Monday 31 August 2015

नासा अंतराळ संशोधन स्थानकावरील अंतराळवीर ताज्या फळाचे वाटप करताना

       
 Image Credit: NASA           अंतराळवीर केजेल लिंडग्रेन ताज्या फळांचे वाटप  करण्यासाठी जाताना  
नासा अंतराळ संशोधन स्थानक                                                                  
(नासा संस्था): Aug. 27, 2015
नासा संस्थे कढून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार 
 २५ ऑगस्ट ला kounotori 5 H- II (HTV-5) ह्या मालवाहु  कार्गो हवाई जहाजातून  ( अंतराळ यानातून ) अंतराळ स्थानकावर आलेल्या ताज्या फळांचे वाटप अंतराळ स्थानकावरील अंतराळवीर केजेल लिंडग्रेन  (Kjell Lindgren  )  हे  इतर अंतराळ वीरांना करण्यासाठी जाताना त्यांची उडालेली तारांबळ ,आतील भागात तरंगणारी हि फळे आणि केजल लिंडग्रेन यांच्या हास्यमुद्रेची हि दृश्ये अंतराळवीरांनी अचूक टिपलीत आणि हा फोटो  नासा ह्या संस्थेने सर्वांना पाहण्यासाठी  उपलब्ध केलाय  


ग्रीनलंड जवळील बर्फ व हिमनदीचा प्रवाह


Sea Ice in the Greenland Sea
 08/24/2015
उन्हाळ्यातील उष्णतेमुळे उत्तर गोलार्धातील बर्फ वितळून त्याचे पाणी आर्टिक समुद्रात मिसळल्यामुळे वहात आलेल्या हिमनदिचे पाणी आणि  Greenland समुद्रा काठचे बर्फ

                                समुद्राच्या पाणी पातळीत वाढ संशोधकांचा निष्कर्ष 
समुद्राच्या पाण्याच्या पातळीत अंदाजे तीन इंचाने  तर काही ठिकाणी नऊ इंचाने वाढ झाली असली तरी हि पाणी पातळी सर्वत्र सारखी नाही समुद्राकाठची जामिन कमी होणे ,बर्फ वितळून त्याचे पाणी समुद्रात वहात येणे व आणि बर्फामुळे तयार झालेल्या ग्लेसियर्स मधील बर्फ अती उष्णतेमुळे वितळून त्याचेही पाणी समुद्रात मिसळल्याने काही ठिकाणी पाण्याची पातळी वाढली असल्याचा निष्कर्ष  नासाच्या संशोधकांनी काढला आहे  

Thursday 27 August 2015

अंतराळ वीर मारणार सोयुझ यानातून अंतराळ स्थानका बाहेर फेरी

नासा संस्था -(अंतराळ स्थानक)

Soyuz spacecraft departs
The Soyuz TMA-08M spacecraft departs from the International Space Station's Poisk Mini-Research Module 2 (MRM2) and heads toward a landing in a remote area near the town of Zhezkazgan, Kazakhstan, on Sept. 11, 2013 (Kazakhstan time). On Friday Aug. 28, 2015, Expedition 44 crew will move the Soyuz TMA-16M spacecraft from the Poisk module to the Zvezda docking port.
Credits: NASA

इंटर national  अंतराळ स्थानकावरील अर्ध्या अंतराळवीरांच एक पथक  शुक्रवार २८ ऑगष्टला 
सोयुझ TMA -16M या अंतराळ यानातुन त्यांच्या अंतराळ स्थानका बाहेरील कक्षेत  (  orbital भोवती ) फेरी मारतील 
रशियन फेडरल स्पेस एजन्सी (Roscosmos ) मोहीम 44 चे कमांडर Gennady  Padalka, नासा उड्डाण अभियंता एस केली आणि (Roscosmos)चे मिखाइल Kornienko  Zvezda ह्यांचा त्यात समावेशआहे 
3.12 मिनिटे ते  3.37 (a.m.) मिनिटा पर्यंतच्या ह्या अंतरीक्ष भ्रमणाच्या ऐतिहासिक क्षणाचे दृश्य नासा दूरदर्शन वरून प्रसारीत केल्या जाइल 





