Thursday 25 October 2018

आपत्कालीन लँडिंगनंतर Jim Bridenstineह्यांनी अंतराळवीर Nick Hague ह्याच्याशी साधला संवाद

                            https://www.nasa.gov/sites/default/files/thumbnails/image/jsc2018e081923.jpg                                      
                       अंतराळवीर Nick Hague नासा प्रमुख Jim Bridenstine ह्यांच्याशी संवाद साधताना

नासा संस्था -20 oct.
11 oct ला नासाचे सोयूझ MS-10 हे अंतराळयान यानात बिघाड झाल्याने पृथ्वीवर परतले यानाच्या आपत्कालीन लँडिंग नंतर यानातील दोनीही अंतराळवीरांनी परिस्थिती व्यवस्थित हाताळत यान पृथ्वीवर सुरक्षितपणे उतरवले ह्या यानातून सुदैवाने सुरक्षित बाहेर पडलेल्या अंतराळवीरांचे नासा प्रमुख JIm Bridenstine ह्यांनी कौतुक करत त्यांच्याशी संवाद साधला
अंतराळवीर Nick Hague ह्याच्याशी त्यांनी साधलेला हा संवाद
Jim -
आता तुम्ही कसे आहात ! आम्ही पाहील ते खूपच आश्चर्यकारक होत उड्डाणाच्या वेळेस काही चुकल्याचे जाणवले का? त्या वेळेस नेमक काय घडल? यानातील बिघाड कधी लक्षात आला तूम्ही Air Force मध्ये होतात त्याचा अनुभव कामी आला का ?
Nick -
आम्ही ठीक आहोत ! हा अनुभव आमच्यासाठीही अनपेक्षित आणि आश्चर्यकारी होता खरंच ह्या अपघातातून आम्ही वेळीच चूक लक्षात आल्याने वाचलो हे आमचे भाग्यच !
यानात असलेली Rescue सिस्टिम अतिशय फास्ट असते काही कळायच्या आत आम्ही बाहेर रॉकेट पासून दूर फेकल्या गेलो जेव्हा Automated message अलार्म वाजला ,इमर्जन्सी लाईट्स लागले आणि फेल्युअरचा मेसेज आला तेव्हा आम्हाला जाणवल कि यानात काहीतरी गडबड आहे आता आपण अंतराळस्थानकात पोहोचू शकणार नाही
सुरवातीला यानाने व्यवस्थित उड्डाण केले हा पहिला अनुभव माझ्यासाठी आनंददायी आणिअविस्मरणीय होता पण त्या नंतरच्या पहिल्या प्रक्रियेत बूस्टर मध्ये बिघाड झाला आणि हा अनर्थ घडला क्षणात सारे चित्र बदलले आम्ही त्याही परिस्थितीत यान सुरक्षित उड्डाण करावे म्हणून आम्हाला सुचेल ते प्रयत्न केले पण यान खूप वेगाने
हेलकावू लागले श्वास घुसमटू लागला काही कळायच्या आत काही क्षणातच सार संपल्याची जाणीव झाली
त्या काही क्षणात आमचा रोख पृथ्वीवर सुरक्षित परतण्यावर होता आणि आम्ही त्या दृष्टीने प्रयन्त्न करायला सुरवात केली सोयूझ कॅप्सूल मध्ये नेमक काय घडतय कळत नव्हत
अर्थातच एअर फोर्स मधला पायलट असतानाचा अनुभव कामी आला तेव्हाचे ट्रेनिंग आणि नासा संस्थेतील ट्रेनिंग ,मेहनत कामी आली अशा वेळेस नेमके काय करायला पाहिजे ते प्रयत्न केले धैर्याने आणि शांततेने परिस्थिती हाताळली
पण आत बरच काही घडतय हे जाणवत होत क्षणात कॅप्सूल वेगळी झाली आणि कॅप्सूल सहित आम्ही दूर फेकल्या गेलो तेव्हा प्रचंड वेग जाणवत होता यानाची response system अलार्म वाजताच आणि धोक्याची सूचना मिळताच त्वरित कार्यरत झाली आणि विशेष म्हणजे आम्ही त्याच मुळे वाचलो
हे अंतराळ यान तयार करणारे इंजिनीअर्स ,डिझायनर्स आणि टीममधील इतर सहकाऱयांचे हि System तयार केली म्हणून आम्ही आभार मानतो मी त्यांचा ऋणी आहे ह्या 35 वर्षात कधीही ह्या सिस्टिमचा वापर करण्याची वेळ आली नव्हती कारण आता पर्यंतच्या अंतराळमोहिमा यशस्वी झाल्या आहेत कित्येक अंतराळवीर अंतराळ स्थानकात सुरक्षितपणे पोहोचून तिथे राहून परत आले आहेत सतत जा,ये सुरूच असते
पण ह्या वेळेस विपरीत घडल अचानक बुष्टर बिघाडामुळे हि मोहीम अयशस्वी झाली अर्धवट राहिली आणि त्या मुळेच हि सिस्टिम तपासल्या गेली तिची उत्तम कार्यतत्परता कळली

