Monday, 30 June 2025

Blue Origin NS-33 मोहिमेतील अंतराळ प्रवासी अंतराळ पर्यटन करून परतले

 

 Blue Origin NS-33 मोहिमेतील अंतराळ पर्यटक Allie Kuehner,Carl Kuehner,Jim Sitkin,Freddie Rescigni, Leland Larson आणी Owolabi Salis  -फोटो -Blue Origin

Blue Origin - 29 जुन 

Blue originच्या NS-33 अंतराळ पर्यटन मोहिमे अंतर्गत 29 जुनला Allie Kuehner,Carl Kuehner हे दोघे पती पत्नी ,Leland Larson,Freddie Rescigni,Jr Owolabi Salis,James Sitkin हे सहा नागरिक अंतराळ पर्यटन करून परतले हे सहा अंतराळयात्री 21 तारखेलाच अंतराळ पर्यटनास जाणार होते पण खराब हवामाना मुळे हे पर्यटन लांबले होते Blue Origin चे हे 13 वे मानवी अंतराळ ऊड्डाण आहे आणी आतापर्यंत चे 53 वे 

29 जुनला Blue Origin च्या West Texax येथील ऊड्डाण स्थळावरून 9.38 a.m.ला New Shepard अंतराळयान  रॉकेटच्या सहाय्याने ह्या सहा जणांसह अंतराळात झेपावले अंतराळात पोहोचताच काही मिनिटातच यान रॉकेट पासून वेगळे झाले अंतराळयानातील स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित झाली आणी यानाचा अत्यंत वेगाने पुढील प्रवास सुरू झाला काही मिनिटांनी यान वेग वाढवत अंतराळ व पृथ्वी ह्यांच्यातील सिमारेषा असलेल्या कर्मन लाईन पर्यंत पोहोचले 

यान कर्मन रेषा पार करून अंतराळातील झीरो ग्रॅव्हिटीत पोहोचताच सर्व अंतराळ प्रवाशांनी काही क्षण ह्या वातावरणात तरंगण्याचा आनंद घेतला आणी अवघ्या दहा बारा मिनिटात पृथ्वी ते अंतराळ असे अदभूत अंतराळ परर्यटन करून परत पृथ्वीवर परतले

अंतराळयानाने अंतराळातील कर्मन रेषा पार करून अंतराळातील झिरो ग्रॅव्हिटीत प्रवेश केला तेव्हा सर्व सहाही प्रवासी आनंदीत झाले आणी त्यांनी अंतराळातील झीरो ग्रव्हिटीत सर्व बाजूने तरंगण्याचा आनंद घेतला खिडकीतून खाली पहात एकमेकांना पृथ्वीचे सौंदर्य दाखवत Oh ! Look Our Earth ! How Beautiful ! Oh ! My God ! आपण खरेच अंतराळात पोहोचलो आहोत असे ऊत्स्फुर्त ऊद्गगार त्यांनी काढले 

 

 Blue Origin NS -33चे अंतराळ प्रवासी दांपत्य Allie Kuehner आणि Carl Kuehner अंतराळातील झिरो ग्रॅविटीचा आनंद घेताना -फोटो -Blue Origin

अवघ्या दहा मिनिटांंचा हा अदभूत अंतराळ अनुभव घेऊन हे सहाही अंतराळप्रवासी पृथ्वीवर परतले तेव्हा Blue Origin ची रिकव्हरी टिम तेथे पोहोचली त्यांनी ह्या सर्वांंना यानाचे दार ऊघडुन बाहेर येण्यास मदत केली ह्या प्रवाशांना सोडायला व न्यायला त्याचे नातेवाईक ऊड्डाण स्थळी हजर होते सगळ्यांंनीच परतल्या नंतर आपली प्रुथ्वी खूप सुंदर आहे,अदभूत आहे भावी पिढिसाठी तिचे संरक्षण करणे आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली 

ह्या अंतराळ प्रवाशाविषयी

Allie पर्यावरणवादी वन्य जीव संरक्षक ऊत्साही साहसी संशोधक आहेत दुर्गम भागातील जंगलांना भेट देऊन वन्यजीव संरक्षण करण्याची त्यांची ईच्छा आहे Carl बिल्डिंग अँड लँड टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष आहेत नाविन्यपूर्ण डिझाईन काढून विकास कामे करताना वन्यजीव संरक्षण नैसर्गिक अधिवास, शाश्वत अन्न प्रणाली आणी पर्यावरण पुरक प्रकल्प टिकवण्याची प्रमुख जबाबदारी त्यांच्या वर आहे 

Larson-School Bus services ,Ink, आणी Larson Transportation services चे माजी CEO आहेत 1997 मध्ये त्यांच्या Larson legacy ह्या कौटुंबिक व्यवसायाची स्थापना झाली सुरुवातीला त्यांनी शिक्षक म्हणून काम केले नंतर त्यांनी सैनदलातील सैनिकांना शैक्षणिक मार्गदर्शन व समुपदेशन करण्याचे काम केले 1968 च्या संविधान अधिवेशनाचे प्रतिनिधित्व   त्यांनी केले होते आणी त्यांनी सध्याचे हवाई संविधान लिहिले त्यांना मधमाशा पालन,कोईमासे व कोबंडी पालनाची आवड आहे त्यांना तिबेटमधील ऊंच पर्वतीय प्रदेशातील भिक्षू सोबत रहायला आवडते

