Thursday, 21 November 2024

नासाच्या Artemis Accords मोहिमेत Denmark सहभागी

  Graphic showing the flags of the nations that have signed the Artemis Accords.

               नासाच्या Artemis Accords मध्ये सहभागी झालेले देश -फोटो -नासा संस्था 

 

 नासा संस्था- 21नोव्हेंबर

अमेरिकेने पन्नास वर्षांनी सुरू केलेल्या चांद्र मोहिमेत हळूहळू ईतर देशही सहभागी होत आहेत आतापर्यंत 47 देश  Artemis Accords मोहिमेत सहभागी झाले असून आता डेन्मार्क देशही ह्या मोहिमेत सहभागी झाला असून आर्टिमस मोहिमेतील सहभागी देशांच्या यादीत 48 व्या स्थानावर आहे ह्या आधीच 47 देश ह्या मोहिमेत सहभागी झाले असून भारताचाही त्यात समावेश आहे

डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन येथे झालेल्या Signing Ceremony समारंभात डेन्मार्कने Artemis मोहिमेत सहभाग नोंदवला Cristina Egelund ( Higher Education & Science Minister ) ह्यांनी Denmark च्या वतीने Artemis Accords वर सही केली ह्या Artemis Accords Signing Ceremony समारंभाला US Ambassador -Alan Leventhal हे देखील उपस्थित होते नासाचे Administretor Bill Nelson ह्यांनी ह्या दोघांचे स्वागत केले आणि डेन्मार्क Artemis मोहिमेत सहभागी झाल्याचे जाहीर केले ,"डेन्मार्क युरोपियन स्पेस एजन्सी (ESA ) चा सदस्य देश आहे आणि गेल्या अनेक दशकांपासून नासा सोबत अंतराळविश्वातील अंतराळ मोहिमेत कार्यरत आहे विशेषतः नासाच्या मंगळ मोहिमेत त्यांचा यशस्वी सहभाग आहे आता डेन्मार्कच्या Artemis मधील सहभागामुळे अंतराळविश्वातील भविष्यकालीन मोहिमेत शांततेने संशोधन करण्यास मदत होईल !"

Artemis मोहिमेत सहभागी झाल्यानंतर Egelund म्हणाल्या ,"ह्या मोहिमेत सहभागी होऊन सर्व देशांसोबत काम करताना चांद्रभूमीवरील औद्योगिक आणि सायंटिफिक संशोधनास बळ मिळेल आणि इतर देशांसोबतचे संबंध देखील मजबूत होतील अमेरिकेने पन्नास वर्षांनी पुन्हा एकदा चांद्रमोहीम राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे Artemis मोहिमेची सुरवात करून अंतराळविश्वातील मानवाला अज्ञात असलेल्या गोष्ठीचा,मानवाला उपयुक्त गोष्टीचा शोध घेण्यासाठी आणि मानवतेच्या विकासासाठी त्यांनी घेतलेल्या ह्या पुढाकारासाठी आम्ही त्याच्या सोबत आहोत अंतराळ विश्वातील भविष्यकालीन नाविन्यपूर्ण शोध घेण्यासाठीचा हा उपक्रम आहे !"

2020 मध्ये नासा आणि अमेरिकेतील विदेश विभागा तर्फे  सुरवातीला सात देशांनी एकत्र येऊन Artemis Accords ची स्थापना केली होती ह्या मोहिमे अंतर्गत भविष्यकालीन अंतराळ विश्वातील अंतराळ मोहिमेत एकत्रित शांततापूर्ण संशोधनासाठी करार करण्यात आला आहे सुरवातीला सात देशांचा सहभाग असलेल्या ह्या मोहिमेत आता 48 देश सहभागी झाले असून डेन्मार्क 48व्या स्थानावर आहे

Tuesday, 19 November 2024

Blue Origin सहा नागरिकांना अंतराळ पर्यटन घडवणार

 Headshots of the six NS-28 astronauts

 Blue Origin च्या NS -28 अंतराळ पर्यटन मोहिमेतील अंतराळ प्रवासी  -फोटो -Blue Origin