JIm -
तुमच्या यानाने यशस्वीपणे अंतराळात झेप घेतली यान वर,वर जात होत तुम्ही अर्ध्या वाटेत होता आम्ही पृथ्वीवरून तो थरारक क्षण अनुभवत होतो पुढची प्रक्रिया सुरु होण्याची आतुरतेने वाट पाहात होतो पण क्षणात चित्र पालटल यान पृथ्वीकडे परतु लागल आम्हालाही क्षणभर काय होतय कळत नव्हत
Nick -
हो ! बुष्टर मधला बिघाड लक्षात आला अन सारे प्रयत्न निष्फळ ठरले मग परतण्याचा निर्णय घेतला आणि यानाची दिशा पुन्हा पृथ्वीकडे वळवली त्या वेळेसचा अनुभव आम्हाला एखाद्या उंच फेकलेल्या ball सारखा वाटला  उंच उडालेला बॉल जसा ग्रॅव्हिटीमुळे पुन्हा खाली यायला लागतो तसच रॉकेट पासून वेगळे होताच काही क्षणातच  आम्ही पृथ्वीवर खाली येऊ लागलो
तो क्षण अविस्मरणीय अकल्पित होता बरेच नवे अनुभव आले वजनरहित अवस्था होती ती ! काही क्षण आजूबाजूच्या वस्तू तरंगत होत्या O Gचे इंडिकेटर सुरु होते मी खिडकी बाहेर पाहिले समुद्र ,डोंगर आणि नंतर जमीन दिसू लागली आणि मला जाणवल आम्ही पोहोचत आहोत
Jim -
आम्हाला सगळ्यांना यान परत येताना दिसले आणि पॅराशूट पण उघडलेले दिसले !
Nick -
हो ! आम्ही अत्यंत वेगाने खाली येत होतो आणि प्रेशरही प्रचंड होते नेहमीच्या सामान्य लँडिंग पेक्षा हा अनुभव वेगळा होता आम्ही खरेच भाग्यवान आहोत हा अनुभवही आम्हाला अनुभवता आला
मी गेली पाच वर्षे नासामध्ये आहे आणि ह्या पुढेही राहीन नासा मला पुन्हा स्थानकात राहायला जाण्याची संधी देईल आता ती संधी कधी मिळेल ते आताच सांगता येत नाही
हि मानव निर्मित अंतराळ मोहीम आहे त्या साठी प्रचंड मोठी टीम कार्यरत असते हा निर्णय एकट्याचा नसतो हि मोहीम यशस्वी व्हावी म्हणून आणि अंतराळवीर सुरक्षित स्थानकात जा,ये कारावेत म्हणून हि टीम सतत जागृत असते
मला माझी हि पहिली मोहीम अवीस्मर्णीय व्हावी असं वाटत होत पण ती अशा तरेने नाही पण ह्या अनुभवातून
मला नक्कीच नव शिकायला मिळाल
आता ह्या मोहिमेतील बुष्टर बिघाडाचे कारण शोधले जातेय त्या साठी नासा संस्थेतील सहकारी देशाचे पार्टनर्सहि
मदत करत आहेत आणि त्या साठी अंतराळ स्थानकातील कार्यक्रमात कराव्या लागलेल्या बदलाचा आढावा घेत आहेत .

