Sunday 18 October 2015

अमेरिकन अंतराळवीर स्कॉट केलीन केले अंतराळ मोहिमेत तीन रेकॉर्ड ब्रेक

                                 फोटो -नासा संस्था स्कॉट केली अंतराळ स्थानकातून पाहताना
नासा संस्था -16oct.
अंतराळातील आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनने पंधराव्या वर्षात यशस्वी पदार्पण  केले असुन येत्या दोन nov ला स्पेस स्टेशनचा पंधरावा वर्धापन दिन आहे
                               अमेरिकन अंतराळवीर स्कॉट केलीन केले आंतराळ मोहिमेत तीन रेकॉर्ड 
  45 व्या अंतराळ मोहिमेचे कमांडर अमेरिकन अंतराळवीर स्कॉट केली ह्यांनी आपल्या अंतराळ मोहिमेत तीन रेकॉर्ड ब्रेक केले आहेत
16oct.ला स्कॉट केली ह्यांचा अंतराळातील स्पेस स्टेशन मधील 383 वा दिवस सुरु होईल त्यांनी ह्या आधीचा अमेरिकन अंतराळवीर  Mike Fincke ह्यांचा अंतराळात 282 दिवस राहण्याचा विक्रम मागे टाकत नव्या विक्रमाची नोंद केलीय 
29 oct.ला स्कॉट केली अंतराळात सलग 216 राहण्याचा दुसरा रेकॉर्ड ब्रेक करतील 2006 मध्ये 14 व्या अंतराळ मोहिमेचे Michael Lopez-Alegria ह्यांनी ह्या आधी 215 दिवस सलग अंतराळातील स्पेस स्टेशन मध्ये राहण्याचा विक्रम केला होता तो स्कॉट केली मोडतील 
तसेच त्यांच्या स्पेस स्टेशन मधील एक वर्षाच्या वास्तव्यात येणारा प्रत्येक दिवस ह्या विक्रमात नोंदविल्या जाइल आणि ह्या वास्तव्यातील जास्ती दिवस राहतानाच त्याचे होणारे परिणामहि अभ्यासतील   
ह्या फोटोत स्कॉट केली अंतराळ स्थानकातील Cupola मध्ये दिसत आहेत ज्या मधून पृथ्वी कडे 360 डिग्री कोनातून पाहता येते  


Sunday 11 October 2015

मंगळ यानाच्या उष्णता रोधक शिल्डची चाचणी यशस्वी


                  फोटो -नासा संस्था

नासा संस्था -6oct.
नासाने आगामी मंगळ मोहिमेसाठी पाठवण्यात येणारया स्पेक्टो क्राफ्ट साठी आधुनिक तंत्रज्ञान वापरून उष्णता रोधक शिल्ड तयार करण्यात यश मिळवले आहे नुकतीच मंगळावरील वातावरणा सारखे वातावरण तयार करून ह्या शिल्डची यशस्वी चाचणी घेण्यात आली मंगळावर पाठवण्यात येणारया स्पेक्टोक्राफ्टला मोठया आकाराच्या उष्णता रोधक शिल्डची आवश्यकता भासते कारण मंगळाच्या वातावरणात शिरताना तयार होणारी उष्णता व यानाचा वेग नियंत्रित करताना तयार होणारया उष्णतेशी सामना करत स्वत:ला सुरक्षित ठेऊन यानाला तिथल्या वातावरणात प्रवेश करण आवश्यक असत हे काम अत्यंत जिकीरीचे व कठीण आहे

                    सद्याच्या उष्णता रोधक  शिल्डला लिमिट नवीन प्रगत शिल्ड बनवण्यात यश 

सध्या जे रॉकेट आहे त्यात उष्णता रोधक व स्पेक्टोक्राफ्ट साठी फार कमी व सीमित जागा आहे  त्या मुळे यानाला खूप अडचणीचा सामना करावा लागतो म्हणूनच नासाच्या Sillicon Valley  येथील एम्स रिसर्च सेंटर कॅलीफोर्निया मधील इंजीनीयर्सनी  आधुनिक तंत्र  वापरून ह्या समस्येवर उपाय शोधण्यात यश मिळवले आहे
                                              ADEPT ह्या  आधुनिक टेक्निकचा वापर 

