Friday 29 March 2024

Jasmine Moghbeli ह्यांनी कुटुंबियांसोबत नवरोज सण साजरा केला

 Image

अंतराळवीर Jasmin Moghbeli ह्यांनी नवरोज साठी स्थानकात नेलेले Haftseen चे साहित्य -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -21 मार्च 

पारसी लोक वर्षातून दोनदा नववर्ष म्हणजे नवरोज सण साजरा करतात ऑगस्टमध्ये आणि मार्चमध्ये मार्च महिन्यात वसंत ऋतूचे आगमन होताच नवरोज साजरा करतात ह्या वर्षी वीस तारखेला सर्वत्र हा सण साजरा करण्यात आला मागच्या आठवड्यात अंतराळ स्थानकातील सहा महिन्यांचे वास्तव्य संपवून पृथ्वीवर परतलेल्या अंतराळवीर Jasmin Moghbeli ह्यांनी देखील आपल्या कुटुंबियांसोबत नवरोज साजरा केला 

Image

 अंतराळवीर Jasmin Moghbeli पती आणि मुलांसोबत नवरोज साजरा करताना -फोटो -नासा संस्था

नवरोज हा फारसी सण आहे त्याची सुरवात जमशेदजी नवरोज ह्यांनी केली शिवाय पारंपारिक रिवाजानुसारही हा सण साजरा केल्या जातो नवरोज सणाच्या दिवशी घराची साफसफाई केल्या जाते घर फुलांनी सजविल्या जाते वेगवेगळे पदार्थ केल्या जातात नवीन कपडे परिधान करून नागरिक पारसी मंदिरात जाऊन देवाचे दर्शन करतात  नवीन वर्ष सुखाचे,समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो म्हणून देवाजवळ प्रार्थना करतात एकमेकांना शुभेच्छा देतात घरी नातेवाईक आणि मित्रांना फराळासाठी,जेवणासाठी बोलावतात त्यांचे गुलाबपाणी अंगावर सिंपडून स्वागत केल्या जाते घरात पारंपारिक पद्धतीने एका टेबलावर सजावट केली जाते त्या मध्ये प्रतीकात्मक रूपात सात वस्तूंचा समावेश असतो आरसा,शिक्के ,सफरचंद,सिरका,लसूण,जामून आणि एका पॉट मध्ये पेरलेले अंकुरित गहू ह्यांचा त्यात समावेश असतो ह्या सर्व वस्तू सूर्योदय,नवीन दिवसाचे भरभराटीचे,आरोग्यदायी आणि सौभाग्याचे प्रतीक म्हणून आरशापुढे ठेवून पूजा केली जाते प्रार्थना केली जाते 

Image

नवरोज सणानिमित्य पारंपारिक विधीसाठी सजविलेल्या प्रतीकात्मक रूपातील Haftseen च्या वस्तू -फोटो -नासा संस्था

नासाच्या अंतराळ मोहीम 70ची अंतराळवीर Jasmine Moghbeli अंतराळ स्थानकातील 199 दिवसांचे वास्तव्य  संपवून 11मार्चला पृथ्वीवर परतल्या आहेत त्यांनी ह्या वर्षीचा नवरोज सण आपल्या कुटुंबीयांसोबत साजरा केला आहे आणि त्यांचे फोटो सोशल मीडियावरून त्यांच्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत अंतराळस्थानकातील वास्तव्यादरम्यान अंतराळवीरांनी स्थानकात नववर्ष साजरे केले होते आणि पृथ्वीवासीयांना शुभेच्छा दिल्या होत्या तेव्हा लाईव्ह संवाद साधताना अंतराळवीर Jasmin Moghbeli ह्यांनी नवरोज सणा बद्दल माहिती सांगितली होती 

त्या म्हणतात," मला वाटले नव्हते की मी ह्या वर्षी माझ्या कुटुंबियांसोबत हा सण साजरा करू शकेन त्या मुळे ह्या सणासाठी लागणारे सर्व साहित्य (Haftseen ) मी माझ्यासोबत स्थानकात नेले होते अंतराळातील फिरत्या अंतराळ स्थानकातील घरात वास्तव्यादरम्यान हा सण साजरा करण्याचा क्षण युनीक होता पण मी आता परतले आहे आणी माझ्या पती आणी मुलांसोबत आनंदाने हा सण साजरा करतेय 

                                                 तुम्हा सर्वांना Happy Nowruz!

