Sunday 25 February 2024

Collins Aerospace Co.ने अंतराळवीरांसाठी तयार केलेल्या स्पेससूटची प्राथमिक चाचणी पूर्ण

Collins Aerospace Co. च्या स्पेससूटची Commercial zero gravity Aircraft मध्ये उड्डाणादरम्यान टेस्ट घेताना -फोटो -Collins Aerospace 

नासा संस्था - 12 फेब्रुवारी 

नासा संस्थेचे अंतराळवीर अंतराळ मोहिमेदरम्यान अंतराळ प्रवासात,स्थानकात आणि अंतराळात स्पेस वॉक करताना स्पेससूटचा वापर करतात हे स्पेससूट वेगवेगळ्या प्रकाराचे असतात गेल्या वीस वर्षांपासून अंतराळवीर वापरत असलेले स्पेससूट आता जुने झाले आहेत त्या मुळे नासा संस्थेने भविष्यकालीन अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांच्या वापरासाठी नवीन स्पेससूट बनवण्यासाठी व्यावसायिक कंपनींना संधी दिली होती त्यातून निवड झालेल्या Collins Aerospace कंपनीने तयार केलेल्या स्पेससूटची प्राथमिक चाचणी पूर्ण झाली आहे 

नासा संस्थेने निवड केलेल्या स्पेससूटची प्राथमिक चाचणी Collins कंपनी तर्फे घेण्यात आली अंतराळवीर स्थानकातील वास्तव्यादरम्यान आणि स्पेसवॉक करताना हा स्पेससूट वापरणार आहेत म्हणून हा स्पेससूट अशा वातावरणात वापरण्यायोग्य आहे का आणि अंतराळवीरांच्या सर्व गरजाची पूर्तता करणारा सुरक्षीत आहे का ह्या बाबी तपासण्यासाठी पृथ्वीवरही तसेच वातावरण हवे म्हणून कंपनीने कमर्शियल Zero gravity Aircraft मध्ये उड्डाणादरम्यान 20 सेकंदासाठी झीरो ग्रॅव्हिटी सारखी वातावरण निर्मिती करून पॅराबॉलिक फ्लाईट दरम्यान ह्या स्पेससूटची योग्यता चेक केली त्या साठी अंतराळवीरांनी हा स्पेससूट परिधान केला होता ह्या वातावरण निर्मिती साठी विमानाच्या पायलटने रोलर कोस्टर ट्रीकचा वापर केला ही ट्रीक वापरून पायलट वीस सेकांदासाठी Aircraft मध्ये ऊड्डाणादरम्यान वजनरहित अवस्था निर्माण करु शकतो ह्याचा वापर ट्रेनींग दरम्यान इंजीनीअर्स,शास्त्रज्ञ आणि विध्यार्थ्यांना काही सेकंद अंतराळात न जाताही झीरो ग्रँव्हिटि हार्डवेअर व सायंटिफिक प्रयोग करण्यासाठी केल्या जातो 

ह्या चाचणीच्या यशस्वीतेनंतर आता नासाच्या J.PL संस्थेतील लॅब मध्ये ह्यानंतरची चाचणी घेण्यात येणार आहे लॅबमधील Vacuum Chamber मधील हवा काढुन त्या मध्ये स्थानका सारखे वातावरण निर्मिती करून त्या वातावरणात स्पेससूटच्या परिपूर्णतेची चाचणी घेण्यात येईल त्या नंतर  नासाच्या Florida  येथील J.PLसंस्थेतील Neutral Buoyancy Lab मधील 40 Foot Deep Pool असलेल्या जागेत अंतराळवीर हा स्पेससूट घालून चाचणी घेतील आणी स्पेससुटची योग्यता तपासतील अंतराळवीरांच्या ट्रेनिंग दरम्यान येथे Space Walk केल्या जातो

आवश्यक सर्व चाचण्या नंतर अंतीम निर्णय घेण्यात येईल अंतिम चाचणीत हा स्पेससूट अंतराळवीरांच्या वापरासाठी सर्व दृष्टीने वापरण्या योग्य व सुरक्षित आहे का ?  स्पेसवॉक करताना त्यांना लागणारे सर्व सामान त्यात मावते का त्यांना लागणारा टूलबॉक्स कॅमेरे बॅटरीज चार्जींग सिस्टिम्स आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यातून लिकेज होत नाही ना हे तपासले जाईल शिवाय हा स्पेससूट घालून अंतराळवीरांना  सहजतेने वावरता येते का आणी तो त्यांना फीट बसतो ना ह्या बाबी तपासल्या जातील त्या नंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल अंतिम निर्णयानंतर ह्या स्पेससूटच्या मोट्या प्रमाणात निर्मितीला मान्यता दिल्या जाईल