ADEPT ह्या  आधुनिक प्रोजेक्टचा  वापर (  heating simulation testing of an ADEPT model)  त्या साठी करण्यात आला कार्बन फेब्रिक चा वापर करून हिट शिल्ड तयार करण्यात आली हि शिल्ड लवचिक असून उघडल्यावर छत्रीसारखी दिसेल
मंगळासारखे वातावरण कृत्रिमरित्या तयार करून संशोधकांनी घेतलेल्या  ह्या स्पेक्टो क्राफ्ट च्या उष्णता रोधक शिल्डच्या चाचणीला यश मिळाले आहे   

Morning aurora आंतर राष्ट्रीय स्पेस स्टेशन वरून

    फोटो- नासा संस्था-Skott Kelly
नासा संस्था -9 oct.
नासाचे  अंतराळवीर स्कॉट केली ह्यांनी आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन वरून हे निसर्गरम्य नैसर्गिक हिरव्या रंगाचे पटल 7oct.ला सकाळी कॅमेराबद्ध केले
आणि सर्वांना Good Mornihg म्हणत हे छायाचित्र  पाहण्यासाठी उपलब्ध केलेय 

Friday 9 October 2015

प्लुटो वर निळे आकाश आणि बर्फ नासाचा शोध

                                                    फोटो -नासाच्या होरायझन यानातील MVIC कॅमेरयाने घेतलेले

नासा न्यूज सर्विस -9oct.

प्लुटो वर निळे आकाश आणि बर्फ  आढळले असल्याचा शोध नासाच्या संशोधकांनी लावला असुन नासाच्या  होरायझन या अंतराळ यानातील ( MVIC)  ह्या कॅमेरयाने प्लुटोवरील हे दृष्य टिपले आहे प्लुटोचा नैसर्गिक चंद्र " Titan "  वर दिसणारे धुके व प्लुटोवरील धुके सारखेच असल्याचे मानले जातेय सूर्य प्रकाशामुळे वातावरणातील नायट्रोजन व मिथेन वायु ह्यांच्या रासायनिक प्रक्रियेमुळे काजळीचे सूक्ष्म कण तयार होतात त्यांना Tholins म्हणतात हे कण पृष्ठ्भागाकडे येताना मात्र मोठे होत जातात

प्लूटोच्या वातावरणातील धुक्याचे हे पहिले रंगीत छायाचित्र नासाच्या होरायझन या अंतराळ यानातील ( MVIC)  ह्या कॅमेरयाने टिपले आहे
Kuiper बेल्ट मध्ये निळ्या आकाशाची कल्पना आजवर कोणीही केली नव्हती हे दृष्य खरोखरच अप्रतिम !वातावरणातील सूक्ष्म कण सूर्यप्रकाशामुळे परावर्तीत झाल्यामुळे त्यांना निळसर रंग प्राप्त झाला आहे
Tholins चा रंग करडा किंवा लाल असतो पण ते निळा रंग कसे परावर्तीत करतात ह्याचे कोडे शास्त्रज्ञ उलगडत आहेत