Wednesday 17 October 2018

यवतमाळात दुर्गादेवीचे उत्साहात स्वागत


    यवतमाळातील दुर्गादेवीचे हे आकर्षक रूप आणि देखावे
     फोटो -पूजा दुद्दलवार(B.E.Soft.&B.M.C)

यवतमाळ -10 oct.
यवतमाळात दरवर्षी दुर्गोत्सव उत्साहात स्वागत केल्या जातो आकर्षक व नाविन्यपूर्ण देखाव्यामुळे इथल्या दुर्गा मंडळांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे ह्या काळात आजूबाजूच्या खेड्यातून लोक इथल्या दुर्गादेवी पाहण्यासाठी गर्दी करतात
ह्या वेळेस पाणीपुरवठा विभागातर्फे सतत रस्ते खोदल्या जात असल्याने काही मंडळांना आकर्षक देखावे तयार करण्यासाठी वेळ मिळाला नाही असे काही मंडळांनी सांगितले शिवाय यवतमाळ येथील कृत्रिम पाणी टंचाई, बंद असलेली लोकल फोन व इंटरनेट सेवा ,वाढती महागाई सततचे बंद या मुळे आलेली व्यापारातील मंद आदी अनेक कारणांनी लोकांनी वर्गणी देताना काटकसर केली विशेष म्हणजे काही मंडळांनीही बळजबरी न करता वर्गणी ऐच्छिक ठेवली हे ह्या वेळचे वैशिष्ठ निश्चितच कौतुकास्पद आहे
तरीही दुर्गादेविंचे आगमन दिव्यांच्या आकर्षक सजावटीने सजलेल्या रस्त्यांवरून मंडळांच्या उत्साही कार्यकर्त्यांच्या आदिवासी नृत्य ,टिपरी नृत्य वै. कला सादर करीत ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीने थाटामाटात  झाले  यवतमाळातील प्रत्येक चौकातच दुर्गादेवीची प्रतीष्ठापना झाली आहे त्या मुळे साहजिकच दुर्गादेवींची संख्याही वाढली आहे ह्या सर्व ठिकाणी होणारी नागरिकांची गर्दी पाहता पोलीस बंदोबस्तही चोक आहे यवतमाळात सर्वच ठिकाणी पोलीस बंदोबस्त असून ते लोकांना व्यवस्थित मार्गदर्शन करत आहेत
अशाच काही दुर्गादेवीच्या मंडळाबद्दल आणि सजावटीबद्दल घेतलेली हि माहिती
 छोटी गुजरीतील एकता मंडळ १९७१ सालापासून दुर्गादेवी बसवतात त्यांच्या मंडळातर्फे नेहमीच नाविन्यपूर्ण व पर्यावरणपूरक देखावे सादर केले जातात यंदा त्यांनी कृत्रिम फुले व हिरवळीचा वापर करून आकर्षक सजावटीचा इंद्रपुरी महाल साकारला आहे त्या साठी खास कलकत्यावरून हरी नामक कलाकाराला बोलवण्यात आले आहे त्यांनी त्यांच्या तीस सहकारी कर्मचाऱ्यांच्या मदतीने वीस दिवसांच्या परिश्रमाने हा देखावा सादर केला आहे आणि तो खरोखरच आकर्षक आहे मंडळातर्फे सामाजिक कार्यही केल्या जाते शिवाय दररोज येणाऱ्या भक्तांना उपवासाचा फराळ वाटप केल्या जातो