Freddie इटालियन,अमेरिकन ऊद्योजक आहेत ते स्पर्धात्मक गोल्फपटु आहेत ते कमोडिटी केबल्सचे अध्यक्ष आणी CEO आहेत त्यांनी राष्ट्रीय आणी राज्य स्तरावरील गोल्फ स्पर्धेत 20 वर्षे सहभाग नोंदवला त्यांना पुरातत्व संशोधनाची आवड आहे 

Owolabi - वकील,आर्थिक सल्लागार,Equitocracy चे लेखक,The Soul Maker Ministry चे प्रमुख सदस्य आहेत 

Jim- निव्रुत्त वकील आहेत त्यांनी 40 वर्षे वकिली केली ते जागतिक स्वयंसेवी संस्थेचे स्वयंसेवक आहेत त्यांनी सात खंडांना भेट दिली आणी त्यांचा जागतिक प्रसार केला साहसी व्रुत्तीच्या Jim यांना लहानपणी स्टार ट्रेक पहाताना अंतराळाची आवड निर्माण झाली तेव्हा पासूनच त्यांची अंतराळात ऊड्डाण करण्याची ईच्छा आहे 

 NS-33 Mission Patch

ह्या अंतराळ प्रवाशांसाठी Blue Origin ने त्यांची कर्तृत्व वैशिष्ट्ये कोरलेला Patch तयार केला होता Ali आणी Carl यांच्या पर्यावरण संरक्षणाच्या कामासाठी पाने,Leland यांच्या कौटुंबिक व्यवसायाचे प्रतिक School Bus,Freddie यांच्या पुरातत्व संशोधनाच्या आवडीचे प्रतिक चंद्र Jim यांच्या साठी न्यायाचा तराजू Owolabi यांच्या अध्यात्मिक प्रवासाचे प्रतिक कमळ आहे हि सर्व प्रतिकचिन्हे Capsul ला पातळ हिरव्या रेशेने जोडलेली असतात आणी ती अंतराळ प्रवाशांचे प्रातिनिधित्व करतात प्रुथ्वी भोवती दोन हिरव्या रेषा आहेत पहिली  रेषा क्षितिज आणी दुसरी कर्मन रेषा दर्शवते ह्या सर्वांंना हा Blue Origin चा Patch लाऊन त्यांना अंतराळवीर झाल्याचे सर्टिफिकेट देण्यात आले

Friday, 27 June 2025

नासाच्या Axiom -4 मोहिमेतील अंतराळवीर स्थानकात पोहोचले अंतराळातून साधला लाईव्ह संवाद

 The Axiom Mission 4 crew gathers inside the International Space Station's Harmony module shortly after docking aboard the SpaceX Dragon spacecraft. From left are, Mission Specialist Sławosz Uznański-Wiśniewski, Commander Peggy Whitson, Pilot Shubhanshu Shukla, and Mission Specialist Tibor Kapu.

 नासाच्या Axiom -4 मोहिमेतील अंतराळवीर स्थानकात पोहोचल्या नंतर स्थानकातील अंतराळवीरांशी संवाद साधताना -फोटो -नासा संस्था

 नासा संस्था -26 जुन 

नासाच्या Axiom-4 मोहिमेतील अंतराळवीर अखेर एक महिन्यानंतर स्थानकाच्या दिशेने मार्गस्थ झाले आणी काही वेळातच  यानातील स्वयंचलित यंत्रणा कार्यरत झाली यान रॉकेट पासुन वेगळे झाले आणी अत्यंत वेगाने यानाचा  अंतराळ प्रवास सुरु झाला काही वेळातच यानाने अंतराळातील झीरो ग्रॅव्हीटीत प्रवेश केला 28 तासांच्या अंतराळ प्रवासानंतर गुरुवारी अंतराळयान 6.31a.m.(EDT) वाजता स्थानकाच्या Harmony Module जवळ पोहोचले त्यानंतर स्वयंचलित यंत्रणेने स्थानक आणि अंतराळ यान ह्यांच्यातील  Hatching आणि Docking प्रक्रिया पार पडली 8.14 a.m.(EDT)हे अंतराळवीर स्थानकात पोहोचले तेव्हा स्थानकातील अंतराळ मोहीम 73 च्या अंतराळवीरांनी त्यांचे स्थानकात स्वागत केले 

अंतराळयान ग्रेस झिरो ग्रॅव्हीटीत पोहोचताच नासा संस्थेने लाईव्ह संपर्क साधुन ह्या अंतराळवीरांशी संवाद साधला संस्था प्रमुख- "Peggy , welcome to Space ! तुमचा अंतराळ प्रवास कसा सुरू आहे ?"

अंतराळ यान झीरो ग्रॅव्हीटीत पोहोचल्यावर नासा संस्थेशी लाईव्ह संवाद साधताना अंतराळवीर Peggy,अंतराळवीर Slawosz,अंतराळवीर शुभांशु आणि अंतराळवीर Tibor -फोटो -Axiom संस्था

Peggy- "Thanks! Grace कडून आणी आमच्या चौघांतर्फे तुमचे आणी पृथ्वी वासियांचे स्वागत ह्या नवीन अंतराळयानाचे नाव आम्ही Grace ठेवले आहे अंतराळयानाला नवेपणाचा वास येत आहे अंतराळ प्रवास छान सुरु  अंतराळ प्रवासाचा अनुभव नेहमीच आनंददायी आणी मजेशीर असतो ह्या वेळेस Axiom मोहिमेतील दुसऱ्या अंतराळ प्रवासात ह्या नव्या तिन अंतराळवीरांसोबत अनुभव शेअर करतानाचा अनुभव नवा आहे !"

