविषयीचे गैरसमज दूर करणारे पुरावेही प्राप्त होत आहेत
मंगळावर पुरातन काळी सजीव सृष्टी अस्तित्वात होती पण कालांतराने तिथले वातावरण नष्ट होत गेल्याने सजीव सृष्टीही नष्ट झाली परंतु तिथे अस्तित्वाचे पुरावे मात्र तसेच राहिले नासाच्या मंगळ मोहिमे अंतर्गत मंगळावर  पोहोचलेल्या मंगळ यानाने तिथे असलेल्या दऱ्या,खोरे नदयांचे आटलेले प्रवाह पाण्याचे स्रोत,नदीकाठच्या मातीचे दगडांचे अवशेष खडकातील केमिकल्स,वायू ह्यांचे संशोधित नमुने शोधून त्याचे फोटो आणि माहिती वेळोवेळी पृथ्वीवर पाठवली आहे त्या मुळेच मंगळही पृथ्वीप्रमाणे सूर्यमालेतील एक ग्रह आहे तिथले वातावरण मात्र अत्यंत थंड आहे त्याच्या कक्षेतील विरळ वातावरणात ग्रॅव्हिटी अत्यल्प आहे तिथे वादळी वारे वाहतात,धुळीचे लोट उठतात हि माहिती शास्त्रज्ञांना मिळाली आणी आता मंगळावर पृथ्वीप्रमाणे भूकंपही होतो ह्याचीअत्याधुनिक माहितीही मिळाली आहे
नुकतेच मंगळावरील धुळीच्या प्रचंड वादळाचे फोटो आणि माहिती Opportunity मंगळ यानाने पृथ्वीवर पाठवली होती त्या नंतर त्याचे काम ठप्प झाल्याने हि मोहीम थांबविण्यात आली आणि आता नासाच्या InSight मंगळ यानाने मंगळावरील भूकंपाचा आवाज रेकॉर्ड करून पृथ्वीवर पाठवला आहे
सध्या मंगळावर नासाचे InSight Mars Lander कार्यरत आहे आणि ह्या मंगळ यानाने मंगळावरचे 128 मार्टिन डे अविरत कार्यरत राहून यशस्वीपणे पूर्ण केले आहेत आणि त्याच्या कार्यकाळात पहिल्यांदाच मंगळावर भूकंपाचे धक्के जाणवले आहेत
InSight मंगळयानाला बसविलेल्या अत्याधुनिक Seismometer च्या साहाय्याने तेथील भूकंपाची तीव्रता व आवाज रेकॉर्ड करून ह्या यानाने पृथ्वीवर पाठवला आहे सहा एप्रिलला मंगळावर झालेल्या भूकंपाचा हा आवाज आहे प्रथम 14 मार्चला नंतर 6एप्रिल,10एप्रिल आणि 11तारखेलाही असे धक्के जाणवले आहेत
सहा तारखेला भूकंपाची मिळालेली रेकॉर्डेड माहिती जरी उपयुक्त असली तरीही ती धूसर आहे हे भूकंप प्रवण क्षेत्र अत्यंत कमी असल्याने आणि भूकंपाची तीव्रताही कमी असल्यामुळे मंगळाच्या भुपृष्ठा खालील घाडामोडींची
 जास्ती सखोल माहिती उपलब्ध होऊ शकली नाही हा भूकंप जरी कमी तीव्रतेचा असला तरीही तिथल्या शांत वातावरणात भूकंपाचा क्षीण आवाजही रेकॉर्ड झाला आहे बाकीच्या तारखेच्या भूकंपाबद्दल शास्त्रज्ञ सध्या शाशंक आहेत त्यांच्या मते कदाचित ते आवाज तिथे वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचे असतील त्या मुळे तेथील भूभागावरच्या  जमीनीवर हालचाली जाणवल्या असतील पण ह्या तीन भूकंपाच्या धक्क्यांचा काळ पाहता हे मंगळावरील भूकंपाचे धक्के असल्याचे जाणवते त्यामुळे शास्त्रज्ञ ह्या माहितीवर अधिक संशोधन करत आहेत
 
          InSight मंगळ यानाने रेकॉर्ड करून पाठवलेली भूकंपाच्या आवाजाची माहिती -फोटो -नाससंस्था

InSightने  सहा एप्रिलला झालेल्या भूकंपाची तीव्रता,क्षेत्र आणि आवाज रेकॉर्ड करून पाठवल्याने शास्त्रज्ञ
आनंदित  झाले असून आता मंगळावरील भूकंप हा नवीन विषय संशोधकांना संशोधित करण्यासाठी मिळाला आहे त्या मुळे ते उत्साहित झाले आहेत ही माहिती त्यांच्यासाठी आणि आगामी मंगळ मोहिमेसाठी मैलाचा दगड ठरेल अशी आशा ते व्यक्त करतात
19 डिसेंबर 2018 ला InSight मंगळ यानावर बसविलेला Seisometer यानाने मंगळाच्या पृष्ठभागावर land केला  कारण मंगळाच्या भूपृष्ठाच्या अंतर्गत भागातील घडामोडी आणि तिथल्या Rocky World ची माहिती आणि मातीचे आणि खडकांचे नमुने गोळा करणे हा हेतू होता आणि आता ह्या मिळालेल्या माहितीचे संशोधन शास्त्रज्ञ करीत आहेत मंगळावरील सूक्ष्म घडामोडींचे क्षीण आवाज आणि जमिनीचे तडकणे किंवा इतर आवाज रेकॉर्ड व्हावे या साठी खास डिझाईन केलेला Seismometer InSight यानात बसविण्यात आला आणि त्याचे रिझल्ट खरोखरच उत्साहजनक आहेत आम्ही कित्येक दिवसांपासून अशा सिग्नलची आतुरतेने वाट पाहात होतो कारण पृथ्वीप्रमाणे मंगळ आणि चंद्र ह्या ग्रहांवर Tectonic Plates नाहीत ह्या प्लेट्समधील अंतर्गत घडामोडीमुळे पृथ्वीवर भूकंप होतो
मंगळ ग्रहावर मात्र अत्यंत विरळ वातावरण आहे तिथे उष्णताही कमी आहे थंड आहे अजूनही मंगळाचा पृष्ठभाग थंड होत असतो त्या मुळे तेथील पृष्ठभाग सतत थंड आणि आकुंचित होतो आणि हि प्रक्रिया सतत चालू असते त्या दरम्यान जर प्रचंड हवेचा किंवा इतर दाब निर्माण झाला तर तेथील भूभाग तडकतो
सुरवातीला हा आवाज वाऱ्याचा असावा असे शास्त्रज्ञांना वाटले पण नंतर मिळालेल्या माहितीचे संशोधन केल्यावर हा भूकंप होता ह्याची खात्री त्यांना पटली त्यांच्या मते मंगळ ग्रह अजूनही Seismically active असल्याचा हा ठोस पुरावा आहे त्या मुळे भविष्यातील मानवासहित मंगळ मोहीम आणि मंगळावरील मानवी वस्ती निर्माण करण्याचे शास्त्रज्ञाचे स्वप्न नक्कीच साकार होईल अशी आशा त्यांना वाटते

No comments:

Post a Comment