Saturday 29 July 2023

Artemis मोहिमेतील अंतराळविरांच्या स्पेससुटवरील Moon Dust Cleaning साठी बार्बी डॉलचा वापर

 नासा संस्थेत बार्बी डॉलच्या Space Suit वर लिक्विड नायट्रोजन स्प्रे मारून Moon Dust Cleaning चा प्रयोग करताना - फोटो -WSU

नासा संस्था -24 जुलै

नासा संस्थेच्या Artemis मोहिमेची तयारी अंतीम टप्प्यात आली आहे ह्या मोहिमेतील अतराळवीरांचे अंतीम ट्रेनिंग सुरु आहे पुढच्या वर्षी हे अंतराळवीर चंद्रावर जाणार आहेत तेथील भुमीवर पाऊल ठेवणार आहेत आणी चंद्रभूमीवरील वातावरणात संशोधन पण करणार आहेत अंतराळवीर चंद्रभूमीवर प्रवेश करतात तेव्हा ते तेथील वातावरणातील धुळ,व रोगजंतूच्या संपर्कात येतात आणी त्यांच्या स्पेससुटवर,यानावर,यानातील उपकरणावर धुळ जमते हि चंद्रभुमीवरील धुळ साफ करणे अत्यंत कठीण असल्याचे आधीच्या अपोलो चांद्रमोहिमेतील अंतराळविरांमुळे शास्त्रज्ञांना कळाले  

चंद्रभुमीवरील वातावरणातील विद्युतभारीत धुलीकण स्पेससुटवर धुळीसोबत जमतात आणी हे धुलीकण अत्यंत चिकट असतात त्यामध्ये टोकदार वाळूकणही असतात  ब्रशने साफ केल्यानंतरही स्पेससूट वर चिकटून राहतात  स्पेससुटवर हे कण कोठेही चिकटल्यामुळे स्पेससुट फाटण्याची शक्यता असते स्पेससूट व्यवस्थित Lock न झाल्याने leakageची समस्या ऊद्भवते अंतराळवीरांच्या अंतराळ मोहिमेत,स्पेसवॉक दरम्यान देखील अंतराळविरांना ह्या समस्यांना सामोरे जावे लागते हे ईलेक्ट्रोभारीत धुलीकण आणि इतर रोगजंतू अंतराळविरांच्या श्वासोच्छ्वासाद्वारे शरीरात प्रवेश करतात त्यामुळे संसर्ग होऊन फुफ्फुसाला सुज येणे,घसा सुजणे,सर्दी आणी ताप येऊन तब्येतिला धोका निर्माण होणे ह्या सारख्या समस्या उद्भवतात म्हणूनच नासा संस्थेत Artemis मोहिमेतील अंतराळविरांच्या सुरक्षेसाठी स्पेससुट वरील Moon Dust Cleaningसाठी नवनवीन प्रयोग करण्यात येत आहेत नवनवीन ऊपक्रम राबविण्यात येत आहेत   

ह्याच ऊपक्रमा अंतर्गत नासा संस्थेने Artemis मोहिमेसाठी नागरिकांकडून नाविन्यपूर्ण संकल्पना सादर करण्याची स्पर्धा जाहीर केली होती ह्या स्पर्धेत Washington University येथील मेकॅनिकल आणी मटेरिअल्स इंजिनीअरिंग कॉलेज चे Associate प्रोफेसर Jacob Leachman आणि त्यांच्या विध्यार्थ्यांच्या टीमने Artemis Award जिंकला त्यांनी संशोधित केलेला अंतराळविरांच्या स्पेससुट वरील Moon Dust Cleaning चा यशस्वी प्रयोग त्यांनी नुकताच नासा संस्थेतील शास्त्रज्ञांपुढे करून दाखविला त्या साठी त्यांनी बार्बी डॉलचा वापर केला गरम फ्रायपॅन वर पाणी टाकल्यावर जसे पाण्याचे थेंब हवेत ऊडुन वाफेत रुपांतरीत होतात तसेच स्पेससुटवरील धुलीकण देखील नायट्रोजन स्प्रे मारल्यावर हवेत ऊडुन नाहिसे होतात व स्पेससुट खराब न होता स्वच्छ होतो असे ह्या टिमच्या प्रोफेसरांनी सांगितले

