नासाच्या CHAPEA -1 मंगळ मोहिमेतील सहभागी धाडसी प्रतिनिधी -फोटो नासा सस्था
नासा संस्था - 1 मार्च
नासाच्या CHAPEA मोहीमे अंतर्गत Florida येथील नासा संस्थेतील J.PL Lab मध्ये शास्त्रज्ञांनी मंगळासारखे वातावरण निर्मिती करुन कृत्रीम मंगळभुमी निर्माण केली आहे भविष्यकालीन मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांच्या मंगळनिवासाठी आणी त्या नंतरच्या मानवी वास्तव्यासाठी ह्या शास्त्रज्ञ निर्मित कृत्रिम मंगळभुमीत वास्तव्य केल्यानंतर मानवी आरोग्यावर काय विपरीत परिणाम होतात ह्या विषयी संशोधीत माहिती मिळवल्या जात आहे
नासाच्या CHAPEA ह्या अभिनव ऊपक्रमा अंतर्गत पहिल्या टप्प्यात सहभागी निवडक चार धाडसी उमेदवाराचा एक गृप तयार करण्यात आला असे तीन गृप निवडण्यात आले त्यातील प्रत्येक गृपमधील चार प्रतिनिधी भविष्यकालीन मंगळ मोहिमेतील अंतराळविरांचे प्रतिनिधी म्हणून ह्या मोहिमेत सहभागी झाले आहेत पहिल्या गृप मधील चार निवडक उमेदवार नासा संस्थेतील शास्त्रज्ञ निर्मित कृत्रीम मंगळभुमीतील Mars Dune Alpha ह्या निवासस्थानी एक वर्षासाठी रहायला गेले आहेत ह्या Mars Dune Alpha मध्ये हे ऊमेदवार 1,700 sq ft जागेतील 3DPrinted खोलीत वास्तव्य करत असुन प्रत्येकाची स्वतंत्र खोली आहे आता पहिल्या गृपमधील ऊमेदवारांनी ह्या मोहीमेतील वास्तव्याचे अर्ध्याहून अधिक दिवस पुर्ण केले आहेत दुसऱ्या गृपमधील प्रतिनिधी 2025 च्या वसंत ऋतूत ह्या Mars Dune Alpha मध्ये रहायला जाणार आहेत ह्या वास्तव्या दरम्यान त्यांना पृथ्वीवरील नागरिकांपासून त्यांच्या कुटुंबीयांपासून लांब ह्या भुमीत बंदिस्त करण्यात आले असून फक्त हे प्रतिनिधी नासा प्रमुखांच्या संपर्कात आहेत
आता पुन्हा नासा संस्थेने CHAPEA-2 ह्या अभिनव ऊपक्रमा अंतर्गत ह्या मोहिमेत सहभागी होण्याची संधी धाडसी उमेदवारांसाठी उपलब्ध केली आहे त्या साठी नासा संस्थेच्या काही अटी व नियमांची पूर्तता करणे आवश्यक आहे
ह्या मोहिमेत भाग घेणारा उमेदवार 30-55 ह्या वयोगटातला असावा तो US मधील रहिवासी असावा व त्याला ईंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे ह्या मोहिमेदरम्यान त्याला त्याच्या सहकारी प्रतिनिधी व संस्थेशी ईंग्रजी भाषेत संवाद साधता यावा म्हणून हि अट घालण्यात आली आहे उमेदवाराने Stem Field मधील Medical ,Engineer,Biology,Mathematics,Physics किंवा Computer Science मध्ये Masters किंवा PHD डिग्री मिळविलेली असावी त्याला दोन वर्षांचा Stem Professionalचा
अनुभव असावा शिवाय त्याने Aircraft उड्डाणाच्या Piloting चे प्रशिक्षण
घेतलेले असावे त्याला आकाशातील 1000 तासाचा उड्डाणाचा अनुभव असल्यास
प्राधान्य दिले जाईल तो Test Pilot Program मध्ये सहभागी आणि चार वर्षांचा अनुभवी असणे देखील आवश्यक आहे Military Officer Training घेतलेल्या
