Friday, 30 May 2025

Blue Origin NS -32 मोहिमेतील सहा अंतराळ प्रवासी 31 मेला अंतराळ पर्यटनाला जाणार

 

         Blue Origin NS -32 अंतराळ पर्यटन मोहिमेतील अंतराळ प्रवासी -फोटो -Blue Origin

 

Blue Origin - 30 मे

Blue Origin च्या NS-32 मोहिमे अंतर्गत सहा अंतराळ प्रवासी  31 मेला अंतराळ पर्यटनासाठी जाणार आहेत आणी Blue Origin चे हे बारावे मानवी ऊड्डाण आहे ह्या आधी फक्त woman's Special अंतर्गत सहा महिला अंतराळ पर्यटनास जाऊन आल्या आहेत ह्या अंतराळ प्रवाशांमध्ये Aymette Medina Jorge, Dr.Gretchen Green Jaime Aleman Jesse Williams Mark Rocket आणी Paul Jeris ह्यांचा समावेश आहे 

31 मेला सकाळी 8.30 वाजता (13.30 UTC) Blue Origin च्या  West Texas येथील ऊड्डाण स्थळावरून New Shepard अंतराळयान ह्या सहा प्रवाशांना घेऊन अंतराळ पर्यटन करण्यासाठी अंतराळात झेपावेल आणि ह्या सर्वांना पृथ्वी आणि अंतराळ ह्यांच्यातील सीमारेषा पार करून अंतराळ प्रवासाचा अनुभव घडवेल

ह्या मोहीमेतील प्रवाशांविषयी

 Aymette-  Texas येथील ओडिसी अकादमी मधील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक School मध्ये Stem Teacher  पदी कार्यरत आहेत त्यांनी 60 हुन अधिक अवकाश प्रयोग आणि झीरो ग्रव्हिटी  प्रोजेक्टचे नेतृत्व केले आहे त्या मध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या फ्लाईंग बायोमेट्रीक सेन्सर आणि पॅराबॉलिक Zero G in Flight 3D प्रिंटिंगचा समावेश आहे त्या 2023 चा Stem Educater Award वीनर आहेत त्यांचे तिकीट Formacias Similares ह्या मेक्सिकन कंपनीने स्पान्सर केले आहे भविष्यकालीन नवसंशोधकांना प्रेरणा देण्याचे त्यांचे द्येय आहे

Dr Gretchen - ह्या महिलांच्या इमेजिंग तज्ञ  Radiologist Specialist आहेत त्यांना वीस वर्षांचा क्लिनिकल अनुभव आहे  त्या उत्कृष्ट शिक्षिका,संशोधक आहेत त्यांना लहानपणापासूनच अंतराळ विश्वाची आवड आहे 1986 मध्ये त्या पहिल्यांदा Space camp मध्ये गेल्या नंतर त्यांनी  Crew Trainer पदी काम केले त्या Space Camp Alumini Association च्या अध्यक्ष होत्या सध्या त्या US Space & Rocket Center Educater in Foundation Board वर कार्यरत आहेत राष्ट्रीय स्थरावर उद्योजक आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे 16 व्या वर्षी आर्थिक संघर्षावर मात करण्यासाठी त्यांनी अमेरिकेत सायकल चालविली होती

Jaime - हे पानामाचे वकील ,उद्योगपती आणि अमेरिकेतील माजी राजदूत आहेत पानामाच्या सर्वात मोठ्या खाजगी बँकांपैकी एका बँकेच्या संचालक मंडळावर कार्यरत आहेत ते साहसी आहेत त्यांनी 193 संयुक्त राष्ट्रांनी मान्यता दिलेल्या देशांचा आणि उत्तर आणि दक्षिण ध्रुवांवर प्रवास आणि अंतराळ प्रवास करणारी पहिली व्यक्ती ठरतील