 

Tuesday 26 March 2024

नासाच्या Soyuz मोहिमेतील अंतराळवीर Tracy Dyson रशियन अंतराळवीर Oleg Novitskiy आणि Marina Vasilevskaya अंतराळस्थानकात पोहोचले

  The Soyuz MS-25 crew joins the Expedition 70 crew aboard the International Space Station. Credit: NASA TV

 नासाच्या Soyuz-MS-25 अंतराळ मोहिमेतील नासाची अंतराळवीर Tracy Dyson रशियन अंतराळवीर Oleg Novitskiyआणि Belarus ची Spaceflight Participant- Marina Vasilevskaya स्थानकात पोहोचल्यानंतर Welcome Ceremony दरम्यान लाईव्ह संवाद साधताना -फोटो -नासा संस्था 

 नासा संस्था -26 मार्च

नासाच्या Soyuz मोहिमेतील अंतराळवीर Tracy Dyson रशियन अंतराळवीर Oleg Novitskiy आणि Belarus Spaceflight Participant Marina Vasilevskaya अंतराळस्थानकात पोहोचलेआहेत 23 मार्चला कझाकस्थानातील बैकोनूर ह्या उड्डाण स्थळावरून सोयूझ MS-25 अंतराळ यान 8.36 a.m.( 5.36 p.m स्थानिक वेळ ) वाजता ह्या तीनही अंतराळवीरांसह स्थानकाच्या दिशेने अंतराळात मार्गस्थ झाले 

निघण्याआधी ह्या अंतराळवीरांची उड्डाणपूर्व आवश्यक प्रक्रिया पार पडली त्यांचे Health आणि Space suit चेकअप करण्यात आले त्या नंतर त्यांना उड्डाणस्थळी नेण्यात आले ह्या अंतराळवीरांना निरोप देण्यासाठी त्यांचे नातेवाईक ,मित्र आणि सहकारी अंतराळवीर तेथे आले होते काही वेळातच अंतराळवीरांसह सोयूझ यान रॉकेटच्या साहाय्याने  अंतराळ स्थानकात जाण्यासाठी अंतराळात झेपावले

दोन दिवसांच्या अंतराळ प्रवासानंतर  सोयूझ यान सोमवारी 25 मार्चला 11.03a.m.ला स्थानकाच्या Prichal module जवळ पोहोचले  दोन तासांनी 1.26p.m.वाजता स्थानक आणि सोयूझ यानातील Hatching आणि Docking प्रक्रिया पार पडली त्या नंतर ह्या तीनही अंतराळवीरांनी स्थानकात प्रवेश केला स्थानकात सध्या वास्तव्यास असलेल्या अंतराळवीरांनी ह्या अंतराळवीरांचे स्थानकात स्वागत केले काही वेळाने नासा संस्थेतील ह्या मोहिमेतील तिन्ही देशातील संस्था प्रमुखांनी अंतराळवीरांशी लाईव्ह संपर्क साधत त्यांचे स्थानकात सुरक्षित पोहोचल्याबद्दल अभिनंदन करून त्यांचे स्वागत केले आणि Welcome Ceremony पार पडला तेव्हा ह्या अंतराळवीरांचे नातेवाईक नासा संस्थेत उपस्थित होते अंतराळवीरांनी त्या वेळेस त्यांचे मनोगत व्यक्त केले 