यवतमाळ येथील वडगाव रोड वरील सुभाष क्रीडा मंडळाचे यंदाचे हे बावन्नावे वर्ष आहे दरवर्षी भव्यदिव्य व वेगळेपण दर्शवणारे देखावे सादर करण हे या मंडळाच वैशिष्ट .यंदाही त्यांनी केदारनाथ धामाचा देखावा साकारला असून त्यांनीही कलकत्त्याहून कारागीर बोलावले होते हा देखावा साकारण्यासाठी वीस पंचवीस कामगारांनी परिश्रम घेतले त्यांनी उंच डोंगर तयार केले असून डोंगरावर चढण्यासाठी व उतरण्यासाठी लोखंडी जिना बसवला आहे आणि आतमधल्या मोठ्या गुहेत नागाच्या फण्यावर दुर्गादेवी विराजमान झाली आहे उंच डोंगरावर शंकराची मूर्ती आहे प्रवेशद्वारावर आदिवासी वेशातील कलाकार,समोर कारंजे महादेव आणि गणपतीची मूर्ती येणाऱ्यांना आकर्षित करतात
आर्णी रोड वरील लोकमान्य दुर्गादेवीची मूर्तीही लक्षवेधी आहे मंडपात गोलाकार पाण्याच्या तळ्यात मध्यभागी दुर्गेची मूर्ती असून तिची समोरची बाजू दुर्गेचे सुंदर ,शांतरूप दर्शवते तर पाठीमागील मूर्ती कालीमातेचे क्रोधीत
रूप दर्शवते
आठवडी बाजारातील राणी झासी बंगाली दुर्गा मंडळाने कलकत्याच्या कालीमातेचे विलोभनीय रूप साकारणारी आकर्षक मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे
शिवाजीनगर मधील मंडळाने बालकांना आकर्षित करणारे छोटा भीम मधील ढोलकपूर गाव चलतचित्र माध्यमातून साकारले आहे. स्टेट बँक चौकातही केदारनाथ धाम साकारले आहे. दर्डा मातोश्री जवळील शिवराय मंडळाने दुर्गेची त्रिमूर्ती प्रतिष्ठापीत केली असून त्यासमोरील कारंजे लोकांना आकर्षित करत आहे.या शिवाय नेहमीच्या लोकमत चौक ,मेन लाईन ,गांधी नगर इथल्या म्हैसासूरमर्दिनीच्या रूपातील दुर्गादेवीही लोकांना आकर्षित करत आहेत.
ओम सोसायटी जवळ माँ एकविरा दुर्गोत्सव मंडळाने साठ फूट उंच शिवलिंग बनवून त्याच्या आतमध्ये देवी दुर्गा प्रतिष्ठापित केली आहे आणि आजूबाजूला बारा जोतिर्लिंगाची मूर्ती साकारली आहे प्रवेशदारावर समोर नंदीची
मूर्ती आहे आणि छोट्याशा तळ्यात एक घागर ठेवली आहे त्यात नागरिक नाणी टाकतात हे त्यांचे पंचविसावे वर्ष आहे.
समर्थवाडी मधल्या समर्थ दुर्गा उत्सव मंडळाचा देखावाही लक्षवेधी आहे त्यांनी खेड्यातील झोपडीच्या देखावा साकारला असून आतमध्ये गोल तळ्यात दुर्गादेवी विराजमान झाली असून बाहेर बैलाचा पुतळा आहे ह्या मंडळाला आदर्श दुर्गोत्सवाचे बक्षीस मिळाले आहे यंदा त्यांनी बाजूला बेटी बचाव ,पाणी अडवा पाणी जिरवा या सारखे वैचारिक लोकजागृती करणारे फलक लावले आहेत  

Friday 12 October 2018

अंतराळस्थानकाकडे निघालेल्या सोयूझ M.S.-10 मध्ये बिघाड आपत्कालीन landing अंतराळवीर सुरक्षित