  1965 मध्ये Mattel कंपनीने अंतराळविरांसारखा सोनेरी स्पेससुट परीधान केलेली अंतराळवीर बार्बी डॉल बाजारात आणली होती Mattel कंपनीचे Co Founder Ruth Handler ह्यांनी तरुणींनी अंतराळ क्षेत्रात करिअर करावे ह्या हेतूने बार्बीला ह्या वेषात बाजारात आणले आणि हि अंतराळवीर बार्बी तरुणीच्या भावी आयुष्यातील स्वप्न साकारणारी ठरली त्यानंतर पायलट आणी अंतराळविश्वातील अनेक रुपात बार्बी बाजारात आली आणी तरुणीमध्ये प्रेरणादायी ठरली नासामध्ये पहिल्या महिला अंतराळविराची निवड होण्याआधीच बार्बी खेळण्यातील अंतराळवीर झाली होती आणी आता खरोखरच बार्बीचा आर्टिमस मोहिमेतील Moon Dust Cleaning प्रयोगासाठी अंतराळविश्वात प्रवेश झाला आहे `

Two Barbie dolls float in microgravity in front of a window on the International Space Station. Both dolls wear white flight suits with blue trim inspired by astronaut attire. The doll on the left is caucasian with blond hair, and the doll on the right is Black with natural curls. Through the window, the edge of Earth can be seen, with blue ocean and white swirling clouds, in contrast to the inky expanse of space beyond. Credit: Mattel

नासा संस्थेतील शास्त्रज्ञांनी बार्बी डॉलला अंतराळविरांसारख्या कापडाचा स्पेससुट घालून त्यावर स्पेससुट Dust Cleaningचा प्रयोग केला आहे ह्या आधी विजेते विद्यार्थी आणी त्यांच्या Associate Professor Jacab Leackman ह्यांनी स्पेससुटच्या कापडाचा तुकडा वापरला त्यावर ज्वालामुखीच्या राखेचा थर लावला आणी चंद्रावरील वातावरणा सारख्या वातावरणात बंद काचेच्या Box मध्ये हा तुकडा ठेऊन त्यावर लिक्वीड नायट्रोजनचा स्प्रे मारला तेव्हा कापडावरील सर्व धुळ ऊडुन कापड स्वच्छ झाले होते हा प्रयोग सिलेक्ट झाल्यानंतर नासा संस्थेतील शास्त्रज्ञांनी त्या प्रयोगाची चाचणी केली 

आता ह्याच प्रयोगासाठी नासा संस्थेतील शास्त्रज्ञांनी बार्बी डॉलचा वापर केला बार्बीला अंतराळविरांसारखा स्पेससुट घालून त्यावर ज्वालामुखीची राख लावली ह्या राखेत चंद्रावरील वातावरणातील धुळ आणी मातीतील समान घटक असल्याने त्याचा वापर करण्यात आला त्यानंतर चंद्रावरील वातावरणा सारखे कृत्रिम वातावरण असलेल्या चेंबर मध्ये बार्बी डॉल ठेऊन 360 अंशात सर्व बाजूने बार्बी फिरवत स्पेससुटवर लिक्विड नायट्रोजनचा स्प्रे मारण्यात आला तेव्हा  नायट्रोजनच्या वाफेसोबत स्पेससुट वरील विद्युतभारीत अपायकारक धूलिकण कण देखील नष्ट झाल्याचे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले

Monday 17 July 2023

भारताचे चांद्रयान -3 अंतराळयान चंद्राच्या दिशेने मार्गस्थ

  Image

   श्रीहरीकोटा येथील उड्डाण स्थळावरून चांद्रयान- 3 अंतराळात झेपावताना -फोटो इसरो संस्था