Slawosz- "अदभूत ! प्रवास खूप छान सुरू आहे आम्ही फक्त चौघेच नाही तर आमच्या सोबत हा Zero g indicater Joy पण आहे तोही आता झीरो ग्रॅव्हिटित तरंगतोय आम्ही स्वतःला सावरत त्याला पकडतानाची मजा अनुभवतोय झिरो ग्रॅव्हीटीत शिरल्यावर आणि बेल्ट काढल्यावर थोड अनइझी वाटल पण क्षणातच सावरलो पहिल्यांदा प्रवास करतानाचा आणी खाली पृथ्वीच अदभूत सौंदर्य पहाण्याचा हा थरारक क्षण अनुभवतोय आता आम्ही युरोप ईटली,सिसली,ग्रीस आयलॅन्डच्या वरून प्रवास करत आहोत अंतराळवीर Peggy ह्यांनी यानाच्या खिडकीतून खाली दिसणाऱ्या पृथ्वीच अद्भुत सौंदर्य सर्वांना दाखवल! आम्ही पृथ्वीच्या वरून अंतराळातून आमच्या देशाकडे,पृथ्वीच अदभुत सौंदर्य प्रत्यक्षात पहातोय खरोखरच हा क्षण अमुल्य आहे अविस्मरणीय आहे!" 

शुभांशु -नमस्कार ! अंतराळातून तुमच्याशी संवाद साधतोय आताच Peggy ह्यांनी सांगितल्या प्रमाणे एक अनुभवी आणि आम्ही तिघे नवे अंतराळवीर सोबत अंतराळप्रवास करतोय हा क्षण  जितका रोमांचक आहे तितकाच थरारक आहे उड्डाणाआधी माझ्या मनात एकच विचार होता एक महिन्याच्या Quarentine नंतर अखेर आम्ही उद्या अंतराळ प्रवास करणार आहोत जाण्याचा उत्साह होता अधीरता होती अंतराळातील झिरो ग्रॅव्हीटीत प्रवेश केला तेव्हा अचानक कुणीतरी मागून सीटवरून जोरात बाहेर ढकलल्याचा अनुभव आला पण सीटबेल्ट काढला तेव्हा मी तरंगू लागलो तो क्षण अद्भुत होता तो पृथ्वीवर अनुभवता येत नाही थोड्याच वेळात सार शांत झाल त्या साठी नासा संस्था ,Axiom संस्था आणि टीममधील सर्वांचे आभार त्यांच्या मुळेच आम्हाला हि अमूल्य संधी मिळाली आणि माझ्या कुटूंबियांचे आणि मित्रांचेही आभार त्यांनी आम्हाला सपोर्ट केल आमचा हा Zero g इंडिकेटर हंस ज्ञानाचे प्रतीक आहे सरस्वतीचे वाहन आहे हंगेरी आणि पोलंड मध्ये पण हे शुभ चिन्ह आहे Zero g वर लक्ष केंद्रित करण अत्यंत आवश्यक आहे ग्रेस अंतराळयान पण छान आहे झिरो ग्रॅविटीत प्रवेश केला तेव्हा अनइझी वाटल पण सगळ्यांनी सांगितल तु कालपासून खूप झोप घेत आहेस हे चागंले संकेत आहेत मला वाटत आता ह्याची सवय करून घ्यायला हवी ह्या अनुभवातून लहान मुलासारख शिकतोय लहानपणी पहिल पाऊल टाकताना आपण तोल सावरतो तसच शिक्षणाचा पहिला अनुभव नवीन वातावरणात स्थिर होण खूप आव्हानात्मक आहे मी माझ्या ह्या मित्रांसोबत हे वास्तव अनुभवतोय खरतर दुसऱ्यांना अस पाहण छान वाटत पण प्रत्यक्षात कठीण आहे हा प्रवास माझा एकट्याचा नाही माझ्यासोबत सारे भारतीय आहेत माझ्या खांद्यावर भारताचा तिरंगा आहे भारताने उचललेले अंतराळ विश्वातील हे पहिले ऐतिहासिक पाऊल आहे हा प्रवास स्मरणीय आणि रोमांचक करू या मी सोशल मीडियावरून लाईव्ह संपर्काद्वारे तुम्हाला ह्या मोहिमेची माहिती देत राहीन धन्यवाद !" 