               फोटो -नासा -होरायझन यानातील MVIC ह्या कॅमेरयाने टिपलेले प्लुटो वरील बर्फ

                                                        प्लुटो वर आढळले बर्फ  
 होरायझन मधील कॅमेरयाने  टिपलेल्या छायाचित्रात प्लुटो वरील भूभागात काही ठिकाणी बर्फाचे पट्टे आढळले आहेत पण खूप कमी ठिकाणी ते दिसतात हे पाण्याचे बर्फ का दिसतेय ह्याचा शोध शास्त्रज्ञ घेत आहेत आणि त्यांच्यासाठी ते मोठे आव्हान आहे
Mery land University च्या विज्ञान संशोधीका सिल्विया प्रोटोपापा म्हणतात कि जिथे पाण्याच्या बर्फाचे पट्टे आढळले आहेत ते छायाचित्रात लाल रंगाचे दिसतात त्या मुळे पाण्याचा बर्फ व लाल रंग प्रदान करणारे थोलीन चे कण ह्याचा काय संबंध आहे ह्याच आम्ही संशोधन करतोय 
New Horizan हे अंतराळ यान पृथ्वीपासून 3.1 billion miles अंतरावर आहे व व्यवस्थित कार्य करत आहे  

मंगळावरच्या वालुकामय भागात आढळला भेगाळलेला पृष्ठभाग

  फोटो -नासा संस्था -HiRISE camera

नासा न्यूज सर्विस -7oct.

मंगळावरच्या वालुकामय भागात भेगाळलेला पृष्ठभाग आढळला असून नासाच्या Mars Reconnaissance Orbiter ह्या यानातील
HiRISE ह्या कॅमेरयाने तो भाग छायाचित्रीत केला आहे
ह्या कॅमेरयामुळे मंगळावरील वातावरणातील घडामोडी ,मातीची धूप ,वारा वादळ माती व मातीच्या कणांचा आकार ह्या बद्दलची अद्ययावत माहिती मिळते
ह्या कॅमेरयाने घेतलेल्या ह्या छायाचित्रात नदीतील गाळ व वाळूच्या थरांमुळे तयार झालेले सेडीमेंटरी खडक काही ठिकाणचा भेगाळलेला भागही दिसतोय त्यावरून शास्त्रज्ञांनी असा निष्कर्ष काढलाय की हा भाग वालुकामय आहे म्हणजे तिथे वाळू असावी जर तिथे वाळू आहे तर नक्कीच त्या भागातून पूर्वी नदी वाहात असणार तिथल्या वादळवारया मुळे ,वातावरणतील  विध्वंसक घडामोडींचा परिणाम होऊन नंतर अतीउष्णते मुळे त्या आटून कोरड्या पडल्या पण नदीकाठच्या भागात वर्षानुवर्षे नदीबरोबर वहात आलेल्या गाळामुळे त्यांच्या थरामुळे तिथे वाळूमिश्रित खडक (सेडीमेंटरी रॉक ) तयार झाले पण नंतर बदलेल्या वातावरणामुळे व तो भाग वाळल्यामुळे कडक झाला आणि त्या भागाला भेगा पडल्या असाव्यात
हा भाग ह्या फोटोत ठळक पणे  गडद व खोल दिसत असल्याने मंगळावर पूर्वी पाणी होते ह्या शक्यतेला पृष्ठी तर मिळतेच शिवाय आता नवीन संशोधना नंतर तिथे अजूनही पाणी असल्याचे पुरावे मिळाले आहेत नासाचे अंतराळवीर ह्या शक्यतेवर दररोज नवनवीन संशोधन करत आहेत           

Wednesday 7 October 2015

पृथ्वी ते स्पेस स्टेशन कार्गो ट्रफिक

नासा न्यूज  सर्विस -2 oct. 

पृथ्वीवरील शहरी भागातली रस्त्यावरील ट्रफिक आपण नेहमीच पाहतो ,अनुभवतो  कधी,कधी तर ट्रफिक जाम झाल तर जाम वैतागतो देखील पण  हि बातमी आहे ती  ह्या आठवडयातील पृथ्वी ते नासाच स्पेस स्टेशन ह्या  मार्गावरची.
नासाच्या अंतराळ स्थानकावर ह्या आठवडयात  दोन मालवाहू विमानांच्या  (कार्गो ) येण्या जाण्या मुळे अंतराळ स्थानकासाठी रहदारीचा ठरला त्या बाबतीतली माहिती अशी,
अंतराळ स्थानकात पृथ्वीवरून जपानचे HTV-5  हे  कार्गो विमान पाच आठवड्या आधी अंतराळ स्थानकावर गेले होते पाच टन  अत्यावश्यक सामान घेऊन गेलेले हे मालवाहू विमान अजूनही तिथेच होते  ह्या आठवडयात तिथून पृथ्वीकडे  परत निघालेले हे कार्गो विमान एक दिवसानंतर पृथ्वीच्या कक्षेत प्रवेशले  पण प्रशांत महासागराच्या वरच्या परिसरात  येताच ते जळून नष्ट  झाले अंतराळ स्थानकातून येताना अंतराळ वीरांनी त्या मधून टाकाऊ कचरा पाठवला होता तो ह्या कार्गो विमानासोबत जळून गेला

