
नासाच्या अंतराळ मोहीम 71/72 मधील अंतराळवीर सोयूझ MS -26 अंतराळयानातून पृथ्वीवर खाली उतरताना -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -25 एप्रिल
नासाच्या अंतराळ मोहीम 71/72 चे तीन अंतराळवीर Don Pettit रशियन अंतराळवीर Alexy Ovchinin आणि Ivan Vagner स्थानकातील सात महिन्यांचे वास्तव्य संपवून वीस एप्रिलला पृथ्वीवर परतले आहेत विशेष म्हणजे अंतराळवीर Don Pettit ह्यांचा वीस तारखेला 70 वा वाढदिवस होता पृथ्वीवर परतल्यावर ते थोडेसे थकले होते पण नंतर ते नॉर्मल झाले
हे अंतराळवीर वीस तारखेला संद्याकाळी 5.57 मिनिटाला पृथ्वीवर येण्यासाठी स्थानकातून बाहेर पडले आणि संद्याकाळी 9.20 मिनिटाला (स्थानिक वेळ सकाळी 6.20 मिनिटे ) पृथ्वीवर परतले ह्या तीन अंतराळवीरांसह सोयूझ MS-26 अंतराळयान कझाकस्थानातील Dzhezkagan येथे पॅराशूटच्या साहाय्याने खाली उतरले नासाच्या रिकव्हरी टीमने ह्या अंतराळवीरांना अंतराळ यानातून बाहेर आणले टीम मधील डॉक्टरांनी त्यांचे प्राथमिक चेकअप केले त्या नंतर त्यांना रुटीन Postlanding मेडिकल चेकअप साठी कझाकस्थानातील Recovery Staging area Karaganda येथे नेण्यात आले ह्या सर्व अंतराळवीरांना फायनल चेकअप नंतर नासाच्या विमानाने त्यांच्या गावी पाठवण्यात आले

नासाचे अंतराळवीर Don Pettit आणि सहकारी अंतराळवीर पृथ्वीवर परतल्यानंतर अंतराळवीर Pettit ह्यांना अंतराळयानातून बाहेर आणताना रिकव्हरी टीममधील सदस्य -फोटो नासा संस्था
निघण्याआधी ह्या अंतराळवीरांचा स्थानकात Change The Commmond Ceremony कायर्क्रम पार पडला स्थानकाचे कमांडर Alexy ह्यांनी स्थानकाची सूत्रे अंतराळवीर Onishi ह्यांच्या हाती सोपवली आणि आपल्या ह्या स्थानकाचा नीट सांभाळ कर असे म्हटले त्या वेळी अंतराळवीर Alexy आणि Onishi ह्यांनी त्यांच्या मैत्रीला उजाळा दिला "आपण 2016 मध्ये भेटलो तेव्हा पासून एकत्र आहोत नासाच्या अंतराळ मोहीम -48 मध्ये आपण एकत्र होतो एकत्र संशोधन केल खूप छान मजेत वेळ घालवला असे म्हणत नासा संस्थेतील मान्यवर व टीम मधील सर्वांचे आभार मानले त्यांनी त्यांच्या सहकारी अंतराळवीरांचेही आभार मानले आपण सारे मिळून केलेल वास्तव्य,संशोधन सतत आठवणीत राहील त्या बद्दल आभार !
अंतराळवीर Onishi ह्यांनी देखील Alexy ह्यांचे आभार मानले ते म्हणाले ," तुझ्या हातून स्थानकाची हि चावी घेताना मला आनंद होत आहे हा माझा बहुमान आहे स्थानक खूप महत्वपूर्ण आहे अंतराळ स्थानकात जाण,तिथे वास्तव्य करण आणि संशोधन करण सोप नाही इथे अंतराळवीर नियमित येजा करतात वास्तव्य करतात नवनवीन संशोधन करतात हा अनुभव अमूल्य आहे पिढ्यानपिढ्या ह्या मोहिमा सुरु राहतील त्या साठी नासा संस्थेचे आभार तुझ्या सोबतचा अनुभव रॉकिंग होता !"

अंतराळ स्थानकातून निघण्याआधी Change The Commamd Ceremony कार्यक्रमात अंतराळवीर Alexy Ovchinin स्थानकाची चावी जपानी अंतराळवीर Takuya Onishi ह्याच्या हाती सोपवताना -फोटो -नासा संस्था
हे तीनही अंतराळवीर 17 सप्टेंबर 2024 मध्ये स्थानकात राहायला गेले होते आता सात महिन्यांनी पृथ्वीवर परतले आहेत ह्या अंतराळवीरांनी स्थानकात 220 दिवस वास्तव्य केले अंतराळवीर Pettit चवथ्यांदा स्थानकात वास्तव्यास गेले होते त्यांच्या ह्या चार वेळच्या अंतराळ
कारकिर्दीत त्यांनी स्थानकात 590 दिवस वास्तव्य केले त्यांनी त्यांच्या स्थानकातील वास्तव्या दरम्यान स्थानकात सुरु असलेल्या सायंटिफिक संशोधनात सहभाग नोंदवला त्यांनी Metal 3D printing Capabilities,Advance Water Sanitization Technologies Explore,स्थानकातील झिरो ग्रॅव्हीटीतील वातावरणातील पाण्याच्या कमीजास्त उपलब्धतेत रोपांची लागवड आणि वाढीवर संशोधित माहिती गोळा केली शिवाय स्थानकातील वातावरणात गोलाकार पेटणाऱ्या अग्नीच्या ज्योती संदर्भातील संशोधित निरीक्षण नोंदवले आणि ह्या कामातून मिळालेल्या मोकळ्या वेळात काही युनिक सायंटिफिक प्रयोग केले आणि अंतराळातील फोटो काढून ते सोशल मीडियावर सर्वांसाठी प्रकाशित केले
अंतराळवीर Ovchinin हे देखील चवथ्यांदा स्थानकात राहायला गेले होते त्यांनी त्यांच्या चारवेळच्या अंतराळवारीत स्थानकात 595 दिवस वास्तव्य केले अंतराळवीर Vagner हे दुसऱ्यांदा स्थानकात राहायला गेले होते त्यांनी त्यांच्या दोनवेळच्या अंतराळ कारर्कीर्दीत स्थानकात 416 दिवस वास्तव्य केले आणि तेथील संशोधनात सहभाग नोंदवला