:

Monday 24 August 2015

A Hubble Cosmic Couple

कॉस्मिक किरणांचे तेजोवलय

 spectacular cosmic pairing of the star Hen 2-427
फोटो -नासा  संस्थेकडून प्राप्त  

अंतराळातील शक्तिशाली स्फोटक व अत्यंत वेगवान कॉस्मिक किरणाच  उत्सर्जन आणि प्रचंड उष्णता,धूळ ह्या मुळे तयार झालेल्या ढगांच्या तेजोवलायाच्या मध्यभागी प्रखर तेजाने चमकणारा हेन ४२७ हा तारा
नासाच्या खगोल संशोधकांनी Hubble Tescope च्या सहाय्याने अंतराळातून  टिपलेले हे मनमोहक दृश्य  
संशोधकांनी आधीच लावलेल्या शोधानुसार हि अत्यंत प्रखर वेगवान व शक्तिशाली किरणे मानवी शरीरास हानिकारक असतात ह्याला पुन्हा एकदा पृष्ठी दिलीय

Friday 21 August 2015

श्रद्धा की अंधश्रद्धा

 सद्या अत्याधुनिक पोषाख घालुन सिनेसंगीताच्या तालावर नाचणारी पण स्वत:ला देवीचा अवतार भासवून दागिने भारी साड्यानि सजून भक्तांपुढे देवीच सोंग घेऊन त्यांना  फसवणारी त्यांच्या भोळेपणाचा फायदा उठवून त्याचा गैरफायदा घेणारी
"  भोंदू राधे मा व तिची भोंदुगिरी" ,तिचे वेडेचार ,तिची व तिच्या तथाकथित भोंदू भक्तांची चलाखी तिच्याच भक्तांकडून उघडकीस आलीय तिच्याविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप दाखल झालाय Dolly बिंद्रा आणि इतर अनेकांनीही आता तिच्या विरोधात तक्रारी दाखल केल्यात मिडियानेही तिची अधिक माहिती काढत तीच खर रूप लोकांपुढे आणलय त्या मुळेच तिची भोंदुगिरी उघडकीस आलीय ती भक्तांना लॉकेट ,अंगठी प्रसाद म्हणून देते अशी माहितीही समोर आलीय इतक सोन तिच्याकडे येत कोठून? असे प्रश्न सामान्यांना पडताहेत तसच सद्या नाशिक मध्ये सुरु असलेल्या कुंभमेळाव्यातील साधूंच्या अंतर्गत वादामुळे स्वत:ला साध्वी म्हणून घेणारया महंताच प्रकरण गाजतय 
 " साध्वी महन्ता "च भोंदूपण तिच्याच भक्त असलेल्या महिलेन उघडकीस आणलय भिकारीणींना पैसे देऊन त्यांना अनुयायी करणारी हि भोंदू महिला संसारिक त्रासाला कंटाळून साध्वी बनली आणि लोकांना फसवू  लागलीय अशी माहिती मिडियाच्या स्टिंग ऑपरेशन मुळे लोकांना कळाली  असे कितीतरी साधू अजूनही भोंदुगिरी करत भक्तांना फसवत असतील त्यांनाही पकडण आवश्यक आहे 
श्रद्धेची अंधश्राधा कधी बनते हे भोळ्या भक्तांना कळत देखील नाही आणि ह्याचाच गैरफायदा हे चलाख भोंदू साधू घेतात ह्याला कारण अज्ञान आणि अडचणीन त्रस्त झालेले लोक ह्या भोन्दुकडे जातात आणि फसतात 
      (ह्याच विषयावर लिहलेला व abp माझाच्या ब्लॉग माझावर प्रकाशित झालेला  हा लेख मी पुन्हा प्रकाशित करतेय )   

