Friday 18 January 2013

सर्प मित्रांना आवरा

                       सापांची भीती वाटू नये म्हणून काही सर्प मित्र काम करतात ते लोकांना साप पकडण्यास मदत करतात व साप पकडण्यास शिकवतात पण आता हे हौशी सर्प मित्र लोकांची डोकेदुखी ठरू लागले आहेत कारण ते त्याचा गैरफायदा घेऊ लागले आहेत . असे लोक साप पकडून ते लोकांच्या घरातील आवारात , नालीत ,झाडावर कधी कधी घरात देखील सोडतात व नंतर त्यांनाच पकडायला बोलवावे लागते किव्हा ते पकडून दाखवतात अर्थात सारेच सर्पमित्र असे नसतात.पण काही जण लाकांना उपद्रव देणारेही असतात तर काही जण काही दुर्मिळ सापांची विक्री करून लोकांना त्रास तर देतातच शिवाय गुप्त धनाचे आमिष दाखवून लोकांना लुबाडतात अशा सर्प मित्रांना मागे पकडण्यात आले होते पण ते पुन्हा सक्रिय झाले आहेत.
                    अशा लोकांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी नाहीतर लोक सापांना मारण्यास मागे पुढे
पाहणार नाहीत.

भोंदू साधू पासून सावध व्हा


                   समाजात भोंदू साधूची कमतरता नाही ,गावोगावी,खेड्यापाड्यात,शहरात देखील असे भोंदू साधू असतात .ते साध्या भोळ्या लोकांना फसवतात .जेव्हा फसवणूक उघडकीला येते तोपर्यंत असे साधू परागंदा झालेले असतात म्हणूनच अशा साधू पासून सावध राहावे.
                    जेव्हा लोक आपली समस्या घेवून साधू कडे जातात तेव्हा ते त्यांच्याच तोंडून ऐकलेली माहिती जाणून घेवून त्यांचा माग काढतात त्यांची आणखी माहिती गोळा करून जेव्हा त्यांना सांगतात तेव्हा ते चकित होतात आणि त्यांच्या जाळ्यात अडकतात.ते सांगतील तसे उपाय करतात ,ते म्हणतील ते आणून देतात सोने,नाणे ,पैसे व इतर वस्तू मग त्या साधूला दक्षिणा म्हणून देतात ,पूर्ण पणे लुबाडल्या नंतर भोळ्या भक्तांच्या लक्षात हि गोष्ट येते पण साधू त्यांना दाद देत नाही.
                     कधी,कधी तर ते त्यांचा फोन देखील चोरून ऐकतात भोळ्या भक्तांनी त्त्यांना फोन नंबर दिलेला असतोच ,कधी फोनला क्लिप बसवून तर कधी फोन वायर मधेच दुसरया फोनला जोडून ,तर कधी काही भ्रष्ट कर्मच्यारांना हाताशी धरून अशा गोष्टी घडतात.
                       हे साधू आपल्या भोळ्या भक्तांना हातातून अंगारे,कुंकू काढून दाखवतात त्यासाठी त्यांच्या शर्टाच्या बाहीत हाताच्या कोपरयात ते कुंकवाची किव्हा अंगारयाची पुडी कशी लपवतात ते अंध श्रद्धा निर्मुलन समिती कित्येकदा दाखवत असते कित्तेक टी ,वी चानेल वरूनही अशी माहिती प्रसारित होत असते असे साधू हवेतून हातचलाखीने अंगठी कशी काढून दाखवतात हे देखील एका चानेल वरून दाखवण्यात आले होते त्या अंगठ्या देखील अशाच भोळ्या भक्तांकडून हडपलेल्या होत्या शिवाय नारळ आधीच फोडून त्यात चिंधी,हळद,कुंकू,लिंबू घालून मग ते चमत्कार म्हणून त्यातून काढणे अंगातील भूत काढण्याच्या नावाखाली झोडपणे घरात भूत आहे हे दाखवण्यासाठी घरातल्या वस्तू गहाळ करणे ,कपडे फाडणे घरात लिंबू टाकणे जळते कपडे टाकणे हे देखील दाखवून दिले होते ह्या मध्ये काही बिल्डर देखील सहभागी असतात एखादी वास्तू भारलेली आहे हे दाखवून ती विकायला भाग पाडण्यासाठी अशी कामे केल्या जातात तर कधी गुप्तधन आहे असे सांगून साप सोडल्या जातो मागे काही साधुनी त्याच घरातील वस्तू दागिने चोरवून तिथेच पुरून गुप्त धन आहे हे सिद्ध करण्यासाठी असे केल्याची बातमी देखील वाचण्यात आली होती शिवाय एका साधूने तर काही भक्तांना कसे ब्ल्याक मेल केले काही तरुणींना साप अंगावर सोडून दुष्कृत्य करण्यास कसे बाध्य केले आणि त्याला काही फसवल्या गेलेल्या लोकांनी कसे पकडले हे देखील त्या चानेल वाल्यांनी निर्भीडपणे दाखविले होते
                   तेव्हा पैसे ,दागिने डबल करून देण्याचा दावा करणारया अशक्य गोष्ट शक्य करूनसमस्या सोडवून देण्याचा दावा करणाऱ्या साधू पासून सावध राहणेच बरे अन्यथा तुम्ही फसवले जाण्याची शक्यता असते.