1oct.ला कझाकीस्थान येथून सोडलेले रशियाचे कार्गो विमान सहा तासानंतर अंतराळ स्थानकात पोहोचले
त्यात मोहीम 45 च्या चमुसाठी लागणारी अन्न सामुग्री ,इंधन ,Hardware व इतर सामानांचा त्यात समावेश असून सामानाचे वजन तीन टन आहे हे कार्गो विमान डिसेंबर पर्यंत तिथे राहणार आहे.
सद्या हि  कार्गो विमानांची  पृथ्वी ते अंतरिक्षातील वाहतूक  तुरळक असली तरीही प्रगत देशांचा अंतराळ संशोधनाचा वाढता कल पाहता भविष्यात स्पर्धा वाढून पृथ्वी ते अंतरीक्ष मार्गावर ट्रफिक जाम झाल्यास नवल नाही 

ह्या आठवडयात  अंतराळ स्थानकातील  अंतराळवीर किमिया युई ह्यांनी नियंत्रक वापरून जर्मनी इथे असलेल्या रोवरला निर्देश पाठवले भविष्यात ह्या तंत्रज्ञाना मुळे मंगळाभोवती फिरणारया अंतराळवीरांना मंगळाच्या पृष्ठभागावर कार्यरत असलेल्या रोबोटला नियंत्रित करता येईल  त्या मुळे सद्या  पृथ्वीवरून नियंत्रित करताना होणारा विलंब टाळता येईल.
हे  नवीन तंत्रज्ञान एखाद्या धोकादायक ठिकाणी रोबोट पाठवण्यासाठी  मानवालाही उपयुक्त ठरेल
सद्या मंगळावर वाहते पाणी असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे  ती जर खरी ठरली तर पुढची तयारी
म्हणून अंतराळवीर अशा शक्यतेचा विचार करून नवीन तंत्र विकसित करत आहेत ज्याचा उपयोग मंगळावर उतरलेल्या रोवरला वाहत्या पाण्यातून वाट काढण्यासाठी होईल.   


नासाच्या MAVEN मंगळ यानाला वर्ष पूर्ण

MAVEN ह्या नासाच्या अंतराळ यानाच्या मंगळाच्या कक्षेतील भ्रमणाला  नुकतेच  एक वर्ष पूर्ण झाले असून 
ते यशस्वीपणे तिथे कार्यरत असून त्याने अत्यंत महत्वाची माहिती गोळा केली आहे  
हे अंतराळ यान फ्लोरिडा  येथील Cape Canaveral Air Force Station येथून 18 Nov 2013 प्रक्षेपित करण्यात आले होते ते 21 Sept 2014 ला मंगळाच्या कक्षेत पोहोचले
 MAVEN प्रकल्पाचे प्रमुख संशोधक ब्रूस जॉकोस्की म्हणतात  MAVEN चे हे यश म्हणजे ह्या प्रकल्पातील सर्वच संशोधकांनी केलेल्या अविरत व अथक परिश्रमाचे फलित आहे.16Nov 2014 पासून सुरु झालेल्या मावेन यानाच्या मंगळ मोहिमेचे मुख्य उद्दिष्ठ वायू व उत्सर्जनामुळे मंगळाच्या वातावरणात झालेल्या बदलाचा अभ्यास करणे हा असून सर्वात वरच्या थरापासून खालच्या थरापर्यंतचा अभ्यास  व त्यातला नेमका संबंध काय ह्या बाबतीतले महत्वपूर्ण संशोधन ह्या अंतराळ याना मार्फत केल्या जातेय .
आणखी दोन महिने हे काम चालेल त्या नंतर मावेनचा कार्यकाळ वाढविल्या जाइल मावेन मार्फत मंगळावरील वातावरणाची अत्यंत महत्वपूर्ण माहिती मिळवल्या जातेय. 
Mery land  येथील नासाच्या  Godard Space Flight Center येथून मावेन अंतराळ यानाचे नियंत्रण केल्या जातेय . 