 मानवी जीवनात असे अनेक प्रसंग येतात कि माणूस नियती पुढे हतबल होतो. दुखा:ने खचून जातो.अचानक पणे आलेल्या संकटांनी घाबरून जातो अशा वेळेस माणूस ईश्वराचा धावा करतो आणि अघटीतपणे त्याला मार्ग सापडतो संकटाशी सामना करण्याची शक्ती येते आणि त्याच्या वरील संकटे दूर होतात ह्या विलक्षण योगायोगाच त्याला आश्चर्य वाटत आणि तो मनोभावे ईश्वराला शरण जातो ईश्वरावरची त्याची श्रद्धा अगाढ बनते आणि तो देवाची भक्ती करू लागतो त्याला पुजू लागतो.पण जो पर्यंत हि भक्ती एका मर्यादे पर्यंत असते तो पर्यंत ठीक असत पण एकदा का हि मर्यादा ओलांडली कि , श्रद्धेची अंधश्रद्धा कधी होते ते कळत देखील नाही. "अती  तेथे माती" हि गोष्ट मग अंधश्रद्धेच्या बाबतीत घडते नेहमी कर्म,कर्तव्य ,क्रियाशीलता ,प्रयत्न ह्याला महत्व दिल्यास देव भेटतो अगदी महाभारतातील कृष्णाचे उदाहरण त्या साठी योग्य ठरेल केवळ देवाची पूजा केल्याने आणि निवांत बसल्याने यश व पैसा कसा मिळेल?
                जो सतत कार्यरत राहतो कुठलेही अवडंबर न माजवता देवाची पूजा करतो त्याला देव सदैव प्रसन्न होतो काही वेळेस स्रिया किव्हा माणसे आपल्या संसाराकडे दुर्लक्ष करून फक्त देव,देव करतात ह्या देव, देव करण्यात कित्येकदा शाळेत जाणारी मुले उपाशी शाळेत जातात कारण आई पूजेत ,जपात किव्हा पारायणात गुंतल्याने स्वयंपाकाला उशीर होतो. अशी किती तरी उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर दिसतात .
                      हीच गोष्ट साधूच्या मागे जाण्याची असते आजकाल देवाच्या नावावर लुटण्याचा धंदा जोरात सुरु आहे काही भोंदू साधू गरीब भोळ्या ,भाबड्या लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतात त्यांना खोटेनाटे चमत्कार दाखवून फसवतात त्याच्या कडून पैसे दागदागिने लुबाडतात ,खेडोपाडी गावोगावी शहरात असे भोंदू साधू असतात असे फसवणारे साधू जेव्हा फसवणूक उघडकीला येते तो पर्यंत  परागंदा झालेले असतात जेव्हा लोक आपली समस्या घेऊन त्यांच्या कडे जातात तेव्हा त्यांच्याच तोंडून ऐकलेली माहिती जाणून घेऊन हे भोंदू त्यांचा माग काढतात आणि त्यांची आणखी माहिती गोळा करून जेव्हा त्यांना सांगतात तेव्हा चकित होऊन भक्त त्यांनी टाकलेल्या जाळ्यात अडकतात. मग ते सांगतील ते उपाय करू लागतात त्यांची सारासार बुद्धी गहाण पडते साधू ,भोंदू मागतील ती वस्तू ,पैसे,दागदागिने ,धान्य ते त्या साधूला दक्षिणा म्हणून आणून देतात आणि पूर्णपणे लुबाडले गेल्यावर भोळा भक्त भानावर येतो पण साधू त्यांना दाद देत नाही.
               कधी कधी तर ते त्यांचा फोन देखील चोरून ऐकतात भोळ्या भक्तांनी त्यांना फोन नंबर दिलेला असतोच कधी फोनला क्लिप बसवून तर कधी फोन नंबर मधेच दुसऱ्या फोनला जोडून तर कधी भ्रष्ट कर्मच्यारयाला हाताशी धरून अशा गोष्टी घडल्याची उदाहरणे मागे उघडकीस आली होती असे साधू आपल्या भोळ्या भक्तांना हातातून अंगारे,कुंकू काढून दाखवतात त्या साठी ते आपल्या शर्टाच्या किंवा  ब्लाऊजच्या बाहीत कशी खुबीने अंगारा किव्हा कुंकवाची पुडी लपवतात ते अंधश्रद्धा निर्मुलन समिती नेहमी दाखवत असते साधू हातचलाखीने हवेतून अंगठी कशी काढून दाखवतात ,नारळ आधीच फोडून त्यात खुबीने चिंदी,लिंबू हळद,कुंकू कसे घालतात अन मग चमत्कार म्हणून कसे काढून दाखवतात हे प्रकार कित्येकदा दाखवले जातात तरीही भोळे भक्त फसतातच काहींच्या अंगात देवी येते आणि त्या असे चमत्कार करून दाखवतात माझ्या लहानपणी शाळेत असताना आणि नंतरही अशा बायका मी आमच्या आसपास खूप पहिल्यात कारण सोलापूर पासून तुळजापूर जवळ असल्याने असे प्रकार नेहमी घडत दर मंगळवारी ,शुक्रवारी अशा बायकांच्या अंगात येई आणि त्या कुंकू काढण्याचे चमत्कार करीत कोणाला केळ खायला सांगत तर कोणाला उपवास करायला सांगत कोणाच्या अंगात भूत आहे असे  सांगून त्यांना झोडपत आणि दक्षिणा रूपाने भरपूर पैसे उकळीत आम्ही आमच्या परीने त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असू एकदा आमच्या घरी आलेल्या चमत्कारी गजानन महाराजाचे अवतार समजणाऱ्या भोंदू साधूला आम्ही पकडले होते.व त्याची हातचलाखी उघड केली होती
             काहीजण घरात भूत आहे ,गुप्तधन आहे असे सांगून घरात जळते कपडे टाकणे ,लिंबू टाकणे ,कपडे फाडणे घरातील वस्तू चोरी करवणे एव्हडेच नाही तर घरात साप सोडण्याचे प्रकारही करतात ह्यासाठी घरातील कोणी अंधश्रद्ध व्यक्ती ,नोकर त्यात सामील करून घेतात तर कधी घर सोडावे ह्यासाठी काही बिल्डरही हि कामे करवतात गुप्त धनासाठी बळी देण्याची घटना मागे घाटंजीत घडली आणि त्या नंतर अशा कितीतरी घटना उघडकीस आल्या तर भोंदू साधूच्या नादी लागून एका इंजिनिअरच्या पत्नीचा बळी गेल्याची घटना अशीच उघड झाली होती