Alexey Ovchinin of Roscosmos, left, and Flight Engineer Nick Hague of NASA
 सोयूझ यानाच्या आपत्कालीन लँडिंग नंतर पृथ्वीवर सुरक्षित पोहोचलेल्या अंतराळवीरांना भेटतानाचा हृद्य क्षण
फोटो -नासा संस्था

नासा संस्था -11 oct 
नासाच्या अंतराळ मोहीम 57 चे अंतराळवीर Nick Hague आणि रशियन अंतराळवीर Alexey Ovchinin हे दोघे रशियन बनावटीच्या MS-10 ह्या अंतराळयानातून अंतराळ स्थानकात राहण्यासाठी जात होते
 त्यांच्या सोयूझ यानाने ठरल्या प्रमाणे ठरलेल्या वेळी कझाकस्थानातील उड्डाणस्थळावरून ठीक 4.40 am वाजता अंतराळस्थानकाकडे यशस्वीपणे झेप देखील घेतली आणि यानाने काही अंतर क्षणात पारही केले
पण यानाच्या पहिल्या चरणातील प्रक्रियेला सुरवात होताच काही सेकंदातच बुस्टर रॉकेट मध्ये बिघाड निर्माण झाला आणि ह्या समस्येनंतर अंतराळस्थानकाकडे प्रवास करणे अशक्य असल्याने यानाचे पृथ्वीवर आपत्कालीन लँडिंग करण्याचा निर्णय तात्काळ घेण्यात आला
यानातील दोनीही अंतराळवीरांनी ह्या निर्णयाचे पालन करून यान पृथ्वीकडे परत आणले सोयूझ यान पृथ्वीवर सुरक्षित पणे उतरल्यानंतर नासाच्या search &rescue टीमने यानाचा शोध घेऊन अंतराळवीर Hague आणि अंतराळवीर Ovichinin ह्यांना capsule मधून सुरक्षितपणे बाहेर काढले आणि त्यांना जेथून सोयूझ यानाचे उड्डाण झाले त्या ठिकाणी नेण्यात आले
तेथे नासाचे प्रमुख Jim Bridenshine ,रशियन अंतराळ संस्थेचे प्रमुख अधिकारी आणि अंतराळवीरांचे नातेवाईक उपस्थित होते हे अंतराळवीर सुरक्षित असल्याचे पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला Jim Bridenshine ह्यांनी रशियाच्या व नासाच्या टीमचे हि समस्या यशस्वीपणे हाताळल्याबद्दल कौतुक केले
आता ह्या अंतराळवीरांचे आवश्यक काळजी म्हणून मेडिकल चेकअप केले जाईल आणि त्या नंतर ते घरी परततील

Sunday 7 October 2018

अंतराळ मोहीम 56चे तीनही अंतराळवीर पृथ्वीवर सुखरूप पोहोचले

 Members of the Expedition 56 crew, NASA astronauts Drew Feustel and Ricky Arnold, and cosmonaut Oleg Artemyev of the Russia
 अंतराळवीर Drew Feustel ,अंतराळवीर Ricky Arnold आणि Oleg Artemyev  पृथ्वीवर सुखरूप पोहोचल्यानंतर - फोटो -नासा संस्था