 Tibor -"शुभांशु ने सांगितल्याप्रमाणे आमची राईड खूप अद्भुत आहे महिनाभराचा Quarentine चा काळ कंटाळवाणा होता पण ह्या तिघांसोबत मजेत गेला उड्डाणा आधी ग्रेस अंतराळयानात बसलो तेव्हाचा क्षण थरारक होता आम्ही वर्षभरापासून ट्रेनिंग घेत होतो Pilot Fighter,Jet Training पेक्षा रॉकेट लाँचिंगचा अनुभव वेगळा होता ग्रेस यान खूप जोरात उड्डाण करत तिथे गोंधळ होता इथे अंतराळात खूप शांतता आहे Peggy आमच्या तिघांची खूप काळजी घेतात आमचा हा पहिला अंतराळ प्रवास आहे त्या अनुभवी आहेत पृथ्वीसौन्दर्य अद्भुत आहे  झिरो ग्रॅव्हीटीतला अनुभव मजेशीर आहे तितकाच कठीण पण हा अनुभव घेण्याची स्थानकात जाण्याची संधी दिल्याबद्दल नासा आणि Axiom संस्थेचे आणि आमच्या देशाचे देशवासियांचे आभार आमच Zero g हंस मी Slawoz ह्याच्या मुलाला समर्पित करतोय त्याला प्राण्यांची आवड आहे त्याच्याकडे पाहील्यावर मला त्याच्या उज्वल भविष्याची जाणीव होते आमचे हे अंतराळयान ग्रेस नवीन आहे त्याच Opening आम्ही Peggy ह्यांच्या हस्ते हा  Axiom patch यानाच्या मध्यभागी लाऊन करत आहोत patch प्रमाणेच आपली पृथ्वी देखील ह्या सौरमंडळाच्या मध्यभागी आहे  

स्थानकात प्रवेश करताच स्थानकातील अंतराळवीरांनी ह्या चौघांचे स्वागत केले त्यांना ज्युस प्यायला दिला त्यांची विचारपूस केली त्या नंतर काही वेळातच ह्या अंतराळवीरांचा नासाच्या लाईव्ह संपर्कात खेळीमेळीच्या वातावरणात  Welcome Ceremony पार पडला 

अंतराळ मोहीम 73 च्या कमांडरनी त्यांच्याशी संवाद साधला," Welcome मित्रांनो आम्ही तुमची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहात होतो तुम्हाला स्थानकात सुखरूप आनंदी चेहऱ्याने प्रवेश करताना पाहून आम्हालाही आनंद होतोय तुमच्या येण्याने आता स्थानकात सहा देशांचे अकरा अंतराळवीर मिळून आपण एकत्र संशोधन करणार आहोत Peggy तुम्ही पाचव्यांदा स्थानकात प्रवेश करत आहात तुमच्या अनुभवाचा आम्हाला फायदा होईल!"त्या वेळी सर्वांनी ह्या अंतराळवीरांनी केलेल्या स्वागता बद्दल आभार मानले शुभांशू म्हणाले," तुमच्या ह्या घराचा दरवाजा आमच्यासाठी तुम्ही उघडला त्या बद्दल आभार आता मला अंतराळविश्वातील अंतराळ प्रवासाच्या ह्या पहिल्या पडावावर पोहोचल्याच समाधान वाटतय ह्या वातावरणात थोड अनइझी वाटतय डोक जड झालय पण तुमच्या साथीन हळूहळू सावरेन आणि उत्कृष्ठ संशोधन करेन!"अंतराळवीर Tibor आणि Slawosz ह्यांनी देखील सर्वांचे आभार मानत असेच मनोगत व्यक्त केले त्या नंतर अंतराळवीर Peggy ह्यांनी ह्या तीन अंतराळवीरांना Axiom mission patch no लाऊन ते अंतराळवीर झाल्याचे जाहीर केले

Thursday, 26 June 2025

नासाच्या Axiom -4 अंतराळ मोहिमेतील चार अंतराळवीर स्थानकाच्या दिशेने मार्गस्थ

  

नासाच्या Axiom -4 मोहिमेतील अंतराळवीरासह  Space X Crew Dragon अंतराळात झेपावले -फोटो नासा संस्था 

 नासा संस्था - 25 जुन 

नासाच्या Axiom -4 अंतराळ मोहिमेतील चार अंतराळवीर अखेर स्थानकाच्या दिशेने मार्गस्थ झाले ह्या आधी सहा वेळा स्थानकातील तांत्रिक समस्या आणि हवामान उड्डाणास अनुकूल नसल्यामुळे त्यांचे स्थानकात जाणे लांबले होते नासाच्या Axiom -4 मोहिमे अंतर्गत नासाच्या अंतराळवीर आणि Axiom Space कंपनीच्या Human Space Flight Director Peggy Whitson,भारतीय अंतराळ संस्था इसरोचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला,युरोपियन अंतराळवीर Slawosz Uznanski Wisniewski (Poland ) आणि हंगेरीचे अंतराळवीर Tibor Kapu हे चार अंतराळवीर स्थानकातील चौदा दिवसांच्या वास्तव्यासाठी स्थानकाच्या दिशेने मार्गस्थ झाले ह्या मोहिमेत अंतराळवीर Peggy Whitson ह्यांनी कमांडरपद  शुभांशु शुक्ला ह्यांनी पायलट पद आणि पोलंडचे अंतराळवीर Stawosz आणि हंगेरीयन अंतराळवीर Tibor Kapu ह्या दोघांनी मिशन स्पेशॅलिस्ट पद सांभाळले  

  (From left) Ax-4 Mission Specialist Tibor Kapu, Pilot Shubhanshu Shukla, Commander Peggy Whitson, and Mission Specialist Sławosz Uznański-Wiśniewski wave from inside the Space Dragon spacecraft.

