Thursday 26 January 2017

जपानी H T V-6 कार्गोशिप 27 जानेवारीला पृथ्वीवर परतणार


                                                 Japanese H T V-6                                                       फोटो -नासा संस्था 

 नासा संस्था -  24  जानेवारी
नासाच्या अंतराळ मोहीम 50 च्या अंतराळवीरांनी जपानच्या H T V-6 ह्या कार्गोशिपचे चेकिंग पूर्ण केले असून आता शुक्रवारी अंतराळ स्थानकातून हे कार्गोशिप पृथ्वीकडे येण्यासाठी उड्डाण करेल
अंतराळवीरांना लागणारे 4.5 tan वजनाचे स्थानकात सुरु असलेल्या संशोधनासाठीचे आवश्यक साहित्य,इंधन व पाणी घेऊन H T V-6 हे कार्गोशिप पृथ्वीवरून सहा आठवड्यापूर्वी अंतराळस्थानकात गेले होते अंतराळ वीरांनी नुकतेच स्पेसवॉक करून बसवलेले अडाप्टर व नवीन बॅटरीज देखील ह्याच कार्गोशिप मधून पाठवण्यात आल्या होत्या
H T V-6  कार्गोशिप पृथ्वीच्या कक्षेत शिरून पॅसिफिक महासागराच्या वर पोहचताच पेट घेईल व त्या नंतर ते नष्ट केल्या जाईल
ह्या मोहिमेचे कमांडर Shane Kimbrough व फ्लाईट इंजिनीअर Thomas Pesquet  ह्या दोघांच्या देखरेखीखाली
H T V-6 ह्या कार्गोशिपच्या release चे काम पूर्ण केल्या जाईल ह्या घटनेचे थेट प्रक्षेपण नासा T.V. वरून केल्या जाणार आहे
नासाच्या अंतराळवीरांनी तिथे सुरु असलेल्या संशोधनांतर्गत कमी गुरुत्वाकर्षणाचा मानवी डोळ्यावर व दृष्टीवर काय परिणाम होतो हे जाणुन घेण्यासाठी त्यांच्या डोळ्याचे चेकिंग केले त्या साठी आवश्यक असलेले Optometry Instrument आधीच अंतराळ स्थानकात पाठवले होते ह्या Instrument च्या साहाय्याने डोळ्याच्या रेटिना व आतील भागाचे निरीक्षण करता येते

            अंतराळ स्थानकात Peggy Whitson आपल्या डोळ्याचे चेकिंग करताना                  फोटो -नासा संस्था




Sunday 15 January 2017

नासाच्या अंतराळवीरांचा दुसरा स्पेस वॉकही यशस्वी


                     स्पेस वॉक करून परतल्यानंतर अंतराळवीरांची हि आनंदी मुद्रा   -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -15 Jan.
नासाच्या अंतराळ मोहीम 50 चे कमांडर Shane Kimbrough आणि फ्लाईट इंजिनीअर Thomas Pesquet  ह्या दोन अंतराळ वीरांनी ह्या आठवडयात अंतराळ स्थानकातील तांत्रिक कामासाठी दुसऱयांदा स्पेस वॉक केला
सहा जानेवारीला Shane Kimbrough व Peggy Whitson ह्यांनी त्यांच्या मोहिमेतील पहिला स्पेसवॉक केला होता
अंतराळवीरांनी केलेला ह्या आठवडयातील हा दुसरा स्पेस वॉकही यशस्वी झाला आहे जवळपास सहा तासांच्या ह्या स्पेसवॉक मध्ये ह्या दोघांनी अंतराळ स्थानकात मागील आठवडयातील उर्वरित adapter plates बसवल्या आणि तीन जुन्या निकेल हायड्रोजन बॅटरिज बदलून त्या जागी नवीन तीन लिथियम आयन बॅटरीज  बसवल्या त्या आधी त्यांनी ह्या बॅटरीजच्या इलेक्ट्रिकल कनेक्शन जोडणीसाठी आवश्यक हुक प्लेट मध्ये अडकवले
ह्या नवीन लिथियम आयन बॅटरीज आधीच्या बॅटरीज पेक्षा कमी जागा व्यापणारया व अधिक पॉवरफुल आहेत ह्या बॅटरीजचा उपयोग अंतराळ स्थानकाला जोडलेल्या सौर प्रणालीतील ऊर्जा गोळा करून ती साठवण्यासाठी होतो
ह्या दोन अंतराळवीरांनी ह्या शिवाय अंतराळस्थानकासाठी आवश्यक व पुढील स्पेसवॉकसाठी उपयोगी असलेली इतर कामेही ह्या स्पेसवॉक मध्ये केली आहेत
Shane Kimbrough ह्यांचा ह्या आठवडयातील हा दुसरा व त्यांच्या करिअर मधला चवथा यशस्वी स्पेसवॉक होता तर Thomas Pesquet  ह्यांचा मात्र हा पहिलाच स्पेसवॉक होता
अंतराळवीरांनी आतापर्यंत अंतराळस्थानकाच्या तांत्रिक कामासाठी केलेल्या स्पेसवॉक मधील हा 197 वा  स्पेसवॉक होता 