Friday 23 February 2024

आर्टिमस मोहिमेतील पहिले व्यावसायिक मानव विरहित रोबोटिक Odysseus चांद्रयान चंद्रावर उतरले

 

 Odysseus passes over the near side of the Moon after entering lunar orbit insertion on February 21. Credit: Intuitive Machines

 आर्टिमस मोहीमेतील पहिले व्यावसायिक Odysseus रोबोटिक चांद्रयान चांद्रभूमीवर उतरण्याआधी -फोटो नासा संस्था

 नासा संस्था -23 फेब्रुवारी 

नासाच्या व्यावसायिक अंतराळ मोहिमेअंतर्गत आर्टिमस मोहिमेतील पाहिले व्यावसायिक  Intuitive Machines कंपनीने तयार केलेले रोबोटिक Odysseus चांद्रयान 22 फेब्रुवारीला चांद्रभूमीवर सुरक्षीतपणे खाली उतरले नासाच्या अपोलो मोहिमेनंतर प्रथमच 52 वर्षांनी पाहिले व्यावसायिक रोबोटिक चांद्रयान सुरक्षीत चंद्रभुमीवर उतरले आहे 

15 फेब्रुवारीला नासाच्या Florida येथील स्पेस सेंटर मधील 39 A ह्या ऊड्डाणस्थळावरुन सकाळी 1.05 a.m.(EST)वाजता Odysseus रोबोटिक चांद्रयानाने Space X Falcon 9 Rocket च्या सहाय्याने चंद्रावर जाण्यासाठी आकाशात ऊड्डाण केले आणी सात दिवसांच्या अंतराळप्रवासानंतर चंद्रावर सुखरूप पोहोचले ऊड्डाणानंतर यान राँकेट पासून वेगळे झाल्यानंतर काही वेळातच यानातील स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित झाली आणी यानाने अंतराळप्रवासास सुरुवात केली काही वेळातच Odysseus यानाने 16 तारखेला अंतराळातून पृथ्वीचे अलौकिक सौंदर्य कॅमेराबध्द करत काढलेला फोटो नासा संस्थेत पाठविला 

 A view of Earth captured by a 186-degree wide field of view camera aboard Intuitive Machines’ Nova-C lunar. The start of this image sequence occurred 100 seconds after separation and lasts for two hours. Credit: Intuitive Machines

 Odysseus चांद्रयानाने कार्यान्वित होताच अंतराळ प्रवासादरम्यान काही वेळातच टिपलेले पृथ्वीचे अलौकिक सौन्दर्य -फोटो नासा संस्था 

Odysseus अंतराळयानातील Cryogenic ईंजीनमध्ये प्रथमच Liquid Oxygen आणी Liquid Methane वायुचा वापर करण्यात आला असून ह्या अंतराळ प्रवासादरम्यान यानाने किती प्रमाणात ह्या ईंधनवायुचा वापर केला ह्याची नोंद ठेवण्यात येणार आहे  शिवाय भविष्यकालीन अंतराळमोहिमेतील अंतराळवीरांना तेथे वातावरणात ऊपलब्ध असलेल्या वायूपासून मानवी श्वासोच्छ्वासाठी आवश्यक असलेला Oxygen आणी मानवी निवासासाठी आवश्यक ईंधन निर्मिती करता येईल का ह्या बाबतीतही संशोधन करण्यात येणार आहे Odysseus यानात बारा सायंटिफिक कमर्शियल पेलोड पाठविण्यात आले आहेत त्यातील सहा पेलोड नासा संस्थेचे व सहा कमर्शियल आहेत छोट्या Cubesat च्या आकाराच्या ह्या पेलोडच्या सहाय्याने नासाचे शास्त्रज्ञ चंद्रावरील सायंटिफिक प्रयोग करणार आहेत

 Odysseus यान सात दिवसांच्या अंतराळप्रवासानंतर गुरुवारी 22 फेब्रुवारीला 5.23 p.m.(CST) वाजता सुरक्षीतपणे चंद्राच्या कक्षेतुन खाली चंद्रभुमीवर ऊतरले ऊतरण्याआधी यानाने वेगावर नियंत्रण मिळवत वेग हळूहळू  कमी करत खाली येत सुरक्षितपणे यान खाली ऊतरविले Odysseus यान चंद्रावरील दक्षिण ध्रुवावरील Malaport ह्या भागात ऊतरले आहे हा भाग दक्षिण ध्रुवावरील आसपासच्या डोंगराळ भागाच्या तुलनेत सपाट व सुरक्षित आहे हा भाग पृथ्वीवरुन चंद्राकडे पहाताना मानवाला सहजतेने दिसतो 