.ह्या वर्षी साधू रामपाल ,आसाराम बापू त्याचा मुलगा नारायण साई या सारख्या अनेक भोंदू साधूंचा भोंदूपणा उघडकीस आलाय तर सद्या वर लिहल्या प्रमाणे अत्याधुनिक पोषाख घालुन सिनेसंगीताच्या तालावर नाचणारी पण स्वत:ला देवीचा अवतार भासवून पुराणातल्या देवी प्रमाणे दागिने भारी साड्यानि सजून हातात त्रिशूळ घेऊन भक्तांपुढे देवीच सोंग वटवून त्यांना फसवुन ,त्यांच्या भोळेपणाचा फायदा उठवून त्याचा गैरफायदा घेणारी  भोंदू राधे मा व तिची भोंदुगिरी अशीच उघडकीस आलीय ती भक्तांना लॉकेट ,अंगठी प्रसाद म्हणून देते अशी माहितीही समोर आलीय साध्वी महन्ताच भोंदूपण तिच्याच भक्त असलेल्या महिलेन उघडकीस आणलय भिकारीणींना पैसे देऊन त्यांना अनुयायी करणारी हि भोंदू महिला संसारिक त्रासाला कंटाळून साध्वी बनली आणि लोकांना फसवू लागलीय अशांना पकडण अत्यंत आवश्यक झालय 
                  माझ्या लहानपणी साधूच्या नादी लागून एका बाईच्या मुलाचा जीव गेल्याची घटना घडली होती खरे साधू संत असे फसवे नसतात तेव्हा उगाच वाईट परीस्तीतीला ,आलेल्या संकटाला घाबरून बुवाबाजीच्या नादी लागण्या पेक्षा किव्हा नुसतीच पूजा करत बसण्य पेक्षा ईश्वरावर श्रद्धा ठेवून आलेल्या संकटाना धीराने सामोरे जाण्यातच यश आहे तेव्हा श्रद्धा व अंधश्रद्धा ह्यातला फरक जाणून घेणेहि आवश्यक झाले आहे.