Saturday 7 January 2017

नासाच्या Shane Kimbrough व Peggy Whitson ह्यांनी केला यशस्वी Space Walk


           Peggy Whitson ,Shane Kimbrough  (NASA) आणि Thomas Pesquet (ESA) ह्यांनी रोबोटिक ट्रेनिंग
           दरम्यान घेतलेला हा सेल्फी       फोटो -नासा संस्था

नासा संस्था-7 जानेवारी
नासाच्या अंतराळ मोहीम 50 चे कमांडर Shane Kimbrough व Flight Engineer Peggy Whitson ह्या दोघांनी स्पेस स्टेशनच्या तांत्रिक कामासाठी शुक्रवारी केलेला Space Walk यशस्वी झाला

            Peggy Whitson  आणि Shane KImbrough स्पेसवॉकला जाण्याआधी  फोटो -नासा संस्था

सहा तास बत्तीस मिनिटांच्या ह्या स्पेस वॉक मध्ये ह्या दोन्ही अंतराळवीरांनी स्पेस स्टेशनच्या बाहेरील भागात रोबोटिक आर्मच्या मदतीने नवीन adapter plates install केले आणि स्टेशनच्या बाहेरील तीन जुन्या निकेल हायड्रोजन बॅटरीज बदलून त्या ठिकाणी नव्या Lithium ion बॅटरीज बसवल्या ह्या बॅटरीजचा उपयोग स्थानकातील सोलर arrays पासून मिळणारी सोलर इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करून ठेवण्यासाठी होतो
त्यांनी इतर अनेक तांत्रिक कामेहि केली ह्या स्पेसवॉक साठी लागणारे सामान जपानी कार्गोशिप मधून डिसेंबर मध्येच अंतराळस्थानकात पाठवण्यात आले होते
आता अंतराळस्थानकाच्या उरलेल्या कामासाठी तेरा जानेवारीला हे अंतराळवीर ह्या मोहिमेतील दुसरा स्पेसवॉक करणार आहेत

                         अंतराळवीर Snane Kimbrough व Peggy Whitson  स्पेस वॉक करताना

नासाचे कमांडर Shane Kimbrough ह्यांचा हा चवथा स्पेसवॉक होता त्यांनी परिधान केलेल्या ड्रेसवर लाल रंगाच्या रेषा होत्या आणि त्यांच्या डोक्यावरील हेल्मेटमध्ये कॅमेरा( Camera 18 ) बसवलेला होता
नासाची flight engineer Peggy Whitson च्या करिअर मधला हा सातवा स्पेसवॉक होता
आता तिने सर्वात जास्तवेळा स्पेसवॉक करणाऱया अंतराळवीरांगनेच्या यादीत प्रथम स्थानावर असणारया नासाच्या अंतराळ वीरांगना  Suni Williams ह्यांच्याशी बरोबरी केली आहे peggy ने परिधान केलेल्या ड्रेसवर रेषा नव्हत्या पण तिच्या डोक्यावरील हेल्मेट मधेही कॅमेरा बसवलेला होता ( Camera 20 ) ह्या दोन्ही अंतराळवीरांना Thomas Pesquet ह्या अंतराळवीराने मदत केली त्याचा हा पहिलाच स्पेसवॉक होता
ह्या अंतराळवीरांनी केलेला हा 196 वा स्पेसवॉक होता आतापर्यंत अंतराळस्थानकातील तांत्रिक कामासाठी अंतराळवीरांनी 195  वेळा स्पेसवॉक केले होते
स्पेस वॉक करणे अंतराळवीरांसाठी आवश्यक आणि आव्हानात्मक काम असले तरी तो जीवघेणा असतो आणि T.V. वर लाइव टेलिकास्ट पाहणाऱया सायंन्स प्रेमी प्रेक्षकांसाठी काळजाचा ठोका चुकवणारा आणि थरारक असतो  कारण अंतराळात वातावरणविरहित अवस्थेत तरंगत वस्तू पकडणे ,फिटिंग करणे दुरुस्ती करणे अत्यंत कठीण असते विशेषतः महिलांसाठी आणि पेगीन हि यशस्वी कामगिरी तब्बल सातवेळा केलीय हि अभिनंदनीय बाब आहेच आता तेरा तारखेला ती पुन्हा स्पेसवॉक करणार आहे