नासाच्या Huston येथील संस्था प्रमुखांनी ह्या तीनही अंतराळवीरांशी संवाद साधला ",तुमचे स्थानकात स्वागत आणि  सुरक्षित अंतराळप्रवासाबद्दल अभिनंदन ! तुमच्या धैर्याचे कौतुक आहे कारण हा प्रवास अवघड होता  अंतराळवीर Oleg Novitskiy तुमचे ह्या दुसऱ्या घरी स्वागत ! चवथ्यांदा तुम्ही स्थानकात वास्तव्यास आला आहात तुम्हा सर्वांचे आनंदी चेहरे पाहून आम्हालाही आनंद होत आहे Tracy Dyson तुम्हिही तिसऱ्यांदा स्थानकात वास्तव्यास आला आहात तुम्हा दोघांना पाहून अनेकजण प्रेरित झाले आहेत तुमचे अथक परिश्रम आणि कामाप्रतीची निष्ठा पाहून आम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना अभिमान वाटतोय हि वाट कठीण आहे पण तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने ती साध्य केली आणि Marina Belarus तर्फे स्वागत ! तुमचा हा  पहिलाच अंतराळ प्रवास होता इथे तुमचे कुटुंबीय आले आहेत त्यांना तुमच्या अंतराळ प्रवासा बद्दल जाणून घ्यायचे आहे ते स्क्रीनवर तुम्हाला पाहात आहेत

Marina -Thanks !इथे आम्ही सुरक्षित पोहोचलो आहोत तुम्हा सर्वांच्या सपोर्ट मुळे इथे येण्याची हि संधी मिळाली त्या साठी संस्थेतील सर्वांचे Belarus चे आम्हाला सपोर्ट करणाऱ्या ट्रेनिंग देणाऱ्या ह्या मोहिमेतील सर्वांचे आभार इथे यायला दोन दिवस लागले पण प्रवास अनोखा होता मला इथे येण्यासाठीच्या सर्व प्रक्रिया आवडल्या आता आम्ही स्टार पर्यंत पोहोचलो आहोत हा अनुभव अविस्मरणीय आहे आम्हाला मदत करणाऱ्या नासा संस्थेतील सहभागी सर्वांचे आभार 

Tracy Dyson -मला तुम्हाला सर्वांना पाहून आनंद झालाय तुम्ही आमच कौतुक केलं त्या बद्दल आभार पण त्या साठी तुम्हा सर्वांनी आम्हाला मार्गदर्शन केल आम्हाला ट्रेनिंग देणाऱ्या,इथे येण्याची संधी देणाऱ्या ह्या मोहिमेतील सर्वांचे नासा संस्थेतील सहभागी सर्वांचे आभार! इथे पोहोचायला वीस तास लागले तरीही आम्ही बोअर झालो नाही आम्ही एकमेकांना ओळखत असल्यामुळे माझे सहकारी अंतराळवीर चांगले असल्यामुळे आणि तुम्ही दिलेल्या सपोर्ट मुळे आमचा प्रवास चांगला झाला तुम्हा सर्वांचे आभार! अंतराळवीर Oleg ह्यांनी देखील अशीच प्रतिक्रिया व्यक्त केली आणि  सर्वांचे आभार मानले त्या नंतर संस्था प्रमुखांनी सर्वांना स्थानकातील वास्तव्यासाठी शुभेच्छा दिल्या !"

आता हे सर्व दहाही अंतराळवीर स्थानकात एकत्रित वास्तव्य करतील आणि हे तिन्ही अंतराळवीर अंतराळ मोहीम 70-71 अंतर्गत तेथे सुरु असलेल्या संशोधनात सहभागी होतील अंतराळवीर Dyson सहा महिने स्थानकात वास्तव्य करणार आहेत आणि सहा महिन्यांनी सप्टेंबर मध्ये पृथ्वीवर परतणार आहेत अंतराळवीर Oleg Novitskiy आणि अंतराळवीर Marina बारा दिवस स्थानकात वास्तव्य करतील आणि सहा एप्रिलला अंतराळवीर Loral O Hara सोबत सोयूझ MS -24 अंतराळयानातून पृथ्वीवर परततील

Wednesday 13 March 2024

नासाच्या Space X Crew -7 चे चारही अंतराळवीर पृथ्वीवर परतले

 The SpaceX Dragon Endurance spacecraft is seen as it splashes down in the Gulf of Mexico off the coast of Pensacola, Florida, at 5:47 a.m. EDT, returning Crew-7 to Earth.