Jesse-  साहसी व्यक्तिमत्वाचे कॅनडियन उद्योजक आहेत त्यांनी वयाच्या 16 व्य वर्षी पहिला डिजिटल मार्केटिंग व्यवसाय सुरु केला आणि सध्या 2012 मध्ये स्थापन झालेल्या Car History Group चे CEO आहेत  ते उत्साही गिर्यारोहक आहेत त्यांनी पृथ्वीवरील सात सर्वोच्च शिखरांपैकी सहा ऊंच शिखरे सर केली आहेत ज्या मध्ये माऊंट एव्हरेस्ट आणि अंटाक्र्टिकाचे माऊंट विन्सन यांचा समावेश आहे 

Mark - न्यूझीलंडमधील क्राईस्टचर्च येथील उद्योजक आणि तंत्रज्ञान नेते आहेत Kea Aerospaceचे CEO आहेत ह्या कंपनीमध्ये सौरऊर्जेवर चालणारे स्ट्रेटोस्फेरिक युएव्ही विकसित केले जातात ते एरोस्पेस न्यूझीलंडचे अध्यक्ष आहेत त्यांनी Rocket lab मध्ये बियाणे गुंतवणूक केली होती आणि सह संचालकपद सांभाळले होते 

Paul -  रियल  इस्टेट डेव्हलपर आणि उद्योजक आहेत त्यांचे वडील नासात ईंजीनिअर असल्याने त्यांना  लहाणपणापासुनच अंतराळ विश्वाचे आकर्षण आहे बालपण ऊन्हाळ्याच्या सुट्टीत फ्लोरिडा येथील अंतराळ किनाऱ्यावर गेले तेथे त्यांना  Apollo,Stattle, Mariner, Voyager आणी Viking चे  ऐतिहासिक उड्डाण पाहायला मिळाले त्यांनी 149 देशांंना भेटी  दिल्या आहेत प्रत्येक राष्ट्रांना भेट देण्याचे त्यांचे उद्धिष्ट आहे आणि लहानपणापासूनच त्यांचे अंतराळातून पृथ्वी सौंदर्य पहाण्याचे स्वप्न आहे


Thursday, 29 May 2025

नासाच्या Axiom -4 मोहिमेतील चार अंतराळवीर आठ जूनला स्थानकात जाणार

 
The Axiom Mission 4 crew

नासाच्या Axiom -4 मोहिमेतील युरोपियन अंतराळवीर Stawosz Uznansk नासाच्या अंतराळवीर Peggy Whitson इसरोचे  भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आणि हंगेरियन अंतराळवीर Tibor Kapu -फोटो -नासा संस्था

 

नासा संस्था -27 मे 

अमेरिकेने अंतराळ विश्वातील अंतराळवीरांच्या अंतराळ प्रवासासाठी आणि अंतराळयान बनविण्यासाठी व्यावसायिक कंपन्यांना परवानगी दिल्यानंतर Space X कंपनीने ह्या मोहिमेत सहभागी होत शुभारंभ केला आणि Crew Dragon अंतराळ यानातून अंतराळवीरांना अनेकदा सुरक्षित अंतराळ प्रवास घडवत हि मोहीम यशस्वी केली त्या नंतर Axiom Space कंपनीनेही ह्या व्यावसायिक अंतराळ मोहिमेत पदार्पण केले आणि तीन वेळा ह्या मोहिमेतील अंतराळवीरांना सुरक्षितपणे स्थानकात नेऊन आणले आता नासाच्या Axiom -4 मोहिमेतील चार अंतराळवीर स्थानकात वास्तव्यास जाणार आहेत 

Axiom -4 मोहिमे अंतर्गत नासाच्या अंतराळवीर आणि Axiom Space कंपनीच्या Human Space Flight Director Peggy Whitson,भारतीय अंतराळ संस्था इसरोचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला,युरोपियन अंतराळवीर Stawosz Uznanski Wisniewski (Poland ) आणि हंगेरीचे अंतराळवीर Tibor Kapu हे चार अंतराळवीर स्थानकात वास्तव्यासाठी जाणार आहेत ह्या मोहिमेत अंतराळवीर Peggy Whitson ह्या कमांडरपद तर शुभांशु शुक्ला हे पायलट पद सांभाळणार असून पोलंडचे अंतराळवीर Stawosz आणि हंगेरीयन अंतराळवीर Tibor Kapu हे दोघे मिशन स्पेशॅलिस्ट पद सांभाळणार आहेत

