Wednesday 30 January 2019

पार्कर सोलर प्रोबचा सूर्याच्या कक्षेत प्रवेश पहिली यशस्वी परिक्रमाही पूर्ण

illustration of Parker Solar Probe                            पार्कर सोलर प्रोब सूर्याच्या कक्षेत शिरताना - फोटो - नासा संस्था

नासा संस्था -28 जानेवारी (Twitter वरून मिळालेल्या माहिती नुसार
नासाचे सूर्याच्या दिशेने अंतराळ प्रवासास निघालेले पार्कर सोलर प्रोब हे सौर यान आता सूर्याच्या कक्षेत शिरले असून त्याने 19 जानेवारीला यशस्वीपणे सूर्याभोवती एक परिक्रमाही पूर्ण केली आहे
अवघ्या 161 दिवसात व्यवस्थित कार्यरत होऊन पार्कर सोलर प्रोब सूर्याजवळ पोहोचले आणि त्याच्या कक्षेत यशवीपणे प्रवेश करून पहिली सूर्याभोवतीची परिक्रमाही निर्विघ्नपणे पूर्ण केली आहे पृथ्वीपासून दूर सूर्याच्या जवळच्या कक्षेत शिरल्यानंतर आता हे सौर यान सूर्याभोवतीच्या दुसऱ्या परिक्रमेच्या तयारीला लागले आहे
पार्कर सौर यान सूर्याभोवती 24 परिक्रमा पूर्ण करणार आहे आणि सूर्या संबंधित अत्याधुनिक माहिती गोळा करणार आहे
पार्कर सोलर प्रोब च्या ह्या यशाने पार्कर सोलर प्रोबच्या प्रोजेक्ट टीम मधील सर्वजण आनंदित झाले आहेत ह्या प्रोजेक्टचे प्रमुख मॅनेजर Andy Driesman म्हणतात आम्हाला ह्याचा अभिमान वाटतोय पार्कर प्रोबच्या ह्या यशाने आमच्या टीमने केलेल पार्कर सौर यानाच डिझाईन,मॅनेजमेंट आणि कार्यक्षमता योग्य असल्याच सिद्ध झालय पार्कर सौर यान आम्ही अपेक्षित केल्याप्रमाणे यशस्वीपणे कार्यरत झाले आहे आणि व्यवस्थित काम करत आहे ह्या यशाने आम्ही आनंदित झालो आहोत कारण पार्कर प्रोबमुळे सूर्याच्या कक्षेत शिरल्यानंतर तिथल्या वातावरणात हे सौर यान कसे काम करतेय ह्याची माहिती आम्हाला जाणून घेता आली
 Parker Solar Probe's position, speed and round-trip light time as of Jan. 28, 2019.
                    पार्कर सोलर प्रोब सूर्याची पहिली परिक्रमा पूर्ण करताना -फोटो -नासा संस्था

सध्या पार्कर सोलर यानाने सूर्याच्या कक्षेतील वातावरणात कार्यरत होऊन सूर्यसंबंधित माहिती गोळा करून
17 gigabites इतका data store करून पृथ्वीवर पाठवला आहे उर्वरित डाटा एप्रिलमध्ये तो पृथ्वीवर पाठवेल
पार्कर सोलर प्रोबने पृथ्वीवर पाठवलेली माहिती नवी आणि अनमोल आहे आजवर आपल्याला माहीत नसलेल्या
संशोधित माहितीचा त्यात समावेश आहे आणि अजून नवीन माहिती पार्कर सोलर प्रोब पृथ्वीवर पाठवेल अशी आशा शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत आता मिळालेल्या माहितीचे अधिक संशोधन शास्त्रज्ञ करत आहेतच शिवाय आता पार्कर प्रोबच्या सूर्याभोवतीच्या दुसऱ्या परिक्रमेची तयारीही ते करत आहेत आणि त्याला दोन महिन्यांचा अवधी लागेल
पार्कर सोलर प्रोबने पाठवलेली माहिती शास्त्रज्ञांनी store करून ठेवली असून हि माहिती पार्कर सोलर प्रोब मधून मात्र डिलीट केली आहे त्या मूळे ह्या सौरयानाला सूर्या संबंधित मिळालेली माहिती store करण्यासाठी जास्तीची जागा होईल
दुसऱ्या परिक्रमेनंतर पार्कर प्रोब सौर यान सूर्यापासून 15 मिलियन मैल इतक्या अंतरावर पोहोचेल ह्या आधी कोणतेही यान सूर्याच्या इतक्या जवळ पोहोचले नव्हते ह्या आधी Helios २ हे यान 1976 साली सूर्यापासून 27 मिलियन मैल इतक्या अंतरावर पोहोचले होते
पार्कर सोलर प्रोब ह्या सौर यानाला बसवलेल्या अत्याधुनिक चार Instrument Suites च्या साहाय्याने पार्कर प्रोब
सूर्याभोवतीची अद्ययावत माहिती गोळा करेल आणि पृथ्वीवर पाठवेल विशेषतः सूर्याच्या करोना म्हणजेच सूर्याचा  अत्यंत प्रखर तेजस्वी आणि उष्ण भाग ह्या भागातील प्रचंड उष्ण आगीचे उठणारे लोट तीव्र उष्णतेची उठणारी सौर वादळे आणि त्यामुळे प्रचंड वेगाने वाहणारे उष्ण वारे त्या सोबत उडणारे धूलिकण वायू आणि इतर घटकांची माहिती पार्कर सोलर प्रोब गोळा करेल आणि पृथ्वीवर पाठवेल त्या मुळे शास्त्रज्ञांना सूर्याभोवतीच्या  तेजस्वी प्रभामंडळातील प्रचंड उष्णतेचे कारण आणि त्या खालील सूर्याचा भूपृष्ठ थंड का आहे?  ह्याची उत्तरे शोधता येतील

Sunday 20 January 2019

मी भारताचा भारत देश माझा !यांचा भारत घडवुया आपण यांच्या सारखे बनु या!