 Space X -Crew -Dragon अंतराळवीरांसह  पृथ्वीवर पोहोचल्यानंतर फ्लोरिडा मधील Pensacola येथील समुद्राच्या खाडीत खाली उतरताना -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -13 मार्च

नासाच्या अंतराळ मोहिमेअंतर्गत अंतराळ स्थानकात गेलेले Space X Crew -7 चे अंतराळवीर Jasmin Moghbeli युरोपियन अंतराळवीर Andreas Mogensen जपानचे अंतराळवीर Satoshi Furukawa आणि रशियन अंतराळवीर Konstantin Borisov  त्यांच्या स्थानकातील 199 दिवसांच्या वास्तव्यानंतर पृथ्वीवर परतले आहेत ह्या चारही अंतराळवीरांसह Space X Crew Dragon Endurance सोमवारी 11 मार्चला सकाळी 11.20 मिनिटांनी पृथ्वीवर परतण्यासाठी स्थानकाबाहेर पडले आणि 12 मार्चला 5.47a.m ला फ्लोरिडा मधील Pensacola येथील समुद्राच्या खाडीत पॅराशूटच्या साहाय्याने खाली उतरले पृथ्वीवर परतण्यासाठी निघण्याआधी स्थानकात ह्या आंतराळवीरांचा Farewell Ceremony व Change The Commander Ceremony पार पडला त्या वेळी नासाच्या Huston येथील संस्थेने त्यांच्याशी लाईव्ह संपर्क साधला ह्या लाईव्ह संवादात अंतराळवीरांनी नासा संस्थेचे आभार मानत त्यांचे मनोगत व्यक्त केले  

Space X Crew -7चे अंतराळवीर स्थानकातील Farewell Ceremony दरम्यान नासा संस्थेशी लाईव्ह संवाद साधताना -फोटो -नासा संस्था

Jasmin Moghbeli - "अंतराळवीर होण्याच,स्थानकातील झिरो ग्रॅव्हीटीत राहुन संशोधन करण्याच स्वप्न मी लहानपणापासून पाहिल होत खरतर माझ्यासाठी ते धैर्याच काम होत पण मी माझ्या अपेक्षा पूर्ण करू शकेन कि नाही मी इथे राहू शकेन का ह्या बद्दल मनात साशंकता होती पण मी अंतराळवीर झाले नासा संस्थेत माझी निवड झाली आणि नासा आणि Space X संस्थेच्या पार्टनरशिप मुळे मला माझे स्वप्न सत्यात उतरवण्याची संधी मिळाली अंतराळातील झिरो ग्रॅव्हीटीत फिरते स्थानक बनविणाऱ्याच कर्तृत्व असामान्य आहे इथे वेगवेगळ्या देशातील अंतराळवीरांसोबत राहून संशोधन करतानाचा अनुभव खूप सुंदर होता आधी माझं हे स्वप्न होत पण प्रत्यक्षात मी इथे आले स्थानकात सहा महिने राहून संशोधन केल आणि ह्या मोहिमेत सहभागी झाले नासाने मला हि अमूल्य संधी दिली हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे  Loral ,Alec तुमच्या आणि सहकारी अंतराळवीरांसोबतचा काळ मजेत गेला आता पुन्हा तुम्ही पृथ्वीवर परतल्यावर भेटू Space X -8 च्या अंतराळवीरांसोबत खूप कमी वेळ राहायला मिळाल तरीही त्यांच्या सोबतचा वेळ आनंदात गेला आता स्थानक सोडताना वाईट वाटतय मला नासा ,Space X संस्था आणि मोहिमेतील सहभागी टीम मधील सर्वांचे आभार मानावयाचे आहेत त्यांच्या मुळे आम्ही इथे राहू शकलो त्यांनी वेळोवेळी आम्हाला संशोधनात मार्गदर्शन केल आणि माझी फॅमिली,मित्र सर्वांनाच आमची काळजी होती आता आम्ही परतत आहोत तुम्हा सर्वांचे आभार !"

अंतराळवीर Satoshi - "मला पण नासा संस्था ,Space X आणि सहभागी सर्व संस्थांचे ,माझ्या सहकारी अंतराळवीरांचे आभार मानावयाचे आहेत ज्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केल ह्या सर्वांसोबतचा साडेसहा महिन्यांचा काळ खूप लवकर गेला असं वाटतय आम्ही आताआता तर इथे आलोय ! आता इथे crew -8 मोहिमेतील अंतरराळवीर आले आहेत त्यांच्या सोबतचा अल्पकाळ मजेत गेला !"