Wednesday 19 August 2015

पृथ्वीवर निसर्गाने आच्छादल रंगीबिरंगी पटल


              स्वातंत्र्यदिनी पहाटेच्या वेळी  पृथ्वीवर निसर्गाने आच्छादलेल हे रंगीबिरंगी पटल

   Aurora veil      फोटो - scott kelly
                                    नासा संशोधन केद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार
  १५ ऑगस्ट  ह्या भारताच्या स्वातंत्र्यदिनी पहाटेच्या वेळी पृथ्वीवर निसर्गाने आच्छादलेल्या रंगीत पटलाच
 हे नयनरम्य दृश्य नासाच्या अंतराळ स्थानकावरून नासाचे खगोल शास्त्रज्ञ scott kelly ह्यांनी टीपलय.
सूर्याची उर्जा आणि हवेतील सूक्ष्म कणामुळे प्रकाशित झालेल्या नृत्य दिव्यांचे हे गतिमान दृश्य अत्यंत आकर्षक दिसते पण जेव्हा ते एका ठिकाणी स्थिर स्थितीत रंगीबिरंगी किरणांनी प्रकाशमान होतात तेव्हा ते पृथ्वीवर  घातलेल्या मुकुटासम  भासतात scientific भाषेत त्याला Aurora veil म्हणतात 
scott kelly हे खगोल संशोधक एक वर्षासाठी अंतराळ स्थानकावर वास्तव्यास असून त्यांनी 249mile  अंतरावरून हा फोटो घेतला आहे सूर्य उगवतीच्या वेळेसच जांभळ्या लाल हिरव्या रंगाच हे पटल खुपच नयनरम्य दिसतय.  
सूर्यावरील सतत चालणारया अंतर्गत घडामोडी ,त्यामुळे होणारे सौर वादळ, वाहणारे अती उष्ण वारे ह्या मुळे सौर उर्जेचे गतिमान उष्ण पार्टिकल (ठिणग्या ) अंतराळात इकडे तिकडे उडू लागतात गतिमान अवस्थेत फिरू लागतात त्यांच्यातल्या प्रचंड उष्णता व गतीमुळे ते पृथ्वीवर पोहोचल्यावरही दोनतीन दिवस प्रकाशमान अवस्थेत फिरू शकतात पण जेव्हा हे पार्टिकल पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात ओढले जातात तेव्हा वातावरणातील  photon( light partical ),oxygen ,nitrogen व इतर वायूंच्या संपर्कात येतात त्या मुळे त्यांना रंग प्राप्त होतो आणि प्रकाशमान अवस्थेत ते रंगीत दिव्यांप्रमाणे ,वातावरणात उडू लागतात तेव्हा कवींना ते नृत्य दिवे भासू लागतात प्रचंड उष्णता व गतिमान अवस्थेतले निसर्गाने चेतवलेले हे नैसर्गिक नृत्य दिवे जेव्हा स्थिर होतात तेव्हा त्याला  रंगीबिरंगी पटलाच स्वरूप प्राप्त होत scott kelly ह्यांनी अंतराळ स्थानकातून पाठवलेल्या videoत ह्या नैसर्गिक रंगीत नृत्य दिव्यांच नृत्य पाहण खरोखरच अप्रतिम निसर्गाची हि अदभूत किमया लाजवाब!            