नासाच्या Axiom 4 अंतराळ मोहिमेतील हंगेरियन अंतराळवीर Tibor Kapu ,भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला,नासाच्या अंतराळवीर Peggy Whitson आणि पोलंडचे अंतराळवीर Slawosz अंतराळ स्थानकाच्या दिशेने उड्डाण करताना -फोटो -नासा संस्था

नासाच्या फ्लोरिडा येथील Kennedy Space Center येथील 39A ह्या उड्डाण स्थळावरून सकाळी 2.31 वाजता Space X Crew Dragon ह्या सर्वांसह Falcon -9 रॉकेट च्या साहाय्याने अंतराळात झेपावले आणि गुरुवारी 26 जूनला 7a.m.ला स्थानकाच्या Harmony Module जवळ पोहोचेल स्थानकाजवळ पोहोचल्यानंतर Dragon मधील स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित होऊन स्थानक व Dragon ह्यांच्यातील Hatching, Docking प्रक्रिया पार पडेल त्यानंतर हे अंतराळवीर स्थानकात प्रवेश करतील स्थानकात सध्या रहात असलेले मोहीम 73 चे अंतराळवीर ह्या अंतराळवीरांचे स्थानकात स्वागत करतील आणि Welcome Ceremony पार पडेल

हे मल्टिनॅशनल अंतराळवीर त्यांच्या 14 दिवसांच्या वास्तव्या दरम्यान स्थानकातील झिरो ग्रॅव्हिटीतील लॅब मध्ये सुरु असलेल्या सायंटिफिक संशोधनात सहभागी होणार आहेत आणि 60 वेगवेगळे अत्याधुनिक संशोधनात्मक सायंटिफिक प्रयोग करणार आहेत  

Axiom -4च्या यशस्वी उड्डाणानंतर नासाचे Administrator Jenet Petro ह्यांनी आनंद व्यक्त केला," ते म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Tramp ह्यांच्या सहकार्याने पोलंड आणि भारताचे अंतराळवीर चाळीस वर्षांनी पहिल्यांदा स्थानकात जात आहेत त्यांचे अभिनंदन !"

शुभांशु शुक्ला हे अंतराळप्रवास करणारे दुसरे भारतीय अंतराळवीर आहेत ह्या आधी रॉकेश शर्मा अंतराळात गेले होते चाळीस वर्षांनी पुन्हा भारतीय अंतराळवीर स्थानकात राहायला जाणार असल्याने भारतात उड्डाणाआधी अत्यंत आनंदाचे वातावरण होते नासा संस्थेतर्फे ह्या उड्डाणाचे लाईव्ह प्रसारण करण्यात आल्याने नागरिकांना हा उड्डाण सोहळा लाईव्ह पाहायला मिळाला शुभांशु शुक्ला ह्यांच्या कुटुंबियांसाठी आणि लखनौ वासियांसाठी हा लाईव्ह उड्डाण सोहळा लखनौ मधील शुभांशु ह्यांच्या शाळेत दाखविण्याची खास सोय करण्यात आली होती उड्डाणाआधी सकाळी अंतराळवीर शुभांशु ह्यांनी video call वरून त्यांच्या आई वडिलांशी संवाद साधला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले यशस्वी उड्डाण पाहिल्या नंतर त्यांचे आईवडील काही क्षण भावुक झाले होते त्यांच्या आईला अश्रू अनावर झाले हा आमच्यासाठी आणि देशासाठी अभिमानाचा क्षण आहे हे आनंदाश्रू आहेत त्याचे स्वप्न पूर्ण झाले मी आता त्याच्या स्थानकातील प्रवेशासाठी आणि सुरक्षित पृथ्वीवर परत येण्याची वाट पाहीन तो उत्कृष्ट संशोधन करेल असे त्या म्हणाल्या 

उड्डाणा नंतर Dragon अंतराळात पोहोचताच नासा संस्थेने ह्या अंतराळवीरांशी  लाईव्ह संवाद साधत नवीन Dragon मधून प्रवास कसा सुरु आहे हे विचारले तेव्हा अंतराळातील नव्या अंतराळयानाचा हा छान वास येत आहे दरवेळी अंतराळ प्रवास करताना नवा अनुभव मिळतो आणि तो आनंददायी असतो ह्या मोहिमेतील विविध देशांच्या तीन अंतराळवीरां सोबतचा प्रवास नवा आहे त्यांच्या सोबत काम करण्याचा अनुभव देखील खूप छान होता हे अंतराळवीर बुद्धिमान आहेत अंतराळविश्वातील संशोधन करण्याचा त्यांचा दृष्टिकोन नवा आहे त्यांच्या देशाच्या ह्या व्यावसायिक सहभागामुळे आमच्या मोहिमेला संशोधन करताना मदत मिळेल अंतराळ विश्वात व्यावसायिक दृष्ठीने औद्योगिक प्रगती होईल शिवाय त्यांच्या देशातील भावी पिढीला ह्या अंतराळविश्वात करिअर करताना प्रेरणा मिळेल आणि ह्या अमर्याद अंतराळ विश्वात संशोधन करण्यासाठीची पाऊलवाट मिळेल!" ह्या वेळी तिन्ही देशाच्या अंतराळवीरांनी त्यांना ह्या मोहिमेत सहभागी करून हि अंतराळ प्रवासाची अनमोल साधी दिल्यामुळे लाईव्ह संवाद साधत नासा ,Axiom आणि कुटुंबियांचे आभार मानत हा  पृथ्वी दर्शनाचा अंतराळ प्रवासाचा अनुभव अद्भुत असल्याचे सांगितले नासाच्या माजी अंतराळवीर Peggy Whitson ह्या अनेकवेळा स्थानकात वास्तव्यास गेल्या असून त्यांनी एक वर्ष सलग स्थानकात राहण्याचा विक्रम प्रस्थापित केला