ISRO संस्था - 15 जुलै 

भारताच्या चांद्रमोहिमे अंतर्गत चांद्रयान -3 ह्या अंतराळयानाचे 14 जुलैला इसरो संस्थेच्या श्रीहरीकोटा येथून यशस्वी उड्डाण करण्यात आले श्रीहरिकोटा येथील उड्डाण स्थळावरून दुपारी 2.35 मिनिटाला LMV-3-M4रॉकेटच्या साहाय्याने चांद्रयान -3 अंतराळयान चंद्रावर जाण्यासाठी अंतराळात झेपावले उड्डाणानंतर काही वेळातच यान रॉकेट पासून वेगळे झाले आणि चंद्राच्या दिशेने मार्गस्थ झाले तेव्हा युनियन मिनिस्टर जीतेंद्रसिंह,इसरो संस्थेतील प्रमुख शास्त्रज्ञ S.Somnath आणि ह्या मोहिमेतील इतर सहभागी शास्त्रज्ञ ,इंजिनीअर्स,तंत्रज्ञ आणि सर्व कर्मचाऱ्यांनी उभे राहून टाळ्या वाजवत ह्या मोहिमेच्या यशस्वी शुभारंभाचा आनंद व्यक्त केला इसरो संस्थेतील ह्या मोहिमेतील महिला शास्त्रज्ञांनी देखील एकमेकांचे अभिनंदन करत त्यांचा आनंद व्यक्त केला आणि त्यांचे फोटो सोशल मीडियावरून शेअर केले इसरो संस्थेचे माजी डायरेक्टर Dr .P.V. Venkitakrishnan ह्यांनी विमान प्रवासादरम्यान चांद्रयान 3च्या उड्डाणाचा विमानातून घेतलेला व्हीडिओ सोशल मीडिया वरून शेअर केला आहे

हा उड्डाण सोहळा पाहण्यासाठी संस्थेबाहेर हजारो लोक उपस्थित होते इसरो संस्थेतर्फे ह्या सोहळ्याचे लाईव्ह प्रसारण करण्यात आले होते संस्थेतील निवेदक ह्या मोहिमेची माहिती टि.वी.स्क्रीन वरून नागरिकांना देत होते चांद्रयानाच्या चंद्राच्या दिशेने नियोजित उड्डाण प्रक्रिया पार पडल्यानंतर युनियन मिनिस्टर जितेंद्र सिंह आणि इसरो संस्थेचे चेअरमन S.Somnath ह्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले आणि हि मोहीम राबविण्यासाठी परवानगी देऊन आर्थिक साह्य दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले त्यांनी ह्या मोहिमेतील सहभागी सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले ह्या वेळी सोमनाथन म्हणाले,"कि लहानपणापासूनच मला रॉकेट बद्दल आकर्षण होते मला रॉकेट एखाद्या लहान मुलासारखे वाटते लहान मुलांना जसे आपण सर्व शिकवतो तशीच प्रक्रिया रॉकेट निर्मिती पासून launching पर्यंतची असते त्या चमकत्या रॉकेटने अंतराळात यशस्वी झेप घेतलेली पाहतानाचा क्षण माझ्यासाठी आनंददायी होता!"

Image

                  उड्डाण सोहळा पाहण्यासाठी जमलेले नागरिक -फोटो -इसरो संस्था 

चांद्रयान -3 आता 41 दिवसांनी चंद्रावर पोहोचेल सध्या अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेत फिरत असून बावीस दिवस यान पृथ्वीच्या कक्षेत फिरेल आणि पृथ्वीच्या बाहेरील वातावरणाच्या आवरणातून हळू,हळू पुढे मार्गक्रमण करेल ह्या दरम्यान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणा बाहेर पडण्यासाठी वेग व भ्रमण कक्षेवर नियंत्रण ठेवेल हे यान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत ओढल्या जाऊ नये म्हणून प्रयत्न करेल पृथ्वीच्या वातावरणातील शेवटच्या कठीण आवरणाचा थर भेदून कक्षेबाहेर पडण्यासाठी यानाचा वेग प्रचंड वाढवेल आणि यान त्या नंतर चंद्राच्या कक्षेत शिरण्यासाठी प्रवास करेल सहा दिवसांच्या अंतराळ प्रवासानंतर चंद्राच्या 100k.m.च्या कक्षेजवळ पोहोचल्यावर यान वेगावर नियंत्रण ठेवेल आणि वेग कमी,कमी करत चंद्राच्या पृष्ठभागाच्या दिशेने खाली येत कमी वेगाने हळुवार पणे चंद्रभूमीवर उतरण्याचा प्रयत्न करेल ह्या आधीच्या मोहिमेतील विक्रम लॅण्डर अत्यंत वेगाने चंद्रावर उतरले होते पण वेग नियंत्रणात न आल्याने तेथील भूमीवर आढळले आणि स्फोट होऊन नष्ट झाले होते ह्या वेळी असे होऊ नये म्हणून शास्त्रज्ञांनी हि खबरदारी घेतली आहे पूर्वीच्या विक्रम लॅण्डर मधील त्रुटी काढून यानात आवश्यक बदल करण्यात आले आहेत