नासातील शास्त्रज्ञांनी यान सुरक्षितपणे खाली ऊतरावे म्हणून खबरदारी घेत यानाची चंद्राच्या कक्षेतील एक फेरी वाढविली होती आणी Odysseus यान बनविणाऱ्या टिममधील ईंजीनिअर्स आणी तंत्रज्ञांंनी यान चंद्रावर न आधळता सुरक्षित हळुवारपणे खाली ऊतरावे म्हणून यान बनवितानाच त्यात अत्याधुनिक यंत्रणा बसविली होती त्यामुळे हि मोहीम यशस्वी झाल्याची प्रतिक्रिया Odysseus यानाच्या कंपनी प्रमुखांनी व्यक्त केली हि मोहीम यशस्वी झाल्यमुळे भविष्यकालीन अंतराळविश्वातिल अंतराळमोहिमेतील अंतराळवीरांना निश्चितच फायदा होईल आम्ही पुन्हा एकदा चंद्रावर पोहोचलो आहोत असे मत नासाचे Administrator Bill Nelson ह्यांनी व्यक्त केले

आता 14 दिवस Odysseus यानातील पेलोडच्या सहाय्याने ह्या दक्षिण धृवावरील मानवाला अज्ञात असलेली पुरातन काळातील सजीवांच्या अस्तित्वाची माहिती आणी ईतर सायंटिफिक माहिती गोळा करेल ह्या भागातील भौगोलिक स्थिती,Geological, Magnetic field आणी ईतर भुगर्भिय व भुपृष्ठीय संशोधीत माहिती गोळा करुन ती पृथ्वीवर पाठवेल शिवाय भविष्यकालीन अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांना राहण्ययोग्य पोषक वातावरण असलेली जागा शोधेल आणी यानातील अत्याधुनिक कँमेऱ्याच्या सहाय्याने फोटो काढून पाठवेल ह्या भागात शास्त्रज्ञाना ह्या आधी बर्फाचे अस्तित्व आधळले असल्यामुळे तेथील पाणवठ्याची ठिकाणे पाण्याचे स्रोत असलेल्या ठिकाणाचा शोध घेईल अंतराळवीरांना तेथून पृथ्वीवर संदेश पाठविण्यासाठी योग्य जागा शोधेल शिवाय चंद्रावर यान ऊतरवताना ह्या आधीच्या अपोलो मोहिमेतील अंतराळवीरांना व अंतराळयानाला हवेत ऊडालेल्या धुळीमुळे समस्या निर्माण झाली होती कारण ह्या धुळीचे कण हवेतच तरंगत होते यानावर जमलेली धुळ निघत नव्हती आर्टिमस मोहिमेतील आणी भविष्यकालीन मोहिमेतील अंतराळयान व अंतराळवीरांना ह्याचा त्रास होऊ नये म्हणून तेथील धुलीकणांचे संशोधनही करण्यात येणार आहे त्या साठी यानात अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात आली आहे

ह्या माहितीचा ऊपयोग आर्टिमस मोहिमेतील अंतराळविरांच्या चांद्रमोहिमेसाठी होईल आणी भविष्यकालीन व्यावसायिक मोहिमेतील अंतराळवीरांसाठीही होईल व्यावसायिक मोहीमेतील खाजगी कंपनींंचे अंतराळयान ऊतरण्यासाठी आणी भविष्यातील तेथून परत पृथ्वीवर येण्यासाठी तेथून ऊड्डाणासाठी वाहनतळ म्हणून वापरण्यासाठी होणार असल्याने शास्त्रज्ञ चंद्रावरील अशा जागेचा शोध घेत आहेत पृथ्वीसारखे पोषक वातावरण व पिण्यायोग्य पाण्याचा शोध लागल्यास भविष्यकालीन मानवी निवासासाठीही ह्या मोहिमेचा ऊपयोग होणार आहे 

चंद्रावर 15 दिवसच सुर्याचा प्रकाश पडत असल्याने आणी यानातील यंत्रणा सौरऊर्जेवर कार्यान्वित होत असल्यमुळे यान 14 दिवस चंद्रावर कार्यरत राहील नतंर काहीकाळ यान सुप्ताअवस्थेत राहील