Tuesday 8 January 2013

हुरडा विक्री आता गाडीवर

                           पूर्वी शेतातून हुरडा पार्ट्या रंगत ,थंडी सुरु होताच शेतात्त ज्वारी कोवळ्या हुरड्या वर आली कि ,शेतातून हुरडा पार्टी दिल्या जाई तेव्हा हुरडा खायला शेतातच जावे लागे घरी हुरडा पार्टीच्या वेळेस उरलेला भाजलेला हुरडाच आणल्या जाई.पण जग बदलत चालल ,आणि हुरड्याच मार्केटिंग झाल मग शेतातच ढाब्या सारखे बाकडे,खुर्च्या टाकून हुरडा खायला मिळू लागला पण ह्याचा फायदा फक्त गाडीवाल्यांनाच मिळत असल्यानेच कि काय हुरडा भाजी मार्केट मध्ये विक्रीस आला तिथून तो मग pack केलेल्या पाकिटातून किराणा दुकानात पोहचला.
       आणि आता तो चक्क गाडीवर विकायला आलाय. परवा नागपूरच्या बर्डी मध्ये हुरड्याची गाडी दिसली तेव्हा नवल वाटले कारण आता पर्यंत फळे व भाजीपाला फक्त गाडीवर विकायला येत होता .आता लवकरच तो यवतमाळ मध्ये पण विकायला येईल कदाचित दारावर सुद्धा गाडीवरून हुरडा विकायला आल्यास नवल वाटणार नाही उलट गृहिणींना घरबसल्या हुरडा खायला मिळेल अर्थात त्यात शेतातल्या हुरडा पार्टीचा आनंद मात्र मिळणार नाही.

Tuesday 1 January 2013

नववर्षाभिनंदन

                                                     ढगा आडूनी हळू,हळू
                                                                                   रविराज अवतरला
                                                           चंदेरी रुपेरी सोनेरी
                                                                                     प्रकाश घेवूनी आला
                                                        अंधारल्या सृष्ठी तला
                                                                                       तम  दूर सारीला  
                                                            चरा चरातून  नवचैत्यन्य                       
                                                                                      अन उत्साह संचारला
                                                             पानगळीने तरुवर
                                                                                      निष्पर्ण जरी झाला
                                                                 नव निर्मितीचा ध्यास त्याने
                                                                                        मनी जागवला

काळ्या कपड्यातली भक्ती

         दसरा  ते संक्रांति दरम्यान आंध्र,तामिळनाडू,कर्नाटक मध्ये कुठल्याही शहरात,खेड्यात,रस्त्या,रस्त्यावर काळे कपडे धारी लोक दिसतात मग ते तिरुमला,तिरुपतीच मंदीर असो,कि कानिपाकमचे गणपती मंदीर असो किव्हा रस्त्यातील छोटी मोठी मंदिरे .एवढेच नाही तर हैद्राबाद,कर्नुल सारख्या शहरात साध्या व काही मोठ्या हॉटेलात,दुकानात देखील मालकापासून सेल्समन पर्यंत असे काळे कपडेधारी भक्त दिसतात.कुतूहल म्हणून सहज विचारले असता कळालेली माहिती अशी की ते ऐयाप्पा स्वामीचे भक्त आहेत.      
                       केरळ मधील साबरीमला इथे ऐयाप्पा स्वामीचे मंदिर आहे हे मंदिर पहाडात असल्याने कित्येक मैल पायी जावे लागते जवळच पंपा नदी वाहते मंदिरापासून पाच किलोमीटर अंतरावर जंगलात सतत बारुदाचा स्फोट केल्या जातो जेणे करून वाघ सिंहा सारखी श्वापद दूर पळावीत मंदिरात जाताना वाटेत पाच ठिकाणी नारळ फोडल्या जातात व अंघोळ केल्या जाते काळे कपडे असतील तरच प्रवेश मिळतो नाहीतर दुरूनच दर्शन घ्यावे लागते.  
                     ह्या स्वामीची कथा अशी सांगितल्या जाते कि हे स्वामी म्हणजे अगदी लहान बालक होते ते एकदा मित्रांसमवेत जंगलात फिरायला गेले तेव्हा जंगलात वाघ आला ,मित्र घाबरून पळाले परंतु ऐयाप्पा स्वामी मात्र वाघाशी खेळत बसले तेव्हा त्यांचे मित्र घाबरून ऐयाप्पाच्या आई,वडिलांना घेवून आले त्यांनी पण ते दृश्य पहिले नंतर ते स्वामी जंगलात अदृश्य झाले म्हणून त्या ठिकाणी त्यांचे मंदिर बांधण्यात आले.
                       दर वर्षी संक्रांतीला श्रद्धाळूंना स्वामी ज्योतीच्या स्वरुपात दर्शन देतात अशी भक्तांची श्रद्धा आहे म्हणूनच दसऱ्यानंतर संक्रांति पर्यंत स्वामी भक्ती केल्या जाते त्यासाठी पंचेचाळीस दिवस काळे कपडे वापरले जातात दाढी केल्या जात नाही चटई वर झोपावे लागते ब्रम्हचर्य पाळले जाते पायात चप्पल वापरल्या जात नाही स्वतःचे जेवण स्वतः बनवले जाते आता काळानुरूप स्वयंपाक बनवला जात नसला तरीही इतर गोष्टी कटाक्षाने पाळल्या जातात काहीजण मात्र देवळात जाण्यासाठी शेवटची स्टेप येते तेव्हा काळे कपडे घालून पायऱ्या चढतात. हे व्रत बायकांना करता येत नाही पण चाळीशी नंतर हे व्रत बायका करू शकतात.