चांद्रयान चंद्रभूमीवरील दक्षिण दृवावर सुखरूप उतरल्यानंतर ह्या यानातून प्रज्ञान रोव्हर बाहेर पडेल आणि भारताच्या चंद्रावरील चांद्रमोहीमेची सुरुवात होईल ह्या चांद्रयानात अत्याधुनिक रोबोटिक उपकरणे,कॅमेरे,X Ray Spectrometer आणी  Lunar Seismic Activity मापक उपकरण बसविलेली असल्यामुळे हे यान तेथील भूमीवर फिरून तेथील भविष्यकालीन अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांच्या निवासासाठी उपयुक्त पोषक वातावरण असलेली जागा शोधेल शिवाय चंद्रावरील पुरातन सजीव सृष्टीला दुजोरा देणारे पुरावे गोळा करेल यानातील संशोधित उपकरणाच्या साहाय्याने संशोधनास सुरवात करेल चंद्रावरील भुपृष्ठावरील आणि भूगर्भातील माती,खडक ,मिनरल्स आणि पाण्याच्या अस्तित्वाचा शोध घेईल आणि त्याचे फोटो आणि संशोधित माहिती पृथ्वीवर पाठवेल ह्या आधीच्या मोहिमेतील  शास्त्रज्ञांना त्या भागात डोंगरदऱ्या आणि पाण्याच्या अस्तित्वाच्या खुणा आढळल्या आहेत ह्या आधीच्या मोहिमेत विक्रम लॅण्डर जरी नष्ट झाले असले तरीही यानासोबत चंद्रावर गेलेले ऑर्बिटर अजूनही तेथे कार्यरत आहे ह्या ऑर्बिटरवरून मिळालेल्या माहितीवरून चंद्राचा दक्षिण भाग पृथ्वीच्या दक्षिण दृवासारखाच अत्यंत थंड आहे आणि तेथे बर्फ़ाचे अस्तित्व आहे त्या मुळे तिथे पाण्याचे अस्तित्व असू शकते म्हणून ह्या मोहिमेत चांद्रयान चंद्राच्या दक्षिण भागात पाठविण्यात आले आहे ह्या आधीच्या नासाच्या मोहिमेत देखील हीच संशोधित माहिती मिळाली आहे त्या मुळेच अमेरिकेच्या Artemis मोहिमेतील अंतराळवीर पुढच्या वर्षी चंद्राच्या ह्याच भागात उतरणार आहेत

परंतु चंद्राचा हा भाग पंधरा दिवस अंधारात असतो आणि पंधरा दिवसच प्रकाशात त्या मुळे आपले चांद्रयान जेव्हा तेथे पोहोचेल तेव्हा तेथे प्रकाश असेल अशी शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे ह्या मोहिमेतील संशोधित माहितीचा उपयोग भविष्यकालीन मोहिमेतील अंतराळवीरांना तसेच भविष्यकालीन चंद्रावरील मानवी वास्तव्यासाठी ऊपयुक्त आणी पाणी असणारे ठिकाण शोधण्यासाठी होईल हि मोहीम यशस्वी झाल्यास भारत चंद्रावर पोहचणारा चवथा देश ठरेल ह्या आधी अमेरिका,रशिया आणि चीनची चांद्रमोहीम यशस्वी ठरली आहे

Tuesday 11 July 2023

नासाच्या शास्त्रज्ञ निर्मित कृत्रिम मंगळ भूमीत एक वर्षाच्या निवासासाठी चार धाडसी नागरिकांचा शुभारंभ

 CHAPEA Ingress

 नासाच्या J.PL संस्थेतील शास्त्रज्ञ निर्मित कृत्रिम मंगळ भूमीत प्रवेश करताना चार धाडसी उमेदवार -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -10 जुलै

सध्या नासाचे Curiosity मंगळयान व Perseverance मंगळयान मंगळावर यशस्वी संशोधन करत आहेत  Perseverance यानासोबत मंगळावर पोहोचलेल्या Ingenuity mars Helicopterने देखील नुकतीच तिथल्या आकाशात 50 वी यशस्वी भरारी मारून मंगळावरील महत्वपूर्ण संशोधित माहिती गोळा करून पृथ्वीवर पाठविली आहे  शिवाय भविष्यकालीन मंगळ मोहिमेत मानव निवासासाठी पृथ्वीसारख्या पोषक वातावरणाचाही शोध घेतल्या जात आहे इथे पृथ्वीवरील नासा संस्थेतही भविष्यकालीन मंगळ मोहिमेची जोरदार तयारी सुरु आहे आगामी मानवसहित मंगळ मोहिमेसाठी उपयुक्त वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत 

  Kelly Haston, CHAPEA mission 1 commander, offers final remarks alongside her crewmates (from left to right: Anca Selariu, Ross Brockwell, Nathan Jones) before entering the habitat.