यवतमाळ - ११ जानेवारी
नंदुरकर महाविद्यालयातील सहाय्यक शिक्षक महेश डहाके ह्याच्या शत महाप्रदर्शनाचा स्टॉल होता त्यात क्रांतिवीर,समाजसेवक स्वातंत्र्य वीर, कल्पना चावला,आनंदीबाई जोशी,झाशीची राणी,बहिणाबाई चौधरी,वैरेंची माहिती व फोटो लावलेले होते
आणि मी भारताचा भारत देश माझा !यांचा भारत घडवुया आपण यांच्या सारखे बनु या! अशी साद ह्या प्रदर्शनात घालण्यात आली होती
                                                             अंतराळवीरांगना कल्पना चावला


                                                                झाशीची राणी लक्ष्मीबाई                                       
                                                    
                                         भारतीय सिनेमाचे जनक दादासाहेब फाळके

                                                     स्वातंत्र्य सैनिक सरदार वल्लभभाई पटेल

 या शिवाय स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या जीवाची आहुती देणारे शहीद भगतसिंग ,शाहू महाराज ,झिजाबाई महादेव गोविंद रानडे,दादाभाई नौरोजी सरोजिनी नायडू लाल बहादूर शास्त्री ,साने गुरुजी संत कबीर ,ज्योतिबा फुले सर विश्वेश्वरैया ,मदर टेरेसा जवाहरलाल नेहरू ,महात्मा गांधी आदी सर्वच क्षेत्रातील आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे मान्यवर कवी,लेखक ,दिग्दर्शक ,संशोधक समाजसेवक कलावंतांचा परिचय देणारे हे प्रदर्शन विध्यार्थ्यांसाठी उदबोधक होते विशेषतः आजच्या मोबाईल गेमच्या वेडापायी जीव देणाऱ्या तरुणाईंला मार्गदर्शक ठरणारे होते शिवाय आजच्या भ्रष्ठाचारांनी पोखरलेल्या लोकशाहीतील लोकांनाही आकर्षून घेणारे हे प्रदर्शन आणि हा उपक्रम स्तुत्त्यच आहे 

पोलीस कर्मचारी शेखर वांढरे ह्यांच्या वारली पेंटिंगची चित्रे पाहण्यासाठी लोकांनी केली गर्दी

                             पोलीस कर्मचारी शेखर वांढरे ह्यांच्या वारली चित्रांच्या प्रदर्शनाचा स्टॉल

यवतमाळ -११ जानेवारी
पोलीस कर्मचारी शेखर वांढरे ह्यांचे वारली चित्रांचे प्रदर्शन लक्षवेधी होते त्या मुळे साहजिकच लोकांची तिथे गर्दी होती ह्या चित्रांसाठी चहा पावडर ,टाकाऊ कागद आणि लग्नपतंत्रिकांचे कागद वापरण्यात आले आहेत अत्यंत सुंदर अशा साठ चित्रांचा समावेश इथे होता वांढरे हे ड्युटीतून मिळालेल्या फावल्या वेळात त्यांचा हा छंद जपतात मुंबईला असताना एकदा त्यांनी जहांगीर आर्ट ग्यालरीत प्रदर्शन पाहिले आणि त्यांची लहानपणीची आवड जागी झाली तेव्हापासून ते हि चित्रे काढतात आणि सुटीत लहान मुलांनाही शिकवतात विशेष म्हणजे प्रदर्शन पाहायला येणाऱ्यांच्या गर्दीमुळे व्यवस्थित फोटो घेणेही कठीण होते त्या मुले सर्वच पेंटिंग फोटोत समाविष्ट होऊ शकत नव्हते.


सुरेश राऊत ह्यांच्या व्यंग चित्रांचे प्रदर्शनही लक्षवेधी


 
 यवतमाळ -११ जानेवारी

संमेलनात सुरेश राऊत ह्यांचे व्यंग चित्रांचे प्रदर्शनही गर्दी खेचत होते त्यांनी काढलेली व्यंगचित्रे विनोदी तसेच ह्रदयस्पर्शी होती मुलाच्या वाढदिवशी वृद्धाश्रमात ब्लॅंकेट वाटायला चाललास तर घरच्या वृद्ध बापापासून सुरवात का करत नाहीस किंवा वृध्दाश्रमावर मुलाची कृपा हा बोर्ड या सारखी वर्तमानावर भाष्य करणारी अनेक चित्रे लक्ष वेधून घेत होती  
प्रदर्शनातील लोकांच्या पसंतीस उतरलेली व्यंगचित्रे

आजकाल वृद्धांची समस्या सर्वत्र भेडसावत असल्याने मी  ह्या समस्येवर त्यावर व्यंगचित्र काढल्याच त्यांनी सांगितल प्रदर्शन पाहायला आलेले सर्वच नागरिक त्यांना पसंतीची दाद देताना दिसत होते
त्यांची काही व्यंगचित्रे पाहताना पाहणाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलत होते उदा. आधी नाही का सांगायच बहिणीला साडी हवी म्ह्णून? मला वाटल बायकोसाठी हवी म्हणून महाग दाखवल्या किंवा जंगलात लाकडच शिल्लक नाहीत टायर ट्यूब अन इ कचऱ्याने जाळा आता अस मृतदेह जाळण्यासाठी लाकड गोळा करणारे
म्हणत आहेत, किंवा,का S S य ?जावईबापूचे लिव्हर खराब झाले मग मुलीला दारूबंदी जिल्ह्यात देऊन काय फायदा! या सारखी व्यंग चित्रे हसवतानाच वर्तमानातील कटू सत्य दर्शवतात बाळासाहेब ठाकरे,राज ठाकरे शी.द.फडणीस ह्यांची आठवण हि चित्रे पाहताना येते                               