Monday 12 February 2024

नासाच्या Axiom 3 मोहमेतील अंतराळवीर पृथ्वीवर पोहोचले

 The Axiom Mission 3 crew members are seated inside the SpaceX Dragon spacecraft preparing for their undocking from the International Space Station. Credit: NASA TV

 Axiom -3 मोहिमेतील चार अंतराळवीर Space-X-Crew Dragon मधून पृथ्वीवर परतण्यासाठी निघताना -फोटो नासा संस्था

नासा संस्था -9 फेब्रुवारी 

नासाच्या Axiom 3 मोहमेतील अंतराळवीर Michael Lopez Alegria ,Walter Villadei, Marcus Wandt आणी  Alper Gezeravci त्यांचे स्थानकातील वास्तव्य संपवून 7 फेब्रुवारीला सकाळी 9.20 मिनिटांनी(EST)  स्थानकातून पृथ्वीवर येण्यासाठी स्थानकाबाहेर पडले आणि 9 फेब्रुवारीला शुक्रवारी सकाळी 8.30 मिनिटांनी(EST) पृथ्वीवर पोहोचले Space X Crew Dragon Freedom ह्या चार अंतराळवीरांसह अमेरिकेतील फ्लोरीडामधील Daytonaयेथील समुद्राच्या खाडीत सुरक्षीत खाली उतरले 

पृथ्वीवर परतण्याआधी ह्या अंतराळवीरांचा स्थानकात Farewell ceremony पार पडला त्या वेळी ह्या चारही अंतराळवीरांनी स्थानकातील आमचा मुक्काम वाढला तरीही मोहीम 70 मधील सर्व अंतराळवीरांनी आम्हाला खूप सहकार्य केले आमचे स्थानकातील दिवस मजेत गेले त्या साठी स्थानकातील सर्व अंतराळवीरांचे Axiom संस्थेचे आमच्या देशाचे आणि नासाचे आभार! त्यांच्यामुळेच आम्हाला इथे येण्याची,राहण्याची,संशोधन करण्याची संधी मिळाली असे मनोगत व्यक्त केले स्थानकातील अंतराळवीरांनी देखील ह्या अंतराळवीरांचा अंतराळ प्रवास सुरक्षित व्हावा म्हणून शुभेच्छा दिल्या

 

 Axiom मोहीमेतील अंतराळवीर परतण्याआधी स्थानकातील Farewell Ceremony दरम्यान अकरा अंतराळवीरांसह एकत्रीत -फोटो-नासा

अंतराळवीर Andreas- "आता Axiom -3 मधील अंतराळवीर पृथ्वीवर परतत आहेत सगळ्या चांगल्या गोष्ठी लवकर संपतात त्यांच्या सोबतचा काळ खूप मजेत गेला खराब हवामानामुळे त्यांना परतण्यास वेळ झाला पण आम्ही आमच्या कामातून वेळ काढून एकत्र वेळ घालवला Marcus बरोबर संध्याकाळी घालवलेला वेळ कायम स्मरणात राहील Happy Journey To All !"

अंतराळवीर Jasmin -मला हे चार अंतराळवीर स्थानकात राहायला येणार होते तेव्हा आम्ही अकरा अंतराळवीर स्थानकात कसे राहणार अशी काळजी होती पण ह्या चौघांनी छान काम केले त्यांच्या सोबतचा काळ मजेत गेला जरी आम्ही त्यांच्या सोबत स्थानकात दोनअडीच आठवडेच राहिलो तरीही आमचा बॉण्ड आम्ही पृथ्वीवर परतल्यानंतरही कायम असाच राहील आता मी अभिमानाने सांगू शकते कि,स्थानकात नऊ देशातील अकरा अंतराळवीरांसह आम्ही वास्तव्य केल एकत्रीत संशोधनात सहभागी झालो हि माझ्यासाठी गौरवास्पद बाब आहे म्हणूनच हे Inter National Space Station स्पेशल आहे हे चारही अंतराळवीर सुखरूप पृथ्वीवर पोहोचावेत हि शुभेच्छा !