MAVEN ने वर्षभरात पूर्ण केलेले महत्वाचे काम :

यशस्वी पणे मंगळ कक्षेत प्रवेश करून स्थिरावल्या नंतर मावेनने
Sliding Spring ह्या धुमकेतुशी  सामना करत यानाची तांत्रिक चाचणी पूर्ण करून 
मंगळ निरीक्षणाचे दहा महिने पूर्ण केले आहेत आणि 
चार वेळा " deep dig " मोहीम ( माती परीक्षणासाठी खोदकाम करणे ) पूर्ण केली आहे 
मावेनचे प्रोजेक्ट Manager Richard Burns ह्यांच्या मते ह्या अंतराळ यानाला मंगळावरील वातावरणाशी जुळवून घेण्याचे अतुलनीय काम मावेन प्रकल्पाच्या चमूने यशस्वीपणे केले आहे.

Nebula veil

                              Nebula veil-फोटो -नासा हबल टेलिस्कोप
नासा संस्था -

       साधारणत:  8000 वर्षापूर्वी अंतरिक्षातील विनाशकारी घडामोडींमुळे सूर्यापेक्षा वीसपट मोठया असलेल्या ग्रहाचा विस्फोट झाला त्याचे अवशेष तुकड्यांच्या रुपात अजूनही अंतराळात फिरत असतात अशाच नष्ठ न झालेल्या ग्रहाच्या एका तुकडया वरील पातळ रंगीबिरंगी पटलाचे  हे आकर्षक छायाचित्र नासाच्या हबल टेलिस्कोप ने टिपले आहे
अंतरिक्षातील धूळ ,हायड्रोजन ,हेलियम व इतर वायूंमुळे तयार झालेले हे रंगीत पटल पृथ्वीपासून 110 प्रकाशवर्ष दूर आहे
त्याला veil nebula  असे  नाव देण्यात आले आहे    

Friday 2 October 2015

मंगळावर पाणी असल्याच्या खुणा सापडल्या नासाकडून दुजोरा

                         फोटो - Nasa-HiRISE Camera- मंगळावरील पाणी असल्याच्या खुणा दर्शविणारया गडद रेषा

नासा संस्था -29sept.

         नासाकडून  मिळालेल्या माहितीनुसार  मंगळावर पूर्वी पाणी होते हे सिध्द करणारे पुरावे मिळाले आहेत
मंगळ ग्रह अपशकुनी ,चांगल्या कार्यात विघ्न आणणारा म्हणून कितीही दोषारोपित असला तरीही शास्त्रज्ञ सतत मंगळावर जीवसृष्टी होती का?  त्यासाठीच आवश्यक वातावरण तिथे होत का ,आताही तिथे सूक्ष्मजीव   आहेत का ?   तिथे जीवसृष्टी असेल तर पाणी असणारच या सारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मंगळावर मानवरहित यान पाठवून सतत संशोधन करत असतात
आपला भारतही आता मागे राहिलेला नाही नुकतच भारताच्या मंगळ  मोहिमेला  ( MOM)  वर्ष पूर्ण झालय