Tuesday 15 January 2019

साहित्य संमेलनात पुस्तकांच्या स्टॉलवर,कला प्रदर्शनाला लोकांनी केली गर्दी

यवतमाळ येथील साहित्य संमेलनात साहित्याव्यतिरिक्त इतर कलांच्या प्रदर्शनांचे स्टॉल्स प्रवेशद्वाराजवळच लावलेले होते दुसऱ्या दिवशी शनिवार व रविवारअसल्याने नागरिकांची गर्दी होती शिवाय महाविद्यालयीन आणि  शाळेची सहलच संमेलनात आली असल्याने विद्यार्थ्यांचीही गर्दी होती
प्रवेशद्वारावरच एक लोककलाकार गाडगेबाबाच्या वेशात तोंडावर गाडगे घालून येणाऱ्या जाणाऱ्यांचे प्रबोधन करत होता

तरुणाईप्रमाणेच काही कुटुंबीयही प्रवेशद्वारासमोर सेल्फी घेण्यात मग्न होते त्या मुळे लोकांना आत जाण्या येण्या साठी थांबावे लागत होते प्रवेशद्वाराजवळच पोलिसांचा मदत कक्ष असल्याने कडक सुरक्षा आणि लोकांना योग्य मार्गदर्शन करण्याचे काम पोलीस करत होते संमेलन स्थळाच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराजवळही पोलीस तैनात होते
आत वऱ्हाडी पदार्थांचे स्टॉल्स होते तिथे मांडे,गोळा भात,वऱ्हाडी नागपुरी पोहे वै पदार्थांचा आस्वाद लोक घेत होते एकूणच लोक संमेलनाचा उपयोग पर्यटन स्थळासारखा करताना दिसत होते
कार्यक्रमाप्रमाणेच संमेलन स्थळी लावलेल्या पुस्तकांच्या स्टॉललाही लोक भेट देत होते विशेष म्हणजे संमेलनात महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील नामांकित प्रकाशन संस्थेची आणि नवोदित प्रकाशन संस्थेची असंख्य स्टॉल्स लावलेली होती प्रत्येक स्टॉलच्या रांगेत सुरवातीलाच प्रकाशन संस्थेची यादी लावलेली असल्याने लोकांना स्टॉल शोधणे सोपे झाले होते विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकाच्या दुकानात गर्दी केली होती काही महिला पोलिसही ड्युटी सोबतच पुस्तके हाताळण्यात व्यग्र होत्या मुंबईच्या मुक्त शब्द प्रकाशनाचा स्टॉल रिकामा होता पण त्यावर निषेधाचा आणि बहिष्काराच्या संदेशाचे फलक लावले होते


           संमेलनात लोकांना किल्ल्यांची माहिती व्हावी म्हणून त्यांचे फोटो व माहिती लावलेली होती
.
        
      संमेलनात आर्णीच्या सचिन नार्लावार ह्यांचे नैसर्गिक लेण हे काष्ठशिप प्रदर्शनही लोकांना आकर्षित करत होते



Sunday 13 January 2019

९२ व्या साहित्य संमेलनात अरुणा ढेरे ह्यांनी केलेल्या उदबोधक भाषणातील काही अंश

 
                       व्यास पिठावरून श्रोत्यांशी संवाद साधताना संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे

 यवतमाळ -११ जानेवारी
आधी दिलेल्या बातमी नुसार यवतमाळ येथे साहित्य संमेलनाची सुरवात वादाच्या सावटात मान्यवरांच्या बहिष्कारात आणि काळी फित लावून धरणे आंदोलन करून,नयनतारा ह्यांचे मुखवटे घालून केलेल्या निषेधात सुरु झाले

पूर्व नियोजित उद्घाटकांच्या निमंत्रण वापसीचा फटका संमेलनाला बसला कारण पूर्व नियोजित वक्ते,पत्रकार व लेखक न आल्याने साहित्य प्रेमींची निराशा झाली
मावळत्या संमेलनाध्यक्षांनी संमेलनाची सूत्रे अरुणा ढेरे ह्यांच्या कढे सोपविली त्यानंतर गोंदण ह्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले

                           संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर गोंदण ह्या स्मरणिकेचे प्रकाशन करताना अरुणा ढेरे           

