अंतराळवीर Nick Hague अंतराळस्थानकातील चेंबर मध्ये काम करताना -फोटो -नासा संस्था
नासा संस्था 10 मे
नासाचे अंतराळवीर स्थानकातील फिरत्या लॅबमध्ये राहून कसे संशोधन करतात अंतराळवीरांच्या स्थानकातील झिरो ग्रॅविटीतील तरंगत्या अवस्थेतील वास्तव्या विषयी,राहणीविषयी विद्यार्थ्यांना नेहमीच कुतूहल असत म्हणूनच अंतराळवीर त्यांना मिळालेल्या फावल्या वेळात विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देतात नुकताच अंतराळवीर Nick Hague ह्यांनी अमेरिकेतील Cosmosphere ,Hulchinson Kansas येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्याचाच हा वृत्तांत
नुकताच मदर्स डे साजरा झाला ह्या दिवसाचे औचित्त साधून सुरवात Nick Hague ह्यांची आई Beverly Hague ह्यांनी केली आणि ऐकू येतय का ? असं विचारताच Nick ने आश्चर्यचकित होत आईचा आवाज ओळखून हो मॉम! असे उत्तर दिले आणि तिला मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या
1)- Nick Robin -5th grade- अंतराळवीर होण्यासाठी तुम्हाला कोणी प्रेरित केले ?
Nick Hague -
मी लहानपणी तुझ्या एव्हढा होतो तेव्हा मी आकाशातील ग्रह ताऱ्यांचे निरीक्षण करायचो आणि मी अडव्हेंचर्स नेचरचा असल्यामुळे मलाही वेगळ काहीतरी करावस वाटायच अवकाशात भरारी घ्यावीशी वाटायची त्यांना जवळून पाहावस वाटायच त्या मुळेच मी अंतराळवीर होण्यासाठी प्रेरित झालो माझ्या घरच्यांनी मला साथ दिली आवश्यक ती मदत केली त्यांनीही मला प्रोत्साहित केल
2)- Jodan Moog- (4th grade)- शिक्षणा व्यतिरिक्त अंतराळवीर होण्यासाठी काय आवश्यक असत ?
Nick Hague -
अर्थातच टीम वर्क!आम्ही अंतराळ स्थानकात सध्या सहा अंतराळवीर मिळून राहतो,संशोधन करतो पण पृथ्वीवरून हजारो शास्त्रज्ञ आम्हाला गाईड करतात आवश्यक त्या सूचना देतात हे काम एकट्याने करायचे नाही एकमेकाला समजून घेत एकत्रितपणे हे काम करावे लागते मी,हायस्कुल मध्ये होतो तेव्हा Gymnasium मध्ये जायचो तेव्हा आम्हाला शाळेत नासाचे space program दाखवायचे ते पाहून मी इन्स्पायर झालो मला स्पेस बद्दल कळाल ,टीम वर्कची माहिती मिळाली त्या मुळे अंतराळवीर होण्यासाठी टीम वर्क करण्याची हातोटी आत्मसात करण आवश्यक आहे
3) Nody- (3rd grade)- अंतराळवीर होण्यासाठी सगळ्यात अवघड गोष्ट कोणती होती तुमच्यासाठी ?
Nick Hague -
निश्चितच रशियन भाषा शिकण ! मला अंतराळवीर होण्यासाठी रशियन शिक्षण आवश्यक होत आणि ती माझ्यासाठी अवघड गोष्ट होती पण नंतर शिकल्यावर सोपी झाली
4)- Zimboby-(1st grade)- अंतराळातील मायक्रोग्रॅविटीत कोणती गोष्ट करायला तुम्हाला आवडते?आम्हाला दाखवू शकता का ? मोकळ्या वेळेत काय करायला आवडत
Nick Hague -
मायक्रोग्रॅव्हीटीत सगळ्या वस्तू तरंगतात हा माईक,आम्ही,पाणी,अन्नाची पाकीट सारच!हे पाहण मजेशीर असत ! मला तरंगायला आवडत कुठेही कसेही तरंगत जाता येता येत अन्न खाताना,पाणी पीतानाची मजा मी अनुभवतो अस म्हणत त्यांनी ज्युसचा तरंगणारा आणि मोठा होत जाणारा बबल तोंडाने पकडून पितानाची कसरत दाखवली
शिवाय मला स्थानकाच्या क्युपूला मधून बाहेर पृथ्वीकडे पाहायला आवडते ती रंगीत आणि खूप सुंदर दिसते अस सांगत त्यांनी सुंदर भासणारी पृथ्वी खिडकीतून दाखवली
Erisa Linski - (2nd grade )- स्थानकातून पृथ्वीवर कुटुंबियांशी कसा संपर्क करता तिथे वायफाय नेटवर्क आहे का ?