                                                मंगळावर पाणी होत , नासाकडून पृष्ठी 
नासाच्या  MRO  (  Mars Recnnaissance Orbiter )  द्वारे केलेल्या नवीन संशोधनानुसार मंगळवार पाण्याचे अस्तित्व होते हे सिद्ध करणारे पुरावे मिळाले आहेत  आता नवीन संशोधनात खारट पाण्याचे अंश असलेल्या असंख्य रेषा (  वाहत्या पाण्याच्या धारांच्या खुणा )  मंगळा वरील डोंगर माथ्याच्या उतारावरील  भागात बरयाच ठिकाणी आढळल्या आहेत
MRO च्या इमेजिंग स्पेक्टोमिटर  ह्या उपकरणाच्या साह्याने घेतलेल्या छायाचित्रामध्ये मंगळावरील डोंगरावरील उतार भागातील खडकांमधील खनिजात बाष्प आढळले आहे व ते प्रवाही असल्याच्या खुणा सापडल्या आहेत ह्या वाहत्या पाण्याच्या प्रवाहामुळे खडकावर परिणाम होऊन त्यांची झीज झाली असावी आणि अति उष्णतेने पाणी आटुन तो भाग कोरडा पडला पण पाणी अतिशय खारट असल्याने त्यातील मिठाचे अस्तित्व तसेच राहिले खडकावरील ह्या वाहत्या पाण्याच्या धारांच्या खुणा मंगळावर पाणी असल्याचा पुरावा देतात असा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला आहे
उतार भागात असलेल्या पट्टयात बाष्प मिश्रित खनिज सापडले आहेत विशेष म्हणजे खानिजावरील पडलेल्या वाहत्या पाण्याच्या रेषा उष्ण वातावरणात  गडद व प्रवाही दिसतात तर थंड वातावरणात पुसट  दिसतात  जेव्हा तापमान उणे १०. F (उणे २३.C ) असते तेव्हा गोठल्या मुळे ह्या रेषा ठळकपणे दिसत नाहीत
पण उष्ण तापमानात त्या प्रवाही स्थितीत दिसतात  स्पेक्टोमिटरने केलेल्या निरीक्षणात मंगळावर खारे पाणी असल्याचे पुरावे मिळाले असून मंगळावर जीवसृष्टी होती का? ह्याचा शोध घेण्यासाठी हि माहिती अत्यंत उपयुक्त ठरू शकते कारण पूर्वी जर मंगळावर जीवसृष्टी  असेल आणि ती नंतर नष्ठ झाली असेल तर त्यांचे सूक्ष्म जीवाणू ह्या बाष्पयुक्त खनिजात अस्तित्वात असतील तर ते शोधण्यात वैज्ञानिकांना मदत होईल
पूर्वीपासूनच मंगळाच्या पृष्ठभागावरील उतार भागातील खडकावर जवळपास १०० मीटर लांबीच्या दिसणारया ह्या रेषा मंगळावर पाण्याचे अस्तित्व असल्याचे पुरावे देतात  ते पाणी अती उष्णतेने वाळून कोरडे पडल्यामुळे  उतार भागात तयार झालेल्या रेषांच्या स्वरूपात त्या दिसत असाव्यात असा निष्कर्ष शास्त्रज्ञानी काढला आहे बाष्पयुक्त खनिजांमधील रासायनिक घटकांमुळे पाण्याचा गोठणबिंदू कमी होत असावा असेही शास्त्रज्ञांना वाटतेय