अरुणा ढेरेंनीहि केला नयनतारा सहगल ह्यांच्या निमंत्रण वापसीचा निषेध
संमेलनाच्या नवनिर्वाचित अध्यक्षा अरुणा ढेरे ह्यांनी देखील उदघाटनाच्या निमंत्रण वापसीचा आपल्या भाषणातून खरपूस समाचार घेतला मी इथे संकोच्याने उभी आहे इथे आधी पासून आतापर्यंत कित्येक मान्यवर साहित्य संमेलनाध्यक्षांनी भाषणे केली आहेत इथे उदघाटनाला नयनतारा सहगल येणार होत्या पण त्यांचे निमंत्रण रद्द केल्या गेले
मागच्या वर्षीपासून एक सुंदर प्रघात आम्ही पाडला होता मराठी व्यतिरिक्त इतर भाषेतील कसदार लेखन करणाऱ्या साहित्यिकाला साहित्य संमेलनाच्या उदघाटनाला बोलवायच ठरवल आणि म्हणूनच आम्ही आनंदाने नयनतारांना आमंत्रित केल त्यांनीही वयाची नव्वदी पार केल्यावरही आनंदाने निमंत्रण स्वीकारून येण्याच कबूल केल होत ते केवळ त्यांचं महाराष्ट्राशी असलेल्या मौलिक नात्याच्या प्रेमाखातर पण अत्यंत अनुचित पद्धतीने आपण त्यांना पाठवलेलं आमंत्रण रद्द केल हि अत्यंत निषेधाची आणि नामुष्कीची गोष्ठ आहे संयोजकांकडून झालेली हि अत्यंत गंभीर चूक आहे
सतत साहित्यबाह्य शक्तीच्या ताब्यात संमेलन जात असलेल्या सध्याच्या धोक्याच्या परिस्थितीत हि जोखीम पुरेशा समजशक्तीने उचलली गेली नाही काळाची गरज संयोजकाला ओळखता आली नाही
झुंडशाहीच्या दबावाला बळी पडून त्यांच निमंत्रण रद्द करण्यात आल त्यांना येऊ नका अस सांगण्यात आल हि बाब निषेधार्ह आहे! झुंडशाहीच्या बळावर जर कोणी आपल्याला भयभीत करीत असेल तर आपण केवळ नमत घेऊन टीकेचा धनी होण्याचा मार्ग स्वीकारणार का ? ह्या धमक्या बळाच्या जोरावर का होईना पण कोणत्याही विधायक गोष्टींचा आग्रह धरणाऱ्या नव्हेत साहित्याशी किंवा भाषेच्या जाणत्या प्रेमाशी ज्यांचा सुतराम संबंध नाही अशा कोणा समूहाने दिलेल्या धमक्यांपुढे वाकण हि शोभनीय गोष्ठ नाही !
हे म्हणजे असं झाल की,एखाद्याला आपल्या घरच्या लग्नाला या म्हणून आमंत्रण पत्रिका घेऊन त्याच्या घरी जायच यायचा आग्रह करायचा अन पुन्हा आपणच त्यांना येऊ नका म्हणून सांगून त्यांना अपमानित करायच हि अत्यंत लांछनीय,निंदनीय बाब आहे
नयनतारा सहगल ह्या पंडित नेहरूंची भाची आहेत विजया लक्ष्मी पंडित आणि रणजित पंडित ह्यांची कन्या आणि इंदिरा गांधीं त्यांची मामे बहीण त्यांचे चुलत आजोबा गेल्या शतकातील वेदाभ्यासक त्यांनी ऋग्वेदाचे मराठीत आणि इंग्रजीत भाषांतर केल होत त्यांच्या वडिलांनी स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगला त्यांनी तुरुंगात असताना १२व्या शतकातल्या काश्मिरी कवी कल्हणाची राजतरंगिणी इंग्रजीत अनुवादित केली होती राजकीय आणि  साहित्यिक अनुवंश रक्तात वागवणाऱ्या नयनतारा ह्यांच साहित्य इथल्या मराठी जनांना माहीत नाही त्या निमित्याने ते माहिती झाल असत पण त्यांना येऊ नका असं कळवून अपमानित केलं गेल म्हणूनच आता राजकीय हस्तक्षेप टाळण्यासाठी राजकारण्यांवर अवलंबून न राहता संमेलनाचा महाकोष सशक्त करण्याची वेळ आली आहे हे व्यासपीठ संवादाचे आहे  विसंवादासाठी किंवा डोके भडकावण्यासाठी नाही प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे साहित्य संमेलन विचारांच आदान प्रदान करण्यासाठी आहे दुर्दैवाने धर्मवादी राजकारण केंद्रस्थानी बनले आहे साहित्याची तत्व आपणच नष्ट करत आहोत साहित्याची बांधिलकी जगण्यासाठी असते
एका अभ्यासकांनी सांगितलेली एक गोष्ट त्यांनी सांगितली मार्कंडेय ऋषी कडे आलेल्या एका राजाने एकदा मला शिल्प शिकायचे आहे असं सांगितल तेव्हा ऋषी म्हणाले
तुला त्या साठी आधी नृत्य शिकावे लागेल राजा म्हणाला का ? तेव्हा ऋषी म्हणाले कारण नृत्य हे गतिमान शिल्प आहे तर शिल्प हे गोठलेले नृत्य ! राजा म्हणाला ठीक आहे मग मी नृत्य शिकेन ऋषी म्हणाले त्या आधी तुला वादन शिकावे लागेल कारण नृत्य वादनाच्या तालावर केल्या जाते राजा म्हणाला ठीक आहे मी वाध्य वाजवायला शिकेन ऋषींना एकमेकात गुंतलेल्या कलेच्या कड्या दिसत होत्या आपणही साहित्य विश्वातले घटक आहोत साहित्यातील भल्या बुऱ्या स्वरूपाला लेखक,प्रकाशक,पुस्तक विक्रेते,वाचक सारेच सारखेच जबाबदार आहेत साहित्याच स्वरूप निर्मळ ठेवण्याच भान आपण ठेवायला हव साहित्याचा आनंद घेताना हे लक्षात ठेवायला हव
आपली लोकपरंपरा अनादिकालापासून चालत आली आहे आपल्या पूर्वजांनी भवतीच्या कल्लोळातून सृष्टी घटकातून लय सांभाळत लौकिकातून अलौकिक कस आपल्या ओंजळीतून गोळा केल हे खरच आश्चर्यकारी आहे
लोकपरंपरा हीच लिखित परंपरेपेक्षा सहस्त्र पटींनी प्राचीन इथल्या जनजीवनात प्रतिष्टीत आणि इथल्या सर्वसामान्यांच प्रातिनिधीत्व करणारी अधिक व्यापक अधिक सकस अशी परंपरा आहे ती अडाणी माणसांनी सांभाळली हा गैरसमज आहे ती अनक्षर लोकांनी सांभाळली हे वास्तव आहे अनक्षरत्व हे लिखित परंपरेचा गौरव करणाऱ्या समाजाशी जोडलं गेल
आपली साहित्य परंपरा आदिम काळापासून अस्तित्वात होती तेव्हा एक संस्कृतज्ञ वेदाभ्यासी जंगलात रोज संस्कृत श्लोक म्हणत यज्ञ करताना एक एक आहुती द्यायचा तेव्हा त्याच्या श्लोकाचा आवाज ऐकून आजूबाजूला जंगलातील प्राणी जमा व्हायचे साहित्यात केव्हढी शक्ती आहे ह्याच हे प्राचीनकालीन उदाहरण आहे
आपण माणूस म्हणूनच काय लेखक म्हणूनही स्वयंभू उगवून आलो नाही त्या मुळे परंपरेने काय काय भल बुरहि जन्माला घातल आहे त्याच एक ऐतिहासिक भान वर्तमानात जगणाऱ्या आणि भविष्याचा वेध घेउ पाहणाऱ्या लिहित्या वाचत्या माणसाला हव
हे शतक विसंगतीने भरल आहे एका बाजूला वैज्ञानिक प्रगतीमुळे,यंत्रामुळे माणूस कृत्रिम जादुई नगरीत शिरला आहे तर दुसरीकडे ओसाडलेल्या जीवनात त्याला जिवंत ओलावा निर्माण करणार मानवी जीवन हव आहे
नव्या दमाचे लेखक भाषेला ताकदीने खेळवत सक्षमपणे लिखाण करत आहेत माणूस प्रगतिशील आहे जुन्या मर्त्य गोष्टींचा तो त्याग करून नव्याचा स्वीकार करतोय ह्या बाबतीतही त्यांनी एक गमतीदार किस्सा सांगितला
एका इतिहासकाराला एक संग्रहकाराने सांगितल कि आमच्याकडे प्राचीन जुनी कट्यार आहे इतिहासकार त्याच्या घरी गेले तेव्हा त्यांना ती दाखवली आणि सांगितल कि ती त्यांच्या पूर्वजांची खूप पुराणकालीन आहे इतिहासकारांनी ती कट्यार हातात घेतली तेव्हा ते म्हणाले ह्याची मूठ नव्यासारखी दिसतेय तो म्हणाला हो आधीची जुनी झाली म्हणून माझ्या आजोबांनी ती बदलली मग ते म्हणाले ह्याच पात तेही चकाकतेय तो म्हणाला हो! माझ्या वडिलांनी ते बदलल कारण तेहि खूप जुन झाल होत साहित्याचही असच असत ! परंपरा तीच राहते तीच स्वरूप काळानुसार बदलत जाते
इथल्या वृद्धांच्या स्थितीबद्दल वर्णन करताना त्यांनी सांगितलं कि,
लेकी नेल्या चोरी,लेक नेले घारी परदेशी म्हातारी घरी
म्हणजे जावयांनी मुली चोरून नेल्या मुले परदेशी गेली आणि म्हातारी आपल्याच घरी परदेशी झालेत
आपल्या संस्कृतीचा मागोवा घेताना पुरुषी वर्चस्वाचा आणि स्त्रीला भोग्य वस्तू मानणाऱ्यांच्या काळात स्त्रीवाद अनेकदा पाहायला मिळाला पुराणकालीन स्रियांच्या प्रतिभेचे,प्रज्ञेचे अविष्कार इथे घडले आहेत समाजपुरुषाच्या न्यायबुद्धीला आपली विटंबना होत असताना ताठ कण्यांनी आवाहन करणारी द्रौपदी इथे होऊन गेली आपल्या जोडीदारा विषयीच्या इच्छा अपेक्षांचा मागोवा घेत स्वयंनिर्णयाने पती निवडीच स्वातंत्र्य मिळवणारी सावित्री इथे होऊन गेली आणि आपल्या आवडीच्या पतीसोबत विवाह करण्यासाठी पळून जाऊन विद्रोह करणारी रुक्मिणी इथे होऊन गेली अनादी काळापासून स्त्रीला फक्त उपभोग्य वस्तू मानणाऱ्या पुरुषांविरोधात आवाज उठवणाऱ्यागोष्टी अंगिकाराव्या स्रिया काश्मीर महाराष्ट्रातच नाही तर कर्नाटकातील अक्का महादेवी पर्यंत होऊन गेल्या आहेत आता काळ बदलला आहे नव्या जुन्या लेखिकांनी खूप छान लिखाण केलय साहित्य विश्वात अजूनही कसदार लेखनाची गरज असल्याचही त्यांनी सांगितल वाचकांनी चांगल ,कसदार लेखन असलेली पुस्तके निवडावीत आणि विचारप्रवृत्त करणार साहित्य वाचाव
तब्बल दीडदोन तास अरुणा ढेरे ह्यांनी त्यांच्याअलंकृत,ओघवत्या शैलीतील भाषणाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले

Saturday 12 January 2019

यवतमाळात वादाच्या सावटात ९२ व्या साहित्य संमेलनाला सुरवात

                  92 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे अध्यक्षीय भाषण करताना

यवतमाळ -११ जानेवारी
९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला यवतमाळात सकाळी ग्रंथ दिंडीने सुरवात झाली नयनतारा सहगल ह्यांना उद्घाटनाला बोलावून पुन्हा त्यांना येऊ नका असे पत्र पाठवून अपमानित केल्यानंतर आणि शेतकरी संघटनेच्या मागण्या मान्य करा नाहीतर संमेलन उधळून लावू अशा धमकीवजा इशाऱ्यानंतर मान्यवरांनी ह्या संमेलनाकडे पाठ फिरवली मान्यवर लेखक,पत्रकार ह्यांनी संमेलनाचा निषेध नोंदवत संमेलनाला येण्यास व उद्घाटक म्हणून निमंत्रण स्वीकारण्यासही नकार दिला तेव्हा संमेलन होईल कि नाही असे यवतमाळकरांना वाटत होते
पण वेळेवर उद्घाटनाला आत्महत्त्या ग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीला निमंत्रित करून ह्या संमेलनाला सुरवात झाली पण नयनतारा सहगलांच्या निमंत्रण वापसीचे सावट संमेलनावर होतेच शेवटी दोघींच्या साहित्यिक योग्यतेत फरक होताच
उद्घाटक वैशाली येडेनिही नवऱ्याच्या आत्महत्येला सरकारी व्यवस्था जबाबदार असल्याचे सांगून अडचणीच्या वेळेस नयनतारा चालत नाही तर आम्हीच चालतो असे म्हणत नयनतारा ह्यांच्या आरोपाला पृष्ठि देत सरकार झुंडशाहीपुढे झुकले असेच सूचित केले माझ्या नवऱ्याने परिस्थिती पुढे हार मानून आमचा विचार न करता आत्महत्त्या केली असली तरीही मी हार न मानता परिस्थीतीशी लढणार आहे अस तिने सांगितल
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे मावळते अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख ह्यांनी देखील त्यांचे भाषण संपण्याआधी अध्यक्षीय अधिकारातून काही वेळ वाढवून ह्या प्रकाराबद्दल निषेध नोंदवून सडेतोड वक्तव्य  केले