ह्या आधी 2022एप्रिल मध्ये Axiom-1 मोहिमेतील अंतराळवीरांनी स्थानकात 17 दिवस वास्तव्य केले होते 2023 मध्ये Axiom -2 मोहिमेत चार अंतराळवीरांसह  Peggy Whitson ह्यांनी कमांडरपद सांभाळत आठ दिवस स्थानकात वास्तव्य करीत हि मोहीम यशस्वी केली आणि 2024 च्या जानेवारी महिन्यात Axiom -3 मोहिमेतील अंतराळवीरांनी स्थानकात 18 दिवस वास्तव्य केले होते 

अंतराळातील ह्या फिरत्या अंतराळ स्थानकातील झिरो ग्रॅव्हीटीतील प्रयोगशाळेत गेल्या चोवीस वर्षांपासून विविध देशांचे अंतराळवीर सतत जातात,तेथे सुरु असलेल्या संशोधनात सहभागी होतात आणि नवनवीन शोध लावतात पृथ्वीवर करता येत नाहीत अशा पृथ्वी संरक्षण,मानवी आरोग्यासाठी उपयुक्त आणि औद्योगिक विकासासाठीच्या संशोधनात सहभागी होतात स्थानकातील विपरीत वातावरणाचा मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामाची संशोधित माहिती गोळा करतात अंतराळस्थानक म्हणजे अंतराळविश्वातील व्यावसायिक अर्थव्यवस्था विकसित करणारी Sprigboard आहे आणि ती अधिक सशक्त करण्याचे नासाचे द्येय आहे त्यासाठी ह्या व्यावसायिक संस्थेच्या सहकार्याने अंतराळ मोहिमा कमी खर्चात सुरक्षित आणि नियमित करण्याचा नासाचा उद्देश आहे ह्याचा उपयोग भविष्यकालीन मंगळ आणि दूरवरच्या अंतराळ मोहिमेसाठी होईल असे नासा संस्थेतील ISS Program Manager Dana Weigel म्हणतात,"आम्ही ह्या व्यावसायिक मोहिमेच्या यशस्वी सहभागामुळे आनंदित झालो आहोत आणि Axiom च्या नियमित व्यावसायिक सेवा सुरु करण्यासाठी उत्सुक आहोत

Thursday, 19 June 2025

सुर्याच्या अंतर्गत भागातून शक्तिशाली सौरज्वाळांचे ऊत्सर्जन

  A teal-colored ultraviolet image of the Sun taken by SDO/AIA, showing bright regions of solar activity and swirling patterns on the solar surface, dated 2025-06-17.

 नासाच्या Solar Dynamic Observatory ने टिपलेला सूर्याच्या अंतर्गत भागातून बाहेर पडणाऱ्या  शक्तिशाली तीव्र उष्णतेच्या सौर ज्वाळा आणि प्रकाशित भागाचा फोटो -फोटो -नासा संस्था

नासा संस्था - 19 जुन 

नासाच्या Solar Dynamic वेधशाळेतील Solar Dynamic Observatory तर्फे सतत सुर्याचे निरीक्षण व ईतर माहिती गोळा केली जाते ह्या वेधशाळेने प्रसारित केलेल्या माहिती नुसार सध्या सुर्याच्या अंतर्गत भागातून अत्यंत शक्तिशाली तीव्र  उष्णतेच्या सौरज्वाळांचे लोट अंतराळात उत्सर्जित होत आहेत

मंगळवारी संध्याकाळी 8.49 मिनिटांनी सुर्याच्या अंतर्गत भागातून अशा शक्तिशाली उष्ण लाटा ऊत्सर्जित होत असल्याने आणी तो भाग अत्यंत प्रकाशमान दिसत असल्याने त्या वेळेस वेगाने बाहेर पडणाऱ्या ज्वाळांचे फोटो  Solar Dynamics Observatory ने टिपले आहेत ह्या फोटोत आगीच्या ज्वाळांचे लोट बाहेर फेकल्या गेल्या नंतर सूर्या पासून बाहेर पडलेल्या Ultra Violet rays मुळे हा भाग सोनेरी निळसर रंगाने अत्यंत प्रकाशमान झाला आहे 

नासाच्या शास्त्रज्ञांनी प्रसारित केलेल्या माहिती नुसार X 1.2 प्रकारच्या ह्या ज्वाळा अत्यंत शक्तिशाली आणी तीव्र ऊष्णतेच्या असतात सुर्याच्या अंतर्गत भागातील मॅग्नेटिक फिल्ड मध्ये अंतराळातील प्रचंड वेगाने वाहणारे वारे धुळ आणी हानीकारक Cosmic कीरणे आत ओढल्या जातात सर्व जगाला प्रकाशमान करणारा सुर्य प्रत्यक्षात आगीचा पेटता गोळा आहे त्याच्या अंतर्गत भागात ज्वलनशील पदार्थ आणी वायूमुळे सतत आग घुमसत असते आणी त्यापासून तयार होणारे आगीचे लोट,ज्वाळा,विध्युत भारीत किरणे वायुकण प्रचंड वेगाने सुर्याच्या करोना ह्या भागात फेकल्या जातात त्यामुळे तेथील भागात तीव्र उष्णता आणि प्रकाश असतो ह्या भागातील चुंबकीय क्षेत्रात ज्वलनशील पदार्थ,वायू,विद्युतभारीत किरणे,विद्युतभारीत कण गोलाकार फिरत असतात तेथे सतत ऊष्ण सौर वारे वहात असतात,सौरवादळे होतात जेव्हा ह्या वादळाची तिव्रता वाढते तेव्हा शक्तीशाली स्फोट होतात आणि त्यामुळे निर्माण झालेले आगीचे लोट ह्या चुंबकीय क्षेत्रातुन बाहेर अंतराळात फेकल्या जातात