अंतराळवीर Konstantin - "खरच ह्या वेळी मी सुखदुःखाचे क्षण अनुभवतोय सहा महिन्यांचा काळ खूप लवकर संपला पण आम्ही येण्याआधी ठरवल्या प्रमाणे स्थानकातील सायंटिफिक प्रयोग संशोधन आणि इतर कामे पूर्ण केली आहेत आता हि मोहीम संपणार ह्या टीममधील अंतराळवीर ग्रेट होते नासा संस्थेतील सर्वांचे आभार "

अंतराळवीर Andreas -"आता स्थानक सोडण्याचा क्षण आहे आणि सहा महिन्यांपूर्वी स्थानकात येण्याचा फ्लोरिडातील उड्डाण स्थळावरून उड्डाण करतानाचा आम्हाला निरोप देण्यासाठी आमचे कुटुंबीय मित्र जमले होते तेव्हाचा क्षण आठवला सहा महिने खूप लवकर संपले ह्याची जाणीव होतेय हा क्षण सुखदुःखाचा आहे पृथ्वीवर परतण्याचा आमच्या कुटुंबियांना भेटण्याचा आनंद आणि इथल्या सहकारी अंतराळवीरांना सोडून जाण्याच दुःख इथे आम्ही संशोधन केल Space walk  केले स्थानकात आलेल्या कार्गोशिपच,अंतराळवीरांच स्वागत केल हे सारच खूप असामान्य होत आम्हालाहि संधी दिल्याबद्दल आभार !" 

त्या नंतर Change The Commander Ceremony पार पडला आणि अंतराळवीर Andreas ह्यांनी स्थानकाची सूत्रे अंतराळवीर Alexander Grebenkin ह्यांच्या हाती सोपविली  

Space X Crew Dragon समुद्राच्या खाडीत खाली उतरताच नासाची Recovery Vessel तेथे पोहोचली Recovery टीमने Dragon ला Recovery Boat पर्यंत आणले त्या नंतर Dragon आणि Recovery Boat ह्यांच्यातील hatching ,docking प्रक्रिया पार पडली Dragon चे दार उघडल्यानंतर नासाच्या Recovery टीम मधील डॉक्टर्स आत गेले आणि त्यांनी ह्या अंतराळवीरांचे प्राथमिक चेकअप केले त्या नंतर अंतराळवीरांना Dragon मधून बाहेर काढण्यात आले ह्या अंतराळवीरांना नंतर नासाच्या विमानाने Johnson Space Center मध्ये पोहोचविण्यात आले तेथून त्यांना  त्यांच्या गावी पाठविण्यात येईल 

Tuesday 5 March 2024

नासाच्या अंतराळ मोहीम Space X Crew 8 चेअंतराळवीर स्थानकात पोहोचले

 The four SpaceX Crew-8 members (front row) join the Expedition 70 crew (back row) for welcome remarks shortly after docking and entering the space station. Credit: NASA TV

 नासाच्या Space X Crew -8चे अंतराळवीर स्थानकात पोहोचल्यानंतर स्थानकातील सर्व अकरा अंतराळवीर Welcome Ceremony दरम्यान लाईव्ह संवाद साधताना -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -5 मार्च 

नासाच्या Space X Crew-8  अंतराळ मोहिमे अंतर्गत नासाचे अंतराळवीर Mathew Dominick ,Micheal Barratt,Jeanette Epps आणि रशियन अंतराळवीर Alexander Grebenkin हे चारजण सहा महिन्यांच्या स्थानकातील वास्तव्यासाठी अंतराळात गेले आहेत हवामान उड्डाणासाठी प्रतिकूल असल्यामुळे ह्या अंतराळवीरांचे स्थानकात जाण्यासाठीचे उड्डाण लांबले होते

अंतराळवीर Mathew Dominik हे पहिल्यांदाच स्थानकात राहायला गेले असून त्यांचा हा पहिलाच अंतराळ प्रवास आहे 2017 मध्ये नासा संस्थेत त्यांची अंतराळवीर म्हणून निवड झाली ह्या मोहिमेत ते मिशन स्पेशॅलिस्ट पद सांभाळतील 