Blue Origin -18 नोव्हेंबर

Blue Origin NS-28 मोहिमे अंतर्गत सहा नागरिकांना अंतराळ पर्यटन घडवणार आहे 22 नोव्हेंबरला Blue Origin च्या West Texax येथील उड्डाण स्थळावरून साडे नऊ वाजता New Shepard अंतराळ यानातून Emily Calandrelli ,Sharon Hagle,Mark Hagle,Austin Litteral,James(JD) Russell,Henry Wolford हे सहा नागरिक अंतराळ पर्यटनास जाणार आहेत 

Emily -MIT इंजिनीअर, नामांकित पहिल्या अमेरिकन महिला TV Host आणि #1NY Times Best Selling लेखिका आहेत त्यांचे 3 मिलियन फॉलोअर्स आहेत Emily यु ट्यूब वर सक्रिय आहेत यु ट्यूब वर त्यांच्या सायन्स सिरीज Wonder Lab Emily,s Science Lab प्रसारित होतात त्या नऊ पुस्तकांची लेखिका आहेत 

Sharon Hagle - Space Kid Global च्या संस्थापक आहेत मुलींना मुलांच्या बरोबरीने प्रतिनिधित्व करण्यासाठी सामान हक्क मिळावा ह्या साठी त्यांनी संघर्ष केला आहे Sharonचे पती Mark Tricor International चे अध्यक्ष आणि CEO आहेत ह्या दोघांनी ह्या आधी 31 मार्च 2022 मध्ये Blue Origin च्या NS -20 मोहिमे अंतर्गत अंतराळ पर्यटन केले आहे आता ते दुसऱ्यांदा अंतराळ पर्यटनास जाणार आहेत सर्वात आधी अंतराळ पर्यटन करणारी जोडी म्हणून त्यांची नोंद झाली आहे

Austin Litteral - वित्तीय आणि सेवा उद्योगा मध्ये कार्यरत आहेत त्यांना लहानपणापासूनच अंतराळ प्रवास  करण्याची इच्छा होती आता त्यांचे स्वप्न साकारणार आहे त्यांचे तिकीट Whatnot co.ने स्पॉन्सर केले आहे 

James  सिरीयल उद्योजक आणि Info HDA चे संस्थापक आहेत ते सैनिकी परिवारातील आहेत त्यांनी त्यांच्या मुलीच्या स्मरणार्थ Victoria Russell Fondation ची स्थापना केली ह्या संस्थेद्वारे मुलांना शिक्षण आणि संगोपनासाठी आर्थिक व शैक्षणिक मदत केली जाते 

Henry -Canada येथील Bayshore Capital Torontoचे अध्यक्ष आणि CEO आहेत Aviator आणि Pilot आहेत Charter,Medevac आणि Organ retrieval Flight मध्ये कार्यरत आहेत 

Blue Origin चे New Shepard अंतराळयान नव्यांदा सामान्य नागरिकांना अंतराळ पर्यटनास घेऊन जाणार आहे हे सहाही जण अंतराळ यानातून पृथ्वीवरून उड्डाण करून काही मिनिटात पृथ्वी आणि अंतराळ ह्यांची सीमा भेदणाऱ्या करमन रेषेपर्यंत पोहोचतील काही मिनिटे अंतराळातील झिरो ग्रॅव्हीटीचा अद्भुत आनंद अनुभवतील आणि पृथ्वीवर परततील 

 The mission patch for NS-28.

Blue Origin च्या NS -28 मोहिमेतील अंतराळ पर्यटकांसाठी तयार करण्यात आलेला Embedded Patch -फोटो -Blue Origin

पृथ्वीवर परतल्यावर त्यांना Blue Origin ने त्यांच्यासाठी तयार केलेला त्यांची वैशिष्ठे कोरलेला  Embedded Patch देऊन त्यांना अंतराळवीर झाल्याचे सर्टिफिकेट देण्यात येईल Blue Origin ची हि अठ्ठाविसावी अंतराळ मोहीम आहे आजवर Blue Origin ने 43 नागरिकांना करमन रेषे पर्यंत अंतराळ पर्यटन घडवले आहे

Friday, 8 November 2024

Perseverance मंगळयानाने टिपले सुर्यग्रहणाच्या वेळी निसर्गाने साकारलेल्या डोळ्याच्या नैसर्गिक आकाराचे विलोभनीय दुश्य

 

मंगळावरील आकाशात 30 सप्टेंबरला झालेल्या सुर्ग्रहणाच्या वेळी Perseverance यानाने कॅमेराबद्ध केलेले निसर्गाने साकारलेल्या मानवी डोळ्याचे विलोभनीय दृश्य - फोटो नासा संस्था