हे चार देशातील चार अंतराळवीर आठ जूनला 14 दिवसांच्या वास्तव्यासाठी स्थानकात जाणार आहेत नासाच्या फ्लोरिडा येथील Kennedy Space Center येथील उड्डाणस्थळावरून  Space X Crew Dragon अंतराळ यान ह्या चार अंतराळवीरांसह 9.11a.m.ला अंतराळ स्थानकात जाण्यासाठी अंतराळात उड्डाण करेल ह्या व्यावसायिक मोहिमेत नासा आणि भारतीय अंतराळसंस्था ह्यांच्या सहकार्याने प्रथमच इसरोचे  भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला सहभागी होणार आहेत पोलंड आणि हंगेरीचे अंतराळवीर देखील ह्या मोहिमेत पहिल्यांदाच सहभागी झाले आहेत 

हे मल्टिनॅशनल अंतराळवीर त्यांच्या 14 दिवसांच्या वास्तव्या दरम्यान अंतराळातील ह्या फिरत्या स्थानकातील झिरो ग्रॅव्हिटीतील लॅब मध्ये सुरु असलेल्या सायंटिफिक संशोधनात सहभागी होणार आहेत आणि 60 वेगवेगळे अत्याधुनिक संशोधनात्मक सायंटिफिक प्रयोग करणार आहेत 

Axiom -4 मोहिमेतील नासाच्या माजी अंतराळवीर Peggy Whitson अनेकवेळा स्थानकात वास्तव्यास गेल्या असून त्यांनी एक वर्ष सलग स्थानकात राहण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे त्या म्हणतात," Axiom मोहिमेतील विविध देशांच्या अंतराळवीरांसोबत काम करण्याचा अनुभव खूप छान आहे हे अंतराळवीर बुद्धिमान आहेत अंतराळविश्वातील संशोधन करण्याचा त्यांचा दृष्टिकोन नवा आहे त्यांच्या देशाच्या ह्या व्यावसायिक सहभागामुळे आमच्या मोहिमेला संशोधन करताना मदत मिळेल अंतराळ विश्वात व्यावसायिक दृष्ठीने औद्योगिक प्रगती होईल शिवाय त्यांच्या देशातील भावी पिढीला ह्या अंतराळविश्वात करिअर करताना प्रेरणा मिळेल आणि ह्या अमर्याद अंतराळ विश्वात संशोधन करण्यासाठीची पाऊलवाट मिळेल!" 

ह्या आधी 2022एप्रिल मध्ये Axiom-1 मोहिमेतील अंतराळवीरांनी स्थानकात 17 दिवस वास्तव्य केले होते 2023 मध्ये Axiom -2 मोहिमेत चार अंतराळवीरांसह  Peggy Whitson ह्यांनी कमांडरपद सांभाळत आठ दिवस स्थानकात वास्तव्य करीत हि मोहीम यशस्वी केली आणि 2024 च्या जानेवारी महिन्यात Axiom -3 मोहिमेतील अंतराळवीरांनी स्थानकात 18 दिवस वास्तव्य केले होते 

अंतराळातील ह्या फिरत्या अंतराळस्थानकातील झिरो ग्रॅव्हीटीतील प्रयोगशाळेत गेल्या चोवीस वर्षांपासून विविध देशांचे अंतराळवीर सतत जातात,तेथे सुरु असलेल्या संशोधनात सहभागी होतात आणि नवनवीन शोध लावतात पृथ्वीवर करता येत नाहीत अशा पृथ्वी संरक्षण,मानवी आरोग्यासाठी उपयुक्त आणि औद्योगिक विकासासाठीच्या संशोधनात सहभागी होतात स्थानकातील विपरीत वातावरणाचा मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामाची संशोधित माहिती गोळा करतात अंतराळस्थानक म्हणजे अंतराळविश्वातील व्यावसायिक अर्थव्यवस्था विकसित करणारी Sprigboard आहे आणि ती अधिक सशक्त करण्याचे नासाचे द्येय आहे त्यासाठी ह्या व्यावसायिक संस्थेच्या सहकार्याने अंतराळ मोहिमा कमी खर्चात सुरक्षित आणि नियमित करण्याचा नासाचा उद्देश आहे ह्याचा उपयोग भविष्यकालीन मंगळ आणि दूरवरच्या अंतराळ मोहिमेसाठी होईल असे नासा संस्थेतील ISS Program Manager Dana Weigel म्हणतात,"आम्ही ह्या व्यावसायिक मोहिमेच्या यशस्वी सहभागामुळे आनंदित झालो आहोत आणि Axiom च्या नियमित व्यावसायिक सेवा सुरु करण्यासाठी उत्सुक आहोत "! 