                                            पाण्याच्या अस्तित्वाचे पुरावे सापडले 

           फोटो -  HiRISE Camera-   मंगळावरील Garni Creater ह्या उतारावरील भागातील गडद रेषा  


२०१० साली प्रथम ह्या रेषा मुळच्या नेपाळच्या व सद्या जॉर्जिया institute मध्ये कार्यरत असलेल्या लुजेन्द्र ओझा ह्यांना MRO च्या HiRISE  (High Resolution Imaging Science Experiment  )  प्रयोगा दरम्यान घेतलेल्या छायाचित्रामध्ये दिसल्या होत्या पण त्यांचे अस्तित्व चक्रावणारे होते कारण त्या कधी दिसत तर कधी गायब होत त्या मुळे त्यांनी त्या भागाचे हिवाळ्यात व उन्हाळ्यात अजून संशोधन केले आणि मंगळावर अतिशय खारट पाण्याचे स्रोत अस्तित्वात असावेत असा निष्कर्ष त्यांनी काढला त्यांचा शोध निबंध नेचर Geoscience मध्ये प्रकाशित झाला आहे ओझा ह्यांनी केलेल्या संशोधना नुसार खानिजामध्ये magnesium perchlorate ,magnesium chlorate आणि sodium perrchlorate ह्यांचे मिश्रण असावे काही perchlorate हे अतिथंड तापमानात साध्या पाण्याचे रुपांतर बर्फात होऊ देत नाहीत
आता नवीन संशोधनानुसार मंगळावरील डोंगरातील उतारावरच्या खडकाळ भागात  बरयाच ठिकाणी   खडकाला चरे पडलेले आढळले आहेत पाण्याच्या अस्तित्वाचे पुरावे देणारया ह्या असंख्य रेषा तिथुन वाहणारया  पाण्याच्या धारांमुळे पडलेल्या असाव्यात  असा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला आहे मंगळावरील अंतर्गत व अंतराळातील बाह्य घडामोडी मुळे नंतर तिथले पाणी नष्ठ झाले असावे आणि तिथल्या विरळ वातावरणामुळे जीवसृष्टीहि नष्ठ झाली असावी मंगळावर सजीव असतील  ह्या शक्यतेवर आणि मंगळ यानावरून  मिळालेल्या नवीन छायाचित्रात दिसत असलेल्या तेथील खडकात  fossils च्या खुणा असतील तर त्याचेही संशोधन शास्त्रज्ञानी केल्यानंतर  ह्या शक्यतेला पृष्ठी मिळेल

                                                   मंगळावरील खडक,  वाहत्या पाण्याच्या खुणा व  fossils ?


 २००६ सालापासून वैज्ञानिक सतत MRO  उपकरणाद्वारे मंगळावरील वातावरणाच संशोधन करत आहेत
त्यांच्या मते पूर्वी देखील अशा खारट पाण्याचे अवशेष रेषांच्या रुपात आधळले आहेत
नासाच्या आधीच्या मंगळ मोहिमेतील  Phoenix lander आणि Curiosity Rover ह्यांनी गोळा केलेल्या   मंगळावरील मातिच्या नमुन्या मध्येहि  perchlorate सापडले होते
काही शास्त्रज्ञांच्या मते १९७० ला मंगळावर गेलेल्या व्हायकिंग यानाच्या मंगळ मोहिमेतही  तिथल्या मातीच्या नमुन्यात मिठाचे अस्तित्व आढळले होते आताही खारट पाण्याच्या रेषा शास्त्रज्ञांना सापडल्या आहेत त्या मुळे मंगळावर अब्जो वर्षापूर्वी पाणी होते आणि अंतरिक्षातील विनाशकारी घडामोडीमुळे तिथले जीवसृष्टीला आवश्यक वातावरण विरळ झाले व तेथील  अतीउष्णतेने नद्या कोरड्या पडून पाणी आटुन गेले व जीवसृष्टीहि नष्ठ झाली असावी ह्या शक्यतेला पृष्ठी मिळाली आहे
असे असले तरी हे पुरावे छायाचित्रातून ,खनिजातून  मातीतून मिळाले आहेत  प्रत्यक्ष तिथे जाऊन पाणी प्रवाही अवस्थेत अजूनही कोणी पहिले नाही  पण लवकरच मंगळावर मानव पाठविण्याच्या दृष्ठीने नासाचे प्रयत्न सुरु आहेत तरीही ह्या नवीन शोधामुळे मंगळावर पूर्वी पाणी होते व तिथे जीवसृष्टी अस्तित्वात होती अशी शक्यता बरयाच वर्षापासुन वर्तविल्या जात होती  त्याला प्रयोगाअंती शास्त्रज्ञांनी  दुजोरा दिलाय