Saturday 15 August 2015

कृष्ण विवर


                         नासाच्या संशोधकांनी शोधलेले अंतरिक्षातील अत्यंत लहान कृष्ण विवर 


                                                                                              फोटो -twitter वरून प्राप्त
  आजूबाजूच्या लखलखणारया तारका मधल्या लहानशा कृष्ण विवराचे  नासाच्या खगोल संशोधकांनी शोधलेले व टिपलेले हे विलोभनीय दृष्य
   

Saturday 1 August 2015

मैत्रीदिन

                            दिल दोस्ती दुनियादारीतल्या रुममेटच्या मैत्रीतून एकमेकांना सावरणारया ,एकमेकांची दुख: आपलीशी करत त्याच हसत खेळत निवारण करून आयुष्य आनंदी करणारया सुखद मैत्रीच सुंदर स्वरूप आपण अनुभवतोय आजकालच्या स्वातंत्र्याच्या गैरवापर करून व्यसनाधीन संस्कारहिन तरुणाईचा मैत्रीचा हैदोस पाहता ह्या मालिकेतून उलगडत जाणारी तरुणाईची मैत्री,मैत्रीतून मांडली जाणारी समस्या आणि ती सोडवणारी हि मित्रमंडळी ह्याच अनोख मैत्रबंधन खरोखरच लाजवाब!  विशेषत: शेजारच्या नुकत्याच कॉलेज मध्ये दाखल झालेल्या पण raging च्या भितीन रोज गेटबाहेरून परत येणारया लहान दोस्ताला धैर्य देऊन raging हाणून पाडायला शिकवणारे हे दोस्त मैत्रीला वयाच बंधन नसत हे दाखवून देतात मैत्रीचे विविध पैलु उलगडतानाच आजकालच्या ज्वलंत समस्येकडेही लक्ष वेधत त्यावर उपाय सुचवण्यात लेखक यशस्वी झालाय.
                           उद्या मैत्रीदिन पूर्वी मला वाटायच कशाला हवा मैत्रीदिन ज्या दिवशी मित्र किंवा मैत्रीण भेटतात तोच मैत्रीदिन पण आता मैत्रिणी जेव्हा बरयाच वर्षांनी भेटल्या तेव्हा मैत्रीदिनाच महत्व पटल मैत्रीदिनाच्या निमित्याने आपल्याला मैत्रीचा आठव होतो एक दिवस मजेत जातो
                            मैत्री निखळ ,निर्वाज्य आनंददायी.एकमेकांच्या सुखदुखा:त सहभागी होऊन आश्वस्त करणारी.खरच मैत्रीचा धागा किती चिवट असतो ना ! कोणी तोडु पाहील तरी तुटता तुटत नाही उलट जास्तच पक्का होतो लहानपणी शाळेत अबोध वयात मैत्रीची सुरवात होते त्यात रुसवे,फुगवे ,मारामारी, चिडण,चिडवण असत ती बालिश निरागस मैत्री खरी असते त्यात खोटेपणा नसतो घरातल्या सुखी सुरक्षित वातावरणातून शाळेत प्रवेशल्यावर तिथल्या भीतीदायक वातावरणात मैत्रीची साथ मिळते आणि भीती दूर पळते पुढे कॉलेजात गेल्यावर मैत्रीचे निकष बदलतात मैत्रीत प्रगल्भता येते नवीनच पंख फुटलेल्या तरुणाईला मोकळ्या आकाशात उडण्याची साथ मिळते एकमेकांना सावरण्याच बळ येत