अंतराळवीर Micheal Barratt हे तिसऱ्यांदा स्थानकात राहायला गेले आहेत 2009 मध्ये मोहीम 19-20अंतर्गत स्थानकात राहायला गेले होते त्या वेळी त्यांनी दोनवेळा स्थानकाच्या कामासाठी Space Walk केला होता 2011मध्ये S.TS -133अंतर्गत स्थानकात राहायला गेले होते त्यांनी त्यांच्या मोहिमेदरम्यान स्थानकात 212 दिवस वास्तव्य केले आहे ते 70-71 मोहिमेत मिशन स्पेशॅलिस्ट म्हणून काम पाहतील 

अंतराळवीर Jeanette Epps ह्यांचा पण हा पहिलाच अंतराळ प्रवास होता त्या पहिल्यांदाच स्थानकात राहायला गेल्या आहेत 2009मध्ये नासा संस्थेत त्यांची निवड झाली ह्या मोहिमेत त्या कमांडर व पायलटपदी कार्यरत होत्या ह्या मोहीमेत त्या Flight Engineer पद सांभाळतील

रशियन अंतराळवीर Alexander Gerbenkin हे देखील पहिल्यांदाच स्थानकात राहायला गेले आहेत ह्या मोहिमेत ते Flight Engineer पद सांभाळतील

The crew of NASA’s SpaceX Crew-8 mission to the International Space Station poses for a photo during their Crew Equipment Interface Test at NASA’s Kennedy Space Center in Florida. Credit: SpaceX

Space X Crew -8चे अंतराळवीर स्थानकात जाण्याच्या तयारीत -फोटो नासा संस्था

रविवारी नासाच्या Florida येथील Kennedy  Space Center येथील उड्डाण स्थळावरून हे चारही अंतराळवीर Space X Crew Dragon मधून स्थानकात जाण्यासाठी अंतराळ प्रवासास निघाले  निघण्याआधी ह्या अंतराळवीरांचे आवश्यक चेकअप पार पडले रविवारी 3 मार्चला 10.53 p.m. (EST) वाजता Space X Crew Dragon Endeavour Falcon 9 रॉकेटच्या साहाय्याने स्थानकात जाण्यासाठी ह्या चार अंतराळवीरांसह अंतराळात झेपावले आणि मंगळवारी 5 मार्चला 2.30 a.m.ला स्थानकाजवळ पोहोचले अंतराळ प्रवासादरम्यान हे अंतराळवीर नासा संस्थेच्या लाईव्ह संपर्कात होते नासाच्या ह्या मोहिमेतील टीम प्रमुखांच्या मार्गदर्शनात ह्या अंतराळवीरांनी Space X Crew Dragon मधील स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित केली आणि आवश्यक प्रक्रिया पार पाडत मार्गक्रमण केले 

Space X Dragon Endeavour स्थानकाजवळ पोहोचल्यानंतर काही वेळातच Dragon मधील स्वयंचलित यंत्रणेने स्थानक आणि Dragon ह्यांच्यातील Hatching आणि Docking प्रक्रिया पार पडली त्या नंतर ह्या अंतराळवीरांनी स्थानकात प्रवेश केला स्थानकात सध्या राहात असलेल्या मोहीम 70च्या अंतराळवीरांनी ह्या अंतराळवीरांचे स्थानकात स्वागत केले 

काही वेळातच ह्या अंतराळवीरांचा Welcome Ceremony पार पडला मोहीम 70चे कमांडर Anndy ह्यांनी ह्या अंतराळवीरांचे स्थानकात स्वागत केले तेव्हा लाईव्ह संवादादरम्यान साऱ्यांनीच अंतराळप्रवास चांगला झाल्याचे सांगत Space X आणि नासा संस्थेचे आभार मानत त्यांच्यामुळे आम्हाला हि अंतराळ प्रवास करण्याची स्थानकात राहण्याची संधी मिळाल्याचे सांगितले हा प्रवास Exiting होता अविस्मरणीय होता त्या साठी सर्वांचे आभार आमच्या कुटुंबियांचेही आभार त्यांच्या सपोर्ट मुळेच आम्ही इथे पोहोचलो आहोत आम्ही सुखरूप पोहोचलो आहोत असे सांगितले ह्या कार्यक्रमासाठी स्थानकातील सर्वही अकरा अंतराळवीर एकत्र जमले होते 