नासा संस्था-JPL- 8 नोव्हेंबर

नासाचे Perseverance मंगळयान 2021च्या  फेब्रुवारी मध्ये मंगळावर पोहोचले तेव्हापासून मंगलभुमीवरील व भुगर्भातील पुरातन सजीव सृष्ठिच्या अस्तित्वाला दुजोरा देणारे पुरावे,पाण्याचे अस्तित्व आणी भविष्यकालीन मंगळ मोहिमेतील मानवी निवासासाठी पृथ्वीसारख्या पोषक वातावरणाचा शोध घेत आहे Perseverance मंगळयानाने  आजवर अत्यंत महत्त्वपुर्ण संशोधीत माहिती आणी तेथील भूगर्भातील खडकांचे नमुने गोळा करून त्याचे फोटो व व्हिडिओ  पृथ्वीवर पाठविले आहेत ह्याच मोहिमे अंतर्गत Perseverance यानाने मागच्या महिन्यात झालेल्या मंगळावरील सुर्यग्रहणाच्या वेळचे फोटो पृथ्वीवर पाठवले आहेत

मंगळ ग्रहाला दोन चंद्र आहेत Phobos आणी  Deimos हे दोन्हीही चंद्र आकाराने लहान आहेत  Phobos हा बटाट्याच्या आकाराचा आहे 30 सप्टेंबरला मंगळावरील 1,283 व्या दिवशी मंगळावरील आकाशात सुर्यग्रहण झाले तेव्हाचे फोटो Perseverance ने यानातील अत्याधुनिक कॅमेऱ्याच्या सहाय्याने कॅमेराबद्ध केले असुन पृथ्वीवर पाठवले आहेत

Perseverance यानाने घेतलेल्या ह्या फोटोत निसर्गाने रेखाटलेल्या मानवी डोळ्याचे विलोभनीय दृश्य दिसत आहे सुर्यग्रहणाच्या वेळी निसर्गाने साकारलेल्या ह्या फोटोत सुर्याचा पृष्ठभाग मानवी डोळ्यातील पांढऱ्या (Iris) भागासारखा भासत आहे आणी काळवंडलेला Phobos चंद्र मधल्या बुबुळा सारखा ( pupil) भासत आहे त्या मूळे शास्त्रज्ञानी ह्या फोटोला  Googly Eye असे नाव दिले आहे बटाट्याच्या आकाराचा Phobos चंद्र सुर्य आणी मंगळाच्या मधून भ्रमण करत असताना ग्रहणकाळात त्याने सुर्याचा मोठा पृष्ठभाग व्यापला आहे त्यामुळे सुर्याची प्रकाशकिरणे रोखली गेल्याने सावली पडली आणी चंद्र काळवंडला ह्या वेळी Phobos अत्यंत वेगाने भ्रमण करीत असल्यामुळे त्याला मानवी डोळ्यातील फिरणाऱ्या बुबुळाचा आकार प्राप्त झाला आहे

मंगळाच्या ह्या दोन चंद्रांची नावे ग्रीक खगोल शास्त्रज्ञांने ग्रीक पुराण कथेतील भीतीदायक देवता आणी त्याचा जुळा भाऊ ह्यांच्या नावावरुन ठेवली आहेत (फोबिया म्हणजे भिती)  Phobos हा पृथ्वीच्या चंद्रापेक्षा 157 पटिने लहान असून त्याची रूंदी जेमतेम 17 मैल ईतकी आहे आणी Deimos त्याहीपेक्षा लहान आकाराचा आहे हा चंद्र  मंगळाच्या जवळ असुन मंगळावरील विषुववृत्ताशी समांतर आहे ह्या चंद्राला मंगळाभोवती परिक्रमा करण्यासाठी फक्त साडेसात तास लागतात 

 Perseverance मंगळयानाने ह्या आधी अनेकवेळा मंगळावरील सुर्य ग्रहण पाहिले आहे आणी त्या आधी  नासाच्या मंगळ मोहिमेतील Quriosity मंगळयानाने 2019 मध्ये आणी Opportunity यानाने 2004 मध्ये मंगळावरील आकाशात झालेल्या सुर्यग्रहणाच्या वेळचे फोटो कॅमेराबध्द करून पृथ्वीवर पाठवले होते