
नासाचे पार्कर सोलर प्रोब सौर यान सूर्याच्या अंतर्गत करोना भागातून भ्रमण करताना -फोटो -नासा संस्था
नासा संस्था - 25 सप्टेंबर
नासाच्या पार्कर सोलर प्रोबने18 सप्टेंबरला सूर्याच्या अंतर्गत भागात शिरून 3.8 मिलीयन मैल अंतरावरून अत्यंत जवळून 25 वी फेरी पुर्ण केली नासाच्या Maryland येथील APL संस्थेतील ( Johns Hopkins Applied Phy.) मधील शास्त्रज्ञांनी प्रसारित केलेल्या माहिती नुसार पार्कर सोलर प्रोब सौरयान सूर्याभोवती भ्रमण करून सूर्याच्या अंतर्गत कक्षेतून सुरक्षित बाहेर पडण्यात यशस्वी झाले असुन हे सौरयान नियमित भ्रमण करत आहे नासाच्या सौर मोहिमेतील शास्त्रज्ञांच्या नियोजना नुसार 2026 पर्यंत पार्कर सौरयान सूर्याच्या कक्षेत भ्रमण करून सखोल निरीक्षण करेल आणी संशोधित माहिती मिळवेल पार्कर सौरयानाने पाठवलेल्या Becon tone वरून हि माहिती शास्त्रज्ञांना मिळाली
पार्करसौरयान सुर्याच्या कक्षेत शिरले आणी यानातील स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित झाली तेव्हा यानावर पृथ्वी वरील संस्थेचे नियंत्रण नव्हते पार्कर सौरयानाने त्याच्या ह्या आधीच्या वेगाच्या रेकॉर्डशी बरोबरी साधत ताशी 430,000 मैल प्रति तास वेगाने करोना भागाच्या अत्यंत जवळुन भ्रमण केले ह्या आधी 24 डिसेंबर 2024,22 मार्च 2025आणि 19 जून 2025 मध्ये देखील पार्कर सौरयान सूर्याच्या अंतर्गत भागातून अत्यंत जवळून भ्रमण करून सुरक्षित बाहेर पडण्यात यशस्वी झाले होते
पार्कर सौरयानाचा हा भ्रमणकाळ10 सप्टेंबरला सुरु झाला आणि 20 सप्टेंबरला संपला पार्कर सौरयानातील चार अत्याधुनिक सायंटिफिक उपकरणाद्वारे सूर्याच्या करोना भागातील निरीक्षण आणी संशोधीत सायंटिफिक माहिती गोळा करण्यात आली सध्या सुरू असलेल्या सुर्याच्या अकरा वर्षाच्या चक्राच्या अंतिम टप्प्यात सुर्य अत्यंत Active Phase मध्ये असताना ह्या काळातील सोलर घडामोडी सौर ऊर्जा सौरवारे सौरवादळांची तिव्रता मोजण्यात आली सूर्याच्या अंतर्गत भागातील व आसपासच्या वातावरणातील निरीक्षण नोंदवून संशोधित माहिती गोळा करण्यात येत आहे सध्या सूर्याच्या अंतर्गत भागातून अत्यंत शक्तिशाली आगीच्या ज्वाळा बाहेर पडत आहेत पार्कर सौरयानाच्या सूर्याच्या अंतर्गत भागातील चवथ्या वेगवान भ्रमणामुळे आणखी संशोधित माहिती मिळेल
23 सप्टेंबर नंतर पार्कर सौरयान सूर्याच्या करोना भागातील सौरवारे,सौर घडामोडी सौर वादळाची तीव्रता सूर्याच्या अंतर्गत भागातील उष्ण ज्वाळांचे उत्सर्जन ह्या बाबतीत नोंदवलेले निरीक्षण आणि गोळा केलेली संशोधित माहिती पृथ्वीवरील शास्त्रज्ञांना पाठवेल
सुर्याच्या ह्या अंतर्गत घडामोडी दरम्यान अंतराळात प्रचंड वेगाने बाहेर पडणारे आगीचे लोट, सौर वारे धूळ आणि हानिकारक कॉस्मिक किरणे ह्यांचा हानिकारक प्रभाव पृथ्वीवर ,अंतराळस्थानकात रहाणाऱ्या अंतराळवीरांवर पृथ्वीवरील Satellites Powergrid आणी Air travel करणाऱ्यांवर पडतो त्या मुळे हि अत्याधुनिक संशोधीत माहिती अंतराळ विश्वातील भविष्य कालीन दुरवरच्या चंद्र आणी मंगळ मोहिमे साठी ऊपयुक्त ठरणार आहे
विषेश म्हणजे सुर्याच्या अंतर्गत अत्यंत ऊष्ण असलेल्या करोना भागातून फेरी मारुन देखील पार्कर यान सुरक्षित बाहेर पडले ह्या सौरयानाला सुर्याच्या तीव्र ऊष्णतेपासून स्वतःचे संरक्षण करता यावे म्हणून यानाच्या Shield मध्ये Innovative Carbon Foam चा वापर करून Thermat Protection System बसविण्यात आली होती त्या मुळे पार्कर यान 1.600 ते 1700 f. (870 ते 930 c.) पर्यंत ऊष्णतेतही सुरक्षित राहुन सूर्याच्या अंतर्गत भागातून बाहेर पडू शकते
ह्या यानाची निर्मिती सूर्याचा आकार,सौरवारे,सौरवादळ,सौरज्वाळा ,सूर्याभोवतीचा करोना ह्याचा शोध लावणाऱ्या शिकागो युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ Eugene Parker जिवंत असताना त्यांच्या संकल्पनेतून झाली त्यांच्या नेतृत्वात सुरु झालेल्या ह्या सौर मोहिमेतील सौरयानाला त्यांच्या सन्मानार्थ पार्कर नाव देण्यात आले त्यांचा फोटो देखील ह्या सौर याना सोबत पाठवण्यात आला पण 2022 मध्ये त्यांनी ह्या जगाचा निरोप घेतला नासाच्या Living With Star प्रोग्राम द्वारे पार्कर सोलर प्रोबची निर्मिती केल्या गेली