आता स्थानकात अकरा अंतराळवीर एकत्र वास्तव्य करतील आणि हे चारही अंतराळवीर स्थानकात  सुरु असलेल्या संशोधनात सहभागी होतील

Friday 1 March 2024

नासाच्या पृथ्वीवरील शास्त्रज्ञ निर्मित मंगळभुमीत रहाण्याची धाडसी नागरिकांना संधी



    नासाच्या CHAPEA -1 मंगळ मोहिमेतील सहभागी धाडसी प्रतिनिधी -फोटो नासा सस्था

नासा संस्था - 1 मार्च 

नासाच्या CHAPEA मोहीमे अंतर्गत Florida येथील नासा संस्थेतील J.PL Lab मध्ये शास्त्रज्ञांनी मंगळासारखे वातावरण निर्मिती करुन कृत्रीम मंगळभुमी निर्माण केली आहे भविष्यकालीन मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांच्या मंगळनिवासाठी आणी त्या नंतरच्या मानवी वास्तव्यासाठी ह्या शास्त्रज्ञ निर्मित कृत्रिम मंगळभुमीत वास्तव्य केल्यानंतर मानवी आरोग्यावर काय विपरीत परिणाम होतात ह्या विषयी संशोधीत माहिती  मिळवल्या जात आहे 

नासाच्या CHAPEA ह्या अभिनव ऊपक्रमा अंतर्गत पहिल्या टप्प्यात सहभागी निवडक चार धाडसी उमेदवाराचा  एक गृप तयार करण्यात आला असे तीन गृप निवडण्यात आले त्यातील प्रत्येक गृपमधील चार प्रतिनिधी भविष्यकालीन मंगळ मोहिमेतील अंतराळविरांचे प्रतिनिधी म्हणून ह्या मोहिमेत सहभागी झाले आहेत पहिल्या गृप मधील चार निवडक उमेदवार नासा संस्थेतील शास्त्रज्ञ निर्मित कृत्रीम मंगळभुमीतील Mars Dune Alpha ह्या निवासस्थानी एक वर्षासाठी रहायला गेले आहेत ह्या Mars Dune Alpha मध्ये हे ऊमेदवार 1,700 sq ft जागेतील 3DPrinted खोलीत वास्तव्य करत असुन प्रत्येकाची स्वतंत्र खोली आहे आता पहिल्या गृपमधील ऊमेदवारांनी ह्या मोहीमेतील वास्तव्याचे अर्ध्याहून अधिक दिवस पुर्ण केले आहेत दुसऱ्या गृपमधील प्रतिनिधी 2025 च्या वसंत ऋतूत ह्या Mars Dune Alpha मध्ये रहायला जाणार आहेत ह्या वास्तव्या दरम्यान त्यांना पृथ्वीवरील नागरिकांपासून त्यांच्या कुटुंबीयांपासून लांब ह्या भुमीत बंदिस्त करण्यात आले असून फक्त हे प्रतिनिधी नासा प्रमुखांच्या संपर्कात आहेत 

आता पुन्हा नासा संस्थेने CHAPEA-2 ह्या अभिनव ऊपक्रमा अंतर्गत ह्या मोहिमेत सहभागी होण्याची संधी धाडसी उमेदवारांसाठी उपलब्ध केली आहे त्या साठी नासा संस्थेच्या काही अटी व नियमांची पूर्तता करणे आवश्यक आहे