Nick Hague -
हो ! इथे तशी सोयआहे इथे खूप चांगले वायफाय आहे वायरलेस नेटवर्क आहे ते satelliteला जोडलेले असते आपल्या पृथ्वीभोवती खूप satellitesआहेत ते आमचे सिग्नल्स पृथ्वीवर पाठवतात त्या मुळेच हा संवाद होऊ शकतो आम्ही फोनवरून,इ-मेलने आमच्या कुटुंबियांशी संपर्क साधतो ती आमच्यासाठी महत्वाची गोष्ट असते आठवड्याच्या शेवटी व्हिडीओ कॉन्फरन्सी द्वारे आम्ही कुटुंबियांशी बोलतो माझ्या पत्नीकडून मला मुलांविषयी कळत तिथल्या घडामोडीबद्दल कळत कधी तिथे खूप पाऊस आला आणि मुलांच्या शाळेला सुट्टी मिळाली हेही कळत !
Angie- (5th grade)- स्थानकातील दिवस कसा असतो?सगळ्यांच वेळापत्रक सारखच असत का ? सगळे एकाच वेळी झोपता का ?
Nick Hague -
हो ! आमच वेळापत्रक ठरलेल असत,सकाळी साडेसहाला आम्ही उठतो साडेसातपर्यंत फ्रेश होतो मग आमच काम सुरु होत आम्ही व्यायाम करतो दुपारचं जेवण करतो संशोधन,मेंटेनन्सच कामही करतोआम्हाला दिवसभराच ठरवून दिलेल काम वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो
Dylan Mader( KIndergarden चा प्रश्न) Carl Bekman 8th - स्पेस स्टेशन मध्ये तुम्ही रोपे कोठेआणि कशी लावता ? - Maya Hill-( 4th grade)- अंतराळात Oxygen अभावी रोपे कशी वाढतात ?
Nick Hague -
मी सध्या स्थानकातील कोलंबस लॅब मध्ये आहे हा युरोपियन एजन्सीचा भाग आहे अशा चार लॅब स्थानकात आहेत त्यात veggie project साठी खास चेंबर बनवले आहेत त्यातील रॅक मध्ये वेगवेगळी रोपे वाढवली जातात
त्यात कलर लाईट्स आणि पाण्याची विशेष सोय केली जाते एका बॅग(veggie pond ) मध्ये रोप लावले जाते कारण इथे साऱ्या वस्तू तरंगतात त्या मुळे पाणीही सगळीकडे थेंबाच्या रूपात तरंगते ते थेंब रोपावर कोठेही जाऊन थांबते (हे प्रात्यक्षित त्यांनी करून दाखवले )गुरुत्वाकर्षणाच्या अभावामुळे पाणी मुळच्या दिशेने वाहात नाही,पोहोचत नाही म्हणून ह्या बॅगेत खास सोय केलेली असते
पृथ्वीवर झाडे कॉर्बन डाय ऑक्साइड शोषून घेतात जे माणूस आणि सजीवांच्या स्वासोच्छवासातून त्यांना मिळते शिवाय सूर्यप्रकाशात झाडे वाढतात पण इथे तस नसत म्हणून अंधार उजेडासाठी लाईटिंगची खास सोय टेम्परेचर व पाण्याचे योग्य नियोजन करून रोपे वाढवली जातात दिवस रात्रीचे चक्र पृथ्वी प्रमाणेच असते रोपाच्या प्रकारावर ते अवलंबून असते शास्त्रज्ञ पृथ्वीवरून ते मॅनेज करतात त्या नुसार लाइटींगची सोय केलेली आहे
Nick -(7th grade)- स्थानकातील दिवस रात्रीचे चक्र कसे असते? तुम्हाला सकाळ आणि रात्र कशी कळते ?