 

 Space X Crew Dragon Freedom Axiom मोहिमेतील चार अंतराळवीरांसह Daytona खाडीत उतरले -फोटो नासा संस्था

नासाच्या व्यावसायिक अंतराळ मोहिमे अंतर्गत Axiom मोहिमेतील हे चार अंतराळवीर 18 जानेवारीला दोन आठवड्यांसाठी स्थानकात वास्तव्यास गेले होते पण लँडिंगच्या ठिकाणच्या खराब हवामानामुळे हे अंतराळवीर पूर्व नियोजित वेळेत पृथ्वीवर परतू शकले नाहीत त्यांचा स्थानकातील मुक्काम वाढला त्या मुळे स्थानकातील अठरा  दिवसांच्या वास्तव्यानंतर हे चारही अंतराळवीर नऊ फेब्रुवारीला पृथ्वीवर परतले अंतराळ प्रवासासह ह्या अंतराळवीरांनी बावीस दिवसात हि मोहीम पूर्ण केली ह्या अंतराळवीरांनी त्यांच्या स्थानकातील वास्तव्यादरम्यान तेथे सुरु असलेल्या तीस सायंटिफिक संशोधनात सहभाग नोंदविला 

Space X Crew Dragon अंतराळातील पृथ्वीची कक्षा भेदून पृथ्वीवर पोहोचुन खाली उतरताच नासाची Recovery Vessels तेथे पोहोचली नासाच्या Recovery Vessels मधील नासाच्या टीमने Space X Crew Dragon आणि अंतराळवीरांना बोटीपर्यंत आणले

Space X Crew Dragon  Shannon Recovery बोटी जवळ पोहोचताच Shannon Recovery बोट आणि Dragon मधील Docking आणि Hatching प्रक्रिया पूर्ण झाली नासाच्या Recovery टीमने ह्या अंतराळवीरांचे प्राथमिक चेकअप केल्यानंतर अंतराळवीर Dragon मधून बाहेर पडले स्थानकातील वास्तव्यादरम्यान झिरो ग्रॅव्हीटीत तरंगत्या अवस्थेत राहिल्यामुळे पृथ्वीवरील वातावरणात प्रवेश करताना उभे राहून पाऊल टाकताना,चालताना त्यांना थोडा वेळ लागला  त्या नंतर आवश्यक चेकअप नंतर ह्या अंतराळवीरांना नासाच्या विमानाने नासाच्या Florida Space Center मध्ये नेण्यात आले तेथून आवश्यक प्रक्रिये नंतर त्यांना त्यांच्या गावी पोहचवण्यात येणार आहे

Sunday 4 February 2024

नासाच्या HERA मोहिमेतील चार धाडसी प्रतिनिधी नासा संस्थेतील शास्त्रज्ञ निर्मित क्रुत्रीम मंगळ भूमीत राहायला गेले

 

 C7M1 Group

नासाच्या HERA मोहिमेतील धाडसी प्रतीनिधी Kamak Eladi,Susan Hilbig, Abhishek Bhagat आणी Carli Domenico शास्त्रज्ञ निर्मित क्रुत्रीम मंगळभुमीत प्रवेश करण्याआधी -फोटो -नासा संस्था

 

 नासा संस्था -27 जानेवारी

नासाच्या भविष्य कालीन मंगळ मोहिमेत अंतराळवीर मंगळावर जाणार आहेत तिथे मानवी वास्तव्यासाठी पृथ्वी सारखे पोषक वातावरण व ठिकाणाचा शोध घेऊन मंगळावरील संशोधित माहिती मिळवणार आहेत ह्या मोहिमेची पूर्वतयारी सध्या नासा संस्थेतील शास्त्रज्ञ करीत आहेत त्या साठी नासाच्या J.PL संस्थेतील शास्त्रज्ञांनी  संस्थेतील मोकळ्या जागेत मंगळासारखे वातावरण असलेली क्रुत्रीम मंगळभूमी निर्मित केली आहे मंगळ मोहिमेतील अंतराळविरांची मोहीम सुरक्षित होण्यासाठी आणी मंगळावरील वातावरणाचा मानवी आरोग्यावर काय परिणाम होतो हे संशोधीत करण्यासाठी HERA मोहीम राबविण्यात येत आहे ह्या आधी CHEPEA मोहीमे अंतर्गत चार धाडसी नागरिक ह्या शास्त्रज्ञ निर्मित प्रुथ्वीवरील क्रुत्रीम मंगळ भुमीत एक वर्षासाठी रहायला गेले आहेत आता नासाच्या HERA मोहिमेतील चार धाडसी प्रतिनिधी 26 जानेवारीला नासा संस्थेतील शास्त्रज्ञ निर्मित मंगळ भूमीत राहायला गेले आहेत ह्या मोहिमे अंतर्गत अभिषेक भगत, Carli Domenico, Kamak Ebadi आणी Susan Hilbig ह्या चौघांना 26 जानेवारीला ह्या क्रुत्रीम मंगळभुमीत प्रवेश केल्यानंतर बंदिस्त करण्यात आले असून 45 दिवसानंतर हे चौघे बाहेर येतील