 नासाच्या Mars Dune Alpha ह्या शास्त्रज्ञ निर्मित कृत्रिम मंगळभूमीत प्रवेश करण्याआधी मनोगत व्यक्त करताना कमांडर Kelly Haston ,Anca Selaria ,Ross Brockwell आणि Nathan Jones -फोटो -नासा संस्था

नासाच्या Crew Health & Performance Exploration Analog (CHAPEA) मोहिमे अंतर्गत नासाच्या J.PL lab मध्ये शास्त्रज्ञांनी कृत्रिम मंगळ भूमी निर्माण केली आहे नासाचे मंगळ मोहिमेतील अंतराळवीर प्रत्यक्ष मंगळावर जाण्याआधी आणि तिथे भविष्यकालीन मानवी वसाहत निर्माण करण्याआधी मंगळासारखे वातावरण आणि भूमी असलेल्या ह्या शास्त्रज्ञ निर्मित मंगळभूमीत राहिल्यावर मानवी शरीरावर,आरोग्यावर काय परिणाम होतो हे संशोधित करण्यासाठी हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे ह्या  प्रयोगशील उपक्रमात सहभागी होऊन ह्या कृत्रिम मंगळ भूमीत एक वर्ष राहण्यासाठी धाडसी नागरिकांना नासा संस्थेने संधी उपलब्ध केली होती ह्या अभिनव उपक्रमा अंतर्गत निवड झालेल्या चार शिकाऊ अंतराळवीरांचा समावेश असलेले तीन ग्रुप तयार करण्यात आले होते आणि त्यातीलच निवडक चार धाडसी उमेदवारांच्या पहिल्या ग्रुपला आता नासाच्या Johnson Space Center संस्थेतील मंगळासारख्या कृत्रिम  वातावरण निर्मिती केलेल्या छोट्या खोलीत एक वर्ष निवास करण्यासाठी पाठवण्यात आले आहे भविष्यकालीन मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांच्या सुरक्षित मंगळ निवासासाठी हा प्रयोग करण्यात येणार असून त्याची सुरवात आता झाली आहे 

NASA’s simulated Mars habitat includes a 1,200-square-foot sandbox with red sand to simulate the Martian landscape. The area will be used to conduct simulated spacewalks or “Marswalks” during the analog missions. 

नासा संस्थेतील शास्त्रज्ञांनी लाल वाळूचा उपयोग करून तयार केलेली मंगळासारखे वातावरण निर्मित पृथ्वीवरील कृत्रिम  मंगळभूमी -फोटो -नासा संस्था   

25 जूनला ह्या मोहिमेतील पहिल्या ग्रुप मधील कमांडर Kelly Haston  -(Research Scientist), Flight  Engineer- Ross  Brockwell-, Medical Officer -Nanthan Jones आणी Microbiologist -Anca Selariu   हे चार धाडसी निवडक उमेदवार एक वर्षाच्या वास्तव्यासाठी ह्या पृथ्वीवरील कृत्रिम मंगळ सृष्टीत गेले आहेत नासा संस्थेतील ह्या मोहिमेतील प्रमुख Grace Douglas, Director-Vanessa Weik ,Judy Hayes (Human health & Performance Director ) ह्यांच्या उपस्थितीत ह्या चार उमेदवारांना ह्या Mars Habitat मध्ये एक वर्षासाठी बंदिस्त करण्यात आले ह्या अभिनव  उपक्रमाच्या शुभारंभा आधी ह्या चार धाडसी उमेदवारांचे नासा संस्थेतर्फे स्वागत करण्यात आले आणि ह्या अभिनव प्रयोगात सहभागी होऊन त्या साठी घेतलेल्या ट्रेनिंग दरम्यानच्या अथक परिश्रमाबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले त्यांना ह्या शास्त्रज्ञ निर्मित पृथ्वीवरील कृत्रिम मंगळ भूमीतील प्रवेशासाठी आणि एक वर्षांच्या वास्तव्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आत प्रवेश करण्याआधी ह्या उमेदवारांनी देखील त्यांचे मनोगत व्यक्त केले सर्वांनीच नासा संस्थेने त्यांना हि सुवर्णसंधी दिल्याबद्दल आभार मानले ह्या मोहिमेतील सहभागी सर्वांनीच त्यांना ह्या मोहिमेसाठी ट्रेनिंग दिल्याबद्दल त्यांचेही आभार मानले शिवाय त्यांचे कुटुंबीय,मित्र प्रेरणा देणाऱ्या साऱ्यांचे  विशेष आभार मानले कुटुंबियांचे आभार मानताना, निरोप घेताना काही क्षण ते भावविवश झाले पण नंतर त्यांनी सर्वांचा निरोप घेतला नासाचा हा अभिनव उपक्रम भविष्यकालीन मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांच्या सुरक्षित मंगळ निवासासाठी आहे आणि आम्ही ह्या ऐतिहासिक मोहिमेत सहभागी होऊन संशोधन करणार आहोत ह्याचा आम्हाला अभिमान वाटत आहे आम्ही आनंदित आहोत आम्ही हि मोहीम निश्चितच यशस्वी करू असे त्यांनी सांगितले शास्त्रज्ञ निर्मित मंगळ भूमीत प्रवेश करण्याआधी ह्या मोहिमेतील प्रमुखांनी Mars Dune Alpha चे चिन्ह असलेल्या झेंड्यावर त्यांच्या सह्या घेतल्या त्या नंतर ह्या उमेदवारांनी आत प्रवेश केल्यानंतर बाहेरून दार बंद करून त्यांना बंदिस्त करण्यात आले आता मंगळ मोहिमेतील अंतराळवीरां सारखेच ते एक वर्ष पृथ्वीबाहेर राहतील 