Nick Hague -
आम्ही सोळावेळा पृथ्वीभोवती फिरतो त्या मुळे सोळा वेळा सूर्योदय आणि सूर्यास्त होतो खिडकीतून उजेड व अंधार दिसतो पण इथे पृथ्वीपेक्षा वेगळी स्थिती असल्याने इथे आमच्या साठीही लाईटची सोय केलेली आहे सकाळी जास्त निळ्या प्रकाशाचे प्रखर लाईट लावतो तर रात्री लाईट्स बंद करून अंधार करतो खिडकीचे शटरही बंद करतो
Fisher Symantec- (11th grade)- ज्यांना diabetes ,Cancer,Asthma आहे अशा व्यक्तीला अंतराळात जाता येऊ शकेल का ?तुमचा अनुभव कसा आहे ?
Nick Hague -
अंतराळ स्थानकात निरोगी व्यक्तींच्या शरीरावर विपरीत परिणाम होतो स्थानकातील मायक्रोग्रॅविटी मध्ये मानवाची उंची दोन इंचाने वाढते आणि पृथ्वीवर आल्यावर पूर्ववत होते सतत तरंगत राहिल्याने हाडांवर परिणाम होतो ताठ उभे राहता येत नसल्याने पाठीचा कणा वाकलेल्या अवस्थेत राहतो हाडे ठिसूळ होतात नजर कमजोर होते गुरुत्वाकर्षण नसल्याने शरीरातील द्रव पदार्थ उलट्या दिशेने वाहतात डोक्यावर विशेषतः मेंदूवर प्रेशर येत डोक्याच्या दिशेने रक्तप्रवाह वाहत असल्याने हार्टवर परिणाम होऊ शकतो सतत cosmic रेडिएशन होत असल्यामुळे स्किनवरही दुष्परिणाम होऊ शकतो अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते पण हळू हळू सवय होते आता हे दुष्परिणाम होऊ नयेत म्हणून संशोधन सुरु आहे त्या साठीचआम्ही रोज बॉयलॉजिकल सॅम्पल्स घेतो त्या मुळे सध्या तरी आजारी व्यक्तीला अंतराळात जण अशक्य आहे त्या साठी मेडिकली फिट असाव लागत
Eslic -(5th grade)- स्थानकात आजारी पडलात किंवा दुखापत झाली तर उपचार कसे करता ? अशी स्थिती मंगळावर गेल्यावर आली तर काय कराल ?
Nick Hague -
आम्हाला प्रथमोपचाराचे प्रशिक्षण दिलेले असते त्या मुळे उपचार करता येतो आम्ही जखमेवर टाके घालू शकतो आम्हाला oxygen देता येतो कित्येकदा टीममध्ये एखादा डॉक्टर असतो आता आमच्या सोबत कॅनडियन अंतराळवीर David Saint हे डॉक्टर आहेत ते अशा प्रसंगी उपचार करतात मंगळावर मात्र डॉक्टर आणि सर्व मेडिकल सामुग्री सोबत घेऊन जावे लागेल
Adiee Baker -(5th grade)-Mia 3rd grade- अंतराळात वारा वाहतो का ? तिथे पृथ्वीसारखे वादळ होते का ?
Nick Hague -
आम्ही पृथ्वीच्या वातावरणाच्या वर असल्यामुळे इथे हवा नसते पण इथे सौर वादळे होतात सूर्यापासून निघालेले अत्यंत उष्ण सौरकण वादळाच्या स्वरूपात सर्वत्र फेकल्या जातात पण सुदैवाने पृथ्वीभोवती चुंबकीय आवरण असल्यामुळे आपल्याला होनी होत नाही
Ducan Bell(-6th grade )-Jensen- अंतराळातून सूर्य कसा दिसतो ?
Nick Hague -
मी जेव्हा खिडकीतून बाहेर पाहतो मला पृथ्वी लहान दिसते पण सूर्य चंद्र आणि तारे पृथ्वीवरून जसे दिसतात तसेच दिसतात कारण आम्ही पृथ्वीपासून फक्त 250मैल वर आहोत त्या मुळे आकारात फरक दिसत नाही पण सूर्याची उष्णता मात्र पृथ्वीपेक्षा जास्त जाणवते
Jayden Fellows-(6th grade )-Kensi Norndoff- स्पेस सूट घालायला किती वेळ लागतो
Nick Hague- लाँचिंग आणि परतण्याच्या वेळेस स्पेससूट घालायला फारसा वेळ लागत नाही एक तास लागतो आमच्या कडे वेगवेगळे स्पेससूट असतात जाताना आणि येतानाचा सारखा असतो पण स्पेसवॉकच्या वेळेसचा मात्र वेगळा असतो त्यात oxygen,पाणी आणि इतर आवश्यक सामान ठेवाव लागत स्पेसस्टेशनच्या बाहेर अंतराळात काम कराव लागत असल्याने तो एकदम फिटिंगचा असावा लागतो थोडीशीही गॅप चालत नाही तो घालायला बराच वेळ लागतो चार पाच तास आणि त्या साठी मदत घ्यावी लागते एकट्याने घालता येत नाही
Nathon Wecca- (5th grade)-स्थानकातून पृथ्वीकडे बघताना दृष्ठीकोन कसा बदलतो ?काय फरक जाणवतो ?