                   मावळते अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आपल्या भाषणातून अन्यायाला वाचा फोडताना

भाषणाच्या सुरवातीस ते म्हणाले कि आयोजकांनी आमचे खूप छान स्वागत केले पण नयनतारा सहगल इथे आल्या असत्या तर संमेलन अजून छान झाले असते त्यांचे विचार लोकांना ऐकायला मिळाले असते त्या उच्च प्रतीच्या लेखिका आहे ,इथे नयनतारा सहगल उदघाटनाला येणार होत्या पण झुंडशाहीला आणि त्यांच्या भाषणाला घाबरून त्यांना अपमानित करून त्यांना न येण्यास सांगितले गेले हे कोणी आणि का केले हे कदाचित कधीही समोर येणार नाही पण हि बाब अत्यंत खेदजनक आहे लज्जास्पद आहे महामंडळाचा अध्यक्ष म्हणून अप्रत्यक्षपणे मीहि अपराधी आहे,प्रक्षुब्ध आहे,व्यथित आहे,चिंतीत आहे त्यांच्यासाठी जशी हि बाब लज्जास्पद आहे तशीच माझयासाठीही ! माझी मान आज शरमेने खाली गेली आहे निमंत्रण वापसीच्या पापात अध्यक्ष म्हणून ह्या न केलेल्या पापात दुर्दैवाने मीही सहभागी आहे म्हणूनच मी व्यथित आहे
नयनतारा सहगल इथे आल्या असत्या तर काय आकाश कोसळले असते का?
कि राजकीय भूकंप झाला असता ?
त्यांच्या इंग्रजी साहित्यावर अमराठीपणावर आक्षेप घेतला गेल्याने की झुंडशाहीला घाबरून दडपणाखाली हा निमत्रंण वापसीचा निर्णय घेतला गेला ?
कदाचित हे कधीही कळणार नाही! मंत्र्यांनी आमचा संबंध नसल्याच म्हटलय तर आयोजक आणि निमंत्रक एकमेकांना दोष देत आहेत असे असले तरीही नागरिक सुज्ञ आहेत महामंडळांनी आक्षेप का घेतला नाही ?
ते चूप का बसले ? असं ह्या पुढे होता काम नये नाहीतर अजून कटू प्रसंग येतील अशा प्रसंगी आक्षेप घेता आला पाहिजे साहित्य संमेलनात आता वैचारिक स्वातंत्र्य उरले नाही निरंकुश,निर्भेळ वातावरण उरले नाही अशी लाजिरवाणी घटना पुन्हा घडता कामा नये म्हणूनच मी चिंतीत आहे व्यथित आहे
खरेतर नयनतारा सहगल ह्याच लेखन उच्चस्तरीय आहे त्या नामवंत राजकीय घराण्याशी संबंधित व्यक्ती आहेत
त्यांची मते ठाम आहेत त्यांच्या मामेबहिणीच्या म्हणजेच आणीबाणीच्या विरोधात त्या सहभागी होत्या त्यांनी पुरस्कारही परत केला होता त्या प्रामाणिक आणि निर्भीड लेखिका आहेत भारतात सर्वधर्मीय व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे महाराष्ट्राची परंपरा उदारमतवादी असताना महामंडळाच्या ह्या असहिष्णू वृत्तीमुळे ह्या परंपरेला तडा गेला आहे हि गोष्ठ महामंडळाला अशोभनीय आहे झालेली चूक भरून काढण अशक्य असली तरी आवश्यक आहे नाहीतर वेगळा संदेश लोकांपर्यंत जातच राहील त्या साठी सरकारकडून मदत घेण बंद करा
गंगाधर पांतावणे नामवंत लेखक कलावंतांचं साहित्यिक संमेलन कुठलही मानधन न घेता भरवतात मीही मागच्या वर्षी आणि ह्याही वर्षी मानधन घेतल नाही मागच्या वर्षी माझ्यावरही टीका झाली होती
त्या नंतर त्यांनी कायदा व शिक्षण मंत्री विनोद तावडे ह्यांच्याकडे पाहून माझी हि टीका मनावर न घेता आता सर्व मराठी शाळेचे सक्षमीकरण करावे तसेच इंग्रजी माध्यमांच्या शाळेला मराठीची सक्ती करावी अशी सूचना केली आणि अध्यक्षीय सूत्रे अरुणा ढेरे ह्यांच्या कडे सोपविली
 
                           माननीय शिक्षण मंत्री विनोद तावडे व्यासपीठावरून भाषण करताना

माननीय शिक्षण मंत्री विनोद तावडे ह्यांनीही आपल्या भाषणातून नयनतारा सहगल ह्यांच्या निमंत्रण वापसी चा निषेध नोंदवून मी कुठल्याही बाबतीत ह्यात सहभागी नाही माझ्या कार्यकाळात मी कधीही असा प्रकार केला नाही आणि करत नसल्याचे सांगितले ह्या घटनेने सरकारचेही नाक कापले गेले सरकारने कधीही संमेलनाचा उद्घाटक ठरवला किंवा रद्द केला नाही किंवा कोणी यावे कोणी येऊ नये ह्या बाबतीत हस्तक्षेप केला नाही
 ज्या नयनतारा सहगल ह्यांनी आणीबाणीच्या काळात स्वत:च्या मामेबहिणीच्या विरोधात भूमिका घेतली त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला सरकार का म्हणून विरोध करेल? असा सवालही त्यांनी केला
आजची तरुण पिढी सायबर addict झाल्याचे सांगत तावडे म्हणाले कि,आजची पिढी कॉम्पुटर,लॅपटॉप,मोबाईल
WhatsApp ,फेसबुक वर सारा वेळ वाया घालवते ह्या पिढीने वाचनाकडे वळावे म्हणुन काही तास त्यांना ह्या सर्वापासून वेगळे ठेवण्याचा आणि फक्त वाचायला लावायचा मानस आहे शिवाय सर्व महाविद्यालयात वांग्मय मंडळ स्थापित करणे अनिवार्य केले असल्याचेहि त्यांनी नमूद केले
 