The CHAPEA mission 1 crew poses with a flag featuring their mission patch surrounded by their signatures.

 Mars Dune Alpha-भूमीत प्रवेश करण्याआधी चौघांनी सह्या केलेल्या झेंड्यासह -फोटो -नासा संस्था

ह्या मोहिमेतील ऊमेदवार Johnson Space Center मधील 1,700 sq.foot जागेत तयार केलेल्या Mars Dune Alpha ह्या 3D printing चा वापर केलेल्या खोलीत वर्षभर राहतील ह्या चौघांसाठी सेपरेट रूम असून त्यात त्यांच्या संशोधनाचे साहित्य,मेडिकलचे साहित्य,रोबोटिक उपकरण,व्यायामासाठी,झोपण्यासाठी आणि इतर आवश्यक गोष्ठीसाठीची सोय करण्यात आली आहे ह्या एक वर्षाच्या निवासा दरम्यान ऊमेदवारांना मानसिक आणी शारिरीक दृष्ठ्या काय समस्या ऊद्भवतात त्यांच्या आरोग्यात काय बदल होतात मानवी शरीर मंगळासारख्या वातावरणाला कसे सामोरे जाते ह्याचे निरीक्षण नोंदवण्यात येणार आहे आणी त्या समस्या निवारण्यासाठी ऊपाय शोधले जाणार आहेत त्या साठी नवीन Technology शोधण्यात येईल ह्या मोहिमेचा ऊपयोग भविष्यातील मंगळ मोहिमेतील अंतराळविरांना होईल अंतराळवीर प्रत्यक्षात जेव्हा मंगळावर निवास करतील तेव्हा त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून खबरदारीचे ऊपाय शोधले जातील त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा हा प्रयत्न आहे त्यासाठीच हा मोहीम पुर्व अभिनव ऊपक्रम राबविण्यात येत आहे असे Johnson Space Center चे प्रमुख शास्त्रज्ञ म्हणतात शीवाय ह्या संशोधीत माहितीमुळे भविष्य कालीन मानवसहित मंगळ मोहिमेतील अंतराळविरांसोबत सकस अन्न आणी आवश्यक गोष्टी व सामान मंगळावर पाठवण्यास मदत होईल भविष्यात मंगळावर मानवी वसाहत निर्माण करण्याचा शास्त्रज्ञांचा विचार आहे त्या दृष्टीने हे प्रयत्न सुरू आहेत