Friday, 23 May 2025

नासाच्या Perseverance मंगळयानाने मंगळभुमीवरील नवीन भागात घेतलेल्या खडकांच्या नमुन्यात चिकणमातीचे अंश

 Rover’s tracks coming from an area called “Witch Hazel Hill”

 नासाचे Perseverance मंगळयान 13  मे ला Witch Hazel Hill ह्या भागातून मंगळ भूमीवरील Krokodillen ह्या भागात प्रवेश करताना -फोटो -नासा संस्था

नासा संस्था- 23 मे 

नासाचे Perseverance मंगळयान गेल्या चार वर्षांपासून मंगळभुमीवर कार्यरत आहे मंगळभुमीवरील पुरातनकालीन सजीवसृष्टिच्या अस्तित्वाला दुजोरा देणारे पुरावे,आटलेले पाण्याचे स्त्रोत आणी भविष्यकालीन मानवासहित मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांना राहण्यायोग्य तेथील पृथ्वीसारख्या पोषक वातावरणाचा शोध घेत आहे शिवाय मंगळावरील भुगर्भातील आणी भुमीवरील उत्खनन करून खडक,माती,वाळू यांचे नमुने गोळा करत आहे ह्या यानाने आतापर्यंत अत्यंत ऊपयुक्त आणि महत्वपूर्ण संशोधीत माहिती मिळवली आहे 

सध्या Perseverance मंगळयान मंगळभुमीवरील नवीन भागात पोहोचले आहे ह्या भागाला शास्त्रज्ञांनी Krokodillen असे नाव दिले असून हे नाव Norway येथील Prins Karls Forland ह्या डोंगर रांगेतील एका कड्याच्या नावावरून ठेवले आहे मंगळावरील हा भाग डोंगराळ आहे आणी त्याच्या पायथ्याशी मंगळावरील पुरातन कालीन खडकात चिकणमातीचे अंश सापडले आहेत 

Jezero Crater च्या पायथ्याशी दक्षिण आणी पश्चिमेकडील 73 एकर जागेत व्यापलेल्या ह्या पाठारी भागातील खडकांची रचना पुरातन कालीन आहे त्यामुळे नासाच्या मंगळ मोहिमेतील टिममधील शास्त्रज्ञांना येथील खडकांचे नमुने गोळा करून संशोधीत माहिती मिळवण्याची ईच्छा होती गेले पाच महिने मंगळावर वादळ होते त्यामुळे हे काम आता पुन्हा सुरु झाले आहे असे Caltech Pasadona येथील ह्या मोहिमेचे प्रमुख शास्त्रज्ञ Ken Farley   म्हणतात ह्या आधी Witch Hazel Hill ह्या भागात घेतलेली संशोधीत माहिती ऊपयुक्त ठरली आहे तितकिच ह्या नव्या भागातील संशोधीत माहिती  देखील ऊपयुक्त ठरेल अशी आम्हाला खात्री वाटते 