ह्या मोहिमेत भाग घेणारा उमेदवार 30-55 ह्या वयोगटातला असावा तो US मधील रहिवासी असावा व त्याला ईंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे ह्या मोहिमेदरम्यान त्याला त्याच्या सहकारी प्रतिनिधी व संस्थेशी ईंग्रजी भाषेत संवाद साधता यावा म्हणून हि अट घालण्यात आली आहे उमेदवाराने Stem Field मधील Medical ,Engineer,Biology,Mathematics,Physics किंवा Computer Science मध्ये Masters किंवा PHD डिग्री मिळविलेली असावी त्याला दोन वर्षांचा Stem Professionalचा अनुभव असावा शिवाय त्याने Aircraft उड्डाणाच्या  Piloting चे प्रशिक्षण घेतलेले असावे त्याला आकाशातील 1000 तासाचा उड्डाणाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल तो Test Pilot Program मध्ये सहभागी आणि चार वर्षांचा अनुभवी असणे देखील आवश्यक आहे Military Officer Training घेतलेल्या किंवा stem मधील Bachelor Science पदवीधर उमेदवारास प्रथम प्राधान्य दिले जाईल ह्या निवडक ऊमेदवारांना CHAPEA-2 मोहिमेत सहभागी झाल्यानंतर Mars Dune Alpha मधील एक वर्षाच्या निवासादरम्यान त्यांना त्यांच्या कुटुंबियांपासून दूर पृथ्वीपासून दूर Mars Dune Alpha मध्ये बंदिस्त जागेत राहावे लागेल त्यांना त्यांच्या कुटुंबियांसोबत संवाद किंवा संपर्क करता येणार नाही त्यांचा फक्त नासा संस्थेशी संपर्क राहील

ह्या निवासादरम्यान ऊमेदवारांना मंगळग्रहावरील वातावरणात रहाण्यासाठी आवश्यक ट्रेनिंग देण्यात येईल मंगळ ग्रह पृथ्वीपासुन दुर असल्यामुळे अंतराळविरांना तेथून पृथ्वीवर संपर्क साधताना अडचण आली किंवा काही समस्या उद्भवल्यास त्यांना त्वरीत मदत पाठवता येणार नाही त्यामुळे अशा आपद्कालीन समस्येवर मात करून पुढे मार्गक्रमण करता येण्यासाठी विशेष ट्रेनिंग देण्यात येईल,शीवाय तेथील वातावरणातील बदलामुळे येणारा मानसिक ताण किंवा ऊपकरणात समस्या निर्माण झाल्यावर कुशलतेने परस्थिती हाताळून समस्येचे निवारण कसे करता येईल हेही शिकवले जाईल ऊमेदवारांना अंतराळविरांसारखे झीरो ग्रव्हिटित रहाण्याचे ट्रेनिंग,Space Walk, Robotic operations,आणी सायंटिफिक प्रयोग ह्याचेही प्रशिक्षण देण्यात येईल मंगळ ग्रह पृथ्वीपासून दूर असल्यामुळे ह्या अंतराळवीरांना पृथ्वीवरून अन्न ,भाजीपाला फळे पाठविताना अडचण येईल,विलंब होईल म्हणून ह्या अंतराळवीरांना स्वत:साठी लागणारे अन्न पिकवता यावे म्हणून रोप लागवड आणि त्यांच्या निरोगी आयुष्यसाठी व्यायामाचे प्रशिक्षण देण्यात येईल 

सध्या Mars Dune Alpha मध्ये वास्तव्यास असणाऱ्या पहिल्या गृप मधील भविष्यकालीन मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांच्या प्रतिनिधींना ह्या सर्वाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे ह्या मोहिमेतील प्रतिनिधींनी ह्या अर्ध्या वर्षात अनेक सायंटिफिक प्रयोग करुन हि मोहीम यशस्वी केली आहे त्यांच्या ह्या वास्तव्यादरम्यान त्यांनी संशोधीत माहिती त्यांचे फोटो व व्हिडिओ देखील नासा संस्थेत पाठवले आहेत ह्या प्रतिनिधींच्या Mars Dune Alpha मधील वास्तव्यादरम्यान संशोधित केलेल्या माहितीचा उपयोग भविष्यकालीन मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांसाठी होईल ह्या कृत्रिम मंगळभूमीतील  झिरो ग्रॅव्हीटीतील वास्तव्यात अंतराळवीरांच्या तब्येतीवर होणाऱ्या विपरीत परिणामावर उपयुक्त औषधें शोधण्यात येणार आहे

ज्यांना ह्या मोहिमेत सहभागी होऊन नासाच्या पृथ्वीवरील शास्त्रज्ञ निर्मित कृत्रिम मंगळ भूमीत वास्तव्य करावयाचे आहे त्यांनी 2 एप्रिल पर्यंत नासा संस्थेशी संपर्क साधावा