                                            विद्यार्थ्यांनी केला काळे झेंडे दाखवून निषेध
 
                              भाषणादरम्यान काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवताना विद्यार्थी

त्यांचे भाषण सुरु असतानाच काही युवक काळे झेंडे घेऊन आत शिरले आणि निषेधाच्या घोषणा देऊ लागले तेव्हा काही क्षण वातावरण स्तब्ध झाले पण विनोद तावडे ह्यांनी ते शैक्षणिक बाबतीत निषेध नोंदवत आहेत साहित्य संमेलनाशी ह्याचा काही संबंध नाही तेव्हा लोकांनी घाबरू नये शांत राहावे असे सांगितले आणि तात्काळ वातावरण शांत झाले आणि पोलिसांनी देखील त्वरित दखल घेऊन ह्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आणि अनर्थ टळला  
 त्या नंतर अरुणा ढेरे ह्यांनी संमेलनाची सूत्रे स्वीकारली
 क्रमश :

Thursday 10 January 2019

नयनतारा सहगल ह्यांच न होणार भाषण प्रिंट माध्यमातून आणि सोशल मीडियावर प्रकाशित

नयनतारा सहगल

यवतमाळ -8 जानेवारी
यवतमाळ येथे 11-12 व 13 जानेवारीला संपन्न होणारे साहित्य संमेलन अनेक कारणांनी वादग्रस्त ठरले खरे तर यवतमाळात बऱ्याच वर्षांनी साहित्य संमेलन होणार आणि यवतमाळवासीयांना साहित्यिक मेजवानी मिळणार म्हणून यवतमाळकर आनंदित होते पण इथल्या लोकांना भेडसावणाऱ्या समस्या लोकांनी पाठपुरावा करून मोर्चे काढून निषेध नोंदवूनही संपल्या नाहीत उलट वाढतच आहेत त्या मुळेच सुरवातीला मागण्या मान्य करा नाहीतर संमेलन होऊ देणार नाही असा इशारा दिल्या गेला त्या मुळेच लोकांचा विरोध वाढीला लागला
त्या नंतर संमेलनाच्या उद्घाटनाला नयनतारा सहगल ह्यांना निमंत्रण दिल्या गेले आणि त्या इंग्रजी लेखिका आहेत म्हणून त्यांच्या नावाला विरोध झाला आणि जर त्यांच्या हस्ते उद्घाटन केले तर संमेलन हाणून पाडण्याचा इशारा पुन्हा एकदा दिला गेला शिवाय नयनतारा सहगलांनी त्यांच्या भाषणाची प्रत आधी पाठवली ते वाचल्यानंतर पुन्हा वादाला तोंड फुटले आणि मग त्वरित निर्णय बदलून नयनतारा ह्यांना आधी बोलावले असतानाही पुन्हा येऊ नका म्हणून कळवले गेले हि त्या लेखिकेची नामुष्कीच!
विशेष म्हणजे त्या कोणी सामान्य लेखिका नव्हत्या तर नामवंत लेखिका आहेत आणि माजी पंतप्रधान कै.जवाहरलाल नेहरूंच्या बहिणीच्या कन्या आहेत म्हणजे त्या राजकीय दृष्ठ्या देखील असामान्य आहेत त्यांचा असा अपमान करायला नको होता अशीच यवतमाळकरांची भावना आहे
साहित्य संमेलनात लेखकांची मांदियाळी जमते मग तो लेखक कुठल्या भाषेत व्यक्त होतो ह्याला महत्व नसते भाषेला महत्व देण्यापेक्षा त्याच्या व्यक्त होण्याला महत्व देणे गरजेचे होते
साहित्य संमेलन मराठी भाषिकांच होत हे तर आधीच अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेतील संबंधितांना माहीत होते मग नयनतारा सहगल इंग्रजी भाषिक साहित्यिक आहेत हे त्यांना माहीत नव्हते का ? असे असताना त्यांना निमंत्रण देताना ह्या गोष्टीचा विचार का केला गेला नाही? त्यांना मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून निमंत्रण का दिले गेले आणि दिलेच तर पुन्हा का रद्द केले हि गोष्ठ अपमानास्पद आहेच म्हणूनच मान्यवर लेखकांनी,पत्रकारांनी निषेध नोंदवत संमेलनाला येण्यास नकार दिला आहे
आपल्या भारतात लोकशाही नांदतेय लोक दररोज आपल्या भावना वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त करतात तसेच नयनतारा ह्यांनीही आपल्या भावना भाषणातून व्यक्त केल्या प्रत्येकाला बोलण्याच अभिव्यक्त होण्याच स्वातंत्र्य आहे मग त्यांच्यावरच अपमानित होण्याची वेळ का यावी? नक्कीच ह्यात राजकारण आहे अस लोकांना वाटू  
लागलय
म्हणूनच नयनतारा सहगलांच न होणार अध्यक्षीय भाषण माध्यमावरून नयनतारा सहगल ह्यांनीच प्रसिद्ध केलय
92 वर्षीय नयनतारा सहगल अजूनही तेव्हढ्याच उत्साही आणि कार्यरत आहेत आपल्या मतांवर ठाम आहेत स्वातंत्र्य पूर्व काळातील आणि राजकीय घराण्यातील असल्याने त्यांना स्वतंत्र भारतातील अन्यायाची चीड येतेय आपल्यावर झालेल्या अन्यायाने आणि अपमानाने त्या व्यतीत झाल्या आहेत आणि म्हणूनच त्यांनी त्यांच न होणार भाषण प्रिंट माध्यमातुन सोशल मीडियावर प्रकाशित केलय जवळपास सर्वच चॅनेल्स वरून दिलेल्या मुलाखतीतून आपली बाजू मांडलीय
पुण्यातील काही विद्यार्थ्यांनीही ह्या भाषणाच्या प्रति काढून कॉलेज मध्ये वाटल्या आहेत ह्या भाषणावर मुख्यमंत्रांनी आक्षेप घेतल्याच बोलल जाताच मुख्यमंत्रांनी मला ह्यात ओढू नका माझा संबंध नाही अस स्पष्ट केल
तर आयोजक आणि महामंडळ ह्या चुकीचा दोष एकमेकांना देत असतानाच पुन्हा एकदा नयनतारा सहगल ह्यांनी राजकीय दबावा मुळेच माझ निमंत्रण रद्द केल असा आरोप केला आहे
आयोजकांना माझे विचार,माझी मते आणि माझे लेखन ह्या विषयी पूर्ण माहिती होती त्यांनी आनंदाने मला निमंत्रित केले होते आणि मीही ते आनंदाने स्वीकारले होते आणि येण्याआधी माझे भाषण मी पाठवले ते मंत्र्यांना रुचले नाही म्हणूनच राजकीय दबावाखाली माझे निमंत्रण रद्द करून न येण्याविषयी कळवल्याचा खुलासा त्यांनी सामना दैनिकातून केला आहे