 नासा संस्था -4 Oct.
नासाच्या अंतराळमोहीम 56चे अंतराळवीर Drew Feustel ,Ricky Arnold आणि Oleg Artemyev हे तिन्ही अंतराळवीर गुरुवारी चार तारखेला 7.44 a.m. वाजता (5.44pm.स्थानिक वेळ ) कझाकस्थानातील Dzhezkazgen येथे सुखरूप पोहोचले
 ह्या तीनही अंतराळवीरांनी त्यांच्या अंतराळ स्थानकातील वास्त्यव्यात तेथे सुरु असलेल्या सायंटिफिक प्रयोगाच्या संशोधनात सहभाग नोंदवला शिवाय तिथे आलेल्या पाच कार्गोशिपच्या आगमनासाठी path तयार करून त्यांच्या docking ची सोय केली आणि त्यांच्या संशोधनाच्या कार्यातून वेळ काढत अमेरिकेतील 29 स्टेट मधील विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली
अंतराळवीर Drew Feustel  ह्यांनी त्यांच्या अंतराळ कारकिर्दीत तीनवेळा अंतराळयात्रा केली आणि अंतराळ स्थानकात 226 दिवस वास्तव्य केले तर Ricky Arnold ह्यांनी दोनवेळा अंतराळयात्रा केली आणि अंतराळ स्थानकात 209 दिवस वास्तव्य केले
ह्या अंतराळवीरांनी त्यांच्या स्थानकातील वास्तव्यादरम्यान संशोधनाबरोबरच अंतराळ स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी स्थानकाबाहेर तीनवेळा spacewalk केला
Drew Feustel ह्यांनी त्यांच्या अंतराळ कारकिर्दीत नऊवेळा स्पेसवॉक केला आणि त्या साठी स्थानकाबाहेर 61 तास 48मिनिटे व्यतीत केले आणि त्या मुळे जास्तवेळ स्पेसवॉक करणाऱ्या अमेरिकन अंतराळ वीरांच्या यादीत त्यांनी तिसरे स्थान मिळवले
Ricky Arnold ह्यांनी देखील त्यांच्या अंतराळ कारकिर्दीत पाच वेळा स्पेसवॉक केला आणि त्या साठी त्यांनी स्थानकाबाहेर 32 तास 4 मिनिटांचा वेळ व्यतीत केला
अंतराळ वीर Oleg  Artemyev ह्यांनी दोनवेळा अंतराळवारी केली आणि त्या दरम्यान त्यांनी अंतराळ स्थानकात 366 दिवस वास्तव्य केले त्यांनी केलेला पहिलाच स्पेसवॉक मात्र  रेकॉर्डब्रेक ठरला
त्यांनी केलेला 7 तास 46मिनिटांचा स्पेसवॉक रशियन Space Programm History मधला सर्वात जास्तवेळ केलेला स्पेसवॉक होता


Tuesday 2 October 2018

अंतराळवीर Drew Feustel ह्यांनी स्थानकातून Music Video केला रेकॉर्ड

 Expedition 56 Commander Drew Feustel
 अंतराळ स्थानकात Music Video रेकॉर्ड करण्याच्या तयारीत अंतराळवीर Drew Feustel -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -30 sap.
नासाचे अंतराळवीर Drew Feustel ह्यांनी अंतराळस्थानकातून एक Music Video रेकॉर्ड केला आहे हा video त्यांनी कॅनडियन रॉक बँड च्या टीमच्या साहाय्याने रेकॉर्ड केला आहे अंतराळवीर Drew मार्च मध्ये अंतराळस्थानकात राहण्यासाठी गेले होते आणि गुरुवारी 4octला पृथ्वीवर परतणार आहेत
 त्या आधीच अंतराळ स्थानकातून त्यांनी हा video रेकॉर्ड केला असून नुकताच त्यांनी तो त्यांच्या चाहत्यांसाठी You tube वर शेअर केला आहे हे गाण श्रवणीय तरआहेच शिवाय त्यातील दृश्येही आल्हाददायी आहेत अंतराळस्थानकातील झिरो गुरुत्वाकर्षणात संशोधनासोबतच फावल्या वेळात केलेला हा video खरोखरच सुखद आश्चर्य आणि कौतुकास्पदच !
त्यांनी ह्या video रेकॉर्डिंग करण्यासाठी मदत करणाऱ्या टीमचे आभार मानले आहेतच शिवाय ह्या video recording साठी सहाय्य केल्याबद्दल नासाच्या Johnson Space Center चे मिशन सपोर्ट आणि टेक्निकल रिसोर्सेसचेही विशेष आभार मानले
हा video बनविण्यासाठी त्यांच्या मोहीम 55-56चे सहयोगी अंतराळवीरांनी प्रोत्साहन दिल्याबद्दल विशेष आभारही मानले त्यांच्या ह्या यशात त्यांचे कुटुंबीय व मित्रांचाही वाटा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले
त्यांच्या गाण्याचे बोल आहेत ,
                                         "  love is all around and us,
                                          We are all around the World"
           