हे धाडसी उमेदवार अंतराळवीर नसल्यामुळे ह्या निवासा दरम्यान त्यांना मंगळग्रहावरील वातावरणात रहाण्यासाठी आवश्यक ट्रेनिंग देण्यात आले होते त्यांना अंतराळवीरांसारखे झिरो ग्रॅव्हीटीत राहण्याचे आणी तेथील निवासा दरम्यान कराव्या लागणाऱ्या Space Walk,Robotic operations,Habitat Maintenance,personal hygiene ह्या गोष्टींचेही  ट्रेनिंग देण्यात आले त्या मुळे ह्या शास्त्रज्ञ निर्मित मंगळभूमीच्या बाहेरील भागात हे उमेदवार संशोधना बरोबरच अंतराळवीरांसारखा Space Walkही करणार आहेत त्या साठी त्यांना स्पेस सूटही देण्यात आला आहे शिवाय ह्या मंगळभूमीत ते धान्य,भाजी,फळे वै रोपांची लागवडही करणार आहेत त्या साठी ह्या भूमीत खास मंगळावरील लाल माती,वाळू,मिनरल्सचा वापर करण्यात आला आहे 

मंगळ ग्रह पृथ्वीपासुन दुर असल्यामुळे अंतराळविरांना तेथून पृथ्वीवर संपर्क साधताना अडचण आली किंवा काही समस्या उद्भवल्यास त्यांना त्वरीत मदत पाठवता येणार नाही त्यामुळे अशा आपद्कालीन समस्येवर  मात करण्याचे ट्रेनिंगही त्यांना देण्यात आले आहे शीवाय तेथील वातावरणातील बदलामुळे येणारा मानसिक ताण किंवा ऊपकरणात अचानक काही कठीण समस्या निर्माण झाली तर आपद्कालीन संकटांशी सामना करण्यासाठी प्रशिक्षीत करण्यात आले असून हे सर्व उमेदवार नासा संस्थेच्या संपर्कात असतील नासाच्या Artemis मोहिमेअंतर्गत मानव चंद्रावर जाणार आहे त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे आगामी काळातील भविष्यकालीन मंगळ मोहीम आणि दूरवरच्या अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांसाठी आणि मानवी निवासासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल

Saturday 8 July 2023

नासाच्या Artemis मोहिमेत भारतही सहभागी

 Indian Ambassador Taranjit Sandhu signs the Artemis Accords.

 Washingtonयेथील Willard Inter Continental Hotel मधील एका कार्यक्रमात Artemis मोहिमेत भारत सहभागी झाल्यानंतर Artemis Accords वर सही करताना अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजीत संधू आणि नासाचे Administrator Bill Nelson,सोबत Nancy Jackson (Deputy Assistant ) Space Research Organization ,Space Counsellor -Krunal Joshi-फोटो नासा संस्था

 

नासा संस्था

नासाच्या Artemis मोहिमेत आजवर 26 देश सहभागी झाले आहेत ह्या आधी Canada देशाने ह्या मोहिमेत सहभाग नोंदवत Artemis Accords वर सही केल्यानंतर आता पंतप्रधान मोदींंच्या मागच्या महिन्यातील अमेरिका दौऱ्यानंतर भारताने देखील सहभाग नोंदवला आता भारत Artemis मोहिमेतील 27 वा सहभागी देश आहे

21 जुनला बुधवारी Washington येथील Willard Inter Continental Hotel मधील एका कार्यक्रमाच्या वेळी भारताने Artemis मोहीमेत सहभागी होत आर्टिमस मोहिमेच्या Artemis Accords ( कायदे आणी करार) वर सही केली नासाचे Administrator Bill Nelson ह्यांच्या ऊपस्थितीत अमेरिकेतील संयुक्त राज्याचे भारतीय राजदूत तरणजीत संधु ह्यांनी भारत देशातर्फे आवश्यक करारावर सही केली 2020 मध्ये अमेरीकेतील विदेश मंत्रालयाच्या सहकार्याने सात देशाने एकत्रीत येत Artemis Accordsची स्थापना केली होती

ह्या वेळी नासाचे Administrator Bill Nelson म्हणाले,अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Joe Biden आणी ऊपाध्यक्ष कमला हॅरिस ह्याच्या वतीने भारतासोबत पृथ्वीवर आणी अंतराळ विश्वात भागीदार होताना आम्हाला आनंद होतोय आता अंतराळ विश्वातील ऊद्दिष्ठ साध्य करण्यासाठी आम्ही करत असलेली प्रगती वेगवान झाली आहे पण फक्त ऊद्दिष्ठ साध्य करणे हा आमचा हेतु नाही तर त्या नंतर आणखी प्रगती करणे महत्त्वाचे आहे त्या साठी आपण काय करू शकतो ह्याचा विचार करणे महत्त्वाचे आहे आम्हाला शांततेने,पारदर्शकपणे एकमेकांच्या सहकार्याने ह्या मार्गावर अडीअडचणींंचा सामना करत पुढे मार्गक्रमण करायचे आहे भारताच्या सहकार्यात एकत्र काम करायला आम्ही ऊत्सुक आहोत 