Nick Hague -
मी स्पष्ठपणे सूर्यप्रकाशात पृथ्वीकडे पाहू शकलो इथून पृथ्वीवरील शहर पाहताना मात्र खूप प्रयत्न करूनही पटकन शहर ओळखता येत नाही मला सगळ प्लेन दिसत Denver,Dever हुन Houston कडे जायला फक्त तीन मिनिटे लागतात पृथ्वीकडे पाहताना आपण किती लहान आहोत आणि विश्व किती मोठ आहे ह्याची जाणीव होते ह्या अंधाऱ्या समुद्रात आपली पृथ्वी एका बेटा प्रमाणे भासते आपण त्याचा भाग आहोत,पृथ्वी खूप स्पेशल आहे सुंदर आहे हे जाणवते
Genesis Harvey-( 7th grade)- तुम्हाला तुमच्या छोट्या शहरातून एकदम अंतराळ स्थानकात पोहोचल्यावर कस वाटतय ?
Nick Hague -
खरच मी एक दिवस खरच स्थानकात पोहोचेन अस वाटलही नव्हत तीस वर्षांपूर्वी मी Hoxie मध्ये शाळेत शिकत होतो तेव्हा मला भविष्यात मी अंतराळवीर होऊन स्थानकात राहायला जाईन माझं स्वप्न साकारेल अस वाटल नव्हत मी खरच स्वत:ला खूप भाग्यवान समजतो हि माझ्यासाठी सुवर्णसंधी होती माझ स्वप्न साकार करण्याची! ती मला मिळाली अर्थात त्या साठी खूप प्रयत्न,संघर्ष करावा लागला कठोर परिश्रम करावे लागले आपण स्वप्न पाहिले आणि ते झटक्यात पूर्ण झाले असे कधीच होत नाही त्या साठी त्या स्वप्नाच्या दिशेने रोज एक एक पाऊल पुढे टाकाव लागत कधी हरल की आपल एक पाऊल मागे येत पण पुन्हा पुन्हा प्रयत्न करावे लागतात त्यात सातत्य ठेवाव लागत आणि त्या साठी जिद्द महत्वाची आहे आणि नशीबही
Gavin Shivers- ( 7th grade )- पहिल्यांदा launch करताना भीती वाटली का ? तुमचा अनुभव सांगा
Nick Hague -
मला भीती वाटली नाही अस म्हणण चुकीच ठरेल आम्ही रॉकेट्स वर होतो 4000 की.मी.वेगाने वर जात होतो आणि रॉकेट नष्ट झाले पण पाच वर्षांच नासा संस्थेतील ट्रेनिंग कामी आल आम्ही स्वत:ला तात्काळ सावरल आणि
मी आणि कमांडर Alexie ने Abort चा निर्णय घेतला त्यासाठीची तयारी सुरु केली मी एअर फोर्स मध्ये होतो त्यावेळेसचा अनुभव कामी आला अशा वेळेस परिस्थिती कशी हाताळायची ह्याच ट्रेनिंग घेतल असल्यामुळे पुढचा धोका टळला ,मी खूप सुदैवी आहे
शेवटी Madley Ziglor हिने तुम्ही पृथ्वीवर परतल्यावर तुमच्या जन्मगावी Hoxie ला भेट देणार का ?असे विचारताच Nick म्हणाले हो! नक्कीच ! आणि आल्यावर तुम्हालाही भेटेन
त्या नंतर Nick Hague ह्यांच्या आईने स्थानकातील तुझ्या घरच्या सर्व अंतराळवीरांना शुभेच्छा ! अस म्हणत आभार मानले तेव्हा Nick नेही आईला पुन्हा एकदा मदर्स डे च्या शुभेच्छा दिल्या आणि नासा संस्थेने आईशी बोलण्याची अमूल्य संधी दिल्याबद्दल आभार मानले
No comments:
Post a Comment