ह्या भडकत्या शक्तीशाली ज्वाळांमधून अपायकारक विनाशकारी सौर कीरणे बाहेर पडतात पृथ्वीवरील रेडिओ Communications ,Electric Power Grids,Navigation Signals अंतराळ यान आणि अंतराळस्थानकात राहणाऱ्या अंतराळवीरांसाठी  हे सौर वादळ धोकादायक ठरू शकते

ह्य आधी मे महिन्यात 24 तारखेला देखील सुर्याच्या अंतर्गत भागातून आगीचे लोट बाहेर ऊत्सर्जित झाले होते त्या ऊष्ण लाटा X1.1 प्रकारच्या होत्या त्या आधी 2024  मध्ये सुर्याच्या अंतर्गत भागातून 13 मे व 14 मेला अत्यंत वेगाने शक्तीशाली आगीचे लोट अंतराळात फेकल्या गेल्याची माहिती नासाच्या Solar Dynamics Observatory ने दिली होती  ह्या वेगाने बाहेर पडणाऱ्या ज्वाळांचे फोटो देखील Solar Dynamics Observatory ने टिपले आहेत ह्या फोटोत आगीच्या ज्वाळांचे लोट बाहेर फेकल्या गेल्या नंतर सूर्या पासून बाहेर पडलेल्या Ultra Violet rays मुळे हा भाग सोनेरी निळसर रंगाने अत्यंत प्रकाशमान झाला आहे  हे आगीचे लोट अंतराळात फेकल्या गेल्या मुळे पृथ्वीला धोका होऊ शकतो असा ईशाराही नासा संस्थेच्या वेधशाळेने दिला होता त्या मुळे पृथ्वीवरील यंत्रणा सतर्क झाली आणि स्थानकातील अंतराळवीरांनी काही विपरीत घडू नये म्हणून आधीच खबरदारी घेतली होती सौर उपकरण,सौर प्रणाली काही वेळ बंद ठेवली होती

Wednesday, 4 June 2025

Blue Origin NS -32 मोहिमेतील सहा अंतराळप्रवासी अंतराळ पर्यटनावरून परतले

 

Blue Origin  NS -32 चे अंतराळ प्रवाशी अंतराळ पर्यटनावरून पृथ्वीवर पोहोचल्यानंतर -फोटो -Blue Origin 

Blue Origin- 1 जुन

Blue Origin च्या NS-32 मोहिमे अंतर्गत सहा अंतराळ प्रवासी 31 मेला अंतराळ पर्यटनाहून परतले Blue Origin चे हे बारावे मानवी ऊड्डाण होते ह्या आधी फक्त woman's Special अंतर्गत सहा महिला अंतराळ पर्यटनास जाऊन आल्या आहेत ह्या अंतराळ प्रवाशांमध्ये Aymette Medina Jorge, Dr.Gretchen Green,Jaime Aleman,Jesse Williams,Mark Rocket आणी Paul Jeris ह्यांचा समावेश होता  

अंतराळ पर्यटनास जाण्याआधी ह्या सर्व अंतराळ प्रवाशांनी उड्डाणपूर्व ट्रेनिंग पूर्ण केले होते उड्डाणा आधी आवश्यक ऊड्डाण पुर्व चेकअप झाल्यानंतर हे पर्यटक अंतराळ पर्यटनासाठी निघाले तेव्हा पत्रकारांनी त्यांच्या त्या क्षणीच्या प्रतिक्रिया विचारल्या असता त्यांनी आम्हाला ह्या क्षणी लहानपणीची आठवण येत आहे आमच्या भावना संमिश्र आहेत पृथ्वीदर्शन करण्याची हा थरारक प्रवास करण्याची उत्सुकता लागलीय हा क्षण रोमांचक आहे अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या

31 मेला सकाळी 8.30 वाजता (13.30 UTC) Blue Origin च्या West Texas येथील ऊड्डाण स्थळावरून New Shepard अंतराळयान ह्या सहा प्रवाशांना घेऊन अंतराळ पर्यटन करण्यासाठी अंतराळात झेपावले आणि वेगाने  अंतराळात  पोहोचले त्यानंतर New Shpard अंतराळ यानातील स्वयंचलित यंत्रणा कार्यरत झाली यानाने नियोजित टप्पे पार केल्यानंतर काही सेकंदात अंतराळयान रॉकेट पासून वेगळे झाले आणि पुढील प्रवासास सुरवात झाली 