संधु म्हणाले,आमचा भारत देश Artemis मोहिमेत सहभागी होऊन अंतराळविश्वात एक महत्वपुर्ण पाऊल पुढे टाकत आहे हा आमच्यासाठी महत्त्वाचा क्षण आहे आम्ही अंतराळ विश्वातील संशोधनासाठी,प्रगतीसाठी सहकार्य करण्यास वचनबद्ध आहोत भारत शक्तीशाली आहे अंतराळ विश्वात भारताने प्रगती केली आहे त्यामुळे आमचा देश अंतराळ विश्वातील शांततेला आणी प्रगतीला प्राधान्य देतो आम्हाला खात्री आहे की,आर्टिमस मोहिमेत सहभागी होऊन अद्ययावत शोध लावण्यास आम्ही निश्चितच हातभार लाऊ अंतराळातील शांततापुर्ण आणी समृध्द भविष्यकालीन संशोधनासाठी आणी मानवी प्रगतीसाठी हे आवश्यक आहे त्याचा फायदा जगभरातील सर्व लोकांना होईल

Friday 7 July 2023

नासाच्या Space X Crew -7 मोहिमेतील चार अंतराळवीर ऑगस्ट मध्ये स्थानकात राहायला जाणार

 NASA’s SpaceX Crew-7 portrait.

Space X Crew -7चे अंतराळवीर Jasmin Moghbeli, युरोपियन अंतराळवीर Andreas Mogensen जपानचे अंतराळवीर Satoshi Furukawa आणि रशियन अंतराळवीर Konstantin Borisov -फोटो -नासा संस्था 

नासा संस्था -6 जुलै 

नासाच्या Space X Crew -7 अंतराळ मोहिमेतील चार अंतराळवीर ऑगस्ट महिन्यात सहा महिन्यांच्या वास्तव्यासाठी स्थानकात जाणार आहेत नासाची अंतराळवीर Jasmin Moghbeli,जपानचे अंतराळवीर Satoshi Furukawa,युरोपियन अंतराळवीर Andreas Mogensenआणि रशियन अंतराळवीर Konstantin Borisov ह्या चार अंतराळवीरांना घेऊन Space X Crew Dragon सातव्यांदा अंतराळ स्थानकात जाणार आहे 

15 ऑगस्टला नासाच्या Kennedy Space Center Florida येथील 39 A ह्या उड्डाण स्थळावरून Space X चे Endurance अंतराळयान ह्या चार अंतराळवीरांसह Falcon 9 रॉकेटच्या साहाय्याने स्थानकात जाण्यासाठी अंतराळात झेपावेल 

ह्या मोहिमेत नासाची अंतराळवीर Jasmin Moghbeli कमांडरपद आणि युरोपियन अंतराळवीर Andreas Mogensen हे पायलटपद सांभाळणार आहेत जपानचे अंतराळवीर Satoshi Furukawa आणि रशियन अंतराळवीर Konstantin Borisov हे दोघे ह्या मोहिमेतील मिशन स्पेशॅलिस्ट पद सांभाळतील अंतराळवीर Andreas Mogensen आणि अंतराळवीर Satoshi Furukawa ह्यांची हि दुसरी अंतराळवारी असून ते दुसऱ्यांदा अंतराळ स्थानकात राहायला जाणार आहेत अंतराळवीर Jasmin Moghbeli आणि  Konstantin Borisov हे मात्र प्रथमच अंतराळ प्रवास करणार असून हे दोघे पहिल्यांदाच स्थानकात राहायला जाणार आहेत

ह्या अंतराळवीरांच्या अंतराळ स्थानकाच्या दिशेने उड्डाण,स्थानकातील Hatching ,Docking आणि अंतराळ स्थानकातील प्रवेशाचे लाईव्ह प्रसारण नासा टि वी वरून करण्यात येणार असून हौशी नागरिकांना ह्या उड्डाण सोहळ्यात सोशल मीडियावरून आभासी पद्धतीने उपस्थित राहण्याची सुवर्ण संधीही नासा संस्थेने उपलब्ध केली असून त्या साठी नासा संस्थेत नोंदणी करून परवानगी घेणे आवश्यक आहे