ह्या भागात केलेल्या उत्खननात सुरवातीलाच घेतलेल्या खडकांच्या नमुन्यात चिकणमातीचे अंश सापडले आणि चिकणमाती तयार होण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते मंगळावर प्राचीन काळात पडलेल्या पावसाच्या पाण्यात वाहून आलेला गाळ माती आणि वाळू ह्या पासून हे खडक निर्माण झाले असावेत किंवा ह्या खडकांचे थर कदाचित तेथे अस्तित्वात असलेल्या पाण्याच्या प्रवाहातील गाळामुळेही तयार झाले असावेत त्या मुळे मंगळावर पुरातन काळी पाण्याचे अस्तित्व असल्याचे संकेत मिळतात आणि पाणी असेल तर तेथील वातावरण सजीव सृष्ठीला पोषक असेल आणि तेथे सजीवांचे अस्तित्वही असेल म्हणूनच इथे आणखी उत्खनन केल्यास आणि त्यातील खडकात चिकणमातीचे अंश असल्यास ह्या मताला पृष्ठी मिळेल पृथ्वीवरील चिकणमातीत सजीवांच्या निर्मितीला आवश्यक असलेले ऑरगॅनिक घटक असतात आणि चिकणमातीयुक्त खडकात पुरातन जीवाष्म सुरक्षित राहतात ह्या भागातील ह्या खडकांच्या सखोल संशोधनानंतर त्या मधील खनिज आणि पाण्याचे अंश सापडलॆ तर मंगळावर प्राचीन काळी सजीव सृष्ठी अस्तित्वात होती आणि कालांतराने ती नष्ठ होत गेली हे सिद्ध होईल असे शास्त्रज्ञांचे मत आहे

हे खडक मंगळग्रहावरील उत्क्रांतीच्या काळात तयार झाले असतील मागच्या वर्षी Cheyava Falls ह्या भागात असलेल्या खडकात देखील असे पाण्याचे अंश सापडले होते 2024 च्या जुलै मध्ये सापडलेल्या खडकांची रचना देखील अशीच आहे आणि त्यात रासायनिक घटक आहेत ह्या खडकांच्या रचना पाहून त्यांची निर्मिती खूप प्राचीन काळी Jezezero Crater च्याही आधीच्या काळात झाली असावी त्या काळी तेथे कदाचित सजीवांचे अस्तित्वही असेल मंगळावरील Krokodillen भागाची निर्मिती Noachian काळात झाली असावी ह्या भागाच्या बाहेरील कडांमध्ये Olivine आणि Carbonate युक्त खडक आढळले आहेत हे खडक मंगळावरील भूगर्भीय घडामोडीच्या वेळी भूगर्भातून बाहेर पडलेल्या Magma पासून तयार झाले असावेत पृथ्वीवरील Carbonate युक्त खडक खनिजे आणि द्रवरूपातील  कार्बन डाय ऑक्साईड आणि पाण्यापासून तयार होतात आणि त्यातील खनिजे जीवाष्म संरक्षित करतात 

9 मे ला मंगळावरील 1,500 व्या मंगळ दिवशी Perseverance मंगळ यानाने हे खडक शोधले आहेत आतापर्यंत Perseverance यानाने दोन खडकांचा चुरा आणि मातीचे नमुने तीन वातावरणीय आणि इतर नमुने गोळा केले आहेत ह्या आधी खडकांच्या नमुन्यांच्या 25 ट्यूब्स भरून सील केल्या आहेत ह्या टीम मधील शास्त्रज्ञांनी Perseverance यानातील स्वयंचलित यंत्रणेद्वारे  त्यातील काही ट्यूब्स रिकाम्या आणि काही नमुने सील न करता भरले आहेत जर ह्या पुढील भागात आणखी काही सजीवसृष्ठीच्या अस्तित्वाचे सबळ पुरावे मिळाल्यास त्या ठिकाणचे  नमुने रिकाम्या ट्यूब्स मध्ये भरता येतील आणि सील न केलेल्या ट्यूब्स मधून आधीचे नमुने काढता येतील असा विचार शास्त्रज्ञांनी केला आहे

गेल्या चार वर्षांपासून Perseverance मंगळयानाद्वारे हे नमुने गोळा केल्या जात असून प्रत्येक ट्यूबमध्ये महत्वपूर्ण संशोधित माहिती आहे असे नासाच्या JPL Lab California  संस्थेतील ह्या मोहिमेतील शास्त्रज्ञ Katie Stack Margan म्हणतात