किंवा stem मधील Bachelor Science पदवीधर उमेदवारास प्रथम प्राधान्य दिले जाईल
ह्या निवडक ऊमेदवारांना CHAPEA-2 मोहिमेत सहभागी झाल्यानंतर Mars Dune Alpha मधील एक वर्षाच्या निवासादरम्यान त्यांना त्यांच्या कुटुंबियांपासून दूर पृथ्वीपासून दूर Mars Dune Alpha मध्ये बंदिस्त जागेत राहावे लागेल त्यांना त्यांच्या कुटुंबियांसोबत संवाद किंवा संपर्क करता येणार नाही त्यांचा फक्त नासा संस्थेशी संपर्क राहील
ह्या निवासादरम्यान ऊमेदवारांना मंगळग्रहावरील वातावरणात रहाण्यासाठी आवश्यक ट्रेनिंग देण्यात येईल मंगळ ग्रह पृथ्वीपासुन दुर असल्यामुळे अंतराळविरांना तेथून पृथ्वीवर संपर्क साधताना अडचण आली किंवा काही समस्या उद्भवल्यास त्यांना त्वरीत मदत पाठवता येणार नाही त्यामुळे अशा आपद्कालीन समस्येवर मात करून पुढे मार्गक्रमण करता येण्यासाठी विशेष ट्रेनिंग देण्यात येईल,शीवाय तेथील वातावरणातील बदलामुळे येणारा मानसिक ताण किंवा ऊपकरणात समस्या निर्माण झाल्यावर कुशलतेने परस्थिती हाताळून समस्येचे निवारण कसे करता येईल हेही शिकवले जाईल ऊमेदवारांना अंतराळविरांसारखे झीरो ग्रव्हिटित रहाण्याचे ट्रेनिंग,Space Walk, Robotic operations,आणी सायंटिफिक प्रयोग ह्याचेही प्रशिक्षण देण्यात येईल मंगळ ग्रह पृथ्वीपासून दूर असल्यामुळे ह्या अंतराळवीरांना पृथ्वीवरून अन्न ,भाजीपाला फळे पाठविताना अडचण येईल,विलंब होईल म्हणून ह्या अंतराळवीरांना स्वत:साठी लागणारे अन्न पिकवता यावे म्हणून रोप लागवड आणि त्यांच्या निरोगी आयुष्यसाठी व्यायामाचे प्रशिक्षण देण्यात येईल
सध्या Mars Dune Alpha मध्ये वास्तव्यास असणाऱ्या पहिल्या गृप मधील भविष्यकालीन मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांच्या प्रतिनिधींना ह्या सर्वाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे ह्या मोहिमेतील प्रतिनिधींनी ह्या अर्ध्या वर्षात अनेक सायंटिफिक प्रयोग करुन हि मोहीम यशस्वी केली आहे त्यांच्या ह्या वास्तव्यादरम्यान त्यांनी संशोधीत माहिती त्यांचे फोटो व व्हिडिओ देखील नासा संस्थेत पाठवले आहेत ह्या प्रतिनिधींच्या Mars Dune Alpha मधील वास्तव्यादरम्यान संशोधित केलेल्या माहितीचा उपयोग भविष्यकालीन मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांसाठी होईल ह्या कृत्रिम मंगळभूमीतील झिरो ग्रॅव्हीटीतील वास्तव्यात अंतराळवीरांच्या तब्येतीवर होणाऱ्या विपरीत परिणामावर उपयुक्त औषधें शोधण्यात येणार आहे
ज्यांना ह्या मोहिमेत सहभागी होऊन नासाच्या पृथ्वीवरील शास्त्रज्ञ निर्मित कृत्रिम मंगळ भूमीत वास्तव्य करावयाचे आहे त्यांनी 2 एप्रिल पर्यंत नासा संस्थेशी संपर्क साधावा
No comments:
Post a Comment