      

 

अंतराळ मोहीम 56 चे तीन अंतराळवीर 4 तारखेला पृथ्वीवर परतणार

 Drew Festal (right) and Ricky Arnold (left) of NASA, along with Oleg Artemyev of Roscosmos (center)
 नासाच्या मोहीम 56चे कमांडर Drew Feustel,flight engineer Ricky Arnold आणि Oleg Artemyev यांच्या अंतराळस्थानकातील वास्तव्यादरम्यानचा क्षण -फोटो -नासा संस्था 

नासा संस्था -2 oct.
नासाच्या अंतराळ मोहीम 56चे कमांडर Drew Feustel, flight engineer Ricky Arnold  आणि flight engineer व  सोयूझ कमांडर रशियन अंतराळवीर Oleg Artemyev गुरुवारी 40ct.ला पृथ्वीवर परतणार आहेत
 हे तीनही अंतराळवीर सोयूझ MS-08 ह्या अंतराळ यानातून पृथ्वीवर परततील स्थानकातून निघाल्यानंतर जवळपास तीन तासानंतर त्यांचे सोयूझ यान कझाकस्थानातील Dzhezkazgan येथे पोहोचेल
त्या आधी 3oct.ला स्थानकात कमांडर ceremony पार पडेल सध्याचे कमांडर Drew Feustel स्थानकाच्या कमांडर पदाची सूत्रे Alexander Grest ( ESA ) ह्याच्या हाती सोपवतील
4oct.ला 12.30a.m.-ला अंतराळवीरांचा  Farewell ceremony कार्यक्रम होईल आणि अंतराळवीर एकमेकांचा निरोप घेतील नंतर यानाचे  Hatch Closure पार पडेल 3.30a.m.-ला यानाची  Unlocking प्रक्रिया पार पडेल
6.30a.m.ते 6.51a.m.-वाजेपर्यंत  Deorbit burn & 7.45 वाजता यानाचे Landing होईल व सर्व क्रिया व्यवस्थित पार पडल्यानंतर सोयूझ अंतराळयान पृथ्वीकडे झेपावेल
ह्या सर्व घडामोडींचे लाईव्ह प्रक्षेपण नासा t.v. वरून करण्यात येणार आहे
पृथ्वीवर पोहोचल्यानंतर ह्या अंतराळवीरांना हेलिकाफ्टरने कझाकस्थानातील recovery staging city Karaganda येथे नेण्यात येईल आणि चेकअप नंतर नासाच्या दोन विमानाने अंतराळवीर आपल्या इच्छित स्थळी पोहचतील
अंतराळवीर Feustel आणि Arnold नासाच्या विमानाने Houston येथे जातील तर रशियन अंतराळवीर Artemyev रशियातील त्यांच्या घरी Star City येथे जातील
ह्या तीनही अंतराळवीरांनी अंतराळ स्थानकात 197 दिवस वास्तव्य केले असून त्यांनी स्थानकातील त्यांच्या वास्तव्यादरम्यान स्थानकातून पृथ्वीभोवती 3,152 वेळा फेऱ्या मारल्या
अंतराळवीरांनी अंतराळस्थानकातील त्यांच्या वास्तव्यात स्थानकातील फिरत्या लॅब मध्ये सुरु असलेल्या संशोधनात्मक वैज्ञानिक प्रयोगात सहभाग नोंदवला हे संशोधन पृथ्वीवरील मानवी आरोग्यासाठी,अंतराळवीरांच्या स्थानकातील  वास्तव्यासाठी व आगामी दूरवरच्या अंतराळ मोहिमांसाठी उपयुक्त आहे