काही वेळातच अंतराळयान पृथ्वी आणि अंतराळ ह्यांच्यातील 62 मैल अंतरावरील सीमारेषा पर्यंत पोहोचले आणि काही क्षणातच हि ससीमारेषा पार करून अंतराळातील झिरो ग्रॅविटीत पोहोचले अंतराळयान अंतराळात पोहोचताच सर्वांनी आनंदानी जल्लोष केला त्यांच्या तोंडून Wow! Amazing ! Look Our Earth is How Beautiful ! अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटल्या आता आपण खरोखरच karman line पर्यंत पोहोचलोय आपण सारे लकी आहोत आपल्याला हा अद्भुत,असामान्य अविस्मरणीय आनंद मिळतोय असे म्हणत आनंदाने टाळ्या वाजवत ह्या थरारक क्षणांचा  अंतराळ प्रवासाचा अनुभव घेतला अंतराळातील झिरो ग्रॅव्हीटीत प्रवेश करताच सर्वजण सीटवरून बाहेर पडले आणि साऱ्यांनी सर्व बाजूने तरंगण्याचा अद्भुत आनंद घेतला पण हा आनंद काही सेकंदातच संपला आणि अवघ्या दहा बारा मिनिटांचा पृथ्वी ते अंतराळ अशा अंतराळ पर्यटनाचा आणि पृथ्वी दर्शनाचा अद्भुत आनंद घेऊन सर्व अंतराळ प्रवाशी पृथ्वीवर परतले

 Blue Origin NS-32 चे अंतराळ पर्यटक अंतराळातील झिरो ग्रॅव्हीटीत पोहोचल्या नंतर तरंगण्याचा आनंद घेताना -फोटो -Blue Origin 

Pual Jeris- माझ्या आयुष्यातील अंतराळ उड्डाणाच स्वप्न पूर्ण होईल मी अंतराळात पोहोचेन तिथून पृथ्वी दर्शन करेन अस वाटत नव्हत पण ते आता शक्य झालय मला सर्वांना हेच सांगायचय कि जर आपली इच्छा असेल तर आपण काहीही करू शकतो कारण इच्छाशक्तीला सीमा नसते त्या साठी Blue Origin चे आभार त्यांच्या मुळेच मी हा अद्भुत आनंद घेऊ शकलो 

 

Blue Origin NS 32 मधील अंतराळ प्रवाशी Jaime Aleman पर्यटनाहून परतल्यानंतर -फोटो -Blue Origin

Mark Rocket आता Kiwi मधील पहिले अंतराळ उड्डाण करणारे अंतराळवीर ठरले ते  म्हणाले हा अनुभव अत्यंत सुंदर ,अमूल्य,असामान्य आणि अविस्मरणीय आहे हा अनुभव 11 मिनिटात अत्यंत कमी वेळात संपला

Ayme- माझ्या साठी माझ्या देशासाठी हि सन्माननीय बाब आहे असे म्हणत एमीने मेक्सिकोचा झेंडा दाखवला माझे हे अंतराळ पर्यटन माझ्या देशातील युवा पिढिला प्रेरित करेल तुला ह्या क्षणी काय वाटते असे विचारल्यावर खर सांगु का? मला पुन्हा ह्या यानात बसून परत अंतराळात जावस वाटत! ह्या अदभूत अनुभवासाठी ह्या अंतराळ पर्यटनासाठी Blue Origin आणी संपूर्ण टिमचे आभार आता अंतराळस्थानकात जायची ईच्छा आहे असे ती म्हणाली

Dr.Green- हा अनुभव असामान्य होता आपण आपल्या दैनंदिन जिवनात सुखदुःखाचे क्षण अनुभवतो,संकटांचा सामना करतो पण जेव्हा मी अंतराळातुन पृथ्वीकडे पाहिल तेव्हा जाणवल हा अदभुत आनंद हा अनुभव वेगळा आहे तो तिथे मिळत नाही मी खरोखरच भाग्यवान आहे मला हा अमुल्य क्षण अनुभवायला मिळतोय मी बाराव्या वर्षी Space Camp मध्ये गेले होते तेव्हा पासून माझ अंतराळ प्रवास करण्याच स्वप्न होत ते पुर्ण झाल त्यासाठी मी खूप संघर्ष केला मेहनत केली आणी अंतराळवीर होण्याच ट्रेनिंग घेतल नंतर नासा मध्ये ट्रेनर झाले मी माझ्या सोबत तेव्हाचा माझा Polaroid फोटो आणी Wings नेले होते मी घेतलेल शिक्षण योग्य होते हे मला जाणवल आता स्थानकात जायची ईच्छा आहे 

Aleman - अविश्वसनिय ,मार्मिक आणी अध्यात्मिक अनुभव देणारा होता Blue Origin च हे काम खूप छान आहे ते तसच सुरू रहाव मी अपेक्षा केली त्या पेक्षा हा प्रवास खूप सुंदर आणी वेगळा होता मला ह्या प्रवासासाठी माझ्या मुलीने प्रेरीत केल तिने 130 देशांना भेटी दिल्यात माझ्या पत्नीने 120 आणी मुलाने 70देश पाहिले आहेत त्यांनी प्रोत्साहित केल माझी पण ईच्छा होती ती पूर्ण झाली अंतराळातून पृथ्वीकडे पाहिल की वाटत हे अंतराळ किती विशाल आहे आपली पृथ्वी केकमधल्या चेरी सारखी आहे अजून आपल्याला ह्या ब्रम्हांडात खूप संशोधन करायचय खूप ठिकाणी जायचय हा अनुभव अविस्मरणीय आहे 

ह्या अंतराळ पर्यटकांना Blue Origin ने अंतराळवीर झाल्याचे सर्टिफिकेट आणी खास त्यांच्या साठी तयार करण्यात आलेले त्यांची कर्तृत्व वैशिष्ट्ये कोरलेले पदक देऊन सन्मानित करण्यात आले