नासाच्या Space X Crew -8चे अंतराळवीर स्थानकात पोहोचल्यानंतर स्थानकातील सर्व अकरा अंतराळवीर Welcome Ceremony दरम्यान लाईव्ह संवाद साधताना -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -5 मार्च
नासाच्या Space X Crew-8 अंतराळ मोहिमे अंतर्गत नासाचे अंतराळवीर Mathew Dominick ,Micheal Barratt,Jeanette Epps आणि रशियन अंतराळवीर Alexander Grebenkin हे चारजण सहा महिन्यांच्या स्थानकातील वास्तव्यासाठी अंतराळात गेले आहेत हवामान उड्डाणासाठी प्रतिकूल असल्यामुळे ह्या अंतराळवीरांचे स्थानकात जाण्यासाठीचे उड्डाण लांबले होते
अंतराळवीर Mathew Dominik हे पहिल्यांदाच स्थानकात राहायला गेले असून त्यांचा हा पहिलाच अंतराळ प्रवास आहे 2017 मध्ये नासा संस्थेत त्यांची अंतराळवीर म्हणून निवड झाली ह्या मोहिमेत ते मिशन स्पेशॅलिस्ट पद सांभाळतील
अंतराळवीर Micheal Barratt हे तिसऱ्यांदा स्थानकात राहायला गेले आहेत 2009 मध्ये मोहीम 19-20अंतर्गत स्थानकात राहायला गेले होते त्या वेळी त्यांनी दोनवेळा स्थानकाच्या कामासाठी Space Walk केला होता 2011मध्ये S.TS -133अंतर्गत स्थानकात राहायला गेले होते त्यांनी त्यांच्या मोहिमेदरम्यान स्थानकात 212 दिवस वास्तव्य केले आहे ते 70-71 मोहिमेत मिशन स्पेशॅलिस्ट म्हणून काम पाहतील
अंतराळवीर Jeanette Epps ह्यांचा पण हा पहिलाच अंतराळ प्रवास होता त्या पहिल्यांदाच स्थानकात राहायला गेल्या आहेत 2009मध्ये नासा संस्थेत त्यांची निवड झाली ह्या मोहिमेत त्या कमांडर व पायलटपदी कार्यरत होत्या ह्या मोहीमेत त्या Flight Engineer पद सांभाळतील
रशियन अंतराळवीर Alexander Gerbenkin हे देखील पहिल्यांदाच स्थानकात राहायला गेले आहेत ह्या मोहिमेत ते Flight Engineer पद सांभाळतील
Space X Crew -8चे अंतराळवीर स्थानकात जाण्याच्या तयारीत -फोटो नासा संस्था
रविवारी नासाच्या Florida येथील Kennedy Space Center येथील उड्डाण स्थळावरून हे चारही अंतराळवीर Space X Crew Dragon मधून स्थानकात जाण्यासाठी अंतराळ प्रवासास निघाले निघण्याआधी ह्या अंतराळवीरांचे आवश्यक चेकअप पार पडले रविवारी 3 मार्चला 10.53 p.m. (EST) वाजता Space X Crew Dragon Endeavour Falcon 9 रॉकेटच्या साहाय्याने स्थानकात जाण्यासाठी ह्या चार अंतराळवीरांसह अंतराळात झेपावले आणि मंगळवारी 5 मार्चला 2.30 a.m.ला स्थानकाजवळ पोहोचले अंतराळ प्रवासादरम्यान हे अंतराळवीर नासा संस्थेच्या लाईव्ह संपर्कात होते नासाच्या ह्या मोहिमेतील टीम प्रमुखांच्या मार्गदर्शनात ह्या अंतराळवीरांनी Space X Crew Dragon मधील स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित केली आणि आवश्यक प्रक्रिया पार पाडत मार्गक्रमण केले
Space X Dragon Endeavour स्थानकाजवळ पोहोचल्यानंतर काही वेळातच Dragon मधील स्वयंचलित यंत्रणेने स्थानक आणि Dragon ह्यांच्यातील Hatching आणि Docking प्रक्रिया पार पडली त्या नंतर ह्या अंतराळवीरांनी स्थानकात प्रवेश केला स्थानकात सध्या राहात असलेल्या मोहीम 70च्या अंतराळवीरांनी ह्या अंतराळवीरांचे स्थानकात स्वागत केले
आता स्थानकात अकरा अंतराळवीर एकत्र वास्तव्य करतील आणि हे चारही अंतराळवीर स्थानकात सुरु असलेल्या संशोधनात सहभागी होतील
No comments:
Post a Comment