Friday, 16 May 2025

नासा संस्थेतील Lab मध्ये अंतराळस्थानकातील संशोधना अंतर्गत लावण्यात आलेल्या Lettuce ची कापणी

 https://images-assets.nasa.gov/image/KSC-20250424-PH-KLS01_0052/KSC-20250424-PH-KLS01_0052~large.jpg?w=1920&h=1280&fit=clip&crop=faces%2Cfocalpoint

 नासाच्या Kennedy Space Center मधील लॅब मध्ये उगवलेल्या Lettuce च्या रोपाची पाने तोडताना टीममधील शास्त्रज्ञ -फोटो -नासा संस्था

 

नासा संस्था- 16 मे 

अंतराळ स्थानकातील झीरो ग्रव्हिटित वास्तव्य करणाऱ्या अंतराळवीरांना पृथ्वीवरुन येणाऱ्या अन्न,भाजी फळांवर अवलंबून रहावे लागते त्यांना प्रीझर्व केलेल्या भाज्या व अन्न खावे लागते पुरेसे जीवनसत्त्वयुक्त अन्न न मिळाल्याने त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम होतो अंतराळवीरांना ताजे व पोषक अन्न मिळावे म्हणून नासा संस्थेतील शास्त्रज्ञ सतत प्रयत्न करत असतात त्या साठी स्थानकात पृथ्वीसारखी वातावरण निर्मिती करुन कृत्रीम व्हेजी चेंबर तयार करण्यात आला आहे ह्या मोहिमे अंतर्गत वेगवेगळे व्हेजी प्रोजेक्ट राबविण्यात येत असुन आतापर्यंत अंतराळविरांनी त्यात अनेक भाजी फुले व धान्याची यशस्वी लागवड करून त्याचा आस्वादही घेतला आहे अंतराळ मोहिमेतील अंतराळवीर स्थानकातील वास्तव्या दरम्यान संशोधन व इतर कामातून मोकळा वेळ काढून ह्या रोपांची निगा राखतात आणि त्यांचे वेळोवेळी निरीक्षण नोंदवून संशोधीत माहिती गोळा करतात

नासाच्या ह्या मोहिमेतील Plant habitat -07 ह्या प्रोजेक्ट अंतर्गत स्थानकात आणी पृथ्वीवरील नासाच्या Florida येथील  Kennedy Space Center मधील अत्याधुनिक लॅब मध्ये   Outredgeous Romine Lettuce ची रोपे लावण्यात आली होती त्यांची वाढ आता पूर्ण झाली असून नुकतीच नासाच्या ह्या मोहिमेतील टीमने Lettuce च्या पानांची कापणी केली आहे 

2014 मध्ये पहिल्यांदा स्थानकात Romine Lettuce ची रोपे पाठवण्यात आली आणि स्थानकातील Veggie चेंबर मध्ये हि रोपे लावण्यात आली होती तेव्हा त्याची वाढ होऊन त्याला भरपूर पानेही आली आणि अंतराळस्थानकात वास्तव्यास असणाऱ्या अंतराळवीरांनी त्याचा आस्वादही घेतला त्यातील काही पाने त्यांनी येताना पृथ्वीवरही आणली होती अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांनी ह्या रोपांची काळजी घेतली आणि झिरो ग्रॅविटीत वाढणाऱ्या ह्या रोपांचे संशोधनात्मक निरीक्षणही नोंदवले होते त्याच जातीच्या Lettuce ची हि रोपे आहेत Lettuce ची कोवळी ताजी पाने सलाद साठी वापरली जातात त्या मध्ये  मानवी शरीराला आवश्यक जीवनसत्वे असून पोषक आहेत

Plant Habitat -07 प्रोजेक्ट अंतर्गत  24 एप्रिल 2025 ला काही रोपे Space X -31 Cargoship मधून स्थानकात पाठविण्यात आली असून इथे नासा संस्थेतील अत्याधुनिक लॅब मधील व अंतराळ स्थानकातील झिरो ग्रॅव्हीटीतील पृथ्वीसारख्या कृत्रिम वातावरणात हि रोपे कशी वाढतात अंतराळातील विपरीत वातावरणात कमीजास्त पाण्यात वाढताना त्यांच्यात काय बदल होतात त्यांच्यातील पोषक तत्वांवर आणि Microbiome मध्ये काय फरक पडतो ह्याचे सूक्ष्म निरीक्षण नोंदवून सखोल संशोधन करण्यात येत  आहे ह्या संशोधनाचा उपयोग भविष्यकालीन  दूरवरच्या अंतराळमोहिमेतील अंतराळवीरांना आणि चंद्र आणि मंगळ मोहिमेतील मानवी वास्तव्यातील अंतराळवीरांना होईल