Sunday 6 January 2019

अंतराळवीर Drew Feustel ह्यांना पृथ्वीवर परतल्यानंतर चालताच आले नाही twitter वरून video केला share


Embedded video
 नासाचे अंतराळवीर Drew Feustel पृथ्वीवर परतल्या नंतर चालण्याचा प्रयत्न करताना -फोटो नासा संस्था

नासा संस्था -
नासाचे अंतराळवीर अत्यंत कठोर प्ररिश्रम करून प्रतिकूल परिस्थितीत अंतराळस्थानकात वास्तव्य करतात स्थानकातील झिरो ग्रॅव्हिटी मध्ये सतत तरंगत्या अवस्थेत राहून तिथल्या प्रयोगशाळेत मानवासाठी उपयुक्त संशोधन करतात
पण स्थानकातील वास्तव्यादरम्यान त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम होतो गुरुत्वाकर्षणाच्या अभावामुळे सतत तरंगत्या अवस्थेत राहिल्याने त्यांच्या शरीरातील सर्वच अवयवांवर,हाडांवर,रक्तभिसरण आणि शरीरातील इतर
संस्थेवर परिणाम होतो त्याही अवस्थेत आपल आरोग्य फिट राहावं म्हणून ते दररोज दोन तास व्यायामही करतात
तरीही पृथ्वीवर परतल्यावर त्यांना स्थानकातील वास्तव्यादरम्यान त्यांच्या शरीरावर झालेल्या दुष्परिणामाला सामोरे जावे लागते
वीस डिसेंबरला नासाचे तीन अंतराळवीर Serena Aunon ,Sergey Prokopyevआणि Alexander Grest पृथ्वीवर परतले तेव्हा त्यांचे सर्वच अंतराळवीरांनी अभिनंदन केले
तेव्हा नासाच्या अंतराळ मोहीम 56 चे अंतराळवीर Drew Feustel ह्यांनीही  twitter वरून त्यांचे अभिनंदन केले आणि सोबत एक video पण शेअर केला
ह्या video मध्ये Drew ह्यांना पृथ्वीवर परतल्यानंतर चालताना कसा त्रास झाला हे चित्रित झालेय Drew मार्च मध्ये तिसऱ्यांदा स्थानकात राहायला गेले होते आणि चार ऑक्टोबरला पृथ्वीवर परतले त्यांनी 197 दिवस ह्या मोहिमेदरम्यान स्थानकात वास्तव्य केले होते आणि नव्यांदा स्पेसवॉक करून जास्तवेळ स्पेसवॉक करणाऱ्या अंतराळवीरांच्या यादीत तिसरा क्रमांक मिळवला होता हि त्यांची तिसरी अंतराळवारी होती आणि त्यांनी आजवर स्थानकात 226 दिवस वास्तव्य केले आहे पण जेव्हा ते पृथ्वीवर परतले तेव्हा त्यांना चालताच येईना स्थानकात सतत तरंगत्या अवस्थेत राहिल्याने ते चालणे विसरले परतल्यानंतर घेण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या टेस्टनंतर त्यांनी चालण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांचे पाय लडखडू लागले होते पण नंतर नासा संस्थेतील तज्ञ डॉक्टरांनी त्यांना चालण्यास मदत केली आणि सरावा नंतर त्यांना अत्यंत कष्टाने चालता येऊ लागले होते
त्या वेळेसचा हा video ट्विटर वरून शेअर करून त्यांनी अंतराळवीरांना हि माहिती दिली आणि म्हणाले मला चालताना जसा त्रास झाला तसा तुम्हाला होणार नाही अशी मी आशा करतो पाणी पृथ्वीवर सुखरूप पोहोचल्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो हा व्हिडीओ पाच ऑक्टोबरचा आहे
क्षणभर चालणे विसरलेले Drew म्हणतात त्रास कोणाला होत नाही पृथ्वीवरील सामान्य माणसात आणि स्थानकात राहून आलेल्या अंतराळवीरात फरक असतोच ना! तिथे गुरुत्वाकर्षणामुळे सतत तरंगत्या अवस्थेत फिरावे लागते
चालणे नसतेच पृथ्वीवर परतल्यावर म्हणूनच चालण्याचा विसर पडतो सुरवातीला माणूस चालायला शिकतोच ना? तसेच माझेही झाले होते !