अभिषेक भगत भारतीय आहेत त्यांनी नागपूर युनिव्हर्सिटीतुन BE (Electrical) केले असून त्यांनी ME Electrical -California ME(Computer Science)-Verginia Masters in Space System -Florida मध्ये केले आहे आणी ते US Army मध्ये Research Engineer पदी कार्यरत आहेत Carli Domenico -San Antonio Texas येथील आहेत त्या Neuro Scientists आहेत Kamak Ebadi नासाच्या California मधील JPL संस्थेत Robotic Technologists आहेत ते नासाच्या मंगळ मोहिमेतील Perseverance Space Flight Operation टिममध्ये,Mars Sample return mission मध्ये तसेच Artemis Programm मध्ये सहभागी आहेत Susan Hilbig North California मधील Durham येथील आहेत त्या Duke University Emergency Department मध्ये Physician Assistant पदी कार्यरत आहेत 

मंगळमोहिमेतील अंतराळवीर प्रत्यक्ष मंगळावर जाण्याआधी मंगळासारख्या वातावरणात राहिल्यावर मानवी शारीरावर काय विपरीत परिणाम होतो ह्या विपरीत अवस्थेत मानवी शरीर त्याला कसे सामोरे जाते त्यांच्यात काय मानसिक बदल होतात ह्या विषयीचे संशोधन करण्यासाठी हि मोहीम राबविण्यात येत आहे हे चार धाडसी नागरिक मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांचे प्रातिनिधित्व करणार आहेत हे धाडसी प्रतीनिधी आता 45 दिवस ह्या भुमीत वास्तव्य करणार असून तेथील संशोधनात सहभागी होणार आहेत 

मंगळ मोहिमेतील अंतराळवीर प्रुथ्वी पासुन हजारो मैल दुर  अंतरावर अंतराळप्रवास करणार आहेत तेव्हा त्यांना पृथ्वीवरील लोकांशी त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधता येणार नाही म्हणून त्यांना सगळ्यांपासून दुर ह्या भुमीत बंदिस्त करण्यात आले आहे हे अंतराळवीर त्या काळात ह्या क्रुत्रीम मंगळभुमीतुन बाहेर पडु शकणार नाहीत त्यांच्या कुटुंबीयांशी किंवा बाहेरच्या कोणाशीही संपर्क साधु शकणार नाहीत फक्त नासा संस्थेतील प्रमुख त्यांच्या संपर्कात असतील 

 हे अंतराळवीर मंगळावर जाण्यासाठी अंतराळप्रवास करतील तेव्हा काही कारणाने पृथ्वीवरील नासा संस्थेशी संपर्क साधण्यास वेळ झाला किंवा संपर्क यंत्रणा बंद पडली किंवा अचानक काही समस्या उद्भवल्यास यानात बिघाड झाल्यास त्या वर कुशलतेने मात करून परिस्थतीवर नियंत्रण मिळवुन पुढे मार्गक्रमण करता यावे म्हणून ह्या अंतराळविरांना आपदकालीन  Operation, Maintainance Training देण्यात येणार आहे हे चार नवीन प्रतिनिधी तेथे Human health Studies वर सुरू असलेल्या वेगवेगळ्या अठरा संशोधनात सहभागी होणार आहेत ह्या पृथ्वीवरील क्रुत्रीम मंगळभुमीतील बंदिस्त वातावरणात राहिल्यावर मानवी आरोग्यावर शारीरिक मानसिक व मानवी प्रतिकार शक्तीमधे काय बदल जाणवतात ह्याचे निरीक्षण नोंदवून संशोधीत माहिती गोळा करणार आहेत 

नासा संस्थेतील जगभरातील सात देशातील शास्त्रज्ञ ह्या प्रतिनिधीच्या संपर्कात असतील आणी त्यांना संशोधनादरम्यान मार्गदर्शन करतील ह्या चौघा प्रतिनिधीचा हा 2024 मधला पहिला ग्रुप असुन ह्या पुढील संशोधनासाठी वेगवेगळ्या ग्रुपमध्ये वेगवेगळ्या प्रतिनिधीचा समावेश असेल हे चौघे प्रतिनिधी 11 मार्चला नासाच्या ह्या क्रुत्रीम मंगळभुमीतुन बाहेर पडतील