Saturday, 3 May 2025

अंतराळ स्थानकाच्या कामासाठी नासाच्या अंतराळवीर Anne McClainआणी Nicole Ayers ह्यांचा Space walk संपन्न

  NASA spacewalkers (from left) Nichole Ayers and Anne McClain work together at the International Space Station's Port-4 truss structure to install a modification kit readying the orbital outpost for a future rollout solar array.

नासाच्या अंतराळवीर Nicole Ayers आणि Anne McClain स्थानकाच्या रशियन सेगमेंट मधील Port Truss ह्या भागात  Space Walk करताना -फोटो -नासा संस्था

 नासा संस्था - 1 मे

नासाच्या अंतराळवीर Anne McClain आणी Nicole Ayers ह्यांनी स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी स्पेसवॉक केला ह्या दोघी सकाळी 9 वाजुन 5 मिनिटाला स्पेसवॉक करण्यासाठी स्थानकाबाहेर पडल्या आणी दुपारी 2 वाजुन 49 मिनिटांंनी स्पेसवॉक पूर्ण करून स्थानकात परतल्या 

   NASA astronauts (from left) Anne McClain and Nichole Ayers pose for official crew portraits at NASA's Johnson Space Center.

                        नासाच्या अंतराळवीर Anne McClain आणि अंतराळवीर Nicole Ayers

पाच तास चव्वेचाळीस मिनिटांच्या ह्या स्पेसवॉक मध्ये ह्या दोघी अंतराळविरांनी अंतराळ स्थानकाच्या बाहेरील भागातील Communication Antenna दुसरीकडे प्रस्थापित केला आणी पुढील स्पेसवॉकसाठीची तयारी करून ठेवली त्यांनी स्थानकाच्या रशियन सेगमेंट मधील Port Truss ह्या भागात काही तांत्रिक कामे केली त्यांनी Solar Rollout Arrey (IROSA) fix करण्यासाठी Bracket बसविले पुढील मोहिमेत पृथ्वीवरून Space X Dragon मधुन हे Solar Arrey स्थानकात पाठविण्यात येणार आहेत त्यासाठी हि पुर्व तयारी करण्यात आली आहे शिवाय ह्या दोघींनी स्थानकाबाहेर Jamper Cable wire ची जोडी देखील Fix केली ह्या कामामुळे स्थानकाला पुरवठा होणाऱ्या ऊर्जा आणि विजनिर्मिती क्षमतेत तीस टक्क्यांनी वाढ होईल सध्या स्थानकात 160 KW विजनिर्मिती होते ती क्षमता 215 KW पर्यंत वाढेल 

ह्या दोघींनी ह्या स्पेसवॉकची तयारी आधीच करून ठेवली होती त्यांनी त्यांचे स्पेससुट लिकेज चेक केले चार्ज केले स्पेसवॉक साठी लागणारे हार्ड वेअर व इतर साहित्य चेक केले अंतराळवीर Anne McClain ह्यांनी ह्या स्पेसवॉक साठी लाल रंगाच्या रेशा असलेला स्पेससुट परीधान केला होता त्यांच्या आजवरच्या अंतराळ कारकिर्दीतला स्थानकाच्या कामासाठी केलेला त्यांचा हा तिसरा स्पेसवॉक होता अंतराळवीर Nicole Ayers ह्यांनी ह्या स्पेसवॉक साठी परीधान केलेला स्पेससुट रेशा विरहित होता त्यांचा हा पहिलाच स्पेसवॉक होता 

आजवरचा स्थानकाच्या कामासाठी अमेरिकन अंतराळवीरांनी केलेला हा 93 वा तर नासाच्या अंतराळवीरांनी स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी केलेला हा 275 वा स्पेसवॉक होता