                         मैत्रीला वयाच ,स्थळकाळाच ,जातीधर्माच बंधन नसत ती कोठेही केव्हाही कोणाशीही होऊ शकते शाळा कॉलेजातली मैत्री, लग्नानंतर विशेषत:स्त्रियांच्या बाबतीत घर,संसार,मुल,मुलांच शिक्षण करिअर ह्या मुळे दुरावते वर्षानुवर्षे भेटी होत नाहित पण अवचित जेव्हा मैत्रिणीच गेट टुगेदर होत तेही २०-२५ वर्षानंतर तेव्हाचा आनंद काय वर्णावा ! गप्पांना उत येतो हास्याला उधाण येत सुखदुखा:ची देवाणघेवाण होते भेटण्यान आनंद द्विगुणीत होतो प्रत्येकाला काय सांगू ,किती सांगु अस झालेल असत बोलण्याच्या ओघात वय,वेळ विसरत मधली वर्ष गळून पडतात एकमेकांचे बदललेले पत्ते email ,फोन न. मिळतो आणि पुन्हा एकदा जुनी मैत्री नव्यान सुरु होते आणि आता तर whats app वरून फोनवर तासनतास गप्पा रंगतात चिंता क्लेश ह्याचा क्षणभर विसर पडतो जगण्याची नवी उमेद जागी होते जीवनात हास्य फुलत.मैत्रीच रसायनच वेगळ असत!  खरया मैत्रीत स्वार्थ नसतो ,फसवणूक नसते ती निर्मळ निस्वार्थ असते काहीजण अल्पावधीतच मैत्रीचा सुगंध दरवळून आपल्याला कायमचे सोडून जातात कधीही न येण्यासाठी!
                         काही मित्रमैत्रिणी मात्र फसवे असतात सोबत राहुन ते आपल्या मित्रांना फसवत असतात समोर गोड बोलून मागे त्यांच्या विरोधात बोलतात ,अफवा पसरवतात आणि त्यांना त्याचा पत्ताही नसतो त्यांच्या चांगुलपणाला मूर्खपणाच लेबल लावून ते त्यांच हस करतात आणि त्यांच्या संकटात,दुखा:त भर टाकतात काहींना त्यांची प्रगती, संपन्नता ,उत्कर्ष बघवत नाहि कधीकधी तर अशा मित्रांमुळे दिवाळ वाजण्याची वेळ येते तर काही जण आपला हेतू साध्य करून संकट समयी मित्राला एकट पाडून निघुन जातात आणि "A Friend in need is a friend indeed "हि म्हण उलटी करून Friend is not in need is not a friend indeed अशी नवी म्हण सार्थ करत त्याला आयुष्यातून उठवू पाहतात त्याला जगण नकोस होत काही कमकुवत मनाची माणस क्वचित जीवही देतात अशा वेळेस मैत्रीवरचा विश्वास उडतो आणि नको ती मैत्री करण अस होउन जात पण काही कर्तुत्ववान माणस मात्र हार न मानता अशांना त्यांची जागा दाखवुन देतात त्यांना कितीही एकट पाडलं तरी ते हारत नाहीत
                          आणि अशाच वेळी खरया मित्रांची ,मैत्रिणीची ओळख पटते कधीकधी जुन्या शाळा कॉलेजातल्या मैत्रिणी पुन्हा भेटतात आणि  मैत्रीवरचा उडालेला विश्वास पुन्हा बसतो जगण्याला नवसंजीवनी मिळते जुन्या आठवणीला उजाळा मिळतो आणि पुन्हा एकदा खरया मैत्रीचा प्रत्यय येतो आपल्या जवळचे दुरावतात ,आपल्यावर संकट येतात तेव्हा जे मित्र  कामी येतात तेच खरे मित्र नाहीतर मैत्रीला अर्थ नसतो